|
Psg
| |
| Thursday, April 20, 2006 - 10:43 am: |
| 
|
केदार, सध्या मार्केट strong आहे म्हणून लोकं गुंतवणूक करत आहेत. मला सांगा what is the ideal time to sell? २-४ वर्ष dividend मिळाला की, का त्या शेअरने आपण घेतलेल्या भावापेक्षा जास्त भाव गाठला की? तसच, capital gain tax चा किती विचार करायला हवा विकताना?
|
Psg तु खुप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस. त्या प्रश्नाचे मी एक छोटे पण उपयोगी उत्तर investment page वर पोस्ट केले. ( read exit strategy ). केदार.
|
Dineshvs
| |
| Friday, April 21, 2006 - 12:15 am: |
| 
|
केदारच्या माहितीपुर्ण लेखांमुळे, अनेक जणाना गुंतवणुक करायची ईच्छा झाली असेल. पण हे सगळे फार टेक्निकल आहे, आम्हाला समजत नाही, असा काहि जणांचा ग्रह झाला असेल, तर त्यांच्यासाठी हि अगदी प्राथमिक माहिती. लिमिटेड कंपनी पर्यंत प्रवास कसा झाला ते थोडक्यात पाहु. अगदी प्राथमिक अवस्थेत ऊद्योगधंदे सुरु झाले ते सोल प्रोप्रायटर पासुन. ईथे सगळा एकखांबी तंबुसारखा कारभार. श्रमहि एकाचे आणि पैसाहि एकाचाच. अजुनहि काहि छोटे ऊदोयगधंदे अश्या स्वरुपात चालवले जातातच. लहान प्रमाणावर हे सहज शक्यहि होते, पण सगळी सोंगे आणता येतात, पण पैश्याचे नाही या न्यायाने, कधीतरी पैसा व कधी अनुभव कमी पडतो. एकाच माणसाला खरेदी, विक्री बघणे, ऑफ़िस संभाळणे असे सगळेच जमत नाही. मग भागीदार शोधले जातात. येणारा भागीदार, हा भांडवल तरी गुंतवेल किंवा श्रम तरी करेल. म्हणजे व्यवस्थापनातला काहि वाटा तो ऊचलेल. भागीदारी आली म्हणजे होणारा नफा वाटुन घेणे आलेच. दुर्दैवाने तोटा झाला तर तोहि वाटुन घ्यावा लागणार. भागीदारी व्यवसाय, भारतात तरी ईंडियन पार्टनरशिप ऍक्ट, १९२२ ने नियंत्रित केला जातो. भागीदारी मधे बहुतेकदा पार्टनरशिप डीड असते. त्यात प्रत्येक भागीदाराचे नाव, त्याचा भागीदारीतील वाटा, अश्या काहि बाबी नोंदवलेल्या असतात. भागीदार जवळचे मित्र असतील तर सहसा, मतभेद होत नाहीत, पण समजा झालेच तर काय करायचे, किंवा वाद कश्या तर्हेने सोडवायचे, याचीहि नोंद या कागदपत्रात केलेली असते. पण असे डीड नसले तर या कायद्यात तरतुदी केलेल्या आहेतच. आता कायद्याच्या नजरेतुन बघितले तर सोल प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप याना तसा अर्थ नाही. म्हणजे त्याना स्वतंत्र अस्तित्व नाही. सोल प्रोप्रायटरमधला मालक आणि भागीदारीतले भागीदार, हे नामानिराळे राहु शकत नाहीत. म्हणजेच, जे कोणी यांच्याशी व्यवहार करतात, त्याना नुकसान भरपाई करायची वेळ आली, किंवा ऋणकोना कर्जाची परतफ़ेड करायची वेळ आली, तर हि मंडळी व्यक्तीश : जबाबदार असतात. म्हणजेच त्यांचे दायित्व अमर्याद, किंवा अनलिमिटेड असते. दुर्दैवाने समजा या ऊद्योगाचे दिवाळे निघाले, आणि त्या ऊद्योगाची मालमत्ता विकुन आलेला पैसा, हा त्या ऊद्योगाची देणी देण्यास पुरेसा नसला तर, या मालकांची वा भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता, त्या ऋणकोना ऊपलब्ध असते. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. भागीदार किती घेता येतील याला कायद्याच्या आणि ते किती भांडवल गुंतवु शकतील याला व्यवहाराच्या मर्यादा आहेत. या मर्यादांवर मात करण्यासाठी, एक नवीन सेट अप सुरु करणार आला, आणि तो म्हणजे लिमिटेड लायबिलिटी कंपनी. आता एथले जे भांडवल आहे ते काहि मर्यादित लोकांकडुन न घेता, सर्वसाधारण लोकांकडुन जमा केले जाते. यासाठी अर्थातच अनेक कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत. कंपनी कायदा, १९५६ बरोबरच रजिष्ट्रार ऑफ़ कंपनीज, कंपनी लॉ बोर्ड अश्या काहि संस्था सर्व लिमिटेड कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कंपन्यांचे मुख्य प्रकार दोन. एक प्रायव्हेट आणि दुसरी पब्लिक. हे शब्द बहुदा कंपनीच्या नावातच असतात. प्रायव्हेट कंपन्या खाजगीरित्या, भांडवल ऊभे करतात तर पब्लिक कंपन्या लोकांकडुन भांड्वल ऊभे करतात. हे जे भांडवल असते त्याची विभागणी अनेक भागात केली जाते व त्याला भाग भांडवल म्हणतात. आणि या भागानाच ईंग्लिशमधे शेअर्स म्हणतात. आता नेमके किती भांड्वल कंपनीला लागणार आहे, त्याची नोंद करावी लागते. या कंपन्यांची दोन कागदपत्रे, एक मेमोरॅंडम ऑफ़ असोसिएशन आणि दुसरे आर्टिकल्स ऑफ़ असोसिएशन असतात. पहिल्यात नाव, स्थापनेचा हेतु, भांडवल आदी त्रोटक माहिती असते आणि दुसर्यात कंपनीचा कारभार कसा चालेल, याची माहिती असते. सर्व लिमिटेड कंपन्यांची नोंदणी करावीच लागते आणि या दोन कागदपत्रांशिवाय हि नोंदणी होत नाही. आता हे जे भाग भांडवल म्हणजे शेअर्स असतात ते १, २, ५, १०, ५०, १०० रुपये अश्या मुल्यांचे असु शकतात. या रकमेला दर्शनी मुल्य किंवा फ़ेस व्हॅल्यु म्हणतात. तुम्हाला मिळणारा डिव्हीडंड नेहमी फ़क्त याच रकमेवर असतो, हे कायम लक्षात ठेवायचे. एखाद्या कंपनीने असे शेअर्स बाजारात आणले कि त्याला पब्लिक इश्यु असे म्हणतात. तसेच कंपनीची माहिती देणार्या कागदपत्राला प्रॉस्पेक्टस असे म्हणतात. आता या प्रॉस्पेक्टस मधे काय माहिती द्यावी, यबद्दल बरेच नियम आहेत. केवळ ग्लुमी पिक्चर न रंगवता, जोखमीच्या बाबींची पण वस्तुनिष्ठ माहिती आता द्यावी लागते. हे प्रॉस्पेक्टस नीट वाचुनच या शेअर्समधे गुंतवणुक करावी, अशी अपेक्षा असते. एखाद्या अस्तित्वात असलेल्या बिझिनेस हाऊसने जर नवीन इश्यु काढला, तर त्याला अभुतपुर्व प्रतिसाद मिळतो. या प्रतिसादाला सब्स्क्राईब असा शब्द वापरला जातो. योग्य त्या कायदेशीर परवानगीने शेअर्स दर्शनी मुल्यापेक्षा जास्त रकमेला विकता येतात. या फरकाला प्रिमियम म्हणतात. पण या प्रिमियम वर तुम्हाला डिव्हीडंड मिळत नाही, पण कंपनीला मात्र तो पैसा भांडवल म्हणुन वापरता येतो. आता कुणीहि नागरिक वा संस्था हे शेअर्स मिळावेत म्हणुन अर्ज करु शकतात. आजकाल अनेक पब्लिक इश्यु ओव्हरसब्स्क्राईब झाले असे तुम्ही वाचत असाल. म्हणजेच जितके शेअर्स विकायला काढलेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मागणी बाजारातुन झालेली असते. अशी मागणी झाली म्हणुन जास्त शेअर्स विकता येत नाहीत. तर अश्या अर्जदारांपैकी काहि जणानाच, लॉटरी सारख्या एखाद्या पद्धतीने शेअर्स अलॉट केले जातात. आजकाल अर्जाबरोबरच पुर्ण पैसे भरावे लागतात. शेअर्स अलॉट झाले नाहीत, तर हे पैसे ठराविक दिवसात परत करावे लागतात. प्रतिसाद किती मिळेल हे आधी सांगता येत नाही, पण तो कमीत कमी किती असावा, म्हणजेच मिनिमम सबस्क्रिप्शन किती असावे, हे आधीच कायद्याने ठरलेले असते. तितके अर्ज आले नाहीत, तर तो इश्यु रद्द होतो. हे मिनिमम सबस्क्रिप्शन मिळावे म्हणुन त्याचा विमा ऊतरवला जातो, आणि त्याला अंडररायटिंग असे म्हणतात. हल्ली शक्यतो शेअर्सचे सगळे पैसे एकदम भरावे लागतात, असा उल्लेख वर केलेला आहेच. पण तरिहि हि रक्कम हप्त्या हप्त्याने मागायची सोय आहे. अर्जाबरोबर द्यायची रक्कम, अलॉटमेंट झाल्यावर द्यायची रक्कम, पहिला कॉल, दुसरा कॉल असे हप्ते असु शकतात. आणि जर तुम्ही हे शेअर्स घेतलेले असतील, तर अशी रक्कम, मागणी होताच भरण्याची जबाबदारी तुमची. म्हणजे ते तुमचे दायित्व असते. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. तुमचे दाइत्व तुम्ही घेतलेल्या शेअर्सवरच्या दर्शनी मुल्यांपैकी, जितकी रक्कम द्यायची राहिली असेल, तेवढेच तुमचे दायित्व. आणि हाच लिमिटेड लायबिलिटीचा अर्थ आहे. म्हणजे दुर्दैवाने ऊद्या कंपनी बुडीत निघाली, तर त्या कंपनीचे शेअरहोल्डर म्हणुन तुमच्याकडे कुणीहि वरिल रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करु शकत नाही. आता तुम्ही शेअर्होल्डर असला म्हणजे, कंपनीच्या तेवढ्या भागाचे तुम्ही मालक असता, आणि मालक असलात तरी तुमची लायबिलिटी लिमिटेड असते. आणि जर तुमचे शेअर्स फ़ुल्ली पेड असतील, तर तुमची लायबिलिटी शुन्य असते. एक मालक म्हणुन तुमचे काहि हक्क असतात. पण तरिही तुम्ही कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालु शकत नाही. हा रोजचा व्यवहार संभाळण्यासाठी बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स असते. त्यांच्या नेमणुका, काहि ठराविक नियम पाळुनच कराव्या लागतात. जरी रोजचा कारभार बोर्ड बघत असले, तरी त्यांचे अधिकार अमर्याद नसतात. काहि बाबींवर त्याना सर्व शेअर्सहोल्डर्स ची परवानगी लागते, आणि हि परवानगी सर्वसाधारण वार्षिक सभेत ठराव मांडुन मिळवावी लागते. यावर लोकशाहि पद्धतीने मतदान होते, व काहि महत्वाच्या बाबतीत तीन चथुर्तांश मते मिळणे आवश्यक असते. या संबंधात सुद्धा नियम असतात. आणि हे सगळे नियम पाळणे, त्यासाठी आवश्यक ते दस्ताऐवज ठेवणे हि कंपनी सेक्रेटरी या पदावर असलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे. ( हेसुद्धा एक प्रोफ़ेशन आहे. ) जरी भागधारकांचे दायित्व मर्यादित असले तरी, या कंपन्यांवर अनेक संस्थांचा वचक असतो. त्या संस्थाना वेळोवेळी माहिती पुरवण्याची जबाबदारी या कंपन्यांवर आहे. या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत याचा अर्थ असा कि, कुणीहि नागरिक, रजिष्ट्रार ऑफ़ कंपनीज च्या कार्यालयात जाऊन, हि माहिती मिळवु शकतो. सर्व कंपन्यांवर चार्टर्ड अकाऊंटंट कढुन वार्षिक तपासणी करुन घेणे बंधनकारक असते, त्यानी विहित नमुन्यात त्यांचा अहवाल द्यायचा असतो, आणि त्याला ऑडिट रिपोर्ट असे म्हणतात. अमेरिकेतील काहि घोटाळे, या मंडळीनी बेजबाबदारपणे काम केल्याने झालेत, हा ताजा ईतिहास आहे. तर हा रिपोर्ट आणि ईतर गोष्टी शेअर्सहोल्डर्स ना पाठवुन त्यांची परवानगी घ्यावी लागते. या सी ए लोकांची नेमणुक पण त्यांच्या परवानगीनेच होते. जर पुरेसा फायदा झाला असेल तर बोर्ड डिव्हीडंड रेकमेंड करते, आणि तेहि या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्य करुन घ्यावे लागते. आजकाल प्रत्येक तिमाहिसाठी असे अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याने, बोर्ड आंतरिम डिव्हीडंड सुद्धा जाहिर करु शकते, आणि तो फ़ायनल डिव्हीडंड मधुन वजा होतो. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे, हे शेअर्स विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी असलेला बाजार. एकदा बाजारात आलेले शेअर्स ईथे खरेदी विक्रीसाठी येतात. ( नविन इश्यु नाही. ) ईथे सामान्य भागधारक म्हणुन तुम्हाला भाग घेता येत नाही, तर तुम्हाला तुमचे व्यवहार ब्रोकर तर्फेच करावे लागतात. तो तुमच्या वतीने हे व्यवहार करतो, व त्याबद्दल त्याला ब्रोकरेज म्हणजेच कमिशन द्यावे लागते. तसेच असे व्यवहार होण्यासाठी ते शेअर्स ईथे नोंदवावे लागतात, आणि त्याला लिश्टिंग असा शब्द वापरला जातो. या लिश्टिंगचे व ते जारी ठेवण्याचे काहि नियम असतातच. पुर्वी शेअर्स हे कागदोपत्री असायचे. त्याना शेअर सर्टिफ़िकेट असा शब्द होता, आता ते ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात ठेवता येतात. त्यासाठी तुम्हाला एक डिमॅट अकाऊंट ऊघडावे लागते. हे शेअर्स बाजारात दर्शनी मुल्यान्पेक्षा खुपच जास्त किमतीत विकले जातात. शेअर्सची हि किम्मत, कंपनीचा अहवाल, तिला मिळणारे नविन कॉन्ट्रॅक्ट्स, तिच्या भविष्यकालिन योजना, सरकारी धोरणे अश्या अनेक गोष्टींवर ठरतात. याबाबतीत भागधारकांची मानसिकता, हा एक मोठा घटक आहे, आणि याबाबतीत नेमके अंदाज वर्तवणे अशक्य नसले तरी खुपच कठीण असते. तुम्ही एकदा भागधारक झालात कि तुम्ही तुमचा शेअर कुणालाहि विकु शकता, आणि तुम्ही वा ईतर कुणीहि तो खरेदी करु शकतो. या व्यवहारात होणारा फायदा वा तोटा हा निव्वळ तुमचा असतो. त्यात ज्या कंपन्यांचे ते शेअर्स आहेत, तिचा थेट सहभाग नसतो, शिवाय हा फायदा वा तोटा, तिला सहन करावा लागत नाही. त्यामुळे आज एक शेअर ११० रुपयाना घेतलात आणि ऊद्या त्याची किम्मत ११५ झाली, आणि तुम्ही विकलात. ( आणि जेंव्हा तुमचा व्यवहार पुर्ण झाला, तेंव्हाहि तीच किम्मत राहिली तर ) तुम्हाला ५ रुपये फायदा होतो. असे अनेक शेअर्स तुमच्याकडे असले, आणि असे अनेक व्यवहार तुम्ही केलेत तर तुम्हाला मोठा फायदा होतो. वर लिहिल्याप्रमाणे कंपनीला या व्यवहारासाशी काहि घेणे देणे नसते. जर तुमाला तो शेअर दिर्घ मुदतीसाठी ठेवायचा असेल तर, तुम्ही कंपनीकडे तुमची मालकी नोंदवु शकता. कंपनीच्या रेकॉर्डप्रमाणे जो भागधारक असेल, त्यालाच डिव्हीडंड दिला जातो. दरवर्षी डिव्हीडंड दिलाच पाहिजे, असे कोणतेही बंधन कंपन्यांवर नसते. आणि जर तुम्ही मुळ खरेदीदार नसाल तर केवळ डिव्हीडंड साठी एखादा शेअर आपल्याकडे ठेवणे, तितकेसे फायद्याचे ठरत नाही. ( कारण तुम्हाला मिळणारा डिव्हीडंड हा फ़ेस व्हॅल्यु वर असतो, तुमच्या खरेदी किमतीवर नाही. ) . जर कंपन्यांकडे काहि नविन योजना असतील, किंवा जादा भांडवलाची गरज असेल तर कंपनी आणखी शेअर्स विकायला काढु शकते. अश्यावेळी आधीच्याच भागधारकाना, त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात अग्रहक्काने ते शेअर्स, दर्शनी मुल्यात किंवा थोड्या प्रिमियमने ऑफ़र केले जातात. याला राईट इश्यु म्हणतात. तसेच जर कंपनीकडे राखुन ठेवलेला निधी असेल, आणि भविष्यात वाढीव भांडवलावर परतावा देण्याची क्षमता असेल तर, कंपन्या आपल्या आधीच्याच भागधारकाना, त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात, आणखी काहि शेअर्स कंपनी चकटफ़ु देते. आणि याला बोनस इश्यु म्हणतात. कंपन्यांच्या अश्या काहि योजना असतील, तर बाजारात शेअर्सच्या किमती वाढतात. तर मित्रानो, या क्षेत्रातील तांत्रिक बाबींची हि अगदी प्राथमिक महिती. केदारच्या आणि ईतर मायबोलिकरांच्या आग्रहावरुन ईथे पोस्ट करतोय. जर तुमच्याकडे अतिरिक्त बचत असेल तर तुम्ही अवश्य या क्षेत्रात शिरा. आधी थोड्या रकमेने सुरवात करा. ती रक्कम व त्यावर बॅंकेच्या दराने मिळणारे व्याज, ईतपत फायदा पदरात पाडुन घ्या, आणि मग होणारा अतिरिक्त फायदा, परत परत गुंतवुन आणखी फायदा मिळवा. केदारचे मार्गदर्शन आहेच, तरिही स्वता रस घेऊन जर ईथे शिरलात, तर जास्त मजा येईल. हा ऊद्योग हल्ली घरबसल्याहि करता येतो. माझ्या शुभेच्छा आहेतच.
|
Psg
| |
| Friday, April 21, 2006 - 11:31 am: |
| 
|
केदार, छान लिहिल आहे exit strategy बद्दल..
|
Champak
| |
| Friday, April 21, 2006 - 12:22 pm: |
| 
|
Moderators, Please move Dinesh´s and Yogibear´s post to some appropriate place.
|
Yogibear
| |
| Friday, April 21, 2006 - 1:24 pm: |
| 
|
बर्याच जणांना केदार ने दिलेली माहिति प्रत्येक्षात वापरुन बघायची असेल पण गुंतवण्याचा काहीच अनुभव नसल्याने direct stock market मधे उतरण्याची भिति वाटत असेल तर इथे US stock market simulator आणि इथे Indian stock market simulator द्वारे गुन्तवणूकीचा अनुभव घेता येइल... 
|
दिनेश, सहीच.. मला अगदी कंपनी कायदा १९५६ आठवला. खुपच माहीतीपुर्न लेख. तुमची मराठी लिहायची speed पन भरपुर आहे. बरेचदा मला खुप लिहायची इच्छा असते पन लिहीता लिहीता दमून जातो. योगी, सही मला ही ह्या sites माहीती नव्हत्या. आता हे गेम खेळून बधतो. केदार..
|
Yogibear
| |
| Friday, April 21, 2006 - 2:19 pm: |
| 
|
Kedar: Just out of curiosity, do you day/swing/short trade? or only long play?
|
योगी, सध्या US मध्ये असल्यामुळे I dont do day trading but I do short term (less then 1 week) and long. पन जेव्हा भारतात जातो तेव्हा कधी कधी day trading पण करतो.
|
Yogibear
| |
| Friday, April 21, 2006 - 3:22 pm: |
| 
|
Kedar: Ok, thx, I also do active trading, if interested check out my blog... 
|
Milindaa
| |
| Friday, April 21, 2006 - 5:00 pm: |
| 
|
Champak, there is no more appropriate place than this BB and moderators can't put any post on this BB unless the user requests that (since this IS user's personal BB). So, I would say, if Kedar thinks that it is a good idea, he can copy the post himself and paste there.
|
मी कॉपी करुन पोस्ट करन्याचा प्रयत्न केला पण फक्त आकडे येत आहेत.
|
yogi, sahi hai bhai. lage raho. Do you have some software or you use free web sites for research. Recently i went to one stock seminar conducted by commandtrade. Tynache ek prodcut pahile they are selling it for $7900. tya producut madhe backtest naavaache ek facility aahe. It will test your strategy before you actually buy the stock based on past data and also it has trailing stop loss amount. Though its good I find it very expensive.
|
Yogibear
| |
| Friday, April 21, 2006 - 8:27 pm: |
| 
|
Kedar: I use following softwares... 1. QuoteTracker free edition 2. Charter 2.0 - Nice for quick graphs and its free 3. Best Charts - relatively very cheap and provides back testing facility as well. 4. Inference Trade - relatively very cheap and this one allows you to write your own formulas for different graphs although not so easy to use. I use 1,2,3 and I persnonally like 1 and 2. Although if you are an active trader and are ready to spend some money then eSignal, Meta stock and TeleChart are considered to be the best softwares. Good luck 
|
Cool Yogi, thanks for the info. I am an active trader. I use free web sites and I have build some xls, it does not have "LIVE data" but all other charts are automatically get created once I get todays data. But now I am moving towards building a Java based software myself. I will see if I get demos of those softwares suggested by you.
|
हाय केदार खुप चन्गली माहिति मिळालि......मि ही Mutual Fund मधे इन्वेस्ट करायचा विचार करत होतो पण मला काहि माहिति नव्हती म्हाणुन आता पर्यन्त केला नहि.... आता नक्कि करेन..... thanx
|
Chingutai
| |
| Saturday, April 22, 2006 - 5:46 am: |
| 
|
केदार ' एक्झीट स्ट्रॅटेजी' पोस्ट अगदी उपयुक्त. योगी, मस्त लिन्क आहे. धन्यवाद! दिनेश, नेहमीप्रमाणेच..... निव्वळ लाजवाब!!! -चिंगी
|
Dineshvs
| |
| Saturday, April 22, 2006 - 2:26 pm: |
| 
|
मुच्युअल फ़ंड हि नविन लोकांसाठी खास सोय आहे. तुमचा सगळा पैसा हा काहि विश्वस्तांच्या हातात असतो. ते या क्षेत्रातले जाणकार असतात. आणि ते सगळ्यांच्या वतीने निर्णय घेतात. बाजारातील बहुतेक फ़ंडस नी चांगला परतावा दिलाय. पण तरिही त्यात जोखीम असतेच. अर्थशास्त्राचे एक तत्व आहे, तितकी जोखीम मोठी, तितका परतावा जास्त.
|
सोन्याच्या वाढत्या किंमतीवर येक सुरेख लेख, http://www.loksatta.com/daily/20060423/lokkal.htm
|
अमेरिकेत मागे पण सोन्याचा भाव जोरदार वाढुन ८०० झाला होता ( मला exact वर्ष आठवत नाही.) आज तो spot price साठी ६३२ पर्यंत गेला आहे. जेव्हां तो ८०० झाला तेव्हा खुप जन परत सोन्या कडे वळले. काही दिवसानी परत तो ३८० एवढा खाली आला होता. त्यमुळे जर तुम्ही लगेच सोने धेनार असताल तर जर विचार करुन ध्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|