Santu
| |
| Sunday, February 10, 2008 - 6:25 am: |
| 
|
हा पहा अकबराच्या बद्फ़ैलि पणाचा पुरावा. ल्बॉचमन ने संपादित केलेल्या आईने-अकबरी तिल खंड १ पान २७६ वर अबुल फ़जल म्हनतो" अकबराने आपल्या महाला जवळच दारुचे दुकान स्थापन केले आहे. तेथे नेहमि वेश्यांचा घोळका असतो.याना दरबारी लोक आपल्या घरी जार कर्म करण्यासाठि घेवुन जातात. एखाद्या कुमारिका vergin वेश्येस घरि न्यायचे असेल तर स्व्था बादशाहाची परवानगि घ्यावी लागते(अकबराची परवानगी कशाला ही गोष्ट सुज्ञास सांगावी लागु नये?) तसेच तिथे व्यभिचारा साठी गोंडस पोरगे ही मिळत( ही फ़क्त इस्लामिक खासियत मलिक काफ़ुर असाच अल्लाउद्दिन खिलजि चा गोंडस पोरगा होता.) हे त्या गोवारीकरने दाखवले आहे का आपल्या प्रेम कहाणीत
|
बी आर चोप्राने १९८२ किंवा ८३ मधे तलाक तलाक तलाक असा चित्रपट काढला होता. तो मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक देण्याच्या रानटी प्रथेविरुद्ध होता. ही प्रथा आजही आहे. सेन्सॉर वगैरे सगळे सोपस्कार होऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मुस्लिम धुरीणांनी इस्लामची बदनामी होते म्हणून ह्यावर बंदी घालायची मागणी केली. तडजोड होऊन तो सिनेमा निकाह ह्या नावाने आणि काटछाट करून प्रदर्शित झाला. ढळढळीत वस्तुस्थिती असताना, सर्व नियम पाळून बनवलेला चित्रपट त्या निर्मात्याला बदलावा लागला अशी आपली उज्ज्वल परंपरा. त्या पार्श्वभूमीवर जोधा अकबर ही काही जमातींना, काही हिंदूंना अपमानकारक वाटणारी फिल्मी कहाणी सहिष्णूपणे खपवून घ्यावी अशी अपेक्षा का? उद्या पन्नाशी उलटलेला प्रेषित महंमद व नऊ वर्षाची आयेषा ह्यांच्या अनोख्या "प्रेमकहाणी"वर आधारित सिनेमा कुण्या निर्मात्याने काढला तर तो चालवून घेतला जाईल का? उगाच फुकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या गमजा. थोडक्यात हिंदूंना अप्रिय वाटणार्या गोष्टी असतील तर त्या माध्यमाद्वारे मांडण्याचे स्वतंत्र्य तमाम मिडियांना आहे अशी आपली व्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या आहे.
|
Arc
| |
| Monday, February 11, 2008 - 4:28 am: |
| 
|
खरे सान्गायचे तर media ने लोकाना एव्हडे बधीर केले आहे की त्याना picture मधे जे दखवले आहे ते खरे आहे का खोते आहे असा कुठलाच विचार नाही करावास वातणार.त्यामुळे काळजी नसावी, लोक बघतील आणि विसरुन जातील. ज़ालेच तर एखदी political party राजकिय स्वार्थासाठि थोडी फ़ार तोड फ़ोड करेल. पण आता त्याचेही काहि वाटत नाही.सगळा समाज़ प्रचन्ड desensities ज़ाला आहे.प्रत्येकाला आपण गोरे कसे दिसावे,बारीक कसे व्हावे,कुठे खरेदी करावी ह्याची इतकी काळजी असते की बाकी सगळे प्रश्न फ़ाल्तुक वाटु लगतात.
|
Arc ... पटल तुमच म्हण्णं.
|
Bee
| |
| Monday, February 11, 2008 - 7:13 am: |
| 
|
आर्क, सुक्यासोबत ओलेही जळते आहे.. सर्वच जन तुम्ही म्हणता तसे नसतात. बहुतांश देखील पटणार नाही.
|
Arc
| |
| Monday, February 11, 2008 - 9:43 am: |
| 
|
बी तसे नसते तर दर वर्शी वाढत्या GDP बरोबर गुन्हेगारीचे आकडे वाढले नसते. तुम्ही म्हनता त्याप्रमाणे सगळेचजन असे नसतात, पण middle class लोक जे पुर्वी आसपास घदनार्या घटना.बद्दल सजग होते,आज स्वत:च्या दुनियेत इतके मश्गुल आहेत की कुणालाच कुथल्याच गोश्तीचे गाम्भीर्य राहीलेले नाही. news channel २४ तास बातम्यान्चा रतीब घालत असतात लोक जाहीराती बघीतल्यासारख्या बातम्या बघतात आणि सोडुन देतात. who cares , who has time? असाच attitude असतो सगळीकडे.मेधा पाटकरला मुर्ख, गान्धीजीना थेरडा म्हणनार्या सुशीक्शित महाभागाना मी रोज भेटत असते. any way मला जे दिसते ते मी लिहीले.
|
Chyayla
| |
| Monday, February 11, 2008 - 11:05 am: |
| 
|
अशा परिस्थितीमध्ये या इतिहासाचा विपर्यास करून वर प्रेमकथा अशी जाहिरात करणे ही केवळ जोधाचीच नाही तर इस्लामी आक्रमणाच्या बळी ठरलेल्या या सर्वच दुर्दैवी महिलांची विटंबना आहे मला वाटत गोविंद यांच्या या मार्मिक वाक्यातच सगळा सार आलेला आहे. याउपरही हे सगळ नाकारुन हृतिक च्या किंवा प्रिमियर च्या नावाखाली वाकड्या वाटेने समर्थन करणे, किंवा गोवारीकरचा हेतु उदात्त ठरवणे ही निर्लज्ज, आत्मघाती, स्वाभिमानशुन्य अशी विकृतीच म्हणावी लागेल... आणी याना पण सुशिक्षीत महाभाग म्हणायचे बरे का.
|
बरं मला काही शंका आहेत... जोधपुर हे खरोखर जोधाच्या नावावरून वसवलेलं शहर आहे का? आणि जहांगीर हा जोधाचा मुलगा होता का??
|
Shraddhak
| |
| Monday, February 11, 2008 - 2:06 pm: |
| 
|
जोधपुर हे खरोखर जोधाच्या नावावरून वसवलेलं शहर आहे का?<<<<< हो. पण ही ती जोधाबाई नाही. जोधपूर ' राव जोधा ' नावाच्या राठोड वंशीय राजाने वसवलं आहे अशी माहिती तिथल्या मेहरानगढ किल्ल्यात दिली जाते. तो किल्लाही त्या राजानेच बांधला आहे आणि त्याच्या नावावरून ते शहर जोधपुर म्हणून ओळखलं जातं.
|
Peshawa
| |
| Monday, February 11, 2008 - 6:23 pm: |
| 
|
अशा परिस्थितीमध्ये या इतिहासाचा विपर्यास करून वर प्रेमकथा अशी जाहिरात करणे ही केवळ जोधाचीच नाही तर इस्लामी आक्रमणाच्या बळी ठरलेल्या या सर्वच दुर्दैवी महिलांची विटंबना आहे>>> काहीच्याकाही! इतीहासाचा विपर्यास कोण करत हा खरच शोधाचा मुद्दा व्हवा... कींवा कुठलाही इतिहास हा ' विपर्यास ' च्या ऐवजी अजुन काही असु शकतो का हा देखील... प्रत्येक घटनेला अनेक प्रकारांनी बघता येते आणि ती बघणार्याच्या द्रुष्टिकोनातुनच ती पुढे ज्ञात होते. काही गोष्टी: १) अकबराच्या अनेक बायका ह्या राज्पुत स्त्रिया होत्या. २) त्या सगळ्याच पळवून आणलेल्या बळजबरीने आणलेल्या नव्हत्या. ३) हे विवाह करताना politics ह्या एकाच मुद्द्यवर ते झालेले होते. त्यात त्या मुलीच्या वडिलांनी, भावानी आपले राज्य अणि सत्ता अबाधीत (शक्यतो) इतकेच पाहीले होते. तिथे अकबर नसता अणि एखदा हिन्दू राजा त्यांचे राज्य गिळायला आला असता तरी त्यांनी अपल्य मुली त्याला दिल्या असत्या (मुली देउन नाते जोडुन राज्यरख़्शण ही खुप जुनी पद्धत आहे) ४) वर निवडण्याचा अधिकार तसाही कुठल्या हिंदु धर्मातील मुलीला मध्ययुगात होता? जो नवरा वढिलधारे निवडतील त्याच्याशि मुकाट संसार करायचा हेच शिकवून तर मुली वाढवत. मग अशा वेळेस ज्याच्याशि लग्न झाले त्याच्यावरच प्रेम करने लग्ना नन्तर प्रेम होणे क्रमप्रप्त नाही का? ५) अकबराचा मुलगा सलिम ह्याचि आइ रजपुत होती. तीचे नाव इतिहासाला ठावुक नाही लोककथेत तीचे नाव जोधा आहे.. मग अशा वेळेस लोककथा आणि इतिहास ह्यांची वीण घतली तर इतीहासाचा विपर्यास कसा होतो? ६) इस्लमी अक्रमणाची झळ बसली नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही पण प्रत्येक गोष्ट त्याच रंगात रंगवणे ह्याला कुठली विकृती म्हणायचि? ७)त्या राजपुतानी तडजोड केली हे खरे ती तडजड केली असे दाखवले म्हणुन आजच्या राजपुतांचा अपमान कसा होतो?
|
Chyayla
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:52 am: |
| 
|
पेशवा, आपण काही गोष्टी किती Granted घेउन बसलो असतो नाही. १) जसे मुस्लिम आक्रमकान्नी हिंदु मुलीन्ना जबरदस्तीने पळवुन किंवा तडजोड करवुन लग्न करणे. अशा प्रकारामुळे कित्येक राजपुत स्त्रिया ह्या अकबराच्या बायका होत्या त्याने काय फ़रक पडतो. कोणत्याही मार्गाने हिंदुच्या मुली पळवणे हा तर त्यांचा हक्कच. आणी त्या हक्कावर गदा आणणे म्हणजे धर्मनिरपेक्षता खतरे मे है. २) हाच प्रकार हिंदु राजांनी (मुस्लिम स्त्रियांबाबत) केला असता तर परत संस्कृतीच्या नावाने टाहो फोडायला मोकळे. तरी आपल्यासमोर शिवाजी महाराज व कल्याणच्या सुभेदाराची सून हा ईतिहास आहे. ३)कल्पना करा उद्या एखादा गुंड तुमच्या घरातुन तुमच्या मुलीला घेउन जातोय.. तीही तडजोडच असेल ना कारण त्या बदल्यात त्यानी तुमचे प्राण राखले. आणी छे:... याला काय अपमान म्हणावा ही तर तडजोडच.
|
Slarti
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:32 am: |
| 
|
तसे नव्हे. कोणत्याही मार्गाने मुलगी पळवणे याला तत्कालीन राज्यकर्ते हक्क समजत, कुठल्याही धर्माचे असोत. हिंदू राजानेसुद्धा राजकारणासाठी अशा सोयरिकी केल्या असत्याच. शिवाजीने ८ बायका करणे व अकबराने राजपूत बायका करणे यातील उद्देशात काय फरक आहे ? बळजोरीचा प्रश्न आहे हे मान्य...पण मग तुमची मुलगी पळवायला आलेल्या गुंडाला तुम्ही धर्म नाही ना विचारणार ?
|
Chyayla
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:59 am: |
| 
|
शिवाजीने ८ बायका करणे व अकबराने राजपूत बायका करणे यातील उद्देशात काय फरक आहे ? स्लार्टी तुम्ही काय लिहिता याचे भान आहे? शिवाजी महाराजान्नी ८ बायका करणे व अकबराने बळजबरीने मुली पळवणे यात काहीच फ़रक नाही? हिंदु राजान्नी आपसात सोयरिक केलीही असेल पण मुस्लिम आक्रमाकांच्या कोणत्याही मार्गाने बायका पळवुन आणणे व असली सोयरिक करणे याचे उदाहरण द्यावे. तुमची मुलगी पळवायला आलेल्या गुंडाला तुम्ही धर्म नाही ना विचारणार ? स्लार्टी, याबाबतित माझे स्पष्टीकरण.. हा मुद्दा मी धर्मासाठी नव्हता मांडला तर तडजोड व अपमान यातला फ़रक स्पष्ट करण्यासाठी मांडला, कृपया त्याचा घोटाळा करु नये ही विनंती. शेवटी मला वाटत अकबराच्या असल्या बळजबरीला प्रेमप्रकरण दाखवणे हा एक अपमानच आहे याचा सोयिस्कर विसर पडलेला दिसतोय.
|
Mi_anu
| |
| Tuesday, February 12, 2008 - 6:31 am: |
| 
|
मला वाटते सध्या गोवारीकरांना चित्रपट काढू द्यावा(जसे काही ते अनु च्या परवानगीची वाट पाहत खोळंबलेच आहेत!!). अमेरिकन संशोधक कालांतराने खरे काय ते शोधून काढतीलच. अमेरिकन संशोधकांना सारखे उलटसुलट संशोधन करत राहण्यात रस आहे. आज म्हणतात भरपूर दूध प्या, उद्या म्हणतील दूध वर्ज्य करा, आज म्हणतात चॉकलेट खाऊ नका, त्यात निकेल असते, उद्या म्हणतात चॉकलेट खात जा, हृदयविकाराचा धोका टळतो.कालांतराने ते अकबरावर आणि इस्लाम धर्मावर उलटी संशोधने करतीलच. (गंमत बरे का! अकबराचे ग्लोरिफिकेशन करण्यास माझाही विरोध पण इथे विरोध करुन उपयोग होणार आहे का हाही प्रश्न आहे.)
|
Ashwini_k
| |
| Tuesday, February 12, 2008 - 8:49 am: |
| 
|
----हिंदू राजानेसुद्धा राजकारणासाठी अशा सोयरिकी केल्या असत्याच.--- सोयरीक व एखाद्या लूटीप्रमाणे चांगली सजीव स्त्री कुठल्या मोबदल्यात उचलून आणणे हे सारखेच का? ----शिवाजीने ८ बायका करणे व अकबराने राजपूत बायका करणे यातील उद्देशात काय फरक आहे ? बळजोरीचा प्रश्न आहे हे मान्य---- महाराजांच्या काळात bigamy or polygamy हा गुन्हा नव्हता. ८ बायका होत्या म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून नववी बायको म्हणून नाही आणली! इतकी रुपवान असून तिच्याकडे वाकडी नजर न ठेवता "अशीच अमुची आई असती..." असे म्हणून तिच्या सौंदर्याचा आदर करून सन्मानाने परत तर पाठवलेच वर तिला पळवून आणणार्यांची कानौघडणी केली. अकबराने कोणाशीही लग्न करू दे, प्रश्न आहे तो बळजबरीचा आणि हा प्रश्न निदान महाराजांच्या या राज्यात तरी छोटा मानला जात नाही (अजून तरी!). ----पण मग तुमची मुलगी पळवायला आलेल्या गुंडाला तुम्ही धर्म नाही ना विचारणार ? ---- कुठल्याच पापाला किंवा पुण्याला धर्म नसतो. जे हिंदू राजे किंवा सरदार अनितीने वागणारे होते त्यांची अवहेलना इतिहासात झालीच आहे. मग अकबराच बुरखा त्याची खरी प्रतिमा लपवत असेल तर तो आपल्यापुरता तरी फाडायला काय हरकत? (या उलट आपल्या सावरकरांना त्यांनी हाल अपेष्टा सोसूनही, आयुष्याची एवढी वर्षे देशासाठी समर्पित करूनही महाराष्ट्रा बाहेर त्यांना पळपुटे संबोधले जाते याची चीड येते). जेव्हा स्व. सुधिर फ़डकेंनी "सावरकर" काढला तेव्हा कुठे काही non maharashtrians ना त्यांच्या त्यागाची कल्पना आली ( non maharashtrians ची बदललेली मते मी ऑफ़िसमध्ये अनुभवली आहेत). आता बोला, असा सिनेमा काढावा का इतिहासातली पात्रे घेऊन काहिही दाखवावे? अनु म्हणाली त्याप्रमाणे उपयोग काही नाहीच म्हणा!
|
Zpratibha
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:03 pm: |
| 
|
अश्विनि, च्यायला अगदि १००% अनुमोदन.
|
Slarti
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:11 pm: |
| 
|
उद्देश तोच राहतो. सोयरीक करणे म्हणजे आई-वडलांनी राजीखुशीने मुलगी देणे... यात त्या चांगल्या सजीव स्त्रीची इच्छा विचारली जात नव्हतीच. मुलीला देऊन राजकारण साधले जात होते. सारांश, आईवडलांनी मुलीला asset म्हणून वापरणे आणि मुलगी पळवून नेऊन तिला स्वतःकडचा एक asset करणे यात गुणात्मक फरक तो काय ? म्हणजे दुःख याचे तर नव्हे ना की तिला वस्तू म्हणून वापरण्याचा आमचा अधिकार(!!) हिरावून घेतला गेला... सांगायचा मुद्दा हा की धार्मिक आक्रमण एकीकडे लक्षात घेताना अकबराने (किंवा शिवाजीने) त्यांचा एक asset म्हणूनच वापर केला ही बाजूही लक्षात घ्यावी.
|
Slarti
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:20 pm: |
| 
|
राहवत नाही म्हणून... "अशीच अमुची आई असती..." यातून जे ध्वनित होते ते त्या आईसाठी अत्यंत अपमानास्पद वाटत नाहीत का ? आईचा असा अपमान करून स्वतःचे औदार्य दाखवणारी ही कुठली संवेदनशीलता ??
|
Hi_psp
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:59 pm: |
| 
|
"अशीच अमुची आई असती..." यातून जे ध्वनित होते ते त्या आईसाठी अत्यंत अपमानास्पद वाटत नाहीत का ? आईचा असा अपमान करून स्वतःचे औदार्य दाखवणारी ही कुठली संवेदनशीलता ?? चुकिचे आहे तुमचे मत. सर्वाना आई प्रिय असते. महाराजानी फ़क्त त्याचे मत दिले आहे.
|
Supermom
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:04 pm: |
| 
|
स्लार्टी, मला वाटतं तुमचं चुकतंय. त्याचा अर्थ इतक्या अलौकिक सौंदर्याला बघूनही त्यांना फ़क्त इतर कोणाचीही नाही तर जिजाऊंची आठवण झाली असा अर्थ आहे. शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा अपमान करतील ही गोष्ट स्वप्नातही कल्पना न करण्यासारखी...
|