|
Zakki
| |
| Saturday, March 29, 2008 - 5:34 pm: |
| 
|
अहो, त्या इस्ट इंडिया कंपनीचे पुढे काय झाले हो? माझ्या माहितीप्रमाणे १८५७ साली ती कं. बरखास्त करून, सर्व भारत हा व्हिक्टोरिया राणीच्या अधिपत्याखाली आला! ती तरवार काय इस्ट इंडिया कं त होती नि पुढे इंग्लंडला नेली असे काही आहे का? मला कळले नाही की इस्ट इंडिया कं चा नि महाराजांच्या तलवारीचा काय संबंध आहे? कुणि स्पष्ट करून सांगणार का? धन्यवाद. नि त्या तरवारीपेक्षा लक्षपटीने जास्त संपत्ति त्या ब्रिटिशांनी चक्क लुटली. हरामखोरांनी ताजमहाल इ. वस्तूंमधून चाकूने कोरून कोरून अस्सल हिरे माणके नि किंमती रत्ने पळवली! आता नुसत्या काचा आहेत तिथे! ते सगळे पैसे परत आणायला दोन पिढ्या पुरणार नाहीत!
|
Chyayla
| |
| Sunday, March 30, 2008 - 12:49 am: |
| 
|
तान्या तुम्ही कोणाचे समर्थन करता आहात तुमच्या पोस्ट वरुन वाटत की टोणग्याच्या धाडसी विधानात अर्थ आहे, तुम्ही ईतराना म्हणताहात की खालच्या पातळीवर विधाने करताहात पण ते पुर्ण एकतर्फी वाटत. ते एक भाकड कथा सांगणारे शाहीर आहेत मला सांगा हे विधान या माणसाची कोणती पातळी दाखवते, बाबासाहेब पुरंदरे ज्यांच्याबद्दल अख्या महाराष्ट्राला माहित आहे कुणी ऐर्या गैर्याने येउन काहीही बरळले तर यानी त्याना काही हानी तर होणार नाहीच उलट ती थुंकी यांच्याच तोंडावर पडेल, बाबासाहेबांचे कर्तुत्व पहाता अश्या माणसाच नाव घ्यायची तरी पात्रता आहे का यांची? बाकी ईतर ठीकाणीही केवळ ओकार्या काढणे, कुजके टोमणे मारणे यात जर तुम्हाला त्यांचा अभ्यास आणी वाचन दिसतय म्हणता तर माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार असो. उपास व चिन्याचे पोस्ट आवडले त्यात त्यान्नी एक ईतिहासकार व शाहिर यांच्यातला फ़रक व शैलीची व्यवस्थित उकल करुन दाखवली आहे.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 7:07 am: |
| 
|
टोण्ग्याच्या बैलाला+++++++ >>>>> बाबासाहेबांचे समर्थन करण्यासाठी अशा समर्थकांची आणि भाषेची गरज पडत्येय यातच सगळे आले....
