|
Lukkhi
| |
| Tuesday, October 16, 2007 - 9:11 am: |
| 
|
आता रडा!! नाहीतर भारत सोडून इकडे तिकडे जा. >> बरोबर झक्की, भेकड, स्वार्थी आणि पळपुट्या लोकांनी हाच मार्ग अवलंबला पाहिजे
|
Zakasrao
| |
| Tuesday, October 16, 2007 - 11:12 am: |
| 
|
एक मेल आली होती. रामसेतु ह्या विषयावर इथे देतोय.
|
>>> अत्यंत भेकड, अत्यंत मूर्ख, अत्यंत स्वार्थी, अत्यंत लाचखाऊ, नि अत्यंत नालायक असे बरेच नेते भारताला लाभले आहेत!! यथा प्रजा तथा राजा!
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:09 pm: |
| 
|
सरासर अन्याय चालू असता, मुर्दाडासारखे बसून रहाणे म्हणजे भेकडपणा नाहीतर काय? शिवाय ते गुंडांचे राज्य, तिथे राहून तरी काय तुम्ही नि:स्वार्थीपणे रहाता का? लाच खाणे, कर चुकवणे, असले प्रकार केल्याशिवाय तुम्हाला साधे जगतासुद्धा येत नाही! त्यातून आता पैशासाठी कनिष्ठ दर्जाची कामे स्वीकारून परत 'आम्ही Global झालो' असा टेंभा मिरवताच ना! त्यात काय नि:स्वार्थीपणा, शौर्य, आहे?
|
Shravan
| |
| Tuesday, October 16, 2007 - 4:18 pm: |
| 
|
झक्की, तुमची हे म्हणण्यापाठीमागची चीड लक्षात येते आहे पण परिस्थिती इतकीही वाईट नाही भारतात. काही लोक त्यांच्या भोवतालची परिस्थिती याच system मध्ये राहून बदलवू शकले आहेत. उदाहरणे थोदी असतील पण उमेद वाढवणारी जरूर आहेत.
|
रामायण हे कल्पनाविलास नाही यासाठी बरेच तर्क,पुरावे दिलेले आहेत पण ते एक महाकाव्य आहे याला काहिच तर्क नाही पण शेंडेन अगदी confidence नी सांगत आहेत की हे महाकाव्य आहे. ते महाकाव्य का आहे याला एकही तर्क त्यांनी दिलेला नाही. आणि हे लोक स्वत्:ला बुध्दिप्रामाण्यवादी वगैरे समजतात. जर रामायण हे महाकाव्य असते तर वाल्मिकिंनी हे महाकाव्य आहे अस म्हणुन पुर्ण credit घेतले असते ना!!पण या गोष्टी सत्य आहेत असे सांगुन त्यांनी स्वत्:चे credit कमी कशाला करुन घेतले असते??दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन काळात जेंव्हा communication दळणवळण अवघड होते तेंव्हा भारत या महाकाय देशातिल उत्तरेपासुन दक्षिणेपर्यंतचे सर्व लोक एखादी काल्पनिक घटना झाली असे कसे मानु लागतिल?? भारतात अनेक ठिकाणि मंदिरे आहेत जिथे रामाने हे केले ते केले अशा गोष्टी सांगितल्या जातात. जर राम तिथे गेलेच नसतिल तर त्या लोकांनी वाल्मिकिंच्या सांगण्यावरुन या गोष्टी मानल्या असत्या का?? त्या ठीकाणावरचे लोक वाल्मिकिंना म्हटले असते की आम्ही पिढ्यानपिढ्या इथे रहातोय पण राम नावाचा कोणी इथे आलाच नाही त्यानी इथे लीला दाखवल्याच नाहित मग तुम्ही बाहेरुन आलेले आम्हाला कसे काय सांगता की इथे हे झाले म्हणून???तिसरी गोष्ट म्हणजे जेंव्हा लिखाणाची साधने नव्हती तेंव्हा पुर्ण भारतवर्षातील लोक एखादे महाकाव्य पिढ्यानपिढ्या पाठ करण्यात वेळ आणि श्रम घालवतील याला काहि लॉजिक आहे का??
|
Lukkhi
| |
| Tuesday, October 16, 2007 - 5:24 pm: |
| 
|
सरासर अन्याय चालू असता, मुर्दाडासारखे बसून रहाणे म्हणजे भेकडपणा नाहीतर काय? शिवाय ते गुंडांचे राज्य, तिथे राहून तरी काय तुम्ही नि:स्वार्थीपणे रहाता का? >> सगळे तसे रहात नाहीत. जाऊ द्या ना... पळून गेलेल्या लोकांनी या विषयावर बोलण्यात काय पुरुषार्थ आहे? उगीच प्रत्येक BB त विषयांतर केलेच पाहिजे का? लोकं मुद्देसुद बोलतात तर त्यांना बोलू द्या, फाटे फोडू नका
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 8:58 pm: |
| 
|
जे मुर्दाडासारखे स्वस्थ बसत नाहीत किंवा बदल घडवून आणत आहेत त्यांच्या साठी सदिच्छा, त्यांचे अभिनंदन आणि त्यांची मी माफी मागतो, त्यांना उद्देशून मी हे बोललो नव्हतो. पण इथल्या (म्हणजे मायबोलीवरच्या) बातम्या अगदी एकांगी असतात. कुठे चांगले झाल्याचे वाचण्यातच येत नाही, उलट दररोज सरकारने काहीतरी नवीनच आचरटपणा केलेला दिसतो.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, October 17, 2007 - 4:49 am: |
| 
|
झकास, तुम्ही दिलेली pdf फ़ाईल एकदम झकास!
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:13 pm: |
| 
|
रामायण हे इतिहासाला दिलेले काव्यरुप म्हणायचे का ? शिवाजी महाराजांवरही काव्य आहेच कि. पण रामायणाच्या बाबतीत, काहि सत्यांचा कालांतराने विपर्यास झाला असेल, याची शक्यता नाही का ? तिथे जी वानरसेना आहे, ती म्हणजे त्या काळात दक्षिण भारतात असलेली एखादी मानवी जातच, असणार ना ? रामाच्या तुलनेत ते बुटके, कुरुप व काळे असतीलही, पण ते वानर खासच नसणार. वानर जर सेतु बांधु शकत असतील, तर आजच्या काळात साधा निवारा का नाही बांधु शकत ? वानरे थंडीत कुडकुडतात, पावसात भिजतात, पण चार फांद्या आडव्या करुन एखादा निवारा बांधावा असे काहि त्याना सुचत नाही. हा केवळ एक मुद्दा. मला रामायणातल्या अनेक बाबी पटत नाहीत. त्यावर मी यापुर्वीही मते मांडली होती, व मला समजावुन सांगण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यावेळीही मला ते मुद्दे पटले नव्हते. रामायणाचेच श्रीलंकेतले व्हर्जन मी माझ्या मित्रांकडुन ऐकले आहे. त्यात रावणाचेच कौतुक आहे. त्याकाळी आवडलेली स्त्री पळवुन आणणे, यात काहिच गैर समजले जात नसे. उलट त्याने तिच्यावर जबरदस्ती केली नाही, याचेच त्याना कौतुक वाटते. तसेच त्या लोकाना शुर्पणखेच्या अपमानाची पण चीड येते.
|
एका वाचकाचे मत

|
तिथे जी वानरसेना आहे, ती म्हणजे त्या काळात दक्षिण भारतात असलेली एखादी मानवी जातच, असणार ना ?>>> दिनेश मलाही तसेच वाटते. पुराणात आलेल्या काही गोष्टी जसे नाग जमात, अस्वल जमात, वानर हे बहुतेक त्या मानंवाचे झेंडे असतील व त्यावरुन त्या सेना म्हणुन ओळखल्या गेल्या असतील असा तर्क करायला काही हरकत नसावी. नाहीतर खांडववनात कृष्णार्जुनाने नागांना जाळले असे म्हणतात माझ्या मते खांडववनातील नाग झेंडा असनार्या माणसांना त्यांनी हारविले असेल. मागे एका थेअरी नुसार राम हा आर्य व अनार्यांना म्हणजे द्रवीडीयन्स ला हारविन्यासाठी तो दक्षिनेत गेला. अशा अनेक थेअर्या रामा बाबतीत आढळतात.
|
Saurabh
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:09 pm: |
| 
|
अगदीच रहावले नाही म्हणून... दिनेशनी वर म्हटल्याप्रमाणे जर खरेच श्रीलंकेत रामायाणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात असेल (रावण नायक मानून), तर ते (वेगळी बाजु मानणारे) 'काव्य' कोणी लिहिले आहे असे तिथले लोक मानतात? इतिहासातील घटना नेहेमीच सरहद्दीच्या दोन बाजुला दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातुन पाहिल्या जातात हे उघड आहे. पण महाकाव्याचेही तसेच व्हावे? फारच इंटरेस्टींग...
|
Slarti
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:23 am: |
| 
|
केदारचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. अर्थ लावताना काळाचा संदर्भ घेणे आवश्यक आहे इथे. महाकाव्याच्या इतिहासासारख्या दोन आवृत्ती असतील तर हा मुद्दा 'तो इतिहास आहे' या दाव्याच्या पुष्ट्यर्थ वापरता येईल.
|
Deemdu
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:26 am: |
| 
|
रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत. ती इतिहासाशी संबंधीत आहेत. पण कित्येक गोष्टी ह्या काही कारणाने कवी कल्पनेतुन लिहील्या गेल्या असाव्यात अस मला वाटतं जसं की कुंती आणि माद्रीला झालेले पांडव हे खर तर त्या काळी सर्रास चालणार्या नियोग पद्धतीने झालेले आहेत. पण नंतरच्या काळात जश्या समाज संकल्पना बदलत गेल्या तेंव्हा ह्या लोकांना व्यभिचारी ठरवल जाऊ नये म्हणुन मग दुर्वासांनी दिलेल्या मंत्राची काल्पनीक गोष्ट घुसडण्यात आली. किंवा भिमाला जेंव्हा दुर्योधनाने विष देऊन नदीत टाकल तेंव्हा तो नागलोकात गेला म्हणे, तर नागालॅंड आजही अस्तित्वात आहे, आणि ती जागाही नागालॅंड पासुन बरीच जवळ आहे, अशी प्रमाणं आहेत. हीच गोष्ट रामायणाच्या बाबतीतही खरी आहे. तसे तर man eaters आजही आहेतच की, त्यांनाच पुर्वी राक्षस मानायचे. रामायणाच्या बाबतीत तर मी ऐकलेली गोष्ट आशी आहे की, राम हा मुळात त्याच्या पुर्ण आयुष्यात नर्मदा नदी पार करुन गेला नव्हता. ह्याचा अर्थ राम मध्य प्रदेशाच्या पुढे आलेला नाही(ह्याला म्हणे प्रमाण आहेत मला माहीत नाहीत), मग श्रीलंका तर लांबच. शिवाय भौगोलीक अभ्यासानुसार त्या सेतुचे वय हे रामायणाच्या कित्येक वर्ष आधीचे आहे. खर खोट रामच जाणे.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:24 am: |
| 
|
रामायणात अश्या अनेक कथा आल्या आहेत. उदा मारुतीने एक पर्वत उचलुन आणला त्याची कथा बघा. लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यानंतर, त्याला कोणीतरी एका डोंगरावरची वनस्पति आणायला सांगितले असेल. त्याला ती वनस्पति ओळखु न आल्याने किंवा किती लागेल हे न कळल्याने, त्याने एक भला मोठा भारा, आणला असेल. त्यावेळी त्याला कुणीतरी म्हणाले असेल, अरे तु जणु अख्खा पर्वतच उचलुन आणलास की. त्या उद्गाराने पुढे काय रुप घेतले, ते आपण बघतोच. अश्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने रामायणाकडे बघणे गरजेचे आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:32 am: |
| 
|
सौरभ, रामायणाचे अनेक व्हर्जन्स आहेत. त्या काळात लिखाणाची साधने नव्हती, त्यामुळे पाठांतराला पर्याय नव्हताच. अश्या मौखिक रितीत, प्रत्येकाने स्वतःचा मालमसाला घातला असेलच.
|
मारोती पर्वतावरुन ओषधी काही तासात आणल्या हे सत्य असावे. अर्थात तो स्वत उडत नसेल तर त्या क्डे पण विमान असेल. एका आकडेवारी देनर्या पुस्तकाप्रमाने ( त्यात साधारण महाभारत व रामायनातील तारखा सांगीतल्या होत्या) जर ताशी ६०० मैल वेगाने श्रिलंके पासुन हिमालयाकडे गेले तर हे सहज साध्य आहे. ( आजची विमाने ताशी (१००० किमी ने) जातात. परत एकदा विमाने होते की नाही वैगरे मुद्दा गोण कारन तो तेथे जाउन आला. तेच मारोतीने समुद्र पार करन्याबाबत पण म्हनता येईल. त्याकडे शक्ती नसेल तर तो एक पायलट असेल. व या दोन्ही वेळेस त्याने मदत केली म्हणुन तो शक्तीमान वानर ठरला. ( i know हा कल्पनाविलास होउ शकेल पण काहीतरी कल्पना गृहीत घरल्या शिवाय सत्या कडे जाता येत नाही) त्याच विषयावर थोडेसे. ( राम हा आर्य पकडला तर) आर्य आक्रमन वा हडप्पा संकृती व त्याचा आधीचा इतिहासाचा अभ्यास केला असता अनेक मजेदार गोष्टी आढळतील. जसे इंद्राने अनेक दिवस लढुन एका राक्षसाचा पराभव केला असे पुरानात आहे. हडप्पा सारख्या साइट चे उत्खनन करता असे आढळले की तिथे पुरा पासुन संरक्षन करन्यासाठी एक मोठी भिंत होती. (चायना वॉल सारखी). जर थोडा तर्क लावला तर असे म्हणता यिल की इद्राच्या सैन्याला ति लवकर पाडता येत न्हवती. ( उल्लेखात असे आहे की इद्राला रांत्र दिव्स जागरन करावे लागले, मादक द्रंव्याचे सेवन करावे लागले ) व साधरण एका महीन्यानंतर ती भिंत पडली व पुरामुळे ते गाव नश्ट झाले व ती मुळ संस्कृती नष्ट झाली. हडप्पा संकृती ही तत्कालीन आर्यंचा पेक्षा जास्त सुधारलेली होती पण त्यांचा कडे घोडे नसावेत ते मागासलेल्या आर्याकडे होते. हडप्पा कालीन लोकांचा देव बैल होता पण नंतर आर्यानी गाई ला देव केले पन कदाचित थोड्या विरोधा नंतर परत नंदी ही कन्स्पेट जन्माला आली असावी. (बेस आर्यन इन्व्हेजन)
|
परत आपल्या limited senses आणि limited बुध्दीच्या द्वारे गोष्टी explain करायचा प्रयत्न केला जात आहे. हे असे तर्क अमाप केले जाउ शकतात. हे अस झाल असेल, ते तस झाल असेल वगैरे. त्याचा काहिच उपयोग नाही. या अशा पध्दतिनी गोष्टी explain करुन देवाच्या महान शक्तिंना अतिशय कमी प्रमाणात असलेल्या मानविय शक्तिच्या स्तरावर आणले जाते. हे असले प्रकार करायची काहिच गरज नाही. देवानेच हे गुरुत्वाकर्षण आणि इतर नैसर्गिक नियम केलेले आहेत त्यामुळे तो ह्या नियमांच्या वर आहे. आणि त्याच्या कृपेने त्याच्या भक्तांनाही अशा शक्ति प्राप्त होऊ शकतात. जर देवही मानवाच्याच इतका शक्तिमान असेल तर त्याला देव का म्हणायचे???राम एक साधासुधा माणुस असेल तर त्याची पुजा का करायची???आपले senses फ़ारच मर्यादीत आहेत आपण फ़ार दुरच बघु शकत नाही फ़ार हळु आवाज ऐकू शकत नाही आणि आपल्या बुध्दिलाही यामुळेच मर्यादा आहेत. हनुमान आकाशात कसा काय उडाला असेल हे आपल्या बुध्दिला समजुच शकत नही,वानरांनी सेतु बांधला तर ते घर का बांधत नाहित. अहो पण ती साधी सुधी वानरे नव्हती. आपण अनेक वेळा निरनिराळ्या चमत्कारांबाबत ऐकतो. बर्याच वेळा हे चमत्कार म्हणजे हातचलाखी असते. पण सर्वच हातचलाखी असते असे आपण म्हणु शकत नाहि. जर माणसे असे चमत्कार करू शकतात तर सर्वशक्तिमान देवाने त्याहुन मोठे चमत्कार केल्यास त्यात काय नवल??ख्रिश्चन धर्मिय तुम्हाला सांगतिल की ख्रिस्ताने काय काय चमत्कार केले वगैरे. मग आपल्याला आपल्या धर्मातिल गोष्टी जशा आहेत तशा सांगताना का कमीपणा वाटतो???
|
Tiu
| |
| Thursday, October 18, 2007 - 11:17 pm: |
| 
|
आपण अनेक वेळा निरनिराळ्या चमत्कारांबाबत ऐकतो. बर्याच वेळा हे चमत्कार म्हणजे हातचलाखी असते. पण सर्वच हातचलाखी असते असे आपण म्हणु शकत नाहि. >>> मुळीच नाही!!! ती सर्व हातचलाखीच असते. फरक इतकाच की जादुगार आपल्याला सांगतो की ती हातचलाखी आहे आणि बुवा बाबा लोक ती हातचलाखी चमत्कारांच्या नावावर खपवतात. फक्त तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या limited senses आणि limited बुद्धी मुळे आपल्याला ते समजत नाही आणि आपण त्याला दैवी चमत्कार वगैरे म्हणुन मोकळे होतो. सत्यसाईबाबा हवेतुन हात फिरवुन लाडु वगैरे काढतात म्हणे! सामान्य लोकांसाठी! मंत्री संत्री, पंतप्रधान अश्या लोकांसाठी हवेतुन घड्याळं काढतात! Branded!!! वानरांनी सेतु बांधला तर ते घर का बांधत नाहित. अहो पण ती साधी सुधी वानरे नव्हती. >>> मग कुठल्या प्रकारची वानरे होती? Rather ती वानरे नसावीतच. वानरासारख्या जगणार्या लोकांकडुन सेतु बांधुन घेतला असेल. ज्ञानेश्वरंनी रेड्याकडुन वेद म्हणवुन घेतले तसं काहितरी! ही theory सुद्धा सेतु रामाच्या काळात बांधला गेला असेल हे मान्य केलं तर... नाहीतर तो पण एक वादाचाच मुद्दा आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|