|
Mandarp
| |
| Monday, October 22, 2007 - 11:23 am: |
| 
|
आजच्या सकाळ मधील ही बातमी आहे. अश्या व्यक्तीं च्या विरुद्ध काहीच करता येत नाही का? http://www.esakal.com/esakal/10222007/Muktapith3A4C33D986.htm तुम्हाला अश्या प्रकारचा अनुभव आला आहे का? अश्या व्यक्तींना कधी वठणीवर आणले आहे का?
|
Shravan
| |
| Monday, October 22, 2007 - 4:05 pm: |
| 
|
अतिशय संतापजनक! हि व्यवस्था कधी सामान्य लोकांचे गार्हाणे ऐकून त्याच्यासाठी कार्यवाही करणार आहे कोण जाणे? हे वार्तांकन वाचूनही आपण काही करु शकत नाही हा विचार आपल्यालाही वैफल्य आणतो. निकोप वृत्तपत्रे काही अंशी ही जबाबदारी पार पाडू शकतात. पण आपण काय करु शकतो मग? कुणीतरी काही करेल असा विचार करुन शांत बसणे हे ही पटत नाही. अशा गोष्टींवर गांभिर्याने विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे. अशा मुजोरी विरुध्द खरेच आपण काय करु शकू?
|
अशा मुजोरी विरुध्द खरेच आपण काय करु शकू? >> श्रवन काहीही नाही. कारन आपन पळपुटे आहोत. समाजासाठी काही करावे याची जानीव कोणालाही नाही. आपल काम झाले बास झाले ही वृती जो पर्यंत जात नाही तो पर्यंत काहीही होनार नाही. तो राजकिय गुंड वृत्तपत्रातील बातम्या वाचुन (त्याचा विषयीचा) स्वतचे मनोरंजन करुन घेत असेल.
|
Chyayla
| |
| Monday, October 22, 2007 - 6:17 pm: |
| 
|
अशा गोष्टींवर गांभिर्याने विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे केदार, अगदी मनातल बोललात.. श्रावण, अशी वेळ कधिचीच आलेली असते. फक्त जेव्हा स्वता:वर असे प्रसंग येतात तेव्हा त्याची जाणीव होते. तोपर्यंत तरी "मला काय त्याचे" हीच वृत्ती दिसुन येते. राजकारण्याना दोश देण्या आधी आपलाही तितकाच दोश आहे ही जाणीव आधी व्हायला हवी. कारण राजकारणी लोकही शेवटी आपल्यातुनच येतात.
|
लोकांनीच एकत्र येउन फ़टकवायला पाहिजे या लोकांना
|
Suyog_11
| |
| Monday, October 22, 2007 - 10:43 pm: |
| 
|
अशी धमकी देणारया नेत्याच्या बाबतीत जन आंदोलन सुरु करावे...तेही असे की त्याची झोप उडाली पाहीजे. मित्रांनो त्याचे नाव जाहीर करा मग आपण सर्व जण मिळुन या बाबत एक जाहीर निवेदन सर्व व्रुत्तपत्रांमद्धे अणि या देशाच्या राष्ट्रपती,पंतप्रधान,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवुयात. नुसते या ब्लॉग वर चर्चा करण्याने त्या नेत्याला काही फरक नाही पडणार. तेव्हा माझे म्हणणे पटत असेल तर सांगा.
|
सुयोग! अशी कित्येक निवेदने धुळखात पडली आहेत.या राजकारण्यांना त्याचे सोयरसुतक नाही. भावनाशुन्य माणसे आहेत ही सगळी! सत्तेची गुर्मी चढली आहे यांना. सर्वसाधारण माणुस किड्यामुंग्यासारखा भरडला,चिरडला,मारला जातोय.यांना नुसते फ़टकावुन उपयोग नाही अश्यांना भर चौकात ठेचुन अथवा गोळ्या घालुन मारले पहिजे.तेंव्हाच यांची माज मस्ती सत्तेचि गुर्मी उतरेल आणि इतरांना देखिल बोध होइल यातुन. आपण खरच षंढ,नपुंसक होत चाललोय आणि याचाच फ़ायदाहे असले मस्तवाल राजकारणी घेतात. आता अजुन एका क्रंतिची वेळ जवळ येवुन ठेपली आहे.शस्त्र हे प्रत्येक गोष्टिला प्रत्युत्तर होवु शकत नाहि हे जरि खरे असले तरि शेवटि,जर या आधुनिक दानवांचे निर्दालन करायचे असेल तर तोच एक अखेरचा पर्याय उरतो. "डोंबिवली फ़ास्ट" हा चित्रपट याचेच प्रतिक नाहि का? जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Shravan
| |
| Tuesday, October 23, 2007 - 1:05 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, मला वाटत नाही बंड वगैरे पर्यंत जाण्याची गरज आहे. गरज आहे ती फक्त कायदे व व्यवस्था नीट अभ्यासून त्याचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरण्याची. तुम्ही जे 'डोंबिवली फास्ट' चे उदाहरण दिले आहे त्यामध्ये सुद्धा चंद्रकांत गोखलेंना आणून तो मार्ग चुकीचा आहे हे सांगितले आहे. पोलीसांवर बरेच अवलंबुन असते. म्हणजे ते कलम कोणते लावतात यावर. जर कायद्यातील जाणकार कोणती कलमे लावावीत हे सुचवू शकले तर तसा आग्रह धरता येईल. अगदी जनमत गोळा करुन वगैरे तसे करायला भाग पाडता येईल.
|
Itgirl
| |
| Tuesday, October 23, 2007 - 1:45 pm: |
| 
|
लिंक दिलेली बातमी वाचली. वांझोटा संताप झाला एक आई अर्धवट वयातल्या मुलीकडे बघेन अशी धमकी देते?? इतक्या खालच्या थराला एक स्त्री जाऊन बोलू शकते?? स्वत:चे स्त्रीपण आणि आईपण विसरून?? आणि किती खालच्या थराला जाणार हे लोक?
|
Disha013
| |
| Tuesday, October 23, 2007 - 4:38 pm: |
| 
|
>>>>पोलीसांवर बरेच अवलंबुन असते मला नाही वाटत तसे. ते 'वरच्या' हुकमाचे गुलाम.त्यांच्या 'वर' अजुन कुणितरी, आणि त्यांच्याही वर अजुन... जावुद्या ते आपल्यासाठी नाहितच. बातमी भयानक आहे. पण लोक विसरुनही जातील. कदातीच अजुन २,४ अशाच घटना घडल्याही असतील आतापर्यन्त. सावळा गोंधळ आहे नुसता.
|
Maanus
| |
| Tuesday, October 23, 2007 - 4:50 pm: |
| 
|
आव्हान आज आपल्या परम प्रिय जमिनदारांच्या, लाडक्या राजकुमारांच्या, गोंडस श्वानाने मला चावुन एक वर्ष झाले. जमिनदारांनी निवडनुकीत बराच खर्च झाल्याने काही दिवसांनी पैसे देतो असे कळवले. परंतु त्यांची परीस्थीती अजुन सुधारलेली दिसत नाहीय. निवडनुकीत खरेच बराच खर्च झालेला दिसतोय. त्यांच्या बायका मुलांचे किती हाल होत असतील ह्याची मला कल्पना करवत नाहीय. तरीही माझे तमाम जनतेला आव्हान आहे की कृपया पुढच्या खेपेस बहुमताने विजयी करा, जेनेकरुन त्यांच्याकडे आर्थीक सुबत्ता येईल, व माझ्यासारख्या देनेकरांची कर्जे ते चुकवु शकतील. ता.क.: तोपर्यंत कृपया पाटलींनबाईं पासुन आपल्या नवर्यांना सांभाळा, स्वतःच्या नवर्यावर नाखुष असल्याने त्या परपुरषांना स्वतःच्या सौदर्यपाशात जखडुन घेण्याच्या विचारात आहेत. अशी ad paper मधे टाकायची, त्यांच्या printouts काढुन जागोजागी चिकटवयाच्या, internet शुद्धलेखनाच्या चुका आहेत
|
Maanus
| |
| Tuesday, October 23, 2007 - 4:56 pm: |
| 
|
this should be done right before the निवडणुक. also, जेव्हा मला माहीत आहे की अमुक एका व्यक्तीची बरोबरी करु शकत नाही, पोलीस त्याच्या बाजुने आहेत, तेव्हा अशी व्यक्ती शोधावी जी त्या व्यक्तीचा मुकाबला करु शकते, उ.दा. local leader from opposite party, put your case infront of him. newspaper, pamplets may not work, but this will surely work.
|
Zpratibha
| |
| Wednesday, October 24, 2007 - 4:40 am: |
| 
|
माणुस, बरोबर आहे तुमच. काहि वेळा काट्यानेच काटा काढला पाहिजे.त्याच संपुर्ण राजकिय भवितव्यच धोक्यात आणल पाहिजे, ज्याच्या जिवावर तो इतका माजलाय. राहिली गोष्ट त्याच्या आईची तर ती स्वत्:ला स्त्री म्हणुन घ्यायच्यासुद्धा लायकिची नाहि. आणी दुसरे असे की ज्या बाईचे विचार असे तिच्या उदरी नाहितरी नराधमच जन्म घेणार.
|
Zakki
| |
| Wednesday, October 24, 2007 - 2:10 pm: |
| 
|
वरती षठं प्रति षाठ्यं असा बा. फ. आहे. त्यावरून काही बोध होतो का?
|
Suyog_11
| |
| Wednesday, October 24, 2007 - 11:36 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, मला वाटत नाही बंड वगैरे पर्यंत जाण्याची गरज आहे ... मला सांगा किती दिवस हे सगळे सहन करत राहणार आपण... क्रांति शिवाय प्रगती होत नसते. पोलिसांना दोष देणे सोपे आहे. पण आपणच जर एका गुंडाला नेता होण्यापासुन थांबवले तर तो पोलिसांवर शिरजोरी करनार नाही. तेव्हा हे समजुन घ्या की तुम्ही फ़क्त बघ्याची किंवा समज देण्याची भुमिका घेतली तर हे सर्व असेच चालु राहील.
|
Maanus
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:07 am: |
| 
|
रॉबिनहुड... कहा हो. बंड म्हटला की बळी आले, प्रश्न असा आहे की बळी कोण जानार
|
सुयोग तुमचे म्हणणे मान्य! पण ती क्रांती घडवायची सुरुवात कुणी आणि कुठुन करायची हाच महत्वाचा प्रश्न आहे. माझा अनुभव इथे कथन करते आहे. मी स्वत अगदि अश्याच नाहि म्हणता येणार पण काहि अंशी राजकीय दबावाचे भक्ष बनण्याच्या मार्गावर होते.पण "इच्छा तेथे मार्ग "या उक्ति वर माझा विश्वास आहे. माझ्या वडिलांची एक जागा रिपब्लिकन पार्टी च्या बालेकिल्ल्यात आहे.दोन वर्षापुर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले.त्या धक्क्यातुन सावरतोय नाही तर या पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाने जागा ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालु केले.माझ्या अनुपस्थितित सुशोभिकरणाच्या नावाखाली त्या जागेचा काहि भाग गिळंक्रुत देखिल केला. हे काम करत असताना बांधलेले गटार मुद्दाम अश्या प्रकारे बांधले की जेणे करुन पाण्याचा निचरा न होता सगळे सांडपाणी माझ्या सखल भागी असलेल्या जागेत साठुन राहील. माझ्या वडीलांनी प्रेमाने लावलेली जोपासलेली संगोपन केलेली विविध प्रजातींची झाडे पाणी साठुन राहिल्याने कुजुन गेली. मी या सगळ्या प्रकाराने एकदम भांबावुन गेले.काय करावे ते कळेना? सुदैवाने माझ्या वडिलांची पार्श्वभुमी देखिल काहि प्रमाणात राजकिय (शिवसेना)पक्षाशी निगडित असल्यामुळे शेवटी मी त्याच पक्षाची मदत घेण्याचे ठरवले.त्याप्रमाणे दुसर्या प्रभागातील सेनेच्या नगरसेवकाला मदत करण्याचे आवाहन केले. आणि त्यांना ती जागा एखाद्या चांगल्या सामाजिक प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मी दिले. सेनेच्या आमदारांनी त्या जागेची प्रकल्पासाठी पाहणी केल्या नंतर दुसर्या पक्षाच्या जागा घशात घालण्याच्या सगळ्या प्रयत्नांना खिळ बसली. हात पाय गाळुन बसले असते तर माझ्या वडिलांच्या कष्टाने कमवलेल्या जागेवर फ़ार फ़ार तर दारुचा गुत्ता उभा राहिला असता तात्पर्य काय तर घाबरुन न जाता निर्भिडपणे अश्या भेकडांचा सामना करायला हवा.कारण दुसर्याला घाबरवणारी माणसेच स्वत कमकुवत मनाची आणि पळपुटी असतात. जय हिन्द! जय महाराष्ट्र!
|
भारतात न्यायव्यवस्था जवळपास असून नसल्यासारखीच आहे. त्यामुळे न्यायालयात जाऊन फारसे काही साध्य होणार नाही. न्याय मिळायला अनेक दशके लागतील. तोपर्यंत त्या गुन्ह्याचे महत्व पूर्णपणे संपून गेले असेल. एकच किरकोळ उपाय करता येईल. हा श्वानस्वामी ज्या पक्षाशी संबंधित असेल त्या पक्षाला कोणत्याही निवडणुकीत नागरिकांनी अजिबात मत देऊ नये. अनेक नागरिकांनी असे केले तर त्याच्या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकेल. अर्थात असे खरोखरच होईल का याबद्दल मी साशंक आहे. भारतीय नागरिक एखाद्या पक्षाने अनेकवेळा वाईट काम केले आहे हे माहित असूनसुद्धा ते त्याच पक्षाला पुन्हापुन्हा मत देतात. तामिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुकने अनेक वेळा हिंदूधर्मविरोधी भूमिका घेऊनसुद्धा तेच पक्ष आलटूनपालटून निवडून येतात. करुणानिधीने श्रीरामांबद्दल अपशब्द काढले, केरळमधला अतिरेकी अब्दुल नासर मदानी तामिळनाडूत तुरुंगात असताना त्याला खास सोयीसवलती पुरवल्या. जयललिताने ऐन दिवाळीच्या दिवशी श्री शंकराचार्यांना तुरुंगात टकले होते. तरीसुद्धा तामिळ जनता या दोघांच्याच पक्षाला आलटूनपालटून निवडून देते. म्हणून तर हे पक्ष बिनधास्त आहेत. कालपासून पुण्यात भारती विद्यापीठातला रस्ता बंद केला आहे. त्या भागातल्या सुमारे ३ लाख नागरिकांची त्यामुळे पंचाईत झाली आहे. भारती विद्यापीठाचा प्रोप्रायटर कॉंग्रेसचा पतंग कदम आहे. मला खात्री आहे, येवढे होऊन सुद्धा पुढील निवडणुकीत त्या भागातून कॉंग्रेसलाच भरपूर मते मिळतील. हे माहित असल्यामुळेच पतंग आणि त्याचा पक्ष लोकांची अजिबात पर्वा करत नाही. भारतात कायदा अस्तिवात नाही, पुढारी गुंड आणि निगरगट्ट आहेत आणि नागरिकांकडे सारासार बुद्धीचा अभाव आहे. भारतासारख्या देशात स्वतः जपून राहणे हाच एकमेव उपाय आहे.
|
विषय कोणताही असो, तुम्ही हिन्दुत्ववादाचे घोडे दामटणारच.
|
Zakki
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:55 pm: |
| 
|
अहो विजय, तुम्हाला हे कधी कळणार, की भारतात हिंदू धर्माच्या लोकांची बहुसंख्या आहे? भारताचे सगळे प्रश्न हिंदू धर्माच्या लोकांच्या हितांशी निगडित आहेत. त्यांना उघड उघड डावलून जेंव्हा राजकारणी निर्णय घेतात, तेंव्हा, जनतेविरुद्ध असून जनता त्यांना निवडून देते, हे सांगायला याहून ज्वलंत उदाहरण कुठले असणार? आणि सर्व भारतीय लोकांमधील एकच दुवा म्हणजे हिंदुत्व. त्याखेरीज इतर कुठल्याहि मुद्द्यावर सर्व जनतेचे एकमत होऊ शकत नाही. आशी संघटना झाल्याशिवाय कोणतीहि राज्यपद्धति राबवल्या जात नाही. म्हणून संघटना महत्वाची. संघटना झाल्यावर तुमच्यासारखे लोक मुसलमानांचे हित पहातीलच, त्यांना जास्त मते मिळाली तर.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|