Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through February 15, 2008 « Previous Next »

Prajaktad
Wednesday, February 13, 2008 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी चे मुद्देसुद पोष्ट आवडले..बाकी आता मुळ विषयाला(..(जोधा-अकबर हा गोवारिकरचा चित्रपट) धरुन चर्चा करा.

Yog
Wednesday, February 13, 2008 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>असो, धुतल्या तांदळाप्रमाणे निष्कलंक चारित्र्य असलेल्या महापुरूषाविषयी काढलेले अनुद्गार पाहूनही त्याचा विरोध न करता गप्प बसणे हा गुन्हा आहे असे मला वाटले
अश्विनी, जाउदे सध्ध्या असे उपटसुंभागत लिहीण्याची एक फ़ॅशन आहे.यान्ची कीव करावी तितकी थोडी आहे. ज्यान्चे गुरू समर्थ रामदास अन माता जिजाबाई, त्या खुद्द शिवरायान्विषयी असे उद्गार आपलीच माणसे काढतात तेही कुठल्याही सन्दर्भाशिवाय (कदाचित यान्चे सन्दर्भ लालक्रान्तीतून किव्वा लेन सारख्या नेभळटान्च्या लिखाणातून घेतलेले असतील.)हेच "आपले" दुर्दैव आहे. जोधा अकबरबद्दल असे सोयिस्करपणे सन्दर्भहीन भाष्य अन चित्रपट करणे हाही त्याच विकृतीचा एक भाग.
हा चित्रपट निर्मिती, कला, दिग्दर्शन यात उत्तम असेलही (अर्थात प्रोमोज वरून तरी रेहमान ची तीच तीच अल्ला गाण्यान्ची मिसळ, अन rojaa, bombay पासून गुरू पर्यन्त त्याच त्याच चाली वापरून बनवलेल सन्गीत पाहून काही विशेष नाविन्य वाटत नाही)तरिही विषय अन हेतू प्रामाणिक नसेल तर its a waste of talent! "लगान" च्या निर्मात्याकडून हे अपेक्षित नाही.


Peshawa
Wednesday, February 13, 2008 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्या अरे दोन्ही बाजुने तुच बोलतोयस. त्या पिक्चरचे प्रोमो पाहा त्यात ऐश तलवार घेउन लढत लढत प्रेम करताना दाखविली आहे. मग कशी वाटते ब्याकराउंड. >>>

केदार अरे निदान जो चित्रपट त्याने बनवला आहे तो अधि पहा तर खरे... त्या अधिच जो हल्ला बोल चालु आहे तो निसंशय राजकीय माईलेज मिळवण्या साठिच आहे, कींवा भावना भडकवण्यासाठी...

जोधा तलवार घेउन प्रेम करताना दाखवली आहे. बर मग? झाशीची राणिचा नवरा अकाली मेला नसता तर आयुश्यभर भर ती राणी म्हणुन अंतर्महालीच राहीली असती. व तीनेही प्रेम तलवर घेउन केले नसते कशावरून? इतीहासाला ती एक योद्धा होती हे समजलेच नसते! तसेच जर जिजाबाइवर वेळ आली असती तर जिजा तलवार घेउन रणांगणात उतरली नसती का? जोधा तलवार चालवू शकत होती ह्यात ती एक independent व्यक्तीमत्व होती असे सुचीत करायचे असेल... अरे एखादे character screen वर adapt करताना दिग्दर्शकाला काही गोष्टि visually creat कराव्या लागतात. जोधाला तल्वार चालवता येत नव्हती असे इतीहासाने लिहुन ठेवल असते तर गोवारीकर्ला जोधा वेगळ्या पद्धतीने adapt करावी लागली असती....

actual history is few dots on canvas when one has to create a picture s/he connects them according to circumstantial evidence. Which by nature is subjective. As a result the resultant picture though has similar contours is subjective. which evidence to choose and how to interpret it is never unanimous. So there is always one official history which is chosen such that it is politically/socially least disturbing and then there are ideology driven interpretations .Under such situation हा चित्रपट गोवरिकर screen writer/ director चे इतीहासाचे interpretation असणार हे उघड आहे. इथल्या BB वर देखील एकाच इतीहासाचे अनेक interpretations लोक करतात. अशावेळेस त्याने कुणाशी faithful रहायला हवे? हिंदु संगठनांशी? इतीहासाची केवळ factual माहीती सांगायचीये तर he will write academic paper/book. तो कलानिर्मीती करतोय. call it His-Fi (similar to sci-fi) if you want to stress the fictious content of the narrative.

ज्याना हे interpretation पटले नाही त्यानी अजुन एक चित्रपत काढावा. ज्यात त्यांच्या द्रुष्टीने " खरी " अशी history दाखवावी... जोधाबाइ वरचे अनन्वीत बलात्कार detail मधे दाखवावेत. अकबराला रोज किमान १० अशा बायका पळवताना दाखवावे... कोण नाही म्हणतय?

ताक : केदार विशय जरी जोधा अक्बरचा असला तरि मुळ मुद्दा वेगळा आहे. भारतात 'जे आम्हाला वाटत तेच सत्य. तसच असल पहिजे' हा विचार घतक प्रमाणात वाढतो आहे. गोवरीकर ला इतीहासाचे त्याच्य द्रुष्टीने त्याला समजलेले interpretation करायचा अधिकार आहे की नाही? हा खरा प्रष्ण आहे. कुणाच्या भावना दुखावतात ह्या सबबी खाली चाललेली मुस्क्ट्दाबी प्रचंड हानिकारक आहे असे म्या पामराला वाटते.


Slarti
Wednesday, February 13, 2008 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, शिवाजी व अकबर दोघांचेही (या संदर्भातील) साधन (मुलगी, सोयरीक) व साध्य (स्वतःचे राज्य राखणे, वाढवणे) हे एकच होते हे मान्यच करायचे नसेल तर इलाज नाही. अकबराला जोधाकडून केवळ शरीरसुखाची अपेक्षा होती असे ज्ञात इतिहासावरून तरी मला वाटत नाही. त्यने बाकीच्या मुलींबाबत काय केले याचा इथे संबंध नाही.

महाराजांच्या 'बळजोरी'चा मुद्दा... मला तत्कालीन राजकारणात एक शक्यता वाटली. थोर असले तरी ते सरदार शेवटी माणसेच होती. उदा. काही सरदार मुघलांकडे जाऊ नयेत यासाठी pre-emptive उपाय योजले गेले याचा अर्थ ते सरदार कुंपणावर होते किंवा ते स्वराज्यात राहतील याची खात्री नव्हती. अशा वेळी त्यांना आकर्षित करण्यासाठी बळाच्या perception ची गरज नाही काय ? याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून बळ वापरले असा नाही हे स्पष्ट केले आहेच. पण त्या बळाचा विचार या सरदारांनी (स्वतःहून) केला असेल व पर्यायाने राजांना फायदा झाला असणार ही मला मोठी शक्यता वाटते. भले भले सरदारसुद्धा त्यांच्या दारी आले असतील पोटची पोरगी पदरात घ्या असे म्हणत तर ते सर्वच 'स्वराज्याला हातभार लावावा' अशा उदात्त हेतूने आले असतील हे मला शक्य वाटत नाही. मी जे म्हणतो यात महाराजांच्या बळाच्या धाकापेक्षा मला सरदारांच्या माणूसपणाकडे लक्ष वेधायचे आहे. त्या राजाकडे जी विचारझेप होती ती इतर फारच थोड्याजणांमध्ये होती. तशीच उत्तुंग झेप, दूरदृष्टी त्याच्या सर्व सरदारांमध्येही असेल असे मला वाटत नाही (जरी त्यांनी प्राणार्पण केले तरी). तेव्हा सोयरिकीपूर्वी भोसल्यांना असलेला जबरदस्त पाठींबा 'कोणीच' लक्षात घेतला नसेल हे मला शक्य वाटत नाही. हा विचार करून मुलगी देणे याचा अर्थ बळाला घाबरून मुलगी देणे असा होत नाही. तेव्हा ताकदीचा फायदा "झाला" हे तार्किक वाटले मला तरी, म्हणून लिहीले.

अकबराच्या बळजोरीचा मुद्दा... अकबराच्या जागी एखादा हिंदू सम्राट असता तर नक्कीच त्याच्या दारी स्वतःहून सोयरिकी चालत आल्या असत्या (जशा की भोसल्यांच्या दारी आल्या). अकबरालासुद्ध त्याच कारणामुळे (राज्यरक्षण, विस्तार इ.) अशा सोयरिकींची गरज होती, पण तो वेगळ्या धर्माचा असल्याने आक्रमण करून ती मिळवणे याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता. एक लक्षात घ्या, मी समर्थन वगैरे करतच नाही. केवळ विश्लेषण.

सुभेदाराच्या सुनेचा मुद्दा... ध्वनितार्थ तो होतो त्याला आपण काय करणार ? भावार्थ मला मान्य आहेच तेही मी संगितले आहे. शेवटी भावार्थ हा आपण रोपण करतो त्या इतिहासाचे ज्ञान असल्याने (उदा. इथे राजांचे मातृप्रेम), ध्वनितार्थ हा केवळ त्या उद्ग्रांशी निगडीत असतो. तरीही, मला जे वाटले ते इथे लिहीण्याचे औचित्य नव्हते हे मी मान्य करतो. असो.

अकबराचे अथवा शिवाजीचे कृत्य समर्थनीय वा अस्मर्थनीय ठरवण्याचा मुद्दा नाहीच. ते प्रयोजनच इथे उद्भवत नाही. माझा हेतू केवळ विश्लेषण एवढाच होता, आहे. तेही आखा अकबर व आखा शिवाजी असेही मला करायचे नसून केवळ 'जोधा अकबर' या संदर्भात करणे आहे. त्यात मी एका मर्यादेच्या बाहेर भावनिक होऊ शकत नाही हे मी मान्य करतो.
इतिहासाकडे objective पद्धतीने बघण्याचा एक प्रयत्न आहे एवढेच. तसे बघावे का हाही अर्थात मूलभूत प्रश्न आहेच.

समारोप Calvin चे विधान उद्धृत करून करतो. ते खरे की खोटे, गंमतीत घ्यायचे की गांभीर्याने हे ज्याचे त्याने ठरवावे...
History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.


Yog
Thursday, February 14, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>History is the fiction we invent
ऐकावे ते नवलच.. Calvin पण fictitious च होता का मग?

>ज्याना हे interpretation पटले नाही त्यानी अजुन एक चित्रपत काढावा. ज्यात त्यांच्या द्रुष्टीने " खरी " अशी history दाखवावी... जोधाबाइ वरचे अनन्वीत बलात्कार detail मधे दाखवावेत. अकबराला रोज किमान १० अशा बायका पळवताना दाखवावे... कोण नाही म्हणतय?

पेशव्या तुझे बाकी मुद्दे तात्विक दृष्ट्या विचारात घेतले तरिही this argument is far fetched.. . खरी अशी history मुद्दामून "दाखवायची" गरजच काय? (एकन्दरीत distortion बघता खरच अशी गरज आहे बहुदा..) अनन्वित बलात्कर "पडद्यावर" दाखवावे किव्वा नाही हा वादाचा (कलाकृती प्रदर्शनाचा) मुद्दा आहे, history चा नव्हे. अर्थात bandit queen style असे बलात्कार दाखविता येतील. तो मुद्दा नाहीये. धूम टू सारखे अकबर "बाई चोर" दाखवून दहा चोर्‍या दाखवायला हरकत नाही.. त्याला पकडणारे आधुनिक john, abhishek ही त्याच चित्रपटात दाखवावेत.. कदाचित हीट होईल.. जोधाबाईचा आयटम नम्बरही चालेल..:-)
hope u got my point...


Kedarjoshi
Thursday, February 14, 2008 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी व अकबर दोघांचेही (या संदर्भातील) साधन (मुलगी, सोयरीक) व साध्य (स्वतःचे राज्य राखणे, वाढवणे) हे एकच होते हे मान्यच करायचे नसेल तर इलाज नाही.>>>>>
एक दोन ऊदा देउ ईच्छीतो.
भवानीबाई ला महाराजांना शहाजादा मुअज्जमला देउन राज्य विस्तार करता आला असता. कारण मुअज्जम हा ओरंगजेबाचा मुलगा असुनही त्याविरुध्द बंड करत होता. (शिवाजी राजांना भवानी बाई नावाची मुलगी होती). पण त्यांनी तसे केले नाही. शिवाय जेव्हा महाराज कुतुबशहा कडे भाउ म्हणुन गेले होते तेव्हाही असे मुलींचे वा स्त्रीयांचे आदान प्रदान झाले असते पण तसे झाले नाही. तेव्हा तर कुतुबशहा कडुन वाटेल ते वदवुन घेता आले असते.

तिसरे उदा म्हणजे संभाजीचे. त्याला तर जिव व राज्य दोन्ही वाचविता आले असते.

यावरुन काय सिध्द होते त्यावर पण विचार कर.
म्हणुन शिवाजी व कुठल्याही मोगल ( वा त्या पुढे जाउन मुसलमान) राजाशी तुलना होऊ शकत नाही. कुठल्याही बाबतीत.


गोवरीकर ला इतीहासाचे त्याच्य द्रुष्टीने त्याला समजलेले interpretation करायचा अधिकार आहे की नाही? हा खरा प्रष्ण आहे.>>>>>

याचे उत्तर मी तिसर्याच पोस्ट मध्ये दिले आहे. ( कल्यान ची सुन व महाराजांची मनघटीत प्रेम क्था चे पोस्ट, तेच पोस्ट इथे लागु पडते).

ईतिहास हा आपल्या दृष्टीने पाहाता येत नसतो. तो जसा आहे तसाच असतो. कितीही गोरवशाली वा लाजिरवाना असला तरी.


Santu
Thursday, February 14, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लारटि
तिच्या मनाविरुध्द लग्न झाले प्रेम झाले हे स्पष्ट आहे का)))) तेच तर तुला सांगतोय तिच्या तिन भावाना बन्दि करुन त्याच्या गळ्यावर तलवार ठेवुन अकबराने तिची मागणि केलि हे ऐने अकबरि अबुल फ़जल्ने व बदायुनिने पण लिहिले आहे तसेच. स्मिथ च्या अकबर द ग्रेट या पुस्ताकात आहे मग हा प्रेम कहाणिचा खोटारडे पणा कशाला.
जर त्याला कल्पनेच्या भरार्‍या मारायच्या असल्या तर त्याला सिनेमाला दुसरे नाव ठेवता आले असते.
मुख्य म्हणजे त्यांचे लग्न झालेच नाहि तसा कुठलाही समारंभ झाल्याचे वर्णन नाहि. त्याच्या इतक्या बायका व रखेलि होत्या की सर्वाशी लग्न करणे त्याला शक्य हि झाले नसते.तेव्हा प्रेम होणे हे तर अश्यक्य कोटी
तिल गोष्ट आहे. हि सुध्दा बिरबल अक्बर कहाणी सारखी कपोल कल्पित कहाणी आहे.


Ashwini
Thursday, February 14, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिवाजी व अकबर दोघांचेही (या संदर्भातील) साधन (मुलगी, सोयरीक) व साध्य (स्वतःचे राज्य राखणे, वाढवणे) हे एकच होते
याच्याइतके विनोदी वाक्य मी कित्येक वर्षात वाचले नव्हते.

इतिहास पुन्हा एकदा वाचून पाहा Mr. Slarti , पहिल्यापासून.

शिवाजी महाराज
साध्य - हिंदवी स्वराज्य निर्माण करणे.
साधन - बारा मावळातले निष्ठावान मराठे एकत्र करून तयार केलेली जीवाला जीव देणारी सेना

अकबर
साध्य - परकीय भूमीवर परकीयांची राज्ये येन केन प्रकारे काबीज करणे
साधन - घात पात, फितुरी, मुली लुटणे इ.

वरती केदारने उत्तर दिलेलेच आहे. पण राज्य वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या वा शत्रूच्या लेकीबाळी पणाला लावल्याचे एक तरी उदाहरण दाखवून द्या. नुसते असे असले पाहीजे, असावे असे मला वाटते असे हवेतले बाण नको.

अकबराला जोधाकडून कसली अपेक्षा होती याबद्दल तुम्हाला काय वाटते तो तुमचा प्रश्न आहे. त्याने बाकीच्या मुलींबाबत काय केले याचा इथे कसा संबध येत नाही? मग कशाच्या जोरावर तुम्ही ते शिवाजी महाराज आणि अकबराची तुलना केल्याचे बिन बुडाचे विधान केले?


>>महाराजांच्या 'बळजोरी'चा मुद्दा... मला तत्कालीन राजकारणात एक शक्यता वाटली.
तुम्हाला ती शक्यता का वाटली याचे काही references आहेत का तुमच्याकडे? का सगळे नुसते शब्दांचे बुडबूडे? बळाचा विचार सरदारांनी (स्वतःहून) केला असेल आणि त्याचा राजांना पर्यायाने फायदा झाला असेल ही जी तुम्हाला भली मोठी शक्यता वाटते आहे त्याने फार तर ते सरदार मूर्ख होते असा अर्थ निघतो आहे. परंतु त्यावरून, आपल्या प्रचंड सैन्याच्या बळावर राजपुतांना ओलीस ठेवून त्यांच्या लेकींची प्रत्यक्ष मागणी करणार्‍या क्रूर मुघलांच्या पातळीला शिवाजी महाराज कसे जाऊन पोहोचतात, इतके की त्या दोघांच्या उद्देश्यामधला फरक काय हे तुमच्या सारख्या विचारवंत व्यक्तीला विचारण्याची पाळी यावी, हे माझ्या तरी अल्प मतिला कळत नाही बुवा.
मान्य आहे, सगळे सरदार अगदी 'सामान्य माणूस' होते. राजांची विचारझेप त्यांच्याकडे नव्हती. पण त्याने महाराज कसे दोषी ठरतात?

आणखी एक म्हणजे जेंव्हा ही लग्ने झाली तेंव्हा राजांचे साम्राज्य काही इतके वाढले नव्हते की त्याचा धाक वाटावा. इतर मराठा सरदारांसारखेच ते एक जहागिरदार होते. आणि मान्य आहे की 'स्वराज्याला हातभार लावावा' ह्या उदात्त हेतूनेही ते सरदार आले नसतील. पण चांगल्या घराण्यात मुलगी पडते आहे इतके कारण पुरेसे नाही का? त्यासाठी धाकच कशाला हवा?


>>सुभेदाराच्या सुनेचा मुद्दा... ध्वनितार्थ तो होतो त्याला आपण काय करणार ?
यासाठी खरच इतिहासाच्या ज्ञानाची (महाराजांचे मातृप्रेम) आवश्यकता आहे का? ते जरी माहित नसले तरी अर्थ खरच कळत नसावा का?
आणि तुम्हाला जर भावार्थ मान्य आहे तर त्यातून काय ध्वनीत होतय तिकडे तुम्ही कशाला लक्ष देता? इतके की त्यातून 'आईचा अपमान होत नाही का?' ही विधाने कशासाठी? आणि हे सगळा इतिहास माहित असताना लिहीण्याचे प्रयोजन काय?

हे म्हणजे एखादा मुलगा आपल्या बहीणीला म्हंटला, 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' तर त्यातनं ध्वनीतार्थ (वाकडा अर्थ) कुठला निघतो ते पाहायचे आणि त्याने किती वाईट भावना प्रदर्शित केल्या म्हणून ताशेरे झोडायचे असला प्रकार दिसतो आहे. दोष आपल्या दृष्टीचा आहे.

असो. माझ्याकडून हे शेवटचे पोस्ट आहे. कारण एकतर या bb चा हा विषय नाही आणि कुठलाही अधार नसलेली, बिन बुडाची वक्तव्ये किती seriously घ्यायची त्याला पण मर्यादा आहेत.


Peshawa
Thursday, February 14, 2008 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतिहास हा आपल्या दृष्टीने पाहाता येत नसतो. तो जसा आहे तसाच असतो. कितीही गोरवशाली वा लाजिरवाना>>>
तो जसा आहे तसा असला तर तो गौरवशाली आणि लाजिर्वाणा दोन्ही नसायला हवा नाही का? कारण गौरवशाली आणि लाजिर्वाणे हे बघणार्याच्या विचारांचे morals चे फ़लीत झाले.

शिवाजिचे आणि सुनेच्या प्रेम्कहाणीवर जरूर काधावा एखादा चित्रपट. ती सुन जाताना राजांचे जे रुप मनात घेउन गेली ते ती विसरु शकली असेल काय? शेवटी बाइ दिसलि कि पाघळणार्या, अनेक बायका करणार्या बायका पळवणार्या बायकांन्ना कस्पटासमान वागणुक देणार्या मुसल्मानाचीच बायको ती. जिला इतक्या सन्मानाची आदराची सवय नाही महाराजांचे वर्तन पाहुन त्यांच्या प्रेमात पडली तर नवल असेल का? त्या बाइला महराजांविशयी कधीच fantasy झाल्या नसतील का? सुर्य पाहिल्यावर उभे आयुश्य पुन्हा back to janaanaa झालेल्या त्या बाइवर जर्रोर चित्रपट होउ शकतो.

महराजाना त्या रुपाचा मोह पडला नसेल पण विसर पडला असेल काय? तिच्यारुपाने सुंदरतेचा महराजांना झालेला सक्शात्कार, त्यांच्या जिवनावर काय आणी कित्पत परिणाम करुन गेला असेल? हे इतीहास सांगु शकतो का? माणसाच्या अंतर्गत भावना इतीहास मांडतो का? असे अनेक प्रश्ण...

ह्यांची उत्तरे शोधली तर उत्तम चित्रपट बनु शकतो पण बनवणार्याला महराश्ट्रात रहाता येइल काय? असा चित्रप्ट काढला तर तो इतीहासाशी फ़रकत घेतो असे तुला वाटते का? इतीहास फ़क्त घटना सांगतो त्य घटनेचे पडसाद इतीहास नोंदवत नाही की प्रुथक्करण करत नाही.

तो जसा असतो तसा प्रत्येक वेळेस महीति असतो असेईह नाही!


Santu
Thursday, February 14, 2008 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन जा ताना राजांचे रुप घेवुन गेलि )))) अस कुठ लिहलय पुरावा द्या.
त्या बाईला fantacy झाल्या असतिल)))) किति ढील द्याल जरा थांबा. मांजा संपला हो.
महाराजांना रुपाचा विसर पडला असेल का?))))) अस कुठ लिहलय उगिच नाथ माधव छाप कल्पना विलास करण्यात काय अर्थ.
इतिहास पुरावा मागतो श्रीमंत पेशवे.
पण गोवरिकर इतिहास कार नसुन एक फ़ाल्तु बखर कार आहे.


Uday123
Thursday, February 14, 2008 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(कल्याण) सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी मानाने सोडले, ही बातमी महाराज गडावर पोहोचण्याच्या अगोदरच संपुर्ण वर्णनासकट गेलेली होती. सन्मानाने शत्रुच्या स्त्रीला सोडले या घटनेचा जिजामातेला खुप आनंद झाला आणी त्या स्वत: चार पावलं चालत महाराजांच्या स्वागताला सामोर्‍या गेल्या. स्वागताला या साठी की ज्या काही थोर उद्देशाने "स्वराज्याचे" रोपटे लावले होते, तो सफ़ल होत होता. ही एकच घटना स्वराज्यात सर्व जाती, धर्माच्या स्त्रिया सुरक्षीत आहेत याची ग्वाही देत होती.

महाराजांनी आपल्या कृतीने दाखवून दिले की शत्रुच्या स्त्री शी कसा व्यवहार करावा. धन्य तो सुपुत्र, आणी धन्य ती माता जिने असा सुपुत्र घडवला.

महाराजांनी त्यांच्या सेना-अधिकर्‍यांना/ किल्लेदारांना लिहीलेले एक पत्र आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होते. त्या पत्रात त्यांनी लहान मुले, स्त्रीया, सामान्य जनता, आणी शेती (पिकं) यांची आवर्जून काळजी घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. ते पत्र/ मजकुर आंतर-जालावर कुठे आहे का?




Santu
Thursday, February 14, 2008 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय
कल्याण च्या सुनेला महराजानी सोडले हि गोष्ट जरी वैयक्तिक
महाराजांचे च्यारित्र्य उजळ करणारी ठरलि तरी त्यामुळे
पद्मिनी,किंवा जोधा यांचा आत्मा स्वर्गात तडफ़डला असेल की आप्ल्या एका हिन्दु बांधवाने आपल्या विटंबने चा प्रतिशोध घेतला नाहि.

व या क्रुर कर्मि मुस्लिमाना सुध्दा त्यामुळे हिंदु स्त्रिया
आपल्या बापाचा माल वाटत. जर एखाद्या शिवाजीने वा पेशव्या ने. जर या स्त्रियांना मुसल्माना सारखिच treatment दिलि असती तर याचे डोळे उघडले असते.

त्यामुळे पुढे हजारो स्त्रिया जवळ जवळ( ५०००० मराठी स्त्रिया पानिपतात अब्दालि ने पळवुन नेल्या )कारण या बाबतित प्रतिशोध घेण्याची शिकवणच हिन्दु समाजाला कुणि दिलि नाहि.

उलट सदगुण विक्रुति ने हिन्दु समाज ग्रासला होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रुथ्विराज चौहान ने तिन वेळा घोरी ला पकडुन सोडुन दिले.
पण जेव्हा घोरि ने प्रुथ्विराजाला पकडले त्यावेळि असे केले नाहि.

जशास तसे हि क्रुष्ण निति हिन्दु विसरले हिच हिन्दु स्त्रियांची शोकांतिका आहे.

नुसते द्रौपदी ची विटंबना झाली म्हणुन
त्याने कौरवांचा नायनाट केला


Chinya1985
Thursday, February 14, 2008 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनीने लिहिलेल्या पोस्ट्स आवडल्या.पुर्ण अनुमोदन!!!

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.

हे जर खर असेल तर रामसेतु व रामाच्या अस्तित्वाचा पुरावा मागण्याचा दिडशहाणेपणा तुम्ही लोकांनी करु नये. कारण आमच्या व्हॅल्यु अजुन बदललेल्या नाहीत.

बाकी इतरही तुमचे मुद्दे पटलेले नाहीत पण अश्विनी व इतरांनी त्याला चांगली उत्तरे दिली आहेत. केदारच्या पोस्टवर विचार करा. बलात्कार करणार्या पुरुषावर पन स्त्री प्रेम करु शकते अस वाटल नव्हत.

पेशव्या तुझी February 14, 2008 - 2:43 am ची पोस्ट फ़ारच विचित्र आहे. अरे माणसा इथे इतर लोक हेच म्हणत आहेत की इतिहास जसा आहे तसा दाखवा. आता तु लिहिलेल्या फ़ाल्तु गोष्टी( fantacy काय आणि अजुन काय) याबद्दल इतिहासात कुठे लिहिले आहे???आणि कला म्हणजे वाट्टेल ते दाखवा असा अर्थ नाही. झालेला इतिहास तुम्ही नाट्यमय रित्या दाखवा की ज्याने मनोरंजन होईल त्याला कला म्हणतात. आता उद्या गांधीजींना सिरिअल किलर म्हणुन दाखवुन पिक्चर काढला किंवा हिटलरला संतपुरुष शांतीचा पुरस्कर्ता म्हणुन पिक्चर काढला तर त्याला काही अर्थ राहिल का??तु तसा पिक्चर पहायला जाणारा एकटाच असशील.

भारतात 'जे आम्हाला वाटत तेच सत्य. तसच असल पहिजे' हा विचार घतक प्रमाणात वाढतो आहे.

याला कारणीभुत लाल बावट्यावाले सेक्युलरवादी आहेत. ते मोघलांना फ़ारच सज्जन दाखवायचा प्रयत्न करतात आणि मराठ्यांना स्वार्थी कृर दाखवायचा प्रयत्न करतात. रामाला ईजिप्तचा राजा बनवतात(राममंदीर च्या वेळी असा 'शोध' लावला होता),आता तर म्हणतात राम अस्तित्वातच नव्हता. मग इजिप्तच्या रामाच काय झाल??वेळोवेळी इतिहासाशी खेळ करायचा आणि तु म्हणतो तशी फ़िक्शन,फ़ॅन्टसी कलेऐवजी academic paper-book मधे खपवतात. त्या मानसिकतेविरुध्द तु काहीतरी कर.

जशास तसे हि क्रुष्ण निति हिन्दु विसरले हिच हिन्दु स्त्रियांची शोकांतिका आहे.

संतु जशास तसे ही कृष्ण नीती इतकीही खालच्या दर्जाची नाही. धर्माचे काही नियम असतात ते पाळुनच जशास तसे करावे नाहीतर द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा बदला पांडवांनी त्याच पध्दतीने घेतला असता. पण तसे झाले नाही.

Tonaga
Thursday, February 14, 2008 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी नव्हे ते पेशवा फारच सेन्सिबली लिहितो आहे इथे....

लगे रहो पेशवे. तुला घेरलाय चौकडीने लेकिन डरो मत. इन्शा अल्ला बचेंगे तो और लडेंगे.........


Kedarjoshi
Thursday, February 14, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा २ ४३ चे पोस्ट. या पोस्ट बद्दल मला काही लिहायचे नाही.

पण आत्ता बातम्या पाहाताना दोन बातम्यानी माझे लक्ष वेधले. दोन्ही ईतिहासा संबधी आहेत. आणि पेशव्याने मांडलेल्या विचाराशी (म्हण्जे माणसाचा अंतर्गत भावना विषयी ) आहेत. ज्या दुसर्या व्यक्तींना कळाल्या.

पहीली बातमी दिल्ली च्या विश्व विद्यालयात आपल्या पंतप्रधानांच्या मुलीने संपादीत केलेले पुस्तक अभ्यासाला आहेत त्यात राम, सिता, लक्ष्मन व हनुमान याच्यां चारित्र्याविषयी बरेच काही लिहीले आहे. जसे हनुमानाचे सिते सोबत प्रकरण होते वैगरे.

दुसरे उदा. लंडन च्या एका विदुषीने राणी लक्ष्मी बाईचे एका ब्रिटीश मेजर सोबत लफ्डे होते असे मांडले आहे. पण त्याबाबत तिला अजुन पुरावा देता आलेला नाही. तिच्यावर झांशी च्या वकीलाने केस केली आहे.

सही आहे हे एकंदरीत. वैयत्कीक विचार स्वांतत्र्य.


Peshawa
Thursday, February 14, 2008 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे हे एकंदरीत. वैयत्कीक विचार स्वांतत्र्य.>>>

केदार इतीहास as a scientific discipline मधे ज्याला पुराव नाही ते खरे नाही हाच एक्मेव rule लागु होतो. त्या तीथे व्यक्ती स्वतंत्र्याला अजीबात जागा नाही.


Kedarjoshi
Thursday, February 14, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तेव्हा पासुन मी हेच म्हणतोय की व्यक्ती स्वात्र्याला जागा नाही तेथे पुरावेच लागतात. आता तु, मी जे आधी पासुन म्हणतोय त्याला दुजोरा देत आहेस. पुरावे नसतील तर आपल्या मनाप्रमाने काही विचार करता येत नाही व घटना वाट्टेल तशा मांडता येत नाही. मग ते हनुमान सिता असो वा जोधा अकबर असो.

Slarti
Friday, February 15, 2008 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तू जी उदाहरणे दिली आहेस ती योग्य असली तरी मला त्यात subtlety वाटते. राजकारणासाठी स्थळाचा वापर हा मुख्य मुद्दा... मग 'स्वधर्म की परधर्म, स्वराज्य की परकीय राज्य, आक्रमण की राजीखुशी' हे उपमुद्दे आहेत. अर्थात, असे बघणे हा माझा दृष्टीकोन झाला, हे खूपच विलगीकरण आहे हे मान्य, तसे factors वेगवेगळे करून चिकीत्सा करणे आणि मग हळूहळू ते सर्व संपूर्ण चित्रासाठी जोडणे अशा प्रकारेही इतिहासाकडे बघता येते. ही प्रक्रिया चलू असताना त्यातील प्रत्येक पायरीला मी जे काही निष्कर्ष काढतो ते त्या पायरीपुरते असतात याचे भान मला आणि इतरांनाही असणे महत्वाचे आहे.

अश्विनी, वरील उत्तर तुमच्यासाठीसुद्धा. महाराजांनी आयुष्यभर साधन म्हणून काय वापरले व मुघलांनी काय वापरले हे सर्वज्ञात आहे. अभिमान / द्वेष इ. भाव न बाळगता केवळ तटस्थपणे इतिहासाकडे बघण्याची इच्छा. इथे येण्यामागे 'प्रातःस्मरणीय नेत्याचा अपमान सहन न होणे आणि त्याविरुद्ध न बोलणे हा गुन्हा असणे' ही जी भूमिका आहे तिथेच मुळात एक रंगीत चष्मा लावला जातो, नाही का ? तो काढला तर कदाचित माझे म्हणणे, ते पटो वा न पटो, निदान समजायला सोपे जाईल. तुम्हाला 'विनोदी वाटणे' किंवा 'मतीच्या बाहेर वाटणे' याचा पुरावा मागत नाही. ते तुम्ही खुद्द सांगत असलात तरी माझ्या दृष्टीने ती एक शक्यताच आहे.


Santu
Friday, February 15, 2008 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणग्या
टोणग्या तुझा अल्ला गेलाय लादेन बरोबर
चहा प्यायला.
तो काहि तुझ्या सहाय्याला येणार नाहि.


Dhondopant
Friday, February 15, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग.. काय म्हणता? Slartee ते तुमच mathematical equations च्या साहाय्यने काही prove करता येत का ते पहा. म्हणजे " हा सुर्य आणि हा जयद्रथ " असे म्हणुन मोकळे होता येयील. म्हणजे सर्वच कसे पारदर्शक.. की कुणाच्या मनात काय होते आणि सर्व details पण समजतील. आम्ही त्या दीवसाच्या " ईंतजार " करु... कुणाचा तरी थेरम असेलच ना past event formulations वगैरे...

बाकी हा बीबी बंद केला तरी चालेल.

दीडकीची भांग घेतली की काय वाट्टेल त्या कल्पना सुचतात.




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators