|
शुभेच्छा... शुभेच्छा.... शुभेच्छा... लक्ष लक्ष शुभेच्छा
|
Nandita
| |
| Monday, August 28, 2006 - 4:42 am: |
| 
|
ADMN आणि समस्त नेमस्तकांच हार्दिक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा 
|
Nvgole
| |
| Monday, August 28, 2006 - 2:58 pm: |
| 
|
दशकपूर्तीनिमित्त मायबोली प्रशासन, प्रशासक आणि नेमस्तकगण यांचे (आणि खरे तर समस्त मायबोलीकर मित्र आणि मैत्रीणींचे, पण ह्या इथे ...) हार्दिक अभिनंदन! आणि मन:पूर्वक धन्यवाद. माझ्या आयुष्यात मायबोलीने काही वर्षे खरोखरीच बहार आणली होती. त्याखातर मी मायबोलीचा ऋणी आहे. आजही मायबोलीवर आलो की माहेरी आल्यासारखे वाटते. मायबोलीचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो.
|
Raina
| |
| Monday, August 28, 2006 - 3:07 pm: |
| 
|
अभिनंदन. दिवसागणिक मायबोलीवर असेच सदस्य द्विगुणीत होउ दे!
|
Vin
| |
| Monday, August 28, 2006 - 5:29 pm: |
| 
|
मायबोली दशक पुर्ती निमित्त admin, mods यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्या!!
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:28 am: |
| 
|
Admin- तुम्ही ही जी माहिती लिहीली आहे ती पुर्णपणे नविन आहे. ही नावे मी प्रथमच इथे ऐकतो आहे. अजुन सांगत रहा..
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 12:36 pm: |
| 
|
मी सुद्धा प्रथमच वाचतेय हे सर्व! बर्याच दिवसापासून admin कडून काही ऐकण्याची सर्वांना इच्छा आहेच. admin , लिहा आता अजून. छान वाटतय वाचायला
|
Naatyaa
| |
| Tuesday, August 29, 2006 - 12:41 pm: |
| 
|
मायबोली म्हणजेच हितगुज हे समीकरण डोक्यात इतके पक्के बसले आहे की बाकी विभागांचा विसरच पडतो.. त्याबद्दल वाचायला छान वाटत आहे.
|
अगदी बरोबर नाट्या! अस करता यील का? हे जुने विभाग हेत ना, त्यान्च प्रदर्शन दसरा किन्वा दिवाळी निमित्त मान्डायच! म्हन्जे निवडक अर्काइव्हज, हातात असतील तर, प्रदर्शनासारखे मान्डायचे फक्त वाचायला, अन त्यान्ना प्रतिसादाकरता एक बीबी द्यायचा! साधारण दर वर्षात निमित्ताने दोन प्रदर्शन भरवता येतिल! कशी वाट्ट्येय आयडीयेची कल्पना? आणि मायबोलीवरच कुठेतरी, या माहीतीचे सक्षिप्त रूप नावानिशी लिहुन ठेवायचे! 
|
Kaakaaso
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:09 pm: |
| 
|
हार्दिक अभिनन्दन! आपले आणि सहकार्यान्चे सातत्य कौतुकास्पद आहे. मायबोली नामक एक संगणकीय माध्यमातील संअस्क्रतिक चळवळ उभारून आपण मराठी भाषेच्या अभिव्यक्ति आणि अभिव्रध्दीमध्ये अत्यन्त मोलाची भर घातली आहे. समस्त मराठी प्रेमी ह्यासाठी आपले क्रतज्ञ राहतील. मायबोली च्या भावी प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा!! टंकलेखनदोषाबद्दल क्षमस्व! काकासाहेब
|
Admin अभिनंदन, ही सगळी माहिती आजच वाचली, मस्त वाटतंय वाचायला. मैत्रेयी तु खूपच सुंदर लिहिल आहेस गं. ढापलेली उपमा पासून mod म्हणून काय काय अनुभव आले पर्यंत. नात्या, अगदी बरोबर, मायबोली म्हणजे हितगुज. लिंबुटिंबु, great idea हं!
