Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रेमस्वरूप आई, तान्हे बाळ आणि गरजेची...

Hitguj » Views and Comments » Closed BBs » प्रेमस्वरूप आई, तान्हे बाळ आणि गरजेची नोकरी « Previous Next »

Bee
Friday, December 09, 2005 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.....

हा विषय डोक्यात येण्याचे कारण माझी बहिण जी काही महिन्यांनी आई होणार आहे. ती नोकरी करते, शिवाय जबाबदारीची कामे तिला करावी लागतात म्हणून बाळ घरात आल्यानंतर नंतर आपण त्याच्याकडे कसे लक्ष पुरवणार ह्यामुळे थोडी धास्तावली आहे. माहेरी तिची बदली होऊ शकते पण तिच्या यजमानांची होऊ शकणार नाही. शिवाय ती जिथे काम करते तिथे career scope चांगला असल्यामुळे तिला ते शहर सोडावेसे वाटत नाही. मी तिला पाळणाघराचे पाहू या किंवा एखादवर्ष बिनपगारी रजा घे, नाहीतर कुणाला तरी एखादवर्ष जवळ ठेव अशा कल्पना दिल्या. पण ह्या सगळ्या कल्पना तात्पुरत्या आहेत. जी काळजी full time mom घेऊ शकते ती नोकरी करणारी आई घेऊ शकत नाही. तरीही मुलांकडे योग्य ते लक्ष ठेवून आपले गरजेचे career चालू ठेवू शकणार्‍या कैक स्त्रिया ह्या जगात वावरतात. कदाचित मायबोलिवरही अशा आया बहिणी असतील ज्या ही कसरत यशस्वीपणे करतात. त्या कशा manage करतात ह्याची माहिती मला हवी आहे. नंतर ही माहिती मी ताईला पत्राने पाठविन म्हणजे तिला त्याचा थोडाफ़ार तरी उपयोग नक्की होईल.

सद्या डोक्यात येते आहे, बाळ घरी आले की, घरात कुठल्या सुखसोई असाव्यात जेणेकरून त्याचा चांगला उपयोग होईल. हौसेपेक्षा दैनदीन जीवन सुलभ करणार्‍या गोष्टी मला अधिक आवडतात. भारतात इतक्या काही सोयी नसतील जितक्या प्रगत देशांमधे आहेत. पण तरीही काहीतरी नक्की तोडगा काढता येईल असे वाटते.

मुल कसे सांभाळावे अशाच विचारत माझी एक colleague पण काळजी करते आहे. तेंव्हा ह्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल. फ़क्त व्यक्तीगत मदत मिळावी म्हणून मी हा बीबी सुरू केला नाही.


Seema_
Friday, December 09, 2005 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच वाचल की नोकरी करणार्‍या स्त्रीया उलट कमी वेळ बाळाबरोबर असल्याने अधीक उत्कट पणाने त्यांच्या बरोबर खेळतात रहातात
quality of time matters not quantity of time


Rohinividhate
Tuesday, March 21, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा प्रश्न वाचला आनि उत्तर द्यावे असे मनने थ्हरवले
उत्तर म्हनता येनार नाहि याला उलत प्रश्नच उधवतिल.
आइ होन्याचि सर्व जवाबदरि आपन घेतो.पन आपल्या नवर्याने हि थोदि जवाब्दारि घेतलि पहिजे.
माज़ा अनुभव ह्या बबत काहि आगदि चागला नाहि किवा अगदि वाईत हि नहि.
माझि मुलगि १ वर्शा चि आहे.आम्हि दोघे नवरा बयको जोब करतो.दोघे हि समे कमवतो. पन घराचि जवाब्दरि मात्र माझि बालाचि हि माहि
कधि वाथते आपल्या करियर मुले बालाला फ़मिलि सुख मिलनारच नहि.पन जोब हा आर्थिक बाजु मजबुत करन्यास हवाच.
त्या मुले काहि तयारि करायचि आसेल तर ति बाला च्या बाबाच्या मनाचि कर.कारन आइपन आपल्य आन्गि ९ महिन्याचा कोर्स करुन येतो पन बाबा ने तो केलेला नसतो.


