|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 05, 2007 - 11:51 pm: |
| 
|
कुणी बेकार गायले तरि सगळे हाजि हाजि करत १० मार्क देणार...शिवाय प्रत्येक एपिसोड्मधे स्वताच गात सुटणारा फ़ुटबॉल बप्पिदा. >>>> बर्याचदा असे वाटते की मोली ला आज -5 मार्क (वजा पाच) मिळतील तेव्हा तो भप्पी लगेच स्टेज वर उठुन येतो व तिला खुप चांगली गायलीस असे म्हनतो. अमानत खरच ऑर्केस्ट्रा सिंगर वाटतो. वर त्याचा गाण्यात जानच वाटत नाही. आता खरतर गाणे संपुन आपाआपल्या स्पर्धकांना वाचविने चालु आहे. चिन्या बरोबर रोज रोज ते रडन अन सिप्थथी टुर काढन याचा कंटाळा आला आहे.
|
Yog
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:29 am: |
| 
|
अरे वा! मला वाटत zee, idol, voi वाल्यानी इथल्याच जाणकाराना judge म्हणून बोलवाव.. किमानपक्षी "मि ऐकलेली चूकीची गाणी" फ़ेम विनूभाऊना तरी बोलवाच.. असो. बाकी रद्दड commercial मसाला वगळता बरीच चान्गली गायकी ऐकायला मिळते. मुसर्रत च "सावरे तोरे बिन जिया" (बहुदा जोगिया रागातले) मनात भरून राहिल आहे. सूर कमी जास्ती लागण प्रत्त्येकाच असत पण मुसर्रत च्या गाण्यातील expression लाजवाब आहे, सुफ़ी गाण्यात तो बाप आहे यात दूमत नसावे, in that regrads he is class apart! The best thing about him in my observation is he does not care about competition.. he simply enjoys singing from heart, and i think thats the key. अशा स्पर्धान्मधे खर तर male and female voice मधे स्पर्धा होवू शकत नाही, as they are naturally different and both have unique instincts , पण या स्पर्धेत final राजा व अनिक मधे होईल असे वाटते. बाकी चर्चा इथले "जाणकार" करतीलच.
|
Zelam
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:25 pm: |
| 
|
चिन्या तुमचे rules एकदम सही आहेत! प्राजक्ता, I second . निहीरा खरंच मस्त गायची. गाण्यात तिची तयारी जबरदस्त होती, पण तिच्यात so called performance नसल्याने ती जिंकली नाही. आता संगीत का विश्वयुद्ध घ्या नाहीतर star voice घ्या, गाण्याबरोबर performance ला म्हणजे तुम्ही किती हाहाहीही करून गाता त्याला महत्त्व आहे. मग संगीताची स्पर्धा का म्हणतात कुणास ठाऊक? star voice जेव्हा सुरु झाला तेव्हा स्पर्धक खरंच sincerely गायचे, पण आता मात्र दर्जा पार घसरलाय, तरी हे judges हे कौतुक करत असतात. सारेगम मध्ये राजा आवडतो मला, त्याच्यातच थोडं potential वाटतं. बाकी १५ ऑगस्ट काय किंवा judges चे वादविवाद, नमस्कार, चमत्कार, हिमेशची रोटीची काळजी, अभिजीतचं तोशीविषयी उफाळून जाणारं प्रेम ही फक्त नाटकं आहेत लोकांना hook up करायची. मध्यंतरी अलका याग्निक star voice मधून बाहेर पडली होती ते पण नाटकच वाटतं मला कारण बरोबर तेव्हाच ती कुमार सानू बरोबर programs करत फिरत होती आणि नं तर म्हणे contestant च्या प्रेमामुळे ती परत गेली. It's channel strategy and it works because this is how we keep the issue floating .
|
Antara
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:38 pm: |
| 
|
अरे मला हे कळत नाही त्या मुस्सरत ला पॉप वगैरे न का जमेना, काय प्रोब्लेम आहे? तो त्याच्या स्टाईल मधे उत्कृष्ट गातो ना मग झाले तर. उद्या म्हणाल भीमसेन जोशीना पण कव्वाली का नाही जमत. परवा म्हणाल नुसरत फ़तेह अली, गुलाम अली पॉप नाही गात. याचा अर्थ ते बेकार का? उगीच आपलं पूर्वग्रहदूषित मते तुम्हीच बनवताय. खरे रसिक असतील तर फ़क्त गाण्याचा आनन्द घेतील बाकिच्यना गाणे कळत तरी नाही किन्वा फ़क्त पोलिटिकल विचार करत आहेत. काय सन्तु कस्काय
|
Deepanjali
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:27 pm: |
| 
|
Lol अंतरा मी अगदी हेच म्हणणार होते !! तसे तर बर्याच संगीत प्रेमींच्या मते लता मंगेश्कर सुध्दा versatile नाहीये , कारण ती rock-pop-item numbers वगैरे गात नाही , तरीही ती भारताची शान आहेच ना आशा भोसले सारखी gifted versatile singer ही एखादीच असते .. म्हणून प्रत्येक singer कडून तेच कसे expect करणार ? जे मुस्सरात गातो त्यात तो best आहे .. इतर काही त्याच्या कडून ऐकायची इच्छा ही नाही , सूफ़ी ची च जादू खूप आहे ! 
|
Chinya1985
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:56 pm: |
| 
|
अंतरा,तेच तर म्हणन आहे की माझ. तो चांगला सुफ़ी गायक आहे यात वाद नाहि पण हा शो सुफ़ी गायक शोधण्यासाठि नाहि. इथे पार्श्वगायक शोधायचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ज्याला सर्व प्रकारची गाणी म्हणता येतात तोच चांगला पार्श्वगायक म्हणुन भविष्यात पुढे येउ शकतो. भिमसेन जोशि, नुसरत फ़तेह अलि यांच्या मार्गाने त्याने जाव. हे लोक काहि पार्श्वगायक म्हणुन प्रसिध्द नाहित. यांनी स्वत्:ची वेगळी ओळख बनवली ती काहि पार्श्वगायकीतुन नाहि. म्हणुन मी लिहिले होते की त्याने स्वत्: गाणि बनवावी व indipop मधे try कराव. जुनुन पण सुफ़िच गातात रॉक स्टाईलनि आणि भरपुर प्रसिध्दही आहेत. या शोमधे जर मुसर्रत जिंकला तर तो इतरांच्या आधिच गायब होइल कारण सध्याच्या फ़िल्म म्युझिकमधे त्याच्या स्टाईलला फ़ारशी जागा नाहि. याच मताने विशाल या judge नी पण हेच म्हटले होते की versatile गायक शोधायचा आहे त्यामुळे एका स्टाईलची गाणि म्हणु नका पण दरबार आणि हिम्या एकमेकांच्या शिष्यांना चांगले मार्क देतात आणि उचलुन धरतात त्यामुळे विशालला पण आपला stand बदलावा लागला. मला तर विशाल शेखर आणि लाडु बप्पिच चांगले judge वाटतात कारण हिम्या आणि दरबार आपल्याच लोकांना पुढे आणायचा प्रयत्न करतात.
|
Deepanjali
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:36 pm: |
| 
|
या शोमधे जर मुसर्रत जिंकला तर तो इतरांच्या आधिच गायब होइल कारण सध्याच्या फ़िल्म म्युझिकमधे त्याच्या स्टाईलला फ़ारशी जागा नाहि. याच मताने विशाल या judge नी पण हेच म्हटले होते की versatile गायक शोधायचा आहे त्यामुळे एका स्टाईलची गाणि म्हणु नका पण दरबार आणि हिम्या एकमेकांच्या शिष्यांना चांगले मार्क देतात आणि उचलुन धरतात त्यामुळे विशालला पण आपला stand बदलावा लागला. मला तर विशाल शेखर आणि लाडु बप्पिच चांगले judge वाटतात कारण हिम्या आणि दरबार आपल्याच लोकांना पुढे आणायचा प्रयत्न करतात. <<<<काय सूफ़ी style आपल्या कडे popular नाही ? ऐ . ते . न ! आपल्या कडेही नुसरत फ़तेह अली , राहत , अतिफ़ अस्लम भरपूर लोकप्रिय आहेत आणि आपला कैलाश खेर पण ! त्यातले नुसरतजी अता हयात नसले तरी इतर तिघे Hindi films साठीच गातात आणि त्यांची गाणी प्रचंड popular पण आहेत . अर्थात सध्या typical filmy गाणारे जास्त आहेत आणि म्हणूनच मुस्सर्रत सारख्या गायकाची जास्त गरज आहे , असं माझं मत . स्पर्धे विषायी म्हणायचं झालं तर जो पर्यंत public voting आहे तोपर्यंत कुठलाही judge काय म्हणतो याला काहीच अर्थ नाहीये , विशाल मलाही judge म्हणून सर्वात चांगला वाटतो आणि हिमेश ड्रामेबाज ! पण मुस्सरात च्या बाबतीत मला चक्क हिमेश चं पटलं . असो , versatile singer शोधणे हा criteria काही चूक नाही पण आधी कुठे स्पर्धेच्या rules मधेही तसे म्हंटले नव्हते आणि तसेच असते तर मुस्सरात चे मूळात selection सुध्दा झालेच नसते भारतात येणय पूर्वी च्या audition मधे ! सुरवातीला जेंव्हा मुस्सरात वरून वादावादी झाली तेंव्हा या competition मधे राजा आणि अनिक सारखे singers अजुन आलेच नव्हते . मुस्सरात हा सर्वात strongest समजला जायचा आणि तो गेला हिमेश कडे, असे असताना इतर judges ना स्वत : च्या singers ना promote करण्या साठी मुस्सर्रत चे पाय ओढणे भाग होते म्हणून मुस्सर्रत वर सगळ्यांनी हल्ला चढवला , बाकी काही नाही अगदी शेवटी एकलव्य घराण्यातून राजा विशाल कडे आला , अनिक तर अजुन खूप उशीरा आला . सर्वात versatile singer हिमेश कडे गेल्यामुळे विशाल ने ही त्याचा stand बदलला , कारण राजा सर्वात popular असला तरी सुध्दा तो पण काही सगळ्या प्रकारची गाणी गात नाही . सगळे commercial आहे एकदम मान्य पण जर हिमेश च्या ड्राम्यामुळे खरच त्याचे contestants पुढे जात असतील तर कदाचित त्याच्या दृष्टिने ते योग्य च आहे , त्याचे काम च आहे ते . मागे एकदा जेंव्हा मुस्सर्रत सारखा bottom मधे यायचा नेमका त्याच सुमारास तो lyrics विसरला तर हिमेश ने त्याला परत एकदा गाणं म्हणायला सांगितलं , ते ही without music! आणि मुस्सर्रत ने ते अर्थातच उच्च गायलं , हिमेश ने indirectly लोकांना दाकह्वून दिलं कि without music सुध्दा तो किती flawless आहे . थोडक्यात तो जो ड्रामा करतोय तो आपल्या डोक्यात जातो , पण कदाचित त्याच्या contetsnats ना खरच फ़ायदा होतोय असं दिसतय ! या आठवड्या मधे अनिक top ला आणि मुस्सर्रत no.2 आहे म्हणे !
|
Tiu
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:14 pm: |
| 
|
चिन्या... exactly! मी पण हेच लिहिणार होतो! अंतरा...काहिही reasoning आहे हे. तु ज्या लोकांची नावं घेतली आहेत ते सगळे त्यांच्या genre मधे उत्कृष्ट गातात यात वाद नाही. ह्या लोकांमधे स्पर्धा होउ शकत नाही...आणी तशी स्पर्धा झाली तर compariosn होणारच. म्हणजे उद्या भिमसेन जोशी, गुलाम अली, सोनु निगम आणी राहत फ़तेह अली खान ह्यांच्यात स्पर्धा झाली तर लोक म्हणणारच की गुलाम अली चांगला गातो पण classical काय त्याला जमत नाही, किंवा भिमसेन जोशी classical उत्तम गातात पण सुफी त्यांना गाता येत नाही...त्यामुळे तुझ्या ह्या मुद्द्याला काही अर्थ नाही! मुसर्रत सुफी उत्तम गातो याबद्दल कुणाचच दुमत नाही, नसावं. त्याच्याइतका उच्च सुफी गाणारा दुसरा कुणी नसेल, त्याला industry मधे खुप चांगलं future असेल, एकदम मान्य. पण इथे संगीत स्पर्धा चालु आहे. त्यमुळे स्पर्धा जिंकायला सगळ्या प्रकरची गाणी गाता यायला हवीत. सुफी singer शोधायचा तर सगळ्या सुफी गाणार्यांमधे स्पर्धा घ्यायला हवी.
|
Chinya1985
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:29 pm: |
| 
|
अंतरा,मुसर्रत काहि फ़ार ग्रेट नाहि. सुफ़ि चालत तर मग भारतिय classical संगित गाणारे जे पुर्विच्या सारेगम मधे असत तसे आजकाल का नसतात??मग क्लासिकलवाले पण घ्याना!!सुफ़ि गाणि आपल्याकडे चालत नाहित अस मी कुठेच लिहिलेल नाहि. नीट पोस्ट वाच. माझ म्हणन इतकच की या सध्याच्या म्युझिकच्या जगात मुसर्रतसाठि सुफ़ी गाणी कोन लिहिणार आहे??अतिफ़ इस्लाम,जुनुन यांच्यासारख त्याने कराव हे लोक स्वत्: गाणि बनवतात आणि आल्बम रीलीझ करतात. तस करता मुसर्रतला येत असत तर त्याने ते केल असत. कैलाश खेर सुफ़ि स्टाईलचिच गाणि चांगलि म्हणतो असे नाहि इतरहि गाणि म्हणतो. दुसर म्हणजे तु जे विशाल हिम्याबद्दल लिहिलय ते मला माहित नाहि.मी फ़क्त २ महिने हा शो बघितला. तेन्व्हा राजा होता,अभिजित आणि अनिकच्या एंट्रीचा वाद चालु होता. tiu बरोबर!मला मुसर्रतबाबत सांगता येत नाहि कारण तो जी सुफ़ी गाणि म्हणतो ती मला माहितच नाहित त्यामुळे तो चांगला गातो की चुका करतो हे कळतच नाहि. तरि मानु कि सुफ़ी भारि गातो.पण जी इतर गाणि त्याने म्हटली ति काहि धड नाहि म्हटली त्याने.
|
Arch
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:57 pm: |
| 
|
मला सूफ़ी आवडत नाही. ऐकायला कर्कश्श वाटतात. जशी आपली मेहेंदी नाजूक आणि कलाकुसरवाली वाटते आणि अरेबीक मेहेंदी बटबटीत वाटते तस्साच प्रकार सूफ़ी गाण्यात आणि classical मध्ये वाटतो.
|
राजा हसन च्या fans साठी उद्याचा episode चुकवु नका , तिथल्या forum चे हे update: Raja Hasan, a very strong challenger of Saregamapa Challenge 2007 is on cloud nine these days.. Firstly Raja is going to give a terrific performance by singing Kishore Kumar’s song Aake Sidhi Lagi Dil Pe Katariya.. O Sawaria.. on Friday - Comedy Songs Theme.. He is going to come on the stage in both male and female attire and is going to sing the song in both male and femal voices.. (Should be fun to watch..) But the best part is that Shankar, Ehsaan and Loy have singed Raja for their next movie.. It will be announced on Saregamapa on Friday…
|
Tiu
| |
| Friday, September 07, 2007 - 6:57 pm: |
| 
|
But the best part is that Shankar, Ehsaan and Loy have singed Raja for their next movie.. >>> मला आधी शंकर एहसान लॉय हा एकच माणुस वाटायचा...
|
Prajaktad
| |
| Friday, September 07, 2007 - 6:59 pm: |
| 
|
But the best part is that Shankar, Ehsaan and Loy have singed Raja for their next movie.. It will be announced on Saregamapa on Friday… >>>>> अरे वा!तस असेल तर गुड ब्रेक फ़ॉर गुड सिंगर... राजाच सिंगिंग मला आवडत.. ( more than mussarat ) मला आधी शंकर एहसान लॉय हा एकच माणुस वाटायचा... >>>मला पण,.. 
|
Chinya1985
| |
| Saturday, September 08, 2007 - 7:15 am: |
| 
|
काल कोण बाहेर गेला???आता कोणकोण उरल आहे???
|
Kedarjoshi
| |
| Saturday, September 08, 2007 - 12:08 pm: |
| 
|
मोली गेली एकदाची. मुस्सरत काल ओरडत होता. बापरे भयानक किंकाळने होते त्याचे. फक्त राजा, सुमेधा व ऑनीकचे गाणे लक्षात राहान्यासारखे झाले.
|
Tiu
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:46 pm: |
| 
|
कालच्या performance नंतर मुसर्रत टिकणं अवघड आहे... कसला पडला तो काल... रेमोचं गाणं नुसरत style मधे म्हणे! आवरा!!!
|
Maitreyee
| |
| Saturday, September 08, 2007 - 3:49 pm: |
| 
|
मुस्सरत ला कालची थीम सूट नाही झाली अजिबात राजा अन ऑनिक नी गाणी छानच म्हटली पण वाटले तेवढे rocking performances नव्हते! त्यांना कपड्यांचं टेन्शन आलं वाटत भप्पीने तर मौलीवरच्या ड्राम्यातून indirectly suggest केले तो स्वत्: कोणत्या चष्म्यातून पहतो ते! मौली गेल्यावर सारेगम चा TRP काय राहणार म्हणे! पूनम अन सुमेधा पण काही खास नाही. आयडॉल मधे अमित पॉल ची गाणी सही झाली काल. इमॉन पण बर्यापैकी.
|
Deshi
| |
| Saturday, September 08, 2007 - 4:12 pm: |
| 
|
मुस्सरत ला कालची थीम सूट नाही झाली अजिबात >> त्याला सुफी शिवाय कोणतीही थिम सुट होत नाहीत. सगळे गाणे तो ओरडुन म्हणतो.
|
Deepanjali
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:22 pm: |
| 
|
आनिक आणि राजानेही म्हणावी तशी धमाल नाही केली किती ते गंभीर चेहेर्यानी गाणी म्हणायाची , ते पण पडोसन मधली !! आणि सगळ्यांनी पडोसन मधलीच गाणी काय घेतली ? मुली सगळ्याच average गायल्या .. पूनम ला का over rate केलय ?? ती कधीच eliminate होयला हवी होती , बिचारे हरप्रीत - जुनैद - अभिजीत किती तरी चांगले होते तिच्या पेक्षा ! मोउली नंतर तिलाही फ़ार डोक्यावर घेतले judges नी !! झूठ बोले कौवा काटे काय विनोदी गाणं आहे ? काल ' इना मिना डिका ' सारखी superhit गाणे का नाही घेतले कोणी ? किंवा ' पापे बचालो तुसी '', चाल बाझ मधले ' उसने मेरा नाम लिया ' सारखी गाणी घ्यायला scope होता . सुमेधाला काय वेड्या सारखा जॅपनीज ड्रेस दिला ? हवाईयन द्रेस का नाही दिला ? काल सगळेच फ़सले विनोदी थीम मधे !
|
Prajaktad
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:41 pm: |
| 
|
काल सगळेच फ़सले विनोदी थीम मधे ! >>>> अगदी! अगदी! सगळ्यात जास्त पंचाईत मुस्सरतची झाली...त्याने गायच्या आधिच हिम्याने फ़िल्डिंग लावायला सुरवात झाली..मला तर वाटल तो म्हणेल " ये मुस्सरत का ज़ॉनर नही तो plz! क्या मै उसके बदले गाउ??... किंवा ऑनिक २ गाणी गाईल " सगळ्यांमधे राजाच जरा चांगला गायला..सगळेच प्रचंड अवघडले होते...मनमोकळेपणे कुणीच गायले नाही.मौली बाईंना उसगावचा रस्ता दाखवला हे एक बरे झाले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|