|
Moodi
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:48 am: |
| 
|
ललिताताई बर्याच दिवसात तुमचा काही लेख नाही. कश्या आहात?
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 6:57 am: |
| 
|
ललिता, पण एकंदरच स्विस लोक, बोलायला उत्सुक असतात, नाझ्या ईतक्या भटकंतीत स्वःताहुन संभाषण सुरु करण्याची प्रवृत्ती आढळली. ( मला समजो वा ना समजो ) एकंदरच आदरातिथ्य मला आवडले, मी पर्यटक म्हणुन गेलो असल्याने, थोडा फरक नक्कीच पडला असेल.
|
Lalitas
| |
| Friday, August 04, 2006 - 9:12 am: |
| 
|
दिनेश, पर्यटक म्हणुन जे अनुभव येतात ते फार वेगळे असतात. पर्यटकांना स्वीस मदत करतील, पण ते त्या पर्यटक ठिकाणांच्या आजुबाजुला राहाणारे असतात. शिवाय हॉटेल व रेस्टॉरन्टमध्ये तोंडदेखलं गोड बोलायचं - वागायचं शिक्षण दिलेलं असतंच, तो त्यांच्या धंद्याचा भाग असतो! आताच माझं माझ्या ऑफ़िसमध्ये नव्याने लागलेल्या भारतीय वंशाच्या मलेशिअन मुलीशी बोलणं झालं. तिने स्वीस मुलाशी लग्न केलं आहे. ती २८ वर्षांची आहे, कॉम्प्युटर विज्ञानाची इंग्लन्डहून डॉक्टरेट मिळवलेली आहे. तिला फार वेगळे अनुभव येत आहेत, कुटुंबातही व बाहेरही. दररोजचा व्यवहार करताना जे अनुभव येतात ते वेगळे असतात हो!
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 5:02 pm: |
| 
|
अगदी बरोबर, म्हणुनच एखादा देश नीट कळायला, असे दिर्घ वास्तव्यच हवे. आपल्या मायबोलि वर अशी अनेक देशांची खरीखुरी ओळख होतेय, ते कित्ती छान आहे.
|
Bee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:55 am: |
| 
|
... ताई, मी नविन पान वाचलेच नव्हते. एकदम छान सुटसुटीत लिहिलं आहेस. जरा नियमित लिहित जा ताई.. इतका आळशीपणा बरा नाही :-) ताई, माझ्याकडे black sesame seeds उरल्या आहेत. तू कारवार आहेस म्हणजे by default सुगरण आहेस, तेंव्हा काय करू शकतो.. ते सांगतेस का? मला तशी अनेकांनी हे कर ते कर असे सांगितले पण तरीही.. मूडी आता इथे विरोधाला विरोध करू नकोस :-)
|
Moodi
| |
| Wednesday, August 23, 2006 - 8:14 am: |
| 
|
ललिताताई अजून लिहा ना स्विसच्या जीवन पद्धती आणि शिस्तीबद्दल. आणि हो तुमच्या क्वांडोबद्दल वाचले. खूप छान वाटले, त्याचा एक छोटासा फोटो आणि काही स्विसचे पण फोटो टाका ना इथे. मला मेलमधून आलेले तर तुम्ही बघीतलेच, अजून काही तुमच्या नजरेतुन टिपलेले असतीलच ना. ए बी विरोधाला विरोध म्हणजे काय रे? मागे तीळाबद्दल तू मला विचारले होतेस म्हणून मी दिनेश यांच्या बीबीवर तुला परत विचारले याला विरोध म्हणतात का? आणि दिनेशनी तुला अनेक पर्याय सांगुनही त्यांचे आभार मानण्या ऐवजी आता इथे येऊन परत ताईंना विचारतोयस. आता पळवाट नको काढुस की दिनेशना आभार मानलेले आवडत नाहीत म्हणून. आपले कर्तव्य आपण करावे. आणि तुला यापुढे मी काही सांगणार नाही. त्या तीळांचे लोणचे घाल नाहीतर आंगभर उटणे करुन फास, मला काय त्याचे? सॉरी ललिताताई याने इथे माझे नाव घेतले म्हणून मला असे लिहावे लागले. 
|
Lalitas
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:17 am: |
| 
|
जाऊ दे ग मूडी! बी, मी कसली रे सुगरण? कप्पाळ! इथे बरेचजण छान छान पदार्थ लिहितायत... माझा काय पाड! दिनेशनी तुला तिळाचे बरेच उपयोग सांगितले आहेतच. मी याशिवाय काय सांगू शकते? आमच्या प्रकारच्या स्वयंपाकांत फारसे तीळ वापरत नाहीत, आता महाराष्ट्रांत राहिल्यामुळे इथल्या पध्दती थोड्याफार उचलल्या गेल्या आहेत. त्यामुळे गोडा मसाला वापरतो. त्यांत तीळ येतातच. संक्रातीला तिळाचे लाडू, वड्या, गजकासारखा गूळ घालून पदार्थ करतो. पॉलिश न केलेले तीळ या पदार्थांना चालतात, काळ्या तिळांचा उपयोग मला खरंच माहीत नाही.
|
Bee
| |
| Thursday, August 24, 2006 - 11:17 am: |
| 
|
ललिताताई, इथे जे TOP TEN सुगरण आहेत त्यात तू एक आहेस हे मी तुला कसे पटवून देऊ.. तू खूप modest आहेस हेच त्याच एकमेव कारण आहे. whatever, my sincere thanks for replying my post. I've others to ask :-)
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 5:41 am: |
| 
|
ललिताताई, आधी म्हंटल्याप्रमाणे मी इथे तुला हवा असलेला प्रशांत दामलेंचा आणि सुधीर गाडगिळांच्या कार्यक्रमावर माझा आपला अभिप्राय लिहीत आहे. पुर्वी Pune vs Mumbai हे नाव ऐकूण मला वाटले हा एक विनोदी नाटकप्रकार आहे. पण नंतर लक्षात आले, सुधीर हे पुण्यातले आणि प्रशांत हे मुंबईतले आहेत म्हणून ह्या कार्यक्रमाचे नाव Pune vs Mumbai असे ठेवण्यात आले. हा एक गप्पा गोष्टींचा कार्यक्रम होता. थोडेसे नविन ऐवढेच की प्रशांत ह्यांनी त्यांनी केलेले नाटकाचे प्रयोग, सिनेमातील काही भाग - digital recording करुन आणले होते त्यामुळे ते ऐनवेळी सर्वांना दाखविता आले. ह्यातच बराच वेळ गेला. नंतर त्यांनी काही गीत, राग गावून दाखविले. एक तास संपल्यानंतर मग सुधीर ह्यांनी त्यांच्या मुलाखती घेण्यावर आपले अनुभव सांगितले. अनुभव घेताना त्यांनी खूप रंगवून काहीकाही प्रसंग सांगितलेत. शेवटी प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. त्यात खूप जणांनी छान प्रश्न विचारलीत. मला हा शेवटचा भाग खूप आवडला. कारण तो उत्स्फ़ुर्त होता. तयारी करुन आल्यासारखा वाटला नाही. इतकी माहिती पुरे का? तुला जर अजुन काही माहिती हवी असेल तर सांग. एकूण हा कार्यक्रम लोकांना आवडला. मला ठिकठिक वाटला.
|
Lalitas
| |
| Monday, August 28, 2006 - 8:21 am: |
| 
|
बी, आठवणीने माहिती लिहिल्याबद्दल आभार.... माहिती छान दिली आहेस. आमच्याकडे ही प्रश्नोत्तरांवर भर देण्यांत येणार आहे असं कळलं. लोकांना कार्यक्रम आवडला पण तुला ठिकठिक वाटला म्हणजे काय, पसंत पडला नाही का? काही कारण?
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 8:30 am: |
| 
|
ललिताताई मी पहिल्यांदाच असे काही लिहिते. तुला आवडले म्हणून मलाच बरे वाटले. मला हा कार्यक्रम ठिकठिक वाटला कारण त्यांनी प्रशांत दामलेंबद्दल खूप माहिती दिली. त्यांच्या अभिनयाबद्दल सगळ्यांनाच माहिती होते. सुधीर गाडगिळांनी जितके प्रशांत दामलेंना प्रश्न विचारले तितके त्यांनी घेतलेल्या मुलाखतीबद्दल फ़ारसे असे सांगितले नाही. एखादी मुलाखत जर record केलेली असेल तर इथे आणायला हवी होती. जसे की माधुरी दिक्षित, आशा भोंसलेंची मुलाखत दाखवायला हवी होती. अजून एक कारण की प्रशांत दामले ह्यांनी गाणी म्हंटली ती पुर्ण न म्हणतात एखादे कडवेच म्हणायला हवे होते. तू त्यांना सुधीर गाडगिळांनी घेतलेली एखादी recorded मुलाखत आणायला सांग.
|
Raina
| |
| Monday, August 28, 2006 - 2:58 pm: |
| 
|
ललिताताई- आता बी नी सांगीतलेच आहे तर मीही माझे मत सांगते. कार्यक्रम आवर्जून पहावाच असे म्हणणार नाही कारण content काही नाही.. म्हणजे आत्ता काहीतरी होईल, आत्ता काहीतरी असेल- म्हणत संपला.. असे म्हणायची वेळ येते... दामल्यांच्या लोकप्रियतेला sort of encash करयालाच कार्यक्रम आहे असे वाटते.. म्हणजे, त्यांची गाणी वगैरे, clips वगैरे चांगल्या आहेत- पण तेव्हढेच आहे.. अजून काही नाही... आपल्याला इथे काहीच पहायला मिळत नाही म्हणून बघायला हरकत नाही पण पुण्यात नसता बघीतला हाच कार्यक्रम
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 2:36 am: |
| 
|
रैनासारखेच माझेही मत पडले. काल आम्ही ह्यावर चर्चा केली. सगळ्यांचे एकच मत पडले की ही शुद्ध जाहीरातबाजी होती त्यांची आपल्या स्वतःविषयी आणि त्यांचे चाहते म्हणून बघायला येणारे प्रेक्षक चक्क मुर्ख बनले. त्यातही काही आहेतच चांगले चांगले म्हणणारे पण डोळसपणे विचार केला तर मला ही एक marketing strategy वाटली. फ़ुकट गेलेत 20$ . फ़क्त तिथे जावून वडापाव खायला मिळाला इतके एक समाधान बाकी काहीच नाही. ह्याच्या अगदी उलट. इथे कुणाला फ़ारसे माहिती नव्हते की मंगला खाडीलकर इतक्या छान बोलतात. त्यांचा 'आरसा' नावाचा कार्यक्रम अफ़लातून झाला होता. तो कार्यक्रम नक्की करा तिथे. मज्जा येइल. बाई खूप छान बोलतात. एक एक किस्से ऐकवतात की प्रेक्षक जागचा हलत नाही. तसेच श्रीकांत पारगावकरांचा कार्यक्रमही जबरदस्त झाला होता. ते अप्रतीम गायक आहेत.
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 6:41 am: |
| 
|
बी आणि रैना.... मनापासून आभार! आमच्याकडे कार्यक्रम ठरून गेला आहे, झालं ते झालं असंच आता म्हटलं पाहिजे नाही का? पुढचे कार्यक्रम बीने सुचवल्याप्रमाणे मंगला खाडीलकर किंवा पारगावकरांना जरूर बोलवू.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:08 am: |
| 
|
हाच कार्यक्रम बोलवणार आहे का ललिता?
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:48 am: |
| 
|
हाच कार्यक्रम बोलवणार - म्हणजे मला कळलं नाही बी! आमच्याकडे "मैफल शब्दसुरांची" असा कार्यक्रम सुधीर गाडगिळ व प्रशांत दामले येत्या शनिवारी गणेशोत्सवांत देणार आहेत.
|
Raina
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:51 am: |
| 
|
ललिता ताई- साॅरी तुमच्या हक्काच्या पानावर लिहिते आहे. पण तुम्ही वाचलत की delete करेन. मी अशा निष्कर्षापर्यंत येउन पोचले आहे की आपण नाव बघून कलाकारांना बोलावण्यापेक्षा ते येऊन काय करणार आहेत ह्यावर लक्ष दिलं पाहीजे. मुळातच त्यांच्या कार्यक्रमाची संहिता बांधेसूद नसली तर glamour वर कार्यक्रम तरत नाही- याचं भान कलाकारांनी ठेवायला हवं. असे कार्यक्रम विस्कळीतच राहतात.. आपण ईकडे परदेशी राहून live कार्यक्रमाला आसुसलेले असतो.. म्हणून सगळे चालवून घेतो.. असो... ह्या कार्यक्रमात ते दोघं पाटी टकतात झालं. तरिही तुम्हाला काय वाटतं ते जरुर कळवा पाहिल्यावर.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:02 am: |
| 
|
अगं ताई, मला कार्यक्रमाच्या नावाबद्दलच विचारायचे होते. तू बरोबर ओळखलस.
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:08 am: |
| 
|
हरकत नाही रैना, तू सांगतेस ते खरंच आवडलं... अगं परखड लिहिलेलं नेहमीच चांगलं असतं. आता मी आमच्या संयोजकांना सांगणार आहेच.. पण तू सांगितल्याप्रमाणे ग्लॅमरपेक्षा कलेशी ईमान ठेवून कार्यक्रम सादर करणारे कलाकार बोलावले तर खरंच आमची धडपड व फ्रॅंकस कारणी लागतील. मी नक्कीच तुला कळवीन. तू तुझं लिहिणं प्लीज डिलिट करु नकोस. पुढे आपण जे लिहू त्यासंदर्भांत तुझं पोस्ट उपयोगी पडेल.
|
Raina
| |
| Monday, September 04, 2006 - 5:41 am: |
| 
|
कसा झाला कार्यक्रम ललिताताई?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|