|
आसपास, सन्ख्यात्मक आकडेवारी गुणाकार भागाकाराच्या आकडेमोडीमुळे बर्यापैकी अचूक नेमकी असते तर तुम्ही विचारताय ती दर्जात्मक आकडेवारी मात्र अन्दाजपन्चे दाहोदरसे किन्वा जवळपास, आसपास अशीच असणार.....! मी तेवढ्या साठीच No of posts बरोबर size of post in terms of bites विचारत होतो! एनीवे! तसही ज्या आयडीन्ची लोकप्रियता अधिक आणि उलटपक्षी ज्या आयडीन्ची निर्भत्सना अधिक त्या त्या आयडी बर्यापैकी दर्जेदार लिखाण करत असतील असा आसपासचा अन्दाज आपण नोन्दवु शकतो! या साठी पोल घेता येतो, पण यशस्वी होणार नाही
|
मायबोली / हितगुज statistics update (रिकामपणचे उद्द्योग असेही वाचु शकता.) आज दिनांक 9 august 2007 रोजी हितगुजवर सर्वात जास्त पोस्ट्स्ची संख्या असणार्या TOP 5 सदस्यांची नावे खालील प्रमाणे 1. krishnag : 14278 2. athak : 13891 3. yogibear : 13715 4. lalitas : 10284 5. limbutimbu : 9972 गेली अनेक वर्षे सर्वात जास्त No. of posts असणारे जुने हितगुजकर Yogibear यांचा या यादीतील प्रथम क्रमान्क आता राहिला नाही. नव्हे त्यांची तिसर्या क्रमांकावर घसरण झाली आहे.( YB हे अजिबात शो. ना. हो.) april 2005 मधे यग्गोजोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या यादी प्रमाणे तेव्हा दुसर्या क्रमांकावर असलेल्या अथक यांनी आपले दुसरे स्थान आजही कायम राखले आहे. april 2005 यादित तिसर्या स्थानावर असलेले उपास हे आज पार सातव्या क्रमांकावर आहेत. आता वरील लिंबुटिंबू यांच्या पद्धतीला अनुसरून काढलेली Daily average no. of posts च्या आकडेवारीची तुलना (हे आकडे approx. आहेत. )--- april 2005 मधे krishnag यांचे दरदिवसाचे average number of posts होते १४ जे की आता आहे १२. (हे जवळपास सारखेच आहे. आणि यातच त्यांच्या प्रथम क्रमांकाचे गुपीत दडले आहे!) athak यांचे आधीचे average no posts होते ८, आणि आता आहे ६ yogibear अधी ६ अता फक्त २. lalitas आधी ५ आताही ५ limbutimbu आधी ७ आता ९!! average no. of posts मधे सध्या सर्वात आघाडीवर आहेत हितगुजवरील नवीन सदस्या Itgirl !! केवळ ३५ दिवसांच्या कालावधीत ९२५ पोस्ट यांच्या खात्यावर जमा झाली आहेत. म्हणजे daily average No. of posts आहेत तब्बल २६!! आता या सर्व आकडेवारी नंतर येथील गणितज्ञांनी हे गणीत सोडवा बघू. ITgirl यांची आज पर्यंत चे no. of posts आहेत ९२५ आणि त्यांची दर दिवशी पोस्ट टकण्याची संख्या आहे २६. आज प्रथम क्रमांकावर असणार्या krishnag यांची पोस्ट संख्या आज आहे १४२७८ आणि दरदिवशी पोस्ट टाकण्याची संख्या आहे १२ दोघांचाही हा वेग याच आकडेवरीने कायम राहिला तर ITGIRL krishnag यांना किती दिवसात पदच्युत करेल? 
|
वरील पाच सहा मंडळींचे मोठ्या संख्येने पोस्ट्स केल्याबद्दल कौतुक आणि अभिनन्दन केले पाहिजे. पण लिम्ब्या वगळता बाकी मंडळी my city वगळता इतर बीबी वर काही contribution देत नाहीत असे दिसते.फार फार तर अंताक्षरी. इतर माहिती आणि ज्ञान या बाबीत देखील त्यानी contribution दिले पाहिजे. विशेषत्: krishnag यांनी. स्वत्: ह. ह. ने देखील इथे यायचे सोडूनच दिले आहे. अशाने मायबोली वाढणार कशी?
|
Bee
| |
| Friday, August 10, 2007 - 1:58 am: |
| 
|
हवाहवाई, तुझ्या पोष्ट्सबद्दल चकार नाही बोललीस. एकदम कल्टी देऊन गहाळ होतेस आणि मग लगेच चारेक दिवसांसाठी हितगुजवर येतेस..
|
Zakki
| |
| Friday, August 10, 2007 - 1:02 pm: |
| 
|
गेल्या बारा महिन्यात, सभासद असूनहि, कमीत कमी पोस्ट्स कुणाच्या? शेवटून पाच? आणखी एक उद्योग, शक्य असल्यास, जास्तीत जास्त बातमी फलकांवर कोण लिहितात, त्यांचीहि यादी करता आली तर बरे होईल. **नको तिथे नाक खुपसण्याची, किंवा ज्यात त्यात तोंड घालायची सवय कुणाला आहे**
|
Lalitas
| |
| Friday, August 10, 2007 - 5:28 pm: |
| 
|
रॉबिनहूड, मी इतर बीबीवर passive संचार करत असते, माहिती व ज्ञानाचा track ठेवत राहाते... कधी कधी चर्चेत भाग घ्यावासा वाटतो, पण माझ्याजवळ लिहिण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभा नाहीय्. डोक्यातले विचार प्रभावी रित्या मांडता येत नाहीत. माझं लिखाण मला स्वत:लाच अजिबात आवडत नाही! इथल्या बीबीवर भारतीय राजकारण, हिंदु-मुस्लिम वगैरे प्रखर विषय चर्चेत असतात, तिथे माझ्यासारखीने कंदिलाचे दिवे पाजळणं मला काही प्रशस्त वाटत नाही. या घटनांचे पडसाद तुम्ही त्या समाजांत राहत असतांना तीव्रतेने जाणवतात. हजारों मैल दूर राहून मी कसं काय contribution देऊ शकेन याबाबतीत? मला संगीताची अतोनात आवड आहे त्यामुळेही असेल कदाचित अंताक्षरीवर मला विरंगुळा मिळतो. काही सामाजिक बीबीवर जमेल तसं लिहित असते. दुखवण्याचा हेतू नाही... तुमची पोस्ट पाहून मनात विचार आले तसे लिहिले फक्त!
|
Yogibear
| |
| Friday, August 10, 2007 - 8:46 pm: |
| 
|
HH: तुला खरच काही काम धंदे नाहीयेत का? :-P
|
ललिता, राजकारण, आणि हिन्दु मुस्लिम यावरच लिहिले पाहिजे असे थोडेच आहे? जरी तू तिथे असली तरी तुझ्या खास आवडीचे काही ना काही विषय असणारच ना? स्वत्:चे अनुभव असतातच की. अगदी पिशवी घेऊन बाजारात भाजी आणायला जाणे हे सुद्धा रंजक होऊ शकते.प्रत्येकाचा अनुभव हा unique च असतो ना! बरे इथे चुकत माकत लिहिले तरी लाजण्याचे कारण नाही कारण इथे कोणी कोणाला नावे ठेवत नाहीत उलट प्रोत्साहनच देतात!!
|
Athak
| |
| Monday, August 13, 2007 - 5:48 pm: |
| 
|
तरीच , ही ह. ह. इतके दिवस गायब होती गणित सोडवत
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|