| 
   | 
| संतु, तुम्ही जोधा अकबर पाहिला????
 
 
 |  | | Santu 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 12:03 pm: |       |  
 | 
 मि कशाला पहातोय पण
 टीव्ही वाले दाखवतायतना रोज. २४ तास
 रत्नांग्रीत कुठल्या थेटरात बघीतलास
 
 ता.क. ओकार्या काढणारा माणुस काल पासुन कुठ दिसला नाही
 
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 12:15 pm: |       |  
 | 
 अरेरे, पूर्वी हुसेनच्या चित्रांबद्दल झाला तसाच वाद परत. हा वाद वैयक्तिक पातळीवर न उतरो,  ही आशा आहे.
 
 खरे तर जो तो आपआपल्या परीने बरोबर असतो.   काही लोक हुसेनची चित्रे, जोधा अकबर हे केवळ कला या दृष्टीने बघतात.  काही लोक मात्र कले ऐवजी इतर दृष्टिकोनातून बघतात.
 
 मग कलावाले लोक म्हणतात, तुम्हाला अक्कल नाही.  व दुसरे लोक म्हणतात, तुम्हाला हिंदू धर्माविषयी अभिमान नाही!
 
 खरे तर, यात असे एक आहे तर एक नाही असे असत नाही.  कुणाला दोन्हीची चाड, समज, असू शकते.
 
 जर तसे असेल तर, लिहावे की केवळ कला या दृष्टीने माझे असे मत आहे, धर्माभिमान व इतिहासाच्या दृष्टीने माझे असे मत आहे.
 
 म्हणजे नक्की कळेल. नि उगीच वादावादी, एकमेकांवर आरोप होणार नाहीत.  वास्ताविक दोन्ही पक्ष आपपाल्या परीने चांगले हुषार, अभ्यासू असतात, तेंव्हा एकमेकांना नावे ठेवायची गरज नाही.
 
 असे आपले मला वाटते.  त्यात अडचण अशी की तरुणपणी संयम नसतो, नि राग भारी.  त्यामुळे असे होते, नि होत रहाणार.
 
 
 
 |  | टीव्हीवाले चोवीस तास जोधा अकब्रचा अख्खा पिक्चर दाखवतायत???
 झक्की तुमचे म्हणणे पूर्णपणे मान्य आहे. दुसर्या धर्माला नावे ठेवून स्वत्:च्या धर्माचा मोठेपणा मिरवणे म्हणजे धर्माभिमान का??
 मग आपल्यात आणि मिशनर्यात फ़रक काय राहिला??
 मी म्हणून वर लिहिलय की जोधा अकबर मोन्रंजनाच्या पातळीवर वरचढ होता.. तो तद्दन फ़िल्मी चित्रपट आहे हे मलाही मान्य आहेच ना..
   संतु, वैयक्तिक ताशेरे बंद करा.. तुमच्या बोलण्याचा रोख बरोबर समजलाय..
 
 
 |  | | Santu 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 2:00 pm: |       |  
 | 
 खाई त्याला फ़ुल्य फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या
 
 
 |  | | Santu 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 2:18 pm: |       |  
 | 
 झाक्कि अहो कसली ढेकळाची कला नुसता
 खोटरडे पणा आहे सगळा त्या फ़िल्म मधे.
 
 नंदीनी
 
 आणी ४०कोटि च्या सिनेमाची व १ कोटि च्या सिनेमाचि
 कसली बरो बरी करतेस.
 हिन्दकेसरि पैलवाना बरोबर जत्रेतल्या पैलवाना बरोबर जोड लावण्यासारखे आहे हे.
 तशी जोड लावायचि च तर "ट्रॉय" सारखा नितांत सुंदर
 चित्रपट रत्नागीरीत आला तर पाहा मग कळेल ऐतिहासिक
 चित्रपट कसा असतो ते.कुठेही ऐतिहासिक सत्या बरोबर तड्जोड नाहि. त्यात.
 तसेच किंग आर्थर पाहा.
 
 
 |  | | Peshawa 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 4:28 pm: |       |  
 | 
 तशी जोड लावायचि च तर "ट्रॉय" सारखा नितांत सुंदर
 चित्रपट रत्नागीरीत आला तर पाहा मग कळेल ऐतिहासिक
 चित्रपट कसा असतो ते.कुठेही ऐतिहासिक सत्या बरोबर तड्जोड नाहि.>>> ROTFL!!!!!!
 
 हे एखद्य  greek  माणसाला सांगून बघा! त्यातून  troy  ला नितांत सुंदर म्हणणे म्हणजे असो.... प्रत्येक गाढवाचा वेगळा गुळ...   :-)
 
 
 |  | मला एक समजत नाहिये.. आक्षेप नक्की कशावर आहे?? स्वत्: दिग्दर्शक म्हणतोय की जे पिक्चरमधे आहे ते १००% सत्य आहे असा माझा दावा नाही..
   
 ट्रॉय कशावरून पूर्णपणे फ़ॅक्ट्स वर आधारित होता... तो पण असाच एका दंतकथेवर आधारित होता ना??
 
 
 |  | | Tonaga 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 5:28 pm: |       |  
 | 
 ट्रॉय हा ऐतिहासिक चित्रपट आहे? धन्य धन्य... आम्ही तो होमरच्या महाकाव्यावरील समजत होतो...
 जय एकलिन्गजीकी...
 
 
 |  | | Mbhure 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 9:19 pm: |       |  
 | 
 मला जोधा अकबर चांगला वाटला. सर्वच ऐतिहासिक सत्य दाखवायचे म्हटले तर बरेचसे ऐतिहासिक सिनेमा वादग्रस्त होतील.
 
 अकबर हा एक राजा होता ज्याच्याकडे तोडरमल, बिरबल सरखे हिंदू नवरत्न दरबारात होते. ह्याने तो मोठा होत नसेलही पण वेगळा जरुर आहे.
 
 इतिहासाच्या ज्या बजूला आपण रहातो तसा तो वाटतो. उदाः जो एकासाठी स्वातंत्र्यसैनिक असतो तोचे दुसर्यासाठी अतिरेकी होतो. गांधी सर्वांसाठी बापू होते पण हरीलाल किंवा त्याच्यासारख्या समविचारी लोकांकरीता एक हट्टी, दुराग्रही माणुस होता.
 
 मला ह्या वादात पडायचे नाही पण एव्हढेच वाटते की एखादा चित्रपट म्हणुन पहातो तेंव्हा सगळे सत्य नसले तरी करमणुक मुल्ये मुख्य वाटली त्यात इतका राग का?
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Tuesday, February 19, 2008 - 10:31 pm: |       |  
 | 
 हे काहितरी शोधून मिळले(उंदीर शोधून काढावे तसे व तसेच इथील अतीरंजीत चर्चेला खायला काहीतरी (खाद्य) नी आम्हाला वाचायला
 http://en.wikipedia.org/wiki/Mariam-uz-Zamani
 
 एकुणच बरेच कन्फ़ुजन आहे आता. नक्की जोधा कोण?
 
 कोणीतरी खमंग रीवू मागीतला तर...
 
 मी सांगते
 पावणेचार तासाचा कंटाळवाणा मूवी. त्यात मी तरी ३ तास सहन करून चक्क घरी आले निघून.
 
 बाकी तुमचे चालु द्या.
 
 
 |  | | Deshi 
 |  |  |  | Wednesday, February 20, 2008 - 12:15 am: |       |  
 | 
 इतिहासाच्या ज्या बजूला आपण रहातो तसा तो वाटतो>>>>>
 
 बरोबर आहे भुरे. पण अहो आपण या बाजुचे आहोत नाहीका म्हणजे हिंदुस्थानी. तेच पाक च्या लोकानां अकबर ग्रेट वाटेल पण म्हणुन भारीयांनी त्याला ग्रेट म्हणावे का हा प्रश्न आहे. बाकी काही नाही. म्हणुन कदाचीत एवढी चर्चा चालु आहे.
 
 हरिलाल हा एक अंत्यत मुर्ख मुलगा होता बिचारा नंतर मुसलमान झाला इतका त्याला त्याचा बापाचा धर्माचा राग होता.  पण त्यामुळे गांधी सगळ्यासाठी हट्टी होत नाहीत.
 
 
 |  | | Santu 
 |  |  |  | Wednesday, February 20, 2008 - 4:46 am: |       |  
 | 
 टोणगा
 अरे होमर वाचुन तुला बहुदा १०० वर्षे झाली वाटते.
 मध्यंतरी ट्रॉय नावचे शहराचे अवषेश सापड्लेत बर का?
 
 आता हे म्हणजे भरवश्याच्या म्हशीला टो????????
 असे झाले.
 जय महिषासुर मर्दिनी
 
 पेशवा
 तुम्हाला अकबर गोड वाटला का?
 ढगात पळ्पुट्या बाजिरावाला आनंद वाटला असेल
 
 नंदिनी
 ट्रॉय कशावरुन फ़ॉक्ट वर अधारीत)))) उगिच ढगात ग़ोळ्या मारु नकोस
 
 
 |  | | Chyayla 
 |  |  |  | Wednesday, February 20, 2008 - 9:24 am: |       |  
 | 
 दीपांजली, मभुरे व नंदिनी तुम्ही म्हणता की हा चित्रपट १००% ऐतिहासिक सत्य नाही असे आशुतोष गोवारीकर म्हणतो. मग काय हरकत आहे? मला वाटत खरा आक्षेप असा की एकतर ते ऐतिअहासिक सत्य तर नाहीच शिवाय तो अपमानजनक आहे ज्यामुळे समाज जोडण्यापेक्षा (उदा: लगान) समाज तोडण्याचे, आपसात द्वेश वाढवणे हे योग्य आहे का?
 
 बाकी मला भारतातल्या माझ्या बहिणीकडुन ह्या चित्रपटाबद्दल माहिती मिळाली आणी ती मनुस्विनीच्या  Review  शी तंतोतंत जुळते. फ़ारच कंटाळवाणा व अनावश्यक पणे मोठा आहे.  गोवारीकरने भरपुर मेहनत घेउन जे भव्य सेट बनवले ज्यावर त्याने भरमसाठ खर्च केला ते त्याला दाखवण्याचा मोह आवरता आला नाही परीणाम त्याला चित्रपट मनोरंजक बनवता आला नाही, प्रेक्षक केवळ रुत्विक, ऐश्वर्या ला बघायचे म्हणुन जातोय. बर्याच पत्रीकान्नी, चॅनेलवाल्यानी, आंतरजालावर ह्या चित्रपटाचा छान  Review  दीला, कदाचित तो मार्केटिंगचा भाग असावा पण त्यापेक्षा मला सामान्य जनांची प्रामाणिक प्रतिक्रिया जास्त मोलाची वाटते.
 
 झक्की... हा माणुस खरच खुप महान आहे, आपल्या सगळ्यांचा आजा शोभुन दिसतो खासच
  काही असो मला यांचे विचार (कधी कधी) मनोमन पटतात 
 देशीला पुर्ण अनुमोदन..
 
 संतु आणी नंदिनी काय भांडताय रे तुम्ही नेहमी नेहमी आता टॉम आणी जेरीची उपाधी तुम्हा दोघाना द्याविशी वाटतेय, झक्कींचा रॉबिन आजकाल काही दिसत नाही त्यामुळे ही पदवी तशीच उपरी झाली होती.
 
 असो.. दीवे घ्या आणी असे भांडु नका.
   
 
 |  | | Chinya1985 
 |  |  |  | Wednesday, February 20, 2008 - 4:00 pm: |       |  
 | 
 बरं मनुस्वीनीनी चांगली लिंक दिलेली आहे. एकुणच सगळ प्रकरण समजलं. अशा चित्रपटाला राजस्थानवासीयांनी विरोध केला हे चुकिचे वाटत नाही. मला वाईट याच वाटत की या आशुतोश गोवारीकराने शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायला हवा होता या असल्या जोधा अकबराच्या खोट्या स्टोर्या खपवण्यापेक्षा. तो सर्वात प्रसिध्द मराठी दिग्दर्शक आहे त्याने शिवाजी महाराजांवर चित्रपट नाही काढायचा तर कोणी काढायचा???
 
 
 |  | | Savyasachi 
 |  |  |  | Wednesday, February 20, 2008 - 8:37 pm: |       |  
 | 
 शिवाजी राजांवरचा चित्रपट फक्त मराठी लोक बघतील रे. मग निर्मात्याला फायदा काय होणार?
 शिवाय त्यांच काही प्रेमप्रकरण पण नाही खपवायला. फार तर संभाजी राजांवर होऊ शकेल असा चित्रपट.
 
 चित्रपटात भव्यता, पोशाख सोडून दुसरे फार काही बघण्यासारखे नाही.
 मुली ह्रिथिकला पहायला जातात मुल ऐश्वर्याला. त्यातही ती आता वय झाल्याने तेवढी चांगली दिसत नाही.
 त्याच्या उघड्याने तलवारबाजीच्या शिण मधे एवढ काय वाखाणण्यासारख आहे (शरीरसंपदा सोडल्यास) हे मला कळले नाही. तिथे सलमान असता तर मात्र लोकांनी ओरडा केला असता सारखा शर्ट काढतो म्हणून
   कोणतीही मुलगी (निदान हिंदू) एखाद्या जनानखान्यात (तिथलीच एक व्हायचे म्हणून) जाताना तिथले वैभव बघण्याच्या मनस्थितीत असेल अस मला वाटत नाही. त्यामूळे ऐश्वर्याच्या चेहेर्यावरील भाव मला हास्यास्पद वाटले. अर्थात, आशूतोषने सांगितले असणार म्हणूनच. ईतर राण्यांचा बाजार दाखवायचा नाही म्हणून.
 खाजा गाणे चांगले आहे पण ते पहीले ३ लोक फार विनोदी दिसतात
   शेवटची फक्त दोघांची मारामारी आवडली.
 
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Thursday, February 21, 2008 - 3:30 am: |       |  
 | 
 शिवाजीचे सगळे चरित्र एकाच सिनेमात बसवणे कठिण आहे. आतापर्यंत भालजीनी असे अनेक चित्रपट काढले. इतर भाषातुनही असे प्रयोग झाले. जेमिनी गणेशनला, शिवाजी गणेशन हे नाव, या भुमिकेमूळेच मिळाले.
 
 सध्या जाणता राजा चा प्रयोग पुरेसा न्याय देतो पण त्याचे लवकरात लवकर चित्रीकरण झाले पाहिजे.
 पण मला अजुनही वाटते कि त्या प्रयोगाची भव्यता, चित्रपटात पकडणे कठिण आहे.
 
 प्रेमकहाणीच खपते, हे दुर्दैव आहे, नाहीतर विश्वास पाटलानी अनेक चरित्रे लिहुन ठेवली आहेत. पानिपतचे, रणांगण हे नाट्यरुपांतरही सुंदर आहे, पण त्याचे फारसे प्रयोग होवु शकले नाहीत.  (  कारण अर्थातच त्यात प्रेमप्रकरण नाही.  )
 
 
 |  | >> जेमिनी गणेशनला, शिवाजी गणेशन हे नाव, या भुमिकेमूळेच मिळाले.
 बाप रे! अहो जेमिनी गणेशन आणि शिवाजी गणेशन हे दोन वेगवेगळे नट आहेत. ते दोघं कॉंटेंपररी होते पण दोघे वेगळे आणि प्रसिद्ध(शिवाजी जास्त) आहेत. जेमिनी गणेशन रेखाचे वडील आहेत(गेले बिचारे!).
 हे बघा.
 http://www.rediff.com/entertai/2001/jul/27gemini.htm
 
 
 |  | | Santu 
 |  |  |  | Thursday, February 21, 2008 - 6:33 am: |       |  
 | 
 रेखा का वाह वाह
 मुलगि अशि तर वडिल कशे असतिल
 
 
 |  | | Tonaga 
 |  |  |  | Thursday, February 21, 2008 - 4:50 pm: |       |  
 | 
 एका हिन्दू मुलीच्या हिन्दू वडिलांचा असा अपमान? ? शिव शिव....
 
 
 |  | 
| मायबोली |  |  
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
   |