Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2008

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through February 14, 2008 « Previous Next »

Amruta
Wednesday, February 06, 2008 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, बर झाल बाई तु त्या जयदिप बद्दल सांगितलस ते. काहि डोक्यात प्रकाशच पडत नव्ह्ता कोण असेल तो त्या बद्दल. पण कायच्या कायच भरकटली आहे ह मालिका. आणि मला हे कळत नाहिये कि ह्या बायकांना नवर्यांपासुन एवढ्या गोष्टी लपवता येतातच कश्या?? (माझ्या नवर्याला मी ह्या मालिकेत आज काय झाल हे पण त्याला ऐकायच नसताना पण सांगते:-))

आणि मला वाटल की ती स्वयंपाकाच काम करत्ये त्या कुटुंबात पण कुटुंबावर संस्कार करण्याच काम म्हणजे अगदिच हसुन हसुन पुरेवाट :-))

ए अग आणि सुबोध भावेला पोटात लागली ना गोळी??
चल या दुख:नो या चालु झाल. काय पण कुर्ता पुराण चाललय.


Sonalisl
Wednesday, February 06, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कुटुंबावर संस्कार करण्याची'!!!!! >>
ह ह पु वा :D
अचाट मालिकांचा सुचना फ़लक काढायला हवा आता

Anagha_vw
Wednesday, February 06, 2008 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोणी असंभव बघत नाही का?

Amruta
Wednesday, February 06, 2008 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंभव मधे सध्या त्या क्षिप्राचा सुलेखाने खुन केलाय आणि त्या प्रियाला माहित असुन पण ती पोलीसांना काहि सांगत नाहिये. उगिचच लांबट लावतात. बाकी शुभ्राच चालुच आहे. तिच्या डोक्यात सुलेखा शिरते (म्हणजे खरीखरी) तेव्हा तिला कळत. म्हणजे नक्कि काय होतय ते कळत नाही. जाउदे कळेल हळु हळु.
देवा मला आता मी काय लिहित्ये ते कळत नाहिये................


Vinaydesai
Thursday, February 07, 2008 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मला आता मी काय लिहित्ये ते कळत नाहिये................


Amruta...
वाईट नको वाटून घेऊस.. बहुतेक सिरियलच्या लोकांनाही माहीत नसतं ते काय दाखवता आहेत ते...

परवा माझी आई एक सिरियल बघत होती.. त्यात एक बाई दुसर्‍या बाईला एका वाक्यात 'घरातून बाहेर हो' सांगते. त्यानंतर पूर्ण २५ मिनिटे, सांगणारी, ऐकणारी, शेजारी उभी असलेली, आणि घरात काम करणारी अश्या चार बायकांचे चेहरे आणि बाहेर गाडीतून येऊन उतरताना (सतरा वेळा) चष्मा काढणारा बाप्या यावर गेली...


Manjud
Friday, February 08, 2008 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचा असंभवचा एपिसोड कोणी पाहिला? त्यात ती शुभ्रा भूलभूलैया मधल्या विद्या बालनची कॉपी करत्ये असं नाही का वाटलं?

Amruta
Friday, February 08, 2008 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच एपिसोड मिसला माझा :-(
विनय, सगळ्या मालिकांमधे असच होत असत नाहितर वर्षानु वर्ष कश्या चालणार ह्या मालिका?? :-)

Vinaydesai
Friday, February 08, 2008 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो मनुष्य गाडीतून उतरला तेव्हा त्याने चष्मा लावलेला होता.. त्यानंतर मोजून सतरा वेळा त्याने चष्मा काढला (एकदाही परत न लावता)... जादूगारावर सिरीयल असावी....


Kilbil
Saturday, February 09, 2008 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ई टिव्ही कोणी बघत नाही वाटतं. तिथे तर अजुनच भयानक मालिका चालु आहेत.

Dhanu66
Saturday, February 09, 2008 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंभव मध्ये, सुलेखा चे शुभा च्या डोक्यात शिरणे आणि हव तस करुन घेणे हे हेरी पॉटर मधुन घेतलय अस वाटत ( कारण त्यात ही असच काही आहे. ) बाकी सुलेखा च्या ज्या टिचर आहेत, ( काय बर नाव त्यांच ?) त्या, सुलेखा चा हेतु माहीत असुनही तिला का मदत करतात?

Sakhi_d
Wednesday, February 13, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंभव मधे क्षिप्रा स्वत:च्या हाताने फ़ास लावते मग तो दोरखंड पंख्याच्या पातीवरुन फ़ेकते आणि मग सुलेखा तीच्या पायाखालची खुर्ची ढकलते, मग तीला फ़ास बसतो पण त्या दोराची गाठ न मारताच फ़ास कसा काय बसतो???

Mi_anu
Thursday, February 14, 2008 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फास संमोहीत झालेली क्षिप्रा स्वत: बांधेल का आणि तो बांधल्याशिवाय फास कसा बसला हा तांत्रिक प्रश्न माझ्याही डोक्यात आला होता. सुलेखा दोराला पण हिप्नोटाइझ करु शकते का? क्षिप्रा कितीही चवळीची शेंग आणि सुंदर असली तरी एकंदर पंख्याची कीरकोळ शरीरयष्टी पाहता तो एपिसोड संपल्यावर लटकलेल्या क्षिप्रासहित पंखा लगेच खाली आला असेल असे वाटते.
आमचा पंखा जरा हात उंचावून पाती पुसायला लागलं तरी एका बाजूला वाकतो, पंख्यावर पूर्ण माणूस मरेपर्यंत यशस्वी लटकून कसा राहत असेल ही शंका माझ्या मनात पंखा पुसायला शिकल्याच्या वयापासून आहे!
मूळ मुद्द्याकडे: असंभव मालिका खूप रोचक बनत आहे. सुलेखा चा अभिनय जबरदस्त आहे आणि प्रिया शुभ्रा चा पण. इतर चालू रटाळ मालिकांच्या तुलनेत ही मालिका न चुकता पहावीशी वाटते.


Sanghamitra
Thursday, February 14, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> ही शंका माझ्या मनात पंखा पुसायला शिकल्याच्या वयापासून आहे!

आय ऍग्री. मालिकेचा डायरेक्टर पुरुष असेल, जन्मात कधी इकडची काडी तिकडं केली नसेल. लेट अलोन पंखा पुसणे. त्यामुळं त्याला अंदाज नसेल (समानता आणि पुरुष जन्मा नावाच्या दोन मालिका..आपलं.. बीबींचा परिणाम)
बाय द वे

>>इतर चालू रटाळ मालिकांच्या तुलनेत ही मालिका न चुकता पहावीशी वाटते.
हे कारण मला ही मालिका बघणार्‍या खूप मैत्रिणी सांगतात पण ट्रेलर बघूनच भिती वाटते.

Zakki
Thursday, February 14, 2008 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालिकेचा डायरेक्टर पुरुष असेल, जन्मात कधी इकडची काडी तिकडं केली नसेल. लेट अलोन पंखा पुसणे. त्यामुळं त्याला अंदाज नसेल

नि पंखा पुसताना फास लागायची भीति असेल तर यापुढे पुरुषच काय, बायका हि पंखा पुसायला घाबरतील! तो पंखा खाली जमीनिवर काढून मग पुसायचा असेल तर करावे स्त्रियांनी ते काम. पुरुषांनी केले तरी त्यांना पसंत पडतच नाही, मग उगीच भांडणे नकोत, या दूर दृष्टीनेच पुरुष घरकामाला हात लावत नाहीत.

पण बायकांना हे कसे कळावे? त्या आपल्या भांडतच बसतात. निदान आजच्या प्रेमदिनी तरी पुरुषांनी असे घरकाम न करून भांडण टाळावे.


Amruta
Thursday, February 14, 2008 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्राला तो फास बसत असताना माझ्या मनातही असलेच प्रश्ण येत होते. खरच पंख्याला माणुस पंखा न पाडता कसा लटकतो?? हं पुर्वीचे पंखे होते तसे भक्कम पण हल्लिचे अगदिच हलेडुले असतात.
बर मधे मी बघत नव्ह्ते त्यामुळे मलाही सुलेखाची हि टीचर कोण आहे हे मलाहि माहित नाहि. आणि ती तिला भेटली तरी कुठे??


Amruta
Thursday, February 14, 2008 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो मनुष्य गाडीतून उतरला तेव्हा त्याने चष्मा लावलेला होता.. त्यानंतर मोजून सतरा वेळा त्याने चष्मा काढला (एकदाही परत न लावता)... जादूगारावर सिरीयल असावी.... >>>

हे वाचताना मला विनय तुमचाच चेहेरा दिसला चश्मा काढताना सतरा वेळा. :-)


Asami
Thursday, February 14, 2008 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं पुर्वीचे पंखे होते तसे भक्कम पण हल्लिचे अगदिच हलेडुले असतात. >>हे कसे काय कळले तुला ग कोणाला लटकवलयस

Amruta
Thursday, February 14, 2008 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे रे मी अजुन लटकवायचय कुणाला तरी. अस म्हणायच कारण कि मागे नाहि क सीता और गीता मधे हेमा मालिनी पंख्यावर चढुन बसलेली. ते आठवल मला. :-)

Asami
Thursday, February 14, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह म्हणजे तू तशी पंख्यावर चढलीस नि तो तुटून खाली आला म्हणून म्हणतेयस होय. अग weight limit असते ना

Zakki
Thursday, February 14, 2008 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्याचे कारण पंखे हलेडुले असतात हे की ** भरपूर वजन त्यावर आले हे?**

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators