Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Case of girl in wipro bpo.. » Archive through November 13, 2007 « Previous Next »

Manjud
Wednesday, November 07, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचीच घडलेली ताजी घटना.

आम्ही संध्याकाळी घरी जाताना कॉटनग्रीनहून कुर्ल्याला जातो आणि तिकडून ब्रीज क्रॉस करून सेंट्रलची ट्रेन पकडतो. हार्बर ब्रीज क्रॉस करताना तिथे अतोनात गर्दी असते. काल आम्ही ब्रीज चढत असताना एका माणसाने गर्दीचा फायदा घेऊन मैत्रीणीला नको तिथे स्पर्श केला आणि एकदा नाही तर तीन वेळा.... तिसर्‍यांदा जेव्हा त्याने हा प्रकार केला तेव्हा तिला कळलं की हा चुकून झालेला स्पर्श नाही तर जाणून बुजून केलेला स्पर्श आहे. त्याच पावली ती मागे वळली आणि त्याचे बोट हातात घेऊन मळहाताच्या दिशेने मनगटाला टेकेल इतके उलटे पिरगळले. त्या माणसाला ह्या प्रतिकाराची अपेक्षा नव्हती. तो अक्षरश: बेंबीच्या देठापासून ओरडला. लगेच गर्दी गोळा झाली. त्या मैत्रीणीने सगळ्यांच्या समोरच त्याला विचारले, 'और कौनसी उंगलीसे किधर हाथ लगाना चाहता है?' त्या माणसाला गर्दीसमोर आपण केलेली कृती नाकारता येईना. सगळ्या लोकाना काय झालं असेल ह्याची कल्पना आली. सगळे आपआपल्या वाटेने निघून गेले. दुर्दैवाने तिकडे एकही पोलिस नव्हता म्हणून त्या माणसाला तसेच सोडून द्यावे लागले. पण पुन्हा दुसर्‍या कुठल्या मुलीला छेडण्याआधी तो १० वेळा विचार करेल ह्याची नक्की खात्री आहे.


Mrdmahesh
Wednesday, November 07, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधिंची तळमळ मला पण पटते. त्या मुलीने "मी कुणाला सांगणार नाही पण मला मारू नका" असं म्हणलं देखील होतं पण... त्या वेळी तिची काय अवस्था झाली असेल. कल्पना करवत नाही.. साहिल म्हणतात तसं कायद्याचा धाक कुणालाच राहिला नाही. एक गुन्हा लपवण्याकरता त्याहूनही गंभीर गुन्हा करायला हे लोक धजावले या वरूनच हे सिद्ध होतं..
काही वर्षांपूर्वी महापे इथे एक call center पहायला गेलो होतो. "अबे शाणे मैंने कल तेरेको एक सिगरेट पिलाई थी आज तू मुझे पिलाएगा" असं म्हणणार्‍या मुली तिथे पाहिल्यावर "या call center मध्ये call girl काम करतात की काय". असं माझा एक कलीग गमतीने म्हणाला होता. मग अशा मुलींना पाहून हे भडक डोक्याचे ड्रायव्हर चेकाळतात अन् सब घोडे बारा टक्के या न्यायाने ते सगळ्याच मुलींकडे त्या दृष्टीने पहातात. मग एखादी अशीच अभागी ("तशी" नसलेलीच) अलगद जाळ्यात येते.
या घटनेत ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराने दारू प्यायली होती असंही उघडकीला आलंय. हे सुद्धा त्या मुलीच्या कसं काय लक्षात आलं नाही? (काळ वेळ आल्यावर असलं काही लक्षातच येत नाही म्हणा..)
या दोघांना फाशीच व्हायला हवी यात दुमत नाही.
नंदिनीने सुचवलेला चाकू बाळगण्याचा उपाय उत्तम. पण प्रसंगी त्याचा वापर कसा करायचा याचा सराव हवा.


American_desi
Wednesday, November 07, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Any company should not allow private vehicles to transport their employees. Especially, big companies. Goverment or some regulating body must make that decision and punish the companies that do that by putting heavy fine.

If small companies use private drivers then they must give all the driver information to each employee including photo etc to each employee and set some rules so that the system is full proof.

Having said all these, I don't give high marks to today's BPO girls either. So many BPO girls stay alone. I am renting a flat in Mumbai to BPO ladies. First the girl comes saying me and my girl friend will be staying there. Later she brings in her boyfriend or some male guy to stay with her.

What can you do? So, people tend to ignore. If you ask them too many questions they say it is their decision.

American_desi
Wednesday, November 07, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini: Tu sangitalelya precautions kharach changalya ahet. Pan tula pan kahi prashna vicharavese vatatat

1) Daru pine --- You try to tell that you don't drink on that day. Well ... that sends a totally wrong message. The man who is asking you will think ... you do drink so he keeps showing interest in you.

2) Giving wrong mobile -- Again ... Man will use it .. will find out it is incorrect ... but will still think may be he made mistake taking it down so he will still be interested in you.

Why do you give such mix signals. Why can't you say that "I don't drink" or "I don't give mobile number". Why it is so hard to tell the truth and close the matter.

I am not trying to blame you. But giving mix signals make things worst ... in my opinion.

Malavika
Wednesday, November 07, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विप्रोची जबबदारी नाही कशी? त्यांनी त्या मुलीला रात्रपाळी करायला बोलावले होते. त्यांना रात्री भारतात (खरतर इतर कुठेही) रात्री एकट्या मुलीने ड्रायव्हरबरोबर जाण्यातले धोके माहिती आहेत. त्यांनी अशावेळी सिक्युरिटी गार्ड द्यायलाच पाहिजे. जबाबदारी नाकारून चालणार नाही.
दुसरे असे की वर काॅल सेंटर्च्या मुलींची जी भाषा आणी वागणे दिले आहे ते कधीच अशा गोष्टी justufy करू शकत नाही. अशी भाषा बोलणारे आणी वागणारे मुलगे बरेच असतात. साडी नेसून खाली मान घालून वावरणार्‍या मुलींवर अत्याचार होत नाहीत असे नाही. प्रश्न अशा नराधम वृत्तींचा आहे.


Divya
Wednesday, November 07, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण यात कंपनीची बेजबाबदारी जास्त वाटते. एकतर night shift मुलीनंआ द्यायला नको निदान local culture security safety लक्षात घेता. किंअवा त्यांच्या सुरक्षिततेची पुर्ण जबाबदारी घ्यायला पाहीजे. ladies driver ठेवाव. security guard लेडीजच द्यावा. हे प्रकरण कंअनीला पण वाटत तितक सोप जाणार नाही कारण american desi यांनी सांगीतलेले points कायदेशीर रित्या लागु होतात, आता आपल्या देशात कायदा कसा गुंडाळला जाइल हे नवीन नाही पण घरचे मुलींना late night पर्यन्त work करु देतील का?

American_desi
Wednesday, November 07, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Agree with Malavika. Bhashecha ani yacha kahi sambandha nahi. Muli ata modern ahet. Te accept kele pahije. Pan he prakaran ek crime ahe. Definitely wipro sarakhya companina jababdar thevale pahije.

Aashu29
Sunday, November 11, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविकाला अनुमोदन, कंपन्या आणि मुली दोहोंनी ही काळजी घेतलीच पाहीजे, इथे कोणालाच कायद्याचा धाक राहिला नाहि, करण न्यायप्रक्रिया वेळखाउ आहे आणि भ्रश्टाचार बोकाळलाय,कितीही मोठा गुन्हा घडला तरि मुस्कट्दाबी करता येते ना, मग कशाला घाबरा, हि व्रुत्ती झालिये लोकांची!

Nandini2911
Monday, November 12, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन देसी. माझे कार्यक्षेत्र वेगळे आहे. मी पत्रकार म्हणून काम करते. त्यामुळे मला एखाद्या व्यक्तीशी पूर्णपणे संबंध तोडता येत नाही. चुकीचा मोबाईल मी देते कारण रात्री अपरात्री उलट्या सुलट्या कॉल्सचा त्रास मला झालेला आहे. त्यामुळे मी माझा जुना मोबाईल नंबर देते. "डोल्फिन असल्यामुळे लागला नसेल त्याचा असाच त्रास आहे" हे सांगायला देखील बरे पडते. पण कधी कधी मला समोरच्याचा मोबाईल हवा असतो अशावेळेला तुझा नंबर दे मी मिस कॉल देते असं सांगून कॉल देतच नाही )बॅलन्स संपला :-))
तरीही बर्‍याचदा मी "त्यातली" नाही हे मी स्पष्टपणे सांगते.

डिनरला गेल्यावर ( interview वगैरेसाठी) वाईन वगैरे पिली जाते. जी मी पित नाही. अशावेळेला मी घेतच नाही म्हटलं तर समोरची व्यक्ती जास्त आग्रह करते. एकदा घेऊन बघ. वाईनच आहे वगैरे सुरू होतं ते टाळायचं असल्यामुळे मी हा "सॉरी आज नाही" हा फ़ंडा सुरू केला आहे. मिक्स किग्नलचा प्रश्न नाही आहे. मी कुठलाच सिग्नल देत नाही. :-)

मला एखाद्या व्यक्ती (किती का लहान असेना का) तोडून चालत नाही. खास करून पी ए ड्रायव्हर मॅनेजर हे बातमीमधले close friend, reliable source असतात. अशावेळेला त्याच्यातलंच एक होऊन रहावं लागतं. अती सती सावित्री पणा दाखवायला गेल्यास लोकानी लिहिलेली प्रूफ़ं तपासायची वेळ येईल माझ्यावर :-)

बाय द वे, परवाच एक ड्रायव्हर भेटला होता. तो आधी कॉल सेंटरच्या गाडीवर बसायचा. त्याला विचारलं तर म्हणे. "आयला काय पोरी असतात का ह्या. बोलायची पद्दत नसते. जरा उशीर झाला की इडीयट काय नॉनसेन्स काय.. सायबाच्या बायका न ह्या. आमची काही किंमतच नसते. काय कपडे काय बोलणं. आअणि काय वागणं इथे सुमोत बसून दारु पितात सिगरेट ओढतात पोरं फ़िरवतात. याच्यापेक्षा हडळ परवडली. वाटतं एकेकीच्या कानाखाली मारावं आणि परत घरी पाठवावं."




Badbadi
Monday, November 12, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकतर night shift मुलीनंआ द्यायला नको >> कंपनी ने का द्यायला नको?? आणि नको असेल तर मुलीने ती का स्वीकारावी??????

Meggi
Monday, November 12, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी देखिल एका CMM Level 5 कंपनी मध्येच काम करते. काही कारणाने मला रत्रि १० - ११ वाजे पर्यंत थाम्बावे लागले. मुलींसाठी वेगळ्या cabs आणि बरोबर कोणीतरी असलचं पाहिजे हा rule आहे. पण पूर्णपणे धब्यावर बसवलेला. मल रात्री एकटिलाच जावे लागले.
एक दिवस माझ्या cab मध्ये आधीच एकजण बसला होता. ही गोष्ट security च्या निदर्शनास आणता ' आज पावसामुळे सगळ्या गाड्या अडकल्यात, त्यामुळे एकाच दिशेने जाणारे एकाच cab ने जातील ' अस उत्तर मिळालं.
हे अनुभव मी open house मध्ये VP ला सांगितली असता मला typical ' गोली ' उत्तरं मिळाली. मी तर आता रात्री थांबायला नकार दिला आहे. पण कंपनी बेजबाबदार असतात हे कळुन चुकलं आहे. स्वत: ची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते.


Meggi
Monday, November 12, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच कंपनीतला अजुन एक अनुभव. मी visa interview साठी चेन्नईला गेले होते. रात्री ज्या हॉटेल मध्ये माझं बुकींग होतं तिथे मी ११.३० ला पोहोचले. एवढ्या रात्री त्यांनी मला 'हॉटेलमध्ये जागा नाही, दुसर्‍या हॉटेल मध्ये shift करतो अस सांगितल.' मी म्हंटलं ' मला रूम देत नसाल तर मी माझ्या manager शी आत्ता बोलते. ' हे ऐकल्यावर ५ मिनिटाच्या आत मला माझी room मिळाली. याचा अर्थ ते लोक खोटं बोलत होते.
दुसर्‍या दिवशी एक माणुस duplicate keys वापरून आत येत होता. मी security chain लावल्यामुळे तो आत येऊ नाही शकला. मी ओरडल्या वर म्हणाला मी laundry साठी आलो. 'laundry tag लावला नसताना आत यायची गरजच काय? ' असं म्हणून मी त्याला हाकलून दिला. थोड्या वेळाने ' खर्‍या ' laundry वाल्याने बेल वाजवली. याचा अर्थ तासाभरा पूर्वी आलेला माणुस laundry साठी आलाच नव्हता.
मी परत आल्यावर लगेचच travel desk आणि Hotel Manager कडे तक्रार केली. एक appologies चे मेल आले. अजुनही आमच्या कंपनी मधुन employees त्याच hotel मध्ये उतरतात. बघुया या open house मध्ये काय उत्तर मिळतं ते..


Divya
Monday, November 12, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी वर meggi ने लिहीलच आहे कंपनीतला अनुभव. आपल्याकडे security इतकी चांगली नाहीये late night पर्यन्त मुलींनी काम करायला. हिच घटना इथे घडली असती तर public reaction कंपनीबाबत नक्किच strong झाली असती. तो driver पण कंपनीचाच होता ना.

Preetib
Tuesday, November 13, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am also workin in CMM Level 5 company and in India I worked in late night also.
Company wants money so they take such projects . (Not BPO, normal IT also.)
So company is not in fault.
Once u r in Project, u need to work at such time.So a girl is not in fault.
Contrlloing drivers/Cabs/shifts/people is practucally difficult.
Rules are written but never followed.
Something extreme happens like this and we all try to find the reason.
But overall, it will still go like this work culture, night shifts, drops and all.

Girl: Should chk mostly she shd not be alone in cab and as nandini said some selft protection instruments.

Sometimes some drivers unnecessary starts conversation, don't entertain such ppl and immediately report this to Management.

Finally Its upto girls now to say firmy NO to such kind of jobs.


Badbadi
Tuesday, November 13, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well said Preeti! I completely agree with you.
meggi, एक दिवस माझ्या cab मध्ये आधीच एकजण बसला होता. ही गोष्ट security च्या निदर्शनास आणता ' आज पावसामुळे सगळ्या गाड्या अडकल्यात, त्यामुळे एकाच दिशेने जाणारे एकाच cab ने जातील ' अस उत्तर मिळालं. >>म्हणजे तू ज्या गाडीने जाणार त्यात इतर कोणीच बसायचं नाही का? कंपनीचा दुसरा सहकारी असला तर काय हरकत आहे??? आणि हे open house च्या आधी तू तुझ्या manager शी/ security head शि discuss करणे अपेक्षित असते. ते केलं होतंस का?

Meggi
Tuesday, November 13, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, आमच्या कंपनी च्या स्वत:च्या cabs नाहीत. आजुबाजुच्या कंपनी मिळुन एकच cab facility वापरतात. त्यामुळे rule प्रमाणे रात्री मुलींसाठी वेगळ्या cabs असतात ज्यात फ़क्त मुलगी आणि तिच्या project मधला मुलगा तिच्या बरोबर जाईल. अजून कोणीही नाही. त्या दिवशी माझ्या बरोबर कोणीही निघु शकलं नाही. अर्थातच open house मध्ये बोलण्या आधी या गोष्टी discuss झाल्यात..
Hotel च्या अनुभवावर तर माझ्या manager ने मला सांगितलं की ' तू पुढच्या वेळी जाशील तर स्वतःचे पैसे घालून Hotel upgrade करुन घे, मी नेहमी असचं करतो ' .


Badbadi
Tuesday, November 13, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यामुळे rule प्रमाणे रात्री मुलींसाठी वेगळ्या cabs असतात ज्यात फ़क्त मुलगी आणि तिच्या project मधला मुलगा तिच्या बरोबर जाईल. अजून कोणीही नाही. त्या दिवशी माझ्या बरोबर कोणीही निघु शकलं नाही.
मुलींसाठी वेगळ्या cabs आणि बरोबर कोणीतरी असलचं पाहिजे हा rule आहे. पण पूर्णपणे धब्यावर बसवलेला. >> तुझ्याबरोबर कोणी येऊ शकत नाही हे तुला माहित होतं... मग नियम धाब्यावर कोणी बसवला?? कंपनीने असं तर नक्कीच म्हटलं नसेल कि वाट्टेल ते झालं तरी घरी जा! कंपनी मध्ये guest house/ dorm अशा सुविधा असतात, जिथे तुम्ही घराइतक्या सुरक्षित असता. मी आधी म्हणाले होते तेच परत.... नियम/ सूचना आपण किती पाळतो??


Meggi
Tuesday, November 13, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलतेस तू? कोणी सांगितलं आमच्या तुला आमच्या कंपनी मध्ये guest house/dorm facilities आहेत? situation माहीत नसताना काहिही बोलायचं.


Tiu
Tuesday, November 13, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कंपनी तर स्वत:च्या फायद्यासाठी shifts मधे वगैरे बोलावणारच...मुलांना बोलावणार तसच मुलिंनाही बोलावणार. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. कंपनीसाठी employee care ही दुय्यम गोष्ट आहे. client service , cost cutting जास्त महत्वाचं. मग त्यातनं असल्या गोष्टी घडतात. आधी मुलींना एक कॅबमधुन पाठवा, मग मुलांना दुसर्या कॅबमधे. दोन्हीचं बिल प्रोजेक्ट कॉस्ट मधे येणार. त्यापेक्षा पैसे कसे वाचतील हे बघते management! मग एकाच कॅबमधे एकाच कंपनीतले मुलं मुली, नंतर वर कुणितरी लिहिल्याप्रमाणे आजुबाजुच्या कंपनी मिळुन एकच cab facility ...म्हणजे कुणी कुणाला ओळखत नाही. मग बाहेरचा एखादा माणुस घुसला तरी कुणाला शंका येणार?
आता हे सगळं नियमांच्या विरुद्ध असतं पण सगळे नियम धाब्यावर बसवले जातात.

But having said all that, no one can force you to compromise. Better be aware of your rights and refuse to go ahead with anything out of the rule book. तुम्ही नकार दिला असता तर काही करुन वेगळी कॅब अरेंज केली असती शिवाय सोबत security guard दिला असता...बडबडी म्हणते त्याप्रमाणे नियम/ सूचना आपण स्वत: किती पाळतो?

बाकी shifts टाळणं नेहमी शक्य नाही. हल्ली employment letter मधेच तसा क्लॉज असतो. You may need to work in any of the company branches within or out of India, you may need to work on weekends, in shifts वगैरे वगैरे!!!


Malavika
Tuesday, November 13, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी,
म्हणजे हे गुन्हे बायका नियम धाब्यावर बसवतात त्यामुळे होतात, की बायका वाट्टेल तशा वागतात, वाट्टेल तसे कपडे घालतात म्हणून होतात?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators