Asambhav madhye faarach bashkal pana suru kela aahe. Aata tar shastri kutumbateel saglech jana haloo haloo vede hot challe aahet. Mansi Salvi ne Pregnancy sathi serial sodli ahe. So please tichya baddal kahi gair samaj karun gheoo naka. Navin Shubhra jee aahe tee jara manda vatthe. Nilam shirke full credit gheoon jate aahe.
|
Dakshina
| |
| Tuesday, December 11, 2007 - 6:47 am: |
| 
|
कळत नकळत मालिका मी जमेल तशी पहाते, म्हणजे आठवड्यातून एकदा, किंवा दोन आठवड्यातून एकदा.... तरीसुद्धा कळते कारण निम्मा वेळ कॅमेरा या चेहर्यावरून त्या चेहर्यावर 'झिक झिक' करत फ़िरतो, अख्ख्या एपिसोडमध्ये सगळेजणं मिळून फ़क्त २ ओळींचा डायलॉग बोलतात. बाकी वेळ झाक झूक कॅमेरा आणि जाहीराती...
|
Kalach mee kalat nakalat cha title song pahila... kharokhar tee Rutuja Close up chee advertisement karte aahe. Mahalaxmi Ayyer cha aawaz tar class aahe. Pan ganyacha direction evdha khaas kelela nahi. Aani tyat Rutuja screen var pan deed fut vatthe mhanun tee evdhi chaap padoo shakat nahi. Mala asa vattha hya serial madhye sadan kada radaychech asel mhanun Rutuja Deshmukh la ghetle aahe ... HE HE HE
|
Monakshi
| |
| Tuesday, December 11, 2007 - 11:14 am: |
| 
|
महालक्ष्मी अय्यर??????? मला वाटतं तो आवाज वैशाली सामंतचा आहे.
|
Mansmi18
| |
| Tuesday, December 11, 2007 - 1:51 pm: |
| 
|
planetvu.com सुरु झाले का? नसेल तर कधी होणार काही idea ? will anyone update on whats happening on zee marathi serials? Thanks in advance
|
Meemarathi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:15 am: |
| 
|
Nahi monakshi..... Serial suru hotanach .... Mahalaxmi Ayyer cha naav yeta .... not vaishali samant. Punha ekda neet paha :-)
|
Dakshina
| |
| Thursday, December 13, 2007 - 9:38 am: |
| 
|
कळत नकळत चं टायटल साँग 'वैशाली सामंत' ने च गायलंय.
|
Dakshina
| |
| Monday, January 14, 2008 - 4:21 am: |
| 
|
परवाचा कळत नकळत चा भाग कुणी पाहीला का? आता सिरियल्स मध्ये पण अचाट आणि आतर्क्य गोष्टी घडू लागल्या आहेत. मधुरा जी दवाखान्यात अँडमिट झालेली दाखवली आहे, त्यात तिला इन्ट्राकॅथ चक्क उलट्या बाजूने लावलं होतं म्हणजे सुई मनगटाच्या दिशेने हवी, ती अशी उलटी बोटांच्या दिशेने.... प्रेक्षकांना हे सिरियल्स वाले समजतात तरी काय?
|
Psg
| |
| Monday, January 14, 2008 - 10:00 am: |
| 
|
हो का? मी ती मालिका शब्दश्: येता-जाता बघते.. त्यामुळे इतकं नीटपणे नाही बघितली.. पण त्या दोघांचं हळूहळू एकमेकांत गुंतणं छान, हळूवारपणे घेतलं ते आवडलं मला.. 'कळत-नकळत'ला साजेसं आणि सुबोध भावे तर खास अभिनय करतो!
|
Manjud
| |
| Monday, January 14, 2008 - 10:49 am: |
| 
|
वैशाल सामंतच कळत नकळतची पार्श्वगायिका आहे...
|
Amruta
| |
| Wednesday, January 23, 2008 - 8:07 pm: |
| 
|
या सुखांनो या कुणी बघत का?? मला सध्या बघायला मिळत्ये तर मला खालील updates कुणी देउ शकेल का?? १. अभय च नक्कि काय झालय?? वहिनिबाई कश्या नोकरी करु लागल्या?? २. निरज च काय झालय?? काय एवढा मोठा प्रश्ण निर्मान झालाय?? ३. कस्तुरी मॅडम च काय चाल्लय?? जयदीप ( तो चश्मा, दाढि अणि पोनीवाला) कोण आहे? ४. ईरा आणि प्रणय आणि आणखिन कोणीतरी तो प्रेस वाला हे नविन characters कोण आहेत?? खरतर पहात नाहिये हेच बरय पण तरी आपली एक उत्सुकता असंभव मधे फार काहि गेल्या वर्षभरात घडलय अस वाटत नाहीये बर्यापैकी कॅचप केलय. तरी काही खास घडल असेल तर सांगा आणि पूनम तु कळतनकळत बद्दल सांग ग.
|
Nkashi
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:04 am: |
| 
|
अमृता, तुझ्या १ आणि २ च उत्तर १. अभय च नक्कि काय झालय?? वहिनिबाई कश्या नोकरी करु लागल्या?? - डोॅ. अभयच्या होस्पिटल मध्ये कोणी पेशंट दगावतो आणि कोर्ट नुकसान भरपाई द्यायला सांगते ३० लाख रुपये आणि २ वर्षे प्राक्टिस करायची नाही, संसाराला मदत म्हणुन वहिनीबाई कामाला लागतात. २. निरज च काय झालय?? काय एवढा मोठा प्रश्ण निर्मान झालाय?? - निरज १०वी च्या प्रिलिम्सला उशिरा पोहोचतो, त्यामुळे teacher त्याला पेपर लिहायला देत नाहीत. त्याचा राग म्हणुन तो teacher ला कंपासने मारतो / मारायचा प्रयत्न करतो. मग पोलिस केस आणी कदाचित कोर्ट केस होते / होईल. नोट : हि सिरीयल मी पहात नाही updates सा.बां कडुन मिळतात. त्यामुळे काही इकडे-तिकडे झाले असल्यास माहित नाही
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 2:12 pm: |
| 
|
नक्षी, थॅंक्स ग, तुझ्या सा.बां. ना माझे बाकिचे प्रश्ण पण विचार ना. अभयच ठिक आहे पण निरजच प्रकरण जरा अतिच वाटतय.
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:08 pm: |
| 
|
काल ती जुनी नायक (कस जगायच? कस वागयच?) मालिका पहात होते. तर त्यात चक्क तो अनिकेत विश्वासराव आहे. छान छोटा दिसत होता, आवाजावरुन आधि ओळखल
|
Bsk
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:53 pm: |
| 
|
काय सांगतीयेस अम्रुता? तो अनिकेत विष्वासराव आहे? तो छोटा मुलगा?? माझ्या नाही लक्षात आलं कधी! मस्त होती ती सिरियल..आणि ते टायटल सॉंग तर फारच भारी!
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:48 pm: |
| 
|
तो छोटा मुलगा नाहि ग. अनिकेत त्या सिरीयल मधे कोण होता ते कळ्ळ नाहि मला काल. नंतर नंतर मिळाली नव्हती ती मालिका मला पहायला. तो छोटा मुलगा नंतर मोठा झालेला का?? मी काल पहिल त्यात अनिकेत १७,१८ वर्षांचा असेल. बारीकसा, सुकडा आणि उंच
|
Prachee
| |
| Tuesday, February 05, 2008 - 12:42 pm: |
| 
|
हो हो, परवा एका भागात काही मुले सिनेमाला जातात असे दाखवले.... त्यात अनिकेत होता
|
Psg
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:54 am: |
| 
|
नायक म्हणजे दिलिप-नीना कुलकर्णींची ना? गोड होती सीरीयल ती अश्या साध्या सीरीयली बनतच नाहीत आता असो, या सुखांनो चे अपडेट्स: ३. जयदीप कस्तुरीवर कॉलेजमधे असतांना प्रेम करत असतो, त्याने तेव्हा तिला प्रपोजही केलेले असते, पण तिला श्रीमंत नवरा हवा असतो, म्हणून ती त्याला नाकारते. आता तो पैसेवाला होऊन तिच्याकडे परत येतो. पण आता तिला 'अधिकारी कुटुंबाचे संस्कार' मिळाल्यामुळे पैश्याची व्यर्थता कळलेली आहे आणि ती त्याला झिडकारते. तो आता त्याचाच सूड घेत आहे. परत घोळ असा की मयुरेश-कस्तुरीला मयुरेशमधे असलेल्या दोशामुळे मूल होत नाहीये हे तिने मयुरेशपासून लपवलेले सीक्रेट जयदीपला माहित आहे. म्हणून ब्लेकमेलिंग वगैरे पण चालू आहे. आता ती म्हणे मयुरेशलाच घटस्फोट देणार आहे, म्हणजे सगळा किस्साच खतम! याने काय साध्य झाले ते मी अजून २ महिन्यांनी सांगीन ४. ती नवी पात्र सीरीयल वाढवण्यासाठी घुसवली आहेत. त्यांचा आणि अधिकारींचा काहीही संबंध नाही. बादरायण संबंध असा की सरिता त्या कुटुंबात नोकरी करायला जात आहे. नोकरी कसली माहित्ये का? 'कुटुंबावर संस्कार करण्याची'!!!!! अचाट आहे ना? आता कळत नकळत: रुतु म्हणजे अनिकेतच्या बहिणीला सुबोध भावेनी पूर्णपणे स्वत:च्या जाळ्यात ओढले आहे. रुतुला ऋजुता आणि अनिकेत भावेबद्दल सगळं सांगतात- अगदी तो आणि ऋजुता लग्न करणार होते तेही, पण ती ऐकत नाही. इकडे तो लाला असतो ज्याच्यावर भावेनी हल्ला केलेला असतो तोही त्याच्या मागावर असतो. भावे आणि रुतु चक्क देवळात लग्न करायला येतात. पण ऐनवेळी ऋजुता आणि अनिकेत मधे पडतात आणि रुतुला ओढून नेतात. त्याच वेळी भावेला लाला गोळी घालतो पायात- हे अगदी कालच घडलं हं- सो हा अगदी लेटेस्ट अपडेट आहे. इसीके साथ आजका बातमीपत्र खतम. फिर मिलेंगे ठीक २ महिने बाद, इसी समय, इसी जगह. टींगटाँग!
|
सगळ्यात राडा झालेली सीरीयल म्हणजे "या सुखानो या". काय ती कथा कुठेही भरकटतेय.तो comic जयदीप अन त्याला सर्व सां गणारी कस्तुरी. बन्द करा लेको!!!
|
Uchapatee
| |
| Wednesday, February 06, 2008 - 1:53 pm: |
| 
|
रवी अगदी. बायकोशी घेतलेला पंगा नडल्यामुळे हल्ली आमच्याकडे रोज याच रटाळ मालिकांचा रतिब असतो. एकदा चुकुन एक एपीसोड पाहीला गेला, तर त्यात जवळ जवळ संपुर्ण वेळ "रात्रीचा उरलेला भात, दुसर्यादिवशी त्या वर होउ शकणार्या संभाव्य प्रक्रीया व चांगला राहील्यास त्याचे होउ शकणारे वेग वेगळे पदर्थ" यातच गेला. ज्ञानात चांगलीच भर पडली. :-)
|