Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 25, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through March 25, 2008 « Previous Next »

Mandarp
Friday, March 14, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्दा,

अम्हाला बॉब बीमन आणि त्याच्या पराक्रमाबद्दल सांगणार का?
आजच रेडीफ़ वर त्याच्याबद्दल छोटा लेख आला आहे.

धन्यवाद
मंदार


Uday123
Monday, March 17, 2008 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद- आपण खुप छानच लिहत आहात्; तुमचे लेख मंत्रमुग्ध करतात. आता या विषयावर एक छानसे पुस्तक लिहाच, मला खात्री आहे की ते वाचुन असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, काही यशस्वी पण होतील, आणि भारताची ऑलिम्पिक मधील पदकांची उपासमार कायमची थांबेल. माझ्या सारख्या खेळाप्रती कमी(/अ)रसीक आणि आळशी माणसाला देखील तुमच्या वरील गोष्टी/ लेख वाचुन धावावे असे वाटते ही तुमच्या लेखणी मधील जादु आहे. बर्‍याच वाचकांच्या विनंती या अगोदर तुम्हाला आलेल्याच आहेत, पुर्ण होईपर्यन्त अजुनही येत रहातील.


Akhi
Monday, March 17, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द, तुम्ही विल्मा रुडोल्फ़ बद्दल लिहाल का? तिने पण प्रतिकुल परिस्थिती मधे ३ सुवर्ण पदके मिळवली

Manjud
Monday, March 17, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैजींगमधे अतिशय पोल्युशन असल्यामुळे हेली गेब्रसेलास्सी या ऑलिंपिक्सच्या मॅरेथॉनमधे धावणार नाही

हे कारण मला पटत नाही.

मुकुंद, आमच्या बॅचपर्यंत तर होताच पण अजूनही आहे, संजूचा बटाटेवडा.....


Tulip
Monday, March 17, 2008 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ अप्रतिम लिहिताय तुम्ही मुकुंद!!

Mandard
Monday, March 17, 2008 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Halie is having problem of "exercise related asthama", hence it is very dangerous for him run for long race like Marathon in polluted city.

Mukund will clarify better.

Runi
Monday, March 17, 2008 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद आता मार्च मॅडनेस आणि फ्रेंच ओपन दोन्ही असले तरी ऑलिंपीकच्या आठवणी लिहिणे सोडु नका.
सगळेजण अगदी मनापासुन हा बीबी वाचताहेत पुढच्या भागची आतुरतेने वाट बघत.


Mukund
Monday, March 24, 2008 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली... माझी युनिव्हरसीटी (KU)दर वर्षी प्रमाणे या वर्षीही पहिले सिडींग घेउन खेळत आहे... त्यामुळे त्यांच्या मॅचेस न बघणे अशक्य आहे... पहिल्या दोन फेर्‍या अपेक्षेप्रमाणे जिंकल्या आहेत.. आता स्विट सिक्स्टीन मधे आलो आहोत.. पुढच्या वीकएंडला तिसरी फेरी जिंकलो तर एलीट एट मधे व चौथी राउंड जिंकलो तर फ़ायनल फ़ोर!.....:-) त्यामुळे वाट बघायला लावल्याबद्दल दिलगीर आहे...

मंदार... तु बरोबर सांगीतले आहेस... हेलीनेही तेच कारण दिले आहे.

उदय.. तुम्हाला... खर म्हणजे या बीबीच्या सर्व वाचकांना एक सांगायचे आहे.... मी या गोष्टी लिहीताना नेहमी काही जणांचा मनात आदर ठेउनच लिहीण्याचा प्रयत्न करतो.. त्या लोकात काही मायबोलिकरही आहेत.. ज्यांची नावे मी आधीच सांगीतली आहेत. जागेअभावी बर्‍याच जणांची नावे लिहायचे राहुन गेले आहे पण त्या व्यक्तींमुळेच मायबोलि ही साइट एक दर्जेदार म्हणुन ओळखली जाते. या साइटला त्यांनी आणलेल्या दर्जाचा मान राखुन लिहीणे..... हे या साइट वर लिहीणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे असे मला वाटते.

झालच तर इथे मला अजुन एका व्यक्तीचे नाव सांगावेसे वाटते.. ते म्हणजे न्यु जर्सीच्या डॉ. मीना नेरुरकर.... याही अमेरिकेत बरीच वर्षे वास्तव्य करुन वैद्यकिय क्षेत्रात काम करत आहेत. १९९८ मधे यांनी निर्मित व दिग्दर्शीत केलेली दोन नाटके बघण्याचे भाग्य मला लाभले... सुंदरा मनामधे भरली व दिंडी चालली पंढरीला.... दोन्ही नाटके अतिशय सुरेख! पहिले नाटक मराठी लावण्यांबद्दल तर दुसरे मराठी भजनांबद्दल... ती नाटके ज्या पद्धतीने निर्मीत व दिग्दर्शीत केली होती ते पाहताना माझ्या मनात सारखे येत होते... या निर्मात्या व दिग्दर्शकाची इंटलेक्चुअल पातळी खुपच वरच्या दर्जाची आहे. कला सादर करताना ज्या पद्धतीने ती सादर केली जाते ते पाहुन आपल्याला लगेच कळुन येते की या निर्माता दिग्दर्शकाची बौद्धीक पातळी काय आहे ते. ती दोन नाटके बघत असताना मी विचार केला... की मी कधी काही निर्माण केले तर मी ते करताना बघणार्‍या किंवा वाचणार्‍याच्या बुद्धीचा आदर करीन.... नाही तर आपण हिंदी व बर्‍याच मराठी मुव्हीत चालत असलेला आचरटपणा पाहातोच.... दर्शकांना ते अगदीच बावळट समजतात.... संपुर्ण मुव्ही पाहायचा म्हणजे एक शिक्षाच वाटते व आपण असे कित्येक मुव्ही अर्धवटच सोडुन देतो... तश्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची, निर्मात्यांची,लेखकांची... या सगळ्यांचीच कीव येते व आपण आपला वेळ फुकट घालवला म्हणुन चरफडत बसतो.

मग श्वास सारखा एखादा नितांत सुंदर चित्रपट जेव्हा आपण पाहतो तेव्हा जो आनंद आपल्याला होतो... तो शब्दात सांगणे अशक्य असते... मग तश्या चित्रपटाची निर्मीती करण्यात मोलाचा हातभार लावणारी व्यक्ती... मायबोलिकर अज्जुका व तिच्या यजमानांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असते... डॉ. मीना नेरुरकर ही व्यक्तीही त्याच उच्च वर्गातली.....

या गोष्टी लिहीताना मी त्या सगळ्यांचा विचार करत होतो.आपले लिखाण वाचुन कोणाला आपला बहुमुल्य वेळ फुकट गेला अशी खंत वाटु नये हा हेतु ठेउनच मी लिहीत आहे. मी काही प्रोफ़ेशनल लेखक नाही... असाच डॉ. मीना नेरुरकरांसारखा हौशी... तसे असुनही तुम्हाला सगळ्यांना हे लिखाण आवडले याचे श्रेय मी.... डॉ. नेरुरकर,श्वास सारखा चित्रपट निर्मीत व दिग्दर्शीत केलेल्या अज्जुका व तिचे यजमान आणी मायबोलिवरचे अनेक सुंदर लेखक व कवी.... या सगळ्यांनी दिलेल्या स्फुर्तीलाच देईन......

आणी हो... तुमच्यापैकी काही जणांनी विल्मा रुडॉल्फ,बॉब बीमन,अबेबे बिकिला... अश्या खुप नावाजलेल्या खेळाडुंबद्दल लिहीण्यास सांगीतले आहे. त्यांचे पराक्रम खरच तोंडात बोटे घालण्यासारखे व सांगण्यासारखेच आहेत... पण आजकालच्या गुगलींगच्या जमान्यात अश्या प्रसिद्ध खेळाडुंबद्दल कोणालाही सहज माहीती मिळु शकते... म्हणुन मुद्दामुनच माझ्या या ऑलिंपिक्सच्या आठवणीवजा गोष्टी सांगताना मी अश्या गोष्टी निवडतो की ज्या सर्वसाधारणपणे बर्‍याच लोकांना माहीत नसतात... परत एकदा डॉ. मीना नेरुरकरांचे उदाहरण देतो... त्यांची ती दोन नाटके पाहताना मला वाटले की नेहमीच्या मराठी लावण्या व नेहमीचीच मराठी भजने आपल्याला ऐकायला व बघायला मिळतील... पण त्या नाटकात नेहमीच्या भजनांबरोबर व लावण्यांबरोबर.... मी कधीही न ऐकलेली भजने व लावण्या जेव्हा ऐकल्या... तेव्हा मंत्रमुग्धच झालो.... त्यांचीच ती स्फुर्ती घेउन मग तुम्हाला गोष्टी सांगताना जॉन स्टिव्हन अखवारी,पियांबु टुल,किटे सॉन व शर्ली बाबाशेफ़ सारख्यांच्या गोष्टी मी निवडल्या...

यापुढेही मी अश्याच वेचक व दुर्मीळ गोष्टी तुम्हाला सांगणार आहे... मधुन मधुन काही प्रसिद्ध खेळाडुंबद्दलही जरुर सांगीन... चालेल का?....:-)


Mukund
Monday, March 24, 2008 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलिंपिक्स स्पर्धेचे एक मोठे आकर्षण म्हणजे या स्पर्धांमधे अनेक खेळांचा समावेश असतो. त्यामुळे प्रत्येकासाठी काहीना काहीतरी बघण्यासारखे या स्पर्धांमधे असते. पण लोकप्रियतेनुसार काही काही खेळ जगभरच्या लोकांचे चित्त वेधुन घेतात. तश्या सर्व खेळांमधे.... जिमनॅस्टिक्स हा प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर असतो असे म्हणणे वावगे ठरु नये...

