|
Milindaa
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:16 pm: |
| 
|
स्वागत आहे!! आता या बीबीवर काहीतरी जीभेला आणि कानाला चविष्ट वाटणारे येईल अशी अपेक्षा.
|
Moodi
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:22 pm: |
| 
|
मनःपूर्व अभिनंदन प्रिया. नव्या घरात पाहुणे आधीच दाखल. आता तुझे अनूभव जरुर लिही.  
|
Mvrushali
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:21 am: |
| 
|
अगं बाई,ही नवीन वास्तू घेतलेली नव्हती मला माहिती :-)मनापासून अभिनंदन.आता विचार शब्दबद्ध होऊ देत
|
आता या बीबीवर काहीतरी जीभेला आणि कानाला चविष्ट वाटणारे येईल अशी अपेक्षा.<<< आपने तो हमारे ज़बान की बात कह दी! प्रिया, अभिनंदन! ता.क. : उद्याचा खास दिवस आरंभाला योग्य ठरावा.
|
Robeenhood
| |
| Wednesday, September 27, 2006 - 2:01 pm: |
| 
|
(डोकावून, इकडे तिकडे पहात )येऊ का आत? (परवानगीची वाट न पहाता दण्णकन सोफ्यावर बसत) वा वा प्रिया, तुला गाठायला हुकमी जागा झाली.. दिवसेंदिवस गायब व्हायची सवय लागली होती ना तुला! आता गाण्यांची अलीबाबाची (किंवा अली बाईची )गुहा उघडणार तर... वर खमंग commentary सह..
|
Karadkar
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:20 pm: |
| 
|
प्रिया, तुला house warming gift माझ्याकडुन. नवरात्र आहे ना म्हणुन देवीचे चित्र बरंका.
|
Priya
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:43 pm: |
| 
|
मिलिंदा, मुडी, वृषाली, गजानन, रॉबिन, मिनोती - मनापासून धन्यवाद. तुमच्या अपेक्षा खुप मोठ्या आहेत. इथे काही लिहीण्याचा विचार खरंतर केलाच नव्हता. पण आता वाटतय, तिकडे अंताक्षरीवर काहीबाही लिहून सगळ्यांना छळत, बोअर करत असते ते तिथल्या ऐवजी इथे करावं. तुमच्या पोस्टवरुन वाटतय, वाचलं जाईल ते. करेन प्रयत्न. मिनोती - घर सजवायला इतकी सुंदर भेट दिलीस! तुझी परवानगी गृहीत धरुन हे चित्र पहिल्या पानावरही टाकते आहे. रॉबिन - आलास! बस म्हणायलाच नको.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 28, 2006 - 3:27 am: |
| 
|
अभिनंदन प्रिया. आल्या आल्या पहिली मागणी, विनयने सगळ्याना गाणी पाठवायची विनंति केली आहे. गाण्यांचे भरपुर कलेक्शन आहे माझ्याकडे पण ऐकता ऐकता लिहुन घ्यायचे काहि खास तंत्र आहे का ?
|
Priya
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:23 pm: |
| 
|
दिनेश, दुर्दैवाने मला कुठली सोपी पद्धत माहीत नाही हो! पुर्वी जेव्हा गाणी लिहून ठेवत असे तेव्हा अगदी मध्ये मध्ये थांबवत लिहीत असे. आता असे लिहून ठेवणे सुटले पण पुन्हा पुन्हा ऐकूनच पाठ होतात माझी तरी. एखादा शब्द समजत नसेल तर मी कित्येक वेळा ऐकलेले आहे तेच तेच गाणे. मग तो शब्द आला की आवाज चक्क मोठा करते! पण शॉर्टकट मात्र मला माहीत नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, September 29, 2006 - 3:55 am: |
| 
|
आभार प्रिया, मी पण हेच तंत्र वापरतो. आता परत कागद पेन्सिल घेऊन बसायला पाहिजे.
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 4:20 am: |
| 
|
प्रियाताई मलापण एक मदत हवी होती. तुला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा कर. लताबाईंनी गायलेल्या भजनांची यादी आणि ती कुठल्या CD मध्ये समाविष्ट केली आहेत त्याची पण माहिती लिही. सलिलदांच्या गीतांचा संग्रह मला अजून मिळाला नाही. इथे इतके संग्रह येत आहेत. पण सलिलदांचा कुठेच मिळत नाहीये. सलिलदांचे लतानी गायलेले मी एक नविन गाणे ऐकले. अप्रतीम!!!! शब्द आहेत - मदभरी ये हवाये मदभरी ये घटाये आणि पुढे काही अशा ओळी आहेत.. मैने तारोसे करली दोसती तारोके के लिये और मचलने लगी जिंदगी तुम्हारे लिये.. तुला येते का हे गाणे पुर्ण?
|
Priya
| |
| Friday, September 29, 2006 - 11:27 am: |
| 
|
अरे बी, HMV ने मागे सलिलदांच्या गाण्यांचा दोन CD चा सेट काढला होता त्यांचा Golden Collection series मध्ये. भजने म्हणशील तर त्यांच्या मीरेच्या भजनांची एक CD आहे - चला वाही देस नावाची. शिवाय फार पुर्वी एक रेकॉर्ड (ग्रामोफोन रेकॉर्ड म्हणतेय मी) होती, अजुन असेल आईकडे त्यावर ३ भजने होती. आणि पं. भीमसेन जोशींबरोबर राम रतन धन पायो नावाची एक CD आली होती. ही सगळी हिंदी भजने झाली. त्याशिवाय ज्ञानेश्वरांचे अभंग, तुकारामांचे अभंग असेही काही संग्रह आहेत.
|
Lalitas
| |
| Friday, September 29, 2006 - 11:47 am: |
| 
|
प्रिया, देवानंदने काळ गाजविला होता..... अगं एकेकाळी सर्व उपवर मुलींना देवानंदसारखाच नवरा हवा असायचा... मुलींचे आईवडिल वैतागलेले असत. कुठून आणायचा देवानंदसारखा मुलगा आणि भेटला समजा "देवानंद"सारखा कुणी, त्याला नको का मधुबालासारखी बायको?
|
Priya
| |
| Friday, September 29, 2006 - 12:41 pm: |
| 
|
पण ललिताताई, कदाचित असं असेल की कल्पना कार्तिकमुळे बर्याच जणींना वाटत असेल की आपल्याला देव आनन्दसारखा नवरा मिळायला काही हरकत नाही. हे मात्र खरं की देव आनन्दने एक काळ गाजवला. मला त्याचे कित्येक चित्रपट आवडतात. अतिशय लाघवी दिसतो पडद्यावर. अगदी त्याचे ते लटकते हातही आवडतात पहायला. त्याचा वक्तशीरपणा, professionalism वगैरे बद्दल इतकं वाचलं आहे की खरच कौतुक वाटतं. आणि ८३ व्या वर्षी चित्रपट काढतोय अजून! कित्येक वर्षांत एकाही चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेलं नसतानाही अजुनही उत्साहाने चित्रपट काढणं म्हणजे खरच त्याच्या व्यावसायिक निष्ठेला सलाम.
|
बी, मदभरी ये हवायें हे गाणे अनोखा दान (१९७२)या चित्रपटात आहे. गीत गुलजारचे आहे. माझ्याकडे mp3 आहे बुवा पण लिरिक्स नाहीत....
|
गाणं वाढ गो (प्रिया)माय....(तोंड वेंगाडतो..) रात्र काळी घागर काळी ची गोविन्द पोवळ्यांची mp3 आहे का तुझ्याकडे...? असल्यास वाढ गो माय (गुरगुन्टा होईल तुला...)
|
Priya
| |
| Friday, September 29, 2006 - 1:41 pm: |
| 
|
अरे बाबा, रॉबिन, तुला मिळाला नाही का निरोप? मी विषयवार अंताक्षरी मध्ये ठेवला होता तुझ्यासाठी निरोप की माझ्याकडेही नाहीये ते गाणं. पुढच्यावेळी येईन तेव्हा परत एकदा शोधायला हवय. अशा बर्याच गोष्टींची यादी आहे माझ्या कडे - ते गाणं, पुलंची वरात, वसंतरावांचं कट्यार, लाग़ूंचं नटसम्राट, जुन्या संचातली संगीत नाटकं - किमानपक्षी काही वर्षांपुर्वी दूरदर्शनने दाखवली त्या संचातलीही चालतील.मेधा गोगटे, प्रल्हाद अडफळकर वगैरे मंडळी असायची ना? बहुधा मला गुलबकावलीचं फूलही मिळेल एखादेवेळेस पण या गोष्टी मिळण्याची शक्यता काही वाटत नाही. (सुस्कारा सोडणार्या चेहर्याची क्लिप आर्ट)
|
Dineshvs
| |
| Friday, September 29, 2006 - 3:24 pm: |
| 
|
प्रिया, आता बरिच नाटके उपलब्ध आहेत. देशात फेरी झाली नाही का ईतक्यात ? ललिता, अलिकडेच देवानंदने असे सांगितले कि मधुबाला प्रत्यक्षात तेवढी सुंदर नव्हती. हेवी मेकप आणि त्या काळचे छायाचित्रण यामुळे ती सुंदर दिसत असे. तिची त्वचा म्हणे तितकि छान नव्हती. खरं खोटं, देवच जाणे.
|
Priya
| |
| Friday, September 29, 2006 - 3:41 pm: |
| 
|
दिनेश, नाटके उपलब्ध असतील हो बरीच, पण मला वर लिहीलेली हवी आहेत, त्या त्या संचात. तशी वरातचीही VCD मिळते असे ऐकलेय, पण पुलंची नव्हे. मी शोधते आहे ती मिळत असली तर मी इकडे मागवून घ्यायलाही तयार आहे.
|
पु लं ची वरात मिळते थोडी. टीव्ही वरचा इपिसोड थोडा शूट केलाय वाटते तसेच रविवार सकाळ नावाचा पु लं चा एक कार्यक्रम टीव्ही वरून घेतलाय. दोन्ही B&W आहेत. शूटिन्ग तेवढेसे समाधानकारक नाही पण for the sake of nostalgia चालसे... दुसर्या वरातीच्या vcd त चन्द्रकान्त काळे, दिलिप प्रभावळकर वगैरे आहेत. दोन्ही अलूरकरांकडे ते झोपलेले नसताना मिळतात.. तू म्हणते ती जुनी नाटके त्या संचात मिळणे शक्य दिसत नाहीत कारण त्याचे video चित्रीकरण झालेले नाही. कारण v.cassette निघाल्या तर धन्दा बुडेल या भीतीने त्या काढलेल्या नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|