|
Zakki
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:18 pm: |
| 
|
पाकड्याला काही पण म्हणू दे. पण फाळणी च्या कायद्याप्रमाणे काश्मीर भारताचा आहे. भारताच्या अदूरदर्शी धोरणामुळे नि नंतरहि तिथल्या हिंदूंना संरक्षण न दिल्याने, आता तिथे मुसलमान जास्त झाले आहेत म्हणून असे म्हणतात की आता ते पाकीस्तानला द्या! आता कुणाला म्हणायचे असेल की तेंव्हाचे तेंव्हा, आता देऊन टाका त्यांना काश्मीर. नि इशान्येकडील भाग चीनला देऊन टाका, कारण चिनी तसे म्हणत असतील. आणखीनहि कुणाला काय हवे असेल ते देऊन टाका! विशेषत: उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, आसाम इतर कुणाला तरी देऊन टाकावे. म्हणजे उरलेला भारतात लोकसंख्या कमी, नि त्यामुळे त्यांची लवकर भरभराट होईल! आमच्या देशात गराज सेल करतात, घरातला कचरा कुणाला हवा असल्यास स्वस्त दरात द्यायला, त्यामुळे घरातली अडगळ कमी होते. तसे करावे.
|
डीजे, विश्वयुद्ध मधला ष नीट कर बघू. तिकडे देव बाफ़ वर बघ विश्व आणि विष्णू अस युद्ध चालू आहे
|
मुद्दा असा आहे की पाक चे लोक कसे चांगले आहेत व आपले कल्चर कसे एकच आहे याचा गवगवा जो केला जातोय त्याचा मी विरोध करतोय. <<<<<अता पाकि votes, sponsorers मिळवून पैसे मिळवायचे असतील तर हे सगळे करायलाच हवे ना !
|
काही कामानिमित्त न्यू यॉर्क मध्ये एका स्वस्त हॉटेल मध्ये तीन आठवडे मी राहिलो. त्या हॉटेल च्या तळाशी एक स्वस्त आणी मस्त देशी रेस्टॉरन्ट होते. तेथे नेहेमी पाकी आणी बान्गलादेशी टक्सी ड्राय्व्हरान्ची वर्दळ असे. त्यातल्या अनेकान्शी पान खाता खाता गप्पा मारल्यावर लक्शात आले की आपल्यात ९५ टक्के गोष्टी सारख्या आहेत.
|
Deshi
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:54 pm: |
| 
|
त्यातल्या अनेकान्शी पान खाता खाता गप्पा मारल्यावर लक्शात आले की आपल्यात ९५ टक्के गोष्टी सारख्या आहेत>>>>>> कुळकर्नी जोशींनीच वर लिहीले आहे की एकाच देशाचे तिन देश झाले मग कल्चर एकच नाही का असनार? वेगळे कसे असेल? ह्या गोष्टी काय सांगायचा. तिच यलो डाल, तोच भांगडा सर्व तेच असनार नाही का?
|
Zakki
| |
| Tuesday, August 21, 2007 - 10:23 pm: |
| 
|
कुलकर्णि, कल्चर एकच आहे म्हणून काश्मीर पाकीस्तान्यांना द्यावे असे तुमचे म्हणणे आहे का? न्यू यॉर्क मधल्या सगळ्यांची एकच संस्कृति असते, अमेरिकन. तिथे कुठल्या देशातून आला, धर्म कोणता याचा काही संबंध नसतो. फक्त जास्तीत जास्त पैसे कसे मिळवता येतील, तेव्हढे करणे. डीजे ने लिहिल्याप्रमाणे भारतातहि हेच अमेरिकन कल्चर येते आहे, म्हणून हा सगळा उपद्व्याप. त्याचा काश्मीर पाकिस्तानला देण्याचा काही संबंध नाही. आता सगळ्या नेत्यांना (अगदी ठाकरे, जॉर्ज फर्नांदेज़, दास मुन्शी यांना सुद्धा) प्रत्येकी एक बिलियन डॉलर्सची लाच दिली तर काश्मीर पाकिस्तानला देतीलच, वर त्यांना भारतीय जनतेच्या पैशातून हजार कोटी रुपये द्यावेत यासाठी कुणि आधुनिक गांधीबाबा उपास करायला बसेल!
|
Zakasrao
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:06 am: |
| 
|
हम्म. मी तो कार्यक्रम पाहिला होता. त्यात तीन पाकिस्तानी (एक दुबईकर पण तो मुळचा पाकिस्तानीच असेल) त्यानी त्यांच्या देशाची गाणी म्हणली त्यात वेगळ ते काय? त्यांचा पण स्वातंत्र्य दिन होताच की. आणि मी ह्या विरुद्ध एकही बातमी पेपर किंवा न्युज चॅनेल वर पाहिली नव्हती. मला वाटत की त्या zee वाल्यानीच हा तमाशा लावला असेल. आणि त्यातच त्याना ते ३ पाकिस्तानी लोक जायला नको असतील म्हणुनही हे सगळ नाटक केल असेल. कारण त्याना सवयच आहे ती. अगदी तिथे बसलेल्या ४ संगीतकाराना पण आहे. उगाच नाही मौली इतकी पुढे आली आहे. तिच्या पेक्षा खरतर श्रेष्ठा,अभिजित,जॉय हे जास्त चांगले आणि versatile आहेत. मी असे सगळे कार्यक्रम पाहतो पण एकही रुपया (खरतर ३ रु असेल) वाया घालवत नाही. माझ्यामते तर ते सगळ फ़क्त TRP साठी आणि आपल्याला हवे असलील लोक वर हवेत ह्यासाठी केलेले एक नाटकच आहे फ़क्त. येत्या आठवड्यात सगळ्यात आधी मौली नंतर जुनेद मग बाकीचे असे एक एक बाहेर जातील. शेवटी त्यातील राजा,अमानत आणि मुस्सरत हे तिघापैकी एकजण जर झाला नाही विनर तर मग ते zee च फ़ार मोठ नाटक असेल. हे सगळ TRP च नाटक आहे बाकी काही नाही. आणि मैत्रीच जे पालुपद असत सगळ्या मिडियाच ते म्हणजे काही सांगु नये अशा प्रकारातल. त्यातल्या कोणाचा काय फ़ायदा आहे हे कळण मुश्किल.
|
>>> संगीत का विष्वयुध्द म्हणजे सगळ्या देशातले लोक येतात तसेच पाकिस्तानी WC cricket मधे जर एखाद्या पाकिने चांगली कामगिरी केली तर तुम्ही कौतुक करत नाही का त्या player चे ? केवळ पाकिस्तान आपला शत्रु आहे म्हणून पाकिस्तानी गायकांना चांगले गात असले तरी त्यांना नावं ठेवायची का ? मी पाकिस्तानी गायक चांगले किंवा वाईट आहेत असे अजिबात म्हणालेलो नाही. हा मुद्दाच उपस्थित होत नाही. पाकिस्तान आणि पाकिस्तानी आपले हाडवैरी आहेत. त्यांच्याशी बरेवाईट असे कुठलेही संबंध ठेवायला माझा विरोध आहे. जो देश आणि ज्या देशातले नागरिक आपले कट्टर शत्रू असून भारत नष्ट करायला टपलेले आहेत, त्यांना भारतात कशाला बोलवायचं? शत्रू हा प्रथम आणि शेवटी शत्रूच असतो या महत्वाच्या वस्तुस्थितीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे भारतातल्या अतिरेकी कारवाया कमी होत नाहीत. माझ्या या विचारांना या व्यासपीठावरचे काही समाजवादी निधर्मान्ध विरोध करतील याची मला खात्री आहे. त्यांनी कितीही विरोध केला तरी पाकिस्तान आणि पाकिस्तानचे नागरिक हे आपले हाडवैरी आहेत ही वस्तुस्थिती अजिबात बदलत नाही.
|
>>> त्या हॉटेल च्या तळाशी एक स्वस्त आणी मस्त देशी रेस्टॉरन्ट होते. तेथे नेहेमी पाकी आणी बान्गलादेशी टक्सी ड्राय्व्हरान्ची वर्दळ असे. त्यातल्या अनेकान्शी पान खाता खाता गप्पा मारल्यावर लक्शात आले की आपल्यात ९५ टक्के गोष्टी सारख्या आहेत. समाजवादी निधर्मान्धांनी या अतिशय भ्रामक समजूती पसरवलेल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशात फारसे साम्य नाही. भारत हा मूर्तीपूजकांचा देश आहे तर पाकिस्तान हा मूर्तीभंजकांचा. भारत घटनेनुसार निधर्मी देश आहे तर पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे. पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांना जवळजवळ नेस्तनाबूत करण्यात आले आहे तर भारतात अल्पसंख्याकांच्या दाढ्या कुरवाळल्या जातात. पाकिस्तानात हातपाय तोडणे, दगडाने ठेचून मारणे अशासारख्या जुलमी इस्लामिक शिक्षा दिल्या जातात तर भारतात तुरुंगवास असतो. पाकिस्तानातात इतर धर्मीयांचा तिरस्कार केला जातो तर भारतात इतर धर्मीयांचे लांगूलचालन केले जाते. पाकिस्तान्यांना आपल्या स्वतःच्या धर्माचा अभिमान आहे तर भारतात आपल्या धर्माचे नाव मोठ्यांदा सांगितल्यास त्याला जातीयवादी समजले जाते. भारतात ढोंगी निधर्मान्धांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते तर पाकिस्तानात असे महाभाग औषधाला सुद्धा सापडत नाहीत. पाकिस्तानात अमुस्लीम कितीही सज्जन असला तरी त्याचा तिरस्कार केला जातो तर भारतात अतिरेकी मुस्लीमांबद्दल सुद्धा अनेकांना कळवळा वाटतो. पाकिस्तानने हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे पूर्वीच जमीनदोस्त करून टकलेली आहेत तर भारतात मंदिराच्या स्थानावर उभी असलेली एक मशिद मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता पाडली गेली तेव्हा अनेकांनी सुतक पाळायला सुरवात केली आणि अजून ते पाळत आहेत. दोन्ही देशात अशा महत्वाच्या गोष्टीत अजिबात साम्य नाही. जगात बहुतेक सर्व देशात सूट, पॅंट, शर्ट वापरला जातो किंवा बहुतेक सर्व देशात कोक पितात अशासारख्या अनेक गोष्टी दाखवता येतील. म्हणून जगातले सर्व देश एकसारखे झाले का? अर्थात पान खाणे आणि जोरदार पिचकारी मारणे, लाच खाणे अशांसारख्या सवयी दोन्ही देशात असणारच.
|
अर्थात पान खाणे आणि जोरदार पिचकारी मारणे, लाच खाणे अशांसारख्या सवयी दोन्ही देशात असणारच. एकदम सही बोला! आणि लहान मुले रस्त्याच्या कडेला... वगैरे पण. बाकी कुलकर्णी तुम्ही ही टक्केवारी कशी काढलीत हो? कुठल्या ९५ गोष्टी सारख्या ते जाऊ दे पण कुठल्या ५ टक्के वेगळ्या ते सांगा बघू. मग उरलेल्या सगळ्या सारख्या आहेत का ते बघता येईल. कल्चर सारखे असण्याचा नीयत आणि इरादे सारखे असण्याशी काय संबंध आहे? आणि सामान्य जनता लाख चांगली असेल पण ती काही निर्णय घेण्यात पार्टीसिपेट करतेय का? मधे डॉ अभय बंगांनी एक लेखात लिहीले होते की लष्कर, राजकारणी, व्यापारी आणि काही मिडीयावाले असे सगळे मिळून फक्त साधारण ५०० लोक पाकिस्तानचे राजकारण हाकतात. बाकी सगळी जनता बाहेर आणि त्या स्त्रॅटेजीज शी अनभिज्ञ. पण ते जाऊ दे. आपली तर लोकशाही आहे ना मग त्यांना ठरवू दे की कुठली गाणी म्हणायची ते. चांगला गायक निवडायचाय तर मग आवाज हा एकच निकष पाहिजे. मोठ्या मनाने त्यांना संधी दिलीत ना मग मोठ्या मनाने त्यांचे constraints पण स्वीकारा. खरे तर या अशा स्पर्धा मुळात बॉलीवूडमधे प्रवेश या कारणासाठीच असतात. मग अमूक पद्धतीचे गाणे म्हणणार नाही अशा प्रकारचे constraints त्यांच्याच करियरला बाधा आणू शकतात. हे काय त्यांना माहीत नाही? उलट खरेच त्यांनी असे म्हटले असेल तर त्यांच्या धाडसाची दाद द्यायला हवी. पण मुळातच हा सगळा मीडियाचा स्टंट वाटतोय. आणि तो यशस्वी झालाय हे आपल्या चर्चेवरून दिसतेयच
|
पाकिस्तान आणि पाकिस्तानी आपले हाडवैरी आहेत. त्यांच्याशी बरेवाईट असे कुठलेही संबंध ठेवायला माझा विरोध आहे. जो देश आणि ज्या देशातले नागरिक आपले कट्टर शत्रू असून भारत नष्ट करायला टपलेले आहेत, त्यांना भारतात कशाला बोलवायचं? शत्रू हा प्रथम आणि शेवटी शत्रूच असतो या महत्वाच्या वस्तुस्थितीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे भारतातल्या अतिरेकी कारवाया कमी होत नाहीत. <<<<मला असं म्हणायचं होतं कि एखादा देश शत्रु असला म्हणून त्यांना Music World cup ला आपल्या देशात उतरु द्यायचे नाही हे काही पटण्या सारखे नाही ( ते पण International audience असलेल्या channel वर ) क्रिकेट मधे जर लोकांना India-Pak सामने पहायला आवडतात तर संगीताच्या क्षेत्रात competition ला invite केलेले का नाही चालत ? बाकी Zee t.v. चा इंडोपाक मैत्री वगैरे TRP वाढवण्याचा स्टंट आहे हे ही खरेच , पण मला तरी तिथल्या कलाकारांना स्पर्धेला invite करण्यात काही चूक वाटत नाही .
|
Anyways, बाकी काही असो , पण झी ला भरपूर attention मिळावण्याचा हेतू मात्र साध्या झाला आहे , हे वाचा , झी Office वर भा . वि . सीनेचा मोर्चा .. http://www.esakal.com/esakal/08222007/TajyabatmyaSpecialnewsMaharashtra2A62AF7668.htm
|
Sunidhee
| |
| Wednesday, August 22, 2007 - 5:24 pm: |
| 
|
पाक किंवा कोणत्याही देशाच्या गायकाला बोलवायला हरकत नाही. पण अश्या स्पर्धांची मर्यादा Z किंवा कोणीही फक्त कलेपुरतीच ठेवावी आणि आम्हाला केवळ कलेचा आस्वाद घेऊ द्यावा. उगाचच देशाला मधे आणु नये. सारेगम सोनु असताना पण हिट होताच, तेव्हा तर किती साधा होता तो प्रोग्राम. त्यात जेव्हा २-३ वर्षापासुन ग्लॅमर आणले तेव्हापासुन गायकीची लेव्हल कमी झाली. शेवटची मला श्रेया घोषल आठवते हिंदीत रुजलेली. नंतर कोण आले? तो २००५ चा देबोशीष, २००६ चे जोडी नंबर १ (मी नाव पण विसरले) वगैरेंचे आज नामोनिशाण पण नाही. विनीत तर देबु पेक्षा निर्विवादपणे चांगला होता आणि हिमेश चा पेट्ट होता.. पण हिमेश साहेबानी स्वत: गाण्याच्या उत्साहात त्याला जेमतेम १ फ्लॉप सिमेमात गायला दिले १ गाणे बहुतेक. पुढे काय नाय. दरबार साहेब २-३ स्पर्धकाना तरी आतापर्यन्त म्हणालेत "जबतक तुझे स्टार नही बनाता तबतक मरूंगा नही'. आता त्या स्पर्धकांची नावे तरी त्याना आठवतील काय? आणि दरबार साहेबाकडे तरी जास्त काम आहे का? सर्वाना रेशमिया हवेत सांगायचे असे की उगाचच डायलॉग मारत असतात हे लोक. ३ही पाक लोक शेवटच्या तीनात आले हे मला खोटच वाटते. Z चा स्टंट असेल. हरप्रीत अजुन बाहेर नाही पडला ते आश्चर्य आहे. सुरुवातीला "कावा कावा" असे काहीसे गाणे सोडले तर मला त्याचे १ पण गाणे नंतर आवडले नाही. अमानत चांगला आहे, सूरात असतो पण दमदार नाही. जुनैद जबरदस्त शार्प आहे. दुर्दैवाने त्याची कव्वाली चांगली नाही झाली. पण अजुनही पुढे येउ शकतो चान्स मिळाला तर. मुस्सफ़र आधी मला उगाचच आवडला नव्हता रणजीत सारखा दिसतो म्हणुन पण आता खूप जोरात चाललाय.. काही जागा तर काय सुरेख घेतो!! राजा सध्या तरी बेस्ट. पूनम कडून पण आशा आहे. राहाता राहिला प्रश्न आपण पाक मधे स्पर्धाना जाण्याचा (क्रिकेट साठी नव्हे, गाण्यासाठी) तर आपले स्पर्धक मुळात तयार होतील का? तिथे जाणे त्याना सूरक्षित वाटेल का? पाक चे भारतात आले म्हणजे भारतात त्याना सूरक्षित वाटते. मला नाही वाटत क्रिकेट सारखी खास सुरक्षा त्याना दिली असेल. इथेच मुख्य फरक आहे कदाचीत. बाकी दोन्ही देशातले संबंध सूधारायला सारेगम स्पर्धा वगैरे उपयोगी नसावी. नुसती पब्लिसिटी आहे. आणि देशभक्ती चे गीत मी माझ्या देशाचेच गाणार, ते नैसर्गीक आहे. म्हणायला जोश तरी यायला हवा की नाही? तरी जुनैद ने भारतीय गाणे म्हटले बहुतेक फक्त त्यात भारत वगैरे शब्द नव्ह्ता.
|
हो , जुनैद ने चक्क 'LOC कारगिल ' मधले गाणे म्हंटले , युध्द संपल्यानंतरचे शोकगीत . ते बहुदा movie मधे भारतीय आणि पाकि दोन्ही सैनिकांच्या तोंडी होते .
|
Tiu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:34 pm: |
| 
|
मुळात भारतात टॅलेंटची कमी आहे का की पाकिस्तानातुन गायक बोलवावे लागतात? हा आता Indians settled in other countries (be it Pakistan or any other country) competing against Indians in India for the title is another thing. पण पाकिस्तानी नागरिक कशाला हवेत? इतकच वाटत असेल तर झी टिव्ही ने पाक मधे जाउन त्यांच्यासाठी सारेगमप सुरु करावं...
|
मुळात भारतात टॅलेंटची कमी आहे का की पाकिस्तानातुन गायक बोलवावे लागतात? हा आता Indians settled in other countries (be it Pakistan or any other country) competing against Indians in India for the title is another thing. पण पाकिस्तानी नागरिक कशाला हवेत? इतकच वाटत असेल तर झी टिव्ही ने पाक मधे जाउन त्यांच्यासाठी सारेगमप सुरु करावं... <<<<काहीही काय पाकिस्तानी लोकांना स्पर्धे साठी बोलावणं आणि आपल्या इथल्या singers च्या टॅलेंट चा काय संबंध ? हे म्हणजे आपल्या देशातले क्रिकेट players फ़ार चांगले आहेत म्हणून रणजी ट्रॉफ़ी खेळा पण World cup cricket मधे पाकिस्तान आणि इतर शत्रुंशी competition करु नका असे झाले !
|
आणि सामान्य जनता लाख चांगली असेल पण ती काही निर्णय घेण्यात पार्टीसिपेट करतेय का? पाकिस्तानात हुकुमशाही आहे त्यात त्या जनतेचा काय दोष? अर्थात इथे उमटणार्या "एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो" अशा घोषणान्वरून ज़ी टीवी चा स्टन्ट मात्र यशस्वी झाला म्हणायला हरकत नाही.
|
Tiu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:43 pm: |
| 
|
काहीही काय पाकिस्तानी लोकांना स्पर्धे साठी बोलावणं आणि आपल्या इथल्या singers च्या टॅलेंट चा काय संबंध ? हे म्हणजे आपल्या देशातले क्रिकेट players फ़ार चांगले आहेत म्हणून रणजी ट्रॉफ़ी खेळा पण World cup cricket मधे पाकिस्तान आणि इतर शत्रुंशी competition करु नका असे झाले !>>> विचारांची गल्लत होते आहे...उद्या cricket world cup मधे पाकिस्तानने आपल्याला हरवलं तर आपल्या टीम मधल्या players ना काढुन त्यांचे players घेणार आहोत का Indian team मधे? आता ह्या सारेगमप मधे कुणि पाकिस्तानि जिंकला तर तो काय परत पाकिस्तानात जाउन तिथल्या सिनेमात गाणी नाही गाणार...तो bollywood साठीच गाणार ना? मग आपल्याच देशात गाणारे लोक हवेत तर आपल्याच देशातले का शोधु नये? Cricket worldcup is not conducted so that we can find good players from other countries and get them in our team... Don't compare apples with oranges!!! मुद्दा समजल असेल अशी आशा आहे... नाहितर हसणं चालु द्या...
|
मग आपल्याच देशात गाणारे लोक हवेत तर आपल्याच देशातले का शोधु नये? या न्यायाने बॉलीवूड चित्रपट पकिस्तानात प्रदर्शीत करायला नकोत. इतक्या मोठ्या बाजारपेठेवर पाणी सोडायची तयारी आहे आपली?
|
Tiu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 11:53 pm: |
| 
|
या न्यायाने बॉलीवूड चित्रपट पकिस्तानात प्रदर्शीत करायला नकोत.>>> बॉलीवूड चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करायला हरकत नाहिये... हरकत आहे ती भारतीय कलाकारांना डावलुन आणि पाकिस्तानि नट नट्या घेउन बॉलीवूड चित्रपट बनवण्याला...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|