|
Yog
| |
| Friday, February 08, 2008 - 5:18 am: |
| 
|
>>अगदी बरोबर बोललास पण अकबर कसा होता ह्याचा अकबर जोधाशी संबंध नाही फ़ार विनोदी विधान केलेस असाम्या.. मग चित्रपटाच नाव ह्रुतिक ऍश ठेवा किव्वा धूम टू गेट अप मधे दाखवा की त्याना..कुठे फ़रक पडतो? ऐतिहासिक घटनेवर चित्रपट काढताना correct reference वापरावा ही किमान अपेक्षा असते.. करोडो पैसे तुम्ही जर कल्पनाशक्ती अन निर्मितीवर उधळता तर जरा प्रामाणिकपणे मूळ विषय तरी अचूक मान्डाण्यासाठी खर्च करावा ही काही मोठी अपेक्षा नाही. reference थोडे फ़ार चूकीचे असतात ते सर्वानाच मान्य आहे.. पण मावळ्याचा शिवाजी बनवून कस चालेल? आशुतोश सारख्या सक्षम निर्मात्याने technically correct चित्रपट सादर केला तर त्याचे निर्मितीमूल्य कमी होणार आहे का..? उलट वाढेलच.. पण खरे सत्त्य पडद्यावर दाखवले तर गोची होईल अन मग चित्रपटाचा "धन्दा" कसा होणार? तेव्हा आशुतोश ने कितिही मुल्यान्चे अथवा कला-स्वातन्त्र्याचे लेप चढवले तरी व्यावसायिक double standards लपत नाहीत.. >ऐतीहासीक पुस्तक, चित्रपट हे वाचकांचा वा दर्शकांच्या व्हिउ वर परिणाम करतात म्हनुन ऐतीहासीक घटना हा जशाच्या तश्या दाखवाव्या लागतात हे माझे मत. केदार अगदी. दुर्दैव हेच की निर्माते याचा गम्भीरपणे विचार करत नाहीत. चित्रपटासारख्या मोठ्या सार्वजनिक माध्यमावर तर अधिक जबाबदारी आहे.
|
Santu
| |
| Friday, February 08, 2008 - 6:21 am: |
| 
|
केदार तुझे आबुल फ़जल बद्दल मत अगदि दुरुस्त आहे. अबुल फ़जल चे पाश्च्यात्त इतिहास्कारांनि shameless flaaterer म्हणजे लाळ्घोट्या हे केलेले वर्णन अगदि बरोबर आहे.आणी हा लाळ्घोट्या अबुल आपल्या ऐने अकबरित म्हनतो" हजारो बायकांचा जनानखाना बाळ्गणारा अकबर त्यांना सम्तोल वागणुक देई. व स्वथा अगदि थोडिशीच दारु घेई." आता याला काय म्हणणार. हजारो बायकांचा उपभोग घेणारा लंपट मणुस सर्वांना समान वागणुक कशि देईल अकबर हा पक्का हिंदुद्वेष्टा होता. हळदिघाटिच्या राणाप्रताप च्या विरुद्ध लढाईत च्या लढाईत बदायुनी हा बखरकार उपस्थित होता. दोनि अकबाराच्या बाजुनि पण काहि राज्पुत लढत होते तेव्हा बदायुनी ला कळेना कि शत्रु कोण व मित्र कोण तेव्हा तो अकबाराला म्हणाला कि मि कोठे गोळिबार करु तेव्हा अकबार म्हाणाला " कोठेहि कर शेवटि गोळिने काफ़िर (हिन्दु)च मरणार आहे." तेव्हा बदायुनि अंधाधुन्द गोळिबार करु लागला. यावरुन अकबर हा पक्का हिन्दु द्वेष्टा होता हे सिध्द होते.
|
Santu
| |
| Friday, February 08, 2008 - 6:53 am: |
| 
|
दुसरे म्हणजे जोधा व इतर स्त्रिया भारमल ने सांभर येथे अकबराच्या स्वाधिन केल्या तेव्हा तिथे कसलाही समारंभ झाल्याचा उल्लेख नाहि. बायका ताब्यात मिळाल्यावर तो तिथुन चालता झाला. जर हे लग्न ठरवुन झाले असते तर अकबर अंबर(भारमल ची राजधानी) येथे गेला असता. तसेच या प्रसंगी कुठलाई लग्नाचा विधी झाल्याचा उल्लेख नाहि. तसेच राजपुत स्वतहा ची मुलगी इस्लामि जनानखान्यात जाव्या याला परमसंकट समजत असत(म्हणुनच पद्मिनी ने जोहार केला) असे असताना अकबराने त्यांच्या मुलि वरुन हिन्दु मुस्लिम ऐक्य साधले असे म्हणणे म्हणजे राजपुतांच्या दुखा: वर डागण्या देण्यासारखेच आहे.
|
Santu
| |
| Friday, February 08, 2008 - 7:05 am: |
| 
|
या गोवारिकारचे राणाप्रताप याबद्दल काय मत आहे याचा प्रश्न केतकरांच्या त्या निधर्मि पत्रकाराने का विचारला नाहि? जर अकबर हिरो आहे तर मग राना प्रताप खल्नायकच असणार? जर अकबर सर्वधर्म समभाव पसरवणारा होता तर राणा प्रताप उगिचच त्याला विरोध करत होता असे च गोवारिकरचे मत असणार.
|
Mi_anu
| |
| Friday, February 08, 2008 - 8:07 am: |
| 
|
गोवारीकरांना ज्यावर चित्रपट काढायचा त्यावर काढू दे, पैसे कमावू दे, लोकांना ऐश ह्रितिक बघूदे,फक्त त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला मोठ्या अक्षरात ठळक डिसक्लेमर लिहावा की 'हा जसाच्यातसा इतिहास नाही, कथा रंजक करण्याच्या दृष्टीने यात काही काल्पनिक संदर्भांचा आधारही घेतला आहे.' मायबोलीवरील चित्रपट संबंधित व्यक्तीना, उदा. नंदिनी किंवा नीरजा यांना गोवारीकरांशी संपर्क साधून त्यांचे या प्रवादांवर काय मत आहे हे विचारणे शक्य आहे का?
|
अश्व नैव गज नैव व्याघ्र नैवच नैवच| अजापुत्र बलि दध्यात देवो दुर्बल: घातक|| वीरतेच्या कींवा धैर्यतेच्या अभावामुळे नाही तर एकता आणि युक्तीच्या अभावामुळे संस्क्रुतीचे रक्षण नाही झाले आणि आता गिधाडे ईतिहासाला चोची मारुन जगत आहेत. पराजिताच्या धर्माचे आणि ईतिहासाचे असेच वाभाडे निघतात. एकच मंत्र... शक्ती आणि युक्ती..!
|
अनु, सेन्सॉर बोर्ड आहे अस्तित्वामधे अजून.. त्यानी एकही कट न देता पूर्ण चित्रपट ओके केलाय (ऐतिहासिक चित्रपटाना मुद्दाम इतिहास क्षेत्रातली माणसे बोलावतात.) आणि आशुत्षने एक डिस्क्लेमर आधीच टाकलाय. एवढा पैसा घालून पिक्चर बनवताना असा विरोश होईल हे त्याला पक्कं माहीत असणार आहे. त्याची त्याने योग्य दखल घेतलेली असेलच.. बाकी तुमचं चालू द्या. मी चालले याच्या प्रीमीयरची तयारी करायला.. हाती आलेलं नवीन काम..
|
Santu
| |
| Friday, February 08, 2008 - 12:05 pm: |
| 
|
शेणसार बोर्ड आहे आहे अजुन )))))))) बर मग
|
Zakki
| |
| Friday, February 08, 2008 - 1:34 pm: |
| 
|
वीरतेच्या कींवा धैर्यतेच्या अभावामुळे नाही तर एकता आणि युक्तीच्या अभावामुळे संस्क्रुतीचे रक्षण नाही झाले आणि आता गिधाडे ईतिहासाला चोची मारुन जगत आहेत. पराजिताच्या धर्माचे आणि ईतिहासाचे असेच वाभाडे निघतात शंभर टक्के सत्य! अहो, कसला धर्म, इतिहास, सत्य घेऊन बसला आहात? या जगात फक्त तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. पैसा, पैसा, नि पैसा! पैसा असला की चैन करता येते. शरीराचे लाड पुरवता येतात. अहो जोपर्यंत शरीर आहे, या जगात आहोत, तोपर्यंत हेच खरे मानले पाहिजे. मग माझ्यासारखे वृद्ध झाल्यावर कळेल, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. तोपर्यंत सांगून समजायचे नाहि! त्याला फक्त स्वानुभूति लागते. तोच 'धर्म'. स्वानुभूति झाल्यावर देव असो, नसो, दिसो, काही फरक पडत नाही. मन शांत होते, सतत आनंदित रहाते!
|
धोंडोपंत, लाख मोलाचे बोललात !
|
Peshawa
| |
| Friday, February 08, 2008 - 3:48 pm: |
| 
|
संतू तुमचा इतका प्रखर म्हणतात तसला विरोध कशाला आहे हे समजले नाही. अकबराच्या बाबतीतल्या काही गोष्टी ह्या मिथक आहेत असे धरून चालुयात. म्हणजे जोधा अकबर ह्यांची प्रेम्कहाणि हे मिथक आहे असे समजा. त्या मिथकावर अशुतोश्ने चित्रपट बनवला तर इतका हुंगामा होण्याचे कारण काय हे समजले नाही...
|
Santu
| |
| Saturday, February 09, 2008 - 4:48 am: |
| 
|
पेशवा उद्या गोवरिकर राणा प्रताप ला खल्नायक दाखवेल. किंवा औरंगजेबाला गाझी (धर्मवीर) दाखवुन संभाजी ला दुष्ट (जसे इस्लामि बखरकार दाखवतात तसे) दाखवेल. हे आपल्याला चालेल काय. काहि गोष्टी या आपल्या समाजाच्या मानबिन्दु असतात. त्याचा मान ठेवला गेला पाहिजे. म्हणुन तर भारताच्या क्षेपणास्त्राचे नाव प्रुथ्वी असते व पाकिस्तानच्या घोरी असते.
|
Gs1
| |
| Saturday, February 09, 2008 - 7:27 am: |
| 
|
पेशव्या, इस्लामी आक्रमकांचा तडाखा राजपुतांनी अनेक शतके सोसला. हा इतिहास हा जसा राणा प्रतापसारख्यांच्या तेजस्वी संघर्षाचा आहे, आणि इस्लामी आक्रमकांच्या हाती सापडून विटंबना होउ नये म्हणून पद्मिनीसारख्या हजारोंनी केलेल्या जोहाराचा आहे, तसाच जीव आणि राज्य वाचवण्यासाठी केल्या गेलेल्या बायका मुली मुसलमानांच्या हवाली करण्याच्या अपमानास्पद तडजोडींचा सुद्धा आहे. बळजबरीने अथवा बळजबरीच्या तडजोडीने ज्यांच्या स्वत्:च्या घराण्यातल्या अथवा त्यांना पूज्य असलेल्या घराण्यातल्या महिला अशा पद्धतीने मुसलमानांच्या ताब्यात गेल्या त्यांच्या मनात अर्थातच ती जखम अजूनही आहे. अशा परिस्थितीमध्ये या इतिहासाचा विपर्यास करून वर प्रेमकथा अशी जाहिरात करणे ही केवळ जोधाचीच नाही तर इस्लामी आक्रमणाच्या बळी ठरलेल्या या सर्वच दुर्दैवी महिलांची विटंबना आहे. मायनॉरिटिझमला पूरक असा इतिहास लिहिण्याच्या निमित्ताने, गेली साठ वर्ष भारतावरील इस्लामी आक्रमणाचा कृर इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न अथक चालू आहेत. त्यात अशा गोष्टी, वा अकबराच्या धार्मिक सहिष्णुतेचे दाखले घुसडणे असे प्रकार होत आहेत. अशा ज्याला खोट्या नाही तर किमान अतिशय वादग्रस्त म्हणता येईल अशा इतिहासाचा आधार घेऊन रजपुतांच्या जखमेवरची खपली काढणे ही या चित्रपट निर्मात्याची चूकच आहे, आणि त्याला केवळ रजपुतांकडूनच नव्हे तर इतिहासाचे थोडेसे भान आणि स्वत्व व सदसदविवेकबुद्धी शिल्लक असलेल्या कुठल्याही हिंदू माणसाकडून विरोध होणे स्वाभाविकच आहे. तेंव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध याचिका, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निर्मात्यावर आयपीसी २९५ खाली पोलिस केस, आणि जमल्यास निदर्शने, बहिष्काराचे आवाहन या मार्गाने विरोध व्हायला हवा. चित्रपटाचे प्रदर्शन यामुळे थांबणार नाही, पण जे दाखवले जातेय त्यापेक्षा वेगळे काही घडले आहे हे तरी लोकांपर्यंत पोहोचेल. जोधाच्या दुर्दैवाची कहाणी प्रेमकथा म्हणून दाखवण्याचे समर्थन करणारे त्यांच्या घरातील कुणावर असा बलात्काराचा वा पळवून नेण्याचा प्रसंग आला आणि त्याची कोणी नाव घेऊन चटपटीत 'लवस्टोरी' बनवली तर कसे वागतील ? तेंव्हा त्या कलाकृतीबद्दल उदारता आणि सहिष्णुता दाखवली जाईल का ? पण एकदा स्वत : ला प्रत्यक्ष झळ लागत नाही असे लक्षात आले की इतरांच्या जीवावर उदारता वा सहिष्णूता दाखवायला आपले काय जाते ?
|
Gs1
| |
| Saturday, February 09, 2008 - 7:40 am: |
| 
|
धोंडोपंत, अगदी योग्य बोललात तुम्ही. स्वत : च्या स्वार्थोत्पन्न निष्क्रियतेला सहिष्णुतेचे नाव देण्याचा दांभिकपणा हेही अजून एक कारण. वीरतेच्या कींवा धैर्यतेच्या अभावामुळे नाही तर एकता आणि युक्तीच्या अभावामुळे संस्क्रुतीचे रक्षण नाही झाले आणि आता गिधाडे ईतिहासाला चोची मारुन जगत आहेत. पराजिताच्या धर्माचे आणि ईतिहासाचे असेच वाभाडे निघतात.
|
Ajjuka
| |
| Saturday, February 09, 2008 - 8:17 am: |
| 
|
>>उदा. नंदिनी किंवा नीरजा यांना गोवारीकरांशी संपर्क साधून त्यांचे या प्रवादांवर काय मत आहे हे विचारणे शक्य आहे का?<< नाही. मला शक्य नाही. माझी त्याचे एकदा भेट झालेली असली तरी हे एवढं काही विचारावं अशी ओळख नाही आणि प्रश्न विचारण्याची मुभा असायला मी पत्रकार ही नाही. बाकी फिल्म पाह्यल्यावरच जास्त काही बोलू शकेन. माझा इतिहासाचा (मुघल) अभ्यास नाही फारसा. पण एकुणात परिस्थिती बघता प्रेमकहाणीपेक्षा बळीची गोष्ट असण्याची शक्यता जास्त वाटतेय. अर्थात अश्या प्रकारचा चित्रपट करताना दिग्दर्शकाला किंवा पटकथेमधे स्वातंत्र्य घ्यावेच लागते नाहीतर चित्रपट न होता नुसत्या हातातल्या माहितीच्या तुकड्यांचा गठ्ठा होतो. त्यामुळे फोकसनुसार काही ठेवावे आणि काही वगळावे लागतेच. पण स्वातंत्र्य घेतले तरी ते इतिहासाशी सुसंगत असेच घ्यावे, विपर्यास होण्याएवढे घेऊ नये असे माझे मत आहे. बाकी प्रोमोज पाह्यल्यावर अशोका इतका गाढवपणा नसावा एवढंच वाटतंय.
|
Yog
| |
| Saturday, February 09, 2008 - 8:20 am: |
| 
|
>पण स्वातंत्र्य घेतले तरी ते इतिहासाशी सुसंगत असेच घ्यावे, विपर्यास होण्याएवढे घेऊ नये असे माझे मत आहे. ..well said! >>अनु, सेन्सॉर बोर्ड आहे अस्तित्वामधे अजून.. त्यानी एकही कट न देता पूर्ण चित्रपट ओके केलाय (ऐतिहासिक चित्रपटाना मुद्दाम इतिहास क्षेत्रातली माणसे बोलावतात.) आणि आशुत्षने एक डिस्क्लेमर आधीच टाकलाय. एवढा पैसा घालून पिक्चर बनवताना असा विरोश होईल हे त्याला पक्कं माहीत असणार आहे. ... बर मग..? आजकाल सर्वच चित्रपटान्च्या आधी std disclaimer असतो. त्यात नविन काय..? इथल्या मुद्द्याचे गाम्भीर्य लक्षात आलेले दिसत नाही. गोविन्द, नेहेमीप्रमाणेच तुमचे मुद्दे यथायोग्य. अन याविरुध्ध एकजूटीने निषेध नोन्दवायचे सोडाच इथे आपल्याच लोकाना निरर्थक वाद अन हे चूक कसे काय? या पोकळ चर्चेत स्वारस्य आहे.. यातून कुठल्या समाज वा मानसिकतेवर अन्याय होतो याची जाण प्रिमियर्स च्या प्रतिक्षेत असणार्याना नसते... सद्सदविवेकबुध्धीची कवाडे एकदा बन्द केली की तुम्ही दाखवाल तो सूर्य अशी आजची अवस्था आहे.. मग यापेक्षा मधुर भन्डारकर खूपच honest आहे.. त्याने हाताळलेले विषय अन सादरीकरण, चान्दनी बार ते page 3 ते corporate, traffic signal पर्यन्त बर्याच प्रमाणात वास्तवाशी जुळते. निर्मिती अन creativity स्वातन्त्र्य त्यानेही घेतलेच पण मूळ विषयाशी प्रामाणिक राहून.. जोधा अकबर बद्दल असा वस्तुनिष्ट चित्रपट काढायची हिम्मत आहे का आशुतोष मधे..? ही वृत्ती आत्ताच ठेचली नाही तर उद्या लेन च्या पुस्तकाचा रेफ़रन्स देवून छत्रपतीन्चेही पडद्यावर वाभाडे काढायला कमि करणार नाहीत हे लोक... खरच आपला इतीहास कुठून सुरू झाला अन आपण कुठे येवून पोचलो आहोत याचे किन्चितही भान राहिलेले दिसत नाही. राजस्तान मधे प्रिमियर करायची हिम्मत आहे का अशुतोशची? मुम्बईत सर्व खपते अन सर्वाचा बाजार झाला आहे.. पण या बाजारात आपणही फ़क्त ग्राहक बनून बसलो तर एक दिवस आपलिही बोली लागल्याखेरीज राहणार नाही.. ही पोस्ट agressive वा तिखट वाटेल.. पण चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकान्पुढे शुध्ध आणी प्रामाणीक हेतू न ठेवता शाब्दिक धुळफ़ेक करणार्या अशा सर्व प्रव्रुत्तीन्चा अन वर त्यान्ना support करणार्या विचारान्चा मि निषेध करतो आहे. हा निषेध तात्विक आहे, वैयक्तिक नव्हे याची कृपया दखल घ्यावी.
|
Chinya1985
| |
| Saturday, February 09, 2008 - 11:55 am: |
| 
|
१००० वर्षांच्या गुलामगिरीनंतर ती हिंदुंच्या नसानसात झाली आहे. आज अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनणारे मोठमोठ्याने सांगतात आम्ही या या चर्चमधे जातो,इतक्या इतक्या वर्षांपासुन कन्व्हर्ट झालेलो आहेत वगैरे पण आपल्याकडे हिंदु धर्माबद्दल असे सांगणे म्हणजे लगेच फ़ॅसिस्ट बनुन जाते. मुस्लिमांचा लाळघोटेपणा केल्याशिवाय धर्मनिरपेक्ष म्हणवलेच जात नाही. देशभक्ती म्हणजेच फ़ॅसिझ्म अशी एक धारणा करुन देण्यात येते
|
Dhondopant
| |
| Saturday, February 09, 2008 - 12:20 pm: |
| 
|
आजकाल सर्वच जण बरोबर असे काहीतरी गाठोडे होवुन बसले आहे. तु पण बरोबर मी पण बरोबर आणि कधी कुठे कशावरुन कुणाचा रोष होईल हे सांगता यावयाचे नाही. काही अर्थ आहे का याला?... आपण एक एक्त्रित समाज म्हणुन कधी जगणार आहोत?.. ते सुख मला ईथे मिळणार आहे का? कधीतरी?.. ती भावना काय असु शकते याची काही थोडी कल्पना US मधे राहीलेल्यांना येवु शकते पण म्हणुन ईथे तो प्रकाश पडणार आहे का? की वर्षानुवर्षे केलेल्या वैचारीक आणी अध्यात्मिक तत्वचिंतनाचा मेळ आणि परीपाक म्हणुन ईथल्या लोकांच्या वाट्याला हेच फळ येणार?.. याला शेवट काय?
|
Santu
| |
| Saturday, February 09, 2008 - 1:16 pm: |
| 
|
जीएस तुमचे अगदि बरोबर आहे. राजपुतांचा इतिहास हा राणा प्रताप, पद्मिनीसारख्या रणशुरांचा आहे तसाच सवाइ जयसिंग मानसिंग या सारख्या फ़ितुरांचा सुध्दा आहे. पण हा अशुतोष तर सर्व उलट दाखवायला निघाला आहे. म्हणे अकबर सहिष्णु. खर तर अश्या स्वजनद्रोह करणार्या या सिनेमावाल्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
|
जिऐस अगदी बरोबर. मी शालेय इतिहासाचा मुद्दा त्यामुळे नेहमी मांडत असतो. आपल्या कॉग्रेंसी राजकारण्यांचा निधर्मी या नावाखाली चालेलला हा सावळ गोंधळ आहे आपल्याच देशाचा इतिहास त्यांनी धर्माचा नावावर बदलला त्यामुळे आज लोक अकबर जोधा च्या प्रतिक्षेत आहेत त्यांना ते विचीत्र वाटत नाही. लहान मुलांना जे शाळेत शिकवीले तेच आयुष्यभर खरे वाटते. मोठेपणी परत एकदा ईतिहास खोलाता जाउन वाचनारे लोक विरळ असतात. त्यातुन असे पिक्चर वा पुस्तक आले की मग येनार्या पिढीला तेच खरे वाटते. याविरुध्ध एकजूटीने निषेध नोन्दवायचे सोडाच इथे आपल्याच लोकाना निरर्थक वाद अन हे चूक कसे काय? या पोकळ चर्चेत स्वारस्य आहे.. यातून कुठल्या समाज वा मानसिकतेवर अन्याय होतो याची जाण प्रिमियर्स च्या प्रतिक्षेत असणार्याना नसते... सद्सदविवेकबुध्धीची कवाडे एकदा बन्द केली की तुम्ही दाखवाल तो सूर्य अशी आजची अवस्था आहे>>>>> योग अतिशय योग्य. काय बरोबर आणि काय चुक यातील फरक आजकाल लोकांना कळेनासा झालाय वा हे काही चुक आहे हेच त्यांना वाटेनासे झालेय. (ऐतिहासिक चित्रपटाना मुद्दाम इतिहास क्षेत्रातली माणसे बोलावतात.) >>>> नंदीनी त्या इतिहासकारांचे नाव मिळतील का? नाही तु इतके सांगेतेस व तुला सगळ माहीती असते म्हणुन विचारले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|