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 29, 2006 - 2:40 pm: |
| 
|
लिंबुची idea छान आहे... admin कडुन अजुनही काही एकायला आवडेल.
|
पूर्वी (म्हणजे झक्कीकालीन)हिन्दी सिनेमात एक डाॅन असे. त्याने फेल्ट हॅट घातलेली असे. तो शेवटपर्यन्त कोणाला दिसत नसे. तो गुहेच्या टोकाला बसून अज्ञात स्थळावरून स्पीकरवरून सूचना देत असे. कधी कधी त्याची सावली पडद्यावर अथवा काचेवर दाखवीत. के एन सिंग नावाचे सद(!)गृहस्थ असल्या डाॅनांचे मेरुमणी! हे डाॅन म्हणजे एक गूढच असायचे तेव्हा... आपले Admin म्हटले की मला हा गुप्त डाॅन नेहमी आठवतो व Big Brother is watching ह्या लालभाईंच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक पोस्ट ते डोळ्याखालून घालताहेत असे नेहमी वाटते!! मी तर बरेच दिवस झक्कीनाच admin समजत असे व ते लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते पाणचट व बालीश पोस्टिंग्ज करीत असावेत असे वाटे... हे उपरिनिर्दिष्ट के एन सिंगमहाशय त्याच्या हाताखालच्या दुय्यम डाॅनांना(बाॅस मंडळीना)सारखे नम्बर वन तुम इधर जाव, नम्बर टू तुम उधर जाव असे आदेश देत असे. तसे हे admin देखील माॅड नं वन तुम ये बी बी पर जाव, माॅड नम्बर टू तुम वो बी बी पर जाव असे हुकूम सोडत असावेत असेही मला वाटत असे... आणि मग हे माॅड्स त्या पोस्टिंगांचा गेम वाजवूनच परत येत असावेत असेही मला वाटते... तसेच ही माॅड़ मंडळी सतत Traffic हवालदारासारखी न दिसेल असे आडोशाला उभे राहून आक्षेपार्ह पोस्टिंग्ज वाचत उभे राहत असतील असेही मला वाटते...
|
रॉबीनहुड. HHPV लिंबुची आयडिया मलाही आवडली.
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:53 am: |
| 
|
ऍडमीन छान वाटते आहे वाचायला. आणखी येवुदेत. लिंब्याची कल्पना पण चांगली आहे. मायबोली वरील इतर विभाग पण सुंदर आहेत. पण त्यावर फार अपडेट होत नसल्याने मायबोली म्हणजे हितगुज हे समीकरण बनत चालले आहे असे मला वाटते. मॉड्स चॉईसपण लवकर आले तर बरे होईल.
|
होय होय कन्डापोहे म्हणतोय ते बरो बर आहे. मायबोलि म्हणजे हितगुज असेच झाले आहे... किम्बहुना होमपेज उघडल्या उघडल्या कर्सर आपोआप हितगुजवरच जातो..
|
>>>> किम्बहुना होमपेज उघडल्या उघडल्या कर्सर आपोआप हितगुजवरच जातो.. अस्स? आम्ही तर सर्च पेजची लिन्कच सेव्ह केली हे! होम पेज वर जातच नाही! उघडल्या उघडल्या सकाळी येक दीसाचा सर्च, सोमवारी तीन दिसान्चा, बाकी वेळेस तीन तासान्चा, अन लोड असताना येक किन्वा दोन तासान्चा सर्च मारतो! सनाश, प्राजक्ता, केदार, कान्द्या, माझी आयडीया आवडली हे सान्गितल्याबद्दल आभारी हे! 
|
Bee
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:07 am: |
| 
|
खूप छान माहिती मिळत आहे Admin . ही history माहिती नव्हती..
|
छान वाटलं मायबोलीचा इतिहास वाचून. मागे अनुराधा गानू यांनी एका लेखात निवृत्तीनंतर अमेरिकेत गेल्यावर मराठी फोंट बनवणार्या आजोबांविषयी लिहिले होते. या वयात प्रोग्रॅमिंग शिकून हे केले म्हणजे खूप आश्चर्य वाटले होते. त्यांच्या उत्साहाला आणि तळमळीला दाद द्यावीशी वाटते. ते आजोबा म्हणजे हेच असावेत.(?) महान आहेत आजोबा. (इथे सगळी Admin team लिहित असल्याने त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी नाव नमूद केल्याशिवाय कोणते लिखाण कुणी केले हे कळत नाही.)
|
Karadkar
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:01 am: |
| 
|
हो गजा, ते अजोबा तेच आहेत. त्या पाटील अजोबाना मी भेटले आहे. अतिशय प्रेमळ अजोबा. प्रचंड वाचनाची आवड आणि सततोद्योगी. त्यांच्याबद्दलची माही मिळाली की अजुन टाकेन.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|