|
च्यायला, टोणगा ह्यांचे समर्थन मी काही राजकीय भावनेतुन वगैरे केले नाहिये. मी त्यांना व्यक्तिश्: ओळखत नाही.. त्यांनी एक विधान केले, त्याच्याच खाली त्यांनी बाळासाहेब ठाकर्यांचे भाषन वगैरे रेफरन्स दिला. टोणगा हे इतर अनेक बा.फ. वर (उदा: शब्दार्थ) अनेकवेळा माहितीपुर्ण पोस्ट्स लिहितात. """"""""""""""मला सांगा हे विधान या माणसाची कोणती पातळी दाखवते, बाबासाहेब पुरंदरे ज्यांच्याबद्दल अख्या महाराष्ट्राला माहित आहे कुणी ऐर्या गैर्याने येउन काहीही बरळले तर यानी त्याना काही हानी तर होणार नाहीच उलट ती थुंकी यांच्याच तोंडावर पडेल, बाबासाहेबांचे कर्तुत्व पहाता अश्या माणसाच नाव घ्यायची तरी पात्रता आहे का यांची? """"""""""""""""""' थुंकी त्यांच्याच तोंडावर उडाली ना? मग तुम्ही का एव्हडा त्रागा करताय? मुळात एखाध्या व्यक्तिबद्दल जर प्रचंड अभिमान (अथवा दुराभिमान) असेल तर त्याच्या विरुद्ध दुसर्या कुणी बोलायचेच नाही का? बर टोणगा एकटेच कुचके बोलत नाहीत, झक्की पण बोलतात, मी बोलतो.. मायबोलीवरील असंख्य मंडळी कुजकं बोलतात.. माझा मूळ आक्षेप होता तो 'संभाजी ब्रिगेड' च्या उल्लेखाला.. आणि त्यातल्यादेखील ह्या वाक्याला.. """कायस्थ आणि ब्राम्हण यांनी छत्रपतींच्या कार्यकालावर केलेले कुठलेही विधान आणि भाष्य तुम्ही संकुचित विचारसरणीनुसार चुकिचेच ठरवणार."""" एखाद्या माणसाने काही विधान केले की थेट त्याला मोडीतच काढायचे.. आपली विचारसरणी लादायची.. आणि मुख्य म्हणजे जात काढायची.. मला २००८ साली स्वतच्या जातीबद्दल अभिमान बाळगणे (कुठलीही जात असो) ह्यापेक्षा हीन गोष्ट कुठलीही वाटत नाही.. समीर (च्यायला), संघाच्या विचारसरणीच्या विरुद्ध बोलणारा प्रत्येक मनुष्य भंपक नसतो, तो कमी देशभक्त नसतो, आणि कमी हिंदु नसतो.. उलट अश्या लोकांच्या मताचा, त्यांच्या बरोबरच्या चर्चेचा कामामध्ये अत्यंत उपयोग होतो, सुधारणेला वाव मिळतो.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 11:49 am: |
| 
|
जाऊ द्या हो बेडेकर. आता संभाजी ब्रिगेडचा अन माझा काय संबंध? पण याना आठवला. हे उत्तमच झाले. खरं तर संभाजी ब्रिगेडची कार्यपद्धती वेडपटपणाचीच असते पण त्यानी भांडारकर इन्स्टीट्यूट बाबत जे केले ते उत्तमच होते असे तिथले प्रकार पाहून म्हणावेसे वाटते. नव्हे त्यापेक्षा अधिक करायला पाहिजे होते.तो विषय कोणाला वाढवायचा असेल तर हरकत नाही.त्यांचेच हसे होईल त्यात. शिवभक्तीह्या गप्पा मारणारांनी महाराजाना राज्याभिषेकासाठी गागाभटाला का आणावे लागले तेही लक्षात घ्यावे. महाराजांची दौलत बुडवून युनिअन जॅक शनिवारवाड्यावर कोणाच्या 'शुभहस्ते' वर गेला ते ही एकदा सांगा.जेम्स लेन प्रकरणात कोल्हापुरचे इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार ह्या प्रकरणा आधी पुण्यात येऊन कोण कोणाला भेटले अन त्यानी त्याना काय विनन्ती केली माहीत आहे का? मग पुण्यातल्या ढुढ्ढाचार्यानी कशी नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली. लेनबाबाचे लिखाण चित्रलेखेत प्रसिद्ध झाले तरी सम्भाजीब्रिगेड वगळता इथल्या अन तिथल्या शिवभक्तांचे रक्त का बरे freezing point च्या खाली गेले होते. कारण त्याना हवे तेच प्रसिद्ध झाले होते ना. अन सम्भाजी ब्रिगेडच्या हैदोसानन्तर कोण कोण नरपुंगव पुणे सोडून महिना महिना गायब झाले होते अथवा घराबाहेर पडत नव्हते आणि सम्भाजी ब्रिगेडच्याही आधी लेनचे लिखाण कोणा कोणाला माहीत होत्ये त्याची यादी मिळण्यासठी सम्भाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे पत्ते देऊ का? बेडेकर इथे फक्त सोइस्करच सांगितले जाते कारण इथे अभ्यास करायचा नसून प्रचार करायचा आहे . गुरु दादोजी कोंडदेव यांचे महाराजांच्या जिवनातील अस्तित्व देखिल नाकारणार्या >>>> दादोजी कोन्डदेवांचे महाराजांच्या जीवनातील आस्तित्व म्हणजे तुम्ही जेम्स लेनला मार्गदर्शन करून जे त्याच्या कडून वदवून घेतले तेच काय? ते तर आम्ही कोट्यवधी वेळा नाकारू. असो, मूळ विषय इस्ट इन्डिया कम्पनी आहे आणि फार एन्ड ला टाटानी घेतलेल्या कम्पनीशी त्याचा संबंध जोडायचा आहे अन झक्की साहेबाना त्या जुन्या इ.इं.कंचे का झाले हा पडलेला प्रश्न, हा आहे, पण माणूसने या तरवारीचे काहीतरी काढले अन विषय फाफलला अन नेहमीचे प्रचारक निमित्त शोधत इथे आले....
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 1:49 pm: |
| 
|
बर टोणगा एकटेच कुचके बोलत नाहीत, झक्की पण बोलतात, . खरे आहे. नुसतेच कुजकं नाही तर, आक्षेपार्ह, अपमानकारक, अतिरेकी,उपहासात्मक पण. भावनामय होऊन असे काय वाट्टेल ते लिहीतो! काय करणार? अजिबात दुसरा उद्योग नाही मला! सांभाळून घ्या नि वैयक्तिक घेऊ नका. तुम्ही इतर ठिकाणी लिहिल्याप्रमाणे 'अपरोक्ष मोड' मधे लिहीतो. मी खोटे बोललो तर ते खोटे आहे हे दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा समजते, तर तुमच्यासारख्यांना लगेच कळेलच. म्हणून आपले खरेच बोलावे असे ठरवले आहे! तुमच्या लिखाणाला उद्देशून आहे, तुम्हाला वैयक्तिक पणे लिहीले नाही. जसे एखाद्या निबंधावर प्रतिकूल प्रतिक्रिया झाली, तरी तुमचे सर्व लिखाण, किंवा तुम्ही स्वत: एकदम कंडम ठरत नाही, असे मी तरी समजतो. तर तरवारीचा विषय निघाला आहे, आज वाचले की जहांगीर की शहाजहानची कट्यार पण विकण्यात येणार आहे. त्या कट्यारीला नक्कीच मौल्यवान रत्ने बसवलेली असणार. ती काढून नाही घेतली का ब्रिटिशांनी? त्याबद्दल काय प्रतिक्रिया?
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 1:55 pm: |
| 
|
बर टोणगा एकटेच कुचके बोलत नाहीत, झक्की पण बोलतात, >>>> कुचके नव्हे मूळ शब्द कुजके आहे. बोली भाषेत ते कुचके झाले आहे झक्की कुजके बोलत असले तरी ते मराठीत कुजके बोलतात हे मात्र स्वागतार्ह आहे
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 2:03 pm: |
| 
|
भाषा 'जपायची' तर भाषेतले सगळे शब्द जपले पाहिजेत. त्यांचे अर्थ, त्यामागील भावार्थ, हे सगळे लिहून ठेवावे. काही वर्षांनी मूळ वाद बाजूला राहील, पण अभ्यासूंना शब्द सापडतील.
|
चला याचा अर्थ माझा अंदाज खरा ठरला तर! महाराजांच्या कारकीर्दीत त्यांच्याच आप्तस्वकियांनी पाठीत खंजीर खुपसल्याची उदाहरणे शेकडोने मिळतील.पण ते लक्षात घेतो कोण कारण "गिरे भी तो टांग उपर" असो मी आपला उगाच एक अंदाज बांधुन खडा टाकला.पण तो सत्य असेल अशी अपेक्षा नव्हती.उगीच नसत्या गोष्टींचा खल करायचा आणि पुन्हा शिवप्रेमी असल्याचा आव देखिल आणायचा. जातीच्या कुबड्या घेवुनच सगळे मिळवायचे आणि वर तोंड करुन आम्ही त्या गावचेच नाही असा आव देखिल आणायचा.
|
Chinoox
| |
| Sunday, March 30, 2008 - 4:45 pm: |
| 
|
पण त्यानी भांडारकर इन्स्टीट्यूट बाबत जे केले ते उत्तमच होते असे तिथले प्रकार पाहून म्हणावेसे वाटते. नव्हे त्यापेक्षा अधिक करायला पाहिजे होते.>>>> पुस्तके फाडण, ग्रन्थालयाची नासधूस करण, म्हणजेच जर आपल्याला शिवभक्ती वाटत असेल, तर मग काही खर नाही...विचारान्चा विरोध हा विचारान्नीच व्हायला हवा..पुस्तक फाडण हे केवळ असन्स्क्रुतपणाचे नव्हे तर नीचपणाचे लक्शण आहे.. शिवाजी महाराज केवळ एका समुदायाचे आदरस्थान नाहीत.ऽआणि महाराजान्च्या नावाचा वापर करून समाजात दुही निर्माण करणे, यासारखा दुसरा मुर्खपणा नाही..
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 5:37 pm: |
| 
|
...विचारान्चा विरोध हा विचारान्नीच व्हायला हवा..>>>>>कुठला विचार हे माहीत आहे का बाळ तुला? भांडारकर वाल्यानी शिवाजीबद्दल लेनला काय सांगीतले अन त्याने काय छापले माहीत आहे का बाळ? त्याला जर विचार म्हणत असशील तर तुझे डोके तपासून घ्यावे लागेल... जयमहाराश्ट्र यानी माझ्या पोस्टधील मुद्द्यांचा परामर्श घेतल नाही? गैरसोयीचे आहे काय? फक्त खडा टाकला अन अंदाज बरोबर निघाला यातच आनन्द काय? ठीक आहे तुमच्या अन्दाजानुसार मी सम्भाजी ब्रिगेडचा आहे असे वादाकरता मानले, द्या आता मुद्द्याना उत्तरे...
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 5:51 pm: |
| 
|
हरामखोरांनी ताजमहाल इ. वस्तूंमधून चाकूने कोरून कोरून अस्सल हिरे माणके नि किंमती रत्ने पळवली! आता नुसत्या काचा आहेत तिथे! ते सगळे पैसे परत आणायला दोन पिढ्या पुरणार नाहीत! >>>झक्कीसाहेब, ताजमहाल लुटला तर खरे म्हणजे तुम्हाला आनन्द व्हायला पाहिजे... कसा काट्याने काटा निघाला म्हणून. कशाला आणायचे पैसे परत. तुमच्या आवडत्या सिद्धान्ताप्रमाणे इथले राजकारणी खाऊन टाकतील ना सगळे पैसे तुमच्या तपशीलात थोडी दुरुस्ती पाहिजे.ब्रिटीशानी फक्त मोगलाना जिंकायचे बाकी राहिले होते. १८५७ चे शिपायांचे बन्ड्/ स्वातंत्र्ययुद्धजिहाद जे काय असेल ते फसल्यानन्तर सगळाच भारत ब्रिटीशांच्या ताब्यात आला मग पुढच्याच वर्षी म्हणजे १८५८ मध्ये E.I.Co. विसर्जीत झाली. भवानी तलवार कसे गेली ते इथले 'इतिहासकार' तुम्हाला सांगतीलच
|
Deshi
| |
| Sunday, March 30, 2008 - 6:37 pm: |
| 
|
टोणगा कुठल्या मोगलांना जिकांयचे राहीले होते? ज्याचे राज्य दिल्लीच्या फक्त अर्ध्या भागावर चालत होते त्यांना तुम्ही मोगल म्हणणार का? की ज्यांचा लाल किल्यावरुन दृष्टीक्षेप टाकल्यावर जो १० मैलाचा टापु येत होता त्याला मोगल साम्राज्य म्हणनार? बंगालचा नबाव पडल्यावरच दिल्लीचे साम्राज्य नष्ट झाले होते. बाकी आपणही ओकार्या काढतच आहात मग दुसर्यांना का दोष दिला आधी. जयमहाराष्ट्र, मराठेसाही पडायला जितके मराठे कारणीभुत होते तेवढेच ब्राम्हणही होते उगीच आरोप प्रत्यारोप करुन काय फायदा.
|
Chinoox
| |
| Sunday, March 30, 2008 - 8:21 pm: |
| 
|
टोणग्या, एक नम्र सुचना..जरा वर्तमानपत्रे नीट वाचा..कुठल्या भान्डारकरवाल्याने लेनला काय सान्गितले , हे जाणून घ्यायला मला आवडेल..लेनच्या पुस्तकात केवळ भान्डारकरचा ऋणनिर्देश आहे..तसाच तो इतर अनेकान्चा आहे..त्या पुस्तकात जे लिहिले आहे, ते कोणत्याही मराठी माणसाच्या मनातदेखील येण्याचे सम्भवत नाही... भान्डारकर इन्सटीट्यूटवरील हल्ल्यात असन्ख्य पुरातन ग्रन्थ व हस्तलिखितान्ची हानी झाली.. अनेक सन्शोधकान्चे, विद्यार्थ्यान्चे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.. मीही एक शास्त्रज्ञ आहे..पुस्तकान्वर जीवापाड प्रेम आहे..कोणत्याही सुसन्स्कृत समाजात अशा दन्डेलशाहीला स्थान असू नये.. आपल्यासारख्यान्ना गेट वेल सून, एवढेच म्हणू शकतो..
|
मुद्दा अगदी मान्य देशी मी कुठेही असे म्हंटले नाही कि महाराजांना विरोध करणार्यांमधे फ़क्त मराठेच होते. इतर सगळ्यांनी ( या मधे अगदी ब्राम्हण कायस्थ व इतर सगळेच आले)देखिल महाराजांच्या स्वराज्य बांधणीच्या काळात विरोध करण्याचे दुष्टकर्म केले होतेच की! आणि हे देखिल सत्यच आहे. लेनला मदत केली म्हणुन भांडारकर ग्रंथालयाची जाळपोळ करुन तेथिल अमुल्य अशी ग्रंथसंपदा नष्ट करण्यात धन्यता मानणार्यांना काय म्हणावे? लेन तर निदान परका होता पण आपल्याच देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी छत्रपतींबद्दल जे अनुद्गार काढले त्याचे काय?लेन ने लिखाण केले तेंव्हा नेहरूंच्याच कॉंग्रेस पक्षाचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते आणि आता सुद्धा आहेच. जेम्स लेन याने त्याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत जो उल्लेख केला तो ब्राम्हणांनीच मुद्दामच करवून घेतला आणि त्यायोगे आपली वर्णवर्चस्ववादी मनोवृत्ति प्रकट केली अस गृहीत धरुनच भांडारकर संस्थेवर संभाजि ब्रिगेडने हल्ला केला होता. त्या लेनने अश्या प्रकारचे लेखन करुन आपल्या वैचारीक दिवाळखोरीचे प्रदर्शन मांडले. आणि खरे पाहता लेनसारख्या नतद्रष्टांना आपण खिजगणतित देखिल धरायला नको.पण त्याच्या विरुद्ध राळ उठवुन आणि त्यांने महाराजांच्या जन्माबाबत केलेल्या लिखाणाच्या प्रती छापुन संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रभर वाटल्या.त्या लेनचे पुस्तक कोणता सर्वसामान्य मराठी माणूस विकत घेऊन वाचणार होता? पण यांनी त्याच्या लिखाणाला आयती प्रसिद्धी दिली आणि नकळत का होईना स्वहस्ते महाराजांची बदनामी केली. दादोजींना कुणी महाराजांचे गुरु मानोत अथवा न मानोत हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी महाराजांना योग्य मार्गदर्शन करुन व महाराजांचा सर्वंकश विकास घडवून आणण्यात दादोजिंचा फ़ार मोठा वाटा होताच हे त्रिवार सत्य आहे. आणि ते कुणी कितीही नाकारल तरी बदलणार नाही. प्रौढ प्रताप पुरंदर, शिसोदिया वंशज ! सुर्यकुलोत्पन्न क्षत्रिय कुलावतंस! सिंहासनाधिश्वर धिराज ! गोब्राह्मण महाराजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 9:28 pm: |
| 
|
कशाला आणायचे पैसे परत. ते भारतीयांचे पैसे होते. ते भारतात 'आपल्या' राजकारण्यांना मिळतील. ते त्यांच्या भारतीय मित्र, नातेवाईक यांना देतील. ते 'आपल्या' देशात गुंतवतील. मग 'आपल्या' देशाचे भले होईल. सध्या इंग्लंडच्या राजकारण्यांना मिळतात, ते भारताला देत नाहीत पैसे. म्हणून ते पैसे भारतात परत आले पाहिजेत.
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 9:42 pm: |
| 
|
टोणगा, लेनला का नाही मारले? आपल्याच देशाची नासधूस? छान, छान. उद्या कुणि लिहा की 'टोणगा' यांनी मला 'असे असे' सांगितले. नि ते छापले की हे स्वत:चे घरच जाळून घेतील, स्वत:लाच ठार मारून घेतील!! चौकश्या न करता! धन्य मुद्दा आहे 'टोणगा' तुमचा!! अहो पुस्तके नि ग्रंथ हे निर्जीव आहेत. खरा दोष चालत्या बोलत्या नि 'अक्कल असलेल्या' माणसांचा आहे. त्यांना धरा, नि जनतेच्या कोर्टात त्यांची चौकशी करा!! अहो, भारतातल्या कुणीहि त्यांचे म्हणणे खरे मानले नाही, इतकी वर्षे! आता त्या लेनने काही लिहीले तर आपल्याच देशाचे नुकसान का करता? मुसलमानांना अक्कल असती तर त्यांनी केंव्हाच असा लेख लिहीला असता आपल्या संसद भवनातल्या कागदपत्रांचा खोटा आधार घेऊन. की मग 'टोणगा' यांच्या सारख्यांनी संसदच जाळून टाकली असती!! काम फत्ते! आता काय म्हणायचे? 'तत्वाचा प्रश्न' कुठल्या शहरातल्या लोकांना असतो बरे? त्या शहरातले दिसताहेत हे 'टोणगा'. केवळ वादासाठी वाद!! घाला घाला. वाद घाला! करमणूक होते आहे.
|
भांडारकर इन्स्टीट्यूट बाबत जे केले ते उत्तमच होते असे तिथले प्रकार पाहून म्हणावेसे वाटते. नव्हे त्यापेक्षा अधिक करायला पाहिजे होते>>>> महत्वाचे ग्रंथ जाळले म्हणजे चांगले झाले? वा वा. लगे रहो. अ रे रे. टोणगा काय हा अध:पात. तिबेटच्या बीबीवरचा हाच टोनगा? की दुसरा कोणी?
|
Tonaga
| |
| Monday, March 31, 2008 - 2:40 am: |
| 
|
मध्ययुगीन इतीहासाबाबत भांडरकर आणि संस्थेचे काम मोठे आणि मोलाचे आहे यात शंका नाही. पण शिवकालीन इतीहास संशोधनाचे ते केन्द्र आहे काय? मग लेन दोन महिने तिथे कसला अभ्यास करीत होता.?भांडारकर ईन्स्टीट्यूटच्या ग्रंथ सम्पदेचे नुकसान झाले आहे?कशावरून म्हणता?वृत्तपत्रावरील बातम्यावरून? स्वत्: संस्था काय म्हणते? एका संशोधकाने भांडारकर ईन्स्टिट्यूटला माहीतेच्या अधिकाराखाली मागीतलेल्या माहीतीत सदर संस्थेने काय लेखी उत्तर दिले आहे माहीत आहे का? ऐकायची तयारी आहे? पोलीस तपासात काय सिद्ध झाले माहीत आहे? हा विषय कारण नसताना उकरून काढलाच आहे तर होऊन जाऊ द्या....
|
Chinoox
| |
| Monday, March 31, 2008 - 2:54 am: |
| 
|
भान्डारकरवर हल्ला झाल्यानन्तर तिथे जाऊन पुस्तकान्ची लक्तर गोळा करणारा पहिला विद्यार्थी मी होतो..३ दिवस आम्ही ३०-४० जण तिथे काम करत होतो...जर पुस्तक फाडली नाहीत, तर काय तिथली ज़ळमट त्या अडाणी लोकान्नी स्वछ केली?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|