Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Reorganization

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » What I would like to see on Hitguj » Reorganization « Previous Next »

Admin
Tuesday, December 20, 2005 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या looking for, views and comments आणि My experience असे तीन विभाग हितगुजवर आहेत.
पण आपण माहीती शोधत्/लिहीत असलो तर ती विषयानुसार शोधतो. उदा. मला जर एखाद्या पुस्तकाबद्दल बोलायचे असेल तर मला ते looking for मधे कुणाला माहीती आहे का?, my experience मधे मला आलेला त्याचा अनुभव आणि view and comments मधे त्या विषयी चर्चा असे करावे लागते. या खरं तर एकसारख्या गोष्टी नाहीत का? त्यापेक्षा books या एक विभागात त्या पुस्तकाचा शोध, अनुभव आणि चर्चा सगळे एकत्र असेल तर चांगले होईल असे वाटते.
तुमचं काय मत आहे?


Moodi
Tuesday, December 20, 2005 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरुर करा त्याचा एकच विभाग, जसा my city या अंतर्गत सगळे देश, शहर अन गावांचे बीबी येतात तसेच. छान उपाय विचारलात अन सुचवलात.

Ajjuka
Wednesday, December 21, 2005 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

my exp आणि V&C एकत्र करायला हरकत नाही पण loking for should be kept seperate. अर्थात एक वस्तू विचारात घेतली तर तिच्यवर वादच घातला जात असेल lookiMg for मधे तर मग पर्याय नाही.
culture मधले अनेक BBs आहेत ज्यांची जागा V&C मधे जास्त आहे. उदाहरणार्थ प्रत्येक लेखकाचा, कवीचा किंवा कलाकाराचा BB त्यामधे जसे वर म्हणले गेलेय तसा एक मूळ विभाग करून त्याच्या आत प्रभाग पाडायचे हे चांगले वाटतेय. करून बघायला हरकत नाही. अर्थात त्याही विभागणीचे काही तोटे असतीलच. शेवटी सगळं काही काटेकोरपणे विभागांमधे तोडून बसवता येणार नाही हे खरेच.


Ajjuka
Wednesday, December 21, 2005 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ताच एका मित्राशी बोलत होते तेव्हा मला एक गोष्ट जाणवली ती इथे टाकतेय. आपल्याला सगळ्यांना मायबोलिची सवय झालिये त्यामुळे विषय शोधणे, सापडणे अवघड वाटत नाही पण नवीन माणूस आला तर सगळी मांडणी थोडी अवघड आहे असे वाटतेय.
माझ्या मित्राला मी मायबोलिवर यायला सांगत होते. त्याचे म्हणणे आहे की त्याने site पाह्यली आहे, चांगली आहे पण enough user friendly नाही. पटापट गोष्टी सापडत नाहीत. एकदा तो कविता शोधायला आला पण ५ मिनिटे झाली तरी काही सापडेना म्हणून निघून गेला. मराठीवर्ल्ड वर सगळे समोर असते असे तो म्हणाला.
माझ्या अजून एक दोन मित्रांनी वरची तुलना सोडून अशीच प्रतिक्रिया दिली होती. हे विचार करण्यासारखे आहे असे मला वाटते.
उदाहरणार्थ माणूस कविता शोधायला येतो तेव्हा तो सहसा कवितेशी संबंधित शब्द शोधतो. culture व गुलमोहर हे त्याला पटकन उमजत नाहीत अगदी स्पष्टीकरण असले तरी. कवितेशी संबंधित शब्द म्हणजे साहित्य वगैरे. असा काही विभाग आणि मग त्यात प्रथितयश आणि गुलमोहर असे उपविभाग आणि so on... असे काही झाले तर सोपे होईल का? कविता हे एक उदाहरण म्हणून घेतले पण असाच प्रत्येक बाबतीत विचार झाला तर? केवळ पटकन सापडत नाहे म्हणून कोणी इतक्या चांगल्या site पासून वंचित रहाणार असेल तर ते काहे योग्य नाही. नाही का?
पुनर्मांडणीचा विषय निघालाय म्हणून हे सगळे बोलणे.
या विभागणी संदर्भात संकल्पनात्मक पातळीवर काही मदत हवी असेल तर सांगा. ते करू शकेन.


Admin
Thursday, December 22, 2005 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मूडी.
धन्यवाद अज्जुका. सुचना चांगली आहे


Giriraj
Friday, December 23, 2005 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Google search नाही का add करता येणार आपल्याकडेच Direct ?

Limbutimbu
Saturday, December 24, 2005 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, टेक्निकली अस शक्य हे का? की मी जेव्हा पोस्ट लिहितो तर लिहितानाच विषयाला धरुन एखादे स्केच काढु शकेन? रन्ग नसले तरी चालु शकतील पण पेन्ट ब्रश मधल्या किन्वा कुठल्याही किमान ब्रश अन रेषेच्या सुविधा मिळु शकल्या तर खुपच बरे होइल, अर्थात तसा एडिटर उपलब्ध करता आला तर!
बरेच विषय असे हेत की त्यान्च्या स्पष्टीकरणासाठी स्केचेसच उपयुक्त होवु शकतात, सद्ध्या पेन्टब्रशमध्ये जावुन स्केचची बीएम्पी करुन ती MS Photo editior मधुन जेपीजी व रिसाईझ करुन मग अपलोड करावी लागते ज्यात शेवटी चाललेला विषय अन स्केच यान्चा सम्बन्ध राखण्याचे भान शेवटी कन्टाळा आल्याने सुटते असा माझा अनुभव हे
नाॅट अ जोक पण झिजलेली पायताणे आणि स्वभाव हा विषय मला तसाच बाजुला ठेवावा लागतो हे कारण त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला दोन बाय दोन सेन्टीमिटरचे तरी चित्र आवश्यक हे! :-)

मी जरा जास्तच मागणी करीत नाही ना? ( विचारात पडलेला चेहरा )


Bspujari
Saturday, December 24, 2005 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीचा RSS/XML feed चालू करता आला तर फार बरे होइन..

Champak
Saturday, December 24, 2005 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

New comers साठी main page वर Hitguj Topics चे short discription द्यावे. something like User´s Manual! म्हंजे गुलमोहर काय आहे, गावातल्या गावात म्हंजे काय? रेंगिबेरंगी म्हंजे काय? etc अशी एक PDF / Link जरी दिली तर उपयोगी पडेल.

नविन लोकांना सोपे पडावे म्हणुन search oprion जर main page वर ठळक पणे ठेवले तर सोपे जाईल.



Admin
Friday, December 30, 2005 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज
google search add करायचे प्रयत्न चालू आहेत
लिंबूटिंबू
तुम्ही म्हणता ते तांत्रिकदॄष्ट्या शक्य आहे. पण त्यासाठी लागणारे कष्ट आणि किती लोक ते वापरतील याचे गणित जमत नाहीये.
BSPujari
RSS Feed चालू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ४-६ महिने लागतील
चपक
उपाय छान सुचवले आहेत आणि त्यातले काय अमलात आणणे शक्य आहेत त्याचा विचार करतो आहोत.


Vishee
Wednesday, October 10, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात वरती previous, next चा tab असतो तो पुन्हा खाली पण नाही का ठेवता येणार? म्हणजे प्रत्येक पान वाचुन झाल्यावर तसच next वर जाता येइल पुन्हा वर न जाता.

Vishee
Monday, October 15, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वरच्या पोस्टला काही उत्तर नाही? Admin, technically खुप कठिण आहे का हे? मंडळींनो, तुम्हाला असा बदल सोयीचा नाही का होणार?

मी आत्ताच भाषा-शब्दखेळ मधले archives वाचले. प्रत्येक पानानंतर आपलं scroll करत वर जा आणि मग next . माझ्यासारखे असे बरेच असतील की जे जुने archives वाचत असतील.


Admin
Tuesday, October 16, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या मायबोलीचे मुख्य सॉफ्टवेअर बदलण्याचे काम चालू आहे त्यामुळे इथे सध्यातरी काही बदलायचा विचार नाही. तुमची सूचना योग्य आहे. पण ११ वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टिंना डागडुजि करण्यापेक्षा नवीन भागात सुधारणा करावी असा प्रयत्न आहे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators