Tustin1
| |
| Monday, November 20, 2006 - 1:33 am: |
| 
|
hi, mi mazya mula la potty trainsathi 2-3 mahinyapasun prayatna karate ahe.pan to kahi maz ikat nahi.mala sangel ka koni mulana potty train kase karave?
|
Malavika
| |
| Monday, November 20, 2006 - 2:28 am: |
| 
|
न कंटाळता (तू कंटाळा करत असशील असे सुचवायचे नाही पन कधी कधी कंटाळा येने स्वाभाविक आहे---स्वानुभवावरून) २-२ तासांनी पॉटीवर बसवत जा. once upon a potty hi DVD चांगली आहे.
|
Mrinmayee
| |
| Monday, November 20, 2006 - 2:39 am: |
| 
|
मुलांना पॉटी एकुणच इंटिमिडेटिंग वाटते. म्हणून माझ्या मुलाच्या डॉक्टरनी छान युक्ती सांगीतली. पॉटीचा उपयोग मुलांना सुरवातीला बसायच्या खुर्चीसारखा करु द्यायचा. त्यावर बसून टी व्ही बघण्यापासून (बघु देत असाल तर) ते पुस्तक आणि खेळणी खेळणे सगळ्या गोष्टी (मुख्य बाब सोडून )त्यावर बसून त्यांना करु द्यायच्या. मग हळुहळू पॉटी सीट ओळखीची होते. त्यानंतर मग महत्वाच्या कार्यक्रमाला त्यावर बसवता येतं. Good luck!
|
Chyayla
| |
| Monday, November 20, 2006 - 3:12 am: |
| 
|
हे मायबोलिकरीणीन्नो (छी: मोलकरीण म्हटल्या सारख्या वाटते) तर हित्गुजकरिन्नो, नाहितर मैत्रिणीन्नो... खुप घोटाळा होत आहे तुमचे नवरे आमची खरडपट्टी काढतील आणी मला ईथे अगावुपणा केल्या सारख वाटतेय... काय बोलाव तुम्हीच सुचवा या पामराला, अजाण, अज्ञानी, Innocent ला. बर हे पॉट्टी प्रकरण काय आहे सान्गाल काय?
|
>>>> बर हे पॉट्टी प्रकरण काय आहे सान्गाल काय? कोण चावल की अन्गात शिरल रे तुझ्या? अरे ते काही देशी अन बाकी परदेशातल्या ल्हान सान पोट्टे पोट्टीन्च पॉट्टी प्रकरण असत, तुला न्हाई समजायच! तुला आपला केतकराचा न्युजपेपरच बरा! DDDDDDD
|
अरे च्यायला पॉटी ट्रेनींग म्हणजे मुलांना शीसू आली असता संडासाचा वापर करायला शिकवणे म्हणजे potty training!
|
Chyayla
| |
| Monday, November 20, 2006 - 3:46 pm: |
| 
|
अ बा बा बा... आयला असे होय, खरच धन्यवाद श्रद्धा... हा लिम्बु टिम्बु नुसता छळतो सान्गायला काय जात होत? लहानपणी तु ट्रेनिन्ग घेतले असशील मी नाही. (थोडा मोट्ठा दिवा घेशील रे बावा). जन्मभर मुर्ख राहण्यापेक्षा काही वेळ असला प्रष्न विचारुन मुर्ख झालेले बरे, पहा निदान माझ्या मुळे ईतरान्ना पण हे ज्ञान प्राप्त झाले. नाहीतर कुणी चुकुन या वयात पॉट्टी ट्रेनिन्ग घेतोय असे म्हटला असता तर किती घोटाळा झाला असता. तर बाकी तुमच चालु द्या, अजुन माझ्या मुलाना वेळ आहे. लग्न झाले की पाहु.
|
Milindaa
| |
| Monday, November 20, 2006 - 3:57 pm: |
| 
|
अजुन माझ्या मुलाना वेळ आहे. लग्न झाले की पाह<<< मुलांचं लग्न होईल तेव्हा हे पाहायची वेळ गेलेली असेल
|
Tustin1
| |
| Monday, November 20, 2006 - 5:21 pm: |
| 
|
thanks maitrinino. mi tyala basayala lavat jail. tyala mipotty sitvar basayla sangate pan to ajibat basat nahi.
|
Varshac
| |
| Monday, November 20, 2006 - 5:30 pm: |
| 
|
च्यायला, लिंम्बुटिम्बु, मिलिंदा हसुन, हसुन पुरेवाट.
|
Prajaktad
| |
| Monday, November 20, 2006 - 8:07 pm: |
| 
|
tustin1 किति वर्षाचा आहे तुझा मुलगा? comunicate करतो का तुझ्याशी?म्हणजे मला हे हवे , ते हवे..वैगेरे चुकुनही फ़ोर्स करु नकोस. take a gap मग पुन्हा प्रयत्न कर. good luck!
|
Anupama
| |
| Monday, November 20, 2006 - 10:07 pm: |
| 
|
मी toilet seat वर direct बसेल अशी seat आणली आहे. सगळ्यात पहिले अंघोळीच्या वेळेस मी तिला रोज potty वर बसवायला सुरुवात केली. चुकुन एकदा पी पी केल्यावर भरपुर कौतुक केले. मग ती सवय झाल्यावर मी माझ्या मुलीला भरपुर पाणी प्यायला देउन bathroom मध्येच तिच्याशी खेळत बसायला लागले थोडावेळ आणि पी पी आली की potty वर बसयल सान्गायचे. प्रत्येक वेळा पी पी केली की अणिक कौतुक करायचे. हळु हळु तीला समजायला लाग़ले. सातत्यने प्रयत्न अणि कौतुक करणे किन्वा छोटी treat देणे या गोश्टिन्नि खुप फ़रक पडतो.
|
Disha013
| |
| Monday, November 20, 2006 - 10:33 pm: |
| 
|
मी पण मुलाला सवय लावताना तेच केले....मग traing कर्णे सोपे जाते.(असे आपले माझे मत)...... माझ्या बहीणीने तिच्या मुलीसाथी आधी मुलांची potty seat आणली...पण त्यावर train झाल्यानंतर कमोड वर सवय लावणे तिला जरा जड गेलेले... so ,मी direct दुसरि step घेतलि.
|
च्यायला, google वर ही माहिती शोधली असती तर सहज मिळाली असती. पण आपली चुक मान्य करायची नाही आणि कुणी कितीही समजवून सांगितले तरी सुधारायचे नाही असा विडा उचललास त्याला कोण काय करणार. मंडळी ह्याला उत्तरे देऊ नका.
|
Chyayla
| |
| Tuesday, November 21, 2006 - 3:20 am: |
| 
|
सॉर्री....श्रद्धा तुला राग आल असेल तर... ...पण मला समजले आता.
|
Tustin1
| |
| Tuesday, November 21, 2006 - 3:27 am: |
| 
|
ag maza mulaga 2 year 4month cha ahe. mi tyala toilet seat par basavun try kel hot pan kahi fayda nahi zala.thanks for advice.prajacta,anupama.maza mulag sarv kahi bolato
|
>>>>maza mulag sarv kahi bolato सत्यवदे वचनाला म्हणतो का हो take it easy
|
Saket
| |
| Friday, April 11, 2008 - 12:35 am: |
| 
|
मला माझ्या ८ महिन्याच्या मुलीला टॉयलेट ट्रेन करायचे आहे. ती सध्या रांगते व धरुन उभी राहते. घर भाड्याचे आहे व घरात सगळीकडे कारपेट असल्यामुळे तीला डायपर फ्री ठेवता येत नाही. तर काही हेल्पफुल टीप्स असतील तर सांगता येतील का? २ वगैरे वर्षापुर्वी या विषयावर छान चर्चा झाल्याचे आठवतेय पण ती सापडत नाहीया.
|
Saket
| |
| Monday, April 14, 2008 - 5:50 pm: |
| 
|
No suggestions .. .. 
|
Arch
| |
| Monday, April 14, 2008 - 6:16 pm: |
| 
|
साकेत, मी अस केलं माझ्या मुलांना train . दोघही एक वर्षाच्या आत train झाली होती. मुलगी झोपून उठली की लगेच तीला सू करायला न्यायच. दर दोन तासांनी डायपर काढून सू करायला न्यायच. अस केल्याने मुलांना कोरड्या डायपरमध्ये रहायची सवय होते. आणि त्यांना ओल्या डायपरमध्ये रहायला अजिबात आवडत नाही. एवढी train झाली की cotton training pants वापरायला लागायच.
|