Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through March 04, 2008 « Previous Next »

Deshi
Tuesday, February 26, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त गोवारीकर देउ शकतो.

Santu
Wednesday, February 27, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या
त्याने इस्लाम ला विरोध केला नव्हता.
पण इस्लाम मधे अल्ला शिवाय कुणाला महत्व नसते.
पण अकबर तर स्वतहा ला दिने इलाहि चा प्रेषित
मानत होता हे मुसल्मानाच्या गळि उतरत नव्हते.

आपल्याला खरा इतिहास माहित नसतो शिवाजि मुळे
आप्ल्याला औरंगजेबाचा इतिहास माहित असतो पण औरंग्जेब अक्बरापेक्षा कमि दुर्गुणि होता त्याच्या सारखा तो स्त्रिलपंपट व
दारुडा तर मुळिच नव्हता.


Tanyabedekar
Thursday, February 28, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधा अकबर वरुन सांगलीमध्ये मात्र जोरदार राडा झाला असे ऐकले..

Chyayla
Friday, February 29, 2008 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका वर्तमानपत्रात अरुण रामतीर्थकर यान्नी लिहिलेले प्रासंगिक विचार करण्यासारखे आहे, पुर्ण लेख देण्यापेक्षा ठळक मुद्दे ईथे देत आहे.

१)जोधा अकबर हा चित्रपट म्हणजे मोगलाईत अत्याचार सहन केलेल्या हिंदु मनाला दिलेल्या डागण्या आहेत. हा चित्रपट गुजरात, राजस्थान मधे बंद पडुन उपयोग नाही; तो मुंबईत बंद पडायला हवा होता. मग शिवसेना गप्प का, निर्माता मराठी आहे म्हणुन? धर्मद्रोह्यांपेक्षा मराठीपण मोठे? आज मुंबईत आवाज शिवसेनेचा आहे जर तीने विरोध करुन हा चित्रपट बंद पाडला असता तर गोवारीकरचे दिवाळे निघाले असते. मुख्य म्हणजे काळ्या कुट्ट ईतिहासाचे ओझे वाहणार्या हिंदु मनाला डागण्या देणारा चित्रपट काढण्याने धाडस इत:पर कोणत्याही निर्मात्याने केले नसते.

२) खरा इतिहास दडवुन विकृत इतिहास यापुर्वी शाळेतुन व सध्याही शिकवला जात आहे. या इतिहासानुसार अकबर हा परधर्म्-सहिष्णू असा राजा होता. तो शांतताप्रिय होता. त्याला युद्ध नको होते. त्यासाठीच त्याने राजपुतांशी रोटी-बेटी व्यव्हार केला. हा इतिहास असत्य आहे. त्याने युद्ध टाळले हे खरे. पण युद्धाचा धाक दाखवून राजपूत तरुणी आपल्या आणी मुलाच्या जनानखान्यात भरल्या, ही वस्तुस्थिती आहे. यातुन त्याने एका दगडात दोन पक्षी मारले. युद्धाचा खर्च वाचवुन मनुष्यहानी टळली. व बळजबरी न करता राजपूत राजकन्यांनी जनानखाना भरला. राजपूतांच्या राजवाड्यातुन मुली अकबराकडे गेल्या, पण अकबराने एकातरी राजपूत राजाला आपल्या घरची मुलगी देउन रोटी-बेटी व्यव्हार केल्याचे एकतरी उदाहरण आहे? राजपूत तरुणी राजरोसपणे जनानखान्यात कोंबणार्या प्रकारास रोटी-बेटी व्यव्हार म्हणणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी आहे!.

३)खरा इतिहास सांगतो की, जोधाबाई ही अकबराची प्रेयसी नव्हती, तर जनानखान्यातील उपभोग्य स्त्री होती. अकबराच्या पदरी भगवानदास आणि मानसिंह हे दोन निर्लज्ज राजपूत राजे होते. अन्य राजपूत राजान्ना युद्धाची, सर्वनाशाची भीती घालत व ते टाळण्यासाठी राजपूत राजे नाईलाजाने होकार देत. राजकन्या मन मारुन डोलीत बसत, व लुब्रा भगवानदास त्या तरुण स्त्रिया अकबराकडे पोहोचवीत.

४)युद्ध केले तर अकबराच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याचा निभाव लागणार नाही, अनेक सैनिक मरतीलच, पण पराभव झाल्यावर मोगल सैन्य किती स्त्रियांना भ्रष्ट करतील, याचा नेम नाही. अनेकांचा मृत्यू, अनेक शीलभ्रष्ट, त्यापेक्षा आपण एकट्या बळी जाउ असा विचार करुन डोलीत बसणार्या राजपूत कन्येची मनोवस्था कशी असेल?

५)गोवारीकरच्या अंगात हिम्मत असती तर त्याने जनानखान्यात चाललेल्या राजपूत राजकन्यांचा कोंडमारा हा चित्रपटाचा विषय केला असता.

६)खिशातील पैसे खर्चुन जोधाबाई नावाच्या एका अबलेच्या दुर्दैवाने राजनीती म्हणुन कोसळलेला दुर्धर प्रसंग चवीने पाहणे कितपत योग्य आहे? भव्य सेटस पाहुन डोळे दिपतीलही पण तरी जोधा-अकबर ही प्रेमकहाणी आहे यावर विश्वास ठेवाल? ईतका गंज आपल्या बुद्धीला चढु शकतो.?






Santu
Friday, February 29, 2008 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगलित काल राडा झाला))))सांगलित तान्या काल राडा झाला याचे कारण म्हणजे शिवप्रतिष्टान चे संभाजि राव भिडे (गुरुजी)हा माणुस एक अवलिया आहे या वयात(७५) ते धारातिर्थ म्हणुन दरवर्षी यात्रा काढतात. मागे रायगड ते राज गड अशी यात्रा काढली होती.
यात स्व खर्चाने सामिल व्हावे लागते. भारतिय पोषाख करावा लागतो. अशा बर्‍याच कडक अटि असतात. हे भिडे गुरुजी पायात चप्पल पण घालत नाहित अश्या डोंगरातुन ते सहज ५० ६०कि.मी. चालतात(व आपल्या सारख्या पोरांना लाजवतात) बर परत हे कुठल्या ही समारंभात स्टेज वर बसत नाहित. खरे म्हनजे स्टेज बनवणे हेच मुळी यांना राजी नाहि(राजकारण्यानी यातुन बोध घ्यावा) तर अशा यात्रांना अक्षरशहा २५००० लोक असतात( यात अतिशयोक्ति) नाहि. हे सर्व लोक गुरुजीना मानतात.

हे सर्व लोक पण लुन्गे सुन्गे नाहित तर कुणि मिलिट्रितिल कर्नल आहे तर कुणी मोठे अधिकारी. अश्या रुशीतुल्य व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती ला मारहाण केल्यामुळे लोकांना संताप आला व वरिल प्रकार घडला


Tanyabedekar
Friday, February 29, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु अरे मी मिरजेचा.. भिडे गुरुजी माहिती नसेल असे होईल का? आणि मला एकुण घटनेचा वृत्तांत देखील कळला काल.. तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या माणसांकडून तसेच आंदोलनात सहभागी लोकांकडून.

गुरुजींना उगाच मारहाण केली गेली.. मग लोक पेटणार नाहित तर काय? जोपर्यंत सभा चालु होती तोपर्यंत कुठलाही दंगा झाला नव्हता. आणि गुरुजींच्या समोर कुणी उगाच बसवर दगडफेक वगैरे करणार नाहित. पण गुरुजींनाच पहिले मारल्यावर लोक बेफाम झाले. मी नेटवर बातम्या वाचतोय गेले काही दिवस. आपला मिडीया हा तथाकथित सेक्युलरिस्ट, दिसले कुठल्या हिंदु संघटनेचे नाव की लागले बोंबलायला. समाजकंटक, हिंसक समाज इ.इ. कुठल्याही साइटवर, चॅनलवर मूळ घटनेचा जसे घडले तसा वृत्तांत नाही.

(इथे कुणालातरी वाटेल की भिडे गुरुजी हे एक लोकल राजकारणी आहेत. परंतु हा माणुस काय आहे ह्याची थोडी चौकशी केलीत तर खरे काय ते कळेल).


Zakasrao
Friday, February 29, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला
परवाच्या मारहाणीत जखमी झाले ते भिडे गुरुजी काय. हे मला आजच कळाल.
सांगलीत अजुन तणाव आहे अशी आजच्या पेपरात बातमी होती.
हे अवांतर आहे पण महत्वाचे.
माझा एक दोस्त होता. तो त्यांच्यासोबत गड किल्ले फ़िरुन आलाय शाळॅत असताना.
आम्ही ट्रेकला जाताना त्याला भिडे गुरुजीनी शिकवलेली गाणी म्हणायचो.
"जब ही नगाडा बजहे गया हे"
हे एक गाण मला त्यापैकी आठवत.
गडावर ट्रेकला जाताना ही गाणी म्हणत गेल्यावर मजा यायची.
आम्ही गडावर का चाललोय ह्याच भान असायचच पण एक जोष येत होता ही गाणी म्हणताना. :-)
संतु ती गाणी तुमच्याकडे असतील तर एखाद्या बीबी वर लिहाल का??
मला हवी आहेत लिखित स्वरुपात.




Santu
Saturday, March 01, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव

अरे आत्ताच लगेच माझ्याकडे नाहित पण.
पाहुन मी तुला पाठवुन देतो.

तन्या
मागच्या वर्षीच गुरुजीनी तळबिड(सरसेनापति हंबिरराव मोहिते व ताराराणी गाव)येथुन धारातिर्थ
यात्रा चालु केली. अक्षरशा ५०००० हजार लोक त्यात सह्भागी झाले.
होते म्हणुन मग मोहिते कुळातील मंत्रि विजयसिह मोहिते हे पण सामिल्ल झालि होते. यामुळे आता सरकार ने हंबिररावांची समाधी जी उपेक्षित पडलि होति तिचा चांगल्या प्रकारे जिर्णोध्दार केला.
असे चांगले काम करणार्‍या माणसाला मारहाण केली तर कोण गप्प बसेल.
बर गुरुजी काहि राजकारणि नव्हेत की काही मिळेल म्हणुन लोक त्यांच्या जवळ येतील. त्याच्या जाज्वल्य देशभक्ती व हिन्दुत्व्वादी विचारा नी प्रभावित होवुनच लोक त्याच्या जवळ पदरमोड करुन येतात.
म्हणुन तर लोक जास्त संतापले.


Zakasrao
Saturday, March 01, 2008 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु धन्यवाद देवुन ठेवतोय आधीच. :-)
मेल करा नक्कि.
zakasrao@gmail.com


Santu
Sunday, March 02, 2008 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल
बेळ्गावात पन काल जोधा अकबर शो बंद पाडला
अभिनंदन

तसेच गडहींग्लज मधे ही खेळ बंद पाडला


Zakki
Sunday, March 02, 2008 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे झाले!

पण पैसे मिळाले तर लोक अजूनहि असले सिनेमे काढतीलच. कारण पैशापुढे, सुंदर नटनट्या, भव्य दृष्ये, गाणी असे बघायला 'कलेच्या दृष्टीने' पुन: पुन: बघायला लोक जातीलच.

हुसेनच्या चित्रांबद्दल एव्हढा गोंधळ घातला. पण 'कलेतले तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही मूर्ख आहात. ती चित्रे अप्रतिम आहेत' असे म्हणणारेहि हिंदू धर्मवादी लोकच होते.

तेंव्हा ज्यात पैसा असेल ते करावे. त्याकडे बघताना 'संकुचित वृत्तिने' बघू नये.
'संगितप्रेम, कलाप्रेम, दिसयला सुंदर' अश्या दृष्टीने पहावे.




Vijaykulkarni
Monday, March 03, 2008 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


या प्रकरणावरचे अशुतोश गोवरिकरचे मत

javascript:openWindow( "/esakal/03032008/KolhapurMaharashtra8DF9459AAD.htm")

Santu
Monday, March 03, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय
अशुतोश गोवरीकर म्हण्जे काय मोठा इतिहास कार
आहे काय. तो आहे एक पोट्भरु दिग्दर्शक त्याच काय
उद्या पैसा मिळतो म्हटल्यावर. जोधाबाई ला डिस्को
करायला लावेल.

आता यु पी त पण बन्दि घातलिय ते बर झाल


Zakki
Monday, March 03, 2008 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या पैसा मिळतो म्हटल्यावर. जोधाबाई ला डिस्को करायला लावेल.

जोधाबाईलाच काय, कुठल्याहि थोर स्त्रीला पण डिस्को करायला लावता येईल. नटी मात्र कमी कपडेवाली, सुंदर नि कमनीय शरीराची हवी. गाणेहि एकदम लई भन्नाट नि ठेकेदार हवे. जास्तीत जास्त मोठ्या आवाजात. मग पडद्यावर शंभराच्या नोटा उधळतील लोक. नि ज्यांना त्यात पैसे मिळाले असतील ते लोक त्याला 'काय पण उत्कृष्ट कला आहे' म्हणून डोक्यावर घेऊन नाचतील.

नुसते वस्त्रविहीन स्त्रीचे चित्र काढले तर त्यात कला असेल, नसेल. नि फार लोक ते बघायला जातील असे नाही. पण त्याच चित्राला सरस्वति, किंवा सीता असे नाव दिले की एकदम ती उच्च कला होते. तिला प्रसिद्धी, जास्त पैसा मिळतो.

कला म्हणजे ज्यात पैसे मिळतात ती, असे आहे आजकालच्या भारतात!


Tonaga
Monday, March 03, 2008 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे झक्की साहेब म्हणजे सभ्य भाषेत लिहिणारे सन्तुच आहेत...

Vijaykulkarni
Monday, March 03, 2008 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशुतोश गोवारीकर ने हा चित्रपट बनविण्यापूर्वी बराच अभ्यास केला आहे. त्याच्या चित्रपटातल्या चुका दाखवून देणे समजण्यासारखे आहे. पण हुल्लडबाजी करून चित्रपटाचे खेळ बन्द पाडून कुणाचा फायदा? ज्यान तो पहायचा आहे ते तो कसाही पहातील. त्यातून आपल्याला काय सिद्ध करायचे आहे? आम्ही म्हणू तो इतिहास आणी त्यापेक्षा वेगळा चित्रपट कुणी काढला तर आम्ही तो बन्द पाडणार? कारण त्या चित्रपटाला मुद्देसुद उत्तर देणे आम्हाला जमणार नाही? हा इतिहास तर मोगले आझम मध्ये पण होता. मग एका मराठी माणसाने काढलेल्या चित्रपटावरच का एवढा राग? आपण कळत नकळत पन्जाबी लॉबीला तर मदत नाही ना करत?


Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच चित्रपट जर कुणा मुसलमान व्यक्तिने काढला असता तर त्याला भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बक्षीस मिळाले असते का? त्या मुसलमानाला फ़िल्मफेअर इ. सर्व बक्षिसे मिळाली असती का? तो मुसलमान मग भारतात एकदम लोकप्रिय होऊन त्याच्या सर्व चित्रपटांना भरपूर प्रेक्षक लाभतील का?

निदान कुणाची त्या विरुद्ध निदर्शने करण्याची हिंमतच झाली नसती. आपला मराठी माणूस आहे, तो काय करणार? घाला त्याला शिव्या.

तसे काय दंगल, लुटालूट करायला काऽहीहि कारण चालते. इथे कुणाला खरोखर इतिहास, संस्कृति इ. ची चाड आहे? लई राडा करायचा समद्याचा! लुटालूट करून काही हाती लागले, पैसे, वस्तू तर बघायचे. कारण काही का असेना.


Prafull
Tuesday, March 04, 2008 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर झक्की. भारतात एका दिवसात हजार एक बलात्कार तर होतच असतील ना. ते आपण गप गुमान सहन करतो. तिथे आपले मन मेले आहे. पण असा sensational issue समोर आला की जाज्वल्य अभिमान जाग्रुत होतो. तोड्फोड बन्द राडा करण्यातच आपण पटाईत.

Vijaykulkarni
Tuesday, March 04, 2008 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेम्स लेन ने शिवाजी महाराजान्चा केलेला अपमान या पेक्शा शम्भर पट निन्दनिय आणी किळसवाणा होता. आज जोधा अकबार ला विरोध करणार्‍यान्ची त्यावेळी काय भुमीका होती?

Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांनी पुण्यातील भांडारकर वाचनालयाला आग नाही का लावली? त्यांचे म्हणणे ते सगळे जुने ग्रंथ बामणांनी लिहीले, ते चुकीचे आहेत! जाळून टाका!

मग? तुम्ही काही पण कारण दाखवा, आम्ही राडा करूच. आम्हाला त्यातले काही कळत असो वा नसो.

राडा केला की प्रसिद्धी मिळते, मग सत्ता नि पैसा. मग कोण जोधा नि कोण शिवाजी!! असे आमचे नविन तत्वज्ञान आहे. Get with the program, wake up and smell the coffe, dude!!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators