Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे लाड » Archive through November 01, 2007 « Previous Next »

Sherloc
Wednesday, October 31, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते हा एक संवेदनशील विषय आहे. म्हणुन मी नविन BB उधडण्याचे धाडस केले.

निमित्त होते पं. ह्रुदयनाथ मंगेशकरांच्या वाढदिवशी "गुलाम अली" चा झालेला उदो उदो. माझं "वैयक्तिक" मत आहे की पाकिस्तानी किंबहुना सगळ्याच परदेशी कलांकारांचे आपल्या देशात फारच कौतुक केले जाते. गझलांच्या कर्यक्रमाला जाणे हे आताशा
"Status Symbol" बनले आहे.

या विषयावर चांगली वाईट दोन्ही मते अपेक्षित आहेत.


Zakki
Wednesday, October 31, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते भारतीयांना स्वत: पेक्षा परकीयांचे, बाहेरच्यांचे आकर्षण जास्त. का माहित नाही. नुसत्या गाण्यातच नाही तर कित्येक इतर बाबतीत.
उदा. आपले सगळे खेळ सोडून क्रिकेट जास्त प्रिय.

कुठल्याहि बाबतीत आपले आहे ते सोडून इतराची आवड. हुसेनची चित्रे अगदी ८० टक्के लोकांच्या भावना दुखावणारी असली तरी त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार! कारण आम्हाला चित्रकला जास्त समजते. मग रविवर्म्याची चित्रे काय टाकाऊ होती का? पण ती काय भारतीय, तीच तीच. हे कसे वेगळेच!

गोर्‍या कातडीचे कौतुक तर काही विचारूच नका!

त्यातून संगित म्हणजे तर काय, त्याला धर्म, देश यांचे बंधनच नाही. उद्या कुणि म्हणाले आम्हाला संदीप खरे ची कविता, भीमसेन यांचे गाणे आवडते. तर लोक म्हणतील तुम्हाला जगात काय चालले आहे माहितच नाही! तिकडे बघा काय सुंदर गातात! म्हणजे खरे ते काही खूपच स्वर्गीय वगैरे नसतात, पण त्यातल्या त्यात, आम्ही जरा जास्त शिकलेले, आम्हाला जास्त माहिती, असे दाखवायला बरे.


Asami
Wednesday, October 31, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुसेनची चित्रे अगदी ८० टक्के लोकांच्या भावना दुखावणारी असली तरी त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार! >> हुसेन भारतीय ना हो तुमचा BB चुकला वाटते :-)

Antara
Wednesday, October 31, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या गुलाम अलींचं कौतुक झालं तर त्यावर बीबी उघडला!हृदय्नाथ मंगेशकरांचा त्याच्याशी काय संबन्ध??
बर गुलाम अलीन्चे कौतुक केवळ ते पाकिस्तानी आहे याच कारणाने होते असे वाटते का तुम्हाला? ते इतके वाईट गातात तरी लोक उगीच पाकिंचे कौतुक करायचे या हेतूने कौतुक करतात असे म्हनायचेय का आपल्याला?
गझल ऐकणे हे स्टेटस सिंबॉल? का बरं कुणाला गझल खरंच आवडत असतील किंवा for that matter सूफ़ी संगीत जरी आवडत असले तरी त्यात चूक काय हे कलले नाही?
गझलप्रेमी जसे गुलाम अलींना मानतात तसे जगजित ना पण.
तुमच आक्षेप कशाला आहे, गुलाम अली? गझल? मुस्लीम? पाकिस्तानी? की स्टेटस सिंबॉल्स नकी काय ते ठरवा बुवा.



Savyasachi
Wednesday, October 31, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>सूफ़ी संगीत जरी आवडत असले
डिजे कुठे आहे :-)

Chinya1985
Wednesday, October 31, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किंना पुर्ण अनुमोदन!!आपल्याला दुसर्‍यांच सगळ चांगल वाटत आणि आपल टाकाऊ.

Deshi
Wednesday, October 31, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या कुणि म्हणाले आम्हाला संदीप खरे ची कविता, भीमसेन यांचे गाणे आवडते. तर लोक म्हणतील तुम्हाला जगात काय चालले आहे माहितच नाही!>>>
एकदम अचुक निशाना. माझा हिंदी मित्राला मागे मी भिमसेन, कुमार गंधर्व आवडतात असे सांगीतल्यावर त्याने मला " क्या घाटी है बे तुम लोग " असे सुनावुन वर परत नुसरत फतेह क्या गाता है जरा उनका सुनते जाओ असे फर्मावले.

Lukkhi
Wednesday, October 31, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या कुणि म्हणाले आम्हाला संदीप खरे ची कविता, भीमसेन यांचे गाणे आवडते. तर लोक म्हणतील तुम्हाला जगात काय चालले आहे माहितच नाही!>>>

एकदम बरोबर...

पण, गुलाम अली फक्त पाकिस्तानी आहेत म्हणून त्यांचा उदो उदो होतो असे वाटत असेल तर एकद 'चुपके चुपके रातदिन...' ऐका. खुद्द लता सुद्धा गुलाम अलींच्या मोठ्या fan आहेत. गझल प्रेमींना जितके जगजीत आवडतात तितकेच गुलाम अलीही (अर्थात याला अपवाद आहेतच)

आता मूळ मुद्द्याकडे -
'बर्‍याच' पाकी कलाकारांना विनाकारण झुकते माप दिले जाते हे मी great indian comedy show मध्ये बघितलेय. आणि ते पाहून सखेद आश्चर्य वाटते. रौफ़ लाला मागच्या वेळी जिंकला यातच सारे येते.


Zulelal
Wednesday, October 31, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलेला भौगोलिक सीमा नसतात, असं म्हणतात. म्हणूनच, पूर्वीच्या काळापासून रसिक राजांच्या दरबारात आपली कला पेश करण्यासाठी कलावंत लोक देशांतरही करीत.
गुलाम अलीने भारतीयांची रसिकता जाणली आहे. ३० ऑक्टोबरला प्रमोद महाजनांच्या जयन्तीनिमित्त या कलावंतानं मुद्दाम आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता मुम्बैत मैफल केली. पाकिस्तानी म्हणून त्याच्या कलेचा द्वेष करण्यात हशील नाही. कितीतरी पॉप गायकाना आजची पिढी डोक्यावर घेते आहे. त्यांच्या नागरिकत्वाची शंकासुद्धा उमटत नाही...


Antara
Wednesday, October 31, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly.. ज्या व्यक्तिला गाने अगर कलाकृती भिडण्यापूर्वीच कलाकाराचा धर्म देश जात काय असा प्रश्न पडतो त्या व्यक्तिला कलेत रसिकता किंवा गती नाहीच असे समजावे. ज्याला आपण 'औरंगजेब' म्हणतो :-)

Uday123
Wednesday, October 31, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही वाटत की ते पाकीस्तानी आहेत म्हणुन लाड होतात. त्या कलाकारांमधे काहीतरी कला आहे...म्हणुन लाड होत असतील जर होत आहेत असे वाटत असेल तर. अमानत नाही काय छान गायचा, पण कुठे आला झी वर नं. १?

याच बरोबर, भिमसेन कुमार गंधर्व हे थोर गायक आहेत, आणी त्यांना समजावुन त्यांच्या गाण्याचा आनंद लुटायला रसीकाला एक प्रतिभा असावी लागते, हे काम येर्‍या-गबाळ्याचे नाहीच.



T_pritam
Thursday, November 01, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुर्णपणे असहमत आहे या विचारांशी...

पहिल्या प्रथम गुलाम अली आणि पं.भीमसेन जोशी याचा संगीताचा प्रांतच वेगळा आहे
(atleast for a person like me who doesnot know anything about music). त्यामुळे होतं काय की माझ्या कानांना जे काही चांगलं वाटतं तेच मी ऐकतो. उद्या कुणी मला शास्त्रीय संगीताच्या मैफिलिला बोलावलं तर कदाचीत मी नकार देईन कारण मला त्यातलं काहीही कळत नाही, पण तोच जर एखदा गजल कार्यक्रम असेल तर मी जरुर जाईन कारण मला त्या ऐकायला आवडतात.

माझे खुप मित्र (गोव्याचे) आहेत ज्यांना इंग्लिश म्युझिक आवडतं. त्यांना संदिप खरे नाही आवडणार कारण त्यांचं मराठी भाषेचं द्यान खूपच मर्यादीत आहे. खूप जणांना
Fast Music आवडतं, किंवा Happy Songs आवडतात. त्यांना कदाचीत मुकेशची जुनी आणि दर्दभरी गाणी नाही आवडणार.

'शेजार्‍याची बायको देखणी' असं कदाचीत २-५ बाबतीत होतही असेल, पण सरसकट सगळ्यांनाच आपण हा नियम नाही लावू शकत. आपल्याकडे पण खूप जण लताजीं चे फन असतील ज्याना आशा भोसले नसतील आवडत. तसचं आहे हे पण. कोणी फक्त पकिस्तानी आहे म्हणुन तो आवडू नये किंवा भारतिय आहे म्हणुन आवडायला हवा हे चुक आहे. कोण कुणाला आवडेल हा ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहे.

कारण संगीताला किंबहुना कोणत्याही कलेला जात, धर्म, देश, प्रांत नसतो आणि तो असूही नये.



Sherloc
Thursday, November 01, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुद्द लता सुद्धा गुलाम अलींच्या मोठ्या fan आहेत.

मला वाटते हा "करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले" असा प्रकार आहे. लतादिदींना नुरजहान सुद्धा आवडायची नव्हे ती त्यांचा आदर्शच होती याचा त्यांनी खुपवेळा उल्लेख केला आहे. आज वयाच्या या टप्प्यावर आलेली प्रगल्भता असु शकेल. फक्त प्रश्न असा आहे की ज्यावेळी लतादिदींना कामाची, पैशाची गरज होती तेव्हा जर हिच नुरजहान त्यांना प्रतिस्पर्धी म्हणुन उभी असती तर मला वाटतं चित्र वेगळे दिसले असते. अरे ज्यांनी सख्ख्या बहिणींना (पक्षी आशा भोसले, उशा मंगेशकर) आणि सुमन कल्याणपुर, अनुराधा पौडवालांसारख्याना सोडले नाही (त्यातल्या दोघी तर गुणवत्तेत सारख्याच होत्या) तिथे नुरजहान सारखी गुणवत्तेत या सर्वांच्या तिळभर कमीच असलेली, तिचा एवढा गवगवा केला असता का?

कारण संगीताला किंबहुना कोणत्याही कलेला जात, धर्म, देश, प्रांत नसतो आणि तो असूही नये.

ही एक सर्वसाधारण पळवाट आहे. पाकिस्तानी काय किंबहुना कोणत्याच प्रसिद्ध कलाकाराबद्दल माझ्या मनात तेढ असण्याचे काहीच कारण नाही. मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्यांनी फाळणीनंतर सुद्धा हिंदुस्थानाला आपला देश मानले त्यांचा योग्य गौरव झाल्याशिवाय या बाजारबुणग्याना (पक्षी अदनान सामी, हसन जहांगीर व यासारखे इतर) डोक्यावर बसवणे कितपत योग्य आहे.

Ajjuka
Thursday, November 01, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला गुलाम अलींचं गाणं आवडतं. गाणं आवडायला लागल्यावर कळलं तो पकिस्तानी आहे हे. तोवर उशीर झाला होता 'मेरा कत्ल हो चुका था!!'
नुसरत ही आवडतो.. झालंच तर सूफी मधे म्हणायचं झालं तर अबिदा परवीन, परिदा खानुम आणि साबरी ब्रदर्स ही आवडतात.. हे तिघे भारतीय की पाकिस्तानी हे मला खरंच माहित नाहीये.
एम एफ हुसेनने केलेल्या वादग्रस्त चित्रांना बाजूला ठेवून मला एक चित्रकार म्हणून त्यांचे भारतीय कलेमधले योगदान मोठे वाटते...

काय करताय? सुळावर चढवताय आता?

हे सगळे आवडतात म्हणजे.. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, बेगम अख्तर, शोभा गुर्टू, उल्हास कशाळकर, अश्विनी भिडे-देशपांडे या जीवघेण्या स्थानांबद्दल अनादर नाही.. जगजीत सिंगवर असलेलं प्रेम कमी नाही..
सुभाष अवचट हा वेड लावणारा चित्रकार, ज्याचा भारतीय म्हणून अभिमान असण्यापेक्षा त्याच्या कलेमधला madness आपला वाटतो.

पण जर कुणी मला भारतीय आहे म्हणून हिमेश रेशमिया किंवा तो दळभद्री मिका आणि तत्सम सगळ्या पिलावळीला सहन कर असं म्हणत नुसरत, गुलाम अली ऐकण्यावर बंदी घातली तर एकतर त्या सांगणार्‍या माणसाचं काहीतरी होईल किंवा मी कान फोडून घेईन... हिमेश रेशमिया नावाची घाण ऐकण्यापेक्षा काहीही ऐकू आलं नाही तरी परवडेल


Raviupadhye
Thursday, November 01, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्गीत हा असा प्रान्त आहे की काळाचे,जातीयतेचे आणि प्रान्ताचे बन्धन तो मानूच शकत नाही. हिमाचलाच्या दर्‍यात वाजणारे अलगुज जेन्व्हा अचानक switzerland च्या आल्प्स मध्ये आपल्या भावन्डान्शी खूण गाठ एका बेभान ललकारी मारणार्‍या स्वैर सैलानी च्या स्वराद्वारे करून देते तेन्व्हा ती दाद गोर्‍या चामडीस पाहून दिली जात नाही. भिमसेन चे अगणीत चहाते मी माझ्या अनेक दशकान्च्या उत्तरेतील वास्तव्यात पाहिलेत.धो धो पावसात भीमण्णान्ची मैफ़ील नेहरू पार्क दिल्लीत मी अन माझ्या सारख्या असन्ख्य चाहत्यानी-त्यात मराठी, u p वाले,सरदार्;फ़िरन्गी;आणी पाकीस्तानी ही होते.त्यामुळे बाहेरच्याची ओढ फार या विधानास खळखळाट फार वाटतो.


Zakki
Thursday, November 01, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा BB चुकला वाटते
नाही हो असामी. केवळ तुम्ही आजकाल बरेच दिवसात मायबोलीवर दिसला नाहीत म्हणून म्हंटले की जरा असे लिहावे की लगेच धावत याल. ते असो.

या BB च्या विषयावर तुमचे मत काय? ते लिहीले नाहीत! तुमचाच BB चुकला!


काय करताय? सुळावर चढवताय आता?

छे: छे:! असे व्यक्तिगत कुणि काही म्हणत नाहीये इथे! *** ते तर घृणास्पद होईल ना? ***

BB च्या विषयात जे म्हंटले आहे, तसे का होत असावे? खरेच होते का? नसल्यास हा प्रश्न मुळात पडलाच का? अश्या मार्गाने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असावी ज्यांनी हा मुद्दा प्रथम इथे लिहीला त्यांचा! असे मला वाटते!!



Uday123
Thursday, November 01, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एम एफ हुसेनने केलेल्या वादग्रस्त चित्रांना बाजूला ठेवून मला एक चित्रकार म्हणून त्यांचे भारतीय कलेमधले योगदान मोठे वाटते...

भारतीय कलेच भाग्य म्हणा हव तर की त्याने फ़क्त देवं-देवतांचेच चित्र काठलेत. दुसर्‍या कुणाचे चित्र काठण्याची हिम्मत केली असती तर आज कब्रस्थानात चिरनिद्रा घेत असता.


Slarti
Thursday, November 01, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, उपाध्ये, व्यक्तिशः अनुमोदन.

तरीही (आणि हे सर्वांस उद्देशून)... कलाकाराची अभिव्यक्ती बघताना कलाकाराकडेही बघावे का हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असावे असे वाटते. माझी रसास्वाद घेण्याची जी पद्धत आहे त्यात कलाकारही (म्हणजे त्याची पार्श्वभूमी वगैरे) अंतर्भूत असेल तर ते योग्य की अयोग्य कसे ठरवायचे ? उदा. गुलाम अली ऐकताना काही जण त्यांच्या नागरिकत्वाकडे, धर्माकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, काहीजण करू शकतात. भारतीय जवान मरण्यात पाकी नागरिक म्हणून त्या कलाकारांचीही जबाबदारी आहे असे जर काहींना वाटत असेल तर वास्तवाकडे, जीवनातील विरोधाभासाकडे क्षणभरही काणाडोळा न करणारे ते योग्य की या गोष्टींना संकुचितपणा मानून त्या कलेतील वैश्विकता जाणणारे योग्य ? हे कसे ठरवायचे ? किंवा मूळात ते योग्य / अयोग्य असे काही आहे तरी का ?


Chinya1985
Thursday, November 01, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यामते काहीकाही वेळा भारतात पाकिस्तान्यांचा उगाचच उदोउदो नक्किच होतो. अमानत चांगल गाण म्हणायचा,मुसर्‍या पण ठीक पण शेंबडा जुनैद फ़क्त पाकिस्तानी होता म्हणुन पुढे गेला हे नक्किच. पण काही काही पाकीस्तानी गायक खरच छान गाणी म्हणतात. मी गाण ऐकताना पाकिस्तान्यांची गाणीही ऐकतो मात्र समजा उद्या भारत आणि पाकिस्तानात युध्द सुरु झाले तर माझा पवित्रा बदलुही शकतो म्हणजे त्यावेळी ही गाणी माझ्यासाठी निषिध्द होणार नाहित अशी हमी मी देउ शकत नाही.

राहीली गोष्ट एम.एफ़. हुस्सेनची तर मी म्हणतो असले कलेचे योगदान काय कामाचे जे स्वदेशातील बहुतांश लोकांच्या भावना दुखवेल. मला त्याचाबद्दल काडीचाही अभिमान अथवा आदर नाही. जोड्यानी हाणायला पाहिजे त्याला.कला बिला सब झुठ!!हिंदुंच्या देवतांचा अपमान करायचा आणि मुस्लिम,ख्रिश्चन यांच्याबद्दल आदरपुर्वक चित्र काढायची. जो माणुसच चुकिचा आहे तो काय बरोबर काम करणार??


Zakki
Thursday, November 01, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात मला हुसेनच्या हेतूंबद्दल शंका येते. नग्न स्त्रीचे चित्र ठीक आहे, पण तिला सरस्वति का म्हणायचे? फातिमा का नाही? बाकीची चित्रे सुद्धा कदाचित् चांगली असतील. पण त्यांना राम, सीता, हनुमान यांची नावे का द्यावीत? इतर नावे दिली तर त्या चित्रंचे कलागुण कमी होतात का? असा माझा प्रश्न आहे त्या चित्रांबद्दल.

म्हणूनच सर्व मुसलमानांची मला शंका येते.

आता गाण्यातले मला काही समजत नाही, पण माझ्या मते ते पाकिस्तानी आहेत म्हणून त्यांना जास्त भाव दिला जातो, म्हणजे आपण कुणि गाण्यातले तज्ञ आहोत असे मिरवायला बरे पडते.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators