Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 13, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through February 13, 2008 « Previous Next »

Slarti
Tuesday, February 12, 2008 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, त्या उद्गारांचा ध्वनितार्थ मला खटकतो एवढेच. भावार्थ तुम्ही म्हणता तसाच असणार. असो.

Prajaktad
Tuesday, February 12, 2008 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी महाराजांचे ७ ही लग्न हे त्यांच्या मर्जीविरुद्ध झालेले आहेत.. त्याचा(सोयरिकिचा) संपुर्ण उद्देश राज्याची सुरक्षितता आणी सोयरकीनिमीत्ताने येणारा राज्यविस्तार हाच होता.
त्यांनी कुणालाही तलवारिच्या जोरावर लग्नाला उभे केले नाही..कि पळवुन आणले नाही.. त्यांची अकबराशी आणी त्याच्या तथाकथित प्रेमप्रकरणाशी तुलनाच होवु शकत नाही.
शिवाय, त्यांचा प्रथम विवाह सई बाईंशी लहान (बाल विवाह प्रथेनुसार )वयात झाला आहे.दुसरा विवाह त्यांच्या वडलांच्या मर्जीखातर लहान वयातच झाला आहे.
बाकी विवाह वर लिहल्याप्रमाणे मराठा सरदार निजाम नाहितर मोगलांना जावुन मिळु नयेत म्हणुन ही झाले आहेत.


Prajaktad
Tuesday, February 12, 2008 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी महाराजांचे ७ ही लग्न हे त्यांच्या मर्जीविरुद्ध झालेले आहेत>>>अर्थी की महाराज स्वत्: अनेक विवाहांच्या विरोधात होते.


Slarti
Tuesday, February 12, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, माझे १२ फेब चे ८:११ चे पोस्ट वाचा. मी जे म्हणत आहे (उद्देश सारखा असण्याचे) तेच तुम्ही सविस्तर मांडले आहे.

Marhatmoli
Tuesday, February 12, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti ,

मला वाटत इथे सगळ्यांच म्हणण एवढच आहे कि शिवाजि महाराजांचि तुलना अकबराशि होवु शकत नाहि कारण एक व्यक्ति म्हणुन त्या दोघांचि पातळि वेगवेगळि होति.

एक उदाहरण म्हणुन बघा कि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळि त्याना विधिवत क्षत्रियत्वाचि दिक्षा घ्यायचि होति. त्याचा एक भाग म्हणुन महाराजांना मौंज, सोडमौंज आणि विवाह (ब्रम्हचर्य आणि गृहस्थाश्रमाचे प्रतिक म्हणुन) करायचे होते. पण महाराजांनि विवाह करण्यास नकार दिला कारण महाराजांच वय त्या वेळेला सुमारे ५५ वर्षे होत आणि वधुच वय त्या काळानुसार ८-१० वर्षे असणार होत. एका कोवळ्या मुलिच्या आयुष्याशि खेळण (त्या काळि समाजमान्य असुनहि) महाराजांना योग्य वाटल नाहि.

पण सगळेच मराठि राज्यकर्ते असे होते असहि नाहि. पानिपतच्या युध्धात सदाशिवराव भाउंनि नानासाहेब पेशव्यांच्या कडे कुमक मागितलि होति. तेन्व्हा नानासाहेब कुमक घेवुन पुण्यावरुन रवाना तर झालेत पण मध्यप्रदेशात स्वत:साठि मुलि बघत बसलेत, आणि ति कुमक शेवट्परयंत सदाशिवराब भाउंना मिळु शकलि नाहि (तिकडे युध्ध आणि इकडे ननासाहेबांच लग्न एकाच वेळि झाल). पानिपत च युध्ध मराठे हरले याच हे एक महत्वाच कारण आहे.

शिवाजि महाराज हे एकुणच काळाच्या पुढे असलेले द्रष्टे होते त्यांचि अकबराशि काय इतर कोणाशिहि तुलना होवु शकणार नाहि.



Chinya1985
Tuesday, February 12, 2008 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्तींनी मांडलेला मुद्दाच चुकिचा आहे. इतरांनी उत्तरे दिलिच आहेत.

Peshawa
Tuesday, February 12, 2008 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ ) जसे मुस्लिम आक्रमकान्नी हिंदु मुलीन्ना जबरदस्तीने पळवुन किंवा तडजोड करवुन लग्न करणे. अशा प्रकारामुळे कित्येक राजपुत स्त्रिया ह्या अकबराच्या बायका होत्या त्याने काय फ़रक पडतो. कोणत्याही मार्गाने हिंदुच्या मुली पळवणे हा तर त्यांचा हक्कच. आणी त्या हक्कावर गदा आणणे म्हणजे धर्मनिरपेक्षता खतरे मे है. >>>>>


त्याने काय फ़रक पडला ते जो इतीहास पुढे घडला तो दर्श्वतो आहेच. राज्पुतां सारख्या बलाढ्य अंकित राजांमुळे मोगली सत्त भरत्भर पसरली. एकिकडे राण प्रताप सारखे रज्पुत होते व दुसरी कडे तडजोड करणारे राज्पुत होते. हे त्या इतीहासाचे सत्य आहे.

असा तडजोड करणारा राज्पुत शिवजीवर चाल करून आला होता. त्याने त्या राज्याचा पुरता बिमोड करुन मोगली सत्त वाढवली होती. मोगलांचे दुर्दैव हे की शिवजि शेरास सवाशेर निघाले. पण ह्या तडजोड करणार्या रज्पुताने मोगली सत्तेला काय दिले हे डोल्यासमोर आहे.

चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटोर वर अक्रमण केले तेंव्हा जो संधी झाला तेंव्हा सेलुकस निकेतोर ने आपली मुलगी चंद्रगुप्ताला दिली. ह्यात धर्म कोठुन आला हे राजकारण होते ज्यच्या पटावर घरातल्या स्त्रिया प्याद्यांसारख्या वापरल्या गेल्या...

ही सगळि background अशुतोश कशि पकडतो हे मला पहायचे आहे... एका बाजुला राणप्रताप सारखे राज्पुत दुस्र्या बाजुला बिलमल सारखे राजे. पटावर प्याद्या सारख्या वापरलेल्या बायका. जेंव्ह अशि बाइ अकबराकडे लग्न होउन गेली तेंव्हा ती कशि वागली असेल? अशाही काही असतील ज्याना हा जुलमाचा रामराम अयुश्यभर सलला असेल. कहींना काहिच फरक पडला नसेल काही नी जे घडतय ते डोळस पणे पाहिले असेल. जोधा ह्यातली कुठली असेल?

हे चित्र्पट बगुनच कळेल त्या अद्धि तुम्ही जे चालवलय ते केवळ राज्कारण धर्माच्या नावाखली. पुन्हा एकदा स्त्रियांनाच प्यादी बनवून असे पुन्ह मझे मत आहे (ज्याला फ़रशि किंमत नाही)
:-)

Kedarjoshi
Tuesday, February 12, 2008 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटोर वर अक्रमण केले तेंव्हा जो संधी झाला तेंव्हा सेलुकस निकेतोर ने आपली मुलगी चंद्रगुप्ताला दिली. ह्यात धर्म कोठुन आला हे राजकारण होते ज्यच्या पटावर घरातल्या स्त्रिया प्याद्यांसारख्या वापरल्या गेल्या>>>>

ही सगळि background अशुतोश कशि पकडतो हे मला पहायचे आहे>>>
जोधा ह्यातली कुठली असेल? >>

पेशव्या अरे दोन्ही बाजुने तुच बोलतोयस. त्या पिक्चरचे प्रोमो पाहा त्यात ऐश तलवार घेउन लढत लढत प्रेम करताना दाखविली आहे. मग कशी वाटते ब्याकराउंड. ह्या बीबी च्या दुसर्या की तिसर्या पोस्ट मध्येच मी हे लिहीले आहे.

राहता राहीला प्रश्न सलिम चा. अकबराला तिन मुल होते. सलिम, मुराद आणि दनिल (बहुतेक). त्यातले नंतरचे दोघे अकबराचा हयातीतच मेले. मग उरला सलिम जो जोधाचा मुलगा होता. मग वारसच कोणी नाही म्हणुन हिंदु स्त्रीचा मुलगा सलिम हा राजा झाला. त्यातही सलिम ने आधीच बंड केले शेवटचे ४ की ५ वर्ष अकबराला सलीम्चे बंड थांबवावे लागले. त्या वर्षात त्याला काहीही करता आले नाही कारण गादी जायची. ईथे सलिम ला मात्र अप्पर ह्यॉन्ड होता कारान तो अर्धा राजपुत होता. मग हिंदु राजांनी त्याला साथ दिली.

चंद्रगुप्ताचे उदा वरवर सारखे वाटत असले तरी ते लागु होत नाही.
त्याची बायको यवनी ( ग्रिक ) असल्यचा जसा उल्लेख आहे तसाच त्याने युध्द संपल्यावर केलेल्या शांततेचा आवाहनाचा ही आहे. ( ref Cambridge history of India ) त्याने वा त्याचा सैन्याने तिकडच्या स्त्रिया राजरोस पळवील्या नाहीत जे कोणी कितीही नाही म्हणाले तरी मोगल ते करत होते. त्यामुळे हे वेगळे उदा वाटते व एकाच मापात तोलता येत नाही.
आणि एका ईतिहासकाराच्या नुसार ते लग्न हे युध्द न होता व्यापार वाढी साठी लागले आहे. ज्यामुळे ईंडो ग्रिक वखारी स्थापण झाल्या. ( History of India, Stanley wolpert ) पण आपण येथील चर्चे साठी ते य्दुध्दामुळे झाले असे समजुयात.

तुझा मुद्दा (स्त्रीयांना वापरन्याचा) बरोबर आहे पण तो धर्माचा चश्मा लावला की वेगळा होतो कारण खुप कमी हिंदु राजांनी स्त्रीया प्ळवुन आनल्या आहेत पण बहुतांश लोकांनी तसे केलेले नाही. ओरंगजेबा नंतर जेव्हा पेशव्यांचा उदय झाला तेव्हा आपण म्हण्जे मराठे हेच हिंदुस्थान चे राजे होते पण मला एक तरी उदा दाखव की अनेक सरदारांचा पराभव केल्यावर (मुसल्मान वा राजपुत पण) मराठ्यानी त्यांचा स्त्रीया लाटल्या वा बळजबरीने पळवुन आणल्या. ( ईथेच आपण नी मोगल वेगळे, हां आपण पैसे लाटले पण तो मुद्दा वेगळा).


Ameyadeshpande
Wednesday, February 13, 2008 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>महाराजांनि विवाह करण्यास नकार दिला कारण महाराजांच वय त्या वेळेला सुमारे ५५ वर्षे होत

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ मधे झाला ज्यावेळी त्यांचं वय ४७ होतं. त्यांचा मृत्यू ५३ व्या वर्षी (१६८० साली) झाला.

Slarti
Wednesday, February 13, 2008 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, स्त्रिया उपभोगण्यासाठी पळवणे वेगळे आणि काही व्यूह मनात ठेवून 'पळवणे' वेगळे.
राजपूत स्त्रिया केवळ उपभोगार्थ पळवल्या असत्या तर त्या राजपूत घराण्यांचे इमान मुघलांना लाभले नसते. त्यासाठी ती बाई जनान्यात राजपुतांच्या संमतीने येणे आवश्यक होते. आता ती संमती मिळवण्यासाठी बळाचा वापर केला त्यांनी हे खरे... तेच चंद्रगुप्ताने केले. भोसल्यांनासुद्धा त्यांच्या ताकदीचा उपयोग झालाच... जरी त्यांनी तो जाणूनबुजून केला नाही. त्या perceived ताकदीशिवाय त्यांच्या सोयरिकीस सर्व सरदार तयार झालेच नसते. (किती जण हिंदवी स्वराज्याचा विचार करून सोयरे झाले ? किंबहुना, हिंदवी स्वराज्याचा विचार इतर सरदारांतही तितकाच असता तर सोयरिकीची गरजच भासली नसती. तेव्हा, मुलगी करून भोसल्यांनी स्वराज्यासाठी इमान मिळवले. हा 'व्यवहार' शिवाजीला करावाच लागला, इच्छा असो वा नसो.) बळाचा सकृत् दर्शनी वापर करण्याची प्रत्येक वेळा गरज नसते, बळाची समाजाला असलेली जाणीवही (perception) तितकीच, किंबहुना जास्त महत्वाची. (यामुळेच माझे शिवाजी व अकबरासंबंधीचे विधान. असो.)
आता प्रश्न आहे पराभूत सरदारांच्या बायकामुली पळवण्याचा... इथे मात्र तो धार्मिक / सांस्कृतिक फरक येत असावा. म्हणजे मुघल जिथून आले तिथे अशा बाया पळवणे हा युद्धाचा, शत्रुत्वाचा एक भागच समजला जात होता का ? घरातील स्त्री आणि उत्तम अरबी घोडा हे दोन्ही जर मुघलांस सारखे असेल तर त्यांची कृती त्याप्रमाणे होईल. इथल्या समाजात स्त्रीकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. स्त्रिया पळवणे हे येथील समाजासाठी निंदनिय होते, आहे, त्याला "त्यात काय एवढे ? हे तर होणारच!" अशी राजमान्यता व समाजमान्यता नव्हती. इथल्या लोककथा, महाकाव्ये याची साक्ष देतील. त्यामुळे पराभूतांचा अरबी घोडा (= संपत्ती) मराठ्यांनी घेतला, स्त्रिया नाहीत (निदान बहुतांशी तरी नाही). हे एक झाले. अजून एक कारण पुढे देतो.
अशा बायका पळवल्याने शत्रूचे खच्चीकरण कितपत होते हेही आहेच. म्हणजे मुघल सरदारांच्या बायका पळवल्याने त्यांच्यावर येणारी नामुष्की आणि हिंदू सरदारांवर येणारी नामुष्की यांच्यात प्रचंड तफ़ावत असू शकते. हे जसे मुघलांनी जाणले तसे मराठ्यांनीही जाणले असावे. थोडक्यात, स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक आणि त्या फरकाची दोन्ही बाजूंस जाण असणे यातून दोन्ही बाजू तशा वागल्या असा एक विचार केला जावा.

आता निव्वळ उपभोगार्थ स्त्रिया पळवणे... तेव्हा मराठ्यांनी बंगालात केलेले अत्याचार विसरून कसे चालेल ? शेवटी माणूस इथून तिथून सारखाच.


Psg
Wednesday, February 13, 2008 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२-३ दिवसांपूर्वी आशुतोषची मुलाखत वाचली त्यात त्याने सांगितले आहे की जोधा बरोबर अकबरचा विवाह हा contract marriage सारखा होता.. म्हणजे मी तुला मुलगी देतो, तू मला संरक्षण दे.. असा. ते 'प्रेमलग्न' वगैरे नव्हते. पण लग्नानंतर जोधा स्वत:च अस्तित्व टिकवून होती. लग्नानंतरच त्यांच्यामधे प्रेम उत्पन्न झाले, ते कसे झाले असेल त्याची थोडीफार वास्तवाला धरून आणि थोडीशी कल्पनिक अशी कथा आहे 'जोधा-अकबर' हा सिनेमा. थोडक्यात ही त्यांची प्रेमकहाणी आहे. त्यात इतिहासाला, त्यावेळेच्या समजकारणाला बहुदा फ़ारसं स्थान नसेल. जोधाच्या वडीलांची हतबलता फारतर दाखवेल. बाकी, अकबर 'सम्राट' म्हणून कसा होता, त्यापेक्षाही तो 'नवरा' म्हणून कसा होता यावरच लक्ष केन्द्रित असेल असे वाटते.

कोणी बघणार आहे का सिनेमा? शुक्रवारी रीलीज होतोय :-)


Santu
Wednesday, February 13, 2008 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लारटि
राजपुताचे इमान मिळाले नसते))))) जोधाच्या तिन भावाना ओलिस ठेवुन तिची मागणि केलि हि गोष्ट काय तिच्या संमतिने झालि असे म्हनणे मअनजे क्रुर विनोद्च म्हटला पाहिजे.
शिवाजिने लग्न जमवलि ति रितसर आपल्य जातित स्थळ पाहुन त्यात फ़ायदेशीर संबध जोडला तरि कसली जबरदस्ति केली नव्हती(त्याकाळी परधर्मीय सोडाच पण जाती बाहेर संबध जोडणे ही गोष्ट सुध्दा अतिशय गर्हणीय समजली जात असे. त्याला आत्ताच्या महात्मा फ़ुले छाप द्रुष्टितुन पाहणे चुकीचे ठरेल) उलट अकबराने कसला ही लग्न समारंभ न करता जोधा शी शरिर संबध जोडला.
कारण जोधा ताब्यात येताच अकबर सांभर या युध्द भुमी वरुन
तो चालता झाला.
बंगालात जे झाले ते युध्दाच्या दंगलित झाले ले अपघात सरसकट अलिवर्दी च्या बायका पकडुन कुणि रघोजि भोसले च्या स्वाधीन केल्या नाहित.

खिलजी ने ही देवगिरिच्या यादवांच्या मुलि अश्याच प
ळवल्या.


Slarti
Wednesday, February 13, 2008 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू, अकबराने 'संमती' बळानेच घेतली हे मी माझ्या पोस्टात स्वच्छ लिहीले आहे की हो. मुख्य म्हणजे जोधा ताब्यात येताच तिला घेऊन तो चालता झाला यावरून ती राजकीय चाल असावी याची शक्यता जास्त वाटत नाही का ? आणि शिवाजीच्या 'जबरदस्ती'बद्दलही मी लिहीले आहे. मुळात ती लग्ने का लावली गेली हे प्राजक्ताने दिलेच आहे. भोसल्यांच्या स्थळाला विरोध का झाला नसेल याचा सर्वंकष विचार केला तर माझी बाजू निदान समजेल. असो.
खिलजीच्या उदाहरणाबद्दल... हाच तर तो सांस्कृतिक / धार्मिक फरक. तिथे राजकीय चाल नव्हतीच.
बाकी मराठ्यांचे अत्याचार म्हणजे अपघात हे वाचून 'आम्ही केला तर चमत्कार, तुम्ही केला तर ...' याची सार्थता पटली.


Santu
Wednesday, February 13, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग संमति बळाने घेतली तर तसे गोवारिकरने दाखवले पाहिजेना
उगिच खोटे खोटे प्रेम कशाला

मग जोधा वर बलात्कार केला अस दाखव ना. उगिच

मुघल गार्डन
**Post Edited by Moderator ***

Slarti
Wednesday, February 13, 2008 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो प्रेम आहे ते लग्नानंतरचे ना !! वर पूनमने लिहीले आहे की तेसुद्धा... लग्नोत्तर प्रेम होऊच शकत नाही असे तर नाही ना ? (तुम्ही पोस्टे वाचत नाही काहो लोकांच्या ? )

Maanus
Wednesday, February 13, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी महाराजांचे ७ ही लग्न हे त्यांच्या मर्जीविरुद्ध झालेले आहेत>>>


काय? ७ लग्न? छे आजकाल मला रोज नवीन नवीन नको असलेला ईतीहास कळायला लागलाय.

Santu
Wednesday, February 13, 2008 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्ना नंतर होइल ना?
पण बलात्कार करणार्‍या शी होईल का?


Slarti
Wednesday, February 13, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरले, झाले, प्रेम निर्माण झाले. हे पुरेसे स्पष्ट आहे का ? (तुम्हाला बलात्काराचा सीन बघण्याची इच्छा वगैरे नाही ना ? )

Slarti
Wednesday, February 13, 2008 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला याउपर आणखी काही शंका / इच्छा आहेत त्यासाठी आधी चित्रपट बघावा लागेल, नाही का ? म्हणून तो आधी प्रदर्शित होऊ दे (बघण्याआधीच आरडाओरड नको), तो बघू मग बघू.

Ashwini
Wednesday, February 13, 2008 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिवाजीने ८ बायका करणे व अकबराने राजपूत बायका करणे यातील उद्देशात काय फरक आहे ?

V&C हा माझा प्रांत नव्हे. मी शक्यतो इथे येण्याचे टाळते. पण अगदीच राहावले नाही म्हणून..

यातला फरक खरच कळत नसेल तर ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. वरती अनेकांनी सांगितले आहेच की ती त्यावेळची समाजमान्य प्रथा होती. शिवरायांचे वयही लहान होते. परंतु पुन्हा पुन्हा ह्या वाक्याचे समर्थन केले जाते आहे. ते अगदी पाहावत नाही म्हणून..

इतर लग्ने करण्याचा निर्णय घरातल्या वडिलधार्‍या माणसांचा होता. महाराजांनी हौसेने, त्या स्त्रियांच्या अभिलाषेने हे विवाह केले नाहीत. उलट विरोध करण्याचाच प्रयत्न केला. परंतु, सोयरिकीने माणसे जोडली जातात आणि स्वराज्य उभारणीसाठी माणसांची गरज होती हा विचार त्यांच्या गळी उतरवण्यात जिजाबाई व इतर यशस्वी झाले म्हणून राजांची मान्यता मिळाली. उलट अकबराने स्त्रिया मागितल्या ते केवळ त्यांच्या अभिलाषेने. हा फरक खूप महत्वाचा आहे.


>>"अशीच अमुची आई असती..." यातून जे ध्वनित होते ते त्या आईसाठी अत्यंत अपमानास्पद वाटत नाहीत का ? आईचा असा अपमान करून स्वतःचे औदार्य दाखवणारी ही कुठली संवेदनशीलता ??

हे विधान तर मला हास्यास्पद पण वाटत नाही. केवळ अनुकंपनीय वाटते आहे.

जिच्या सौंदर्याची वर्णने करताना कवींची प्रतिभा अपुरी पडत होती अशी असामान्य लावण्यवती संपूर्ण असाहाय्य अवस्थेत तिच्या जेत्यासमोर उभी होती. तिच्याशी लग्न करून महाराजांना आपली राण्यांची संख्या वाढवता आली नसती का? लग्नच कशाला, तिला तसेच आपल्या जनानखान्यात टाकले असते तरी महाराजांना प्रश्न विचारायची हिंम्मत कुणात नव्हती. आणि तेंव्हाच्या मुस्लीम रिवाजानुसार ते राजमान्यही होते. अकबराने हेच केले असते. पण महाराजांनी ते केले नाही. त्यांनी तिला आईचा, स्त्रीला त्यांच्या दृष्टीने देण्यात येणारा सर्वोच्च सन्मानाचा दर्जा दिला आणि अतिशय मानाने साडीचोळीसह तिची पाठवणी केली.

आता यात जर कुणाला तो आईचा अपमान वाटत असेल तर दोष स्वतःच्या हिणकस दृष्टीकोणाचा आहे.


>>February 13, 2008 - 1:41 am:

हे तर संपूर्ण पोस्टच हास्यास्पद आहे. किंबहुना हसावे की रडावे तेच कळत नाही.


>काही व्यूह मनात ठेवून 'पळवणे'
अहो, पळवायची गोष्ट तर सोडाच पण राजे मागणी घालायला पण गेले नव्हते. समाजातली मान्यवर मंडळी आपल्या मुलीचा स्विकार करावा म्हणून शिवाजीराजांच्या दारात धरणे धरून बसल्याचे उल्लेख आहेत. महाराजांची संमती नव्हती म्हणून त्यांना पटवण्याचे प्रयत्न होत होते.

>घरातील स्त्री आणि उत्तम अरबी घोडा हे दोन्ही जर मुघलांस सारखे असेल तर त्यांची कृती त्याप्रमाणे होईल. इथल्या समाजात स्त्रीकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. स्त्रिया पळवणे हे येथील समाजासाठी निंदनिय होते, आहे, त्याला "त्यात काय एवढे ? हे तर होणारच!" अशी राजमान्यता व समाजमान्यता नव्हती. इथल्या लोककथा, महाकाव्ये याची साक्ष देतील. त्यामुळे पराभूतांचा अरबी घोडा (= संपत्ती) मराठ्यांनी घेतला, स्त्रिया नाहीत (निदान बहुतांशी तरी नाही).

एकीकडे हे मान्य करायचे आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांचे विवाह आणि अकबराचे राजपूत मुली पळवणे समान मानायचे ह्यातली संगती लावणे माझ्या बुद्धीच्या कक्षेबाहेर वाटते. मुघल समाजात मानत असतील स्त्री आणि उत्तम अरबी घोडा सारखे. म्हणून अकबराचे कृत्य आपल्या दृष्टिने समर्थनीय कसे ठरते? पित्याची हत्या करून गादीवर बसायचे ही पण प्रथा त्यांच्यात होती मग 'आहे बाबा त्यांच्याकडे ती पद्धत' असे म्हणून ती पण समाजमान्य मानायची का?

शिवाजीमहाराजांनी कुठल्याही लग्नाच्या बाबतीत कुणावरही कुठलीही जबरदस्ती केली नाही. त्यांच्या बळाला घाबरून कुणी मुलगी देण्यासाठी राजी झाले नाही. या मुद्द्यावर वरती लिहीले आहेच.

असो, धुतल्या तांदळाप्रमाणे निष्कलंक चारित्र्य असलेल्या महापुरूषाविषयी काढलेले अनुद्गार पाहूनही त्याचा विरोध न करता गप्प बसणे हा गुन्हा आहे असे मला वाटले. बाकी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, त्यातून विष ओकायचे की अमृत हे ज्याचे त्याने ठरवायचे.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators