Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 03, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे लाड » Archive through November 03, 2007 « Previous Next »

Sherloc
Friday, November 02, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो देश, त्याचे नागरिक वर्षानुवर्षे भारताबद्दल फक्त गरळच ओकत आले आहेत त्या देशाच्या सर्वच गोष्टींना, त्यामध्ये अगदी संगितही आले, निषिद्ध मानायला काय हरकत आहे? या कलाकारांनी एक गोष्ट पक्की जोखली आहे की जी काही किंचित कला त्यांच्याकडे आहे तिला पाकिस्तानात बिल्कुल किंमत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सातत्याने भारतावर हल्ले करण्यात आणि सो कॉल्ड संरक्षणात बुडालेली असल्याने भारताइतकी किंमत या कलाकारांना (पैश्याबद्दल बोलतोय मी) मिळु शकत नाही. गुलाम अली काय किंवा इतर काय, पाकिस्तानात पाच पाच हजाराची तिकिटे लावुन कार्यक्रम करु शकत नाहीत.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतिय कलाप्रांतात ज्यांनी ज्यांनी म्हणुन पाकिस्तानी कलाकारांना आणले, खेचले, त्या सर्वांची जन्मगावे जरा चेक करावीत. राज कपुर ज्याने ज़ेबा बख्तियारला बोलावले, महेश भट्ट ज्याने मीरा नामकरण करुन एका कोठेवालीला आणले, फिरोज खान ज्याने नाजिया हसन ला खेचले, विधु विनोद चोप्रा ज्याने नुसरत फतेह अली ला
introduce केले, बी. आर. चोप्रा हे तसे आदरणिय व्यक्तिमत्व. पण त्यांनाही मुस्लिम पार्श्वभुमीवरच्या चित्रपटासाठी पाकिस्तानी गज़ल गायक वापरण्याची marketing trick वापरावी लागली. ही काही मला माहिती असलेली उदाहरणे. या सर्व मंडळींच्या जन्मकथेत कुठेतरी पाकिस्तान आहे. फाळणीनंतर कित्येक मुसलमान कलाकारांनी इथे स्वताचे स्थान निर्माण केले. मोहम्मद रफी साहेब, नौशाद, साहिर, गुलजार ही काही ठळक उदाहरणे. या सर्वांच्या बाबत भारतिय मनाने कधीही वाईट विचार केला नाही. कारण हे सर्व या मातीत इतके मिसळलेले होते. मातृभाषा व्यवस्थित बोलता न येणारे, येत असेल तरी तिची लाज वाटणारे कित्येक महाभाग उर्दु शिकताना मी पाहीले आहेत. इंग्रजांच्या गुलामगिरी नंतरची ही दुसरी "गुलाम" गिरी लवकरच येउ पाहतेय. वाईट याच गोष्टीचे वातते.

Ajjuka
Friday, November 02, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला यातलं काही कळत नाही त्यातलं काही कळत नाही म्हणायचं आणि परत त्यांची लायकी नसताना उदो उदो होतोय हेही म्हणायचं.. अहो मुळात कळतच नाही तर त्यांची लायकी नाही हे कुठून काढलंत तुम्ही?

वरचा स्लार्टीचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.. की आपले सैनिक मारले जाणं याची नैतिक जबाबदारी नागरीक म्हणून त्यांच्यावरही येते. तसंच त्यांचे जे मारले जातात त्याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारणार का? उद्या सीमेवर मेलेल्या पाकिस्तानी सैनिकाची पत्नी.. "माझ्या नवर्‍याच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहेस!" असं म्हणू लागली तर ते तुम्ही भारतीय नागरीक म्हणून स्वीकारणार का? मला नाही वाटत आपण कोणी स्वीकारू ते म्हणून.
आपल्या देशाची अनेक धोरणं आपल्याला पटत नसताना आपण अजूनही याच देशाचे नागरीक म्हणून आहोतच ना? मग कदाचित अनेक पाकिस्तानी कलाकारांची तीच गोची असेल. शेवटी जिथे जन्म झाला ती माती सगळ्यांनाच प्रिय असते हो मग त्या मातीवर अधिपत्य कोणीही गाजवत असेल.
जर का या कलाकारांपैकी कुणी माझ्या देशाविरूद्ध काही करताना आढळला तर अर्थातच माझं पित्त खवळून उठेल. आणि ते जेवढं खरं असेल तेवढाच या कलाकारांच्या कलेनं मला दिलेला आनंदही खरा आहे. आणि त्या कलेला मी कधीच कमी लेखू शकणार नाही. माणूस चुकीचा वागत असेल तर त्याचे समर्थन कधीच करणार नाही मी पण तो केवळ शत्रू राष्ट्रात जन्मला किंवा मला न आवडणार्‍या धर्मात जन्मला म्हणून त्याचा तिरस्कार करणे हे मला कदापि शक्य नाही. तसं असेल तर पाकिस्तानापेक्षाही प्रत्येक अमेरिकन नागरीकाचा तिरस्कार करावा लगेल मला कारण भारताचा, मानवतेचा सगळ्यात मोठ्ठा शत्रू आणि तोही ओठात एक पोटात एक अश्या स्वरूपाचा.. केवळ अमेरीकाच आहे.
खरंतर एम एफ हुसेन बद्दल खूप बडबडून झालंय.. पण 'तो माणूस चुकीचा, कला बिला सब झूठ' असं मानणार्‍यांनी त्याची वादग्रस्त चित्रे सोडून काहीतरी पाह्यलंय का? एकुणातच चित्रकला याचा 'हुबेहूब कढणे' यापलिकडे काही अर्थ लावलाय का?
दुर्दैवाने नेटवर फक्त तिच चित्रे अस्तित्वात आहेत. अलेक पदमसी च्या ऑथेल्लो साठी त्यांनी केलेले पोस्टर, वाळवंटातल्या सुर्यास्ताचे एक चित्र, मीनाक्षी ह्या फिल्मची एकेक fantastic visuals (हे फक्त मी पाह्यलेले)... खूप मोठा spectrum आहे त्या चित्रांच्या पलिकडे.. असो
बाकी वादग्रस्त चित्रे किंवा तत्सम फुटकळ गोष्टींनी हानी पोचण्याएवढा माझा हिंदू धर्म नाजूक आणि लेचापेचा कधी झाला हे काही मला न कळलेलं आहे.
मुळात जर तुम्हाला वाटतंय की हे कृत्य खोडसाळ आहे तर तुम्ही त्यावर चिडून, त्याला विरोध करून एका प्रकारे त्यांचाच हेतू सिद्ध करताय. ते काहीही वागले तरी तुमही दुर्लक्ष करताय आणि असल्या कृत्यांना किंमतही देत नाही आहात असं त्यांना लक्षात आल्यावर जाईलच ना हवा फुग्यातली?


Ashwini_k
Friday, November 02, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे वाचत असताना मला का कुणास ठाऊक आमिरखानच्या "सरफ़रोश" ची आठवण येते. त्यातला नासिरुद्दीन शाह ने अप्रतिम वठवलेला, उत्तम गायकी असलेला, वरवर प्रेमळ वाटणारा पाकिस्तानी गायक आठवतो. तो जेव्हा त्या निष्पाप बकरीला चेहरा शांत ठेऊन मारतो तेव्हा त्याच्या मनात किती क्रौर्य भरले आहे याची कल्पना येऊन हादरायला होते. पुढे तो गायकाच्या मुखवट्या मागचा अतिरेकीच ठरतो.

अर्थात प्रत्येक पाकिस्तानी गायक असा असेल असे नाही. त्यातील कोणी आपल्या कलेचे चिज होईल या आशेनेही येत असतील. गुलाम अलींच्या गजल मलाही आवडतात पण भारत पाकिस्तान मधल्या वाईट संबंधांमुळे व पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांमुळे सगळ्या स्तरावर लोच्या झाला आहे खरे!

बाय द वे, परवाच सायन धारावीला एक होर्डींग पाहीले त्यावर "हम अल्पसंख्यांक नही, बहूसंख्य बनके दिखायेंगे" अशा अर्थाचे वाक्य होते. काय म्हणायचे होते त्यांना!


Nandini2911
Friday, November 02, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाम अली मी लहानपणापासून ऐकतेय. आणि मला खूप वर्षानी समजलं की ते पाकिस्तानी आहेत. अर्थात "हंगामा क्युन है बर्पा" :-)

मुळात संगीत कला आणि राजकारण देशकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
कित्येक मराठी शब्द फ़ारसीमधून आले आहेत. उर्दू ही फ़क्त मुसलमानाची भाषा नाही. सूफ़ी संगीताचा उगम हिंदु धर्मातून झाला आहे. कट्टर इस्लामवादी संगीत चित्रकला इत्यादी गोष्टीना गैर इस्लामी मानतात. :-)

वर कुणीतरी अदनान सामीला बाजार बुणगा म्हटलेलं आहे. त्याला कधी पियानो वाजवताना पाहिलय? He is the fastes piano player in the world हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा पण तो तितकाच जाणकार आहे.

सिनेमातल्या उदाहरणासाठी थोडंसं.
राज कपूर पेशावरला जन्मला. पण फ़ाळणीच्या आधीच पृथ्विराज कपूर कलकत्त्याला सेटल झाले होते. शम्मी आणि शशी तिथेच जनम्ले. राज कपूर पठाण आहे. (हो, हिंदु पठाण सुद्धा असतात.)
फ़िरोज़ खान बंगलोरचा आहे. तिपू च्या घराण्याशी त्याचे काहीतरी नाते आहे.
विधु विनोद चोप्रा काश्मिरी आहे. मिशन काश्मिरनंतर त्याच्या बायकोने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याच्या लहानपणच्या बर्‍याच घटनाचा उल्लेख आहे.

महेश भट्ट तर तद्दन फ़िल्मी माणूस आहे. मीरा कोठेवाली आहे हे मला नवीनच समजले. माझ्या माहितीनुसार ती तिथेही चित्रपटातच काम करत होती.

गुलझार शीख आहे!!!!! फ़ाळणीनंतर तो भारतात आला. त्याची "रावीपार" वाचा एकदा.

गुलाम अली पैशासाठी भारतात येत असतील असे मला वाटत नाही परदेश दौर्यामधे यापेक्षा जास्त पैसे मिळत असतील.

गझलच्या कार्यक्रमा जाऊन status symbol कसा काय होतो बुवा?
पंचम निषाद अनेक संगीत मैफ़िल आयोजित करत असते. त्या सर्वाना लोक उपस्थित असतात. किशोरी आमोणकर पासून ते उस्ताद अमजद अली खानला मी याच कार्यक्रमात ऐकले आहे (त्याच्या तिकिटाचे दर जास्त नसतात.) त्यानीच गुलाम अलीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

लता मंगेशकर आणि नूर जहानबद्दल. लताच्या गाण्यावर नूरजहानचा स्पष्ट प्रभाव होता. पण ट्रेंड पाहून आणि आपली ताकद ओळखून स्वत्:ची स्टाईल बदलली. स्पर्धेसाठी तिने काय केलं हा तिचा प्रश्न आहे. survivial of the fittest हा रूल सगळीकडे लागू होतो. आणि त्यातून आशा कशी उभारली हे सर्वानाच ठाऊक आहे.

भारत आणि पाकिस्तान याची सांस्कृतिक नाळ एकच आहे. आज आपली पिढी पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया बघून पाकिस्तानवर चिडते. पण आपल्या आधीच्या पिढीच्या आठवणी तिथे अजूनही निगडीत आहेत. त्याचे धागेदोरे अजून तिथे बांधलेले आहेत. (हिंदु आणि मुसलमान दोघाचेही)

कलाकार म्हणून जो मोठा असेल त्याला मान मिळावा. उगाच उद्या कुणी मी पाकिस्तानी आहे म्हणून माझे लाड करा म्हटल्यास ते होणे नाही हे सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही. जगजित सिंग जर उद्या म्हणाले की माझ्यापेक्षा गुलाम अलीचे कौतुक जास्त होतेय तर ते एक वेळ ऐकता येईल. इथे आपल्याला सूर नाही समजत विनाकारण दुसर्‍याला नावं ठेवण्यात काय अर्थ??



