Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 17, 2008

Hitguj » Views and Comments » General » टेनीस .....Greatest Ever!! » Archive through March 17, 2008 « Previous Next »

Farend
Tuesday, June 26, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद विम्बल्डन चालू झाले, आता येउद्यात आपलेही सर्व्ज! पहिल्या दिवशी बर्‍याच गेम्स वाहूनच गेल्या म्हणे.

Mahesh
Wednesday, June 27, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, आपण वर्तमानपत्रात क्रिडा विषयावर लेख लिहिणारे मुकुंद पोतदार आहात असे वाटते आहे. तसे नसेल तर क्षमस्व...

Slarti
Tuesday, July 03, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेरेनाबाईंच्या जिगरीला मानलं बुवा !! नुसते पुढे खेळत राहणे इतकेच नाही तर तिसरा सेट ६ - २ घेणे म्हणजे... हात टेकले.

Milindaa
Tuesday, July 03, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज विम्बल्डन मध्ये काही धक्कादायक निकाल लागले, महिलांच्या विभागात.

बर्‍याच नव्या खेळाडू वर येताहेत.


Satishm27
Monday, July 09, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन...........फेडरर विम्बलडन जिंकला!
मात्र आस्ट्रेलियन ओपनसारखा तो "अजिंक्य" नाही वाटला!!!!!!!!!!
नडालने फायनल अविस्मरणीय केली...............

Jaaaswand
Monday, July 09, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Once upon a time...I started this Thread for Federer as ..'Greatest Ever'..
surprised today..by seeing name is changed :-)
Anyways,

No doubt...Federer is BEST..
Am saying this...not because he manged to win 5th successive Wimbledon crown but..
1) He is going through his worst slump in form from last 4/5 years
2) Still he manged to reach all 3 GrandSlams held this year..even won 2..
3) He managed to give fight to Nadal on clay court, defeated him in Hamburg...lost in Rolland Garros
4) He knew..he was not playing well, & Nadal could keep him away from high-five in WMBLDN..
But, on sheer mental strength & nerve..he held back...& won...!!

I agree...Nadal has improved in last 2 years like no other player in circuit & Gap is closing on FedEx...
But, still difference of 2000 odd ATP points between No 1 & No 2 speaks volumes...!! Make no mistake, Nadal himself has stated that he is playing hi BEST TENNIS EVER these days !!

Popular Line.. :
Federer is God...
He was just human other day !!! :-)


Savyasachi
Monday, July 09, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ah... looking at fed's body language in 4thset, i thought of worst. But in 5th set, he changed back to his normal play.

Asami
Monday, July 09, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I started this Thread for Federer as ..'Greatest Ever'.. >> BB will revert to hthis name once Fedex grabs Grench Open :-)

Savyasachi
Monday, July 09, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami, Fedex can never grab 'G'rench open re baba :-)

Jaaaswand
Tuesday, July 10, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami, Savya
yeah even I believe..FedEx will never win 'G'rench Open !!
but definitely will grab Muskateers Cup :-)
Probably in next two years !! :-)

Varsash
Saturday, September 08, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय युस ओपन चालु झाली (नाही सम्पत आली!) तरी ही थ्रेड थन्ड

Yogi050181
Sunday, September 09, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय ठंडच म्हणायची.. मारिया कांदापोहा शारापोव्हा लौकर आउट झाली.. :-( :-(
आता फ़क्त फेडीसाठीच मॅच बघतो..
btw हेनिनच्या जिगरला सलाम.. सॉलिड खेळ.. विलियम्स भगिनींना एकाच स्पर्धेत तेही ग्रॅन्ड्स्लॅम्मध्ये.. हीच हेनिन काही वर्षांपुर्वी नाहिशी झाली होती.. आज ती नंबर एकवर आहे.. & she really deserved for dat


Varsash
Sunday, September 09, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म खरे आहे... हेनिन आणि फ़ेडररररररर....सम्पली युस ओपन

Varsash
Sunday, September 09, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिर्झा कधी कमाल दाखवणार काय माहित...

Savyasachi
Monday, September 10, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

FedEx was down but won first 2 sets and finally match. I am worried, is he slowing down or the opponent was really playing exceptional? Well, he won in the end, I am happy :-)

Ldhule
Monday, September 10, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<opponent was really playing exceptional?
Thats true... मी काल स्टेडियम मधे मॅच पाहिली, नोवाक was simply great.

Mukund
Saturday, September 15, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल... अरे मला या वर्षी बरेच काही लिहायचे होते.... विंबल्डन व यु एस ओपन च्या आठवणींबद्दल पण गेले ३ महीने जरा बिझी होतो त्यामुळे लिहायला जमले नाही..

महेश.. मी मुकुंद पोतदार नाही.

पण असामी म्हणतो त्याप्रमाणे फ़ेडरर ग्रेटेस्ट एव्हर आहे की नाही हा वाद तो फ़्रेंच ओपन परत एकदा हरल्यामुळे चालुच राहाणार आहे पण विंबल्डन व खास करुन यु एस ओपन स्पर्धा त्याने ज्या पद्धतीने जिंकल्या त्यात त्याचा सर्वांगीण खेळ व जबरदस्त आत्मविश्वास दिसुन आलाच! मी यु एस ओपनला त्याच्या उप उपांत्य फेरीतल्या रॉडीक बरोबरच्या मॅचला न्यु यॉर्कलाच होतो. रॉडीक खरच चांगला खेळला या वेळेला. तो पहिले २ सेट जिंकु शकला असता जे टाय ब्रेकरमधे फ़ेडररने अतिशय थंड डोके ठेउन जिंकले. रॉडीक खुपच हायपर वाटत होता व त्यामुळे उगाच त्याची शक्ती वाया घालवत होता. त्याच्या अगदी उलट फ़ेडरर अतिशय थंड राहुन अगदी अचुक क्षणी त्याची शक्ती (मानसीक व शारीरीक) पणाला लावत होता व त्यामुळेच तो ०-२ असा २ सेटने डाउन न होता २-० असा २ सेटने पुढे गेला व शेवटी ३ सेटमधे जिंकला. फ़ायनल मी प्रत्यक्ष पाहीली नाही पण टीव्ही वर पाहील्यावर रॉडीक बरोबरच्या सामन्याचीच पुनराव्रुत्ती झाल्यासारखी वाटली...फक्त फ़ायनलमधे नोव्हाकने अगदी नवशिक्या सारख्या चुका केल्या... निर्णायक वेळी अवसान गाळून त्याने स्वत: च्याच पायावर धोंडा पाडुन घेतला व अक्षरश: फ़ेडररला पहीले २ सेट दान केले... असो... पण फ़ेडररला क्रेडीट दिलेच पाहीजे... पहील्या दोन्ही सेटमधे अगदी लव्ह फ़ॉर्टी डाउन असताना व ३ सेट पॉइंट्स नोव्हाककडे असताना त्याने आत्मविश्वास कधीच गमावला नाही व एका सुप्रीम आत्मविश्वासाने तो खेळला. ही डेफ़िनेटली डिझर्व्ह्ड टु विन द चॅंपिअनशीप....

या वर्षी लागोपाठ ४ वेळा ही स्पर्धा जिंकुन फ़ेडररने ८० वर्षापुर्वीपासुनच्या विक्रमाची बरोबरी केली हे जरी खरे असले तरी यु एस ओपन स्पर्धेबद्दल लिहिताना पुरुषांमधे जिमी कॉनर्स,पिट सॅंप्रास,आंड्रे ऍगॅसी व इव्हान लेंडल य खेळाडुंबद्दल व महिलांमधे ख्रिस एव्हर्ट, स्टेफ़ी ग्राफ़ व मार्टीना नवरातिलोव्हा बद्दल लिहिले नाही तर ते न्याय्य होणार नाही...

७० व ८० च्या दशकात पुरुषांमधे ही स्पर्धा कॉनर्स,लेंडल व मॅकेन्रो य तिघांनीच डॉमिनेट केली. त्या तिघांनी मिळुन १३ वेळा ही स्पर्धा जिंकली व ते तिघे एकुण २० फ़ायनलमधे खेळले.

आजही न्युयॉर्कच काय पण जगातल्या कुठल्याही टेनीस प्रेमी लोकांना विचारले तर ते हेच सांगतील की कॉनर्स हा यु एस ओपन स्पर्धेचा अनभिषिक्त सम्राट होता. तो पाच वेळा ही स्पर्धा जिंकला व ७ वेळा फ़ायनल मधे व १३ वेळा सेमी फ़ायनलमधे खेळला व तब्बल रेकॉर्ड ९८ मॅचेस तो इथे जिंकला..पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ज्या रितीने तो प्रत्येक वर्षी तो या स्पर्धेत खेळला ते सगळ्या जगभरच्या टेनीस प्रेमींच्या लक्षात राहील.... १ नाही २ नाही तर अशा अनेक मॅचेस तो इथे खेळला आहे की ज्यात तो २ सेट डाउन व तिसर्‍या सेट मधे सुध्हा १-४ असा डाउन असताना त्याने सामने फिरवले आहेत... त्याचे ते नेव्हर से डाय ऍटीट्युड व फ़ीस्ट पंचींग सर्व टेनीस प्रेमींना ठाउक आहे...
१९९२ मधे वयाच्या जवळ जवळ चाळीशाव्या वर्षी त्याने २० वर्षाच्या एरन क्रीकस्टीन बरोबर २ सेट डाउन व तिसर्‍या सेटमधे ०-५ असा डाउन असताना त्याने ज्या रितीने सामना फिरवला व त्याच्या अर्ध्या वयाच्या क्रीकस्टीनला हरवले ते व त्या वर्षी त्याने उपांत्य फेरीपर्यंत जी धडक मारली ती यु एस ओपनच्या इतिहासात अजरामर झाली आहे. कोणाला तो सामना इ एस पी एन क्लासीक वर बघायला मिळाला तर ती पर्वणी मुळीच सोडु नका... जिद्द काय असते त्याचे तो सामना म्हणजे मुर्तीमंत उदाहरण होते...

१९७४-७५ पासुन ते १९८५ पर्यंत कॉनर्स्-मॅकेन्रो,कॉनर्स्- बोर्ग,कॉनर्स लेंडल यांच्यात जे सामने फ़्लशींग मेडोज ला झाले ते टेनीस प्रेमींच्या मनात कायमचे घर करुन गेले हे निश्चितच. बोर्गने ही स्पर्धा जिंकण्याचा खुप आटापिटा केला पण प्रत्येक वेळेला एकतर कॉनर्स नाहीतर मॅकेन्रो त्याच्या मार्गातले काटे ठरले व तो ही स्पर्धा चार वेळा फ़ायनलला जाउनही कधीच जिंकु शकला नाही. याच स्पर्धेत एका वर्षी मॅकेन्रो कॉनर्स फ़ायनलमधे कॉनर्सने मॅकेन्रोच्या कोर्टवरच्या वागणुकीला वैतागुन असाही शेरा मारला होता की त्याचा ५ वर्षाचा मुलगाही मॅकेन्रोपेक्षा बरा वागतो...:-)

कॉनर्सपाठोपाठ या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला तो म्हणजे इव्हान लेंडलने... १९८१ ते १९८९... म्हणजे जवळ जवळ ८० चे सर्व दशक... लेंडल तब्बल ८ वर्षे लागोपाठ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला होता... हा त्याचा विक्रम अबाधीत आहे. त्यापैकी ५ वेळा तो हरला ही बाब दुर्दैवाची आहे पण यु एस ओपन फ़ायनल व इव्हान लेंडल हे समीकरणच ८० च्या दशकात होउन बसले होते. ८२,८३,८४ मधे कॉनर्स व मॅकेन्रो कडुन लाठोपाठ ३ वर्षे हरल्यावर ८५ मधे त्याने मॅकेन्रोला हरवुन पुढची ३ वर्षे ही स्पर्धा जिंकली. पण ८८ मधे मॅट्स विलॅंडरने व ८९ मधे बोरीस बेकरने त्याला फ़ायनलमधे हरवुन त्याच्या कारकीर्द्रीचा सुर्यास्त इथेच केला.

लेंडलच्या कारकीद्रीचा सुर्यास्त इथे होत असतानाच याच ठिकाणी ऍगॅसी, सॅंप्रास यांच्या कारकिद्रीचा उदयही इथेच झाला. १९९० मधे ही स्पर्धा वयाच्या १९ व्या वर्षी जिंकुन सॅंप्रासनने आपल्या विक्रमी कारकिद्रीची तोफ़ याच फ़्लशींग मेडोज वर डागली. त्याच्या सर्व्हीसच्या झंझावातात त्या वर्षी उप उपांत्य फेरीत लेंडल,उपांत्य फेरीत मॅकेन्रो व अंतिम फेरीत ऍगसी सारखे अतिरथी महारथी गारद झाले व सगळ्यांनी या कोवळ्या पोराची दखल इथेच घेतली. पुढच्या १३ वर्षात लेंडलप्रमणे सॅंप्रासनेही या स्पर्धेची अंतीम फेरी ८ वेळा गाठली व त्या दरम्यान त्याच्यात व ऍगॅसी,बेकर व राफ़्टर मधे अनेक अविस्मरणीय सामने झाले. पण कॉनर्स लेंडल च्या मानाने सॅंप्रासचे सामने थोडे फिकेच पडले. एक सर्व्हीस सोडली तर सॅंप्रासच्या खेळात मला कधीच वैविध्य वाटले नाही. हा माझा पर्सनल बायस असेल पण... कॉनर्स सारखा कोणीच फ़्लशींग मेडोज वर आजपर्यंत खेळला नाही असे माझे मत आहे..:-)

जी बाब सॅंप्रासची तीच ऍगॅसीची... १९९० ते १९९५ पर्यंतचा फ़्लॅंबॉयंट ऍगॅसी मनाला भाउन गेला पण ९७-९८ नंतरच्या ऍगॅसीच्या खेळात प्रेक्षणियतेचा अभाव वाटला. पण तरीही कॉनर्स नंतर जर कोणी खेळताना सर्वस्व पणाला लावले असेल तर ते ऍगॅसीनेच... म्हणुनच त्यानेही न्यु यॉर्कमधल्या प्रेक्षकांची व जगभरच्या टेनीस प्रेमींची मने इथेच जिंकली. सर्व्हीस रिटर्न करण्यात ऍगॅसी इतके कौशल्य फारच कमी खेळाडुंमधे होते पण सॅंप्रासने इथे त्याला नेहमीच धुळ चारली. ऍगॅसीही इथे सहा वेळा फ़ायनलला आला व दोन वेळा विजयश्रीने त्याच्या गळ्यात इथे माळ घातली.

आणी या सगळ्या आकडेवारीपेक्षा यु एस ओपन स्पर्धेचे अप्रुप जास्त असण्याचे कारण हे की लुई आर्मस्ट्रॉंग व आर्थर ऍश स्टेडीअम वर सामना बघताना असलेले वातावरण! ज्यांना कोणाला फ़्लशिंग मेडोज ला प्रत्यक्ष मॅच बघण्याचे भाग्य लाभले आहे त्यांनाच कळेल की मी काय म्हणत आहे. मला स्वत:ला रॉजर फ़ेडररला दोनदा व ऍगॅसी व रॉडीकला एकदा इथे खेळताना बघण्याचे भाग्य लाभले आहे. सबवे मधुन उतरल्यावर एका बाजुला न्यु यॉर्क मेट्स चे शे स्टेडियम दिसते तर दुसर्‍या बाजुला फ़्लशींग मेडोज चा विहंगम कॉंप्लेक्स दिसतो ज्यात आर्थर ऍश व लुइ आर्मस्ट्रॉंग ही २ मेन स्टेडीअम दिसतात. कॉंप्लेक्स मधे शिरल्यावर मोठा प्रुथ्वीचा गोल डाव्या बाजुला दिसतो. आर्थर ऍश स्टेडीअम एवढे मोठे असुन सुद्धा आत गेल्यावर मॅच बघताना खेळाडु एकदम जवळ दिसतात. त्या स्टेडीअम आखणार्‍या आर्कीटेक्ट ची दाद द्यावीशी वाटते.. म्हणुनच यु एस ओपन स्पर्धा खेळताना कॉनर्स प्रेक्षकांशी जवळचा संवाद साधु शकत असे. असो.

पुढच्या पोस्टात या स्पर्धेवर आपली छाप उमटवणार्‍या महिलांचा उहापोह करु.


Farend
Saturday, September 15, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मुकुंद US open बद्दल छान माहिती मिळाली वाचायला. ही कायम तेथेच (फ्लशिंग मेडोज न्यू यॉर्क) होत आली आहे का? माझ्या आठवणीत तेच नाव कायम ऐकले. या वेळची फायनल सुद्धा मस्त झाली

पुन्हा विनंती: ही माहिती तू स्वत:चा फोल्डर रंगबिरंगी वर उघडून टाक.


Mukund
Monday, September 17, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल.. रंगबिरंगीचा विचार करतो..

फ़ायनल तर मस्तच झाली.. पण क्वार्टर फ़ायनल सुद्धा मस्तच झाली रॉडीक बरोबरची.

अमोल..यु एस ओपन १९७८ का ७९ पासुन फ़्लशिंग मेडोजला होत आहे. त्या आधी ती स्पर्धा न्युयॉर्कलाच पण फ़ॉरेस्ट हिल्सला होत होती. फ़ॉरेस्ट हिलला आधी ग्रास कोर्ट होते मग ७५ ला त्यांनी सरफ़ेस बदलुन क्ले कोर्ट केले आणी मग फ़्लशींग मेडोजला आल्यावर हार्ड डेको सरफ़ेसवर स्पर्धा होउ लागल्या. जिमी कॉनर्स ला यु एस ओपन चा अनभिषिक्त सम्राट म्हणायचे अजुन एक कारण म्हणजे त्याने एकट्यानेच ही स्पर्धा तिन्ही सरफ़ेसवर(ग्रास,क्ले व हार्ड कोर्ट) जिंकली आहे. व लेंडलचेही कौतुक करण्यासारखे आहे कारण १९७८ का १९७९ मधे जेव्हा स्पर्धा फ़्लशिंग मेडोज ला होउ लागल्या तेव्हापासुन ही स्पर्धा सर्व्ह ऍंड व्हॉली करणार्‍या टेनीसपटुंनीच डॉमीनेट केली आहे...(कारण हा सरफ़ेस फ़ारच वेगवान व लो बाउन्स असणारा आहे..) लेंडल हा त्याला एकमेव अपवाद होता.. तो बहुतकरुन बेसलाईन प्लेयर होता तरीही ही स्पर्धा त्याने १० वर्षे डॉमीनेट केली.



Mukund
Monday, March 17, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सगळे फ़ेडरर प्रेमी झोपले की काय? ऑस्ट्रेलिअन ओपन मधे उपांत्य फेरीत नोव्हाक डिजोकव्हीकने यु. एस. ओपन फ़ायनलमधे फ़ेडरर बरोबर हरल्याचा वचपा काढला.... त्या स्पर्धेनंतर अजुन एक दोन स्पर्धेतही फ़ेडररची कामगीरी एकदमच सुमार झाली आहे... यातच आता फ़्रेंच ओपन स्पर्धा जवळ येत आहे जिथे फ़ेडरर कधीच जिंकला नाही. Is this the beginning of an end for him?:-(

काय वाटते मित्रांनो?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators