Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 26, 2003

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » मूल एक पुरे की दोन? » Archive through June 26, 2003 « Previous Next »

Cool_gal
Tuesday, June 24, 2003 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लीच्या काळात सर्वांनाच दोन मुले वाढवणे आर्थिक द्रुष्ट्या शक्य नसते... म्हणून काही जण एकच मुल असावे असा आग्रह धरतात...पण तसे झाले तर ते मुल लाडावण्याची शक्यता असते...दोन्हीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत...तुम्हाला काय वाटते?

Storvi
Tuesday, June 24, 2003 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाढत्या लोकसंख्येच्या द्रुष्टीने एकच मूल असणे रास्त वाटते....

Sayonara
Wednesday, June 25, 2003 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं वाटत की जर तुम्ही भारतात रहात असाल तर एकच मुल पुरेसं असत. कारण भारतात मुलांना शेजारी पाजारी खेळायला भरपुर कंपनी मिळते.त्यातून त्यांना sharing ही कळतं आणि एकटेपणा ही जाणवत नाही.बाकीच्या भावंडानाही (i mean cousins) frequently भेटता येतं. पण जर तुम्ही परदेशात रहात असाल तर मुलं खुपच एकलकोंडी होतात.तुम्हाला सतत बाकीच्या मुलांच्या company वर अवलंबून राहावं लागतं. आणि सुरुवातीपासून सर्व demands वेळच्यावेळी पुरवल्या गेल्यामुळे ती हट्टी पण होतात.त्यामुळे दोन मुलं असणं जरुरी आहे असं मला वाटंत.

Sayonara
Wednesday, June 25, 2003 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या चर्चेतील एक महत्वाचा मुद्दा मी लिहायला विसरले आहे आणि तो म्हणजे तुमची financial condition ! तुम्ही जर दोन मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकणार नसाल तर मात्र एकच मुलं असणं योग्य मग देश असो वा परदेश

Bee
Wednesday, June 25, 2003 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं हे मुलांच गणित इतक्या सहज सोडवन शक्य नाही. आपल्या भारतात काही सगळेच सुशिक्षित आणि सगळ्याच स्त्रिया काही निर्भिड नाहीत. कधी प्रश्न असतो मुलगा होण्याचा. कधी प्रश्न असतो एक मुलगा आणि एक मुलगी हवेच ह्याचा. आता एक मुलगा आणि नंतर मुलगी होईलच असे नाही. कधी मुली होतात आणि आईवडील सासू सारे मुलाची आशा करतात. मुल जन्माला घालणार्‍या आईला कधी कधी तिचे स्वतअचे मत काय हे कधी कुणी विचारात देखील घेत नाही. आणि आपल्यापैकी असे बर्‍याच लोकांना वाटते की भारतात स्त्रियांन्ना थोडे प्राधान्य मिळते आहे. पण तुम्ही मोठमोठ्या शहाराबाहेर पडा आणि स्त्रियांचे जीवन पहा. ते अजून आहे तसेच आहे. रांधा वाढा उष्टे काधा... नाही शिक्षण नाही घरच्यांचे प्रेम.. असो..


पण मला तरी असे वाटते अपत्य दोन पुरे झालेत. पण एकच मुल सांभाळायला पुरे होत असेल तर नवरा बायको दोघांनी एकत्र विचार करून ठरवावे की दुसरे अपत्य करावे की नको. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. बर्‍याचदा असे दिसते की सुशिक्षित श्रीमंत लोकच कमी अपत्याची निवड करतात. गरीब, कमी शिकलेल्या कुटुम्बात दोन तीन चार पाच असे बरीच भावंडे वाढत असतात.

मला पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. आम्ही फ़ार काटकसरीत वाढलेलो आहोत. पण त्यामुळे काही विषम दुःख वाट्याला आलेले नाही. आता मोठे झाल्यानंतर असे वाटते की मोठ्या कुटुम्बातली चहलपहल काही वेगळीच असते.