Bsk
Friday, November 02, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, आणि अज्जुका तुमची मतं खूप पटली.. निदान संगीत,कला या क्षेत्रांमधे असा भेदभाव करणे बरोबर नाही.. कला ती कलाच.. एखाद्याच्या कलेचं कौतुक करण्यात काहीही वावगं नाही आहे. आपल्याला त्यांच्या १टक्का जरी आलं तरी खूप आहे, अशा लोकांचा त्या क्षेत्रामधला मोठेपणा मान्य करण्यात काहीच चुक नाही!

Sherloc
Friday, November 02, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदुंच्या सहिष्णुतेचा आणि secular पत्रकारीतेचा विजय असो!

अदनान सामी च्या पियानोवादनाचा वेग कोणी मोजला? कुठल्या बुकात त्याच्या विक्रमाची नोंद आहे? "त्यांचा" शोएब अख्तर जगातला सर्वाधिक वेगवान गोलंदाज आहे, "त्यांचा" मुष्ताक (अली का मोहम्मद) सर्वात लहान वयात शतक झळकवणारा फलंदाज होता, मुशर्रफ दोन वेळा भारतात आले त्या दोन्ही वेळा त्यांच्या विमानावर तिरंगा "चुकुन" उलटा फडकवला गेला, या आणि अशा विधानांमधला फोलपणा जर उमगत नसेल तर प्रश्नच मिटला.


इथे आपल्याला सूर नाही समजत विनाकारण दुसर्‍याला नावं ठेवण्यात काय अर्थ??

Well, मला गजल नाही समजत (उर्दुच्या तोकड्या ज्ञानामुळे), पण सुरही समजत नाही म्हणणे म्हणजे "गंधर्व संगित विद्यालयाचा" जिथुन मी कधी काळी "संगित विशारद" पदवी घेतली होती, अपमान केल्यासारखे होईल.

असो, चर्चा उगाचच वैयक्तिक पातळीवर आली त्याबद्दल क्षमस्व!

परत एकदा
हिंदुंच्या सहिष्णुतेचा आणि
secular पत्रकारीतेचा विजय असो!

Nandini2911
Friday, November 02, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल उर्दूमुळे समजत नाही??
संगीत विशारद असूनसुद्धा.!!!!
सूर समजायला भाषा लागत नाही असं म्हणतात ना!! जाऊ दे ती वाक्य मी माझ्या संदर्भात वापरलं होतं. मला क्लासिकलमधलं ओ का ठो कळत नसल्यामुळे मला या लोकाचा अतीव आदर आहे.

बहुधा माझेच ज्ञान तोकडे असावे.
शेरलॉक तुमचा नक्की राग कशावर आहे? कारण मधेच तुम्ही क्रिकेटमधली उदाहरणे देत आहात. शोएब अख्तर वेगात गोलंदाजी करतो त्याला सेक्युलर पत्राक्रिता काय करणार? आणि मुश्ताकला काय सेक्युलरवाद्यानी पैसे दिले होते शतक झळकव म्हणून. :-) काहीही...
अदनान सामीची वेबसाईट आहे तिथे तुम्हाला हेही समजेल की त्याची आई भारतीय होती.

अदनान भारतात आला कारण इथे कलेची कदर आहे म्हणून. ब्रिटनमधे लहानाचा मोठा होउनसुद्धा त्याने इथे सेटल व्हायचा निर्णय घेतला.


भारतामधे सध्या व्होटबॅंकेच्या राजकारणासाठी गलिच्छ राजकारण केले जाते. त्या राजकारणामधे कला येऊ नये. ही अपेक्षा.


Ajjuka
Friday, November 02, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

| अदनान सामी च्या पियानोवादनाचा वेग कोणी मोजला? कुठल्या बुकात त्याच्या विक्रमाची नोंद आहे?|
ह्याचे संदर्भ मिळणे अवघड नाही आणि नंदीनी ते सांगेलच.
|"त्यांचा" शोएब अख्तर जगातला सर्वाधिक वेगवान गोलंदाज आहे, "त्यांचा" मुष्ताक (अली का मोहम्मद) सर्वात लहान वयात शतक झळकवणारा फलंदाज होता,|
हे असं जागतिक क्रिकेटच्या बाबतीत खरंच आहे का?(मला क्रिकेट समजत नाही म्हणून विचारतेय. माझं अज्ञान समजा हवं तर..) आणि ते जर खरंच चांगले खेळाडू असतील तर त्यांना चांगले म्हणल्याबद्दल आक्षेप का?

|मुशर्रफ दोन वेळा भारतात आले त्या दोन्ही वेळा त्यांच्या विमानावर तिरंगा "चुकुन" उलटा फडकवला गेला, या आणि अशा विधानांमधला फोलपणा जर उमगत नसेल तर प्रश्नच मिटला. |
याबद्दल दुमत असू शकत नाही. आणि इथे जर आपण(भारताने) कच खाल्ली असेल समज देण्यामधे तर आपल्या नेत्यांचा तो पेचकटपणा आहे हे नक्कीच.

वरच्या उदाहरणांच्यात पहिल्या दोन उदाहरणांपेक्षा शेवटचे एक उदाहरण हे संपुर्ण वेगळे आहे. उगाच एकत्र घेऊन शब्दांचे गुंते वाढवले जातायत.


Ajjuka
Friday, November 02, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या मराठी लोकांच्या BMM अधिवेशनामधे एकदा असाच 'चुकून' तिरंगा उलटा लावला गेला होता. कुणालाही ते लक्षात आले नाही. त्यांनी दिमाखात तो फोटो नेटवर लावला होता. त्यावेळच्या प्रेसिडेंटबाईंना तसे इमेल लिहून कळवल्यावर उपकार केल्यासारखे 'आम्हाला खेद आहे!' असे त्या म्हणाल्या. फोटो काढून टाकला तिथून. आणि वर 'आम्ही NRI कित्ती कामे करतो पण तुम्हाला एवढेच दिसते. काही नाही तुम्हाला US मधे यायला मिळत नाही म्हणून तुमची jealousy आहे ही..' असेही सुनावले होते त्या बाईंनी.
या देशप्रेमींचं काय करायचं हो? भले त्या नसतील आता भारतीय नागरीक पण भारतीय म्हणून तर जन्मल्या होत्या ना? आणि जन्मापासून अमेरीकेत जाईतो तिरंगा कसा लावायचा असतो हे माहित असेलच ना त्यांना. मग आता विसरल्या?
मुशर्रफ तर काय शत्रुराष्ट्राचा अध्यक्ष.. त्याला काय किंमत भारताच्या मानापमानाची..


Asami
Friday, November 02, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या मराठी लोकांच्या BMM अधिवेशनामधे एकदा असाच 'चुकून' तिरंगा उलटा लावला गेला होता.>> मी आता तेच उदाहरण देणार होतो. झक्कींना विचारा हव तर त्यांना आठवत असेल

Savyasachi
Friday, November 02, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>त्यामुळे व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही.
अगदी बरोबर. ही पुर्ण चर्चाच व्यर्थ आहे.
>>उगाच एकत्र घेऊन शब्दांचे गुंते वाढवले जातायत
हेही बरोबर.


Farend
Friday, November 02, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरलॉक, मुश्ताक़ अली 'त्यांचा' नव्हे, आपलाच आहे. फाळणीनंतरही तो भारताकडूनच खेळला. तुम्ही म्हणताय तो मुश्ताक़ मोहम्मद. आणि अज्जुका शोएब वेगात चेंडू टाकतो हे खरे, पण तो की ब्रेट ली सर्वात वेगवान आहेत याबद्दल दुमत आहे, आणि मुळात शोएब गोलंदाजी करतो की 'फेकतो' याबद्दलही :-)

Asami
Friday, November 02, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मुळात शोएब गोलंदाजी करतो की 'फेकतो' याबद्दलही >> आता ह्यावर पण एक BB येउ दे. आशियायी खेळाडूंवर जगात होणारे अन्याय :-)

Uchki
Friday, November 02, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातल्या समस्त बच्चन, कपूर, चोपडा परिवारांतले लहानमोठे, सर्व फ़िल्मी खान, त्यांचे पाकिस्तानातल्या जनतेने केलेले लाड, त्यांना मिळणारे adulation पाहून पाकिस्तानातल्या अनेक pseudo-patriots चा असाच तळतळाट होत असणार. :-)

Sunilt
Friday, November 02, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pseudo patriots हे झकासच!!

Chinya1985
Friday, November 02, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असो अज्जुका,माझ्या चित्रकलेचा ज्ञानाबद्दल तुला काहीही माहित नाही तरी 'चित्र हुबेहुब काढण' वगैरे लिहिलय. पण असो. ठिक आहे. मला त्यापलिकडे चित्रकलेतल काही कळत नसेलही नाही...कळत नाहिच अस धरु. पण हा तुमचा चित्रकलेचा spectrum जगातील १% लोकांनाही कळत नाही हे तुला माहित आहे का??एका perticular सोसायटीतल्या लोकांनाच हे कळत(म्हणजे ते कळत अस त्यांना वाटत). मुळात तुला देवीदेवतांची चित्रे आवडली नाहित त्याने काढलेली पण त्यांनाही गहन अर्थ आणि मोठा spectrum आहे असेही तुमच्यासारखे रसिक कलावंत म्हणतात.याचाच अर्थ तुलाही चित्रकलेतल फ़ार कळत अस नाही (नाहितर या देवतांच्या नग्न चित्रातला मोठा spectrum कळला असता ना!!). आता त्याने केलेल इतर काम मी का लक्षात घेत नाही??मी ते का लक्षात घ्याव??हिटलर पण खुप चांगला कलाकार होता पण त्याला आपण mass murderer म्हणुन ओळखतो महान चित्रकार म्हणुन नाही! देवीदेवतांची नग्न चित्र काढुन त्यानी या देशातल्या ९९%हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत (ज्यांना चित्रकलेतल कळत नाही) . तुम्ही ज्या समाजात रहाता त्या समाजातील लोकांच्या भावना दुखवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला??आणि या १% लोकांसाठी ९९%लोकांच्या भावना दुखवण एखाद्या भावना नसणार्‍यालाच पटु शकत. हां त्याने काही समाजातिल चुकिच्या गोष्टींचा प्रथांविरुध्द आवाज उठवुन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर गोष्ट वेगळी पण इथे ते काहीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इतर काम neglet केल जात कारण या माणसाचा हेतु चुकिचा आहे हे लगेच कळुन येत,मुस्लिम,ख्रिश्चन यांचे सभ्य चित्र आणि हिंदुंचे नग्न,विचित्र चित्र यावरुनच हे कळत. दुसरी गोष्ट म्हणजे तुझी चांगली चित्र १%लोकांना खुष करतात आणि खराब चित्र ९९% लोकांना त्रासदायक वाटतात. आणि समजा एखादा डॉक्टर आहे ज्याने अनेक वर्ष चांगल काम केल आहे,गरिबांनाही मदत केली आहे पण समजा त्याच्याकडुन एखादी चुक झाली आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केस केली तर त्या डॉक्टरला जेलमधे जावे लागते आणि त्याचे करियर बर्बाद होते. तो अस म्हटला की मी इतके वर्ष चांगले काम केले मला माफ़ करा तर त्याला माफ़ी मिळात नाही,थोडिशी शिक्षा कमी होईल. या हुसेननी अक्षम्य काम केले आहे त्यामुळे शिक्षा मिळायलाच हवी फ़ारतर थोडी सवलत द्या चाबकानी हाणायच्या ऐवजी जोड्यानी हाणा. हुसेनला फ़्रीडोम ऑफ़ स्पीच आहे म्हणुन तो काहीही काढु शकतो म्हणनारे बाळासाहेबांची भाषणे मुस्लिमांमधे रोष उत्पन्न करतात म्हणुन ठाकरेंना अटक करा म्हणतात. हा असला विरोधाभास का?त्यांना फ़्रीडोम ऑफ़ स्पीच नाही का??आमच्या ओरड्याने आम्ही हुसेनला मदत तर करत नाही??बिल्कुल नाही. आमच्या ओरड्याने लोकांमधे जागरुकता आहे की हुसेन कसा आहे नाहीतर उद्या तुमच्यासारखे कलेचा spectrum कळणारे या दिवट्याला 'भारतरत्न' पण मिळवुन देतिल. असे झालेलेही आहे. MGR म्हणुन द्रविडी नेत्याने हयातीत असताना पद्मश्री पुरस्कार नाकारला कारण पद्मश्री हे हिंदि नाव आहे आणि याच दिवट्याला सरकारने मरणोत्तर भारतरत्न दिले. अरे काय??ज्याला पद्मश्री पुर्स्काराचा मान राखता येत नाही त्याला तुम्ही भारतरत्न देता?? असेच या हुसेनबद्दल होउ नये आणि होणार नाही आमच्या ओरड्याने आणि शिवसेना वगैरे पार्ट्यांच्या आक्रमकतेने तो घाबरुन दुबई मधे दडुन बसला आहे. चांगल आहे,भारतात येउही नकोस म्हणाव!!


Zakki
Friday, November 02, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे. झेंडा उलटा लावला होता! अति उत्साहाच्या भरात कुणाच्या लक्षात आले नाही ते, म्हणे!

सुरेश वाडकरच्या कार्यक्रमात मध्यंतरानंतर 'चला आपण आता पुन: एकदा अजित वाडेकरचे गाणे ऐकू' असे त्या माननीय MC बाई म्हणाल्या!


Zakki
Friday, November 02, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे. झेंडा उलटा लावला होता! अति उत्साहाच्या भरात कुणाच्या लक्षात आले नाही ते, म्हणे!

सुरेश वाडकरच्या कार्यक्रमात मध्यंतरानंतर 'चला आपण आता पुन: एकदा अजित वाडेकरचे गाणे ऐकू' असे त्या माननीय MC बाई म्हणाल्या!

आणखी एक. भारताला शिव्या देण्याचे, तिथली घाण, लाच खाऊपणा इ. वाईट गोष्टींबद्दलच फक्त बोलण्याचे महापाप वर्षानुवर्षे आम्हा भारतीयांनीच केले आहे. तेव्हढ्या शिव्या पाकिस्तानने सुद्धा दिल्या नसतील. या सर्वाला खीळ बसली ती जेंव्हा आमची मुले थोडी मोठी झाली नि म्हणाली की आम्ही कध्धी कध्धी भारतात जाणार नाही. एव्हढा वाईट देश आहे तर आम्ही कशाला तिथे जाऊ? तेंव्हा बर्‍याच जणांचे डोळे उघडले नि मग ते म्हणू लागले, भारत पण सुंदर आहे, आपले नातेवाईक, आपले मित्र किती चांगले आहेत, त्यांना आपल्याबद्दल कसे प्रेम आहे, नि आता तर काय, भारताची कित्ती कित्ती प्रगति होते आहे, वगैरे.


Lukkhi
Friday, November 02, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अहो, BB कुठला, बोलताय काय? anyway , भावना पोचल्या.


चिन्या, आणि MF हुसेन चे critics , हुसेन भारतिय असल्यामुळे इथे त्यावर चर्चा न करता त्यावर दुसरा BB उघडल्यास बरे होईल.

Dup IDs चे तारणहार Mods , इथे थोडे लक्ष द्याल का?

तळटीप : झक्की, वाडेकरचा विनोद आवडला, विनोदाच्या BB वर हलवला तरी चालेल


Satishmadhekar
Saturday, November 03, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुसेन फक्त हिंदू देवतांचीच असभ्य चित्रे काढतो हा त्याच्यावर अतिशय शिवराळ आरोप आहे. त्याने भारतमातेचे सुद्धा अगदी तसेच 'असभ्य' चित्र काढलेले आहे. भारतमाता तर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्वांची माता आहे. त्यामुळे तो फक्त एकाच धर्माशी संबंधित असभ्य चित्रे काढतो हा आरोप बिनबुडाचा आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators