|
Mansmi18
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:08 pm: |
| 
|
विप्रो बीपीओ मधल्या मुलीच्या हत्येनंतर काही लिहवेसे वाटले. त्यासाठी..
|
Mansmi18
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:36 pm: |
| 
|
कालच wipro bpo मधल्या मुलीच्या हत्येची बातमी ऐकायलापहायला मिळाली. मनुष्य कुठल्या दर्जाला जाउ शकतो हे वाचुन सुन्न व्हायला झाले. मला वाटते companies त्यान्च्या उपाययोजना करतील तेव्हा करतील पण graveyaard shift मधे काम करणार्या मुलीनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही मुद्दे: १. शक्यतो २ किंवा ३ मुलीनी एकत्र जावे. २. ड्रायवर शिवाय दुसरा कोणी माणुस त्याच्या बाजुला बसला असेल तर ड्रायवर ला हटकावे. ३. ड्रायवरशी जरुरीपुरतेच बोलावे. खाजगी माहिती देउ नये. अघळ्पघळ बोलु नये. ४.(अतिशय महत्वाचे) पर्समधे mace किंवा तत्सम पदार्थ ठेवावा. ५. ड्रायवरच्या वागण्यात लघळपणा किंवा वाईट वर्तनाचा संशय आल्यास त्वरीत तक्रार करावी. अशावेळी चांगुलपणा दाखवावयास जाउ नये. ६. गरज नसल्यास ति शिफ़्ट टाळावी.(पैसे थोडे कमी मिळतील पण सेफ़ आहे. मला माहीत आहे हे थोडे पळपुटेपणाचे आहे पण ज्याना अगदीच गरज नाही त्यानी टाळायला काय हरकत आहे?) मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते कि आपल्या क्रुत्याचे काय परीणाम भोगावे लागतील याची पर्वा न करता त्या नराधमानी क्षणिक आवेग आवरला नाही आणि एक निरपराध आयुष्य उद्ध्वस्त केलेच आणि स्वत:चेही केले. थोडा निराशावादी वाटेल पण comapnies च्या driver background checks नी हा प्रश्न कमी होइल पण सुटेल असे वाटत नाही कारण आवेग न आवरता येणे हे सुशिक्षित किंवा अशिक्षित पणावर अवलम्बुन नसून सन्स्कारांवर अवलम्बून असते आणि त्यात आजुबाजुचे वातावरणावर सुद्धा अवलम्बुन असते. या ड्रायवरची पार्शवभुमी पाहता त्यांच्या कडुन सभ्यतेची अपेक्षा ठेवणेही चुक आहे. म्हणुन आता मुलीनी परिस्थीति आपल्या हातात घ्यावी. एक दोन वेळा चांगली अद्दल घडल्याची बातमी आल्याशिवाय या ड्रायवर जमातीला अक्कल येणार नाही.
|
मनस्मि हा विषय खरंत तर मी क्लोजप कथेमधे लिहिणार होते पण मला वाटतं तो इथे जास्त ठीक असेल मी कित्येकदा रात्री अपरात्री फ़िरत असते. कामानिमित्त अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या लोकाबरोबर भेटावे लागते,'काही गोष्टी मी कटाक्षाने पाळते. पहिली गोष्ट म्हणजे जर अपरात्री मी एखाद्या अनाहूत ठिकाणी असेल तर एखाद्या चांगल्या मित्राला फोन लावते. "मी इथे एकटी आहे तरी ट्रेन येईपर्यंत माझ्याशी बोल" हे सरळ सांगते. किमान दोन ते तीन मित्राना अशी आधीपासून कल्पना देऊन ठेवावी. मी एकटी राहत असल्याचं कुणा नवीन माणसाला सांगत नाही. रदीवाला पेपरवाला दूधवालाअ अशा लोकाना "नवरा सध्या घरात नाही आहे" हे उगाच सांगते. यामुळे या लोकाचे उगाच पुढचे प्रश्न वाचतात. ऑफ़िसमधे देखील मी आणि माझी एक कझिन मिळून राहतो असे सांगितले आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायला जाताना मी देखील काही काळजी बाळगते. शक्यतो मे सलवार सूट घालत नाही कारण ते बर्याचदा फ़िटिंगचे असतात. त्या ऐवजी मी ढगळसा टी शर्ट आणि हाय वेस्ट जीन्स घालते,पायात स्पोर्ट्स शूज असल्यास गर्दीत त्रास देणार्याच्या पायावर चागलाच पाय देता येतो. गरज पडल्यास लाथ देखील व्यवस्थित बसते. (हे दोन्ही स्वानुभवावरून) अनोळखी व्यक्तीना मी "दारू पीत नाही" असं सांगितलं की आग्रह होतो आणि तो मोडता येत नाही. अशा वेळेला मी "मी अमुक वारी पित नाही मन्नत आहे असं सांगते. सुदैवाने हिंदु धर्मात प्रत्येक वाराला देवी देवता आहे. अनोळखी व्यक्तीला चुकीचा मोबाईल न.बर देणे. कुणी जास्त लघळपणा दाखवल्यास सरळ "मुकाट तोंड बंद करा आणि गाडी चालवा हे उत्तर दिलेले आहे. मोबाईलवर असलेल्या मित्राला आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत याची कल्प्ना देऊन ठेवावी. (बॅटरी लो नाही ना त्याची आधी खात्री करावी. अन्यथा घोटाळे होऊ शकतात )
|
Mansmi18
| |
| Monday, November 05, 2007 - 2:13 pm: |
| 
|
नंदिनी, तुझ्यासारख्या काळजी घेणार्या मुली फ़ार कमी असतील असे वाटते. तू पत्रकार आहेस त्यामुळे या विषयावर मायबोलीवरच नव्हे तर इतर माध्यमाद्वारे इतर मुलींसाठी awareness वाढवलास तर खूप उपयोगी होइल. मला वाटते या विषयावर सरकारवर किंवा bpo companies अवलम्बून राहुन काही साध्य होणार नाही. मुलीनी स्वत:च स्वत:चे संरक्षण करायला हवे. धन्यवाद.
|
अजून एक छोटी भर नंदिनी तुझ्या उपायांमधे. मित्राला जेंव्हा सांगतेस मी कुठे आहे आणि कुठे जात आहे ते, तेंव्हा जर तू टॅक्सी, रिक्शा वगैरे वाहनात असशील, तर त्याचा नं पण देत जा. आणि तसे बोल मुद्दाम फोनवर की 'हा नं आहे किंवा मी तुला हा नं एसएमएस केला आहे. पोचले की नक्की फोन करते.' उत्तम गोष्ट की एसएमएस करणे. कारण तो मित्र तो नं लिहून घेईलच असे नाही. (आणि हे चालकाला पण लक्षात येऊ शकते.) हे सगळ्यांना उद्देशून आहे. फक्त तुलाच अस नाही.
|
सव्यसाची, या गोष्टीचा चालकाला राग येऊ शकतो. सर्वसाधारणपणे रिक्शावाले टॅक्सीवाले असल्या फ़ंदात पडत नाहीत. कारण ऑलरेडी त्याची नोंद पोलिस स्टेशनमधे असते. )Vऑचमन कामवाला भाडेकरू या सर्वाचा पोलिस स्टेशनमधे नोंद झालेली आहे ना याची खात्री करून घ्यावी. गळ्यातली ओढणी गळ्Yआत अडकवून त्याचा फ़ास बनवणे प्रत्येक मुलीला यायलाच हवे. घरी याची भाcआसोबत मित्रासोब्बत प्रॅक्टीस करावी. एखादा छोटा चाकू जवळ ठेवला तरी चालेल. (गरज पडल्यास फ़ळे कापायच्या कामी येतो) स्विस नाईफ़ बेस्ट.
|
सव्या, चांगली युक्ती आहे. नंदिनी, त्याला राग आला तर आला. त्याने त्याचे वाहन भाड्यासाठी रस्त्यावर काढले आहे, तर त्याला त्यात चिडायचे काही कारण नाही, असे त्याला ठणकावून सांगू शकतेस. (आता दुसरी शक्यता अशी की, माझ्या गाडीचा नंबर वगैरे फोनवरून कळवून मला पळवून नेऊन लुटायचा वगैरे काही कट तर शिजत नाही, असे त्याला वाटू शकते. ) :-)
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:52 am: |
| 
|
नंदीनी मी स्विस नाइफ़च लिहिणार होतो तुच लिहिलिस ते बर केलीस. सोबत मिर्ची पावडर ची चोटी पुडी सहज हाताला येल अशी पर्स मध्ये ठेवुन देणे हे हितकर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषाला कुठे प्रहार केल्यावर कीती त्रास होतो हे माहित असण सगळ्यात महत्वाच. एक लाथ तिकडे हाणली की कमीत कमी ५ मिनिटे तरी हालचालच करु शकत नाही. बर्याच जणीना हे माहित नसत बहुतेक. आणि हिंदी फ़िल्म्स वाल्याना तर हे पटतच नसत. फ़ोन वरुन एक आठवल. ही मुलगी गाडीत बसल्यावर मित्राशी फ़ोन वर बोलत होतीच बर. पण तरिही.......
|
Manjud
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:53 am: |
| 
|
पेपरमध्ये ज्या बातम्या वाचल्या, विप्रोचे स्पष्टीकरण वाचले त्यावरून तरी असे वाटले की चूक त्या मुलीची होती. गाडीत कोणीच मेल कॅंडिडेट नाही बघितल्यावर तिने कंपनीला फोन करणं आवश्यक होतं. मित्राशी बोलण्याच्या नादातच ड्रायव्हर गाडी कुठे नेतोय हे तिला कळले नाही. फोनवर बोलण्याचे पण भान असायला हवे. आपण एकटी आहोत म्हटल्यावर तिने सतर्क राहणे गरजेचे होते. आणि त्यातून दुसरा अनोळखी पुरुष गाडीत होता, त्याबद्दलही तिने काहीच ऑब्जेक्षन घेतले नाही. ड्रायव्हरची चूक अक्षम्यच आहे, माझ्या मते असल्या गुन्ह्याना दया माया न दाखवता शिक्षा केली पाहिजे. पुरेसे पुरावे गोळा झाल्यावर गुन्हा शाबित होण्याची वाट न बघता तातडीने त्याच्यावर कारवाई झालि पाहिजे. असा प्रसंग आपल्यावर आला तर आपण स्वत:चा बचाव आणि सुटका योग्य प्रकारे कशी करू शकू ह्याची उजळणी प्रत्येक मुलीने वारंवार मनात केली पाहिजे असे मला वाटते. मुलींचा सिक्स्थ सेन्स नेहमीच जागृक रहायला हवा.
|
मला पूर्ण घटना माहीत नाही. मी पेपरमधे शक्यतो असल्या बातम्या वाचणे टाळते (कारण उगाच मला टेन्शन येत राहते) फोनवर मित्र असताना तिने त्याला का नाही सांगितले की गाडी कुठे जात आहे. तो ड्रायव्हर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला होता. अर्थात विप्रो आता स्वत्:ची लाज झाकण्याच्या प्रयत्न करणार. आमच्यासारखे media coordinators त्याचे योग्य ते स्पष्टीकरण देणार, याला क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतात. मी वर पण सांगितलय की अशा हल्ल्याची घरच्या घरी एकदा उजळणी केली पाहिजे. त्यामुळे आत्मविश्वास येतो. ज़कास, एका मैत्रीणीच्या पर्समधली मिरची पावडर दुसरीने आय शॅडो म्हणून लावल्याचं आणि नंतर कॉलेजभर नाचल्याचं पाहिलय. म्हणून तो ऑप्शन मी ठेवत नाही. रात्री काम करणार्या मुलीचे ड्रायव्हर सतत बदलणे हाही एक उपाय होऊ शकतो जो माझ्या कंपनीत आहे. मला शक्यतो तीच गाडी आणि ड्रायव्हर दिला जात नाही. अनोळखी पुरुष त्या गाडीत आधीपासून असेल तर गाडीमधल्या मुलानी का ओब्जेक्शन घेतले नाही? का तो नंतर चढला? सर्वात अहत्वाचं म्हणजे कधीही कुणावरही वाजवीपेक्षा विश्वास न ठेवणं. नुसतं सुरक्षिततेच्या दृष्टीनच नव्हे तर एकूणच जीवनात ही गोष्ट कायम धक्का देऊन जाते.
|
Badbadi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 1:22 pm: |
| 
|
अर्थात विप्रो आता स्वत्:ची लाज झाकण्याच्या प्रयत्न करणार >> नंदिनी, यात त्या कंपनीच्या लाजेचा काय संबंध?? कंपनी किती आणि कशी काळजी घेते हे मला माहित आहे. प्रत्येक पिक-अप point ला लक्ष देणं हे वस्तुत: अशक्य आहे. कंपनीत पुण्यात ३०००+ BPO strength आहे. त्यात जवळ जवळ १२००-१५०० (खरंतर जास्तच) (तरुण) मुली आहेत. (हे सगळे ६ महिन्यापूर्वीचे आकडे आहेत) कंपनी वारंवार सूचना देत असते. पण सूचना आपण ऐकतो / वचतो किती आणि अंमलात आणतो किती हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्या मुलीबरोबर जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे... असं होऊ नये! पण म्हणून कंपनीला(च) दोषी धरणे चूकिचे आहे. मी कंपनीची वकिली करतेय असं नाही, पण तिथे काम केल्यामुळे मला काहि गोष्टी (कदाचित) जास्त माहित आहेत. म्हणून इथे मांडाव्याशा वाटल्या. आणि BPO च्या मुली, त्यांचे वागणे / बोलणे, कपडे यावर बरंच बोलता येईल. पण तो स्वतंत्र चर्चेचा विषय ठरेल शिवाय "आम्ही काहिहि घालू, तुम्हि का त्याने उद्दिपित होता" असं काहिजण म्हणतील. पण आधी "दारला कुलूप लावायचं नाही आणि मग चोरी झाली रे" असा आक्रोश करायचा याला अर्थ नाही!!!
|
Maanus
| |
| Tuesday, November 06, 2007 - 3:22 pm: |
| 
|
http://punepratibimb.blogspot.com/2007/11/blog-post_04.html प्रत्येक गाडीत सिक्युरीटी ऑफीसर वैगेरे ठेवणे शक्य असेल असे वाटत नाही. आणि तो सिक्युरीटी ऑफीसर चांगला असेलच हे कश्यावरुन. आणि BPO च्या मुली, त्यांचे वागणे </> बोलणे, कपडे चार वर्षापुर्वी बेंगलोर मधे मी हॉस्टेल ला रहायचो, तेव्हा मी एकटा programming मधला आणि बाकी पुर्ण हॉस्टेल dell call center च्या public चे. तिथे येणार्या पोरी पाहील्या की.... सकाळी वेगळा मुलगा, संध्याकाळी वेगळा... anyway दंगल वैगेरे प्रकार सोडुन अश्या गोष्टी जेव्हा होतात, तेव्हा opp party ची देखील चुक असतेच. it doesnt just happen out of blue
|
>>सर्वसाधारणपणे रिक्शावाले टॅक्सीवाले असल्या फ़ंदात पडत नाहीत. त्या वेळेस कोणता रिक्षावाला मुलीला घेऊन जात होता हे पोलीसांना कस कळेल जर कोणाला सांगितले नसेल तर? हा विचार तो रिक्षावाला करू शकतो. त्याला राग आला तर आला. पण निदान जरब रहाते की अरे आपला नं आत्ता अजून कोणाला तरी माहीत आहे. आणि प्रतिहल्ला करण्याचा नुसता विचारपण कितितरी मुली करू शकत नाहीत. मग खरा प्रसंग आल्यावर तर सराव केला असेल तरी जमणार नाही. ते जरूर शिकाव पण ही सावधानता पण बाळगावी. वरील नं टिपून ठेवण्याचा प्रकार मी ४ ५ वेळा केला आहे जेंव्हा मैत्रीणीला रिक्षात बसवून द्यायचो रात्रीचा. काहींना येतो राग काहींना नाही. असो. या उपायांवर चर्चा करायची तर एक बाफ उघडता येईल जे पटेल ते घ्यावे. माणसाचे आणि बडेचे म्हणणे बरोबर आहे. या BPO मधल्या मुलामुलींची भयंकर स्वच्छंदी रहाण्याची तर्हा पाहिली आहे. पुण्यात तर सोसायट्यांनी कितिदा तक्रारी केल्याचे वाचतो आणि कितितरी जण यांना भाड्याने घर द्यायला नकार देतात.
|
Suyog_11
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:04 pm: |
| 
|
या सर्व गोष्टीला विप्रो सारख्या कंपन्या जबाबदार आहेत. आणि त्यातल्या त्यात विप्रो मधील मॅनेजमेंट... हे लोक पैसे वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात.
|
Amruta
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:29 pm: |
| 
|
गाडीचा नंबर कुणालातरी सांगुन ठेवणे अतिशय उपयोगी पडु शकते. मुंबईत जेव्हा मी सासरहुन माहेरी रिक्षा किंवा टक्सीने जाते तेव्हा न चुकता माझे सासरे त्या गाडिचा नंबर लिहुन ठेवतात. अगदी ड्रायव्हर समोर.
|
Sunidhee
| |
| Tuesday, November 06, 2007 - 7:31 pm: |
| 
|
मी आज हे वाचले.. सुन्न होते असे वाचले की. वरचे सर्व उपाय अंमलात आणायला हरकत नाही. sms पण करता येइल गाडीचा नंबर मित्रांना. मी आता जो विचार मांडणार आहे तो कळकळीने लिहित आहे, कृपया चूकीचे समजु नका कोणी. अश्या प्रकारचे गुन्हे जेव्हा हे नराधम करतात तेव्हा मला त्यांना ओरडून सांगावेसे वाटते, 'सैतानांनो मुलींवर अत्याचार करायचे एक अघोरी क्रुत्य तर तुम्ही केलेच आहेत, अरे पण त्यांना मारून कशाला टाकता????? हवा तर त्याना दम द्या, भिती दाखवा कोणाला न सांगायची.... पण जिवंत ठेवा'. त्यांचा जगायचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला???? मुलांना-मुलींना स्वसंरक्षण शिकायलाच लागेल, रात्रपाळीत असेल तर अजुनच. भारतात असे काही क्लासेस नाहीत का हो? निदान १-२ जणांशी लढायला यायला हवे. पण प्रत्येक उपायात काही ना काही तृटी आहेच. खरेच रात्रपाळीची गरज नसेल तर मुलीने करू नये. असेल तर एकटीने जाऊ नये. कोणाच्या मृत्युची इछ्छा करणे वाईट, पण आता ह्या दोघाना लवकर मृत्युदंड मिळायला हवा आणि त्याचा खूप प्रचार पण व्हायला हवा तर जरा तरी जरब बसेल.
|
Uday123
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:38 pm: |
| 
|
'सैतानांनो मुलींवर अत्याचार करायचे एक अघोरी क्रुत्य तर तुम्ही केलेच आहेत, अरे पण त्यांना मारून कशाला टाकता??? --- सुनिधी तुमची तळ्मळ समजते, आणी मान्यही आहे. एकंदरीत घटना खुप वाइट घडलेली आहे, मन सुन्न होते. मला वाटतं दुसरा (मारुन टाकण्याचा) गुन्हा हा भिती पोटी किवा आपल्या काळ्याकृत्याचा एकमेव पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने होतो. अशा प्रकारचे गुन्हे अनेक घडतात, पण शासन किती लोकांना होते? काही वर्षांपुर्वी जळ्गाव वसनाकांड झाले होते, कितीतरी मुलींना नासवले/ फ़सवले, किती लोकं गजा आड गेलेत? आणी काय शिक्षा झाली? सर्व आरोपी पुराव्या अभावी सुटलेत. गुन्हेगारांना कठोर आणी जलद शासन हा ऊपायचा केवळ एक भाग म्हणता येईल. समाजतील वाढणारी मानसीक विकृती कमी कशी करता येइल? याचा पण विचार व्हावा.
|
Sahilshah
| |
| Tuesday, November 06, 2007 - 10:50 pm: |
| 
|
न्याय मिळायला लागणारा वेळ हे मुळ कारण आहे असे मला वाटते. निकाल लागे पर्यन्त १० ते १५ वर्ष सहज निघुन जातात. त्यात मधे bail पण मिळतो. फाशी ची शिक्षा झाली तरी फाशी मिळेलच याची खात्री नाही. बहुतेक वेळा आरोपी फईल राष्ट्रपती कडे असतनाच आरोपीचे नैसर्गिक निधन होते. (१९९३ चे आरोपे, गवस खटला....) कायद्याचा कोणाला धाकच नाही राहिला.
|
Badbadi
| |
| Wednesday, November 07, 2007 - 3:07 am: |
| 
|
या सर्व गोष्टीला विप्रो सारख्या कंपन्या जबाबदार आहेत. आणि त्यातल्या त्यात विप्रो मधील मॅनेजमेंट... हे लोक पैसे वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात. >> सुयोग, आपले म्हणणे समजावून देऊ शकाल का?? नुसतेच अमुक - तमुक जबाबदार ला बेस काय ते सांगा.
|
बडबडी, मी विप्रोला जबाबदार धरत नाही आहे. जे घडलं त्यातून विप्रो स्वत्:चे नाव काढून घेणार असं मी म्हटलं होतं आणि ते कुठलीही कंपनी करणार. मी स्वत्: crisis management करते. कंपनीची इमेज यातून नीट उभी रहावी हा यामागे उद्देश आहे. आणि त्यामधे वावगे काहीच नाही. अर्थात ती बाब पूर्ण वेगळी आहे. BPO call centre मधल्या मुलाचे मुलीचे वागणे आणि कपडे ही एक वेगळीच चिंतनीय बाब झाली आहे. मी हॉस्टेलमधे असताना रात्री उशीरा येत असल्यामुळे मी कॉल सेंटरमधे नाही असं मला लेटर द्यावे लागले होते. लहान वयात हातात येणारा पैसा आणि तो न वापरायची अक्कल यामुळे काय होऊ शकतं हे मी स्वत्: पाहिलं आहे. माझा एक मित्र २४ व्या वर्षी ड्रग ऍडिक्ट झालेला मी पाहिलाय. त्याच्या आईवडीलाचा झालेली अवस्था पाहिलीय. देव करो आणि तसे दिवस कुणालाही न दाखवोत. म्हणूनच सराव करून ठेवावा. जनरली मुलीना वाटतं की माझ्या बाबतीत घडणार नाही. त्यामुळे मुली प्रतिहल्ला करू शकत नाही. म्हणून घरी याचा सराव जरूर करावा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|