|
Santu
| |
| Friday, February 15, 2008 - 5:29 am: |
| 
|
अश्विनी अग काहि लोक वैश्विक झाल्या मुळे त्यांना आपल्या स्थानिक मान बिंदुचा पदोपदि मान भंग केल्या शिवाय आपली वैश्विकता सिध्द झालि असे च मुळि वाटत नाहि. त्याला काय करणार. यांना स्वधर्म, स्वराज्य अश्या शब्दा विषयी घ्रुणा असते. जेवढा परकिय आक्रमक तेवढा यांना प्रिय असतो. स्वतहा चा बाप वा आई हि केव्हा ना केव्हा तरी तरुण असतेच. तिच्या केव्हा त्याच्या तरुण पणी त्यानी पण काही चुका केल्या असतात्च. म्हणुन काहि कोणि त्यांचा आदर करणे सोडत नाहि. पण हे लोक स्वताच्या बापाला सुध्दा सोडत नाहित.
|
Slarti
| |
| Friday, February 15, 2008 - 6:12 am: |
| 
|
धोंडोपंत, तुमचा फटका आवडला  mathematical equations म्हणजे फक्त आकडेमोड असते का हो ? त्यामगे जी विचारपद्धती आहे तिचे काय ? त्यासकट विचार केला तर मी इथे मांडत असलेली 'mathematical equations' सुद्धा दिसायला लागतील. आता काही 'पारदर्शी सत्य' आढळली आहेत... उदा. प्रेतावर गिधाडे चोची मारतात हे खरे, पण तसे करून (अजाणता का होईन) पुढील गोष्टी करतात : प्रेत dissect करतात, ते खऊन 'पचवतात' अन् स्वच्छता राखण्यास मदत करतात. मृत्यू कोणास चुकलाय ? प्रेत कितीही थोर असले तरी ते तसेच ठेवले तर रोगराई पसरते. त्यापेक्षा खाऊन पचवलेले बरे, काय खरे की नाही ? आता प्रेताविषयी (फक्त) शोक व्यक्त करणारे लोक त्यांना हिणकस, ओंगळ, वैश्विक(ही शिवी कधीपासून झाली ? ) आणखी काय काय मानतात हे खरे. बिचारे.
|
भुतकाळात आणि भविष्यकाळात भ्रमण करणे शक्य आहे... ईथले वाचुन भ्रम व्हायची वेळ आली आहेच तेव्हा ते भ्रमण च की हो ईतिहासातले.. कस म्हंता? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असे रामदासस्वामी म्हणुन गेले आहेत. तद्वत : ईथल्या लोकानी मन प्रसन्न ठेवावे आणि मग लिहावे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असला पाखंडीपणा करु नये. पानाफुलावर प्रेम करावे, सुविचार वाचावेत, खेळावे.. म्हणजे मनातील मळभ दुर होवोन अवघी स्रीष्टी ही आनंदवनभुवन दीसो लागते... पण गाढवाला गुळाची चव काय?
|
Slarti
| |
| Friday, February 15, 2008 - 7:00 am: |
| 
|
अगदी खरे हो... मन प्रसन्न करा... उगीच का त्यांना समर्थ म्हणत ?! फक्त एक कुशंका... गाढवाने फुलापानांवर प्रेम केले, त्यामुळे ते खाल्ले नाही, गुळाची तर त्यास चव नाही... मग त्याने खायचे काय ? थोडक्यात, तुमची पोळी खावी आणि टाळी वाजवावी हे तुम्हास सुचवायचे आहे काय ? (काय सुचवायचे आहे अन् काय नाही हे मला पहिल्यापासूनच कळत नाही, त्यामुळे सपष्ट लिहा.)
|
वरती तुमी आणि ईतर भावानी ज्ये काई लिवल हाय त्ये समद आमच्या बी ध्येनात कुट येतय?... चांगल = वाईट आस काईतरी समीकरण जाहालय... त्ये पन तुमी शिध्ध करालच म्हना... देशासाठी मग ज्यानी आजपतोर जीव खर्ची घातला, खर्यासाटी ज्ये लडले.. त्ये समदे खुळे हुते म्हनायच.. कुनी द्येवाचा अपमान क्येला कुनी हाणली लाठी, कुनी आत्याचार केले तर ईचारस्वातंत्र्य म्हनायच.. कारन ईचारच शेवटी क्रुतीत प्रवत्रीत का परावर्तीत हुतात आस काईतरी गुरुजी आमाला शिकवायचे. आता पयल्यांदा त्याला ईचारस्वातंत्र्य द्यायच आनि मग क्रुतीस्वातंत्र्य मिळालच की.. ह्ये काईतरी येगळच हाय. तुमी काय ईचार करता त्ये लई म्हत्वाच हाय. डु वुई बीलीव ईन इंटरडीपेंडन्स ऑर नॉट? देर आर नान रीटन रुलस विच शुड बी फ़ोलोड बाय एवरीबडी डीस्पाईट ऑफ ईचारस्वातंत्र्य..! ह्ये आसल ईचारस्वातंत्र्य म्हनजे कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हायलय...
|
Zakki
| |
| Friday, February 15, 2008 - 3:37 pm: |
| 
|
अग काहि लोक वैश्विक झाल्या मुळे त्यांना आपल्या स्थानिक मान बिंदुचा पदोपदि मान भंग केल्या शिवाय आपली वैश्विकता सिध्द झालि असे च मुळि वाटत नाहि. या विधानाशी मी सहमत आहे.
|
Tonaga
| |
| Friday, February 15, 2008 - 5:58 pm: |
| 
|
बाकी हा बीबी बंद केला तरी चालेल. >>>>> ढोन्दोपन्ट, असे बी बी बन्द करून कसे चालेल? मग काय मायबोलीवर निकुम्भांच्या कविता वाचायच्या? अहो सापडेल तो प्लाटफोर्म बुद्धीभेद करण्यात वापरणार्यांची दुकानदारी बन्द नाही का होणार? ठराविक विषाच्या प्रचारासाठी(च)इथे येणार्यानी कुठे जावे? इतर बीबी वर ते कधी दिसले आहेत का? चालू द्या जगाच्या अन्तापर्यन्त हा बी बी चालू द्या. अहो लोकाना ओकार्या काढायची केवढी सोय! अहो शौचालये असतात मूत्रालये असतात पण ओकार्यान्ची सोय कुठे असते? म्हणे बी बी बन्द करा!!..
|
Ashwini
| |
| Friday, February 15, 2008 - 6:47 pm: |
| 
|
संतु, माफ करा पण मी सुद्धा सेक्युलरच आहे. आणि जोधा अकबरमध्ये काय दाखवले आहे किंवा काय दाखवावे किंवा मुळात हा चित्रपट असावाच का ह्याबाबतीत पुरेश्या माहितीअभावी माझे काहीही म्हणणे नाहीये. माझा विरोध होता तो, सहज जाता जाता पिंक टाकावी तश्या निष्काळजीपणाने लक्षावधी माणसांच्या स्फूर्तिस्थानाविषयी केलेल्या एका अतिरेकी विधानाला, इतकेच. त्या विषयावर बोलण्यासारखे काही उरलेले नाही कारण सगळाच जर शक्यतांचा व्यवहार असेल तर जगात प्रत्यक्षाचे प्रामाण्य अशी गोष्टच अस्तित्वात नसावी. तर मग आपण खरच जन्माला आलोय की तीही एक शक्यताच आहे हेही पडताळून पाहाणे संयुक्तिक ठरेल.
|
Yog
| |
| Friday, February 15, 2008 - 9:28 pm: |
| 
|
>"अशीच अमुची आई असती..." यातून जे ध्वनित होते ते त्या आईसाठी अत्यंत अपमानास्पद वाटत नाहीत का ? आईचा असा अपमान करून स्वतःचे औदार्य दाखवणारी ही कुठली संवेदनशीलता ?? >>सुमॉ, त्या उद्गारांचा ध्वनितार्थ मला खटकतो एवढेच. भावार्थ तुम्ही म्हणता तसाच असणार. असो. Slarti, तुमचे बाकी विचारमन्थन चालू दे पण असे अर्थ शोधत बसण्याचे (काढण्याचे) कष्ट का? जिथे एकाच शब्दाचे वा वाक्याचे शब्दार्थ, भावार्थ, मतीतार्थ, ध्वनीतार्थ वेगवेगळे होतात त्याला सूज्ञान्नी politics असे सम्बोधले आहे.. आता हेच उदाहरण बघा : "मायबोलीवर कुणालाही फ़ुकट लिहीण्याची सोय आहे" या वाक्याचे अर्थ: शब्दार्थ: पैसे न मोजता, फ़ुकट लिहा मतीतार्थ: मायबोलीवर लिहीण्याची सेवा सर्वान्साठी मोफ़त उपलब्ध करून दिली आहे तेव्हा त्याचा योग्य वापर करा.. ध्वनीतार्थ: कुणीही यावे व काहीही लिहावे.. गूढार्थ: जे रिकामटेकडे वा फ़ुकट बसले आहेत त्यान्न्च्यासाठी फ़ुकटचा timepass चलीतार्थ: (सध्ध्या वापरातील अर्थ)"हे" सर्वच फ़ुकट आहे.. भावार्थ: तेव्हडे Admin ला विचारा. तेच सान्गू शकतील. बघा यातला तुम्हाला कुठला अर्थ योग्य वाटतो वा लागू पडतो. >फक्त एक कुशंका... गाढवाने फुलापानांवर प्रेम केले, त्यामुळे ते खाल्ले नाही, गुळाची तर त्यास चव नाही... मग त्याने खायचे काय ? मला वाटत bb चुकला.. समानता bb वर हा प्रश्ण चर्चेस घ्यावा. असो. स्लार्ती, या पोस्ट वरून मि तुम्हाला वैयक्तीक काही बोलत आहे असा अर्थ मात्र मुळीच काढू नका. पेशव्या तू अलिकडे (इकडे) असा confused posts का टाकत आहेस..? तुझ्या गूढ कविता अधिक अर्थहीन भासतात मला. का ही तुझ्या पुनरागामनाची नान्दी आहे? दिवे घ्या रे.. आता विषयाला धरून कुणीतरी चित्रपटाचा खमन्ग review टाका बरे..
|
Saurabh
| |
| Saturday, February 16, 2008 - 1:04 am: |
| 
|
अगदीच रहावले नाही म्हणून, स्लार्टी, अकबर आणि छत्रपती ह्यांच्या एकाहून अधिक बायका असणे ह्यातील 'गुणात्मक' फ़रक तुम्हाला खरंच कळत नाही का? भोसल्यांच्या बळामुळे जर सोयरिकी झाल्या असत्या तर त्या करण्याचीच मुळात भोसल्यांना गरज पडली नसती. अपले सरदार निजामास, मुघलास जाऊन मिळणार नाहीत ह्याचा बंदोबस्त त्या बळानेच झाला असता. तात्पर्य मराठ्यांचे बळ हे अशा सोयरिकींमधुन निर्माण झाले / वाढले. ह्याउलट अकबराने मात्र स्वबळावर शत्रुचा निःप्पात केल्यानंतर सोयरिकी(!!!) जमवल्या. अजुन एक, ती सुभेदाराची सून वगैरे कथा काल्पनीक आहे (बाबासाहेबांनी सुद्धा तसे सांगितले आहे!).
|
स्लार्टी फकस्त mathematical language जाणतात. गुणात्मक फरक म्हणण्यापेक्षा.... [i2*e-34*6^4r2]*$44i - [68q0*y^6] formulates to an equation with limit delta tends to infinity, applying this and substuting the G value from equation 43 into euation 4433, we will get a difference value greater than zero which proves that there was a ... गुणात्मक फरक.... (हुश्श!). असल काहीतरी बबडायच. म्हजी तेस्नी पटतय..
|
Chyayla
| |
| Sunday, February 17, 2008 - 12:12 am: |
| 
|
तुमचे बाकी विचारमन्थन चालू दे पण असे अर्थ शोधत बसण्याचे (काढण्याचे) कष्ट का? योग, मलाही हे अजुन कळले नाही की स्लार्टींचा हा आटापिटा का? कोळसा कितिही उगाळला तरी तो काळाच राहणार. व चंदन कितीही उगाळले तरी सुगंध देण्याचे थांबणार नाही. हा गुणात्मक फ़रक राहणारच. अश्विनी, तुमचे सगळे मुद्दे पटले व सोबत तुमचा "प्रामाणिक सेक्युलर" पणा भाउन जातो. निदान "ढोंगी सेक्युलरिस्टांप्रमाणे" शिवाजी महाराजान्ना "लुटारु" वैगेरे तर नाही म्हटले. काहि लोक वैश्विक झाल्या मुळे त्यांना आपल्या स्थानिक मान बिंदुचा पदोपदि मान भंग केल्या शिवाय आपली वैश्विकता सिध्द झालि असे च मुळि वाटत नाहि. संतु लाख बोललात व मुद्याच बोललात. ता. क. : मला माझा नवीन आयडी वापरता येत नाहीये, त्यामुळे जुन्याच आयडीने पोस्ट करत आहे.
|
अकबराला ग्रेट नाही दाखवले तर आपण निधर्मी कसे ठरनार. त्या आशुतोश ला शिवाजी वर हिंदी चित्रपट काढायाचा पेक्षा जोधा अकबर करावा वाटले यातच सर्व नाही का? <<<<<<<<अरे पण त्या अशुतोश गोवारीकर नी कुठे चित्रपट 100% इतिहासाशी प्रामाणिक असल्याचा दावा केलाय ? नुस्ता कुठला reference वापरलाय तेवढेच उल्लेख केलाय movie सुरु होण्या आधी . आणि love story सुध्दा अशी असु शकेल एवढे फ़क्त अंदाज बांधलेत त्यानी . एक commerical चित्रपट म्हणून त्याच्या नायकाने आणि नायिकीन जसे असावे तसेच त्यानी दाखवलय . शिवाजी महाराजां वर चित्रपट काढायचा कि अजुन कोणावर हे त्याचे तो पाहून घेइल , एक commercial film maker म्हणून ज्यात सेलेबल मटेरियल आहे तेच तो बघणार ! मराठी इतिहासाचा अभिमान असणारे लोक ' वासुदेव बळवंट फ़डके ' सारखे चित्रपट का नाही यशस्वी करत ? गोवारीकर ने फ़क्त commercial फ़ायदा लक्षात घेउन चित्रपट बनवला आणि ते ही , इतिहास असाच होता असा दावा च केलाच नाहीये मुळात , मग एवढा V n C कशाला ?
|
वासुदेव बळवंत फ़डके असा पिक्चर आलाय बरं का!!!!अजिंक्य देव त्याचा नायक आहे. मराठी लोकांनी आधी तो पिक्चर पहावा मग जोधा अकबर पहावा
|
चिन्या , मला माहित आहे आणि तेच तर मी म्हणतेय कि ' वासुदेव बळवन्त फ़डके ' सारखे चित्रपट का नाही यशस्वी करून दाखवत हे मराठी इतिहासाचा अभिमान / आग्रह असणारे लोक ? परवाच रमेश देव च्या मुलाखतीत त्यानी हळहळ व्यक्त केली मराठी audience अशा movies कडे पाठ फ़िरवतो म्हणून . शिवाय भगत सिंग , मंगल पांडे हे पण movies असेच कधी आले आणि गेले कधी ते कोणाला कळलेही नाही ! आज काल गांधीवादाला ही ' गांधीगिरी ' म्हणावे लागते , बापुंना लोकप्रिय होण्या साठी मुन्ना कि बोली बोलावी लागते . मग अशा market मधे गोवारीकर सारखे लोक इतिहासाचे commercial version करून movies काढतील त्यात काय नवल !
|
सध्या 'जोधा-अकबर' सोडा पण वासुदेव बळवंत फ़डके हा चित्रपट यशस्वी व्हायलाच हवा. हा चित्रपट हिंदीत बनला असता,त्यात कोणी स्टार असता तर हीट व्हायचे चान्सेस नक्कि होते(म्हणजे तेव्हढ मनोरंजन करण्याइतका सिनेमा नक्कीच बनु शकेल). तु लिहिलेले मुद्दे बरोबर आहेत. आणि हेच आपल्या देशाच दुर्दैव आहे. पण आशुतोशनी लगान कसा काढला होता तसाही त्याला काढता आला असता ना!!!म्हणजे एक मुस्लिम राजा होता तो एका हिंदु मुलिशी लग्न करतो वगैरे पध्दतीने. म्हणजे ईतिहासाशी खेळ झाला नसता.
|
Tonaga
| |
| Monday, February 18, 2008 - 1:21 pm: |
| 
|
मग एवढा V n C कशाला ? >>>>> माझे वरचे पोस्ट बघ दीप्स.. ओकारी, निव्वळ ओकारी काढण्यासाठी येतात लोक इथे
|
Santu
| |
| Monday, February 18, 2008 - 1:30 pm: |
| 
|
अरे चिन्या आज सुध्दा कुणा हिन्दु बापाला आपलि मुलगी मुसलमानाला देवु वाटणार नाहि.मग त्याकाळची तर गोष्ट्च सोडा. हे वास्तव आहे मग सेक्युलर पिलावळी ला काहिहि वाटो( काहि बाटगे सेक्युलरिस्ट सोडुन ते काय लादेन ला पन आपलि मुलगी देतील) त्यामुळे त्याकाळी पळवुन नेलेली मुलगी ही तशी न नेता म्हणे प्रेमाने नेली असा सेक्युलर ( हि विशेषता नेहरुंचि त्यानी पण शिवाजि ला लुटरु म्हटले होते) खोटारडेपणा या अशुतोष नी का केला असावा
|
वासुदेव बळवंत फ़डके हा चित्रपट अतिशय बोअर आहे.. मी पाहिलाय.. चांगल्या विषयाची वाट लावलीये. त्यापेक्षा जोधा अकबर मनोरंजनाच्या पातळीवर नक्कीच वरचढ आहे..
|
Santu
| |
| Tuesday, February 19, 2008 - 6:52 am: |
| 
|
वसुदेव बळवंत फ़डके उत्क्रुष्ट चित्रपट पट आहे उलट जोधा म्हणजे तद्दन फ़िल्मि चित्रपट आहे. जोधा तलवार काय चालवते आणी काय काय थापा मारल्यात फ़क्त धुम मधला डान्स करायचा शिल्लक ठेवलाय. उलट अजिन्क्य देव अगदि हुबे हुब फ़डकेची दाहकता उभी केलिय. रितिक अकबर न वाटता रितिक वाटतोय. तर ऐश्वर्या तर सारखी buity parlur मधुन नुकतिच बाहेर आल्यासारखि दिसते. अर्थात काही बाटग्याना "आपला अकबरच" आवडणार म्हणा बोलो जय एकलींगजी कि
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|