|
Unimaginable atrocities have gone on too long--for three long years in Darfur, and it must be a matter of urgent concern of all of us as human beings. This posting is especially for Maharashrians residing in USA but those living outside USA could also participate in sending a (standardized or modified) letter to President Bush through the following link. Because of the high importance of stopping the atrocities at the earliest, you may want to forward the link to people in your e-mail address books too for their consideration, and suggest to them to forward the link to people in their address books. http://www.democracyinaction.org/dia/organizations/darfur/campaign.jsp?campaign_KEY=1625
|
Mukund
| |
| Thursday, November 30, 2006 - 11:22 am: |
| 
|
एक सामान्य माणुस मी मायबोलिवर बर्याच महीन्यात येउ शकलो नाही म्हणुन तुमचे हे पोस्ट माझ्या वाचण्यात आले नाही. तुमच्या या विषयाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही ही खेदाची बाब वाटली. कदाचित असेही असु शकेल की बर्याच जणांना दारफ़ोर हे काय प्रकरण आहे हे निट माहीत नसावे. पण मला स्वत:ला तिथल्या एकंदरीत निर्घुण गोष्टी वाचुन खुप वाइट वाटते.वाइट याकरता वाटते की तिकडे जवळ जवळ ४५०००० माणसांचे हत्याकांड झाले आहे आणी तितकेच बलात्कारही झाले आहेत पण जगातले जे सगळे प्रगत आणी शक्तीशाली देश आहेत ते काहीच करत नसुन षंढासारखे बघत बसले आहेत..आणी हा महामाठ बुश, याने या प्रकारात लक्ष घालण्याऐवजी इराकमधे सिव्हिल वाॅर माजवुन ठेवले आहे..खरच कमाल आहे त्याच्या निर्बुधत्येची असो! पण मी हे पोस्ट यासाठी लिहीत आहे की या दारफोर च्या घ्रुणास्पद व अमानवी एट्रोसिटीसची माहीती सगळ्यांना व्हावी. म्हणुन त्याचा थोडासा इतीहास इथे देत आहे. दारफोर हा सुदान या आफ़्रीकन देशाचा पश्चिम भाग,चाड या देशाला लागुन. या भागाकडे गेले २०० ते ३०० वर्षे दुर्लक्ष झाले आहे कारण सुदानमधे सगळे लक्ष नाइलच्या सुपीक पट्ट्यामधे गेली कित्येक वर्षे केंद्रीत झाले आहे त्यामुळे दारफ़ोर सारख्या वाळवंटी भागकडे कोणीच लक्ष घातले नाही. आणी त्यात भर म्हणजे १९८० मधला त्या भागातला प्रचंड दुश्काळ आणी अनिर्बंधीत लोकसंख्या वाढ. या दोन्ही गोष्टींमुळे तिकडच्या लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे झाले काय कि तिथल्या स्थानीक लोकांनी सुदानच्या सरकारविरुध्ह बंड पुकारले(२००१). दारफ़ोर मधे २ जमातींचा वास आहे..एक म्हणजे शेती करणारे..आफ़्रीकन काळे लोक आणी दुसरे म्हणजे टोळ्यांमधुन राहाणारे अरब वंशीय लोक. दोन्ही जमाती मुस्लीमच आहेत पण अरब मुस्लीम आणी काळे आफ़्रीकन मुस्लीम असा भेदभाव त्यांच्यातही आहे. सुदानमधले सरकार हे अरब मुस्लीम लोकांचे आहे(लिबियाचा पंतप्रधान गद्दाफ़ीच्या क्रुपेने!)काळ्या आफ़्रीकन मुस्लीमांच्या बंडामधे सुरुवातीला २ वर्षे सुदानी सरकारचे खुप पराभव झाले कारण बंड करणारे गनीमी काव्याने लढत होते. शेवटी सुदानी सरकारने जनजवीद म्हणुन अरबी हत्यारींची एक भाडोत्री संगठना या बंडाचा निकाल लावण्यासाठी नेमली.त्यांना सगळी पैशाची आणी हत्यारांची मदत केली व त्यांना अनिर्बंध मुभा दिली की कसेही करुन हे बंड मोडुन काढा आणी त्यासाठी त्यांच्यावर कुठलाही अंकुश ठेवला नाही. या अरब जनजवीद टोळीनी जी काही कत्तल सुरु केली काळ्या आफ़्रीकन मुस्लिमांची की त्याला सुमारच नाही..त्यांनी बंड करणार्यांनाचीच नाही पण इनोसंट लोकांचीही कत्तल करायला सुरुवात केली आणी आजही ती चालुच आहे. युनोचे कित्येक रेझोल्युशन पास झाले हे करू आणी ते करु पण अजुन कोणीच काहीच करत नाही आहे. जगामधे फ़्रीडम पसरवत आहो अशी शेखी मिरवत असलेले बुश महाशयही अजुन काहीही करत नाही आहेत. उलट इराक मधे पाण्यासारखा पैसा घालवुन निष्कारण त्या देशाची वाट लावुन टाकली आहे बुशने. असो. वाईट याचेही वाटते की आपण कोणीही ज्यु होलोकाॅस्ट मधुन किंवा रवांडामधील टुट्सी आणी हुटु लोकांच्या वंश संहारातुन काहीच शिकलो नाही. हुटु लोकांनी जवळ जवळ ९ लाख टुट्सी लोकांची कत्तल रवांडात क्लिंटनच्या करकिर्दीत केली होती तेव्हाही अमेरिका आणी सगळे जग मजा पाहत बसले होते. तेच आताही होत आहे.विचार करण्यासारखी गोष्ट आहे
|
Sunidhee
| |
| Thursday, November 30, 2006 - 5:10 pm: |
| 
|
मुकुन्द, तुम्ही मराठीत लिहुन चांगले केलेत. आणि ईतिहास पण लिहीलात. उशीरा का होईना नीट माहीत झाले. भयानक आहे सर्व. आमचे काम सोपे आहे. बुश पर्यंत जाईल ना जाईल पण action घेतलीये.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|