Meemarathi
Friday, March 24, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rohini..I am totally agree with u. Jasta karun lagna nantar ase kahi hathachya botavar mojnya itke navre astat ki je aaplya mulaanche kaaljee changli ghetat.
aga mazya maitrini la 6 mahinya cha bal aahe. sakali tee office la nightana tya balaala feeding karun nighte aani balasathi mau khimtee ( ukade tandool aani daal ) karun jaate. gharee teechi sasu aahe pan thi thodi vayaskar aahe ( above 60 ) pan tarehe teene ek mulgee thevleli aahe.
divasbhar tashi teechi sasu aste pan teela sandhivat aslya myle teela sarkhi sarkhi uth bas karta yene shakya hote nahi.

pan sandhya kali gharee aalyavar mazya maitrineela swaypak karava lagto, balala feeding la gheoon basava lagta aani itar kaame pan astat..pan teecha navra haa balane shee jari keli tari teela haath lavat nahi tyala saglikade baykoch lagte...hyache karan ase ki balache muke ghyayla aavadtat pan balachee shee kadhyala nako.

mee teela hee goshta tichya navryala patvun dyayla sangitalee aahe.

karan swatachya mulancha aai vadil doghanee miloon kele pahije.

bagh maza salla kasa vattho te.!

Sandip18
Friday, March 24, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me marathi i support to u, keep it up.....

Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mimaraathi, majha sudhaa tula pathimbaa aahe, pan ekatra family jithe aahe tithe navara bayakolaa kadheech madat kareet naahee ha majha anubhav aahe,
vadeel mhanun jabaabdaari ghyayalaa havi..

Meemarathi
Friday, March 24, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ho lopamudra tu he ek barobar bolles...

karan hya mulaana swatachya aai vadilansamor baykola madat karayla laaj vathe, ani doosre mhanje ki tyanchya aaya tyana ladoba karun thevtat..mhanun kam karnyache shistach angee naste. mhanunach mee mhanale ki " Haathchya botavar mojnya itki mule " " De haro khatlyavatree" :-)
but want to tll u one thing,this is all on mutual understanding.

Bee
Friday, March 24, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आणि माझ्या ताईला तर फ़ार मोठा प्रश्न पडला की आता delivery झाल्यानंतर तिचे कसे होईल. तिच्या अमरावतीला फ़ारसे पाळणाघर हे प्रकार नाहीत. असतील काही पण तिच्या घराजवळ तरी नाही. काल ती मला म्हणत होती, मी एक वर्षभर रजा घेईल पण एका वर्षानी काय होणार आहे. मागे माझी एक दुसरी बहिण फ़क्त एक दिवस तिच्या लेकीला घरी ठेवून तिच्या सासरी गेली होती तेंव्हा तिला रात्रभर चैन पडत नव्हता. इथे ही ताई कशी करेल हा प्रश्न. आणि तिला नोकरी अगदी गरजेची आहे.

खरच लग्न, मुल ह्या गोष्टी स्त्रियांसाठी त्यांच्या career ला जराही मदत करत नाही असे माझे ठाम मत आहे. पण लग्न, मुले, नोकरी ह्या तिन्ही तिच्यासाठी महत्त्वर्पुर्ण गोष्टी असतात. जे काही अवलंबुन राहते ते म्हणजे नवरा आणि घरातील इतर माणसे. त्यांनी जर नोकरी करणार्‍या सुनेला, बायकोला समजावून घेतले तरच तिचा career graph नीट राहील नाहीतर चुल, मुल, नोकरी ह्यात तिची बरीच कुचंबना होईल.

मी आजवर हा विचार करत होतो की माझ्या भाचींना मी सक्षम कसे बनवावे, कसे त्यांना नोकरी मिळेल असे शिक्षण द्यावे. पण आता ताईचा प्रश्न लक्षात घेता असे वाटते आहे, आहे का खरच ह्यातुन काही मार्ग, म्हणजे मुलींची काळजी राहणार नाही? त्या स्वालंबी होतील.

माझ्या एका मित्रानी त्याचे लग्न झाल्याझाल्या आपल्या बायकोला आधी Masters करू दिले. तिला खरे तर रस नव्हता ह्यात. मग त्याने परत तिच्यावर दबाव आणला की आता Ph D कर. तिला चांगली नोकरी लागली होती पण त्याने तिला समजावून सांगितले सद्या आपल्याला अपत्य नाही म्हणून इतका वेळ बाहेर राहणे शक्य आहे. उद्या जर मुले असले तर कसे होईल. जर Ph D केलेस तर प्राध्यापकाची नोकरी मिळेल जी तुला career सुख देईन. ती stats मध्ये आहे. मलाही त्याचा विचार पटला. शिवाय तो बायकोला मदत करतो आहे, तिच्या आयुष्याची आखणी करतो आहे ह्याचा अभिमान वाटला. ती university मध्ये रात्री उशिरापर्यंत थांबली तर हा घर आवरणे पासून, जेवण बनवून तिच्या येण्याची वाट बघतो. माझा विश्वास बसत नाही कारण तो माझा ex room mate होता. कधीही घरची कामे न करणारा पण शिस्तबद्ध होता. आता शिस्तिने घरची कामेही करतो.


Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तु कमित कमि तुझ्या बहीणिमुळे असा विचार करतोस बरे वाटले तुझे विचार ऐकुन..
घरातील एखादी वयस्क स्री(आइ, सासु, आत्या, मावशी) असेल ना तर ती कामवालीच्या मदतीने तुझी बहिणिच्या बाळाला सा.म्भालु शकेल..
माझी बहीन doctor आहे delivary नंतर आई च्या मदतीने परत लगेच practice सुरु केली.


Champak
Friday, March 24, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर Ph D केलेस तर प्राध्यापकाची नोकरी मिळेल >>> Wrong info., if they want to come back to India!

Candidate must pass NET/SET or his Ph.D. should be awarded before certain year.(1995 ?? not sure as it was changed 2-3 times.)

Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhya maheetee pramane 1995.. .. .. .. ..

Meemarathi
Monday, March 27, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee

tuzee aai nahi ka tuzya tai kade kahi divsansathi rahayla jaoo shakat..

mazya tai cha pan same problem hota, tiche sasu sasre vayaskar aslyamule tyana mazya bhachi la baghnyas yet navhte. karan mazya taichya sasu la sandhivat aahe.

mag 3 mahine mazee aai taikade roz jaychee yaychee. aani sandhyakali jiju aani tai gharee parat 6 vajeparyant yayche mhanun jasa kahi problem zala nahi.

tuzee tai amravateela rahate aani jar tumhi mumbai madhye rahat asal tar mag jara matter kathin vattha. tareepan jar koni natevaike tithe rahnare asle tar tyanchya paiki konitari jaoo shakel ka ??

Ana_biswas
Monday, March 27, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
घरी सांभाळणे वा पाळणाघरात ठेवणे हे दोनच पर्याय आहेत असे वाटते.दोन्हींचे फायदे-तोटे आहेतच..पण ईलाज नसतो त्याला.सुरवातीला खुप मानसिक त्रास होतो,धावपळ ही,पण मुलंसाठीच हे करत आहोत, हे समजुन,समजावुन केले कि त्रास जाणवत नाही. मला हि सुरवातीला guilty feeling यायचे,पण आता adjust झाले आहे.U have to decide ur preferences & choose alternative

Moderator_7
Wednesday, April 05, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/46/4978.html?1050334238

वरील बीबी याच विषयाशी संबंधित असल्याने पुढील लिखाण त्या बीबी वर करावे.
हा बीबी बंद करण्यात येत आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators