Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
It's her life anyway... (when it come...

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » It's her life anyway... (when it comes to marriages!) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 12, 200530 05-12-05  6:26 am
Archive through November 09, 200510 05-13-05  3:32 am
Archive through March 01, 200621 03-01-06  9:11 pm

Mbhure
Wednesday, March 01, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा आणि मनुस्विनी, हे विचारावस वाटत(पुरुष सोडा) किती बायका ही गोष्ट(माझा नवरा House Husband आहे किंवा आजच पार्टीच सर्व ' ह्यानीच' केले आहे) अभिमानाने दुसर्‍या बाईला सांगतिल किंवा चारचौघात कबुल करतील? अनुभवावरुन सांगतो :-)

Sashal
Wednesday, March 01, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं कबूल करायची वेळ आली तर कदाचित माझ्या हातून ते होणार नाही .. पण ही hypocrisy झाली .. कारण मनातून मला हेच वाटत असतं की एकदातरी ह्याने अनुभव घ्यावा घरच्या कामाचा ..

Storvi
Thursday, March 02, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सांगेन infact सांगतेच. मला आठवतय एकदा गोबी मन्च्युरीयन का काहीतरी केले होते एका पोटलक ला, recipe माझीच असली तरी मी आणि KT ने अनेकदा केली होती आणि त्याला ही आता ते करायला येऊ लागले होते. तर हे कसं केलं म्हणून सगळे विचारत असतांना अपसुकच त्याने कृती वगैरे सांगायला सुरुवात केली, आणि आता कश्या सगळ्या बायका cuisine च्या बी बी वर दिनेश च्या भोवती घोटाळतात तश्या सगळ्या किरण च्या भोवती जमल्या. :-) माझ्या लक्षातही आले नव्हते मग ग्रुप मधला एक मुलगा मला ते दृश्य दाखवू लागला आणि त्याच्यावर जाम खुष झाला :-)

Manuswini
Thursday, March 02, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi
मी कुठे म्हटले नोकरी करणेच म्हणजे कर्तबगारी?

in general कर्तबगारी म्हणजे one who is running the house .. right? or whatever ways, and whatever style
पण नवरा हे सहसा सहन करू शकत नाही मी हे दोन्-तीन उदाहरणात बघितले आहे.
चांगली उदाहरणे सुद्धा आहेत, नाही असे नाही.
पण the way we(society) think is a problem आणि म्हणून mbhure' म्हणतात तसे म्हणायला स्त्री संकोचते कारण पगडा हाच आहे ना
भले नवरा, बायको राजी असली तरी मी एकले होते एका orthodox काकुचे म्हणणे की काय हा बायकोचा बैल, आणि तिला नुसती लाडाहून ठेवलिय

आणी एकिकडे एथे US ला my friend who is young couple (assuming their thinking should be different here atleast and being young) she suffered mentally by her husbands tantrum when he was jobless that finally when she told him clearly if you want to take repsonsibility of the house, go ahead, I am giving resignation today, anyways, I am not saying that this is the ONLY scene or this one person represent all 'men in general
पण ते असे असते
BTW मला वाटत नाही कोणाला चालेल house husband , का कोणी सांगू शकतेस का आमचे हे घर्काम सांभाळ्तात आणि मी नोकरी करते फक्त
blame it on society


Manuswini
Thursday, March 02, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure
पुरुष का सोडा?,
मग तुम्ही तयारी ठेवलिय का full time house husband बनायची? का तुम्ही सांगाल का मित्राना मी घरातच असतो, बायको घर चलवते.

मग ठिक आहे, चला तुमच्या पासून सुर्वात करु शकतो मग rest all will follow
एवी तेवी पुरुषांनीच घरी काम करणारी स्त्री म्हणजे मुर्ख असे म्हटले आहे. काय ती झोपा काढते हा वर शेरा.

दिवे घ्या हा


Manuswini
Thursday, March 02, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी सांगेन जर माझ्या नवर्याने छान dish केली असेल तर त्यात काय

Savani
Thursday, March 02, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि माझा नवरा आम्हाला दोघानाही स्वैपाकाची आवड आहे.त्यामुळे आमच्याकडे सतत राबता असतो. मग मी आणि माझा नवरा ठरवुन घेतो कोणी कोणत्या डिशेस करायच्या ते. आणि आम्ही दोघेही सान्गतो सगळ्याना कोणी काय केलयं ते. पण मग त्यावर आम्हाला.. अर्थात मलाच ऐकायला मिळते. " तिला काय tension नसते कोणाला जेवायला बोलावले की, नवरा करतो निम्मा स्वैपाक " ..
पण मला त्याचे काही वाटत नाही कारण माझा नवरा खरच काही पदार्थ फ़ार छान करतो.


Ajjuka
Thursday, March 02, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही बीबीज वर एकच चर्चा चालू आहे का? असो..
नवर्‍याने घरातले सगळे केले आहे हे अभिमानाने सांगणे यात मुळातच मला घोळ वाटतो.
घरातल्या एखाद्या पार्टीला राबराबून एखाद्या बाईने सगळी तयारी केलेली असते. एखाददुसर्‍या पदार्थांची कोणीकोणी स्तुती करत असतात पण सगळे माझ्या बायकोने एकटीने केले आणि छान केले ह्याचा मनापासून अभिमान किती नवर्‍यांना वाटत असतो? बायको आहे म्हणजे हे करणारच किंवा its her job तेव्हा केल्याचे काय कौतुक असा सोयिस्कर विचार केला जातो हे अमान्य करता येणार नाही. आणि एकंदरीतच यात आपल्या कुणालाच काही वाटत नाही कारण बायकांनी चांगला स्वैपाक करून सगळ्यांना जेवू घालणे ही एक अंगवळणी पडून गेलेली गोष्ट आहे त्याचे विशेष वाटत नाही. पण तेच नवर्‍याने केले तर अपवाद असल्याने त्याचे वेगळे mention जरूरीचे वाटते.
याचा अर्थ माझ्या नवर्‍याने सगळे केले तर त्याकडे त्यात एवढे काय म्हणून मी बाजूला करावे असे नाही. मला कौतुक असेलच पण त्याच वेळेला मी जेव्हा सगळे करेन तेव्हा त्यालाही तितकेच कौतुक असावे अशी माझी इच्छा असेलच.
माझ्या मते दोन कारणांमुळे अभिमानाने सांगणे होत नसावे. एकतर बाई जेव्हा ह्या सर्व जबाबदार्‍या घेते तेव्हा किती appreciation मिळते हे एक. " इतके वर्ष इतके वेळा मी सगळं निभावून नेलं तेव्हा उमटलं का काडीचं तरी कौतुक चहर्‍यावर? आणि आता एकदा काम केलं तर कसली कौतुकाची अपेक्षा? " असं कुण्या बाईला वाटण हे आपल्या समाजात साहजिकच असेल.
दुसरं म्हणजे, इथेच मायबोलिवर एखाद्या मुलिने एखाद्या कशाला मीच एकदा पूर्वी कधीतरी म्हणाले होते की मला स्वैपाकाची आवड नाही पण जुजबी रोजच्यापुरतं गरज म्हणून करायला लागल तर करीन पण घरी शंभर लोक बोलावून सगळ्यांना जेवू घालणे हे काही माझ्याच्याने होणार नाही तर यावर लगेच मला judge करायाला सुरूवात झालीच की. त्यातले काही मायबोलीवरचे आणि काही इतरत्रचे नमुने असे... मुलिंना अस म्हणून चालत नाही मी मनातल्या मनात्: का नाही?), तुम्ही नाही स्वैपाक करायचा तर काय पुरुषांनी मी म म्: काय हरकत आहे?).... काय दिवस आलेत!!(मी म म्: बुडला ना धर्म.. आता बसा...) पुरुषमुक्ती केंद्र सुरू करायला हवे!(मी म म्: हो करायलाच हवे या फालतू विचारातून तुमची सुटका व्हावी म्हणून तरी!), काय बाई आहे! स्त्रीला आपलं घर - संसार हे महत्वाचं असतं आधी आणि मग इतर पण यांचं उलटच! (मी म म्: हे कुणी ठरवलं), हल्लीच्या मुलिंना कष्ट नकोत.. (मी म म्: म्हणजे आम्ही आमच्या करीअर मधे जे करतो ते काय झिम्मा - फुगड्या खेळतो का?), हे बघा अजून तरी पुरूष मुलं जन्माला घालू शकत नाहीत त्यामुळे हे सगळे बायकांनीच सांभाळले पाहीजे.. (मी म म्: तब्येत बरी आहे ना काका तुमची!!)
आता नुसतं hypothetically म्हणलं तरी इतक्या विचित्र प्रतिक्रिया आल्या. मग आजची party पूर्णपणे माझ्या नवर्‍याने organise केली स्वैपाकासकट असे अभिमानाने सांगितल्यावर आजच्या regressive society मधे काय पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळतील याची कल्पनाच न केलेली बरी. या गोष्टीचे दडपण असल्याने बायका आणि नवरेसुद्धा नवर्‍याने घरात काम केले हे सांगायचे टाळत असतील.
अर्थात माझ्यासारख्या काही असतीलही ज्यांना कोणाच्या प्रतिक्रियेची फिकीर नसते त्या सांगतीलही. माझ्या नवर्‍याने केले तर मी नक्कीच सांगेन.
असो खुप बोलले.. सध्या पुरे!


Bee
Thursday, March 02, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशात काय नि परदेशात काय ज्या स्त्रिया गृहिनी असतात त्या नवर्‍याला स्वैपाक करू देत नाही. तुम्ही बाजू व्हा.. मी करते हे उत्तर असत. फ़क्त काहीच पुरुष हौसेने मग हा अधिकार घेतात. ज्या स्त्रिया घरचे काम आणि नोकरी दोन्ही करतात त्यांच्या अपेक्षा असतात नवर्‍यानेही आपल्याला घरकामाला मदत करावी. अशावेळी मात्र बाईलाच जास्त भोगावे लागते. ह्याती चुक ही आपल्या जडणघडणाची. मुलींना आईवडील हमखास किचनची कामे करायला सांगात, त्या मग आपला तो धर्म आहे असे समजतात. मुलांना मात्र बाहेरची कामे, मग त्यांना वाटत बाहेरची कामे करणे हा आपला धर्म झाला. शेवटी स्त्रि घरातील सगळी कामे करण्यासाठी आणि बाहेरची कामे पुरुषांनी करायची असा एक सर्वसाधारन नियम होऊन जातो.

आणि कौतूक हे स्त्रिचेही होते जेंव्हा ती घराबाहेरचे कामे करते. किती पुरुष हे सर्वांसमोर सांगतात की ह्या महिन्याचे बिल माझ्या बायोकेने जाऊन भरले, बाजारहाट माझी बायकोच बघते, किंवा तिच्याच पैशाने हा सोफ़ा विकत घेतला?

काहीवेळी असे सांगणे हे पुरुषांसाठी कमीपणाचे असते आणि ह्याचा व्यत्यासही तितकाच खरा आहे.


Milindaa
Thursday, March 02, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही बीबीज वर एकच चर्चा चालू आहे का? असो..
<<<
चला, कोणाच्या तरी लक्षात आलं म्हणायचं.. सगळ्या बीबींवर एकच चर्चा केली पाहिजेच का ? बीबी चा मूळ विषय काय तर मुलीला लग्न करायचे की नाही हे तिला ठरवूदे इ., आता त्यात कोण घरात काम करतं, कोण नाही याचा संबंध येतोच कोठे ? भारताच्या बाहेर आलं आणि बायको नोकरी करत असेल तर ( करत नसेल तर काय हा पूर्ण वेगळा भाग आहे ) जवळपास प्रत्येक पुरुषाला घरातल्या कामात हातभार लावावाच लागतो. आणि त्याबद्दल कोणी काही म्हणत असेल असं वाटत नाही.

प्रतेय्क ठिकाणी स्त्रियांवर अन्याय केला जातो हाच सूर कशाला पाहिजे ? मागे स्टोरवी ने अभिमानाने लिहीले पण होते की तिचा नवरा आरोहीचे डायपर बदलणे आनंदाने करतो... आणि हा खरं तर पूर्णपणे वैयक्तिक सामंजस्याचा भाग आहे. त्यात कसले आलेत नियम ?

वरच्या आर्काईव्हज मध्ये मैत्रेयी ने टाकलेली QLC ची लिंक मूळ विषयाशीच थोडीशीच संबंधित आहे कारण त्यात लेखात मुलगा / मुलगी असा भेद न करता या वयात येणार्‍या ताण तणावाची चर्चा केली आहे. पण त्या नंतरची सर्व पोस्ट्स ही मूळ विषयाशी अजिबात संबंधित नाहीत ( आणि तो विषय नवीन तर मुळीच नाही ) . विषय बघून लिहीत चला कृपया.

हे माझे वैयक्तिक मत आहे आणि इथे मी मॉडरेटर असण्याचा काहीही संबंध नाही तेव्हा माझ्या पोस्टवर त्याच त्याच कॉमेंट करणे टाळा.


Savani
Thursday, March 02, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्द, ही चर्चा इथे योग्य नाही हे खरे. आपण नन्तर ही पोस्ट हलवु शकता.
फ़क्त कुठे दुसरीकडे मधुनच कसे लिहिणार म्हणुन इथे लिहित आहे.
मला मुळात नवर्याने बायकोच्या कामाचे मुद्दाम इतरासमोर कौतुक करणे किन्वा बायकोने नव्रर्याचे हे लक्षात येत नाही. जर घर दोघान्चे आहे आणि संसार दोघान्चा आहे तर त्यात दोघानी काम केले तर कुठे बिघडले? माझा नवरा माझ्या मुलाला रोज सकाळी तयार करुन day care मधे पाठवतो. नुस्त diaper नाही तर आन्घोळ सुद्धा घालुन. शिवाय अनेकदा तो सन्ध्याकाळी एखादा पदार्थ करतो. पण मला हे मुद्दाम कुणाला कौतुकाने सान्गावे असे वाटत नाही. कारण आम्ही दोघे आमच्या घरात घरासाठी काम करतो. आणि मला माझ्या नवर्याने माझे कौतुक करावे असेहि वाटत नाही. मुळात आपण काही वेगळे करतोय हेच वाटत नाही.
आणि माझ्या मते ज्या बायकान्चे नवरे घरात काम करत नाहे त्या हा शेरा मारायला मोकळ्या असतात.. नवरा अगदी मुठित आहे. सगळे करतो बिचारा. आणि मग स्वताचे नवरे करत नाहीत म्हणुन त्यान्च्या नावे खडे फोडायचे.


Ninavi
Thursday, March 02, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, बीबीचा विषय It's her life असा आहे ना? मग his life बद्दल चर्चा जास्त आहे असं का वाटतंय मला?

मिलिंदा, तुला दीवार मधल्या शशी कपूर सारख्या दोन दोन हैसियती आहेत का? (' ये मैं मॉड की नहीं, मिलिंदाकी हैसीयत से कह रहा हूं!')


Storvi
Thursday, March 02, 2006 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही पण point noted अब हम इधर नही बोलूंगा :-)

Manuswini
Wednesday, March 15, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


interesting हे पहा बरे काही तरी साधर्म्या ह्या bb शी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1432151.cms

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators