Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 21, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने » Archive through August 21, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Monday, August 20, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे निम्मीत आहे सारेगमप या झी वरच्या शोचे. या शो मध्ये १५ ऑगस्ट ही थीम होती व व स्वांतत्र्यावर गाणे म्हणने अपेक्षित होते.

यावरुन एक घोळ झाला की पाक च्या कॉन्टेस्टंट नी भारतीय गाणी म्हणावी का? गाणी म्हणुन झाली व नंतर त्या आठवड्यात तिन्ही पाकि कॉन्टेस्टंट ला योगायोगाने कमी मत मिळाली. पण त्यात रुल प्रमाने ऐलीमेनेशन न करता त्यांनी मिडीया ला दोशी ठरवुन सर्वांना परत एक चांन्स दिला. वर वर पाहाता गोष्ट साधी वाटते पण ती तशी नाही असे मला वाट्ते.

ईस्मायील दरबार ने त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही गाणे म्हणायला नकार दिला का? त्यांनी नाही असे सांगीतले व वर असेही सांगन्यात आले की कोणीतरी आहे ज्याला या दोन देशात शांती नकोय त्याने हा प्रचार केला? Come on

मुळात त्यांनी नकारच द्ययला पाहीजे. नकार दिला तर मी त्याचे समर्थन करेन कारन पाक हा त्यांचा देश आहे व त्यांनी त्यांचा देशाचीच गाणि (स्वातंत्र्याचा थिम वर) म्हणायला पाहीजेत. दुसर्या देशाची नाही. मग चुकले कुठे. का झी ला या सर्वांचा फायदा करायाचा होता त्यामुळे त्यांनीच मिडीयात तसे छापले.

भाई भाई भाई असे जे म्हणुन घेतले जाते ते ओके आहे पण भाई हे दोघांनी पण म्हणायला पाहीजे कोण एकानेच मै तेरा भाई असे का म्हणायचे. का मीच मोठा आहे हे दाखवायचे. आणि किती दीवस?

भाई भाई मुळे आप्ण एक युध्द ओढवुन घेतले होते ते पण चिन सोबत हे ईतक्यात विसरलो का आपण? कमॉन आपण भाई भाई नाही आहोत. फक्त माणस आहोत.

माझा विरोध असे कार्यक्रम करायला बिलकुल नाहे मैत्री वाढायलाच पाहीजे पण ती एकतर्फी वाबळजबरी नसावी जी सध्या आहे.

पाक मध्ये असा कार्यक्रम होऊ शकेल का? झालाय का? तसा होत असेल तर मगच भारतात व्हावा नाहीतर नाही असे मला वाटते.

दरवेळी हा देशा गोतम बुध्दाचा, श्रिरामाचा आहे हे सांगीतल्या जाते मग त्या देशाचे तिन देश का झाले हे का विसरता? की ते स्वप्न होते. चिड याची येते भाईचार्याची नाही.



(हे मुस्लीम विरोधी पोस्ट नाही याची नोंद घ्यावी)


Chinya1985
Monday, August 20, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, हा reality show वगैरे म्हणतात पण ते खर नाहि. आपल्याला बघुनच कळत की ते. तो शुक्रवारचा कार्यक्रम बघितल्यावर तर लगेच कळत होते सगळे भसाभसा रडायला लागले. आता काय गरज??हे सगळे हिच झी वाली लोक पब्लिसिटी स्टंट म्हणुन करतात. आता तो अनिक परवा म्हणाला की मी त्या मुलींपैकी कोणावर प्रेम करत नाहि मी फ़क्त दिया मिर्झावर प्रेम करतो तसेच तो पाकिस्तानी दुबाईवाला पण तसच म्हणाला आणि आज झीन्युज वर दोघेही म्हणत होते की एक मुलगी आहे जिच्यामागे आम्ही दोघेही आहोत वगैरे. मग तु तिला सोड अगदी गळ्यात गळे घालुन वगैरे. च्यायला या लोकांच्या!!!!फ़ाल्तु नाटक करतात. माझ डोकच सणकल, मुल मुलांच्या अगदी कुशीत बसल्यासारखे दिसत होते आणि उगच तु छोड दे मेरे लिये वगैरे. फ़ाल्तु ठिकाणी इमोशनल वगैरे. माझ मत आहे की अशा शोसाठि चांगले अभिनेते घ्या(रंगभुमिवरचे वगैरे) म्हणजे खरच चाललय अस तरी वाटेल. या लोकांना धड नाटक पण करता येत नाहि. त्या पाकिस्तानी शेंबड्याला(विशाल्-शेखरचा) तर आधी काढायला पाहिजे.

बाकी पाकि लिकांनी भारतिय देशभक्तिची गाणी म्हटली नाहित तर चुकल कुठे??


Kedarjoshi
Monday, August 20, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी पाकि लिकांनी भारतिय देशभक्तिची गाणी म्हटली नाहित तर चुकल कुठे>>

येस मलाही तेच म्हणायच. त्यांनी त्यांचा देशाची गाणी म्हणली तर चुकल काय? त्यावरुन नाटक कशाला अन वर त्यांनी आपली गाणी म्हणली नाही म्हणुन लोकांनी वोट दिले नाही हे पालुपद.

Prajaktad
Monday, August 20, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार ! हे सगळे एक मोठे नाटक आहे..प्रोग्राम पर्यायाने chanel ला प्रमोट करण्याचे.. हे सगळ आधिच scripted आणी रिहर्स केलेले असत..(सगळच नाही पण, most of विवाद आधिच scripted असतात.) zee च्या शो मधे टेकनिकली पर्फ़ेक्ट गाणारे किती सिंगर आहेत ? हे सगळ लोकांच्या भावनाशी खेळण्याचा प्रकार आहे..गेम सगळा sms साठीच आहे.


Slarti
Monday, August 20, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मुळात त्यांनी नकारच द्ययला पाहीजे. नकार दिला तर मी त्याचे समर्थन करेन कारन पाक हा त्यांचा देश आहे व त्यांनी त्यांचा देशाचीच गाणि (स्वातंत्र्याचा थिम वर) म्हणायला पाहीजेत. दुसर्या देशाची नाही. मग चुकले कुठे.

केदार, अनुमोदन. बळजबरी करू नये हेही पटते.
पण 'ते मैत्रीचा हात पुढे करत नाहीत म्हणून आपण करू नये' याने ना आपल्या वर्तनाचे समर्थन होते ना त्यांच्या. दोन्ही बाजूंनी आखडूपणा केला तर मैत्री जाऊ दे संवादसुद्धा होणार नाही, कोणीतरी (बेसावध न राहता) साद तर घालायला हवी...
बाकी त्यांची publicity, marketing इ. तंत्रांवरची हुकूमत मला कौतुकास्पद वाटते. reality shows हे वर्तमान समाजमनाचा एक साधारणसा अंदाज देण्यासाठी उपयुक्त आहेत असे माझे मत.


>>> त्या पाकिस्तानी शेंबड्याला...

हे अगदी आतून आतून आलेसे वाटते... 'आपला तो बबडू, त्यांचा तो शेंबडू'
~D ~D


Farend
Tuesday, August 21, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे नक्की काय झाले माहीत नाही, पण पाकी गायकांना भारतीय (देश भक्तीपर) गाणी म्हणायला एव्हढा काय प्रॉब्लेम झाला? एरव्ही सुद्धा लोक जी गाणी म्हणतात ती सर्व त्यांची स्वत:ची मते नसतातच ना?

आणि त्यांना एव्हढे लक्षात आले नाही की बरेचसे स्वातंत्र्य युद्ध दोन्ही लोकांनी एकत्रच लढले होते?

अशी कोणती गाणी होती की जी त्यांनी नाकारली?


Satishmadhekar
Tuesday, August 21, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात आपल्या शत्रूराष्ट्राच्या नागरिकांना भारतात बोलवण्याची कोणाची आयडिया? जो देश त्याच्या जन्मापासून आजतगायत आपला शत्रू आहे त्या देशाच्या नागरिकांचं एवढ कौतुक कशाला?

ज्याप्रमाणे साप व मुंगसाची मैत्री होणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे भारत व पाजीस्तानमध्ये मैत्री संबंध अशक्य आहेत. पाजीस्तान हा आपला भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातला देखील शत्रू आहे हे गृहीत धरूनच त्या देशाशी संबंध ठेवले पाहिजेत.


Giriraj
Tuesday, August 21, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारेगमप, indian Idol आणि ईतरही सगळे reality show हे तद्दन बाजारू प्रकार आहेत. अगदी जावेद अखतरही अश्याच एका कार्यक्रमात दिसतो... परिक्षकांमधली 'तू तू मई मई' मला इतकी नाटकी वाटते की बस्स! एखाद्याने थोडं चांगलं गायलं की असा उदो उदो करतात की हे त्याच्या पाय धुतल्याचेही पाणी पिताना दाखवतिल की काय अशी भीती वाटते. आणि थोडा काही चुकलं की त्याला इतकए टोचतात की पुढेमागे एखाद्याने आत्महत्या केली असेही दाखवतील. मराठी सरेगम मध्ये तर असाच बाजार भरलेला असतो. दाक्षिणात्य दिगदर्शक येऊन हे सगळे शो निर्देशित करतात की काय असेच वाटते. उगाच आपले ढसा ढसा रडतात काय नी काय काय! सगळा वीट आणणारा आणि स्वतचे खिसे भरणारा मामला आहे. त्यावर विचार करणे तर दुरच पण अश्या कार्यक्रमांना मह्त्व देणेही नकोसे वाटते! त्यामुळे हा फ़क्त पैश्यांसाठीचा मामला आहे इतके समजून विसरून जावे!
धन्यवाद! :-)


Santu
Tuesday, August 21, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात आड्यात नाहि तर पोहर्‍यात कुठुन येनार
त्या पाकड्याना आपली गाणि कशी म्हणु वाटतिल?

आपन भाबडे म्हणुन तर अजुन इक्बाल चे सारेजहासे अच्छा अजुन
कवटाळुन बसलोय(हा हाच इक्बाल जिना चा गुरु) त्यापेक्षा
वंदेमातरम हेच खर आपल राष्ट्र्गीत व्हायला पाहिजे होते.
पण नेहरुच मुस्लिम प्रेम त्यावेळि जाग झाल.

केदार

आणि कसले हे हो संबध सुधारणार. अहो पाकिस्तान हेच मुळात
आपल्या गळ्याला नख लावायला बनलय.काश्मिरात रोज पाहतोयसच की आपण आणि गाणि कसलि म्हणाताय?


Chinya1985
Tuesday, August 21, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती, तो विशाल शेखरचा पाकि शेंबडयासारख गाण म्हणतो. तो पाकि आहे म्हणुन म्हटल नव्हत मी. त्याच्यापेक्षा आपला अभिजित कितितरि पटिनि चांगला होता,जॉय पण चांगला होता. तो फ़क्त पाकि आहे म्हणुन टिकुन आहे. मी फ़क्त एका पाकिबद्दल लिहिल होत. बाकी मुसर्रत आणि दुबईकर पाकी खरच चांगले गातात. मी त्यांना नव्हत म्हटल काहि. त्यामुळे ''आपला तो बबडू, त्यांचा तो शेंबडू' ' हे माझ मत नव्हत असो तो पाकि आहे म्हणुन तो रहायलाच हवा अस तुम्हाला वाटत असाव. तसे असेल तर दररोज मत देण्यास sms करत जा.

केदार हे तिघे त्रिशंकुत आले कारण झीवाल्यांना तस हव होत व्होट वगैरे नाटक फ़क्त.


Sanghamitra
Tuesday, August 21, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या सगळ्या तमाशाला आपण इतके महत्व देतो म्हणूनच तो दाखवतात. त्यात काही चारदोन बरी गाणी असतील ती ऐका आणि बाकी सगळे विनोदी कार्यक्रम म्हणून बघा. मला तर indian Idol च्या गाण्यांपेक्षा अनू मलिक आणि अलिशाचे संवाद खूप आवडतात :-)
फक्त sms करून पैसे वाया घालवू नका.


Kedarjoshi
Tuesday, August 21, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीतरी (बेसावध न राहता) साद तर घालायला हवी>>>>>
बरोबर स्लार्टी पण त्या सादेचे प्रत्येक वेळी वेगळेच पडसाद असतात. तो मुशरफ भारतात येऊन कसा निघुन गेला हे प्रत्येकाने पाहीले आहे. असे असता दरवेळी हिंदुस्थानी पाकी भाई भाइ चे नारे आहेत ते डोक्यात जातात. साद कितीदा घालायची याची मर्यादा आपण ओळखली पाहीजे असे वाटते.
म्हणुनच दरवेळी जे गोतम बुध्द्दाचे, रामाचे पालुपद लावले जाते ते ईथे योग्य वाटत नाही कारण मग ईतिहासातून आपण काही शिकत नाही असा अर्थ वाटत आहे. (नजीकच्या ईतिहासातुन पण) ज्या देशाने नेहमी शस्त्रे पुरवने व दंगली घडवने व आपल्या डॉन्स ना सहकार्यकरने एवढेच केले ते मैत्री काय करनार. (दरवेळी आपल सियासती लोक व जनता यात फरक करायचा) अरे सियास्ती लोक हे जनतेतुनच येतात ना मग परत का भांडता?

चिन्या बरोबर त्यांना त्रीश्नंकुत आनुन जनमत त्यांचा साठी तयार करणे हे आवडले नाही.

(म्हनुन ही चिडचिड बाकी तो कार्यक्रम मी पाहातो पण मत देत नाही). अशा कार्यक्र्मा मुळे जनमत बदलत असत कारण मिडीया जनतेवर प्रभाव टाकत म्हणुन ही पोस्टापोस्टी.




Slarti
Tuesday, August 21, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अरे सियास्ती लोक हे जनतेतुनच येतात ना मग परत का भांडता?

हा प्वाइंटाचा मुद्दा आहे. त्यांच्या सियासती लोकात कोणी मैत्रीवादी आहेत का ?
केदार, या विशिष्ट कार्यक्रमामुळे जनमतात काय बदल होइल असे वाटते ?
चिन्या, ~D याचा अर्थ दिवा घ्यावा.
( btw , मी यातील कुठलेच कार्यक्रम पाहिले नाहीयेत, पण काही पुणेरी सवयी जाता जात नाहीत.)


Slarti
Tuesday, August 21, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे नक्की काय झाले माहीत नाही, पण पाकी गायकांना भारतीय (देश भक्तीपर) गाणी म्हणायला एव्हढा काय प्रॉब्लेम झाला? एरव्ही सुद्धा लोक जी गाणी म्हणतात ती सर्व त्यांची स्वत:ची मते नसतातच ना?

But amol, this might be considered as a personal judgement call. Every singer has the freedom to draw his/her own boundaries in this context. Is it justifiable to force somebody to modify those boundaries ?

Kedarjoshi
Tuesday, August 21, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हाच कार्यक्रम नाही तर आजकाल हिदीं पाकी भाई भाई ला उत आलाय. तसाच एक विनोदी कार्यक्र्म सोनी वर पण होता मागे लोकसत्ताचे काही रिपोर्टर तिकडे गेले होते त्यांनीही असेच मांडले की तिकडील जनतेला आपल्या विषयी फार आदर आहे. मग पाकव्याप्त काश्मीर मधील ट्रेनींग सेंटर्स की लोक का पाडत नाहीत? अति आदर असल्यामुळे वा कारगील जेव्हा झाले ६ वर्षापुर्वी तेव्हा निदान निदर्शने तरी का केली नाहीत?

झी, सोनी अन ईतर वाहीन्यांना पाक मध्ये एन्ट्री हवी आहे त्या साठी ते असे मन जुळविन्याचे कार्यक्र्मक घेत आहेत बाकी काही नाही एक व्यवसाय म्हणुन हे सर्व चालु आहे व ते सामान्याना लक्षात येत नाहीये.

मिडीयाचा फार मोठा प्रभाव असतो. बहुतांश जनता ही स्वतच्या मता प्रमाने जगत नाही तर दुसर्यांचा मता प्रमाने जगते. (नाही तर अफवा पसरल्याच नसत्या). जे आपल्याला कळत नाही वा जे आपल्या मर्यादेच्या बाहेर आहे त्याचे उत्तर आपन प्रिंट मिडीयातुन शोधतो.
जर असाच खोटे मत मांडने चालु राहीले तर काही काळाने ते खरेच वाटायला लागते. (बघ आपल्यालाच नाही का ईराक व आधी हल्ला केला ते योग्य केले असे वाटले व नंतर सत्य कळाले).

हे दोन देश माझ्यामते तर कधीही कुठल्याही बाबतीक ऐक्यावर येउ शकत नाहीत कारण दोन्ही कडील द्वेश. उगीच मोठे शब्द मिडीयात वापरले की वाटत की मुळ मानुस पण तसाच असेल. पण तसे नसते हे मुशर्फ ने दाखवुन दिले तरी आपण दाढी कुरवाळतो याचा खेद वाटतो.
जे १३ की २३ कलम भारताने अमेरिकेला सहकार्य करन्यासाठी दिले होत (ज्याची पाक ने पुर्ती करायची होती ती झाली नाही) ते मांडल्या जात नाही पण सारखे तिकडले व आपले कल्चर एक आहे हे मांडल्या जाते Come on तो देश आपलेच एक अंग होता हे लोक विसरले का?

त्यांचा सियासत मध्ये मला नाही वाटत कोणी भारता बद्दल उदार मत ठेवुन आहे कारण भारत द्वेशावर तिकडे लोक निवडुन येतात. म्हणुन ही नाटक नको वाटतात.


Deepanjali
Tuesday, August 21, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात आपल्या शत्रूराष्ट्राच्या नागरिकांना भारतात बोलवण्याची कोणाची आयडिया? जो देश त्याच्या जन्मापासून आजतगायत आपला शत्रू आहे त्या देशाच्या नागरिकांचं एवढ कौतुक कशाला?
<<<<अरेच्या , असं कसं म्हणता !
संगीत का विष्वयुध्द म्हणजे सगळ्या देशातले लोक येतात तसेच पाकिस्तानी:-)
WC cricket मधे जर एखाद्या पाकिने चांगली कामगिरी केली तर तुम्ही कौतुक करत नाही का त्या player चे ?
केवळ पाकिस्तान आपला शत्रु आहे म्हणून पाकिस्तानी गायकांना चांगले गात असले तरी त्यांना नावं ठेवायची का ? :-)
मझ्या मते अमानत अली आणि मुस्सरत खरच सुरेख गातत आणि आपल्या देशातल्या लोकांनी त्यांना vote करणे किंवा त्यांचे कौतुक करणे यात मला तरी काही गैर वाटत नाही .(
आणि पाकि लोकांचे बॉलीवूड प्रेम पण जग जाहिर आहे .)
जर final 3 मधे अमानत - मुस्सरत बरोबर आपल्या देशी singers मधला ' राजा ' सोडून इतर कोणी अला तर मी तरी अमानत किंवा मुस्सरत ला च vote करीन . :-)
बाकी मलाही परवाचा emotional drama पूर्ण पणे arranged वाटला , सगळा TRP साठी drama आणि I guess त्यांचा प्रयत्न यशस्वी पण झाला:-)
अर्थात तरीही सारेगमप माझा सर्वात आवडता program आहे .


Deepanjali
Tuesday, August 21, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि राहिलं त्या 15 th Aug theme विषयी .
मला वाटतं कि International audience असणार्‍या show मधे तरी असा sensitive topic निदान voting च्या episode मधे ठेवायला नको होता .
पाकि लोकांनी आपली देश भक्ती गाणी गावीत असं expect च कस केलं ?
आपले contestnats त्यांच्या देशात जाउन अशी गाणी गातील का ?
आणि गायलीच तर अपल्या देशाचे लोक त्यांचे स्वागत कसे करतील ? :-)
अर्थात परवा झी ने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं , infact सकाळ मधे आलं होतं कि जुनैद ला ' मेरा रंग दे बसन्ती चोला ' गायचं होतं , ते झी टीव्ही टिम ने गाउ दिलं नाही म्हणे .
Anyways, शेवटी सगळ्यांनी अपापल्या देशाची गाणी म्हंटली हेच बरोबर आहे .



Tiu
Tuesday, August 21, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतांश जनता ही स्वतच्या मता प्रमाने जगत नाही तर दुसर्यांचा मता प्रमाने जगते. (नाही तर अफवा पसरल्याच नसत्या).>>>

खरंय...जसं गणपती दुध प्यायल्याची अफवा!
infact हे वाक्य तुम्ही 'देव' म्हणजे काय? ह्या BB वर टाकायला हवं. :-)


Vijaykulkarni
Tuesday, August 21, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकसत्ताचे काही रिपोर्टर तिकडे गेले होते त्यांनीही असेच मांडले की तिकडील जनतेला आपल्या विषयी फार आदर आहे. मग पाकव्याप्त काश्मीर मधील ट्रेनींग सेंटर्स की लोक का पाडत नाहीत?

"मग आमचा काश्मिर अम्हाला का देवून टाकत नाही ? "

असा प्रश्न एखाद्या पाकड्याने विचारला तर :-)


Kedarjoshi
Tuesday, August 21, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुळकर्नी तुम्ही गल्लत करताय. नेहमीसारखी. आपल्या देशात ते लोक चांगले कसे हे मांडले जाते (नेहमी) त्यांचा देशात आपन कसे हे नाही. मुद्दा असा आहे की पाक चे लोक कसे चांगले आहेत व आपले कल्चर कसे एकच आहे याचा गवगवा जो केला जातोय त्याचा मी विरोध करतोय.
म्हणुन मी तो प्रश्न विचारला की एवढा भारतीयांबद्दल पुळका आहे तर मग ते ट्रेंनींग सेंटर पाडा वा निदान त्याला विरोध करा.
आपल्या देशात पाक मध्ये कसे दंगे करावेत याचे ट्रेंनींग सेंटर नाहीत याची आपन नोन्द घ्यावी.

बघा एकतर्फी प्रचारास तुमच्या सारखे विचारी लोक देखील बळी पडतात तर आमच्या सारखे सामान्य का नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators