Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 17, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalitas » Feedback » Archive through February 17, 2006 « Previous Next »

Mukman2004
Thursday, February 02, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या वेळेस नक्की. ह्या वेळेस माझ पिल्लु जरा लहान होत त्यामुळे नाही जमल आणि मी नंदिता चा मेल पण उशिरा पाहिला.
मागे तुम्ही scotland ला आला होता तेंवा पण काही जमल नाही पुढच्या वेळेस नक्की भेटु.
फ़ोटो पण टाका


Shivam
Thursday, February 02, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार ललिताजी!
खुप काही हातातून निघुन गेलं असं आता वाटतय. खरं तर जेव्हा हा
GTG झाला तेव्हा, मी अगदिच नवखा होतो मायबोलीवर. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतिल इतक्याच दिवसांचा अनुभव होता मला मायबोलीचा. त्यात नुकतीच ओळख झाली होती ती फक्त एकाच व्यक्तिची; ती म्हणजे-भावना. त्यावेळी मला इतकी कल्पना नव्हती या सार्‍याची. भावनानं आग्रह करुनसुद्धा आणि मनात असुनही; काही कारणांमुळे येऊ शकलो नाही. पण आता मनानं पक्कं ठरवून टाकलंय पुढची वेळ चुकवायची नाही.
फोटोंची मात्र सगळेच अतुरतेने वाट पाहाताहेत.


Milindaa
Thursday, February 02, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, तुमच्या दीराला मायबोली फारच आवडलेली दिसते.. २ २ युजर आयडी घेतले आहेत त्यांनी :-)

Manee
Thursday, February 02, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, खरच त्यादिवशी यायची खूप इच्छा होती. पण नाही जमलं. तुमच्याशी फोनवर बोलून मात्र खूप बरं वाटलं. बरच काही मिस केलं मी. असो. पुढच्या वेळी नक्की.
कधी येताय मग?


Lalitas
Thursday, February 02, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनी, अगं आताच परत येतेय... पुढच्या ट्रिपसाठी जरा उसंत घेऊ दे. तुमचं प्रेम असंच मिळो व माझी पुढची भारतवारी लवकरच येवो अशी देवाजवळ प्रार्थना!

मिलिंदा, माझ्या दीराने जेव्हा युजर आयडीसाठी रजिस्टर केलं त्यावेळी पहिल्या दोन तीन वेळां ही आयडी कुणीतरी घेतली आहे असा मेसेज मिळत गेला, बहुतेक त्यामुळे अनेक युजर आयडी तयार झाले आहेत असं दिसतय


Bgovekar
Friday, February 03, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो न ललीता वेळ कसा पंख लावुन भुरकन उडुन जात असतो ते कळतच नाही. अगदी काल परवाच भेट झाल्यासारखं अजुनही वाटतयं. छान वाटलं ह भेटुन. इतके दिवस आपण एकमेकांना न भेटताही न पाहताही जणु किती दिवसांची ओळख आहे असे अंताक्षरीवर भेटत होतो - लिहीत होतो. पण प्रत्यक्ष भेटल्यावर ती भेट ही वेगळीच गोस्ट आहे असं वाटते नाही? छान वाटलं भेटुन, गप्पागोष्टी करुन तुंम्हा उभयतां बरोबर. संक्षिप्त प्रमाणातील वृत्त छान लिहिलय की.
तुमच्या दिरांचा युजर आय डी काय आहे?


Lalitas
Friday, February 03, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे दोन आयडी माहित आहेत... खट्याळ आणि मोगाम्बो, पण दिसत नाही तो संचारताना.. वेळ मिळत नसेल

मला तसं साहित्यिक लिहिता येत नाही, मी रेपोर्टस लिहिते, तीच शैली इथे आली आहे अस दिसतंय. काहिही असो, मला तुम्हां सर्वांना भेटून खूप आनंद झाला. परत इथे माझा तुम्हा सर्वांशी जास्त संपर्क असतो. आपल्या एकमेकांबद्दल काहीच अपेक्षा नाहीत... ही एक निर्भेळ मैत्री आहे.... वयाचं अथवा देशाचं बंधन नसलेली!


Manish2703
Friday, February 03, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mogambo, मि. इंडिया मोड मधे असेल...

Shyamli
Sunday, February 05, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहात का?
तुम्ही म्हणताय तर ईथेच वीचारते......
१) दोन भावंडांमधे होणया भांडाणात आईची काय भुमिका असली पाहिजे?
२) मुलांच्या मित्रपरीवाराच्या वाईट सवई मुलांना लागु नये म्हणुन आपण काय काळजी घ्यायला पाहिजे?
ऊदा: खोटे बोलणे, (माझी मुलगी ६ वर्शाचि आहे)
माझ्या मुलिचि मैत्रिण तिच्यापेक्षा तीन वर्षानी मोठि आहे आणि ती भयंकर खोटे बोलते अजुन माझि मुलगी खोट बोलत नाहिये पण मला अशी भिति वाटते की हिला जर तशिच सवय लागलि तर?


Lalitas
Sunday, February 05, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
१) हा पश्न तसा कठीण व सापेक्ष आहे.....
दोन भावंडाच्या भांडणांत शक्यतो तटस्थ राहून भांडण सोडवणे हीच भूमिका ठेवावी. कुणाचीच बाजू घेऊ नये. ही भांडणें तात्पुरती असतात. मुलं ती विसरुनही जातात म्हणुन आपण कधीही कुठल्याही भांडणाचा परत उल्लेख न करणे शहाणपणाचं आहे. नाहीतर त्यांच्यात तेढ वाढायला मदत होते व नंतर भांडणे वाढत जातील.
मुलांची प्रवृती भांडणाच्या वेळी लक्षांत येते.
dominate करण्याच्या प्रवृत्तीकडे लक्ष ठेवले पाहिजे.
मी पाहिले आहे... पालक घराबाहेर दोन मित्रांच्या भांडणांत जर स्वत्:चा मुलगा अन्यायाने त्याच्या मित्रावर शिरजोरी करत असेल तर त्याला प्रोत्साहन देतात. माझ्या मुलचा जय कसा झाला हे आपल्या मुलासमोर मिरवतात. मुलाची मानसिकता अशाने बिघडते. हा मुलगा भावंडाबरोबर भांडताना पालकांकडुन त्याचीच बाजू घेण्याची अपेक्षा ठेवणार नाही का? तुम्ही तुमच्याच दुसर्‍या मुलावर त्याची शिरजोरी चालवून घ्याल का?
मुलांची भांडणे हा नाजूक विषय आहे... निःपक्षपातीपणाने तंटा सोडविणे दुरदर्शीपणाचे ठरते.
२) मुलं बरेचदा असुरक्षिततेच्या भावनेने खोटं बोलतात. हातून एखादी चूक झाली तर आईवडिल रागावतील या भयाने, कधी कधी आईवडिलांना खुष ठेवायला, त्यांचं आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला मुलं उगीचच खोट्या बढाया मारतात. हे देखिल घरच्यांचच अनुकरण असू शकतं. आपणच त्यांच्यासमोर खोटं बोलतो, खोटा बडेजाव करतो. मुलं हे बरोबर आत्मसात करतात. मुलांसमोर आपण काय बोलतो, कसे वागतो याचं सदैव भान ठेवले पाहिजे.
आता तिच्या मैत्रिणीमुळे तुझी मुलगी बिघडायची जर तुला भिती वाटत असेल तर हळु हळु दोघींचे संबंध कमी करता येतील तर पहा.


Shyamli
Sunday, February 05, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोट बोलण्या सदर्भात एक प्रसंग सांगते.....
माझा मुलगा शक्यतो कुणाकडे काही खात नाही, आणि खाल्लच तर येऊन सांगतो.
पण मी वर उल्लेख केलेली माझ्या मुलिची मैत्रिण आणि तिचा भाऊ दोघही आमच्याकडे खेळत होते, माझ्या मुलानी त्यांना चॉकलेट दिले तर बहिण भावाला सांगते ३४;ए तु आईला सांगणार नाहिस ना आपण हे खाल्ल म्हणुन्&#३४;
आणि त्यानंतर लगेचच त्यांची आईपण आली, तर ही मुलगी सरळ ऊठुन गेली आणि चॉकलेट थुंकुन आली. मी आणि माझा नवरा हे सगळ बघत होतो.
आम्ही हे बघुन अवाक झालो................
ईथे दोन्हि भावंड एकमेकाला सामील होती......
ईथे तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुल घाबरुन खोट बोलत होते.

आता अजुन एक प्रश्न
मुलांना निटनेटकेपणाच्या सवई लावताना किती आग्रही असल पाहिजे?
का हा काही ऐकत नाही म्हणुन सोडुन द्याव?




Dineshvs
Sunday, February 05, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता आणि मी, आमची ओळख तशी जुनी. मला आठवतय त्या अंताक्षरीवर सातत्याने जुनी गाणी लिहायच्या, त्यावेळी मी त्याना ईमेल करुन विचारलं होतं तुम्हाला ईतकी जुनी गाणी कशी आवडतात, तर त्या म्हणाल्या होत्या, अरे मी पण जुनीच आहे कि ? आणि तेंव्हापासुन सुरु झालेला मैत्रीचा सिलसिला आजहि कायम आहे. मला भेटलेल्या त्या पहिल्या मायबोलिकर.
आमचे अंताक्षरीवर नेहमीच भेटणे होते, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट, हि मागील पानावरुन पुढे सुरु, अशीच होती.
त्यांच्या अनुभवाचा आणि वयाचा दरारा त्या अजिबात वाटु देत नाहीत. एक प्रसन्न आणि बोलघेवडं व्यक्तिमत्व.
परत परत भेटावं असं वाटायला लावणारं.


Lalitas
Sunday, February 05, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ही मैत्री अशीच टिकून राहो ही मनापासून इच्छा आहे.

श्यामली, नीटनेटकेपणाच्या सवयीत मात्र
consequent असलं पाहिजे. विशेषत्: दोन्ही पालकांनी स्वत: नीटनेटकेपणाची शिस्त काटेकोरपणे पाळली पाहिजे. रोज रोज मुलांच्या मागे लागू नये. घर आवरताना त्यांना बरोबर घ्यावं. एखादं काम जबाबदारीने करायचे नियम लावून द्यावे, जसं स्वत:चे कपडे नीट घड्या करून वा हॅंगरला लावून कपाटांत ठेवणे, ओला टॉवेल वाळत घालणे. त्यांनी टाळाटाळ केली तर त्यांच्याबरोबरीने आपण करायला लागावं. मग सवयीने करत जातात. ओरडा आरडा करुन काही साध्य होत नाही. मुलांची खोली आवरतांना त्यांना मदत करत जावं म्हणजे त्यांना कळायला लागतं कुठल्या वस्तु कुठे व कशा नीट लावून ठेवाव्या ते, नाहीतर खोली आवर असं सांगितलं की मुलं कपाटांत पुस्तकं, कपडे हवे तसे कोंबून ठेवतात, थोडक्यांत फक्त नजरेआड करतात.
वैयक्तिक व सामजिक स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. जेवताना मचमच करून खाऊ नये, अन्नाचे कण खाली सांडू नयेत, धुसमुसळेपणाने अन्न वाढून घेऊ नये अशी शिस्त फार महत्वाची आहे. घरचे संस्कार त्यांतून दिसतात. आमच्याकडे मुलांचे स्विस मित्र मैत्रिणी जेवायला आले तर कधीही कुठलाही अन्नाचा कण इकडे तिकडे सांडत नाही. ही शिस्त त्यांना लहानपणापासुन लावली जाते.
आंघोळ तर आपण करायला लावतोच पण टॉयलेट कसे वापरावेत ह्याचं शिक्षण लहानपणापासूनच दिलं गेलं पाहिजे.
दुसर्‍यांच्या मालकीच्या वस्तू कशा नीटनेटकेपणाने हाताळाव्या हे जाणवून दिलंच पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटीतच टाकणे जर आपल्याकडे प्रत्येक लहान मुलाला शिकवत गेलो तर आपली विदेशात जी बदनामी होते ती टळेल.
श्यामली, अग मी टीचरसारखा उपदेश करतेय ना? मला जसं सुचत गेलं तस लिहित गेलेय....



Shyamli
Monday, February 06, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही होSS! खुप छान लिहिताय तुम्ही....
स्पष्टपणे लिहाल ह्याची खात्रीच होती म्हणुन तर तुमच्याकडे येऊन वीचारले.....
मला ज्या ग़ोष्टींमधे अडचणी वाटत होत्या त्या मी वीचारल्या,पण अजुनही टिप्स, तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही मला जरुर सुचवा, मला आवडल पटल तुम्ही सांगितलेल.
मी शेवटचा परीच्छेद नवर्‍याला वाचुन दाखवला........
तो जरा आळशी आहे ना.......


Lalitas
Tuesday, February 07, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, ह्या आठवड्याच्या लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत मुलांच्या विविध टप्प्यावरील अडचणींविषयी मार्गदर्शन केलं आहे. खाली लिन्क देतेय ती त्यातल्या एका लेखाची आहे, बाकीचे लेखही वाच.
http://www.loksatta.com/daily/20060204/ch01.htm

Moodi
Wednesday, February 08, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली अजुन एक लिंक घे, मस्त आहे.

http://www.esakal.com/static/madhura11.html .

Nalini
Wednesday, February 08, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई तुम्ही दिलेली एवढी छान आणि उपयुक्त माहिती वाहुन जाईल ह्याचा खेद वाटतो. ही सगळी माहिती एकत्रित तुमच्या मुख्य पानावर ठेवली तर त्याचा फायदा ईतरही घेऊ शकतिल.

Shyamli
Thursday, February 09, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच छान आहेत दोन्ही लिन्क,
मी लोकसत्ता वाचते बर्‍याचदा पण सकाळ नव्हता बघितला.


Ana_biswas
Saturday, February 11, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताजी,
आवडला तुमचा BB खूप.श्यामली सारखे प्रश्न मलाही पडतात कधि कधि मुलांच्या भांडणा बद्दल..उत्तर बद्दल आभार मानत नाही..उलट आणखी काही विचारिन म्हणते.. चालेल ना?

Lalitas
Friday, February 17, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका, वाट पाहातेय तुझ्या प्रष्नांची.....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators