|
Storvi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:59 pm: |
| 
|
गेल्या काही वर्षांत यावर माझं मन जरा दोलायमान होतं आहे. काही वर्षांपुर्वी माझा भाचा लहान असताना आई म्हणाली की अम्ही त्याला शिकवतोय कोणी मारलं तर तू ही एक ठेवुन देत जा. या जगात गप्प बसुन चालत नाही. पर्वा पुन्हा हा विषय वर आला. माझं बोलणं चालु होत की लागलं की ' हात रे ' करू नये कारण मुलं पुढे inanimate objects and living things यातला फ़रक न समजता मनासारखं झालं नाही की लगेच हात रे करतील. प्रचितीदखल आई कडे असतांना आरोही ने एकदा मला ' हात रे ' केले. ते पाहिल्यावर घरच्यांचा पवित्रा जरा बदलला. पण काही दिवसांपुर्वी आणखी काही लोकांशी बोलतांना ओउन्हा हा विषय निघाला तेंव्हा ती म्हणाली की शिकला मारायला तर शिकुदेत कारण डे केअर मध्ये काही मुल bully असतात आणि bullying झालं की त्यांना वेगळं ठेवतात आणी caregivers ने corrective action घेतल्यामुळे हे episodes कमी झालेत पण तरीही पूर्ण बंद होत नाहीत सो गपचुप ऐकुन घेण्यापेक्षा हे बरं. मला हे अजिबात पटलेलं नाहीये पण at the same time माझ्या कडे टीचर कडे कंप्लेन करण्याशिवय दुसरं सोल्युशन नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कडे काही उत्तर आहे का याला?
|
Shyamli
| |
| Wednesday, March 22, 2006 - 6:21 pm: |
| 
|
खरतर हा प्रश्ण.... १) परीस्थीति सापेक्ष आहे अस मला वाटत... २) आज कालच्या जगात आपल मुलं अगदी शांत राहुन पण नाही चालणार.... ३) अजुन थोड्या दिवसांनी मुलाला बाहेरच्या जगात एकटच जाव लागणार आहे आणि....तिथे मुलांमधे आपोआपच मुलं हे शिकतात... ४) त्यामुळे आपण जरी नाही शिकवलं तरी मुलं हे शिकणारच... ५) फक्त जरा समजायला लागलं की कधि असं करु नये याची जाणिव मुलांना करुन द्यावी..... अजुन अनुभवी मंडळी प्रकाश टाकतिलच
|
Lalu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 6:26 pm: |
| 
|
याबद्दलची एक लिन्क मी पूर्वी इथेच कुठेतरी दिली होती. सापडते का बघते. ही अजून एक - Dealing with Bullies शाळेतूनही काउन्सेलर याबद्दल चांगली माहिती मुलाना देतात. ते उपाय चांगले आहेत आणि बरेचसे लागू पडतात असं वाटतं. पुन्हा लिहीते.
|
Deemdu
| |
| Friday, March 24, 2006 - 5:44 am: |
| 
|
शठम प्रतिशाठ्यम हे माझ्या दृष्टीने तरी अगदी बरोबर आहे. माझा मुलगा दिवसभर daycare मध्ये असतो, त्याच्या बरोबर त्याच्या पेक्षा मोठी मुलही असतात. आणि खेळण्यांच्या बाबतीत तर प्रत्येकालाच माहिती असेल की एक खेळण एकाने घेतल की ते दुसर्याला कस हव असत अश्या वेळी निदान मी तरी मुलाला अगदी व्यवस्थीत पणे सांगुन ठेवल आहे की तु स्वतहुन कोणाला मारायच नाही पण जर तुला कोणी मारल तर मात्र ऐकुन घ्यायच नाहि मग मात्र return फटक द्यायचा त्याला. अरे बाकीची मुल येऊन मारुन जातील आणि आपल्या मुल्लांनी काय मार खात बसायच का???/
|
दीपली मला तुझे म्हणणे अगदी पटले बघ. अहिसा वादि राहण्यापेक्षा हीसावादी राहेलेले बरे.
|
Storvi
| |
| Friday, March 24, 2006 - 4:35 pm: |
| 
|
मार खावा असं मी म्हणत नाहीये. लक्षात घ्या म्हणुनच मी हा बीबी उघडलाय कोणाला काही सुचत असेल तर उत्तरं द्या. पण तरीही मला वाटतं मारणे हे तरी सुद्धा मला पटत नाहीये. आता ह्या गोष्टीचा उलटा effect लक्षात घ्या. माझ्या भाच्याला असेच शिकवले आहे तुम्ही लोक म्हणता तसं मार खायचा नाही, कोणी मारलं तर आपणही एक दोन लगावुन द्यायच्य. तो आता ७ वर्षांचा आहे. त्याच्या वर्गात एकदा त्याची आणि इतरांची प्रचंड मारामारी झाली एवढीशी मुलं सुद्धा अशी कशी वागु शकतात कळत नाही, नको तिथे मारले ह्याल, आणि चिडुन मग ह्यानेही पट्टा काढला आणि मारले त्या मुलांना मारलं. घरी तक्रार काय आली ह्याने सगळ्यांना belt ने मारलं. खुप विचारुनही exactly काय झाले हे त्याने सांगितलेच नाही. सुरुवात त्याने केली नाही हे त्याने घरी सांगितलं पण शाळेत टीचर समोर काही बोलला नाही. हे सगळ त्याने मी phone केलेला असतांना माझ्या समोर सांगितल, घरातही माझ्याशी बोलतांना सगळ्यांना कळलं खरं काय झालं ते. मग सगळे त्याला झापु लागले की अरे तु टीचर ला हे का नाही सांगितलंस.. पण आता त्याला बोलुन काय उपयोग? त्याच्या द्रुष्टीने तुम्ही जे शिकवलत ते त्याने केलं, त्याला मारलं तर त्याने पण दोन लगवुन दिल्या पण मुळात जे घडलं ते अधी जे कोणी responsible adults आहेत त्यांना सांगावं असं त्याला वाटलं नाही कारण he had dealt with the situation आणि एवढं करूनही सगळं मोठ्यांनी सांगितल्यासारखं वागूनही आपल्याला का रागावतायत हे त्याला कळले नाही आणि मग त्याने जे तोंड बंद केले ते माझ्या phone पर्यंत त्या मुलांनी मात्र स्वतः सुरुवात करुन पुन्हा ह्याने मारल्यावर लगेच टीचर कडे complain केली. त्या आइवजी ह्याला जर आधी authority figures जवळ तक्रार कर आणि मग हात उचल हे शिकवलं असतं तर ही मारामारी एवढी पुढे गेली नसती अणि योग्य त्या मुलांना शाळेत शिक्षा झाली असती. नंन्तर हे लोक शाळेत गेले, मग टीचरलाच झापले की एवढी मारामारी वर्गात चालू असतांना तुम्ही कुठे होतात वगैरे.. आणि मग actually काय घडलय कळल्यावर miscreants च्य पालकांनी पण माफ़ी मागितली हा भाग अलाहिदा, पण हे एवढ्या टोकाला जायला नको होतं असं मला त्या वेळेला वाटलं >>अहिसा वादि राहण्यापेक्षा हीसावादी राहेलेले बरे. >>Are you serious? I can't believe this.
|
Ninavi
| |
| Friday, March 24, 2006 - 4:56 pm: |
| 
|
बाप रे! कठीणच आहे. मला व्यक्तिशः ' हात रे' प्रकार पटत नाही आणि मी माझ्या मुलालाही तसं शिकवलेलं नाही. माझा मुलगा आता सात वर्षांचा आहे. आपण निष्कारण कुणाच्या वाटेला जायचं नाही, कुणी आपल्या बाबतीत तसं करायला लागलं तर शक्यतोवर शाब्दिक वाटाघाटींनी प्रश्न सोडवायचा, हाताबाहेर जातंय असं वाटलं तर टीचरला सांगायचं, जिथे आपली चूक असेल तिथे बिनशर्त responsibility घ्यायची. सहसा इतकं पाळलं तरी पुरतं असा अजून तरी माझा अनुभव आहे.
|
>>शाब्दिक वाटाघाटींनी प्रश्न सोडवायचा बाप रे! कठीणच आहे. ~D
|
Ninavi
| |
| Friday, March 24, 2006 - 5:43 pm: |
| 
|
कलंदर, मी टीचरला सांगेन हां! 
|
Lalu
| |
| Friday, March 24, 2006 - 5:50 pm: |
| 
|
शिल्पा तू हे भारतातलं सान्गते आहेस का? इथे गोष्टी या थराला जातील असं वाटत नाही. वरच्या लिन्क मधले मुद्दे इथेच देते आहे. आणि bullying म्हणजे फक्त ' मारामारी' नव्हे, यात भीती घालणे, चिडवणे, त्रास देणे याही गोष्टी येतात. त्याचा प्रतिकार कसा करावा याबद्दल या स्टेप्स आहेत. अर्थात मी हे इथलं बोलते आहे. What to Do About Bullying Bullying can be a big pain, but you don't have to let bullying get the best of you and your buddies. Here are some things to try if you're bothered by a bully: Act brave. When you're scared of another person, you're probably not feeling your bravest. But sometimes just acting brave is enough to stop a bully. If you walk by as though you're not afraid and hold your head high, a bully may be less likely to give you trouble. Ignore a bully. Simply ignoring a bully's threats and walking away robs the bully of his or her fun. Bullies want a big reaction to their teasing and meanness. Acting as if you don't notice and don't care is like giving no reaction at all, and this just might stop a bully's behavior. Stand up for yourself. Kids can stand up for themselves with words by telling the bully to stop it, and then walk away. Kids also can stand up for each other by telling a bully to stop teasing or scaring someone else, and then walk away together. Tell an adult. If you are being bullied, it's very important to tell an adult. Teachers, principals, parents, and lunchroom helpers at school can all help to stop bullying. Be a buddy. Kids who are being bullied can use the buddy system. Make a plan to walk with a friend or two on the way to school or recess or lunch or wherever you think you might meet the bully. Offer to do the same for a friend who's having trouble with a bully. Don't bully back. Don't hit, kick, or push back to deal with someone bullying you or your friends. Fighting back just satisfies a bully and it's dangerous, too, because someone could get hurt. It's best to stay with others, stay safe, and get help from an adult. ती साईट बहुतेक ही होती. cd वगैरे घ्यायची गरज नाही. माहिती पुरेशी आहे. 'मायबोलीवरचे bullies असा काहीतरी विषय निघाला होता तेव्हा ही साईट आठवली म्हणून मी लिन्क दिली होती असं वाटतंय. cbdg http://www.safechild.org/bullies.htm
|
Storvi
| |
| Friday, March 24, 2006 - 7:16 pm: |
| 
|
हो भारतातलंच सांगतीये. पण मला कुठेही असल तरी अरे ल करे फारसं पटत नाहीये.. लालु तु दिलेली लिंक मी वाचली. पण problem असा आहे मी आरोही ला असं शिकवायचं नाही हे ठरवलेलंच आहे, अणि ते आचरणातही आणते आहे, पण इतर लोक वर म्हणतायत त्या प्रमाणे, एकाला दोन तोडीसतोड असच शिकवताहेत, आणि माझं मत मी त्यांना सांगायच म्हटलं तरी मला नीट alternatives माहीत नाहीत. तु दिलेल्या site बद्दल मे नक्कीच त्यांना सांगेन इथुन पुढे. Thanks मंडळी आणखी एक लक्षात घ्या माझा problem असा आहे, की इथे US मध्ये एकवेळ टीचर ला सांगून problem सोल्वे होइलही, भारतात त्याची guarantee नाही. पण लालू चे options जरा बरे वाटताहेत. at least it gives me a starting point to discuss with my brothers and others..
|
Bee
| |
| Saturday, March 25, 2006 - 8:31 am: |
| 
|
Are you serious? I can't believe this>>>> शिल्पा आपला देश गांधीजींचा आहे म्हणून नाही पण मलाही हिंसावाद अंगी बाणायला विरोध आहे. प्रत्येकात हिंसा करण्याची शारिरीक वा मानसिक कुवत नसते. हिंसेमुळे हिंसा वाढते, प्रश्न सुटत नाहीत तर ते आणखी ज्वलंत होतात. सुडाची भावना शिगेपर्यंत पोचते. एक नाही अनेक तोटे ह्या अहिंसेत दडले आहेत. पण मग प्रश्न पडतो अहिंसा न करणे म्हणजे नक्की काय करणे? शेवटी ज्यालात्याला आपला बचाव करावाच लागतो. मग ज्याला प्रेमाने समजत नाही त्याला समजून सांगावे कसे. लाथोके भुत बातोसे नाही मानते हे पटायला लागतं. मग आपण भेकड आहोत, आपल्यात ती दोन हात करण्याची कुवत नाही ह्याची शरम निर्माण होते. कळत की थोड्याफ़ार प्रमाणात आपणही प्रेम आपूलकी अहिंसा बाजूला ठेवून राक्षसी आव आणावा. असे बरेच काही वाटते. But again I will say, I oppose violence. बचाव हा फ़क्त शाब्दीक स्थरावर करणे नेहमीच शक्य नाही. माझ्या बालपणीचा एक किस्सा सांगतो. वाटेत मेंढ्या नावाचा एक मुलगा मला व माझ्या एका मित्राकडून दप्तरातील सगळ्या लेखणी, पेन, रबर हिसकावून घेत असे. वरून आम्हाला मारायचा पण. तो आमच्या शाळेतील नव्हता. आम्ही दोघे आणि तो एकटा, पण तो आम्हाला पुरुन उरे. घरी तक्रार केली तर कुणी ऐकले नाही. त्याची शाळा कुठली, तो कुठला काही माहिती नाही. आम्ही फ़क्त तिसरी चवथीत. शेवटी मी आणि माझ्या मित्रानी मन घट्ट करुन एके दिवशी वर्तूळ काढायचा chop असतोना तो बहिणीच्या कंपाॅसमधून शाळेत आणला. जेंव्हा हा मुलगा आम्हाला मारायला लागला, लेखणी हिसकवून घ्यायला लागला तेंव्हा आम्ही chop त्याच्या अंगठ्यात घुसवला. तेंव्हापासून तो आमच्या वाट्याला कधी आला नही. उलट जेंव्हा कधी भेटला तेंव्हा आम्हाला घाबरून पळून जात असे. म्हणजे इथे बळी तो कान पिळी ही युक्ती खरी ठरली.
|
शाब्दीक स्तरावर बचाव नेहमीच शक्य नाही.....? मला तरी हे पटत नाही.., लहान मुलांनी किरकोळ प्रकारात एकमेकांना मारणे(म्हनजे एखादी चापट मारणे) हे ती मुले फ़ार सहज पणे करतात, आपल्यापर्यन्त येउही देत नाही, त्या किर्कोळ गोष्टीत आपणही पडु नये पण bulling वगैरे अशा प्रकारात मोठ्यामाणसानाच सांगीतले पाहीजे, मी माझ्या मुलाला संगीतलेय कितीही कोणी चिडवले, बोलले तर आधी teacher ला सांगायचे जर तुला वाटले teacher ने न्याय्य वागणुक दिली नाही असे तुला वाटले तर घरी सांगायचे! त्यालाही हे पटले तो आता कुणाला कधीच मारत नाही(पुर्वी मात्र मारयचा अणि एकदा दोनदा मुलांचे भांडण मी सोडवले) मारणे ही कल्पनाच मला कशीतरी वाटते, कुणी कुणाला मारतांना बघितले ना तर मला कसेतरीच होते, आगदी मुलांनी जरी एक्मेकांना मारले तरी, म्ला कुणाशी वाद झाला तरी अस्वस्थ होते, तसेच त्यालाही कोणाशी भांडण झाले तर होते.. समाजात वावरतांना मारणे हे कधी " जरुरी " झाले आहे असा मला तरी अनुभव नाही. माझे field असे होते की रोज तिथे वाद हा ठरलेला असे, पण गुंडाशी सुद्धावाद घलतांनाचा माझा अनुभव समोरचा खुप चिडला तर तुम्ही शंतपणे जर तुमचा मुद्दा पटवुन दीला तर ते तसेच बोलतात, पन कधीकधी र्स्त्यात किंवा कुठल्या दुकान दाराने फ़सवल्याने जर वाद झाला तर आपन कडकलक्ष्मीचा अवतार घेतल्याशिवाय पर्याय नसतो, तेव्हा मुले बघतच असतात आणि अन्याय सहन करु नये हे त्यांना त्यामुळे लक्षत येते... आपण त्यांना मारण्याची वेळ शक्यतो टाळ्ण्याविशयीच शिकवले पाहीजे, नाहीतर ही सवय मोठेपणी वेगळे रुप धारण करु शकते.. नंतर कुठे मारावे कुठे नाही हे कळण्याइतके वय झाल्यावर ते त्यांचे निर्णय घेउन मोकळे होतीलच!!! इथल्य शाळेत bulling बद्दल film दाख्वली आणि कोणी तसे करतांना आढळल्यास त्यास शाळेतुन काढले जाते. हा ragging चा प्रकार वाटला.
