Shravanip
| |
| Monday, December 11, 2006 - 5:58 pm: |
| 
|
तुम्हाला काय वाट्टं हे अंगात येणं खरं असतं? मला सहज जाणून घ्यायचंय
|
Bhagya
| |
| Monday, December 11, 2006 - 10:04 pm: |
| 
|
श्रावणी, मला खरे खोटे माहित नाही, पण मी चक्क २००१ च्या गणेशोत्सवात सिडनी ला एका बाईच्या अंगात आलेले पाहिले आहे. ती बाई माझ्या समोरच बसली होती. गुरुजी मंत्रघोष करू लागल्यावर तिला घाम फ़ुटायला लागला, ती थरथर कापायला लागली आणि आजुबाजुच्या बायकांनी तिची आरती केली. त्यानंतर ती एक्दम शांत झाली. मला स्वत्:ला अजूनही ही गोष्ट कळलेली नाही. मला वाटत होते की अंगात येणे हा प्रकार भारताबाहेर होणारा नसावा पण?????
|
Shravanip
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:01 am: |
| 
|
बापरे हे तर ऐकावं ते नवलंच
|
Shravanip
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:27 am: |
| 
|
भाग्या पण ती बाई indian होती की foreigner ?
|
Raina
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:41 am: |
| 
|
नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकं, आनंद नाडकर्णींचे लेख वगैरे वाचून असे वाटते की हे खरे नाही. अंधश्रद्धा निर्मुलनावरची पुस्तकं. त्यात बरीच माहिती असते. अंगात येण्याचे प्रमुख कारण म्हणजे Attention Deficit Syndrome ह्या बाया अडाणी, अशिक्षीत, आणि सासुरवाशीणी किंवा समाजानी दुर्लक्षीलेल्या असतात. स्वत:कडे अधिकृतरित्या लक्ष वेधून घ्यायला, किंवा सासूचा छळ वगैरे कमीकरायला etc..etc.. त्या हे नाटक करतात.
|
Shravanip
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:50 am: |
| 
|
हो मीही हेच वाचंलंय पण काही अगदी चांगल्या घरातल्या बायकांच्याही अंगात आलेलं पाहून मला आश्चर्य वाटंलं म्हणून म्हटलं सगळ्यांना विचारावं
|
Bhagya
| |
| Tuesday, December 12, 2006 - 10:41 pm: |
| 
|
श्रावणी, ती बाई चक्क मराठी होती. पण काय ग तिचं ते रूप.
|
Aabha1
| |
| Wednesday, December 13, 2006 - 6:58 pm: |
| 
|
Sarvanna Namaskar, mi ithli navi member aahe. Kuni asha stri la swataha bhetunach wicharle ki tila nakki kay jhale tar ti sangu shakel ka ki tila nakki kay jhale aahe te? Aani ase mhantat ki angat yene he phakta suvasini bayakanchyach babtit ch hote, he khare ka?
|
Ana_meera
| |
| Friday, August 24, 2007 - 11:17 am: |
| 
|
माझ्या सासूबाईंच्या अंगात सासरे जिवंत असेपर्यंत यायचे... मी पुरोगामी घरातून आली असल्याने मला अर्थातच हे थोतांड वाटायचे. आणि गंमत म्हणजे आधी अंगात नवर्याच्या आत्याच्या यायचे., ती विधवा झाल्यावर सा.बा. च्या यायला लागले. हे कसे? फक्त नवरात्रात कोणत्या तरी १ दिवस यायचे. बहुतेक पंचमी किंवा नवमी. आणि मी बाजुला बसलेली असेन तर त्या दिवशी याय्चे नाही नंतर यायचे. अगदी preplanned !!!! ओटी भरून, जळता कापूर खाऊन शांत व्हायच्या. बस!! पाया पड्णे त्या वेळी!!!!!!!!! how strange!!!!
|
माझ्या लहानपणी "जय सन्तोषी माता" हा चित्रपट तुफान हिट झाला. त्यामुळे अन्गात येण्याची जणू फ्याशनच आली.
|
Tiu
| |
| Friday, August 24, 2007 - 1:30 pm: |
| 
|
अंगात येणं हा एक मानसिक आजार आहे... अंगात येणारया बायकांची पुजा करण्यापेक्षा आणि त्यांच्या पाया पडण्यापेक्षा त्यांच्यावर मानसोपचार करायला हवेत. मी अगदी लहान असतांना जेव्हा पहील्यांदा हा अंगात येण्याचा प्रकार बघितला होता तेव्हा असला घाबरलो आणि जोरजोरात रडायला लागलो कि त्या बाईच्या अंगातनं देवी गायब! अर्थात ती देवी असल्यामुळे परत आली लगेच २ मिनिटात...
|
'देवी अंगात येणं' यावरून एक धमाल किस्सा! आमच्या कॉलनीतल्या एका सद्गृहस्थांच्या अंगात अंबाबाई यायची. आणि दुसर्या एका बाईंच्या अंगात दुसरी कुठलीशी देवी!!! नवरात्रात कॉलनीतल्याच देवळात घागरी फुंकल्या! तमाम जनता लोटलेली! मग अचानक या दोघांच्या अंगात रेस्पेक्टिव देव्या आल्या. आणि कहर म्हणाजे 'देव्यांना' बरंका एकमेकींना कडकडून भेटण्याची बुध्दी झाली!!!! मग काय विचारता, त्या गृहस्थांची बायको अंगात येणारीच्या झींज्या उपटायचीच बाकी होती! बघे या दर्शनानं धन्य झाले होते!
|
Sunidhee
| |
| Friday, August 24, 2007 - 5:15 pm: |
| 
|
म्रुण्मयी, बाप रे! पण जाम हसु आले गं!!
|
Disha013
| |
| Friday, August 24, 2007 - 7:31 pm: |
| 
|
मृण्मयी,
हे देवी अंगात येणे म्हणजे घरच्या त्रासाचे परिणाम हे मात्र खरे. आमच्या ओळखीतल्या एका बाईंच्या अंगात याय्ची देवी नवरात्रात. अन जरा वेळ घुमुन झाले की उपस्थीत सर्वान्ना पाया पडायला लावाय्ची. नवरा पाया पडला रे पडला की देवी गायब! राज की बात होती की त्यांचा नवर्याला अगदी सगळी व्यसने होती. नि अतिशय dominating स्वभाव.'माझे तेच खरे' ही वृत्ती. मग त्या बाई असा बदला घेत. असं कुणाच्या अंगात वगैरे आलेलं बघितलं की मला तो अवतार बघुन जाम हसु येत असतं!
|
Zakki
| |
| Friday, August 24, 2007 - 7:40 pm: |
| 
|
मृण्मयीच्या कॉलनितल्या पुरुषांच्या अंगात येते ना! कदाचित् अंगात देवी येणारी बाई पाहून त्याच्या अंगात आले असावे! नंतर इतरहि पुरुषांच्या अंगात यायला लागल्यावर नि त्यांनाहि काही काही करावेसे वाटायला लागल्यावर, त्या बाईच्या नवर्याने दुसर्या कॉलनीत जागा घेतली असे ऐकले. ख. खो. दे. जा.

|
Disha013
| |
| Friday, August 24, 2007 - 8:05 pm: |
| 
|
झक्कीकाका केली दुरुस्ती. हे बरय,देवीच्या नावाखाली...........
|
अन्गात देवी किन्वा देव येतो, बायकान्च्या की पुरुषान्च्या की अजुन कुणाच्या त्या बद्दल फारस माहीत नाही (आपण कुठले येवढे पुण्यवान की देव देव्या आपल्या अन्गात याव्यात????? ) पण ते अन्गात भुत सन्चारत अन ते उतरवायला कुठल्याश्या दत्त मन्दिरात बरीच मण्डळी जमतात, ते कुठ हो??? जरा त्याबद्दल कोणी सान्गु शकेल काय????? 
|
अंगात येणे यात नवीन काहीच नाही. बहुतेक कॉंग्रेसवाल्यांच्या अंगात सध्या सोनिया नावाची देवी येते. काहीजणांच्या अंगात राहुलबाबा सुद्धा येतो असं म्हणतात. दरवर्षी भाद्रपदामध्ये अनिसवाल्यांच्या अंगात येतं. अंगात आलं की ते घुमायला लागतात आणि अंधश्रद्धा, प्रदूषण असं काहीतरी बरळायला लागतात. चिनी आत्मे साम्यवाद्यांच्या अंगात येतात तर दाढीवाले आत्मे निधर्मान्धांच्या अंगात येतात.
|
Arch
| |
| Saturday, August 25, 2007 - 8:56 pm: |
| 
|
मृ, तुमच्या नागपूरमध्ये फ़ारच गंमती चालायच्या हं. तो आज्या नातवंडाना park मध्ये घेऊन गेलेला किस्सा आणि आता हा. 
|
दरवर्षी भाद्रपदामध्ये अनिसवाल्यांच्या अंगात येतं. अंगात आलं की ते घुमायला लागतात आणि अंधश्रद्धा, प्रदूषण असं काहीतरी बरळायला लागतात. हे सर्व नैमित्तिक झाले. काही लोकान्च्या अन्गत बाराही महिने तोगडिया आलेले असतात. त्यामुळे कोणत्याही बीबी वर जावून दाभोळकरान्वर दगड मरणे, सोनियाजीन्वर चिखल उडविणे असे प्रकार करतात ते.
|