Sayonara
Wednesday, June 25, 2003 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेcचा मी हा मुलगी होणं किन्वा मुलगा होणं ह्या आपल्याकडील प्रॉब्लेम्स चा विचारच केला नाही.
bee : तुझ्या मताशी सहमत आहे की मोठया कुटुंबातील मजा काही औरc!! <IMG SRC="http://69.94.96.131/hitguj/clipart/happy.gif" ALT=":-)" BORDER=0>

Bee
Wednesday, June 25, 2003 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुले चांगली निघणे ही आईवडीलांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे. कधी कधी सगळे लाडप्यार देऊन, चांगले संस्कार देउनही मुले वाया जातात. आधिच एक दोन मुले त्यात ती वाया गेलेली किंवा आईवडीलांना विसरलेली, त्या आईवडीलांच्या हृदयाचे दुःख कुणी सावरावे. असे बरेच किस्से आहेत. मोठ्य कुटुम्बात दोन तीन मुले चांगली निघतात आणि त्यावर ते घर सुखी नांदते.

मला तर वाटते, एक दोन मुले असलेल्या आईवडीलांनी आपल्या अपत्यांपासून फ़ार अपेक्ष न बाळगात आपल्या उतारवयाची तडजोड करून ठेवावी. मुलांवर विसंबून राहता कामा नये. पण मुलांपासून दुरावल्याचे दुःख काही वेगळेच असते. आईबाबांना आपल्या पोटच्या मुलांबद्दल कठोर नाही होता येत. ती कशीका निघेना.

Storvi- खरेच आईवडील इतके देशप्रेमी आहेत की ते देशाची लोक्संख्या वाढू नये म्हणून मुले एक किंवा दोनच करावी असे विचार करतात? मला तरी ह्यात काही तथ्य वाटत नाही.


Dakshina
Wednesday, June 25, 2003 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या काळात एक मुल असणं हेच योग्य आहे असं मला वाटतं. कारण पुर्वीच्या काळी एक तर लोकसंख्या कमी, जिव्हाळा, पालनपोषण, यांची काही कमी नव्हती. पण सध्या हातातोंडची पुरेपूर गाठ घालण्यासाठी पती पत्नी दोघांनाही घराबाहेर काम करावे लगते. पुर्वी आई ही घरातच असायची त्यामुळे मुलांकडे लक्ष देणं तिल शक्य होतं, मधल्या काळात दोन मुले असावित असे सर्वसाधारणपणे वाटायचे, का तर एक अपत्य आई बाहेर गेल्यावर एकटं पडू नये म्हणून.

पण आता गेल्या अगदि अलिकडच्या काळात म्हणजे ५ वर्षांपासूनच्या काळात इतके बदल झाले आहेत, स्पर्धा वाढली, महागाई, बेकारी यासर्वांचे प्रमाण इतके वाढले आहे की आत्ता जरी वाटलं की आपण दोन मुलं सहज सांभाळू शकू तरी ते भविष्यात अवघड आहे, कारण लहान मुलांच्या गरजा कमी असतात, पण तीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आड्मिशन्स, कॉलेजचा खर्च इत्यादी गोष्टी वाढतातच.

त्यामुळे प्रामाणिकपणे एकच मुल असावे असे मल वाटते. करण एकच्या खाली अजुन आकडा नहिए नाहितर मी तो ही सांगितला असता.


Bee
Wednesday, June 25, 2003 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मग मुल नसलेलं बरे नव्हे का? की संसाराला शोभा यावी म्हणून एकतरी मुल हवेच असे आहे. भारतात 50% स्त्रिया देखील नोकरी करत नसावी असा माझा अंदाज आहे.

Svsameer
Wednesday, June 25, 2003 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee

अगदी याच विषयावर पुर्वी " मुल का हवे ?" अशा नावाचा एक BB होता. त्यावर बरीच चर्चा झाली होती.


Bee
Wednesday, June 25, 2003 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर, तो बीबी बहुतेक नाहीये आता. वरचे दक्षिणाचे postings मला पटले पण त्यातून मुले असणे ही एक त्रासदायक बाब दिसते आहे. म्हणून मुल नसलेले बरे नव्हे का असे वाटते. असो. ही चर्चा ह्या अगोदर झाली असळ्यामुळे परत त्यावर बोलणे नको. निदान ह्या बीबीवर तरी नको.

Sayonara
Wednesday, June 25, 2003 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली मध्यम वर्गीय कुटुंबातून एक किन्वा दोनच मुले असल्याचे दिसुन येते.परंतु अशिक्षित कुटुंबात झोपडपट्टीतून मात्र आजही पाच्-सहा मुलं असल्याचं चित्र सर्रास दिसतं.मग त्यांच्या हातातोंडाची गाठ पडो वा न पडो.
शिक्षण तर दूरंच राहिलं.


Dakshina
Wednesday, June 25, 2003 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झोपडपट्टीत ५ ते ६ मुलं असण्याचं मुख्य कारण म्हणजे अशिक्षितपणा, हे तर आहेच, शिवाय कुटुंब नियोजनाचे महत्व योग्य प्रकारे पटवून न दिल्यामुळेच झोपडपट्टीत मुलांचे प्रमाण जास्त दिसते. शिकलेल्यांमधे, म्हणजे मध्यमवर्गिय आणि उच्च मध्यमवर्गियांमधे तस स्त्रीच्या भावनांची कदर केली जाते. पण दारिदय रेषेखालील लोकांमधे अजुनही पुरुषच Dominating असतात. त्यामुले कुटुंब नियोजन करायचे की नाही याचा सर्वस्वी निर्णय हा तोच घेतो. सरकार्ने कुटुंब नियोजनाची साधनं इतक्या सहजतेने उपलब्ध करून देउन सुद्धा कही सामाजिक गैरसमजांमुळे त्यांचा वापर हा केला जात नाही.

Archananj
Wednesday, June 25, 2003 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://parents.berkeley.edu/advice/parents/second.html
Ikade khupach insightful discussion wachayla milala.

Storvi
Wednesday, June 25, 2003 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ya vishayavar mala mata mandavishi watatat pan me purvi yavar mate mandali ahet, tich punha tumchya najres anavit ase watle, ani ti ya vishayashi thodifar susangat ahet ase watale mhanoon ithe link det ahe...
kahi good news?

Boli
Wednesday, June 25, 2003 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There is another aspect to limiting your family by 1 kid, in general.

In India, or to have higher statistics consider China. Due to measures taken for population control, currently the average age is increasing in such countries. In other words, ‘Population is aging’.

This will result in high pensioners and less working people in the coming 50 yrs or so.

If there are less kids amongst educated families, then to some extend the educated or cultured population will decrease drastically.

Baki aaplya dharma’che lokach kiti urale aahet, ki we will create a 2:1 ratio with the coming generation.

This does not mean, that people like us, should go for more than 3-4 kids ;-) All the above points are from different perspectives so cannot be used for a particular case.


Bee
Thursday, June 26, 2003 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi- सुंदर लिहिला आहेस लेख. Link दिल्याबद्दल धन्यवाद.

Mahaguru
Thursday, June 26, 2003 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi- चांगले मुद्दे मांडलेस लेख सुंदर आहे

अजुन एक - हा विचार मी ग्रामिण भागातच नव्हे तर शहारातील उcचशिक्षित लोकांमधे पण आढळला
' जास्ती मुले असणे म्हणजे सुबत्तेचे लक्षण आहे '

मला अजुनही logic कळाले नाही


Bee
Thursday, June 26, 2003 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oops! Mukund.. arey he kay keles. nidan Storvi che tewhaDe appreciation taree Thewayala hawe hote :-)

Storvi'tai : tuza lekh Mukund'dadala aawaDala.. :-)

Mukund
Thursday, June 26, 2003 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

True I really liked Shilpa's article.Very thought provoking. But again I like lot of Shilpa's other writings too. They are all very thought provoking.

Ajjuka
Thursday, June 26, 2003 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

swataha 2 mule hou dene is a social crime ase mala vatate. ok ok talavari paarajun angavar yeu naka. let me explain... aaplya deshapudhache sarvaat mothe prashna kuthale aahet? poverty, unemployment, corruption, pratyek kshetratil saturation etc... ya sagalyachya mulashi population explosion (pop ex here onwards) aahe. ok 100% fakt hech karan nasale tarihi pop ex cha yamadhe khup motha vata aahe. ashya paristhitit 2 mule janmala ghalane he kuthlyahi sushikshitala shobhanare nahi. ata tumhi mhanal itaka poravada anek thikani vadhat asto mag mazya ekane kay honar. laakho lok haach vichar karatat tyamule tya pratyekacha ek mhanaje shevati lakho mule hotat. tevha anek sushikshitanni tari at least swatache mool 1 ch asaave ha vichar kela tar nidan tevadha tari pop ex la aalaa basel. shevati apan jya samajat janmalo, shikalo ni paisa kamavato tya samajache apan kahi dene lagato tevha nidan sushikshitanni tari ha vichar karun baghayala harakat nahi. mala manya aahe ki yamule vaad utapanna vhayachi shakyata aahe. pan he lakshat ghya ki mi je mhanatey ti mi anek sushikshitanna keleli vinanti aahe manayachi na manayachi he tumachya hati aahe. aso..
mool ekate vadhane he titakese chhan asatech ase nahi. ekatyane vadhatana mulache kay hote he swaanubhavavarun mahitiye. tevha mool dukate vadhanech uttam. nuclear families mule shaharatun tari sakkhe bhavand ha ekamev khelagadi uralela aahe. (I know I am contradicting myself.) tar ha dusara khelagadi swatachyach rakta masacha hava asa agraha jodapyane na dharata dusare mool dattak ghyave. dusare mool jagat ananyacha crime na karatahi 2 mule asane yamule agadi shakya aahe. mulat jagat asalelya eka mulachi jadanghadan karane he navin mool jagat anananyapeksha nakkich swagatarh aahe aajachya kalat.

arthat mool havese vatane hi ek naisargik odh aahe pan tyabarobarach apan tya mulala arthik, manasik, vel ya sagalya babtit nidan 16-17 varsh tari pure padu ki nahi yacha vichar tya jodapyane kelyashivay 2 kay 1 hi mulacha vichar karu naye. mi upadesh det nahiye pan mi aaj Storvi mhanate tyach station var aahe. bharatat aslyamule, 1 ch varsh zaley lagnala tarihi aamachya aaivadilankade vicharana suru zaliye ni natevaikanchyat charcha tyamule mazi mate jara jastich strong aahet sadyaparisthitit.

Storvi tuza lekh as usual balanced and good. tyalach dharun mi pudhe mhanu icchite ki kharech ekhadya jodapyala mool nako asel mhanaje temporary kinwa kayamache nako asle tar tya nirnayacha aadar rakhala gela pahije anyatha keval apan vaanz nahi aahot he prove karanyasathi, aaivadilanchya aanandasathi kinwa lagna zalyavar yenari aparihary gosht mhanun janmala ghatale gelele pratyek mool ha aajachya kalat social crime ch aahe ase mi mhanen. yamadhe dadapan ananare mhanajech akkha samaj, ni dabavala bali padanare jodape he donhi equally doshi aahet.

Mona
Thursday, June 26, 2003 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अज्जुकाच्या मताशी सहमत नाही. ज़्यांना २ मुले आहेत किंवा जे २ मुले होऊ देण्याचे ठरवतात, ते
Social crime If one has the capacity and energy, why not go in for it ?
users honestly and instead forgoed having their own second or first child ?

Sayonara
Thursday, June 26, 2003 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka : तुझं म्हणणं जसं १०० टक्के बरोबर नाहिये तसंच चूक पण नाहीये.तुझ्या म्हणण्याचा उद्देश नक्किच चांगला आहे. भारतात जर pop ex ला आळा घालायचा असेल तर पुढील किमान पाच वर्ष कुणालाच मुलं होता कामा नये.तरच बाकीचे सर्व problems आटोक्यात येतील.

Mona
Thursday, June 26, 2003 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याच्या वर मला ही कवीता दिसली आणि इथे टाकावीशी वातली -

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

Courtesy : Upashiboka

Bhm
Thursday, June 26, 2003 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


इतकी लोकसंख्या असताना दोन मुले होऊ देणे म्हणजे अपराध आहे.

मी ह्या विधानाचा समाचार घेऊ इच्छितो.
मुळात असे गृहित धरले आहे की होणारी मुले ही लोकसंख्येत भर टाकण्यापलिकडे काही करणार नाहीत. पण हे गृहितक अत्यंत निराशावादी दृष्टीकोनातून मांडले गेले आहे. तसे असायची गरज नाही. होणारे मूल मोठे होऊन गाडगेबाबांसारखा मोठा समाजसुधारक बनणे शक्य आहे की जो अनेक लोकांना लोकसंख्या कमी करायला उद्युक्त करेल. कदाचित उत्तम अभियंता वा मॅनेजर वा प्रशासकीय अधिकारी फार काय एखादा मंत्री बनेल आणि गंगा कावेरी कालव्यासारखा प्रचंड प्रकल्प पुरा करेल आणि कोट्यावधी लोकांचा जीवननिर्वाह सुरळीत करून देईल. कदाचित पुलंसारखा विचारी प्रतिभावंत निघेल आणि आपली संस्कृती उंचावेल आणि अनेकांना काहीतरी चांगले करायची स्फुर्ती देईल. कदाचित उत्तम शिक्षक बनून कुशल विद्यार्थी घडवेल. कदाचित भरपूर पैसा मिळवून योग्य संस्थेला दानधर्म करून काहीतरी विधायक मदत करेल. कितीही जटिल समस्या असली तरी माणूस आपल्या प्रतिभेने तिच्यावर मात करतो असे इतिहासात वारंवार दिसते. तेव्हा मला इतका निराशावादी सूर पटत नाही.

आता दोन वेळच्या जेवणाची ददात नसेल , घरचे संस्कार चांगले असतील , शिक्षण घ्यायला उत्तेजन मिळत असेल , जर आई वडील सुशिक्षित सुखवस्तू सुसंस्कृत असतील तर नवी पिढी चांगली निघण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा निदान ज्यांना आपण चांगल्या घरातले आहोत असे वाटते आणि आपण मुलांना चांगले घडवू शकू असा विश्वास आहे त्यांनी आपल्याला झेपतील इतकी मुले जरूर जन्माला घालावीत. त्याला अपराध म्हणणे हेच एक पाप आहे.


Mona
Thursday, June 26, 2003 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीहम, माझे अनुमोदन. Very well said and thought!

Mvelanka
Thursday, June 26, 2003 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhm नी मांडलेला मुद्दा मी इतरत्रही ऐकला आहे. आणि तो काही प्रमाणावर मला पटलाही आहे.

मात्र काही (विचारी आणि सुसंस्कृत) व्यक्तींनी हा मुद्दा जात, धर्म आणि सुसंस्कारी प्रवृत्ती ह्यांच्या प्रसारासाठी, लोकशाहीत आपले बाहुल्य प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असल्याचेही म्हटलेले दिसले हेही मला नमूद करावेसे वाटते.

किंबहुना bhm नी लिहायच्या अगोदर मला हे लिहावे असे वाटले होते, पण त्यांनी तो पुरेश्या प्रभावीपणे मांडला आहे असे वाटते.


Mvelanka
Thursday, June 26, 2003 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जाता जाता एक विनोद आठवला:

मुले नको म्हणणे हा अप्पलपोटेपणा आहे.

जे जन्माला आलेले आहेत त्यांनी इतरांना जन्म का घेऊ देऊ नये???!!!


Arch
Thursday, June 26, 2003 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, एकच विचारावस वाटत जर दोन मुल होऊन देण हा जर social crime असला तर पुढची mejority पिढी सुसंस्कृत आणि सुशिक्षित नसण ह्याची जबाबदारी कोणावर टाकायची?

Mvelanka
Thursday, June 26, 2003 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांच्या घरात एका भावाला एक मूल आणि दुसर्‍याला दोन असे जिथे आहे, तिथे कोणी तुलना करून पाहिली आहे का की त्या मुलांच्या स्वभावात काय काय चांगले वाईट फरक पडतात.

असे एकच मूल बरे की भावंडे असलेली बरी? अर्थात पुढे जिकडे तिकडे एकच मूल दिसू लागले तर अशी तुलनाही निरुपयोगी ठरेल म्हणा.


Ajjuka
Thursday, June 26, 2003 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arch, pudhachi majority pidhi sushikshit ani susanskrut nasane he gruhitak kuthalya payavar aahe! ashikshitanchi mule ashikshit va asanskrutach nipajatil ya payavar. I think this is not right. ashikshit mule shiku shakatat. shikalyanech susanskrutata yete hehi barobar nahi. tevha zopadapattit 10 tar sushikshitanchya gharat 1 mool janmala aalyane pidhi vaya jate mhanun sushikshitanni 10 chya barobarila moole hou dyavi ase mhanane nirarthak aahe. shevati resources jevadhe aahet tevadhech asanr aahet. te jar sarvanna yogya ritine milayache asatil tar control pahijech ni sarvach changlya goshtinchi survaat sushikshitanpasun ch hote tevha yachihi suruvaat tithunach honar he ughad aahe. zopadapattit 10 peksha kami mule kashi janmala yetil yasathihi barobarine prayatn vhayalach havet. pan keval sushikshitanchi mule kami mhanun pidhi ashikshit ni asasanskrut he mhanane hi ghaai hotey ase mala vatate.

BHM, tumachya mhananyapramane yenare mool he jar thor samajasudharak hou shakate tar te samajakantak hi hou shakate kinwa yatale kahich na ghadata nivval jagale ase hou shakate. shevati it all depends on the kid's IQ, sanskaar, jadanghadan, vachan and so many other things. tyacha kiti mule hou dyavit yachyashi kahich sambandh nahi. ha nirashavadi drushtikon mulich nahi.
yenare mool khup kahitari karun dakhavel yache kahi %s chances asatat. keval ashya chance var aadharit lokasankhya vadhavat rahane yala kahich arth nahi. tyatach tumache te so called 'paap' aahe. mala ajibat tumacha mudda patala nahi.

mona, kiti mule asavit ha mudda ata ajibat vaiyaktik prashna uralela nahiye. apan sushiksiht manasanni tari ya goshtila keval vaiyaktik prashna manu naye. jevha santati niyamanachi garaj bhasali suruvatila tevhache pop baghata 1 kinwa 2 mule pure ha prachar thik hota. pan ataachi paristhiti vegali aahe ata ekach pure ase mhananyachi kharach vel aaleli aahe. tevha vaiyaktik prashna mhanun soyiskar sutaka karun ghenyaitaki hi baab shullak nahi. ajun ek, 1 mool swatache ni 1 dattak asave asa upadesh mi konalahi kelela nahiye. mazya post madhehi mala upadesh karaycha nahi he lihile aahe tevha upadesh karanyacha dosh mala lagat nahi. ni swataha kelyashivay boluch shakat nahi ase kuthey? at least mi 2-3 mule zalyavar bolat nahiye. we dont have any kid yet but that does not mean aamhi yavar kahi vichar karat nahi. mi je lihile te mi mala patale mhanun kinwa vicharanti mi ya nirnayala aale mhanun lihile. mazya aacharanat mi kay aanate ni tyavar mazyatala 'dam' tharavane etc ya goshti mala hetupurassar personal attack vatatat tevha kindly refrain from this.

*******************************************


अर्च, पुढची majority पीढी सुशिक्षित आणि सुसंस्कृत नसणे हे गृहितक कुठल्या पायावर आहे! अशिक्षितांची मुले अशिक्षित व असंस्कृतच निपजतिल या पायावर. I think this is not right. अशिक्षित मुले शिकु शकतात. शिकल्यानेच सुसंस्कृतता येते हे ही बरोबर नाहि. तेव्हा झोपडपट्टित १० तर सुशिक्षितांच्या घरात १ मूल जन्माला आल्याने पीढी वाया जाते म्हणुन सुशिक्षितानी १० च्या बरोबरीला मूले होवु द्यावि असे म्हणणे नीरर्थक आहे. शेवटि resources जेवढे आहेत तेवढेच असणार आहेत. ते जर सर्वाना योग्य रीतीने मिळायचे असतील तर control पाहिजेच नी सर्वच चांगल्या गोष्टिंची सुरुवात सुशिक्षितांपासुनच होते तेव्हा याचिही सुरुवात तीथुनच होणार हे उघड आहे. झोपडपट्टित १० पेक्षा कमि मुले कशि जन्माला येतील यासाठिही बरोबरिने प्रयत्न व्हायलाच हवेत. पण केवळ सुशिक्षितांची मुले कमी म्हणून पिढि अशिक्षित नी असंस्कृत हे म्हणणे हि घाई होतेय असे मला वाटते.

BHM it all depends on the kid's IQ, and so many other things.

pop. at least - we dont have any kid yet but that does not mean etc personal attack kindly refrain from this.


Storvi
Thursday, June 26, 2003 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mandali abhar.... mukund tumhala maza likhan avadta he mala mahit navhta, mala wataycha te fakta malach avadta :-)
seriously, Thanks...

ya vishayavar me ankhi kahi bolnyat artha nahi, karan tech mudde punha punha mandle janar,.... Shevti saglya BB's var pudhe tech hota... tech tech vichar ankhi ankhi jorat mandale jatat yahun adhik kahi ghadat nahi...

mhanoon to lekh ithe post kela.
thanks

Anilbhai
Thursday, June 26, 2003 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकच मुल पुरे हे ठिक आहे पण मग मुलगा असावा की मुलगी असावी?
आणी सगळ्यानीच जर मुलगा असावा असे ठरवले तर?
(Now a days, Medically it is quite possible to have your own choice)
आणी एकाच मुलाचा choice असेल तर लोक हा असा विचार नक्कीच करतील


Bhm
Thursday, June 26, 2003 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>BHM, tumachya mhananyapramane yenare mool he jar thor samajasudharak hou shakate tar
te samajakantak hi hou shakate kinwa yatale kahich na ghadata nivval jagale ase hou shakate.


एक म्हणजे चांगल्या घरात ( म्हणजे सुखवस्तु , सुसंस्कृत , सुशिक्षित इत्यादी ) वाढलेल्या
मुलगा काहीतरी चांगले करण्याची शक्यता दारिद्र्यात अडाणी असंस्कृत घरात वाढणार्‍या
मुलापेक्षा जास्त आहे असे माझे मत. मला वाटते ज्या प्रयोगात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे
ते प्रयोग थांबवून आपण हमखास अयशस्वी होणार्‍या प्रयोगांची संख्या तुलनेने वाढवत आहोत.



shevati it all depends on the kid's IQ, sanskaar, jadanghadan, vachan and so many other things. tyacha kiti mule hou dyavit yachyashi kahich sambandh nahi.
ha nirashavadi drushtikon mulich nahi.


IQ जास्त असणार्‍यांची मुले तो वारसाही घेऊन येत असतीलच की. संस्कार जडणघडण वाचन
वगैरे मूल हे आई बापांकडून शिकण्याची शक्यता कितीतरी जास्त आहे. तेव्हा आपले विचार
हे अत्यंत निराशावादी आहेत हे मी पुन्हा ठासून सांगतो. अगदी probability theory च्या
कसोटीवर घासूनही !


>>
yenare mool khup kahitari karun dakhavel yache kahi %s chances asatat.
keval ashya chance var aadharit lokasankhya vadhavat rahane yala kahich
arth nahi. tyatach tumache te so called 'paap' aahe. mala ajibat tumacha mudda patala nahi.


ज्याला वाढत्या लोकसंख्येची जाणीव आहे त्याबद्दल काही करावेसे वाटते आहे त्याने
वाढवलेले मूल आणि उपरवालेकी देन है असे मानणारा केवळ अडाणीपणे मुले जन्माला
घालणारा ह्यांची औलाद. जरा तटस्थपणे विचार करून सांगा की कोण जास्त चांगले
निघण्याची शक्यता आहे ?
आणि अगदी शिवाजी वा महर्षी कर्व्यांसारखे झाले नाही तरी शिवाजीच्या एखाद्या
मावळ्याइतके किंवा कर्व्यांच्या आश्रमाला एखादा आणा मदत करणार्‍यांइतके चांगले
निघू शकतील आणि असा खारीचा वाटा उचलणारे अनेक असले तर फायदाच आहे की.
उच्चकोटीचे कर्तृत्व असणारा निघण्याची शक्यता कमी असली तरी थोडेफार चांगले गुण
असण्याची शक्यता बरीच आहे अशी माझी खात्री आहे. माझ्यापुरते बोलायचे तर सार्वजनिक
स्वच्छता म्हणजे कुठलीही तमा न बाळगता सर्वत्र थुंकणे इतके तरी माझे मूल करणार
नाही ह्याची मी खात्री देतो. आणि तसे झाले तर बहुसंख्य भारतीयांपेक्षा माझे मूल श्रेष्ठच
ठरेल !
जाता जाता : जर एखादा पोरगा पराकोटीचा समाजकंटक निघाला तर मुशर्रफ वा सद्दाम सारखा उन्मत्त
हुकुमशहा बनेल आणि मग अमेरिकेसारखे दादा राष्ट्र आपसूकच लोकसंख्येला आळा घालेल !



Svsameer
Thursday, June 26, 2003 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka

tuzya vicharana majhe purna anumodan. te vichar avadalyane tyache devnagarikaran karun (tula na vicharata) takle ahe. tyat kahi rhasva dirgha chuka aahet. tya sodun vachavyat.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators