|
Arch
| |
| Friday, June 16, 2006 - 8:30 pm: |
| 
|
नवयाने लवकर घरी यावे, बायकोला घरच्या कामत मदत करावी, तिने केलेल्या स्वयंपाकाचे कौतुक करावे, मुलांना खेळायला घेऊन जावे, घरी आल्यावर मोबाईल बंद करून ठेवावा रात्री बायकोचे पाय चेपून द्यावे >> राधा, हे तर prerequisites आहेत ग नवरा होण्यासाठी
|
Chiku
| |
| Friday, June 16, 2006 - 9:52 pm: |
| 
|
सासु सारख्या सुचना सुन सुचना नको
|
Dinesh77
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:56 pm: |
| 
|
ती स्वराली कुठे गेली? आपल्या सासु सासरे याना कामाला जुम्पुन चाबुक ओढते आहे का आपले विचार किती स्वार्थी होते हे कळल्यावर तोन्ड लपवून जगते आहे मौडरेटर हे जरा वैयक्तिक होत आहे हे मान्य आहे पण तिचे पोस्टिन्ग वाचून डोके सुन्न झाले म्हनून लिहिले. या पोस्टिन्ग चे तुम्ही काहिही करु शकता.
|
Maudee
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:22 am: |
| 
|
दिनेश, तुमची मेल वाचून मी सगळे archives आज वाचले..... स्वरालीची मते मलाही फ़ार गमतीशीर वाटली. म्हणजे तिच्या विचारातला job वरून आल्यावर आरामाची गरज असणे वगैरे ठीक आहे पण एका extent पर्यंत. म्हणजे कधी कधी असे ख़रच होते की आज जरा जास्त दमायला झालय म्हणुन काम नाही करू शकत. पण त्या वेळी आइ बाबाना मग ते कोणाचेही का असेना त्याना सांगणे हे टोकाच होतं. अगदिच जमत नसेल तर नोकर ठेवू शकतो.... किंवा हा एख़ाद्या दिवसाचा प्रश्न असेल तर त्या दिवसापुरते बाहेरून सरळ parcel आणू शकतो. मला नाही वाटत मग त्याचे किंवा तिचे आई बाबा एख़ाद्या दिवसासाठी adjust नाही करणार. secondly , job मुळे वेळ कमी पडत असेल तर time management व्यवस्थित केलं पाहिजे जसं की कुठली कामे सुटीच्या दिवशी करुन ठेवता येतील किंवा वेळ न घालवाता कामे कशी उरकता येतील वगैरे वगैरे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे सर्व करत असतो तेव्हा जड जातच पण सवयीने जमायला लागत. त्याना लवकर उठायची सवय अहे म्हणुन त्यानी उठाव आणि कराव हे जर जास्तच होतं पण
|
Maudee
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:32 am: |
| 
|
हे archives वाचताना असही वाचले की त्याचे आई वडील किंवा मुलीचा पुर्वग्रह यामुळे वाद अथवा मतभेद होतात. या बाबतित मला असं वाटत की कुणाचेच intensions वाईट नसतात. मतभेद हे generation gap मुळे होतात. कुठल्याही मुलीचे आपल्या आईबरोबरही किंवा मुलाचे वडीलांबरोबर काही गोष्टींवर मतभेद असतातचकी शिवाय काय होतं की नविन सून घरात आली की काही अपेक्षा असतात तिच्याकडून. त्या ठेवणं वाईट नाहिये पण होतं काय की नविन लग्न असल्यामुळे नवरा नवरी दोघेही हवेतच असतात नाही म्हणायला....शिवाय नव्याच कौतुकही चालू असतं एकिकडे त्यामुळे तिला त्या गोष्टी तेव्हा समजत नाहीत. त्यामुळे miscommunication आणि मग त्याच रुपांतर वादात. पण एकदा मुलगी रुळली, सगळ्यांचे स्वभाव तिला आणि तिचासगळ्याना बर्यापैकी माहीत झाला की सगळ रुळावर येत. शिवाय मतभेदाबद्दल मला असं वाटतं की कुठलिही २ माणसं समोर आली तरी ती कितिही जवळची असली तरी थोडी फ़ार वेगळी मतं असतातच.... मतभेद नवरा बायकोत सुध्हा होतातच भावा बहिणीत पण होतात मग सासू आणि सून यात कधी कधी जर मतभेद होत असतिल तर त्याला इतक अवास्तव म्हत्त्व का दिल जाव.... its a part of any relationship
|
दिनेश यांची post वाचुन मी सुद्धा स्वराली ची post archive मधुन शोधुन पिंजुन काढली आणी गंमत वाटली जरा स्वराली तु विचार कर की तुझी वहिनी असाच विचार करत असेल आणी तुझे आई वडील थकलेले असतील किंवा नोकर धड पणे मिळत नसतील आनी दिवसभर वहीनी अगदी कामाची list घेवुन मागे असेल तर काय वाटेल तुला काय स्वार्थी विचार आहे हा सासुने असे करावे सासर्याने तसे करावे मग arch म्हणते ते तरी योग्य आहे असे मला वाटते एकमेकांच्यात लुडबुड न करता be responsible for your own home and stand for it स्वःताचे जबाबदारी तरी कळते मग तो नखरा म्हणुन न बघता एक स्वता पेलण्याची ताकद म्हणुन बघावा असे मला वाटते. फार काळ आयतेपणा चांगला नाही. काही काळा नंतर आई वडील सुद्धा थकले असतात जगु द्या त्यांच्या मनाप्रमाने कशाला पोर त्यांच्या गळ्यात मारा स्वःताची पोर स्वःता सांभाळा ना जर हवी आहेत तर पोर तर मी तर ह्याच विचारांची आहे. पोर हवे असेल तर स्वःता सांभाळा अगदीच सासु सासरे बरोबर पटत नसेल तर कलह टाळयासाठी वेगळे रहाणे सुद्धा उत्तम. live n let live स्वःताला कधी कधी दुसर्याच्या चपलेत घालुन बघावे हा असाच र्थ होतो ना english sayings चा put yourself in others shoes
|
Ajjuka
| |
| Friday, July 14, 2006 - 4:10 am: |
| 
|
काय हो दिनेश.. अचानक स्वरालीची आठवण? मी आपल तिला शोध शोध शोधलं आणि सापडल्यावर इतकी हसले के बस्स्...
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 5:21 am: |
| 
|
ती स्वराली इथलीच एक duplicate ID होती. त्यावेळी तिने माझ्या आणि बेटीच्या मध्ये गैरसमज निर्माण केले होते. माझ्या कवितांना तिने चांगले म्हंटले वर जशा माझ्या कविता कळतात तशा बेटीच्या कळत नाही असेही म्हणून गेली. मग ह्यावर की काय लिहावे असा मला प्रश्न पडला. मी हे मेल करुन बेटीला कळविले इतक्यात अनिलने त्यावर एक छानसे उत्तर लिहिले. मग माझ्याबद्दल बेटीला जरा गैरसमज झाला. कधी स्वरालीची मजा यायची पण ती जरा सरकलेल्या डोक्याचीच होती
|
Dineshvs
| |
| Friday, July 14, 2006 - 5:59 am: |
| 
|
मला एक ईमेल आली म्हणुन हा खुलासा, Dinesh77 हा माझा आयडी नाही. बाकि मला ईथल्या वादात पडायचे नाही.
|
Fulpakhru
| |
| Saturday, August 05, 2006 - 7:17 am: |
| 
|
स्वराली ची पोस्ट्स मीही वाचली स्वराली तू जर घरात हि तुझी सुखी सन्साराची कल्पना राबवत असशील तर अधून मधून हि सर्व कमे करायची सवय ठेव बाई कारण तुझी मुले मोठी झाली की तुला पण हे सर्व कराव लागेल तेव्हा सवय हवी ना? ) कमाल आहे खरच
|
खुप आधिच्या पोस्ट्स आज वाचल्या, पण तरीही हे पोस्ट करावे वाटले. का कुणास ठाउक पण मला असे वाटते की ती "स्वराली" तिच्या सगळ्या पोस्ट्स मुद्दाम बाकीच्यांची मते जाणून घ्यायला टाकीत होती. किंवा "स्वराली" ह्या नावाने आपल्यातलेच कोणीतरी त्या पोस्ट्स टाकीत होते. (bcoz her thoughts were really horrible) एक शंकेखोर असामी
|
Chandrakor
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:19 pm: |
| 
|
धन्य ती स्वराली!, ती जर खरोखर अस्तित्वात असेल तर तिच्या सासूसासर्यांनी स्वत्:च्या सुखासाठी वेगळे रहावे आता. मी अशा सासवा पाहिल्या आहेत ज्यांना सून म्हणजे दान मिळालेली दासी वाटते. सग़ळं सुनेने करायचं. ह्या जरा सुद्धा हलणार नाहीत. आता ही स्वराली म्हणजे दुसरं टोक झालं.
|
Mirchi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 7:13 am: |
| 
|
वरच्या सगळ्या पोस्ट वाचुन स्वराली च्या पोस्ट वाचाव्याशा वाट्ल्या लोकहो ही स्वराली सासु होइल तेव्हा )
|
Me_sakhi
| |
| Sunday, November 19, 2006 - 4:17 pm: |
| 
|
आज या बि बि वरच्या सगळ्या पोस्ट वाचुन काढल्या स्वरालिला तर मी साष्टान्ग नमस्कार घालायला तयार आहे.,स्वरालिच्या आइने जर हे विचार वाचले असतिल किवा तिच्या आईला हिच्या अश्या अनोख्या विचाराबद्दल कल्पना असेल तर त्याना आपण जगाला तोन्ड कसे दाखवायचे हा प्रश्न नक्किच पडेल. पण असेहि काहि नमुने असतात उदा:१) माझ्या लहानपणी मी आजोळी जायचे तेन्व्हा माझि मोठि काकी आम्हि आल्याचे बघुन लगेच डोक्याला एखादि चिन्धि बान्धायचि आणि डोक दुखतेय असे सान्गुन तिच्या खोलित जाउन झोपायचि. जेणे करुन सगळि कामे माझ्या आईला आणि काकीला करावि लागत. २) दोन वर्षापुर्वि माझ्या दिराचे लग्न झाले. नववधुचा आमच्या घरातिल पहिला वहिला सण आणि तो हि गणेशोस्तव एक दिवस आधि आम्हि सगळे मख़राचि तयारि करत होतो. अचानक दिर वरच्या मजल्यावरुन धावत खालि आला. आणि म्हणाला कि सौ (माझि जावु) बेशुद्ध पडलि मला काहि कळेना कि अचानक हिला काय झाले.? दिराने तिला उचलुन खालि आणले.तिच्या एकन्दरित अवस्थे वरुन मला शन्का आली मी माझ्या आहोना सान्गुन तिला हॉस्पिट्ल ला न्यायला लावले. डॉ ओळखिचे होते त्यानि तिला आत घेतले आणि नाकाच्या मधल्या भागावर जोरात चिमटा काढला त्याबरोबर ति उठुन बसलि समोर डॉ ना बघुन घाबरलि. डॉ नि तिच्यावर प्रश्नाचि सरबत्ति सुरु केलि.कि तुझा नवरा तुला त्रास देतो का? ,सासु छ्ळते का?इत्यादि इत्यादि. असे काहि होइल हे तिने जमेस धरले नव्हते मी जवळ गेले तर ति रडायला लागली कि मला घरी जायचे आहे. आम्हि तिला घरी घेउन आलो घरी आल्यावर ति माझ्या जवळ येउन बसलि आणि मला म्हणालि वहिनि एक विचारु का?मी हो म्हणाले तिने मला जे विचारले ते ऐकुन मला हसावे कि रडावे तेच कळेना.मला म्हणालि या घरात भूत आहे का?मी विचारले का ग असे का म्हणतेस?तर म्हणालि कि मी न झोपले होते तर कुणी तरि माझ्या गळ्यावर पाय दिला. खर सान्गायच तर मला तिच्या एक कानशिलात पेटवायचि ईच्छा झालि पण मी स्वतहाला रोखले. हा सगळा फ़ार्स करण्याचे एकमेव कारण तिला एकत्र कुटुम्बात रहायचे नव्ह्ते. खरे तर हा निर्णय त्या दोघानि घेतला असता तर बरे झाले असते उगिच काहि तरि वावड्या घराबद्दल उठवुन जाणे किति गैर आहे पण शेवटी सस्कारन्वरच व्यक्तिचि मानसिक जडण घडण अवलम्बुन असते. या प्रसन्गा नन्तर आजतागायत मी तिच्याशि बोलले नाहि
|
Manuswini
| |
| Monday, November 20, 2006 - 2:25 am: |
| 
|
मी _ सखी, अग स्वराली वगैरे कोणी खरी नाही. ती बहुधा खोटी व्यक्ती आहे. आपण एकदम पोटतिडकीने लिहितो कारण आपल्याला दुख होते हे विचार जाणुन. आणी असे दिसते की ही व्यक्ती फक्त गम्मत म्हणुन पेटवुन हे post टाकुन गेली. मी पण अशीच आधी वरती चिडुन post लिहीली तिचे हे विचार वाचुन पण वरील काही लोकांच्या post वरुन अंदाज आला की ही बनवटी व्यक्ती स्वःताच्या छंदासाठी आग टाकुन गेली आणी आपण रक्त जाळतो
|
खरे बोललिस मनस्विनि मला पण असेच वाट्तय.बहुतेक कुणी तरि स्वरालि नावाने पूडि सोडुन गेलय असो पण अग हे विचार जर खरच कुणाचे असतिल तर खरच भय्नकर व्यक्ति असेल ति? देव करो आणि स्वरालि सारखे किन्वा चुकुन देखिल अश्या विचाराने(अविचाराने)आत्ताच्या मुली नि भारावुन जावु नये इतकिच अपेक्षा!
|
हया (मुळ) विषयावर परत एकदा चर्चा चालु करावि का? वादाच्या भरात मुळ विषय जरा बाजुलाच राहिला शिवाय नविन लोकन्चे पण विचार कळतिल.
|
विषय खरंच खूप सुंदर आहे.. आणि सध्या आमच्याकडे माझ्या लग्नाचं रान पेटल्यामुळे बहुतेकदा मला हाच प्रश्न विचारला जातोय.. बाई गं नवरा कसा पाहिजे.. इन्जिनीअर, डॉक्टर की तुझ्यासारखा पत्रकार? माझं एकच उत्तर असतं आणि एवढ्या दिवसात तसा मुलगा माझ्या आईवडिलाना भेटला नाही... बायकोला माणूस म्हणून वागवणारा पाहिजे..
|
Suvikask
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:01 am: |
| 
|
आयडीअल संसार!!!! किती गोन्डस नाव आहे. पन नावातच ९९% विरोधाभास आहे. संसार आणी तो ही आयडिअल???? फार कमी प्रमाण आहे आयडील संसारांचे.. नवरा आणी बायको दोघांमध्येही कमालीची सहनशीलता, जुळवून घेण्याची व त्याग करण्याची वृत्ती असावी लागते. तसेच कुणाच्या कुठल्या गोष्टीत किती नाक खुपसायचे याचेही भान असावे लागते. आपण लग्नापुर्वी पत्रिका वगैरे बघुन किती गुण जुळतात यावरुन लग्न करावे की नाही हे ठरवतो. पण प्रत्यक्ष संसार करताना मात्र एकमेकांचे न जुळलेल्या गुणांशी जमवून घेऊनच संसार यशस्वी करावा लागतो.त्यामुळे लग्नाआधी किती गूण जुळतात यापेक्षा कोणते जुळत नाही, याचा अभ्यास केला तर संसार आयडिअल होईल. आयडिल संसार होण्यासाठी घरातील इतर मंडळींचा देखील नवरा बायको इतकाच महत्त्वाचा part आहे. घरातील एखादा जरी माणूस संकूचित स्वभावाचा असेल तर ताण्-तनाव्-वाद निर्माण होतात.
|
Bee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 7:38 am: |
| 
|
सुचेता, एकदम पटल तू म्हणतेस ते..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|