| | Farend 
 |  |  |  | Wednesday, March 26, 2008 - 7:20 pm: |       |  
 | 
 त्यांचे जॅग्वार व लॅन्ड रोव्हर यांच्या कंपनीने विकत घेतले. त्यांनी पूर्वी ज्या कंपनीच्या उभारणीकरता फंडिंग नाकारले त्या यांच्या कंपनीने त्यांचा सहभाग असलेली स्टील कंपनी विकत घेतली. ( Tata Steel - Corus )
 
 पूर्वी हे त्यांचा चहा विकत घ्यायचे आता चहा बनवणार्या कंपन्याच विकत घेतात (' Tata -Tetley ')
 
 त्यांनी लोकप्रिय केलेल्या खेळाची सर्व आर्थिक सूत्रे यांच्याकडे आहेत, त्यांच्या राणीच्या जीवनावर यांनी चित्रपट काढून तो ऑस्कर मधे आणला!
 
 ५०-६० वर्षांपूर्वी कोण कोणावर राज्य करत होते प्रश्न पडेल हे बघून! काही दिवसांनी ब्रिटिश इतिहासात इस्ट इंडिया कंपनी म्हणजे त्यांच्या कंपन्या विकत घेणारी भारतीय कंपनी असा अर्थ लावतील
   
 या विषयावर लोकांची मते वाचायला आवडतील.
 
 न्यूजवीक मधे पण अशाच अर्थाचा आलेला आहे हा लेख
 
 
 | 
| | Giriraj 
 |  |  |  | Thursday, March 27, 2008 - 4:27 am: |       |  
 | 
 त्याच आशयाचा हा एक लेख
 
 
 | 
| | Maanus 
 |  |  |  | Thursday, March 27, 2008 - 4:34 am: |       |  
 | 
 महराजांची तलवार भारतात परत कधी येणार.
 
 
 | 
| | Arc 
 |  |  |  | Thursday, March 27, 2008 - 5:33 am: |       |  
 | 
 सन्तु कुठे आहात तुम्ही? महाराजान्च्या (अनुस्वार कसा देतात?) तलवारीची माहीती तुम्हीच देउ शकता. आणा बर पटकन जाउन
  ~) 
 
 | 
| | Ashwini_k 
 |  |  |  | Thursday, March 27, 2008 - 5:57 am: |       |  
 | 
 संतु तलवारच आणायला गेले आहेत बहुतेक. काही म्हणा संतुंना माहिती बरीच असते,  फ़क्त त्यांचे कुठल्याही विषयावरचे भाष्य म्हणजे ठसका आणणारी फ़ोडणी असते (त्यांची खासियत).  कधीतरी घाबरून जायला होते, पण मजा येते.  ओ संतु, लवकर या!
 
 ब्रिटिश राजवट व पारतंत्र्यातील भारत याविषयावरून माझे कोणाशी वाद झाले तर मी शेवटी त्या व्यक्तीलाच "छोडो भारत" म्हणण्या इतकी वैतागते त्यामुळे मी फ़क्त इथे वाचणार.
 
 
 | 
| | Santu 
 |  |  |  | Thursday, March 27, 2008 - 1:40 pm: |       |  
 | 
 अरे दोन दिवस धुळवड मग रंगपंचमी त मग्न आहे.
 अरे आमच्या इथ मस्त भांग घोटुन देतात त्यामुळे
 इथ यायला जरा उशीर झाला.
 
 बाकि कस काय चाललाय
 तुम्हि कशि साजरि केलि धुळवड
 
 
 | 
| | Upas 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 2:24 am: |       |  
 | 
 गो नी दांच्या दुर्गभ्रमण गाथे मध्ये बाबासाहेब पुरंदर्यांनी लंडन मध्ये भवानी तलवार प्रत्यक्ष जाऊन पाहील्याचा उल्लेख आलाय, शाहू गादीवरच्या कोणीतरी ती इंग्रजांना भेट दिली म्हणे.. नक्की तलवार आहे का तिथे? असल्यास नक्की कुठे? पहायला मिळते?
 विषयांतराबद्दल क्षमस्व..
 
 
 | 
| | Santu 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 5:50 am: |       |  
 | 
 तुम्हि सगळे जी भवानि तलवार म्हणताय ति कुठलि.
 अशिच एक भवानी तल्वार जी तुळजा भवानी ने दिलि आहे ती
 सातार्याच्या जल्मन्दिरात आहे. दसर्याला छत्रपतिंच्या हस्ते त्याचे पुजन
 होते व लोकांना पहायला तिला जल्मन्दिर पॉलेस मधील भवानिच्या
 पुढे एक दिवस ठेवतात.
 सातारा छत्रपतिंच्या मते तिच खरि भवानि तल्वार आहे.
 
 
 | 
| छत्रपतींची खरी भवानी तलवार लंडन मधिल एका संग्रहलयातच आहे.
 बाबासाहेबांनी ती स्वत बघितली आहे. तसे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमधे नमुद केले आहे.
 
 
 | 
| | Tonaga 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 2:21 pm: |       |  
 | 
 तुम्हाला राग येईल पण बाबा साहेब विशवसनीय इतिहासकार नाहीत. ते एक भाकड कथा सांगणारे शाहीर आहेत....
 
 
 | 
| | Upas 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 3:26 pm: |       |  
 | 
 मला तरी बाबासाहेबांद्दल असं वाटत नाही. गो. नी. दांनी त्यांच्याविषयी जे लिहीलय आणि अर्थात राजा शिवछत्रपती वाचून सुद्धा.. रायगडावर बर्यच गोष्टी शोधल्या ह्या दोघांनी मिळून पण कोणत्याही निर्णयास येण्यापुर्वी बाबासाहेबांचा त्याविषयी सखोल अभ्यास असायचा/ असतो असं गो. नी. दांडेकरांनी बरेचदा म्हटलय.. त्यांच जीवन शिवमय आहे आणि शाहीरी बाणा असेल तर तो केवळ शिवप्रेमापोटीच असं मला तरी वाटतं..
 बरं, जयमहाराष्ट्र जरा महिती द्या ना कुठल्या संग्रहात आहे भवानी तलवार लंडनमध्ये..
 
 
 | 
| | Tonaga 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 4:56 pm: |       |  
 | 
 त्यांच्या शिवप्रेमाबद्दल आक्षेप नाहीच आहे.पन ते मुळात शाहीर आहेत. इतिहासकार नाहीत. त्यामुळे त्यांचे शब्द हा निर्विवाद पुरावा कसा ठरू शकतो. बाबासाहेबांच्या अनेक अनैतिहासिक विधानाने प्रमाणानेच बोलनार्या अस्सल इतिहासाच्या अभ्यासकाना किती वेदना होतात माहीत आहे का? खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे मंडईत केलेले भाषण मी एकदा ऐकले होते. त्यात त्यानी भवानी तलवार हे रूपक आहे असे म्हटले होते. भवानी ने दिली हे झूट आहे. तलवारी विकायला दरबारात आल्या होत्या त्यातली एक उत्कृष्ट तलवार जिजाबाईंना आवडली तेव्हा त्या म्हणाल्या ' शिवबा बघतोस काय घे ती तलवार अन कर भवानी मोहीमेची ' म्हणून ती भवानी तलवार...
 असे बाळासाहेबांचे प्रतिपादन होते..
 
 आत बाळासाहेब खरे की बाबा साहेब?
 कदाचित दोघेही चुकीचे (खोटे नव्हे)सांगत असतील. ती त्यांची त्यांची स्टाईल आहे.म्हणून ते खरे आहे असे नाही. दोन्हीही इतिहासाच्या अधिकारी व्यक्ती नाहीत.वीरश्री करता अथवा नायकाची उंची वाढविण्यासाठी असल्या कथा सोडल्या जातात.
 
 
 | 
| | Yog 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 6:35 pm: |       |  
 | 
 बर मग...?.. तलवार कधी आणताय?
  
 
 | 
| | Upas 
 |  |  |  | Friday, March 28, 2008 - 6:46 pm: |       |  
 | 
 हो पण बाबासाहेबांनी राजा शिवछत्रपती लिहिलय त्यामागे संशोधन आणि परिश्रम आहेत हे विसरून कसं चालेल.. निदान त्याततरी त्यांनी कपोलकल्पित किंवा उथळ लिहिल्याचे ऐकीवात नाही.. किंवा त्याबद्दल कोणी आक्षेप घेतल्याचे मला तरी माहित नाही.. म्हणून बाबसाहेबांवर विश्वास.. असा काही उल्लेख पुरावा आहे का जिथे बाबासाहेब खोटे पडले आहेत आणि तरीही त्यांनी ते अमान्य केले आहे?
 आणि भवानी तलवार बघायची आहे कारण ती महाराजांनी वापरलेय म्हणून, ती तुळजाभवानीने दिली किंवा कसे त्यापेक्षा महाराजांचा हस्तस्पर्श तिला झालाय म्हणून तिच्याविषयी आदर इतकच..
 
 
 | 
| श्री टोणगा!
 तुम्ही संभाजी ब्रीगेडचे सदस्य दिसताय?
 तुम्ही जितके छत्रपतींबद्दल वाचले देखिल नसेल तितकेच बाबासाहेब छत्रपतींचा इतिहास जगलेत.तेंव्हा काहीही विधान करताना विचार करुन बोला.कायस्थ आणि ब्राम्हण यांनी छत्रपतींच्या कार्यकालावर केलेले कुठलेही विधान आणि भाष्य तुम्ही संकुचित विचारसरणीनुसार चुकिचेच ठरवणार.पण शेवटी कोंबडे झाकुन ठेवले म्हणुन सुर्योदय व्हायचा रहात नाही हे लक्षात ठेवा.
 छत्रपतींना जितका विरोध त्यांचे स्वजातीय मराठे यांजकडुन झाला तितका इतर कुणाकडुनही झाला नसेल!जरा इतिहासाची पाने चाळुन बघा.
 आणि छत्रपती म्हणजे काय तुम्हाला मराठ्यांची खासगी मालमत्ता वाटले?शिवराय या महाराष्ट्राचे नव्हेत संपुर्ण देशाचे आहेत. महाराजांना एकट्या मराठ्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करणे अतिशय हास्यास्पद आहे.
 
 उपास!
 २००६ साली इटिव्ही मराठीवर राज़ ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने बासाहेबांची मुलाखत घेतली होती.तेंव्हा त्यांनी महाराजांच्या मुळ चित्राचा आणि भवानी तलवारीचा उल्लेख केलेला मला आठवतो आहे.
 जय हिंद!
 जय महाराष्ट्र!
 
 
 | 
| | Santu 
 |  |  |  | Saturday, March 29, 2008 - 8:24 am: |       |  
 | 
 टोणग्या
 काहि तरि बरळु नको बाबा साहेबानी
 काय अशी अविश्वसनिय विधाने केलि सांग बर.
 
 टोण्ग्याच्या बैलाला+++++++
 
 
 
 | 
| अहिरावण आणि महिरावण मैदानात उतरले- आता इतर देव दानव पळा!!!!!!!!!-
   
 
 | 
| टोणग्या उगीच काहीच्या काही विधाने करु नकोस (तु विजय कुलकर्णी तर नाही ना???). बाबासाहेब इतिहासकार आहेत आणि शाहिरही आहेत. इतिहासकार म्हणजे झोप येईलच अशी व्याख्यानं करणाराच असला पाहीजे असा नियम आहे का??ते इतिहासच सांगतात फ़क्त रंगवुन सांगतात. बाकी भवानी तलवार युरोपात बनली आहे असे बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिवचरित्रात उल्लेख आहे. मी ते चरित्र आत्ताआत्ताच ऐकलेय म्हणुन माहीत आहे. कुठली अनैतिहासिक विधाने त्यांनी केली आहेत???शिवाजी महाराजांबद्दल भरपुर माहीती आहे व अनेकदा एकच गोष्ट विविध लोकांनी विविध पध्दतीने लिहिलेली आहे त्यामुळे विविध इतिहासकारांमधे मतभेद आहेत.
 
 जय महाराष्ट्र,तुम्ही माझे रंगिबेरंगी पान वाचले का???
 
 
 | 
| मी इतिहासाचा विद्यार्थी नाही तसेच त्याचा अभ्यासक देखील नाही. परंतु टोणगा ह्यांच्या इतर पोस्ट वाचल्या असतील तर लक्षात येइल के ते नेहेमी त्यांच्या अनुभवातुन व अभ्यासातुन बनवलेली मते मांडतात.. त्याचे संदर्भ व स्पष्टिकरणही देतात.. कुणाला ते पटेल, कुणाला नाही.. परंतु असे सरसकट 'तुम्ही संभाजी ब्रिगेडवाले दिसताहात' वगैरे विधाने अतिशय खालच्या पातळीवरची आहेत.
 
 (अर्थात जयमहाराष्ट्र ह्या ब्राह्मणांच्या शाळेत शिकल्या असल्यामुळे असेलही कदाचित.. (संदर्भ्: त्यांचेच युपी-महाराष्ट्र बीबी वरील वाक्य))
 
 
 | 
| तनया किंवा तान्या!
 जे कोणी हा किंवा ही असेल त्या व्यक्तिला माझ्या ब्राम्हणांच्या शाळेत शिकण्याचा संदर्भ इथे देण्याची खरे तर काहिच गरज नव्हती.पण आम्ही पुरोगामी आहोत हे सिद्ध करायचे हा अट्टाहास दुसरे काय?
 संभाजी ब्रिगेड चे नाव घेण्याने इथे कुणाला मिरच्या झोंबल्या असतिल तर झोंबोत.पण जे सत्य आहे ते बदलता येणार नाही.
 बाबासाहेबांची खालच्या पातळीवरचे शब्द वापरुन संभावना करताना आपली पात्रता काय हे आधी लिहिणार्याने आणि त्याची रि ओढणार्याने पडताळुन पहावे.
 नेहरु आणि गांधी घराण्यांची तळी उचलुन धरणार्यांना खरेतर महाराजांचे नाव उच्चारण्याचा देखिल अधिकार नाही.
 मराठी इतिहासकार आणि शाहिर यांच्यावर विश्वास ठेवणे जड जाते पण बंगाली इतिहासकारांनी एकांगी लिहिलेला इतिहास वाचण्यात धन्यता मानणार्यांना छत्रपती किंवा बाबासाहेब कुठले कळायला?
 केवळ ब्राम्हणांबद्दल आकस म्हणुन समर्थ रामदास आणि गुरु दादोजी कोंडदेव यांचे महाराजांच्या जिवनातील अस्तित्व देखिल नाकारणार्या महाभागांकडुन चांगल्या विधानाची अपेक्षा तरी कोण करतय म्हणा?
 
 
 राहता राहिला भवानी तलवारीचा विषय! ती तलवार आई भवानीने खरेच दिली असेल अथवा नसेल पण राजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या त्याच तलवारीने महाराजांनी म्लेंच्छांचे आणि दुष्टांचे निर्दालन केले हे सत्य आहे आणि खर्या शिवप्रेमींसाठी एव्हढीच बाब पुरेशी आहे.
 ता.क
 आणि मी ब्राम्हणांच्या शाळेत शिकले याचा मला अतिशय अभिमान आहे. निदान त्यामुळे मी असल्या विचारहीन लोकांच्या कंपुमधे स्वतःला सामिल करुन घेण्यापासुन परावृत्त करु शकले.
 
 
 माझ्यामुळे विषयांतर झाले असल्यास क्षमस्व.
 जय हिंद!
 जय महाराष्ट!
 
 
 
 
 |