|
Aschig
| |
| Monday, August 27, 2007 - 7:00 am: |
| 
|
slarti, for your Q 3-5, one will have to go in to much more detail. May be sometime during the week ...
|
Slarti
| |
| Monday, August 27, 2007 - 4:29 pm: |
| 
|
च्यायला, एका प्रश्नाचे उत्तर मिळाले तरी पुढे अनेक प्रश्न उभे ठाकतात हे खरे, पण ते सुटू शकतात, सुटले आहेत, सोडवले जात आहेत. त्यामुळेच असे करणे खुळा आशावाद ठरत नाही. एका उत्तरातून पुढे अनेक प्रश्न उभे राहणे ही वरकरणी अज्ञानाची अथवा मर्यादांची खूण वाटते, पण वास्तविकतः ती ज्ञानचक्षूंचा आवाका निरंतर वाढत जात असल्याची खूण आहे. >>> जेंव्हा रसायन शास्त्रात Ground work झाल्यावरही शास्त्रज्ञाना वाटले की बस आता जगाचे रहस्य उलगडणार सम्पुर्ण विश्वाची रचना केवळ Chemical Equation मधेच आहे पण त्यात थोडी प्रगती झाल्याबरोबर त्यातील मर्यादा ठळकपणे दीसुन आल्यात अशीच गत सगळ्या शास्त्रांची झालेली आपण पहातोय. आणी यापेक्षा काही वेगळ पुढेही होण्याची शक्यता नाही. ही जी तथाकथित मर्यादा आहे ती विज्ञान ज्या पद्धतीने ज्ञानसंवर्धन करते त्या पद्धतीतून उद्भवली आहे. चुकीचे विचार, संकल्पना प्रगतीनुसार दुरुस्त होतात. तो चुकीचा विचार रद्द होऊन नविन अजून योग्य विचार निर्माण होतो, हे सतत होत राहते, हा प्रवास विज्ञानाचा गाभा आहे. या प्रकारे ज्ञान मिळवणे याला मर्यादा म्हणायचे की शक्तीस्थळ हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. वेदांनी प्रवास पूर्ण केल्याने तिथे एका झटक्यात ज्ञान मिळते, तसे विज्ञानाच्या मार्गाने मिळत नाही ही मर्यादा. पण या पद्धतीमुळेच सतत ज्ञानवृद्धी होते, सतत 'पुढे' जात राहण्याची खात्री मिळते हे शक्तीस्थळ. मानवजातीच्या इतिहासाकडे पाहिल्यास विज्ञानाचे हे मर्म ध्यानात येईल. आशिष, तुला परत एकदा मनापासून धन्यवाद.
|
Aschig
| |
| Monday, August 27, 2007 - 6:03 pm: |
| 
|
slarti, I don't think you need to thank me as this gives me an opportunity to think about what I do really believe in. Tanya, an excellent book about breaking out and much that we have been discussing is Hermann Hesse's "The glass bead game". This book was most influential in winning him the noble prize. A must read.
|
नक्की वाचेन आशीश. सिद्धार्थ वाचले आहे मी हेस चे.. ग्लास बीड गेम ला सुद्धा हात घालायला पाहिजे एकदा. अश्विनी, उत्तरे adjust करुन घेता येत नाहीत. असो. मला वाटते की मला जे विचरायचे आहे ते तुला कळत नाहीये. कदाचित मी जास्ती क्लिष्ट भाषेमध्ये लिहिले आहे. तरी मी परत एकदा प्रयत्न करतो. जो भक्तिमार्ग आहे, अथवा देवावरची जी श्रद्धा आहे ती चुकिची असु शकते ही शक्यता म्हणुन मान्य केली जाते का? किंवा अशी शक्यता असु शकते ह्याला भक्तिमार्गामध्ये स्थान आहे का? जसे तुझे उदाहरण होते की विज्ञानामध्ये आज लावलेला एक शोध उद्या कदाचित चुकिचा ठरवला जावु शकतो किंव पार्शली चुकिचा ठरतो किंवा काही विशिष्ट रेफरंस मध्ये चुक ठरतो, तसे देव आहे ही संकल्पना उद्या कदाचित चुकिची म्हणुन सिद्ध होवु शकेल अशी पॉसिबिलिटी तुम्ही मनात बाळगता का? मी हा प्रश्ण तुझ्या "काही गोष्टी भविष्यात सिद्ध होतील परंतु माझा आजच त्यांच्यावर विश्वास आहे" ह्या वाक्याला अनुसरुन केला आहे.
|
Slarti
| |
| Monday, August 27, 2007 - 11:06 pm: |
| 
|
'देव भेटेल / देव आहे' या श्रद्धेशिवाय अध्यात्मिक स्वरुपाचे अनुभव येणे शक्य आहे का ?
|
Ashwini_k
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:59 am: |
| 
|
नाही रे तन्या, तुझी भाषा क्लिष्ट नाही. मी सांगते उत्तरे कशी लागू पडतील ते! ''' १. श्रद्धा आहे ती चुकिची असु शकते ही शक्यता म्हणुन मान्य केली जाते का? किंवा अशी शक्यता असु शकते ह्याला भक्तिमार्गामध्ये स्थान आहे का? २. तसे देव आहे ही संकल्पना उद्या कदाचित चुकिची म्हणुन सिद्ध होवु शकेल अशी पॉसिबिलिटी तुम्ही मनात बाळगता का?''' माझे वरील पोस्ट्मध्येच दिलेले उत्तर भक्तीच्या बाबतीतही व्यक्तीव्यक्ती मध्ये ट्रान्झिशन फ़ेज असू शकते. काम्यभक्तीने आलेल्याला रिझल्टबद्दल शंका असू शकते (ह्या स्टेजला त्या माणसाचे पुर्व संचित, क्रियमाण व आत्ताचे आचार विचार त्याला रिझल्ट देताना इन्फ़्लुएन्शिअल ठरतात). (सोप्याभषेत सांगायचे तर एका विशिष्ठ स्टेज पर्यंत श्रध्दा चूक असू शकते ही शक्यता केली जाते. पण वरील एलिमेंट्स रिझल्ट्स अफ़ेक्ट करतात. प्रत्येक रिझल्ट नंतर श्रध्दा अधिकाधीक दृढ होत जाते आणि ''शक्यता'' चे रुपांतर ठाम विश्वासात होते व ठळक रिझल्ट्स मिळतात) स्लार्टीचा प्रश्न ३. 'देव भेटेल / देव आहे' या श्रद्धेशिवाय अध्यात्मिक स्वरुपाचे अनुभव येणे शक्य आहे का ? ----हो मिळू शकतात कारण देवाच्या अस्तित्वाला तुम्ही मान्य केले नाही तरी जर तुमचे आचरण जास्तितजास्त शुध्द, विचार पवित्र असतील तर तुम्ही नाही मानले तरी तुम्ही त्याच्या इच्छेच्या प्रान्तात असता कारण तो न्यायी आहे. फ़क्त तुम्ही त्याला योगायोग, सरप्राइज अशी नावे देता. ----------- या बोर्डवर कोणी इलेक्ट्रिसिटी एक्स्पर्ट असल्यास खालील घटनांबद्दल कृपया वैज्ञानिक माहिती द्यावी:- १. मी रात्री झोपताना मनात प्रकर्षाने विचार आला की आज घरात शॉर्ट्सर्किट होणार. आईला सांगितल्यावर आई म्हणाली आपण काय करू शकतो? तू सर्व स्वामी समर्थांवर सोड व शांतपणे झोप. २. रात्री २.३०च्या सुमारास फ़टफ़ट आवाजाने घरातील सर्व जागे झालो. भिंतीवरचे वायरिंग जळत होते. दिवाळीतल्या अनारासारख्या ठिणग्या उडत होत्या. पण त्या ठिणग्या खालीच असलेल्या दोन गाद्या, एकावरएक घडी करून ठेवलेल्या सिन्थेटीक ओढण्या व इतर गोष्टींवर न पडता, अलिकडे व पलिकडे असणार्या मोकळ्या लादीच्या दोन छोट्या भागांमध्येच पडल्या. (खरेतर रचना लक्षात घेता ठिणग्या या वस्तूंवर पडायलाच हव्या होत्या. पण तसे न होता, काहीही अघटीत घडले नाही). ३. ठीणग्या पडणे थांबले व सर्वजण झोपलो (वीजेचा करंट थांबला असे समजून). ४. सकाळी ६ वाजता, मी दात घासताना, काल कुठे बरे जळत होते हे पहायला गेले तर माझ्या समोरच पुन्हा धूर येऊन जळू लागले. मजल्यावरच्या मुलांना सांगून सर्वांचे मिटर बंद केले व बाबांनी इलेक्ट्रिशिअनला झोपेतून उठवून आणले. ५. इलेक्ट्रिशिअनने मिटरकडे चेक केल्यावर तो म्हणाला न्युट्रल पुर्वी कोणीतरी उलटी लावल्याने करंट थांबला नसून चालूच होता. (मग रात्री २.३०-२.४५ पासून सकाळी ६ वाजता माझे त्या स्पॉटकडे पूर्ण लक्ष जाइपर्यंत आग का थांबली? ============= हा योगायोग म्हणा, माझी अंधश्रध्दा म्हणा, काहीही म्हणा, माझा परमेश्वरच आमच्या रक्षणास आमच्या सर्व बाजूंनी उभा होता. याला वैज्ञानीक कारण असेलही पण जसे एखादा एक्स्पर्ट डॉक्टर दोन सारख्याच परिस्थितीतील रुग्णांवर सारखेच उपचार, ऑपरेशन करतो पण तरीही एक रुग्ण दगावणे, एक रुग्ण वाचणे हे कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय (ते कारण त्या परमेश्वरालाच माहीत असते) घडू शकते तसे आहे.
|
याला वैज्ञानीक कारण असेलही पण जसे एखादा एक्स्पर्ट डॉक्टर दोन सारख्याच परिस्थितीतील रुग्णांवर सारखेच उपचार, ऑपरेशन करतो पण तरीही एक रुग्ण दगावणे, एक रुग्ण वाचणे हे कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय (ते कारण त्या परमेश्वरालाच माहीत असते) घडू शकते तसे आहे. दगावलेला रुग्ण का दगावला याची करणे पोस्ट मॉर्टेम ने शोधता येतात. मुळात मानवी शरीर इतके गुन्तागुन्तीचे असते की दोन रुग्ण अगदी सारखे असू शकत नाहीत. सर्वात महत्वाचे त्या दोन रुग्णापैकी एकाने परमेश्वराचा मनोभावे धावा केला आणी ऑपरेशन किन्वा उपचार केले नाहीत, आणी दुसर्याने फक्त ऑपरेशन व उपचार केले तर काय होयील? प्रार्थनेने रोगी बरा होत असेल तर मेडिकल ख़ॉलेज ची जरूर काय?
|
Slarti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:31 pm: |
| 
|
आपण देवाच्या करणीला योगायोग असे नाव देतो की केवळ योगायोगाला देवाची करणी म्हणतो ? एखादी घटना मुळातच देवाची करणी आहे हे विश्लेषणपूर्व गृहीतक घेण्याची गरज नाही. तुमच्या घरी जे घडले ते (म्हणजे ठिणग्या विशिष्ट ठिकाणीच पडणे इ.) समजून घेण्यास complex system analysis वापरावा लागेल. हे sensitive dependence on initial conditions चे उदाहरण असावे असे वाटते. केवळ विद्युत अभियांत्रिकीद्वारे घटनेची ही बाजू कळणार नाही. हे विश्लेषण न करताच काही निष्कर्ष काढणे अतार्किक होय. सारांश, तुम्ही ज्याला श्रद्धेशिवाय येणारे अध्यात्मिक अनुभव म्हणता ते खरोखरच केवळ योगायोग असण्याची शक्यता आहे. >>> याला वैज्ञानीक कारण असेलही पण जसे एखादा एक्स्पर्ट डॉक्टर दोन सारख्याच परिस्थितीतील रुग्णांवर सारखेच उपचार, ऑपरेशन करतो पण तरीही एक रुग्ण दगावणे, एक रुग्ण वाचणे हे कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय (ते कारण त्या परमेश्वरालाच माहीत असते) घडू शकते तसे आहे. याची कारणे सद्यस्थितीत ज्ञात नाहीत, ती कारणे भविष्यात ज्ञात होण्याची शक्यता आहेच. जे अज्ञान कालसापेक्ष असण्याची शक्यता आहे त्याबद्दल असे गृहीतक बाळगणे घाईचे ठरेल.
|
Antara
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:31 pm: |
| 
|
हा योगायोग म्हणा, माझी अंधश्रध्दा म्हणा, >>>होय अन्धश्रद्धा नाहीतर काय! करंट चालू होता पण आग थोड्या वेळानी लागली यात देवाचा काय संबन्ध आधी ते वायरिन्ग तापले असेल बराच वेळ आणि मग लागली असेल आग, हे नाहीतर असेच कारण असणार.. एखादा एक्स्पर्ट डॉक्टर दोन सारख्याच परिस्थितीतील रुग्णांवर सारखेच उपचार, ऑपरेशन करतो पण तरीही एक रुग्ण दगावणे, एक रुग्ण वाचणे हे कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय >>>परत तेच. कुठेतरी डॉक्टर चे प्रयत्न अपुरे पडले असू शकतात, कुठेतरी चूक झाली असू श्कते. कुठेतरी रुग्णाची प्रकृती दगा देते. 'सारख्या परिस्थितीतले रुग्ण' हे कुणी ठरवले? तोच डॉक्टर एकदा काटेकोर असेल दुसर्यांदा चुकूही शकेल. पण जे काही कारण आहे ते आता नाहीतर नन्तर 'ज्ञात' होतेच होते. त्यात देवाची मर्जी कसली आलिये हे बाकी बरय पण. आपल्याला काही समजले नाही की सोडा देवावर. डोक्याला जास्त त्रास नको मला हेवा वाटतोय अस करु शकणार्या लोकान्चा 
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:46 pm: |
| 
|
God helps those who help themselves असे म्हंटलेले आहे. ही कुठेतरी एक चुकीची समजूत तयार झाली आहे की आपण काही करायचे नाही, सर्व काही देवावर सोपवून स्वस्थ बसायचे. असे कधी व का झाले मला माहित नाही. कदाचित् निष्काम व निष्कर्म या दोन शब्दात घोटाळा झाला असावा. अगदी ब्रम्ह सत्य जग माया म्हंटले तरी जर शरीर आहे, तर निदान यातना होऊ नये या दृष्टीने काही ना काही करणे भागच आहे. सर्व मनाचे खेळ आहेत असे समजून संसाराकडे दुर्लक्ष केल्याने काही चांगले होत नाही कुणाचे! पण जेंव्हा आयुष्यात अशी वेळ येते की जवळचे लोक आपल्याला सोडून गेले, सर्व सांसारिक गोष्टींचा यथेच्छ उपभोग घेतला, आता त्यातहि काही गंमत वाटत नाही, आपले ज्ञान व अनुभव आता कालमानाप्रमाणे हळूहळू कमी महत्वाचे होऊ लागले, अश्या वेळी राहिले काय? आता काय करायचे? मन:शांति मिळत नाही. मग वाटायले लागते की या संसाराहून वेगळे असे काहीतरी आहे, ज्यापासून सुख व आनंद मिळू शकतो. अशा वेळी एक जुनी पुराणी देव नावाची कल्पना आठवते. तोपर्यंत कधी अध्यात्माचा विचारहि केला नसतो, एकदम ते तरी कसे जमेल? हे सर्व होणार व तेंव्हा आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून लोक आपले हळू हळू आधीपासूनच देव आहे वगैरे मान्य करून, त्या मार्गाबद्दल माहिती मिळवतात. त्यासाठी देव असायलाच हवा, किंवा त्याचे अस्तित्व सिद्ध करता आले नाही तर काय करायचे हे प्रश्न उद्भवत नाहीत. काऽहिही असो, मला समाधान व शांति मिळाल्याशी कारण, म्हणून मी तो मार्ग धरून बघीन. अशी मनोवृत्ति होते.
|
Tiu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:13 pm: |
| 
|
अश्विनी, Are you sure असं खरच घडलं होतं? स्वप्न तर नाही? नाही बर्याच वेळा आपण स्वप्न बघतो आणी त्या स्वप्नांची तीव्रता इतकी असते कि जागे झाल्यावर पण आपल्याला वाटत राह्तं की खरच असं काहितरी घडलं होतं! nothing abnormal in it... आणी खरंच घडलं असेल तर जे घडलं तो योगायोग आणि देवच आपल्या मदतीला धाउन आला म्हणुन काही विपरीत घडलं नाही ही तुमची समजुत म्हणजे अंधश्रद्धा!
|
Maanus
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:14 pm: |
| 
|
दक्षिण भारतातल्या एका देवळामधे GOD हा शब्द कोरलेला आहे. नेमके कोणते ते देवुळ आठवत नाही पन देवुळ आहे. तिथल्या राजु गाईड ने सांगीतले के GOD आणि आपल्या देवात फार साम्य आहे.
G | Generator | ब्रम्हा | O | Operator | विष्णु | D | Destroyer | शंकर | if you look at individual duties of our main three god, they match to above table. ब्रम्हाजींने जग बनवले. विष्णुजी वेगळ्या वेगळ्या रुपात धरतीवर येवुन जग चलावतात आणि शंकरजी (महेश) तिसरा डोळा उघडुन जग संपवु शकतात. हा एक मुद्दा आणि दुसरा आसा की. मधे काही वाचंनामधे (वाचन म्हणजे पोथीवाचन नाही) असे कळाले की आर्य लोक हे खरे तर युरोपीअन लोक होते. ते नविन जागेच्या शोधात का तिथल्या बाकीच्या युरोपीअन लोकांच्या त्रासामुळे भारतात आले. व त्यांनी आर्य व ईतर concepts ची स्थापना केली. - जर हे खरे असेल तर आपले देव हे युरोप मधुन आले असे गणित आखता येवु शकते का? - first generation आर्यांनी आपन युरोपीअन लोकंपेक्षा वेगळे कसे हे दाखवण्यासाठी GOD शब्द फोडुन त्याला अजुन modular करायचा प्रयत्न तर नसेल केला? अजुन एक भा.प्र. देवांना दाढी मिशा का नसतात?
|
Maanus
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:16 pm: |
| 
|
गॉड म्हणजे येशु नव्हे... येशु हा गॉड चा मुलगादुत होता. गॉड concept येशु च्या आधीपासुन होती.
|
Slarti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:20 pm: |
| 
|
>>> अजुन एक भा.प्र. देवांना दाढी मिशा का नसतात?
 ब्रह्मदेवाला असतात...
|
Slarti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:27 pm: |
| 
|
>>> ... GOD शब्द फोडुन त्याला अजुन modular करायचा प्रयत्न तर नसेल केला? GOD हा शब्द केव्हापासून प्रचलित झाला त्यावर अवलंबून आहे. हा शब्द आर्य वगैरे लोकांइतका जुना नसावा. God
|
Tiu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:48 pm: |
| 
|
माझाहि एक भा नि प्र... With due respect to all the gods, एका particular time नंतर देवांचं वय वाढणं थांबतं का? म्हणजे गणपती आपल्यासारख्या सामान्य लोकांसारखा लहानाचा मोठा झाला...पण नंतर अजुन त्याचं वय वाढलं नाही! आस्तिक मंडळी यावर अधिक प्रकाश टाकु शकतील काय?
|
Maanus
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:46 pm: |
| 
|
त्याला कारण आहे. देवाचा एक दिवस काय ह्याचे उत्तर शोध. (विकिपिडीयावर आहे कुठेतरी) found the link, http://en.wikipedia.org/wiki/Metrics_of_time_in_Hinduism त्यामुळे आपल्यासाठी जरी दिवस रात्र हे चक्र सुरु असले तरी देवासाठी अजुन दुपार पन झालेली नाहीय आणि एकाच दिवसात वय कसेकाय वाढणार.
|
Aschig
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:55 pm: |
| 
|
GOD stands for GOD Over Djinn (see Douglas Hofstadter's GEB: An Eternal Golden Braid)
|
Maanus
| |
| Tuesday, August 28, 2007 - 9:54 pm: |
| 
|
अजुन एक वाचन असे झाले होते की बारा ज्योत्रिलींगे म्हणजे भारतातील अणुभट्ट्या होत्या. शिवलींगाची रचना व अणुभट्टीची रचना जवळ जवळ सारखीच असते. अणुभट्टी थंड रहाण्यासाठी त्याच्या सगळ्या भिंतीतुन पाणी फिरवत असतात. शिवलींगावर सतत पाणी पडत असते. लोकांणा ह्यावद्दल काही माहीती आहे का? दाढी मिशांचा प्रश्न बहुतेक मी happy thoughts च्या पुस्तकात वाचलेला. मला पुस्तक सापडले तर ते उत्तर मी इथे लिहेण.
|
मधे काही वाचंनामधे (वाचन म्हणजे पोथीवाचन नाही) असे कळाले की आर्य लोक हे खरे तर युरोपीअन लोक होते. ते नविन जागेच्या शोधात का तिथल्या बाकीच्या युरोपीअन लोकांच्या त्रासामुळे भारतात आले. व त्यांनी आर्य व ईतर concepts ची स्थापना केली. - जर हे खरे असेल तर आपले देव हे युरोप मधुन आले असे गणित आखता येवु शकते का? >>.. आर्यन इन्वेश्जन थेअरी ही आता चुकीची मानली जात आहे. इन्व्हेजन झालेच नाही असे काही ईतिहासकार म्हणत आहेत. पण तु जो देव तेथुन आले का विचारालेस तो मुद्दा बरोबर आहे. (म्हणजे देव तेथुन आले नाही) तर पुर्वी युरोपात पण मल्टी देवांना माननारे होते त्यांना पेगन्स म्हनतात. आपल्या देवांसारखे त्यांचे पण देव होते जसे सुर्य वैगरे. जेव्हा ख्रिश्चन धर्म फोफाऊ लागला तेव्हा त्यांनी पेगन्स वर आक्रमन केले व त्यांचा पाडाव केला (अनेक युद्धात) नंतर शेवटच्या पेगन राजाला त्याचा मृत्युशय्येवर baptist केले गेले. त्यामुळे ज्या जुन्या संस्कृती आहेत ते मल्टी गॉड्स मानतात व नंतरचे (मुस्लीम व किरिस्ताव) एकच देव मानतात. त्यात ही गोम आहे. मुस्लीम धर्मात कुराना सारखेच बायबल ला देखील महत्व आहे. कारन त्या दोन शाखा आहेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|