|
Soni_kudi
| |
| Thursday, April 10, 2008 - 11:32 am: |
| 
|
इथे सर्वजण मोकळेपणाने लिहिताना दिसले म्हणुन मला धीर आला. माझी कन्या ४ वर्षे पुर्ण आहे. एकुलती एक. ती घरि खुप दंगा करते, खेळते वगैरे..पण शाळेत वर्षभर ती अजिबात बोलत नव्हती...तीच्या इतर गोष्टी जसे चित्रकला,कविता चांगले अस्लेने टीचर पण खुश असायच्या.परंतु मुलगी बोलत नाही हे सारखे ऐकावे लागले. घरी वातावरण पण शांत आहे. अगदि क्वचित माझी आणि नवर्यची भांडणे होतात. सुरुवातीला मी खुप काळजी करायची जेव्हा नुकती शाळा सुरु झाली होती..म्हण्जे साधारण जुने २००७ मध्ये, मग हळुहळु तिनेहि शाळेत तसेच कसे निभावले तीलाच माहीत..आत शाळा संपुन सुट्टी सुरु झाली..टीचर जाता जाता म्हणल्या.. निदान पुढच्या वर्षी तरी हिने बोलायला हवे. इथे आजुबाजुला सर्व तेलुगु मंडळी आहेत.त्यामुळे तिचे मन त्या मुलांमध्ये रमत नाही.तरिही तिला पाठवले तर ती न खेळता नुसती बसुन रहाते.तिच्या डोक्यात काय चालले आहे कळत नाही. माझा नवरा रोज नवे उपाय काढतो.पण काही उपयोग नाही.आम्ही दोघेही कमी बोलणार्यापैकीच आहोत.पण सार्वजनिक ठिकाणी न बोलुन कसे चालेल ? तिचे निरिक्षण खुप छान आहे. सहज सर्व लक्षात ठेवते. हुशार पण आहे. तुम्ही कोणी काही सुचवु शकता का?
|
Sameer_dk
| |
| Thursday, April 10, 2008 - 2:31 pm: |
| 
|
soni_kudi माझ्या मुलाबरोबर पण हिच समस्या होति त्या वेळेस मि जेथे राहत होतो तिथे जरि बरिच मुले होति तरि तो त्यांच्या मधे खेळत नसे,या तर ते ह्याला खेळवत नसावेत पण हा फ़क्त बसुनच असायचा शाळेत पण अभ्यासात सगळे व्यवस्थित करत होता पण शाळेत हिच तक्रार कि तो स्वता: कडुन काहिच करत नाहि फ़क्त विचारलेल्या ला उत्तर देणार, पण त्याच वेळेस मि घर बदलले ति कोलोनि नविनच असल्याने सगळेच जण नविन होते,त्या मुळे मुलान्च्या पण नविनच ओळखि होत होत्या,सगळेच मिळुन मिसळुन खेळायचे. त्या नंतर मुलामधे एकदम फ़रक पडला,आता प्रत्येक पालक शिक्षक भेटित त्याचि सतत बाजुच्या मुलांबरोबर बोलत असतो अशि तक्रार असते. ह्या वरुन मला असे जाणवले कि पहिलेच्या जागि तो त्या मुलांमधे मिसळत नसल्याने त्याच्यात एवढा आत्मविश्वास नसावा कि मि काहि बोललो तर कोणि त्या गोष्टि कडे लक्ष देइल का? आणि एक फ़रक नक्किच आहे कि आजुबाजुचे वातावरण,लोक,त्यान्चि बोलिभाषा ह्याचा खुप फ़रक पड्तो. आता तुम्हि पहा कि मला आलेल्या अनुभवाचा तुम्हाला काहि फ़ायदा होतो का?
|
Mansmi18
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:45 pm: |
| 
|
सोनी कुडी, लहान मुले खुप अनुकरणशील असतात. साधारणपणे ते जसे ऐकतात तसे बोलतात. माझी बायको माझ्या मुलीशी बोलत असते त्यामुळे माझी मुलगी बरेच बोलते. घरात मराठी टीवी सुरु असतो तेही ती पाहातेऐकते त्यानेही तिच्यात बराच फ़रक पडला. ती आता ३ वर्शाची होइल. तीची आजी "ओव्या" वगैरे म्हणते त्या तीने ऐकता ऐकता पाठ केल्या. even तीने टीवी वर लागलेले "अवचिता परिमळू"सहज पाठ केले. "कळत नकळत" चे title song ती तीच्या बोबड्या भाषेत म्हणते. तुम्ही तिच्याशी बोलत रहा. तिच्या कानावर बोलणे पडत राहु दे. अगदी शांतता घरी असेल तर तीही शांतच राहील. (शक्यतो तिच्या समोर वाद करु नका.) मला वाटते तुम्हाला लवकर फ़रक दिसेल.
|
Soni_kudi
| |
| Thursday, April 10, 2008 - 9:13 pm: |
| 
|
समीर तुमचे म्हणणे पटले.. पण माझे यजमान केमिकल इंजिनीयर असलेने आम्ही एवढ्यात तरी हैद्राबाद सोडु शकत नाही.... mansmi, सुचना छान आहे. अमलात आणायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.
|
शहर या घर बद्लणे हा जरि एक उपाय असला तरि तो नेहमिच शक्य नाहि. मला हे सांगायचे आहे कि तुम्हि सगळे जण घरात मराठि बोलत असाल,बाहेर चे तेलगु बोलत असणार त्यामुळे तिला त्या मुलांमधे मिसळण्यात बराच त्रास होत असेल तर जवळ पास बरोबरिचे कोणि मराठि मुल असतिल तर त्यांच्या बरोबर खेळायला पाठ्वा भाषेचा अड्सर दुर झाल्यावर ति त्यांच्या बरोबर खेळु लागेल. काहि काम असे तिच्या कडुन करवुन घेत जा जेच्यानि तिच्या मधे आत्मविश्वास वाढेल. हळुहळु ति घरातला आणि बाहेरचा फ़रक समजु लागेल आणि सर्व काहि सुरळित होइल. मि पण महाराष्ट्रा बाहेरच राहतो त्या मुळे हि समस्या मि पण अनुभवलेलि आहे.
|
Dakshina
| |
| Tuesday, April 15, 2008 - 7:28 am: |
| 
|
सोणी कुडी, हा बा.फ़. मी आज पाहीला... तुम्ही जर पूण्यात असतात तर माझ्याच एका मैत्रिणीचं नाव तुम्हाला सुचवलं असतं. ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आहे. पियर ग्रूप मधे मिक्स होण्यासाठी भाषा जर अनोळखी असेल तर मोठ्ठा अडसर होतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही आणि तुमचा नवरा दोघं ही कमी बोलता.... मला वाटतं की जर तुम्ही दोघांनी आधी घरात बोलणं वाढवलं आणि त्यात तिला ही सामिल करून घेतलं तर थोडा फ़ायदा होऊ शकेल. तिच्या वयासाठी साजेशी पुस्तक मिळतात, ति तिला देऊन, तिला तुम्हाला गोष्टं सांगायला लावा, एखादी बालगीताची सी डी आणून तिला गाणी पाठ करायला लावा... त्यातल्या सोप्प्या शब्दांचे अर्थ सांगा, दुसर्या दिवशी तेच अर्थ तिला विचारा... शिवाय, तिला कोरे कागद, रंग आणून द्या, आणि चित्रं ही काढायला सांगा, तिचे चित्रं पूर्ण झाले की तिने काय काढलेय, म्हणजे आपल्याला काय दिसते, आणि तिला काय दाखवायचे आहे, याबद्दल चर्चा करा. कधी कधी मुलं मनात दडपलेल्या गोष्टी चित्रातून व्यक्त करतात. मला तरी काही हा मेजर प्रॉब्लेम वाटत नाही. मी पण लहानपणी भयानक शांत होते, आता बाबा म्हणतात, ते सगळं आत्ता भरून काढतेय. असो, तुम्हाला जर फ़ार काळजी वाटली तर एखाद्या चाईल्ड सायकॉलॉजिस्ट (कौन्सिलर) ला दाखवा.... All The Very Best. 
|
दक्षिणेच्या म्हण्ण्याला अनुमोदन, मला अजुन असं वटत कि जर तुमचे कोणी मरठि मित्र- मैत्रिणी तिकडे राहत असतिल तर वीकेंड ला त्यांच्याकडे जात जा. त्यान्च्यापैकी कोणाला मुलं असतिल तर त्यांच्याबरोबर ति मिसळु शकेल. तुम्हि जास्त बोलत नहि, पन तुम्च्याच मित्र मैत्रिणिन्ना मुलांचि जर आवड असेल आणि कोणाशि वेवलेंथ जुळली तर प्रोब्लेम सोल्व्ह होउ शकेल. माझ्या मते तरि ह्या साठि डोक्टर कडे जण्याचि गरज नाहि. एक सल्ला म्हणुन तुम्हि घेउ शकता. पण हे माणसाच्या स्वभावावर अवलंबुन आहे. आणि तुम्हिही थोडा वेळ काढुन तिच्याबरोबर बोलणं जरुरीच आहे.
|
मी हिमाचल प्रदेश मध्ये असताना माझ्या दुसर्या मुलीचा जन्म झाला. मलाही हाच problem होता. २ वर्षांपर्यंत ती बोलत नसे. कारण घरात मराठी व कानडी बाहेर हिन्दी व पन्जाबी.शेवटी मी व माझ्या पत्नीने हिन्दीतच बोलावयास सुरुवात केली व ४ ५ दिवसात ती बोलकी झाली.सोनी कुडी च्या बाबतीत ही समस्या आणखी थोडी अवघड आहे कारण बाहेर तेलुगू आहे.इतर सभासदांनी सुचविलेल्या प्रमाणे उपाय नक्किच लागू पडतील. all the best
|
Dhanu66
| |
| Wednesday, April 23, 2008 - 5:29 am: |
| 
|
माझी समस्या ही काहीशी अशीच आहे. माझा मुलगा ४ वर्षाचा आहे. ज्युनीयर मध्ये जातो. आधी तो मजेत शाळेत जायचा. पण गेले काही महीने म्हणजे साधारण जानेवारी नंतर तो शाळेत जायला कटकट करायला लागला. आम्ही दोघेही नोकरी करतो म्हणून त्याला शाळेत सोडायला, आणायला आमच्याच बिल्डींग मध्ये राहाणार्या एक आजी जात असत, कधी कधी त्यांचा मुलगा. माझ्या मुलाला हे दोघेही खुप आवडतात. पण तरीही तो खुप रडत असे. त्याच्या वर्गातला एक मुलगा खुप त्रास देतो असे तो म्हणे. मग टीचर ला सांगीतले. त्या मुलाचा त्रास सगळ्याच मुलांना होत असे. टीचर नी तो असे करणार नाही अशी हमी दिली. मी माझ्या ऑफ़ीस ची वेळ बदलून घेतली. त्याला शाळेत सोडुन मी पुढे जात असे. तरीही तेच. भयंकर रडारड. मग शाळेचा वॉचमन उचलून नेणार वगैरे. ह्या बद्दल आम्ही त्याच्या टीचर शी, त्याच्या के.जी.इनचार्ज शी बोललो. शाळेतली त्याची प्रगती खुप छान आहे. एरवी ही तो मजेत असतो. प्ण शाळेत जायच म्हणजे.... आम्ही चाईल्ड सायकॉलॉजीस्ट चा ही सल्ला घेतला. त्यानी काही उपयूग होतोय हे जाणवत असतांना सुट्टी लागली. आता पुढच्या वर्षी काय होणार देव जाणे! प्लीज काही सुचवा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|