|
Raadhika
| |
| Monday, February 12, 2007 - 4:36 pm: |
| 
|
[अहो पण मी फक्त जे मराठीत लिहीत नाहीत नि ते सुद्धा मायबोलीवर, नि वर म्हणतात आम्ही इथ्थेच येऊन आमचे इंग्रजी, उर्दू ज्ञान दाखवणार, तुम्ही मराठी साठी सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल आम्हाला काही आदर नाही! अश्या लोकांना मी दळभद्रे म्हणतो!] १. आपण भारतातले दळभद्रे लोक म्हणालात. वरची सर्व चर्चा वाचा आणि ठरवा इंग्रजी भाषेत कुठल्या देशातील रहिवाशांनी लिहिले आहे. आणि कुणाला रोमन keyboard वापरून देवनागरी लिहिणे जमत नसेल तर त्याने इथे मतेही मांडू नयेत? २. इथे कुणी उर्दू ज्ञान दाखवत नव्हते, एक समर्पक शेर सांगितला. यालाही आपली हरकत असेल, तर काय बोलणार? ३. आपणही परकी भाषेतील उदाहरणे, म्हणी वाक्प्रचार वापरत असाल, मग इथे हरकत का? लोका सांगे....? ४. हे सर्व यासाठी की कुणास असे वाटू नये आपण फ़ार constructive comments दिल्या आणि मी फ़क्त व्यक्तिगत टिका करत्येय.
|
अरे, पण महाशिवरात्रीला भांग चालते, दिवाळीत, तसंच सत्यनारायणासमोर बसून दारू प्यायलेली चालते तर हळदीकुंकवालाच का हरकत तुमची?
हे माझं मत असेल असं नाही. तसंच हे आधीच कोणीतरी मांडलेलं असू शकतं. मी आपलं चर्चेची गाडी रुळावर आणायला लिहीलं. राधिका, तुला एकतर छचोर या शब्दाचा अर्थ माहीत नाही, किंवा मग झक्की कोण, त्यांचं वय, अधिकार काय आणि आपला काय याचा एकूण अंदाज दिसत नाही. ते अभिमान वगैरे ठीक आहे, पण हे रास्त नाही हो!
|
Mansmi18
| |
| Monday, February 12, 2007 - 10:08 pm: |
| 
|
मला सत्यनारायणाच्या पुजेच्या तयारिच्या यादीत दारु दिसलि नाही. तुमच्याकडे लेटेस्ट यादी आहे वाटते.
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 10:36 pm: |
| 
|
झक्की कोण, त्यांचं वय, अधिकार छ्या:! वय, अधिकार याला काही अर्थ नाही इथे. मांडलेल्या मुद्द्याचाच फक्त विचार करायचा असतो, कुणि लिहीले ते महत्वाचे नाही! मुद्दा आक्षेपार्ह असेल तर तो कुणिही मांडला तरी आक्षेपार्ह नि मुद्दा चांगला असेल तर तो कुणिही मांडला तरी चांगला, फक्त मराठीत लिहावा, ही अपेक्षा!अहो केवळ मते मांडायला ही जागा नव्हे, मराठीत लिहायला, वाचायला ही जागा असे माझे मत आहे. नि केवळ एक दोन शेर लिहील्याने माझे काही बिघडत नाही, पण मी बरेच BB बरीच वर्षे वाचतो, त्यातून माझे असे मत झाले आहे. जरा सवय केली की देवनागरीत लिहीता येईल, त्यासाठी इथेच खूप मदत मिळेल. ते करा नि मग मते मांडा, देवनागरी मराठीत. शिवाय अशु सचिन भारतातलेच, पण abcd ने अमेरिकेत राहून प्रयत्न केला तसे त्यांनाहि करता आले असते. खरे तर नुसते मराठीत लिहीले नाही म्हणूनच मी त्यांना दळभद्रे म्हणतो असे नाही. माझा रोख, जे लोक, हटवादी पणाने, मुद्दाम मराठीत लिहीत नाहीत, नि वर वाद घालत बसतात, त्यांच्यावर जास्त आहे. तर तुम्ही लिहीलेत ते बरे केलेत. हळू हळू माझी मते घासून पुसून स्पष्ट शब्दात मांडल्या जाऊ लागली. आता तुम्ही मला छचोर म्हणा, दळभद्रे म्हणा. मला स्वत:ला माहीत आहे मी काय आहे ते. तेंव्हा लोक काय म्हणतात ते लोकांना जे दिसते, नि त्यांच्या अकलेने ते त्यातून काय अर्थ काढतील त्यावर अवलंबून. त्याबद्दल मला काहीच करता येणार नाही. शिवाय या वयात, मला आता कुणालाहि काऽहीहि पटवून द्यायचे नाही, फक्त मते मांडतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या. माझी मते पण बदलणार नाहीत, नि मला कशाचे वाईटहि वाटणार नाही.
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 10:43 pm: |
| 
|
शिवाय अत्यंत महत्वाचे, नि BB च्या विषयाला धरून बोलायचे तर हळदीकुंकवाबद्दल माझे एकच मत आहे: हळदी कुंकवाबद्दल माझे एकच मत आहे, ते असे की बायकांनी वारंवार (लहान मुलांना घेऊन) हळदीकुंकू करावे. तिथे काय योग्य नि मनाला आनंददायक वाटेल ते करावे. शक्यतो उशीरा घरी परतावे. म्हणजे पुरुषांच्या जिवाला जरा स्वस्थता मिळेल! यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? मायबोलीवर मराठी लिहीणे हा वाद मायबोलीवर पहिले इंग्रजी लिखाण आले तेंव्हाच म्हणजे १० वर्षापासून चालू आहे. माझे मत बदलतच नाही. म्हाणून संधि मिळताच मी ते मांडतो.
|
झक्की कोण, त्यांचं वय, अधिकार >>>> वयाचे मानसशास्त्राप्रमाणे chronological age आणि mental age असे दोन प्रकार पडतात हे बरीक लक्षात असो द्यावे!!
|
Raadhika
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:26 am: |
| 
|
[ राधिका, तुला एकतर छचोर या शब्दाचा अर्थ माहीत नाही, किंवा मग झक्की कोण, त्यांचं वय, अधिकार काय आणि आपला काय याचा एकूण अंदाज दिसत नाही. ] बरं ठीक आहे... छचोर शब्द चुकीच्या अर्थाने वापरला... त्यामुळे काय समस्त मायबोलीकरांचा अपमान झाला असेल त्याबद्दल मी माफ़ी मागते. पण, त्यामुळे झक्कींनी भारतीयांबद्दल केलेल्या comments बरोबर तर ठरत नाहीत ना? असं उगीचच दुसर्या देशावर टीका करणं योग्य आहे का? [ राधिका, तुला एकतर छचोर या शब्दाचा अर्थ माहीत नाही, किंवा मग झक्की कोण, त्यांचं वय, अधिकार काय आणि आपला काय याचा एकूण अंदाज दिसत नाही. ] बरं ठीक आहे... छचोर शब्द चुकीच्या अर्थाने वापरला... त्यामुळे काय समस्त मायबोलीकरांचा अपमान झाला असेल त्याबद्दल मी माफ़ी मागते. पण, त्यामुळे झक्कींनी भारतीयांबद्दल केलेल्या comments बरोबर तर ठरत नाहीत ना? असं उगीचच दुसर्या देशावर टीका करणं योग्य आहे का? आणि एखादा माणूस वयाने मोठा असेल तर त्याने केलेली टीका डोळे झाकून स्वीकारायची??? anyway , मला इथे कुठलाही वाद घालायचा नाहिये.
|
Manya2804
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:45 am: |
| 
|
युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि | युक्तिहीनं वचस्त्याज्यं वृध्दादपि शुकादपि |
|
Zakki
| |
| Tuesday, February 13, 2007 - 11:00 am: |
| 
|
टीका डोळे झाकून स्वीकारायची??? छे, छे. अहो मुळीच नाही. आपले मत योग्य वाटत असेल तर टीकेला न जुमानता ते मांडत रहायचे. कुणि नावे ठेवली तर तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला नाही ना वाटत तुम्ही सगळे दळभद्रे आहात, मग तुम्ही कुणाकुणाकडे लक्ष देणार? नि प्रत्येक वेळी असे कुणि काही म्हंटले की तेच धरून बसणार? तसा जगात भारतीयांचा अपमान पदोपदी होत असतोच. फक्त तुम्ही अजून अनुभवला नसेल. मी म्हंटले ना, पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे. नि शिवाय सर्व देशाला नाही हो दोष दिला, फक्त काही व्यक्तिंना दोष दिला, नि ते भारतात आहेत याचे दु:ख जास्त म्हणून तसे म्हंटले. मला खरेच वाईट वाटते की भारताबाहेर अनेऽक वर्षे राहूनहि जे लोक आवडीने, प्रयत्न करून मराठी लिहीतात, देवनागरी लिहितात, पण भारतातलेच लोक आपल्या भाषेची लाज बाळगतात, ती न स्वीकरता, लगेच परकी भाषेचा आग्रह धरतात, नि तो सुद्धा खास मराठी साठी उघडलेल्या मायबोलीवर! तर सोडा आता तो विषय. गेल्या दहा वर्षात माझ्या मतात फरक पडला नाही, केवळ सभ्यतेचा झटका येतो मधून मधून म्हणून याहून वाईट शब्द इथे लिहीले नाहीत एव्हढेच. ते जाऊ द्या हो, मुद्द्याचे बोला. मी इतरहि विचार मांडले आहेत वरती. पण या बीबी वर हळदी कुंकवाचे बोला. माझ्या मतांबद्दल तुमचे काय मत आहे?
|
Zakki
| |
| Tuesday, February 13, 2007 - 11:09 am: |
| 
|
वयाचे मानसशास्त्राप्रमाणे chronological age आणि mental age असे दोन प्रकार पडतात हे बरीक लक्षात असो द्यावे!! अहो रॉबिनहूड, तुम्ही असे सारखे सारखे लिहू नका. कुणि खरेच तुम्ही काय लिहीले ते वाचले, तर पहिले तुम्हालाच उचलून वेड्याच्या इस्पितळात टाकतील!
|
मी झक्कींच्या एका मुद्द्याशी सहमत आहे. मराठी भाषेतच विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी मायबोली हे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्वांनी मराठीतच लिहायचा प्रयत्न करावा. ते फारसे अवघड नाही. इंग्लिशमध्ये लिहिल्यास मायबोलीचा मूळ उद्देशच नाहीसा होतो. इंग्लिश मध्ये लिहिण्यासाठी इतर अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत.
|
अर्थातच बोवाजींच्या या मुद्द्याशी मी (कधी नव्हे ते)सहमत आहेच. अर्थात मला इन्ग्रजी येत नसल्याने नाईलाजाने मराठीत ल्याहावे लागते ही आपली अन्दरकी बात. मराठीच्या अभिमानाखाली ती आपली दडवून न्यायची...
|
Yogy
| |
| Tuesday, February 13, 2007 - 4:51 pm: |
| 
|
त्यामुळे सर्वांनी मराठीतच लिहायचा प्रयत्न करावा. ते फारसे अवघड नाही. आणि शक्य तिथे (थोडे धाडस करुन का होईना पण) मराठीतच बोलावे. ते ही फारसे अवघड नाही. बाकी आता हळदीकुंकवाची चर्चा चालू द्या.
|
Abcd
| |
| Wednesday, February 14, 2007 - 12:10 am: |
| 
|
आगदी बरोबर,सगळ्यान्ची माफ़ी इन्गलिश मधे लिहील्या बद्दल. ख़ुप सवय आल्यावरच आता लिहीत जाईन. स्वत:च अशुध्द लिहिलेला बघवत नाही म्हणुन इन्ग्लिशचा वापर.
|
Bee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 10:33 am: |
| 
|
Moderator-X Mod ON मंडळी कृपया विषयाला धरुन बोला. भरकटू नका. Moderator-X Mod OFF
|
अगं बाई हळदीकुंकू उतरलं संपलं वाटतं.
|
Chaala navin thread chalu karu. Ya bayakana basu det batali gheun Kashala dokyala jast taap karun ghyayacha . I want to start a new thread : "Valentine Day (Deshi Style) - Pragati ki Vikruti". Can someone start this thread. I don't know how to do it anymore.
|
Athak
| |
| Wednesday, September 19, 2007 - 6:24 am: |
| 
|
अरे पार्टी संपली का
|
Disha013
| |
| Wednesday, September 19, 2007 - 4:04 pm: |
| 
|
मलाही हसु आवरत नाहिये! सगळे पिउन टाईट झालेत वाट्ट! हम किसीसे कम नही! }
|
Ravisha
| |
| Thursday, September 20, 2007 - 4:36 pm: |
| 
|
अरे देवा,परत इंग्रजीच का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|