|
| |
| Monday, July 04, 2005 - 6:15 am: |
| 
|
वाढदिवसाच्या दिवशी, रात्री जेवणानंतर आमच्या माझ्यासह २ मित्रांना थोडासा food poisoning चा त्रास वगळता दिवस सुरेख गेला. दुसर्या दिवशी माझी खुप दिवसापासुन ची एक इच्छा पुर्ण होणार होती. लहानपणी मामाच्या गावाला जाई तेंव्हा तिथे एक घोडा होता. पण तो जरा जास्त च चपळ होता त्यामुळे मला घोड्यावर बसायची इच्छा मात्र पुर्ण झाली नवती. इथे एका लॅब मेट च्या मैत्रीणीच्या घरी stud farm आहे. अन बरेच दिवसापासुन आमचे त्या लॅब मेट बरोबर घोडेस्वारी ला जायचे चालले होते. तर आम्ही, म्हंजे मी, बंगाली मुलगा, लॅब मेट त्याचे नाव xabier , स्पॅनिश उcचार खाबीयेर असा होतो अन त्या ची मैत्रीण तिचे नाव जोने) असे ४ जण शनिवारी सकाळी ११ वाजता फ़ार्म हाउस वर गेलो. ते ठिकाण शहरापासुन साधारण कार ने ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. बास्क कंट्री हा एकदम काश्मीर सारखा डोंगराळ प्रदेश आहे. डोंगराळ भाग अन १२ ही महिने पडणार्या पावसामुळे अगदी हिरवागार परिसर खुप झाडी अन त्यात स्वछ उन पडलेले वातावरण एकदम सही होते. सफ़रचंद अन आॅलिव्ह इथे मुबलक पिकतात. अश्या च एका हिरव्यागार टेकडीवर ते farm house / stud farm होते. चित्रपटात दाखवतात तसे काही टेकड्यांवर काही गाया, बैल, मेंढ्या, आणि घोडे चरत होती. घोड्यांच्या खिंकाळण्या च्या स पार्श्वसंगितामध्ये त्या मैत्रीनीच्या वडिलांनी स्वागत केले अन ओळख परेड झाली. तिथे फ़क्त घोडे च नव्हे तर शहामृगा सारखे पण राखाडी रंगाचे ४ पक्षी होते. नक्की नाव समजले नाही. काही कोंबड्या, आणि मला अज्ञात असलेली काही पक्षी अन २ कुत्री होती. मला कुत्र्यांची जाम भिती वाटते कारण ४ थी ला असताना माझ्या गुरुजींच्या कुत्र्याने माझ्या पायाला असा काही चावा घेतला होता कि ते मला ७ इंजेक्शन घ्यावी लागली होती पण ही कुत्री जाम चांगली होती त्यांच्या शेती ला एक चक्कर मारुन आलो. त्यांनी बटाटे, टोमॅटो, थोडी द्राक्ष बाग, वाटाणे पालक, हिरवी मिरची, सिमला मिर्ची, ई. भाज्यांची अन गुलाब, अन ईतर काही फ़ुलझाडांची लागवड केली आहे. अगदी देशात जाउन रानात फ़ेरफ़टका मारल्या सारखे वाटले. बर्याच दिवसांनी माती हातात घेतली. मग घोडे पहायला गेलो. त्यांच्याकडे अरबी, अरबी - स्पॅनिश, अरबी - इंग्लिश, अमेरिकन अन स्पॅनिश जातीचे असे एकुण ७ घोडे होते. ते घोडे त्यांच्या मालकीचे नाहीत पण त्यांच्या फ़ार्म हाउस वर ते ठेवलेले असतात. जसे बेबी सिटिंग असते तसेच हा घोडे सिटिंग चा प्रकार आहे बहुदा. ७ वेग वेगळ्या घोड्यांच्या मालकांनी त्यांचे घोडे ह्यांना दर महीना एक ठराविक रक्कम देउन निगा राखायला दिलेले आहेत. त्या घोड्यांना दररोज आस पास च्या टेकडीवर फ़िरायला नेणे अन चारा पाणी करणे ही कामे त्या मैत्रीणीचे वडिल करतात. असो. ह्या घोड्यांना आम्ही सोबत आणलेली गाजर खायला घातली अन रपेटीपुर्वी थोडी ओळख करुण घेतली.मान, चेहरा अन पाठीवर थोपटले अन मला पाडु नको रे भो अशी विनवनी पण केली अरबी घोडा म्हंजे एकदम जंगी काम.एकदम उमद जनावर जाम आवडला, पण पहिल्या च वेळी अरबी घोड्यावर बसायची हिंमत झाली नाही. सोबत आणलेले खाण्या पिण्याची साहित्य एका टेबलावर ज्याला डायनिंग टेबल असे ही म्हणता येइल अश्या टेबलावर मांडले. vegetable salad , आम्लेट, अन सोबत सिड्रा नावाचे खास पेय होते. ते सफ़रचंदापासुण बनवले जाते. कोंबड्या, घोडे, ईतर पक्षी, ह्यांच्या संगतीत एक वनभोजनाचा अनुभव घेतला. जेवण झाल्यावर लॅब मेट ची मैत्रीण तिचे नाव जोने) रपेटी साठी तयारी करायला गेली. अन थोडा वेळाने समोर आली तर एकदम हंटर्वाली fearless Nadia च्या रुपात. एकदम जाॅकी च डोक्यावर ती टोपी, घोडेस्वारी चा खास पोषाख, बुट पन हातात हंटर मात्र नवता कारण घोडे तिच्या अगदी च ओळखीचे होते. ती ५ वर्षाची असल्यापासुण तिचा लहानपण चा फ़ोटो मी <a href="/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=643983#POST643983" target="_blank">चित्र कविता </a> सदरात टाकला होता. ती च ती.) घोडेस्वारी करते आहे. तिला मी नाडिया बद्दल सांगितले तर ती जाम लाजली. मग तीन घोड्यांवर खोगिर चढवली. अन त्यंना बंदिस्त रिंग मध्ये घेतले. एका घोड्यावर ती, एकावर गाढा s s व मी?) अन एकावर बंगाली मुलगा असे बसलो. मी त्या मानाने शांत असणार्या स्पॅनिश - अरबी जातीच्या घोड्यावर बसलो. मग थोडे राउंड मारुण झाल्यावर ती ने तिच्या मित्राला त्या घोड्यावर बसवले. अन मग आम्ही तिघे त्या रिंग मध्ये तब्बल ३० मिनिटे घोडे पळवले. घोड्यावर बसतांना, जर कुणाला कुबड काढुण बसायची सवय असेल तर त्यांना जाम अडचण येते. पाठीचा कणा सरळ ठेवुण, असलेली अन नसलेली छाती काढुन बसावे ज्यांचे पाठीचे कणे पोलाड भरल्यासारखे ताठ नाहीत त्यांनी चाणक्य मंडळा तुन पोलाद, लोखंड, शिशे, कथील, बीड, तांबे, चांदी, ई. ई. भरुण आणावेत!) दोन्ही हातात लगाम घेउण घोड्याच्या मानेवरील केसाजवळ घट्ट पकडावे लागतात. खोगिराला जोडुन असलेल्या कड्यांमध्ये पाय अडकवलेले असतात. घोडा सामान्य वेगाणे चालत असेल तर काही अडचण येत नाही पण घोडा जेंव्हा पळायला लागतो तेंव्हा मात्र आपले पाय त्या लोखंडी कड्यांत पक्के अडकवुण छातीवर पुढे झुकवुण थोडेसे उभे राहाता आले पाहीजे. नाहीतर सगळी हाडे ढिल्ली होतात . घोडा वळवतांना ज्या बाजुला वळवायचा आहे त्या बाजुचा लगाम ओढुण दुसर्या बाजुच्या पायाने त्याला टाच मारावी लागते. अन घोडा जागीच थांबवायचा असेल तर दोन्ही हातांनी लगाम थोडासा मागे आपल्या छातीकडे ओढायचा असतो. इथे एक काळजी घ्यावी लागते कि जर लगाम जास्त ओढला गेला तर घोडा पुढील पाय हवेत नेउन उड्या मारायला लागतो अन जर आपल्यला तोल सांभाळता आला नाही तर आपण पडु शकतो
. घोडा पळवायचा असेल तर दोन्ही पायांनी एकाच वेळी पुन्हा पुन्हा टाच मारावी. आम्ही सर्व काळजी व्यवस्थीत घेतली अन रिंग च्या मध्यभागी साक्षात fearless Nadia हंटर्शिवाय उभी होती त्यामुळे अडचण आली नाही. शेवटची ५ ते १० मिनिटे मात्र आम्ही तिघेच होतो जोने व तिच्या वडिलांना ला एक घोडे मालक आल्यामुळे बाजुला जावे लागले. तेंव्हा आम्ही घाबरलो होतो. पण घोड्यांना सवयीचे असल्याने प्रश्न आल नाही. आम्हापैकी कुणी ही अगोदर घोडेसवारी केलेली नवती. नाही म्हणायला आम्ही इथल्या annual sports day च्या दिवशी ५ मिनिटे घोड्यावर बसलो होतो. पण तो अनुभव unsupervised horse riding साठी खुपच कमी होता. घोड्यावर बसलेलो असतांना उगाचच खड्या आवाजात ` आगे पिछे हमारी सरकार
.. ` अन ´ वेडात दौडले वीर मराठे सात ´ अशी गाणी म्हणाविशी वाटली पन अनोळखी आवाजाने घोडे बिचकतील बुजतील म्हणुन मनातल्या मनात च म्हणलो! तब्बल ३०त ते ४० मिनिटांच्या रपेटी नंतर आम्ही घोडे पुन्हा त्यांचा जागी नेले. अन पुन्हा एकदा फ़ार्म हाउस ला चक्कर मारला. अन मग शहरात आलो. घरी फ़ोन केला. अन काल माझा वाढदिवस होता अशी माहीती दिली. अपेक्षेप्रमाणे कुणाला च माहीती नव्हते! नंतर आम्ही ४ जण बीच वर अगदी १० वाजेस्तोवर लोळत पडलो होतो. अन मग ऍश च्या स्वप्नात घोड्यावर बसुन जाण्यासाठी झोपी गेलो (ता.क. : आम्ही कुणी च कॅमेरा नेलेला नसल्याने तुम्ही लोक जगातील एका सुंदर माॅडेल अर्थात दस्तुरखुद्द!) ला घोड्यावर बसतांना चे चित्र पाहु शकत नाहीत.)
|
| |
| Wednesday, July 13, 2005 - 6:34 pm: |
| 
|
<a href="/hitguj/messages/75/87934.html?1121279186" target="_blank">-- --जग^न्^नाथ </a> शेतीत राबणारा गडी अन त्या चा महत्वाचा सण पोळा असे काहीसे एकत्रित लिहिण्या चा प्रयत्न केला आहे.
|
| |
| Monday, July 18, 2005 - 5:15 pm: |
| 
|
MIQUEL BARCELO(a sp^inaXa klaakaracao klaa p`dXa-Na rivavaarI paihlao.. p`dXa-Naa caa ivaYaya : AaiÍ,kna laÜkijavana maaQyama : jalarMga Ê kagad

|
| |
| Monday, July 18, 2005 - 5:18 pm: |
| 
|
k^nvhasa var vaR<ap~aMcao kagad icaTkvauNa %yaad\vaaro naxaI inamaa-Na kolaI Ana %yaavar jalarMgaa
cao ÔTkaro maarlaolao..... mauL ica~ 10 x 10 ÔuT

|
| |
| Monday, July 18, 2005 - 5:22 pm: |
| 
|
ba`aÐJa Qaatu mQyao kolaolaI iXalpklaa²

|
| |
| Tuesday, July 19, 2005 - 1:13 pm: |
| 
|
ek AnauBava
|
| |
| Wednesday, July 20, 2005 - 4:08 pm: |
| 
|
SM was a keen photographer. Under the glass top of his table in his office, there were some photographs of Adivasis - half naked, poor but dancing in raptures and obviously enjoying themselves; with an amazingly radiant smile on the face of men, women and children alike. He had quite a few pictures. Once he said,`Pendse, all of you economists want poverty to be removed and people to get the jobs.I want it too. I want India and Indians to prosper. But look at that radiant smile on their faces. Surely they must have been happy at that moment. I dont see that smile, that joy on the faces of factory workers, or of the middle class- who all must be economically far better off that these poor adivasis. Sometimes I wonder, why is all this job creation taking away the joy and smiles from our faces? Have you economists thought about it all? Work must be fun. Life must be fun. I feel very sad that for most people, their jobs in modern industry and society are not fun. People look upon their job as drudgery´ (From the book :- Giants by any Measure - Sumant Moolagaonkar and J.R.D. - By D.R.Pendse.
|
| |
| Thursday, July 28, 2005 - 11:36 am: |
| 
|
Adios amigos......... Hasta la Vista.........
|
| |
| Friday, September 16, 2005 - 4:28 pm: |
| 
|

|
| |
| Friday, September 16, 2005 - 4:28 pm: |
| 
|
Inside View

|
| |
| Friday, September 16, 2005 - 4:39 pm: |
| 
|

|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|