|
Bee
| |
| Sunday, March 26, 2006 - 6:27 am: |
| 
|
लोपमुद्रा, माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही प्रेमळ पणे कुणाला समजावून सांगूण पाहिले तर समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी प्रेमळपणा बाजूला ठेवून, थोडे कांगावे, नाटकं, दमदाटी, चिडचिड, आदळ आपट, रौद्र अवतार करणे आवश्य असते. हे गुण कुणी जरी नाही शिकवले तरी एकदा जिवावर आली की आपोआप मनुष्य संयम सोडून करू लागतो. मी हाणामारी म्हणत नाही, कधीकधी तीही करण्याची वेळ येऊ शकते. मुलांना घ्या गोष्टी करू नको असे कितीही वेळा बजावले तरी आपण मोठी माणसेच कितीतरी वेळा ह्या सवयींच्या आहारी जातो. सर्वात पहिले वहिले वाद विवाद हे घरातूनच आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या घरी आईवडीलांची आम्हा बहिणी भावांची कमी भांडणे होत नव्हती. माझी लगेच मोठी असलेली बहिण माझे केस जोरात ओढायची, टाणकण मला डोक्यात मारायची, ओरखडे घ्यायची, माझ्यावर राज्य येईल असे खेळ खेळायची. बाहेरचे जग तर दुर. जरा बाहेर पाहतो म्हंटले तर रोज सकाळी नळावरची भांडणे बघायला मिळायची. तुम्हाला जर एकुलते एक मुल असेल तर आईवडील लक्ष ठेवू शकतील पण दोन तीन मुले असतील तर घरचे वाद सोडून पाहणे त्यांना जमणार नाही. BTW इथे शठम प्रतिशाठ्यम म्हणजे नेमके काय?
|
bulling cha arth mee ithalyaa shalet jasa sangitalaa tasa ghetalaay, ithe tya baddal film dakhvalee hotee, asO BEE.. . pahily don olinanatar mee majha anubhav lihila tyacha tujhya post shee kahi sambadh naahee! milindaaaa mjhi doghee post udavataa yeteel ka!!!mla jamat nahiye.
|
Bee
| |
| Sunday, March 26, 2006 - 9:22 am: |
| 
|
लोपमुद्रा, तुझे पोष्ट खूप छान आहे. राहू दे, उडवायला सांगू नकोस. तुझ्या पोष्टवरुन माझे पोष्ट आले आहे काहिसे तेही मग उडवावे लागेल. तेन्ह्वा जे आहे ते राहू दे, बीबीला अनुसरून जे काही आहे ते त्या बीबीवर राहू द्यावे
|
thanks bee!!!.. .. .. .. .. 
|
Jai_jui
| |
| Monday, March 27, 2006 - 4:23 pm: |
| 
|
बी, शठम प्रति शाठ्यम म्हणजे जशास तसे.
|
Storvi
| |
| Monday, March 27, 2006 - 7:04 pm: |
| 
|
>>घरी तक्रार केली तर कुणी ऐकले नाही>>बी problem इथे आहे. हे नाही झालं तर पुढचं सगळं येतं पण आधी मोठ्या माणसांना सांगायला शिकवायलाच हवं असं आपलं मला वाटतं
|
माझा मुलगा १० वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी त्याला विचारलं, "कोणी physically bully करायला लागलं तर तू काय करशील?" (चिडवणारी मुलं insecure आणि low self esteem वाली असतात हे त्याला चांगलं ठाउक आहे. तो कोणाचही वाईट बोलणं कानाआड करु शकतो). पण कोणी मारायला आलं तर काय? ह्यावर त्याचं उत्तर " you do not have to hit the person back. Just be strong enough to hold the hand that is hitting you ! उत्तर ऐकून धन्य झाले शक्य झाल्यास मुलांना मार्शल आर्ट्स सारख्या self defence classes मधे घालावं. त्याचा नक्किच खूप फ़ायदा होतो. तसच आपण मुलांना bullying पासून बचाव तर शिकवतो. पण आपलं पोर तर bully करत नाही ना हे देखिल बघायला आणि तसं न करण्याबाबत त्यांना शिकवायला हवं. तुम्हाला काय वाटतं?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|