|
Lalu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:50 pm: |
| 
|
दिनेश, ओळखा बघू. तान्या, एका देशपांडेना ओळखते गं, पण ही तू दिलेली पुढची काही माहिती नाही. तू बहुतेक माझ्या मामीच्या भावाच्या मुलाच्या बायकोची लांबची भाची असणार! ~d
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:55 pm: |
| 
|
रत्नागिरीच्या मनोहर जोशींच्या रिसोर्टचा ना ? मी किनार्यावरुनच बघितला होता हा. माझी मावशी लोकमान्यांच्या घराजवळ राहते.
|
Lalu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 4:21 pm: |
| 
|
रत्नागिरीचा आहे फोटो. रत्नदुर्ग किल्ल्यावरुन काढलेला. बोटी दिसतायत तिकडे भगवती बन्दर (cbdg) , नर्मदा सिमेंटची जेटी आहे. मासा आणि कालवण कशाचे ओळखा. ;)
|
Shonoo
| |
| Tuesday, April 25, 2006 - 7:06 pm: |
| 
|
तळलेली सुरम ई का? कालवण कोलम्बी?
|
Lalu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 7:08 pm: |
| 
|
मेधा, बरोब्बर! बाकी तुझ्या पद्धतीने बिर्याणी छान झाली ते सांगायचं राहिलं होतं बघ.
|
Hems
| |
| Tuesday, April 25, 2006 - 10:34 pm: |
| 
|
लालू, आमच्या रत्नांग्रीचे फोटो छान आहेत ग ! " भगवती बंदर " बरोबर आहे नाव. नर्मदा जेटी वगैरे खूप दिवसांनी अनपेक्षितपणे वाचायला काय बरं वाटलं म्हणून सांगू! तू कधी गेली होतीस तिकडे? ... आणि तुला आता "trivia" चा नाद लागला आहे वाटतं !
|
Shonoo
| |
| Wednesday, April 26, 2006 - 1:39 am: |
| 
|
बिरयाणी चिकन ची की मटणाची? सुरम इ ला काय लावून तळलेय वास तरी झकास आला
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:20 pm: |
| 
|
सुरमई श्याम ईस तरहा आये सास लेते है, जिस तरहा साये
|
Lalu
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:27 pm: |
| 
|
हेम्स, या महिन्यात १० दिवसाच्या भारतभेटीत मुम्बई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा असा दौरा केला बघ. रत्नांग्री तशी ओळखीची आहे, मी भारतात असताना जायचे. शोनू, चिकन बिर्याणी गं. आणि माशाला आले, लसूण, कोथिम्बीर, तिखट, चिन्च नेहमीचेच. रवा आणि तांदळाच्या पीठात घोळवून तळलेत. मी फक्त खायचे काम केले.
|
लालु मला ती वांग्याची भाजी आणि कटलेट वाटले
|
मला तर वांग्याचे काप वाटले, पण म्हंटले, चौकोनी करत नाहीत ते आणि लालू कौतुकाने विचारते म्हणजे नक्कीच मासे असणार.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:26 am: |
| 
|
मासे न खाणार्याना असेच सांगतात, आणि मग चटक लागते.
|
Tanya
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:46 am: |
| 
|
लालु... मस्तच ग कोलंबीच कालवण आणि तळलेल्या सुरमईची तुकडी आणि तेही मस्त आयतं. सुख ते कोणत? बर्याच दिवसांनी आपल्याइथे मिळणार्या पिठाच्या चपात्या पाहिल्या. इथल्या चपात्या नुसत्या (पिठातील कोंड्यामुळे) brownish दिसतात. दिनेश...
|
तनया, हल्ली कोंडा खा, आणि पीठ फेक, अशीच वेळ आलीय... Diet चे नवे नियम आहेत हे... तेव्हा आनंदाने खा त्या, Healthy असतात..
|
" हल्ली कोंडा खा, आणि पीठ फ़ेक " LOL लालू, भारत भेटित खुप मज्जा केलेली दिसते आहेस विनय, अहो तुमच पुस्तक घ्यायच राहिल हो, कारणं इथे देत नाही, पण राग मानू नका बरं आणि मेधा, मी मटण बिर्याणी केली होती ग - सही झालेली
|
Shonoo
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:47 pm: |
| 
|
पुण्य गेले वर्षभर मला मटण बिर्याणी करायला मूड अन मुहूर्त जमत नाहीये. आमची फ़ूटबाॅल टीम इतकी भिकार खेळत होती की रविवारी कोणी कोणाकडे जात येत नव्हते. अख्खा सीझन सुतकी गेला. आता यंदा काय दिवे लावतात ते बघायच!
|
$/)&%$§/(&§$="&§()"& ase photo lok ka taktaat! Mhanje ekdam aish keleli disate ahe :D
|
लालू, फिक्कुट नाही ग केला! माह्या स्क्रीनवर असा केला कीच रन्ग दिसताहेत, नायतर समदे फोटु काळेशार दिसतात! स्क्रीन कलर सेटिन्गच्या टीप्स दे!
|
लालू थंड घे जरा... आठवतं माणसाला कसं भल्या थंडीतही central park मधे एक कोवळं पान दिसलेलं ते... आकाशातले ढग बघ... तासाभरापुर्वी जो आकार होता तोच परत पाहिजे असा हट्ट केलास तरी दिसेलच असं सांगता येणार नाही... बाहेर आलेलं फ़ुलपाखरू परत कोशात जाणार नाही आणि संध्याकाळचा आकाशातला रंग परत कालच्या सारखाच जमून येणार नाही... बघ बघ डोळे उघड जरा... आलेल्या दिवसाचा असा मस्त पापा घे... खूष हो...
|
लालू, जरा Episode वाच आणि हा हट्ट सोड... कवितांच्या BB वर चक्कर टाकून ये.. तुला व्यसन लागलं तर नाही ना याची तपासणी करू घे, आणि एवढं करूनही जा. वू. दे. शिल्लक राहिल्यास, शिमला मिरची ही सिमल्याहून आली, की कोण्या सीमाला हवी होती म्हणून यावर चर्चा करायल्ल BB काढ... मग तू जा. वू. दे. ऐवजी अ. ये. दे. (अजून येऊ देत) म्हणशील... 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|