|
Maanus
| |
| Wednesday, November 14, 2007 - 12:51 am: |
| 
|
just go on All India BPO Girls one day strike... make government punish those two guys. I just read that, there is no follow up on that case. its been 15 days. Judge has extended their stay in jail. make government create some BPO Lobby, which will define rules and make sure they are getting followed by all IT sector companies.
|
Manjud
| |
| Wednesday, November 14, 2007 - 7:01 am: |
| 
|
meggi , तुझ्या कंपनीत जर अश्या प्रकारचे असुरक्षित वातावरण आहे, तुलाही असे वाईट अनुभव येत आहेत, तर अश्या ठिकाणी तु काम कशी काय करू शकतेस?
|
Badbadi
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:06 am: |
| 
|
कोणी सांगितलं आमच्या तुला आमच्या कंपनी मध्ये guest house/dorm facilities आहेत? >> नसतील तर नियमाप्रमाणे project मधलं कोणी तुझ्याबरोबर येईपर्यंत तू ऑफ़िसमध्येच थांबणं अपेक्षित नाही का? अकारण ऑफिसमध्ये थांबावं लागेल कदाचित पण ते निदान सुरक्षित तरी असते. tiu ने म्हणल्याप्रमाणे तुम्ही नकार दिला असता तर काही करुन वेगळी कॅब अरेंज केली असती शिवाय सोबत security guard दिला असता शिवाय, manager/ security head वगैरेंना त्याच क्षणी हे कळवलं असतस तर त्यांनी काही मदत केली असती. असो. The point I am trying to say from beginning is first you have to take due care of urself.(at least when its a matter of ur safety)
|
Princess
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:00 am: |
| 
|
हे जे काही झाले त्यात कोणाची चुक आहे हे ठरवणे खरच खुप कठिण आहे. पण सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे "आपली न्यायव्यवस्था". बंगलोरला दोन वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यातही ड्रायव्हरने रेप केला आणि मारुन टाकले. त्याचे पुढे काय झाले कळले नाही. मग असे गुन्हे करताना कोणाचे हात का म्हणुन कापतील. आले मनात आणि केला रेप.... स्त्री... तिचे राहणीमान, तिचे वागणे हे अंशत्: कारणीभुत असु शकते. पण पुरुषाची काहीच चुक नाही????? असे बेताल वाग़णे ही चुक नाही का??? कंपनी... अर्थात कंपन्या जबाबदार आहेतच. आपण ज्यांच्या साठी राबत असतो त्यानी आपल्या सुरक्षितततेची काळजी तर घ्यायलाच हवी. रात्री काम करणार्यांसाठी आणि त्यांच्या सुरक्षितततेसाठे नक्कीच वेगळी आणि ठोस पावले उचलायला हवेत.
|
Meggi
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:08 am: |
| 
|
मंजु, मी २ services कंपनी मध्ये काम केलं आहे. services कंपनी मध्ये हे जास्त common आहे. Product कंपनी त्या मानाने ठिक असतात. बडबडी, I repeat, you do not know the situation. ज्यांना सांगायची त्यांना ती मी सांगितली आहे, आणि त्यांना कळली पण आहे. मी hostel वर राहिले, कामानिमित्त बाहेर गेले तेव्हा मला बर्याच सुचना मिळाल्यात.. आणि त्याचा फायदा पण झाला. मी कधीही संध्याकाळच्यारात्रिच्या पार्टीमध्ये cold drink , ज्युस देखिल घेत नाही. new year च्या वेळीस जास्त alert असावं लागतं. हॉटेल मध्ये रहावं लागतं तेव्हा सग़ळ्यात आधी मी बाथरूम, कपाटं, बेड च्या खाली, shower curtains च्या मागे नीट बघुन घेते की कोणी आहे का? रूम ला आतुन लागणारी कडी किवा chain असलिच पाहिजे. खिडक्या नीट बंद होताहेत का हे बघणे आवश्यक. one way mirror ची test करावी. हे अती वाटलं तरी आवश्यक आहे. मी हे सगळं पाळते. बाहेर गावी जातांना मोबाईल चार्ज हवा, roaming activate करा, तिथे कंपनीच office असेल तर तिकडचे नंबर, higher management मधले नंबर मोबाईल वर तसेच कागदावर असावेत. higher management याच्या साठी की त्यांचा फोन कधीच बंद नसतो. हे सर्व मुलींसाठिच नाही तर मुलांसाठी देखिल तितकच महत्वाचं आहे.
|
Princess
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:13 am: |
| 
|
एक उदाहरणे देते. बंगलोरमध्ये असताना, माझी एक मैत्रिण रात्री साडेनऊ पर्यंत ऑफिसमध्ये होती. तिचे एकटीचे काम राहिले होते. बाकी सगळे टीम मेंबर्स निघुन गेलेत. साडेनऊ म्हणजे काही खुप उशिर नव्हे. रात्री १० नंतर कॅब फ़ॅसिलिटी घेता येते. म्हणुन मग तिने ऑफिसच्या बाहेरुन रिक्षा घेतली. कोरमंगलाच्या आत काही स्ट्रीट लाईट्स बंद होते आणि रस्त्यावर कोणीच नव्हते. तिथेच रिक्षा बंद पडली. ड्रायव्हर खाली उअतरला आणि त्याने मैत्रिणीचा लॅप टॉप हिसकावुन पळुन जाऊ लागला. तिने खुप आरडा ओरडा केला तेवढ्यात समोरुन एक कार येताना बघुन तो रिक्षावाला रिक्षात बसुन पळुन गेला. हे सगळे घडले फक्त २-३ मिनिटात. बडबडी, ऑफिसमध्ये काम संपल्यावर रात्री राहणे सगळ्यानाच शक्य होऊ शकत नाही. working mothers साठी तर तो खरच खुप गहन प्रश्न आहे. मूल असणार्याना तर घरी परत जावेच लागते. अशावेळी त्यांची जबाबदारी कंपनीची नाही का?
|
एक रेडिओवरची मुलाखत. प्रश्न: हल्ली मुलीसाठी रात्री अपरात्री फ़िरणं धोक्याचं झालेले आहे. याबाबत आपले मत काय? उत्तर्: मुलीसाठीच का हल्ली मुलासाठी पण ते धोकादायक आहे. माझी मुलगी रात्री येते जाते. ते तिचं काम आहे. "सातच्या आत घरात" ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. अर्थात त्याचे फ़ायदे आहेत तसे तोटेही आहेत. मी माझ्या मुलीला सर्व धोक्याची कल्पना दिली आहे. त्याला सामोरे जायची तिची इच्छा असेल तरच तिने काम करावं अन्यथा माझ्यासारखं घरी बसावं. प्रश्न्: पण तुम्हाला भिती नाही वाटत? तुमच्या मुलीची काळजी नाही वाटत? उत्तर्: मुलीचीच काय मला माझ्या मुलाचीही काळजी वाटते. सध्यचं जग इतकं बदललं आहे. म्हणून मी माझ्या मुलाना घरी तर राहु देऊ शकत नाही ना? प्रश्न्: पण हल्ली आपण पेपरमधे घटना वाचतो... उत्तर" अशी घटना लाखात एकदा होते. आधीही या घटना होतच होत्या. भले त्यावेळेला बायका घराचा उंबरा नको ओलांडू देत. नराधम सगळीकडेच असतात. आणि असे गुन्हेगार तुमच्या आमच्यातच घडत असतात.लैंगिक विकृती एका दिवसात निर्माण होत नाही. पण आपल्या समाजात याविष्यी बोलणंच पाप मानलं जातं. मग अशा घटना घडल्यावर त्याचा बभ्रा होतो. मी माझ्या मुलावर चांगले संस्कार होण्यासाठी कधीच झटले नाही. पण वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न केले. त्यामुळे माझी मुलं व्हेक्टिम होणार नाहीत आणि गुन्हेगार तर त्याहून होणार नाहीत याचा जबाबदारी मी घेतली आहे.. बालदिनानिमित्त परिसंवाद "पालकाच्या वाढत्याजबाबदार्या..." उत्तरे देणारी माझी आई...
|
Manjud
| |
| Wednesday, November 14, 2007 - 12:21 pm: |
| 
|
जेवढी जबाबदारी कंपनीची आहे तेवढीच तुमचीही आहे. कंपनी आपल्या परीने तुम्हाला कॅब \ ड्रॉप फॅसिलिटी देत आहे. त्यांच्या परीने त्यातून प्रवास करायचे नियम पण ठरवत आहे. कंपनी तुम्हाला बेसिक सिक्युरीटी देऊ शकत नसेल तर अश्या कंपनीत काम करणं चुकीचं आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे. बडबडीचा मुद्दा अगदी योग्य आहे. नियम आपणच धाब्यावर बसवतो. मग काही विपरीत प्रसंग घडल्यास जबाबदारी पूर्णपणे कंपनीची कशी?
|
Princess
| |
| Wednesday, November 14, 2007 - 3:54 pm: |
| 
|
आपली सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे, जर आपण आपल्या कामानिमित्त बाहेर गेलो. पण आपण ज्या कंपनीसाठी काम करतो आणि जे लोक आपल्याला रात्री काम करायला लावतात त्यांची ही जबाबदारी का नाही? आपण गृहीत धरुया, की सुरक्षिअततेच्या दृष्टीने स्त्रीने चाकु किंवा इतर हत्यार जवळ बाळगले. आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तरीही मला वाटते की पुरुषाची शक्ती ही नेहमी स्त्री पेक्षा जास्तच असणार. आणि ज्याच्या डोक्यावर वासनेचे भुत बसलेय त्याचे विचारायलाच नको. स्त्रीचा हात पिरगाळुन तिचा चाकु हिसकावुन घेण्यासाठी त्याला क्षणमात्रही लागणार नाही. स्त्रियांचे वागणे, बोलणे राहणीमान बदललय पण पुरुषाना (किंवा कोणालाही) न्यायाचा मुळीच धाक राहिला नाही हेच खरे. स्त्रीचे राहणीमान हेच एक कारण असते तर परदेशात रोज बलात्कार व्हायला हवेत. पण इथे लोकाना थोडी तरी जरब आहे. स्त्रीला गर्दीत फक्त स्पर्श केला म्हणुन लेदरच्या गरम पट्ट्याने दिलेला मार नॅशनल टीवीवर दाखवले तर कोणीही घाबरणारच ना... स्त्रीचा प्रतिकार फक्त छेडछाड करणार्या पुरुषाना वठणीवर आणु शकतो. वासनांध नराधमाना नाही. सुनसान रस्त्यावर अंधार्या रात्री मिरची पुड फेका, चाकु मारा किंवा अजुन काही करा पण तुम्ही त्यांच्या तावडीतून सुटु शकत नाहीत. एकच उपाय आहे, रात्री बेरात्री काम करणार्या कामकर्याची जबाबदारी कंपनीने घ्यावीच आणि न्यायव्यवस्था अशा लोकांशी वागताना जलद आणि दयामाया न ठेवणारी असावी.
|
Princess
| |
| Wednesday, November 14, 2007 - 4:06 pm: |
| 
|
नंदिनी, तुझ्या आईचे विचार आवडले आणि पटलेही. पण काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतात रात्री बेरात्री फिरणे मुलीबरोबर मुलासाठीही धोक्याचे आहे मान्य... पण पुरुषाचा खुन पैशासाठी होतो... मरताना त्याच्या शरीराची विटंबना होत नाही . मुलीवर रेप झाल्यावर तिला मारुन टाकतात. आणि बिचारी जगली तर समाज तिला सुखाने जगु देत नाही. पूर्वी अशा घटनांचे प्रमाण खुप कमी होते. आजकाल इंटरनेटचा वाढता प्रभाव, नव्या पिढीचे स्वैर वागणे हे कारण असु शकते. सातच्या आत घरात हे आजकाल शक्य नाहीच. पण स्त्री ही शारिरीक बळाने कमी आहे त्या दृष्टीने तिच्या सुरक्षिततेसाठी जास्त प्रयत्न व्हावेत असे मला वाटते.
|
Looks like apali bharatiya sanskriti transition phase madhye ahe. Tyamula apalya phdhila he sosave laganar ahe. Sagalyana full freedom hava ahe, security havi ahe, paisa jasta hava ahe, vatel tase bolayala have ahe, system ne sagale kahi kele pahije ase mat ahe, sangayala gele tar konach eikat nahi ... mazi situation vegali ahe mhanun uttar yete. Sagalech jababdar yala. Apan sudha. Rape ani killing hi criminal activity ahe tyamule karanaryala phashi zalich pahije. Americet pan bayaka ratri kam karatat. Pan koni cab madhye basun daru pit nahi, cab driverla vatel tase bolat nahi. Mi tar mhanin ... dress code asala phije (mulansathi and mulinsathi), vagayache kase yache pan training pahije. After that they are on their own. Russia madhye ase ahe. Tithe saral sangitale jate ki dress code follow nahi kela tar you are on your own. Apalyala bharatiya system tight keli pahije for everyone. Americet male harrassment chya cases pan chikkar ahet. Females saral saral pressure anatat. Tyamule ikadacha kayada bayakanvar pan thevadhach tough ahe. Ekun complicated situation ahe. Everyone must take care of themselves.
|
My last comment: Khare tar he taxi drivers, rickshaw drivers ... yani english shikun BPO madhye kam kele pahije. Te nakkich BPO kam karu shakatil. Tyat kathin ase kahich nahi. Mag asale prakar ghadane hopefully kami hotil.
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:28 pm: |
| 
|
मालविका बर्याच दिवसांपासुन एकच मुद्दा मांडायचा प्रयत्न करतेय तर त्याबद्दल लिहितो. मुलींनी वाट्टेल ते कपडे घालावेत,वाट्टेल तितकी दारु प्यावी वाट्टेल ते बोलाव पण त्यांना काही होउ नये अशी मागणी नेहमीच होत असते. पण हे practical आहे का??भारतात काय तर पुर्ण जगात शक्य नाही. परदेशात पण रेपचे प्रमाण कमी नाही. According to a news report on BBC1 channel presented in 12 November 2007, there were 85000 women raped in UK last year or about 230 cases everyday. This means according to the report that one of every 200 women in UK was raped last year. आता ज्या पाश्चिमात्य देशांमधुन नविन कपड्यांची फ़ॅशन येते तिथे पण हीच गत आहे. बर या देशांमधील न्यायव्यवस्था तर भारतापेक्षा खुपच चांगली आहे. शिवाय तिथेही फ़ार कमी लोक report करतात रेप झाल्यावर(३९%च करतात). बर साडीत मुली दिसायला लागल्या तर रेप थांबतील का??बिल्कुल नाही. पण तरीही तुमच्यावर वेळ येण्याचे chances कमी होतिल फ़ारतर. मुद्दा हा आहे की स्वत्:ने स्वत्:च्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. काहिहि झाल तरी रेप चुकिचा हे मी मान्य करेल तुम्ही मान्य कराल पण रेप करणारा तर नाही ना?? मला मुलींनी कुठलेही कपडे घातले तरी काहीही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी पुर्ण विचार करुन वागावे. आता परदेशात पण रात्री स्किनहेड्स च्या एरियात गेलात तर मार पडण्याची शक्यता असतेच ना मुलांना!!मुलेही असु म्हणु शकतात आम्ही कुठेही जाउ कधीही जाउ पण आमच्यावर हल्ला व्हायला नको पण असे होते का?? तुमचे कपडे तुमचे वागणे चांगले असलेच पाहिजे ना. तुम्ही जर रात्री अपरात्री कामाला जात असाल तर तुमच्यावर अशी वेळ येउ शकते हे विसरु नका मग लाखातिल एक तुम्हिहि असु शकता. जेंव्हा मी विमानात चढतो तेंव्हा मला माहित असते की लाखात एक विमान पडते आणि तरी मी त्यात चढतो म्हणजे ते लाखात एक विमान माझे असु शकते हे मला माहित आहे. बाकी कुठलेही कपडे घातलेल्या,कितिहि दारु पिलेल्या,कसेही बोलणार्या मुलीवर बलात्कार होणे हा अक्षम्य गुन्हा आहे,पाप आहे त्यामुळे करणार्याला फ़ाशीचि शिक्षा देण्यात यावी.
|
Manjud
| |
| Thursday, November 15, 2007 - 6:50 am: |
| 
|
भारतात नाईट शिफ्ट हा काही नविन intorduce केलेला concept नाहीये. ह्याच्याही आधी सगळ्या हवाई कंपन्या, MTNL , Airport Authorities मध्ये बायकाना नाईट शिफ्ट होतीच की. मग तेव्हा हे असे पश्न कसे नाही उद्भवले?
|
Malavika
| |
| Thursday, November 15, 2007 - 6:59 pm: |
| 
|
बडबडीचा मुद्दा अगदी योग्य आहे. नियम आपणच धाब्यावर बसवतो. मग काही विपरीत प्रसंग घडल्यास जबाबदारी पूर्णपणे कंपनीची कशी? मंजू, असे प्रकार घडतात, तेव्हा किती वेळा ते नियम मोडल्यामुळे घडतात? आणी कितीवेळा कंपनी सिरीयसली त्यांनीच तयार केलेले नियम काटेकोर्पणे पाळायला तयार असते? दरवेळी तुम्ही वाद घालू शकत नाही. चिन्या, माझा आपण आपली काळजी घ्यायला विरोध नही. किंबहुना, ती घेतलीच पाहिजे. कारण शेवटी जिवावर आपल्या बेतणार असतं. पण मला इथे सर्वात दुर्दैवी वाटलेली गोश्ट म्हणजे, (आणि ह्यात मुली आघाडिवर आहेत.) असा प्रकार घडतो तेव्हा ज्या बाईच्या जिवावर हे बेतते तीचा पूर्णपणे दोश नसू शकतो हे मानयला पण कही लोक तयार नाहीत. कितीतरी जणांनी ह्यात त्या बायकांचा दोश असतोच असे ग्रुहीत धरलेय. being naive ह काय गुन्हा नाही. just naive असल्यामुळे सुद्धा मुली अशा परिस्थितीत सापडतात. परिस्थिती माहिती नसताना आपण कसे काय judge करू शकतो? दुसरे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुणीही असे करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. बायका आपली काळजी घेत नाहीत मग असले प्रकार होणरच हे खूप हिरिरीने बर्याच लोकांनी मांडले आहे पण त्याऐवजी असे गुन्हे होणे हे माणुसकीला सोडून आहे ह्या मुद्द्यावर जास्त भर दिला पाहिजे. ह्यावरून असे गुन्हे घडले कि ते रिपोर्ट होण्याचे प्रमाण इतके कमी का आहे ते पुन्हा एकदा लक्षात येईल. त्या बाईनीच तिची काळजी कशी घेतली नाही, तिनी कपडेच तसे घातले होते इत्यादीची चर्चा लोक करत बसणार. She is the victim here. तिल आरोपी समजू नका. एकंदरच करूणा आणि सहानुभूती ह्या भावनंचा पूर्णपणे अभाव. दुसरे काय?
|
Chinya1985
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:07 pm: |
| 
|
त्या बाईला आरोपी ठरवण नक्किच चुकिच आहे पण त्याचबरोबर तुम्ही तुमचे कपडे,वागण वगैरे चांगल ठेवल तर काय वाईट आहे??शिवाय हे अस दोषी ठरवण सगळीकडेच होत ना??परवाच माझा एक मित्र दारु पिउन बाहेर फ़िरत असताना त्याच्याच मित्राने त्याचा महागडा मोबाईल चोरला. मी त्याला म्हणालो चुक तुझी आहे,तु दारु इतकी प्यायलाच कशाला??आता खर बघितल तर तोच victim आहे,त्याच्या मित्राने कुठल्याही परिस्थितित त्याचा मोबाईल चोरायलाच नको होता. पण तस नसत,तस होतही नाही. जगात अनेक अशा गोष्टी होतात ज्या व्हायला नको. मुलींनी कपडे,दारु,वागणे या गोष्टींवर लक्ष दिल्याने त्यांची सुरक्षा वाढत असेल तर तसे करण्यात काय चुक आणि काय कमीपणा?? रेप वगैरे सर्व माणुसकी सोडुन केलेल्या गोष्टी आहेत हे मान्य पण याला उपाय काय??शिवाय हा भारतातलाच नव्हे तर जगभरातला आणि पाश्चिमात्य देशातलाही मोठा प्रॉब्लेम आहे.
|
Preetib
| |
| Thursday, November 15, 2007 - 11:19 pm: |
| 
|
I want just say onething.Pls don't blame girls. I mean even a simple girl wearing proper cloths and behaving properly may get attacked. Its not just cloths/behaviour. Thats personal to everyone. Does that mean guy has right to rape a girl/women. What happend when a Muslim girl wearing Burkha also get raped and small girls got abused. Its wrong mentality of guys and its sin to abuse somebody physically. As I said earlier controlling such things are practically difficult day by day. Every cab driver should have background check as well as proper record has to be maintained. Girls should take extreme careful duirng night travel. means keep awake, have some protection devices like knief, make sure road is correct. Every time male collegue can't accompany a female one as residence may be far away. I remember one girl in my company escallated this issue saying she won't work late if there is not proper security. If u want me to work, give me saftey and drop me properly. Managment has to agree.
|
Princess
| |
| Friday, November 16, 2007 - 1:51 am: |
| 
|
मालविका, प्रीती १००% अनुमोदन. स्त्रीलाच का दोष दिला जातोय तेच समजत नाहिये मला. साडी नेसलेल्या स्त्रीवर बलात्कार होणार नाहीत होत नाहीत याची काय खात्री. गर्दीत तर अगदी चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या स्त्रियांना सुद्धा स्पर्श करायला हे वाईट लोक विचार करत नाहीत. वय, राहणीमान किंवा बोलणे/ वागणे या बाबींचा इथे कसा संबंध जोडणार??? जिच्यावर हा अत्याचार झालाय तिचीच चुक हे म्हणणेच खुप माणुसकीहीन आहे. तिच्यावर खापर फोडुन दिले की झाले... मग गुन्हेगार निर्दोष सुटला तरी नवल नाही. जळगांवचे सेक्स स्कॅंडल कोणाला लक्षात आहे का? त्यात अडकलेल्या मुलींचे राहणीमान अगदी साधे होते. तरी अडकल्याच ना जाळ्यात मी तर म्हणेन की न्यायालयाने थोडाही वेळ न घलवता सरळ फाशी द्यावी या लोकाना. तरच असे गुन्हे कमी होतील.
|
Princess
| |
| Friday, November 16, 2007 - 1:56 am: |
| 
|
स्त्रियांनी दारु पिणे, स्मोकिंग करणे, कपडे उत्तेजक घालणे या गोष्टीना माझा सुद्धा विरोध आहे. पण फक्त याच गोष्टी रेप साठी कारणीभुत आहेत असे मला वाटत नाही. असे जर असते तर अशा मुलीना पाहता क्षणी सगळ्यानीच रेप केला असता पण करतो कोणीतरी नराधमच... का??? निदान गुन्हा कोणी केलाय हे तरी निरपेक्षपणे ठरावे.
|
Maanus
| |
| Friday, November 16, 2007 - 2:59 am: |
| 
|
well thank god we dont have such laws http://www.breitbart.com/article.php?id=071115145104.rykb7bub where the victim is punished.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|