जिमनॅस्टिक्सला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात सत्तरीचे दशक कारणीभुत होते... आणी खासकरुन १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्समधे रशियाच्या ओल्गा कोर्बुर्टने व १९७६ च्या मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे रुमानियाच्या नादिया कोमोनिचने.... आपल्या ग्रेसफ़ुल व निअर पर्फ़ेक्ट कामगीरीने सर्व जगाला जिमनॅस्टिक्सचे वेड लावण्यास उद्युक्त केले.ओल्गा कोर्बुर्टने जिमनॅस्टिक एक कला म्हणुन पर्फ़ेक्ट करण्यास फार मोठा हातभार लावला तर पर्फ़ेक्ट १० असे गुण मिळवणारी पहीली जिमनॅस्ट म्हणुन नादियाचे नाव जगभर गाजले. या दोन चिमुरड्या मुलींनी जरी जिमनॅस्टिक्स हा प्रकार घरोघरी लोकप्रिय केला असला तरी या खेळाच्या परंपरेत अशी बरीच नावे आहेत.... की जी घेतल्याशिवाय ऑलिंपिक्स जिमनॅस्टिक बद्दल लिहिणे अशक्य आहे....

महिलांमधे १९५६ ते १९६४ दरम्यान ९ सुवर्णपदके मिळवणारी रशियाची लॉरा लॅटीनीना, १९६४ च्या टोकियो व १९६८ च्या मेक्सीको सीटी ऑलिंपिक्सची विजेती झेकोस्लोव्हाकियाची व्हेरा चासलाव्हस्का, १९७२ ची ऑल राउंड विजेती रशियाची नेली किम व १९७६ ची ऑल राउंड चॅंपिअन रशियाचीच लुडमिला तोरिश्चेव्हा,१९८४ ची विजेती रुमानियाची एकतारीना झाबो, व २००० व २००४ मधल्या रशियाच्या स्वेटलाना बोगनस्काया व स्वेटलाना खोरकीना व रुमानियाच्या सिमोना अमानार, अमेरिकेची १९९८४ ची ऑल राउंड विजेती.... मेरी लु रटन व २००४ ची ऑल राउंड विजेती.... कार्ली पिटर्सन.... या सगळ्यांनी... आपले नाव ऑलिंपिक्स जिमनॅस्टिक्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवले आहे.

पुरुषांमधे जपानचे.... सत्तरीतल्या दशकातले सवाओ काटो व मिट्सोउ सुकाहारा,रशियाचा १९७६ मॉन्ट्रियाल व १९८० मॉस्को ऑलिंपिक्स मधे ९ सुवर्णपदके मिळवणारा निकोलाय आंड्रेओनॉव्ह,रशियाचाच व्हॅलरी ल्युकीन,१९८४ लॉस ऍंजलीस ऑलिंपिक्स गाजवणारा चायनाचा ली नींग,१९९२ मधे बार्सीलोना ऑलिंपिक्समधे ६ सुवर्णपदके मिळवणारा... परत एकदा रशियाचाच... अदभुत व्हिटाली शेरबो.... व १९९६ ऍटलांटा व २००० सिडनी ऑलिंपिक्स गाजवणारा... रशियन अलेक्सी निमॉव्ह..... यांची नावे अजरामर आहेत.

ऑलंपिक्स जिमनॅस्टिक स्पर्धांमधे रशियानेच आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी जिमनॅस्टिक्समधे मिळवलेल्या पदकांची संख्या.... बाकीच्या जगातल्या सगळ्या देशांनी जिमनॅस्टिक्समधे एकत्रीत मिळवलेल्या पदकांपेक्षा जास्त आहे... पण आज मी तुम्हाला ऑलिंपिक्स जिमनॅस्टिक्स मधली अशी गोष्ट सांगणार आहे..... की ज्यात.... वरील नावांपैकी एकही नाव नाही. तरीही ही गोष्ट तुम्हाला आवडेल असे मला वाटते... तर चला जाउया त्यासाठी... पुन्हा एकदा १९७६ च्या मॉंट्रियाल ऑलिंपिक्सला....

क्रमंश:


Arun
Monday, March 24, 2008 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुन मधुन काही प्रसिद्ध खेळाडुंबद्दलही जरुर सांगीन... चालेल का?. >>>>>>>>>>>>
मुकुंदा : अरे चालेल का म्हणून काय विचारतोस ?????? सध्या फक्त तू लिहायचं आणि आम्ही ते वाचायचं, इतक सोप्प गणित आहे बघ हे.
तेंव्हा तू, तुला पाहिजे त्या/ आवडतील त्या खेळाडूंबद्दल वेचक आणि दुर्मिळ गोष्टी लिहित जा. आम्ही ते सगळं वाचत आहोत ............ :-)

वरती बर्‍याच जणांनी सांगितल्याप्रमाणे, तुझ्या या लेखमालेतून आम्हाला ज्ञात आणि अज्ञात अशा असंख्य गोष्टी आणि त्यामागच्या त्या त्या खेळाडूंच्या भावना आम्हापर्यंत पोचत आहेत. त्यानिमित्ताने खर तर आम्हीच तुझे आभार मानायला हवेत.


Raviupadhye
Monday, March 24, 2008 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा "बहुमूल्य(???)" -:-) वेळ वाया जावू नये या प्रामणिक अन कळकळीच्या भावनेने मुकुन्द लिहितात.खरं सांगू का या पेक्षा आमच्या वेळेचा आज पर्यन्त सदुपयोग क्वचितच झाला आहे. अन्यथा मूर्ख पेटीसमोर बसून माकड्चेष्टा पाहणे अथवा स्वार्थी "राज" कारण्यांची अतिरंजित वक्तव्ये सहन करणे असा वेळेचा अपव्यय होतो.
या क्रीडारूपी रंगमंचावर आपली छाप आपल्या दैदिप्यमान पराक्रमानी सदैव सोडून गेलेल्या वीरांची गाथा तितक्याच आपुलकीने तुम्ही लिहिता. त्या दिग्गजांच्या पराक्रमाचे प्रतिबिंब ही तितकेच स्फ़ूर्तीदायक,रोचक अन वास्तव असावे याची तुम्ही काळजी घेता.म्हणून या वर्णनात शाहिरांची कळकळ आणि तितकीच समर्थ लेखणी आहे.
चांगले वाचणे,चांगले दुसर्‍यास वाचून दाखवणे असे अनेक उद्देश मुकुन्दाच्या गौरव गाथांमधून आम्हा सारख्या सामान्यांना साध्य होत आहेत.
खेळाडूंच्या नंतर अश्याच जिद्दी लोकांची कथा सांगण्याचे आपण पुढे चालू ठेवू शकू!!!
जियो!!!!!!!!
मुकुन्द जियो!!!!


Mukund
Monday, March 24, 2008 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९७६ चे मॉंट्रियाअल ऑलिंपिक्स म्हटले की जगात सगळ्यांच्या डोळ्यासमोर ४ फ़ुट १० इंचाची... केवळ १४ वर्षाची...... पोनीटेल घातलेली... अन्-इव्हन बारवर आपले अजब कौशल्य दाखवुन... जिमनॅस्टिक्सच्या इतिहासात... प्रथमच पर्फ़ेक्ट १० गुण मिळवणारी.... रुमानियाची नादिया कोमानीचीच येते...

पण आज मात्र आपल्याला जायचे आहे पुरुषांच्या जिमनॅस्टिक्सच्या सांघीक स्पर्धेला..... मी वर सांगीतल्याप्रमाणे आजपर्यंतच्या सर्व ऑलिंपिक्समधे रशियाच्याच जिमनॅस्ट्सनी वर्चस्व गाजवले आहे... त्याला फक्त अपवाद होता १९७२ च्या म्युनीक ऑलिंपिक्सचा... ज्यात सवाओ काटो व मिट्सुओ सुकाहाराच्या अप्रतिम कामगीरीच्या बळावर जपानने जिमनॅस्टिक्सच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले होते व रशियाच्या जिमनॅस्टिक्स सार्वभौमत्वाला सर्वप्रथमच आव्हान दिले होते. आणी आता १९७६ च्या मॉंट्रियाल ऑलिंपिक्सला सुद्धा जपानच्या पुरुषांचा जिमनॅस्टिक्स संघ.. परत एकदा आपल्या देशाची शान राखायला... सवाओ काटोच्या नेतृत्वाखाली.... मॉंट्रियालला येउन डेरेदाखल झाला होता..

जिमनॅस्टिक एरीनामधील सर्व १०,००० ऑलिंपिक्स जिमनॅस्टप्रेमी दर्शकांना पुर्णपणे ठाउक होते की रशियाचा संघ... त्यांच्या १९७२ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुर्ण तयारीनीशी मॉंट्रियालला आला होता. ज्या जिमनॅस्टिक्समधे त्यांनी ५० वर्षे वर्चस्व गाजवले... त्या खेळात लागोपाठ २ ऑलिंपिक्समधे हार पत्करणे रशियातील लोकांना कधीच मंजुर झाले नसते... त्यासाठी रशियाने या ऑलिंपिक्सला.... त्यांच्या अद्वितिय निकोलाय आंड्रेओनॉव्ह च्या दिमतीला.... तरुण अलेकझॅंडर दित्यातिनची भरती.... त्यांच्या संघामधे केली होती.... निकोलाय आंड्रेओनॉव्हसुद्धा... ज्याचे नाव जिमनॅस्टिकमधल्या टॉप ३ ऑल टाइम ग्रेटमधे सहज मोडले जाइल... त्याच्या १९७२ च्या सांघीक स्पर्धांमधे झालेल्या पराभवाची परतफेड करायला... जपानच्या सवाओ काटोच्या संघाबरोबर टक्कर द्यायला.. खुप अधिर झाला होता.

एकुण काय तर.. या जिमनॅस्टिक्सच्या सांघीक स्पर्धेमधे.... एका जबरदस्त संघर्षाला आवश्यक असलेले सगळे गुण होते... दर्दी प्रेक्षक... आपल्याला एक जबरदस्त स्पर्धा बघायला मिळणार म्हणुन.. मनातल्या मनात मांडे खात.. या दोन बलाढ्य संघातील संघर्षाला बघण्यास तयार होउन बसले होते....

या सांघीक स्पर्धेत प्रत्येक संघात सहा जिमनॅस्ट असतात. त्यातल्या प्रर्त्येकाने सहा वेगवेगळ्या ऍपेरॅटसवर.. आपले कौशल्य दाखवायचे असते... त्या सहा जणांचा एकत्रीत स्कोर कोणता संघ जिंकला हे ठरवत असते. ते सहा ऍपेरॅटस म्हणजे... फ़्लोअर एक्सरसाइझ,पॅरेलल बार, हाय बार, पॉमेल हॉर्स, व्हॉल्ट व रोमन रिंग्स..... झाल...स्पर्धेला सुरुवात झाली...एकाच वेळेला दोन दोन देश... आलटुन पालटुन आपले स्पर्धक... या अश्या ऍपेरेटसवर पाठवु लागले. स्विडन, हंगेरी,रुमानिया,वेस्ट जर्मनी,इस्ट जर्मनी आणी अमेरिकेच्या संघांनी आपापले रुटीन्स पुर्ण केले. इस्ट जर्मनीने त्यात ५६४.६५ गुण मिळवुन आतापर्यंतचे पहिले स्थान पटकावले.व टाळ्यांच्या कडकडाटात आता आले जपानचे व रशियाचे स्पर्धक... सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली होती... या दोन संघातल्या एकापेक्षा एक सरस असलेल्या जिमनॅस्टपटुंना बघण्याची मेजवानी त्यांना आता लाभणार होती.

या दोन्ही संघामधे मोट्ठे जिमनॅस्टिक्स युद्ध सुरु झाले. कोणीही आपल्या डोळ्याचे पाते प्रथम मिटायला तयार नव्हते. मोठ्या नेटाने व जिद्दीनी जपानचे साही स्पर्धक व रशियाचे साही स्पर्धक.. आपापले रुटीन.. एकाग्रतेने पुर्ण करत होते. जपानच्या सवाओ काटो व मिट्सुओ सुकाहाराकडुन चुक होणे जवळजवळ अशक्यच होते... त्यांचे सर्व रुटीन यथोचीत पार पाडुन... आपल्यातल्या जिमनॅस्टिक कौशल्याने.... लोकांच्या तोंडुन ते आह... उह... काढत होते. तिकडे रशियाचे निकोलाय आंड्रेओनॉव्ह व दित्यातीनसुद्धा आपल्या जिमनॅस्टिक कौशल्यात कुठेच कमी पडत नव्हते... एक शेर तर दुसरा सव्वाशेर... असे द्वंद्वयुद्ध या दोन महान संघात चालु होते. सगळ्यांना कळुन चुकले की इस्ट जर्मनीच्या संघाला ताम्र पदकावर समाधान मानावे लागणार होते. सुवर्णपदकासाठी खरी लढत या दोन संघांमधेच होणार हे जजेसच्या आधी...त्या १०,००० प्रेक्षकांनी आपल्या मनात एव्हाना ठरवुन टाकले होते... अश्या या युद्धात संघाचे खंदे वीर नाही तर संघातले कमी प्रसिद्धीचे खेळाडु.. कोण सुवर्णपदक जिंकणार ते ठरवणार.... हेही सगळ्यांना माहीत होते.तर मित्रांनो...माझी गोष्ट आहे अश्याच...... तोपर्यंत प्रसिद्ध नसलेल्या.... एका जपानी जिमनॅस्टपटुबद्दल.... पण त्यादिवशी त्याने ज्या गुणांचे व धैर्याचे प्रात्यक्षिक दाखवले.. त्यासाठी तो माझ्यासारख्या अनेक क्रिडाप्रेमींच्या हृदयात कायमचा विराजमान झाला आहे. त्या महान जिमनॅस्टपटुचे नाव आहे.... शुन फ़ुजीमोटो!

क्रमंश्:


Mukund
Monday, March 24, 2008 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर हा असा शुन फ़ुजीमोटो... आपल्या संघातल्या दैदिप्यमान जिमनॅस्टपटुंच्या तेजाच्या छत्राखाली.... हळु हळु आपले सर्व रुटीन्स पार पाडुन.. संघाच्या विजयाला आपला हातभार लावायचा आटोकाट प्रयत्न करत होता. आपल्यामुळे आपल्या संघाला सुवर्णपदक मुकावे लागु नये या एकाच विचारानी पछाडुन.... तो आपले सर्व रुटीन्स अतिशय एकाग्रतेने व कौशल्याने पार पाडत चालला होता. जपानचा संघ पहिल्या तीन रुटीन्सनंतर... रशियापेक्षा पुढे होता. आता जपानच्या सगळ्या सहा जणांनी असेच उरलेल्या तीन रुटीन्समधेही आपले वर्चस्व राखले तर सुवर्णपदक जपानचेच होते. पण दोन संघातल्या गुणांमधला फरक इतका सुक्ष्म होता की दोन्ही संघातल्या कोणालाच थोडीसुद्धा चुक करायची मुभा नव्हती. अश्या परिस्थीतीत शुन फ़ुजीमोटो... आपले चौथे रुटीन फ़्लोअर एक्सरसाइझ वर पुर्ण करत होता.... सर्व प्रेक्षक या अटीतटीच्या स्पर्धेचा आस्वाद घेत... उत्सुकतेने कोण जिंकणार... याचा विचार करत.... या जिमनॅस्टपटुंच्या कौशल्याला दाद देत.... त्या कोझी इन्डोअर एरिनामधे बसले होते.

आणी अचानक... आपल्या फ़्लोअर एक्सरसाइझच्या रुटीनच्या शेवटी... शेवटची हवेतली उलटी कोलांटी उडी हवेत मारुन... जमीनीवर लॅंड होताना... शुन फ़ुजीमोटोला आपल्या गुढघ्यामधुन.... कुडुक.... असा एक विचित्र आवाज आला व लॅंड होताना त्या आवाजाबरोबर एक प्रचंड वेदनेची शुळ त्याच्या मस्तकात गेली... त्याला कळले की काहीतरी विपरीत घडले आहे... खर म्हणजे त्याच्या गुढग्याची वाटीच मोडली होती... त्याचे पार दोन तुकडे झाले होते.... गुढग्याचा सांधा एकत्र ठेवणारी त्याची गुढग्याची वाटीच तुटली होती... पण नेमके काय झाले आहे हे शुन फ़ुजीमोटोला त्यावेळेला माहीत नव्हते..... त्याला फक्त एवढेच कळत होते की त्याच्या गुढग्यातुन जिवघेण्या प्रचंड वेदना येत आहेत... पण प्रचंड वेदनांनी पाणावलेले डोळे त्याने चटकन पुसले...कारण त्याला त्यावेळेला हेही कळत होते की त्या आवाजाबद्दल व वेदनांबद्दल जर का त्याने त्याच्या प्रशिक्षकांना सांगीतले तर तश्या परीस्थीतीत त्याचे प्रशिक्षक त्याला स्पर्धेतुन बाहेर पडायला सांगतील... व त्याचा अर्थ जपानचे आपले सुवर्णपदक राखायचे स्वप्न धुळीस मिळाले असते.... शुन फ़ुजीमोटोमुळे जपान सुवर्णपदकास मुकले... अशी जपानच्या वृत्तपत्रातील हेडलाइन त्याच्या डोळ्यसमोर नाचु लागली व शुन फ़ुजीमोटोने तिथल्या तिथे.. एका क्षणात निर्णय घेतला की... माझ्या वेदनांबद्दल व त्याच्या गुढग्यातुन आलेल्या आवाजाबद्दल तो कोणालाच काही सांगणार नाही....

२६ वर्षाचा जिगरबाज शुन फ़ुजीमोटो.. हसत हसत आपल्या संघातल्या खेळाडुंचे हाय फ़ाय स्विकारत आपल्या सवंगड्यांसोबत येउन बसला.त्याला माहीत होते की रशियाबरोबरच्या या एपिक जिमनॅस्टिक्स युद्धात... त्याच्या देशाला त्याचा प्रत्येक गुण महत्वाचा होता. अश्या निर्णायक क्षणी हे युद्ध सोडायला व आपल्या संघाला पराभवाच्या खाइत लोटायला तो तयार नव्हता.. त्या निर्णयामुळे तो या सांघीक स्पर्धेनंतर होणार्‍या वैयक्तीक स्पर्धेला मुकणार होता हेही त्याला कळत होते.. पण त्याहीपेक्षा देशहीत व संघाचे हीत शुन फ़ुजीमोटोला त्याक्षणी अधिक प्रिय व महत्वाचे वाटत होते. आणी प्रचंड वेदना होत असुनही चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवत फ़ुजीमोटो आपल्या पाचव्या ऍपेरेटसवर.. पॉमेल हॉर्सवर... गेला. या रुटीनमधे सर्वस्वी बाहूंचे बळ वापरायचे असल्यामुळे शुन फ़ुजीमोटोला खात्री होती की शेवटचा डिसमाउंट जर बरोबर लॅंड करता आला तर आपण या रुटीनमधुन निभावुन जाउ. आणी खरोखरच शुन फ़ुजीमोटोने आपल्या सगळ्या वेदना विसरुन... मोडक्या गुढग्याने.. ते रुटीन अतिशय अप्रतिमरित्या पार पाडुन १० पैकी ९.५ गुण मिळवुन आपल्या संघाची सुक्ष्म आघाडी कायम ठेवली. पण शुन फ़ुजीमोटोला माहीत होते.. त्याचे शेवटच्या ऍपेरेटसवरचे... रोमन रिंग्सवरचे.... रुटिन हे कमालीचे कठीण जाणार होते.... कारण त्या रुटीनमधे सर्व रुटीनभर... जमीनीपासुन ८ फ़ुट वर... नुसत्या दोन लोखंडी रिंग्सवर... ज्या साखळीने छताला लटकवल्या असतात... उलटे सुलटे व्हायचे असते.. ते करत असताना पाय एकदम सरळ हवेत जमीनीला समांतर किंवा काटकोनात.. करुन दाखवायला लागणार होते... इथे तर त्याची गुढग्याचा सांधा एकत्र ठेवुन सांधा सरळ ठेवणारी वाटीच तुटली होती... तर आपण आपले पाय गुढग्यात सरळ कसे ठेवणार? आणी तेवढेच नाही तर रुटीनच्या शेवटी... जवळ जवळ १० फ़ुट उंचीवरुन... उलटी कोलांटी उडी मारुन... जमीनीवर लॅंडींग करायचे असते.. ते कसे करणार? हा विचारही शुन फ़ुजीमोटोला प्रचंड अस्वस्थ करत होता...

आणी जोपर्यंत शुन फ़ुजीमोटो रोमन रिंग्सपर्यंत लंगडत लंगडत गेला तोपर्यंत त्याच्या संघातल्या सगळ्यांना व प्रशिक्षकांनाही कळुन चुकले होते की शुन फ़ुजीमोटोला काहीतरी होत आहे.. कारण फ़ुजीमोटोचे शरीर... त्याला होत असलेल्या जिवघेण्या वेदनांमुळे... जवळ्जवळ शॉकमधेच गेले होते.... त्याचा चेहरा पांढरा ठिक्कर पडला होता... लंगडणार्‍या व पांढर्‍या चेहर्‍याचा शुन फ़ुजीमोटोला त्याच्या प्रशिक्षकांनी रिंग्सवर माउंट व्हायला मदत केली.... व पुढची रिंगवरची ३ मिनीटे... फ़ुजीमोटो स्वत्:ला एकच गोष्ट बजावत राहीला...
I must forget about my pain.... I must forget about my pain.... एव्हाना प्रेक्षकांनाही सुगावा लागला होता की शुन फ़ुजीमोटोच्या गुढग्याला प्रचंड इजा झाली आहे... आणी त्या ३मिनीटात.. एका वेगळ्याच झोनमधे जाउन..शुन फ़ुजीमोटोने इतक्या फ़्लॉलेसली त्याचे रुटीन पार पाडले की सगळे १०,००० प्रेक्षक... एकदम पिन ड्रॉप सायलंसमधे..... त्याच्या जिगरीची दाद देत... आ वासुन बघत राहीले... आता फक्त दहा फ़ुट उंचीवरुन.. हवेत उलटी कोलांटी उडी मारुन डिसमाउंट बाकी होता.... सगळे प्रेक्षक काळजीने त्याच्या डिसमाउंटकडे डोळे लावुन बसले... मनातल्या मनात प्रत्येक जण शुन फ़ुजीमोटोच्या सुरक्षीत लॅंडींगची प्रार्थना करत होते.... इकडे फ़ुजीमोटोने आपले हात त्या रिंग्सवरुन सोडले.... हवेत उंच उलटी कोलांटी उडी मारली.... हवेत त्याचे शरीर उलटे गिरकी घेत... शरीराचे गोल भेंडोळे करत तो जमीनीपासुन ४ फ़ुट येइसपर्यंत सरळ झाला.. व त्याचे पाय जमीनीवर दाणकन... आपटले.... एका प्रचंड जिवघेण्या वेदनचे शुळ त्याच्या गुढग्यातुन त्याच्या मस्तकात गेले..... शुन फ़ुजीमोटोने आपले दातओठ घट्ट दाबुन.... त्याचे पर्फ़ेक्ट लॅंडींग... तसुभरही न हलता... प्रचंड वेदना सहन करत... पुर्ण केले.... त्या आघाताने त्याच्या मोडलेल्या गुढग्याच्या वाटीत आता त्याच्या गुढग्याच्या चारी मुख्य लिगामेंट्स तुटण्याची भर झाली होती... त्याचा गुढग्याचा सांधा पुर्ण निखळला होता... पण हा पट्ठ्या.. हसत हसत.. पण डोळ्यातले पाणी व गुढग्यातल्या वेदना आवरत... दात जोरात दाबुन.... वाकुन... जजेसना व प्रेक्षकांना प्रणाम करत होता...

संपुर्ण जिमनॅस्टिक एरीना टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमुन गेला होता... सगळे १०,००० प्रेक्षक आपल्या पायावर उभे राहुन... शुन फ़ुजीमोटोच्या त्या अमेझींग कर्तुत्वाची दाद देत होते.... पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट जेव्हा थांबला तेव्हा स्कोरबोर्ड दाखवत होता की शुन फ़ुजीमोटोने रोमन रिंग्सवर एवढा फ़्लॉलेस परफ़ॉर्मंस व डिसमाउंट केला होता की जजेसनी त्याला १० पैकी ९.७ गुण दिले होते... त्या दोन्ही टीममधल्या त्या सगळ्या महान खेळाडुंपेक्षा जास्त गुण शुन फ़ुजीमोटोने मिळवले होते! त्या स्कोरमुळे जपानने रशियाला ०.४० गुणांनी मागे टाकले व सांघीक सुवर्णपदक पटकावले..... फ़ायनल स्कोर.... जपान... ५७६.८५ गुण. रशिया... ५७६.४५ गुण.... ऑलिंपिक्स जिमनॅस्टिक्स स्पर्धेतली सगळ्यात क्लोजेस्ट कॉंटेस्ट! शुन फ़ुजीमोटोच्या या जिगरबाज कामगीरीच्या बळावर जपानच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले व जपानची मान त्यांनी गर्वाने वर केली..... ऑलिंपिक्सच्या इतिहासातला जबरदस्त जिगर दाखवणारा एक खेळाडु म्हणुन शुन फ़ुजीमोटोचे नाव कायमचे सगळ्यांच्या लक्षात राहील याचा कोणालाच संदेह नाही....

तळटीप...... हा शुन फ़ुजीमोटो एवढ्यावरच थांबला नाही तर पदक वितरण सोहोळ्यालाही या पट्ठ्याने कोणाचीही मदत घ्यायचे नाकारले व आपल्या लंगडत्या पायाने तो स्वत्: पदक स्विकारायला आपल्या संघाबरोबर पोडीअमवर गेला!पण एकदा पदक मिळाल्यावर मात्र त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी त्याला डोक्यावर घेउ नाचवले.....


Dineshvs
Tuesday, March 25, 2008 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, सलगता तुटू नये म्हणुन प्रतिक्रिया देत नव्हतो, पण आज राहवले नाही.
नादियाचा पराक्रम त्यावेळी लाईव्ह बघितला होता. तिचे पुढचे आयुष्यहि खडतरच गेले. तिच्यावर केवळ चार भागाची अप्रतिम मालिका, दूरदर्शनवर दाखवली होती, तशी एखादी फ़िल्म, या शुन वर आहे का ?


Bsk
Tuesday, March 25, 2008 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच सुंदर लिहीलय..सगळं डोळ्यांसमोर आलं.. गूगल वर ही एकच क्लीप मिळाली, शुन वर..
http://video.google.com/videoplay?docid=1922899498515335791&q=shun+fujimoto&total=1&start=0&num=10&so=0&type=search&plindex=0

Akhi
Tuesday, March 25, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्याही खेळाडु बद्दल लिहिल तरी सुधा आम्ही त्या वर तुटुन पडणार्च....... कुठला ही खेळ असो कुठलाही देश असो.... तुमच्या लिहिन्याच्य शैली ला प्रणाम... आणि माहिती असलेल्या किंवा गुगल वरती शोधण्यापेक्श्या त्या तुमच्या शैली मधे वाचायला मजा येते. तो थरार स्व्:त अनुभवता येतो....... तेव्हा काहिहि असल. कुठलिही गोष्ट असेल तर तुम्हि लिहित रहा...... हा १ च तर आहे आवर्जुन वाचण्यासारखा बाकी काय लिहु हि शुन चि कथा पण जबरी... hats off


Abhijeet25
Tuesday, March 25, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आज पर्यंत सगळ्यात आवडलेला प्रसंग म्हणजे हा. खरेच दाद द्यायला पाहिजे शुन फुजिमोटो ची. ईतकी जिद्द खरेच दुर्मिळ आहे.

मुकुंद ईतके सुंदर आणि प्रेरणादायी प्रसंग आमच्या पर्यंत पोचवण्याबद्दल शतश्: आभार.


Ek_mulagi
Tuesday, March 25, 2008 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द, मनापासुन धन्यवाद!
इतक स्फ़ुर्तीदायक लिहताय, hats off to you!


Itgirl
Tuesday, March 25, 2008 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, मधले काही दिवस मला हा बाफ वाचायलाच जमले नाहीये :-( आता आजपासून परत सुरु करतेय :-) बरेच काही लिहिलेले दिसतेय, माझी वाचायची चंगळ आहे आता :-)* हा चांगला चंगळवाद आहे!! याला कोणाची हरकत नसावी :-)

Upas
Tuesday, March 25, 2008 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद खरं सांगू तुला इथला हरितात्या म्हणावसं वाटतय! म्हणजे प्रत्यक्ष ह्या स्पर्धांच्यावेळी जणू काही तु तिथे आहेस अशा पद्धतीने आणि आत्मियतेने तू सांगतोयस.. जवाब नाही..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators