Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through March 15, 2008 « Previous Next »

Santu
Monday, March 10, 2008 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्राव
रामाचे ग्लोरिफ़िकेशन कोणी केले?. मि दोन दिवस गावाला गेलो होतो.
जरा मला सांगशिल का? मला तुझ्या लिहिण्याचा संदर्भ लागेना सा
झालाय.
त्या डिलिट केलेल्या पोस्ट मधे काय लिहिले होते.? हे सांग
म्हणजे मला त्याचा समाचार घेता येईल

नेमस्तक हा शब्द मात्र लै भारी.


Zakki
Monday, March 10, 2008 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामाचे ग्लोरिफ़िकेशन कोणी केले?. मि दोन दिवस गावाला गेलो होतो.

अहो ते गेल्या दोन दिवसात काय, गेल्या दोन हजार वर्षापूर्वीपासूनच झालेले आहे.

राजा नि पति या दोन भूमिकांमधे संघर्ष आला. मग त्यावेळी त्याला जे योग्य वातले ते त्याने केले.

परवाच राम शेवाळकरांच्या भाषणात ऐकले, की रामाने केलेल्या वाली वधाचे समर्थन त्यांना पटले नाही. तसे इतरांना इतर काही काही पटत नाही.

पण तो करून सवरून मोकळा झाला. आपण बहुधा नुसते इथे येऊन वादविवाद करत बसतो. ज्यांच्यात जे बरोबर वातते ते करायची हिंमत असते, ते इतरांच्या बोलण्याचा विचार करत नाहीत.


Santu
Monday, March 10, 2008 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्की
बरोबर आहे. रामाने केले ते बरोबरच केले.
असे मला ही वाटते. राम ग्रेट च होता.
पण श्रावण म्हणतो म्हणुन त्या डिलिट केलेल्या पोस्ट बद्दल
मला उत्कंठा वाटुन राहिलिय


Maanus
Monday, March 10, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु हे बघ काय होतेय मुंबई मधे

सामना बातमी

Shravan
Tuesday, March 11, 2008 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू काही विशेष नव्हते रे. माझ्या पोस्टमध्ये जेवढा उल्लेख आहे तेवढीच पोस्ट होती. पण बरे झाले, तू गावाला गेला होतास. :-)
प्रफुल्लचा ती पोस्ट टाकण्यामागे फक्त फुकाचा सल्ला देण्याचा मानस होता. :-) ती बाब त्यानेही स्पष्ट करुन पोस्ट पण उडवली आहे. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही.
झक्की, फार मोठा विषय आहे. म्हणूनच मी प्रफुल्लला गरज असल्यास दुसरा BB उघडण्यास सांगीतले होते. वैश्वीक संवाद वाढीस लागल्यावर (इंटरनेट वगैरे) कालपरत्वे समाज, संस्कृती यांच्यावर आजूबाजूच्या इतर संस्कृतीच्या खुणा उमटणारच. त्यानुसार माणसांची भावविश्वे, जाणीवा, विचारपध्दतीत फरक होणारच. हे वादविवाद (रामाचेच उदाहरण नाही, तसे इतर अनेक) या अशाच बहुसांस्कृतीक विचारपध्दतीचे परिपाक असावेत. हे अटळ आहे. ज्यांना आदर्श वा पुरुषोत्तम मानले गेले आहेत अशा व्यक्तीमत्वांच्या वागण्याचा, त्यांच्याशी निगडित घटनांचा असा कालपरत्वे उहापोह केला जाणारच.
असो. हे या BB च्या विषयाशी विसंगत झाले.


Santu
Tuesday, March 11, 2008 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकबराने हिन्दु लोक ओळखु यावेत म्हणुन त्यांच्या खांद्यावर निळ्या रंगाचे कापड लावण्याचे सक्तिचे केले होते. त्यामुळे त्याना"तुकडिया" असे संबोधत असत.
अशि सक्ति त्याने ज्यु किंवा ख्रिस्ती लोकांवर केलि नाहि.(आइने-अकबरी)

या वरुन अकबर हा किति हिन्दु द्वेष्टा होता याची कल्पना येते.


Tiu
Tuesday, March 11, 2008 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम कोण देशीचा?
khattamitha.blogspot.com


Santu
Wednesday, March 12, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या पितामह व प्र पितामहांच्या देशिचा रे

Santu
Wednesday, March 12, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेच एकलिंगजिचे देवुळ अकबराने फ़ोडले होते व इथली मुर्ति फ़ोडुन मशिदित फ़र्शी ला बसवली होती

Santu
Thursday, March 13, 2008 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकबराने
खंडणि व आपलि मुलगि न दिल्याचा सुड म्हणुन चितोड चा राजा जयमल वर स्वारी करुन त्याला ठार मारले. व त्याच्या राण्या
आपल्या जनान खान्यात ओढल्या त्या वेळि त्याने चितोड
"बिजन" ( म्हणजे निर्मनुष्य) करण्याचा आदेश दिला. त्यावेळि ३०००० स्त्रिया मुले व माणसे यांची कत्तल करण्यात आलि.

खालिल पुतळा आहे राणा प्रतापाचा अकबर जर एवढा सदगुणि होता तर त्याचा पुतळा कुणि का उभारला नाहि.?
पण राणा प्रताप चे पुतळे सर्वत्र आहेत हे एवढे उघड सत्य त्या अशुतोश ला कळले नाहि


Santu
Thursday, March 13, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस
छान बातमि दिलिस
आनंद वाटला.


Zakki
Thursday, March 13, 2008 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण राणाप्रतापचे काही प्रेमप्रकरण होते का?

नाही ना, मग खल्लास! त्यावर चित्रपट काढून पैसे मिळत नाहीत

हे एवढे उघड सत्य त्या अशुतोश ला कळले.

Santu
Friday, March 14, 2008 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि
एवढे मात्र खरे.
पैश्यापायी स्वजन द्रोह करणारी अवलाद ही.
त्याला कोण काय करणार


Santu
Friday, March 14, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालिल चित्रातील तलाव महाराणी पद्मिनि ची आठवण म्हणुन
बांधण्यात आला होता.
या पद्मिनी नेच मुसलमानाच्या हातुन विटंबना टाळण्यासाठी
जळत्या चितेत जोहार केला.
असे असताना एक रजपुत (जोधा) मुस्लिम अकबरावर प्रेम कशि कत्रील


Zakki
Friday, March 14, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, त्यांचे वय काय होते? जेंव्हा तिला त्याच्या प्रेमाची खात्री पटली तेंव्हा मग जात, धर्म, राजकारण इ. सगळ्याचा विसर पडतो. (असे अत्यंत अंधुकसे आठवते आहे.) शिवाय तो कोण नट होता त्यावर आजकालच्या सुद्धा कित्ती मुली भाळतात म्हणे! तरी त्यांना विश्वजालावर अमेरिका ते जपान, जपान ते चिले, कॅनडा ते ऑस्ट्रेलिया या सर्व देशातले तरूण बघायला मिळत असतील!

मग त्या बिचार्‍या राजवाड्यात कोंडलेल्या मुलीला असा दिसणारा, नि पॉवर्बाज माणूस दिसला तर काय होईल असे वाटते?

तर हा दृष्टिकोण समजून घ्या!

आता मी त्या निर्मात्याला काही पैसे दिले होते का, असे विचारू नका. मी आपला माझे पैसे अगदी जपूऽऽन ठेवतो!

फक्त भावनेच्या आहारी न जाता, शांतपणे विचार केला की असे दोन्ही बाजूचे मुद्दे समजतात.

अश्या चित्रपटामुळे प्रसिद्धी व पैसे मिळतात हे एवढे उघड सत्य त्या अशुतोश ला कळले.
शिवाय,

पैश्यापायी स्वजन द्रोह करणारी अवलाद ही.

या दोन मुद्द्यांचे इथे वर्चस्व झाले नि असे झाले!



Upas
Friday, March 14, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पैश्यापायी स्वजन द्रोह करणारी अवलाद ही.
म्हणजे जोधा बद्दल म्हणताय की निर्मात्याबद्दल की दोन्ही.. हलकेच घ्या!! ~D

Santu
Saturday, March 15, 2008 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास

अर्थात निर्माता च

खालिल जे मैदान. फोटोत दिसते आहे. हे आहे हळदिघाटि चे रक्ततलाई मैदान
इथेच हळदि घाटिचा संग्राम राणा प्रताप व अकबरात झाला झाला.
आता तिथे राजस्तान सरकार ने राणा प्रताप व
तिथे धारातिर्थि पदलेल्या हिन्दु विरांचे भव्य स्मारक केले आहे


Mahaguru
Saturday, March 15, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा, गुजरात सरकारसंबंधित एका निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने केलेली एक टिपण्णी

"यासंदर्भात सम्राट अकबरापासून प्रेरणा घ्यावी, त्याने सर्वधर्मीयांना समान दर्जा दिल्याचेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. "

http://www.esakal.com/esakal/03152008/Specialnews798FC85347.htm

Tonaga
Saturday, March 15, 2008 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु, या बी बी वर हा संदर्भ टाकण्याच्या तुझ्या हिमतीला दाद दिली पाहिजे.

आता भोग आपल्या कर्माची फळं.....


Mahaguru
Saturday, March 15, 2008 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)
मला ह्या संदर्भात विशेष माहिती नाही. सहज ह्या विषयावरील बातमी दिसली म्हणुन लिंक टाकली. मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची comment .
बाकी, जाणकार इथे अधिक माहिती देत आहेतच


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators