|
Uday123
| |
| Thursday, August 02, 2007 - 11:46 pm: |
| 
|
धन्यवाद विनय लिंक बद्दल, व्यर्थ न जाओ हे बलिदान. आपण किती स्वार्थी होत आहोत याची पुन्हा एकदा जाणीव झाली. देशाच्या रक्षणार्थ धारातिर्थी पडलेल्या विराला कोटी प्रणाम. असे का व्हावे थोडा विचार केल्यावर असे वाटते की अशा बातम्यांची लोकांना सवय झाली आहे, तेच ते वाचून लोकांच्या संवेदना बोथट होतात. आता हनीफ़ची बातमी म्हणजे एकदम सनसनाटी, अगदी (मतांसाठी लाचार) मुख्यमंत्र्याला पण भेट घ्यावी असे वाटले, नोकरीची हमी पण देऊ केली. संजय दत्त साठी सहानभुती जरुर वाटते, घडलेल्या घटने बद्दल त्याला पश्चाताप होतो आहे हे त्याच्या फ़ोटो वरून तरी दिसते, हे ही नसे थोडके. पण प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. AK-४७, ५६ हे काही खेळणं नाही आहे.
|
'मुन्नाभाई ' हे कॅरेक्टर संजय दत्त ने public symphathy मिळविण्यासाथी मुद्दाम घेतले होते. त्याला झाली शिक्षा योग्यच आहे. <<<<<ते कॅरेक्टर च असे लिहिले आहे कि कुठल्याही actor नी नाकारले नसते .. इतके powerful character मुद्दाम स्वत : साठी बनवून घेण्या इतके डोकं संजु बाबा किंवा कुठल्याही actor मधे असेल असं वाटत नाही . त्याचं credit राज कुमार हिरानी ला दिलं पाहिजे .. असो , पण मुन्नाभाई च्या role साठी संजु बाबा first choice नव्हता , त्याला जिम्मी शेरगिल चा role दिला होता म्हणे आधी .
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 5:28 pm: |
| 
|
आता बरखा दत्त, म्हणजे संजयच्या बहिणीने, सोनिया गांधीची भेट घेतली. त्या नंतर तिचा बाईट टिव्हीवर दाखवत होते. कसेही करुन संजयला जेलबाहेर काढायचे, असे ती म्हणत होती. आता सोनिया, इथे काय करु शकते ते दिसेलच. मेरा भारत महान.
|
संजयला झालेली शिक्षा हि फ़क्त २००९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन केलेल कृत्य आहे. न्यायमुर्ती श्री कोदे यांच्यावर देखिल संजयला शिक्षा करण्याचे दडपण होते हे नक्कीच. केवळ मुसलमांनांचे लांगुलचालन करण्यासाठी संजय दत्तला बळीचा बकरा बनवल गेल आहे हेच खर! मागिल सुनावणीच्या वेळेस याकुब मेमनने न्यायपालिकेत केलेला थयथयाट आणि त्यांने उधळलेली मुक्ताफळे याचाच हा परिपाक आहे आमची न्यायपालिका देखिल किती निधर्मी आहे याचे दर्शन घडवण्यासाठीचा हा अट्टाहास आहे यात संशय नाही. संजयने स्वतःजवळ अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा नक्की केला आहे पण म्हणुन त्याला इतकी कठोर शिक्षा व्हावी हे नक्कीच योग्य नाही. " असंगाशी संग" कधीही वाईट हेच खरे! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
संजयने स्वतःजवळ अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा नक्की केला आहे पण म्हणुन त्याला इतकी कठोर शिक्षा व्हावी हे नक्कीच योग्य नाही. >>>>> Indian Arms Act section3 read with 25 मध्ये या शिक्षेचा रेन्ज ५वर्षे ते १० वर्षे सक्तमजुरी आहे. या पेक्षा कमी शिक्षा म्हणजे फार तर ५ वर्षे झाली असती. शिवाय मुम्बई हे टाडा एरीयातील नोटीफाईड क्शेत्र आहे. त्यामुळे ही शिक्षा तशी कमीच आहे.संजयाने बाळगलेली शस्त्रे फक्त युद्धातच वापरतात. यावरून त्याचे गाम्भीर्य स्पष्ट व्हावे.पूर्वीही अशा शिक्षा झालेल्या आहेत फक्त ते गुन्हेगार सेलीब्रेटी नसल्याने तुमचे लक्ष गेले नसावे. तुम्ही बाळगून बघा तुम्हालाही तेवढीच शिक्षा होईल! आता बरखा दत्त, म्हणजे संजयच्या बहिणीने>>> दिनेश भौ सन्जयच्या बहिणीचे नाव नम्रता आणि प्रिया दत्त आहे. बरखा दत्त पत्रकार आहे. मला वाटते सुनील दताना ३ च मुले आहेत.
|
Pancha
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:26 am: |
| 
|
त्याला शिक्शा झालि हे योग्य पण त्याला अंडा सेल मधे ठेवणे हे पण अति आहे.
|
dineshv तुमच्या साठी एक correction बरखा दत्त ही एक प्रख्यात tv reporter असून निस्प्रुह समजली जाते.ती सन्जय दत्त्ची बहीण नाही.तीने कुठलीही रदबदली केली नाही.प्रिया दत्त ही सन्जय ची बहीण आहे
|
Dineshvs
| |
| Saturday, August 04, 2007 - 4:32 am: |
| 
|
हो चूक नंतर लक्षात आली खरी. बरखा दत्त, जास्त लक्षात राहते ना. असो पण एका राजकिय नेत्याने, जिच्याकडे कसलेच पद नाही, न्यायप्रक्रियेत हस्तक्षेपाचे संकेत द्यावे, हे अत्यंत चूक आहे. सोनिया, प्रतिभा पाटिलवर पण दबाव आणु शकते. न्या. कोदे यानी पण तु तुझ्या क्षेत्रात नंबर वन आहेस, शंभर वर्षे अभिनय कर, मी फक्त तुझी सहा वर्षे घेतली, असे वक्तव्य केले, तेही चूकच होती.
|
दिनेश, कोदे यांनी जे वक्तव्य केले त्यात मला तरी काही चूक वाटले नाही. (निदान वर्तमानपत्रात कोदे यांच्या नावाने जे छापले त्यात.. "चुका सर्वांकडूनच होतात तशी ती तुझ्याकडूनही झाली. तुझ्या व्यवसायात(अभिनय) तू चांगले नाव कमावले आहेस. अगदी या खटल्याची टांगती तलवार डोक्यावर असतानाही तू उत्तम यश मिळवलेस. आता झालेली शिक्षा हा तात्पुरता अडसर आहे असे समज, आणि मनाने खचून जाऊ नकोस.") बाकी संजय दत्तला जेवढी काही शिक्षा झाली आहे, निदान तिची तरी कडक अंमलबजावणी केली जावी - कुठल्याच विशेष सवलती न देता - या मताचा मी आहे.
|
संजय दत्तला शिक्षा होईल हे तो आधीपासून जाणून होता. पार्टनर हा तीन वर्षे रखडलेला चित्रपट त्याने दिवस रात्र काम करून संपवायला लावला. मुन्नाभाई साठी आधी शाहरुख ही चॉईस होता. पण त्याच्या पाठदुखीमुळे तो पिक्चर संजय दत्तकडे गेला. मुळात त्याची शिक्षा भोगायची मानसिक तयारी झालेली आहे. कोदेनी जे त्याला सांगितलं त्याचा त्याने आधीच विचार केला आहे. चौदा महिने शिक्षा त्याची कमी झालेलीच आहे. चांगल्या वर्तणूकीवर अजून सहा महिने कमी होईल. त्यानंतर त्याचे करीअर परत भरारी घेईल याची त्याला खात्री आहे. आता तुम्ही म्हणाल, मला कसे माहीत? (माझे अजून काही सोर्स मला माहिती देतात. इतकेच सांगु शकेन) प्रिया दत्तची प्रतिक्रिया स्वाभाविक होती. कुठलीही बहीण भावला बाहेर काढायचेच असे म्हणेल त्यात गैर काहीच नाही. उलट आतापर्यनंत संजयने न्यायालयाच्या कक्षेत राहूनच काम केले आहे. सेलेब्रिटीचा अकांडतांडवपणा त्याने कधीच केला नाही. संजयला अंडा सेलमधे ठेवले त्याच्या सुरक्षेसाठी. कारण बाकीचे गुंड ( दुसर्या टोळीतले ) त्याला धोका पोचवू शकतात. सध्या तो येरवड्यामधे आहे. आता तरी त्याला जामीन मिळू शकेल कारण तो arms act मधे आत गेला आहे, टाडामधे नव्हे.
|
Zakasrao
| |
| Saturday, August 04, 2007 - 8:55 am: |
| 
|
रॉबिन तुमच्या पोस्ट मस्त आहेत. संजयला कायद्यातील तरतुदीनुसारच शिक्षा झाली आहे. अजुअन्ही त्याची बहिण प्रिया दत्त ही त्याला सोडवणे ह्यासाठी प्रयत्नशील आहे. आता फ़क्त सुप्रिम कोर्ट हाच त्याला सुटण्याचा मार्ग आहे दुसरा काहीच नाही. आणि जर JJ सारखा मार्ग वापरला तरी ६ वर्ष खुप आहेत त्यामुळे तो जेल मधे राहणारच हे नक्की. दुसरी गोष्ट त्याला शिक्षा झाली त्यामुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास माझातरी अजुन वाढला आहे. बाकिच्यांच माहित नाही. ह्या पुर्ण खटल्यात न्यायाधीशानी पुर्ण कायद्याच्या चौकटीत राहुनच सगळे निर्णय दिले आहेत. त्यांच खरतर खुप कौतुक वाटत मला. आणि हो सगळ्यात महत्वाच ते अफ़झल गुरु आणि ह्या Bb चा काय संबध???? हा BB संजय दत्त आणि टाडा असा आहे. मी सुरवातीला वाचुन गोंधळुन गेलो की अफ़जल इथे काय करतोय म्हणून.
|
इथल्या हिन्दुत्व वाद्यांसाठी वाईट बातमी!! .... ... ... ... ... ... संघाने संजय दत्तच्या शिक्षेचे स्वागत केले आहे!!
|
Dineshvs
| |
| Saturday, August 04, 2007 - 1:04 pm: |
| 
|
गजानन, मी पेपरमधे जे प्रसिद्ध झालय, त्यावरुनच लिहिले. स्वतःच्या निर्णायाबद्दल न्यायमूर्तीनी बोलायची प्रथा नाही. जर शिक्षा कायदेशीर तरतुदीनुसारच झालीय, तर अशी चर्चा अनावश्यक होती. आपल्या न्यायसंस्थेत अजुनही थोडासा डिस्क्रिशनचा भाग आहे, त्यामूळे अनेकदा वरच्या कोर्टात निर्णय बदलतात. केवळ लॉ पॉईंट असेल तरच वरच्या कोर्टात अपील व्हावे, पण तसे होत नाही.
|
न्या.कोदे जरा अनावश्यकच बोलले असे माझेही मत आहे.. मुळातच संजय चा निकाल सगळ्यात शेवटी ठेवणे वगैरे हे सगळे ड्रामॅटिकच वाटले... मात्र उज्ज्वल निकम यानी बॉलीवूडला चांगले नीट केले हे चांगले झाले. त्यानी म्हटले की बॉलीवूडमधले पब्लिक न्या.कोदेंच्या निकालावर टीका करीत आहेत त्यांच्यावर गरज पडल्यास Contempt of the Court Act खाली कारवाई करण्यात येईल... मुन्शीबोवाचेही डोके फिरले आहे. त्यानी खरे तर राजीनामाच दिला पाहिजे... नन्दिनी म्हणते त्याप्रमाणे संजयला शिक्षा होणार याची कल्पना होतीच कारण विरुद्ध निकाल लागल्यानन्तरचे प्लॅनिन्ग त्यांची वकील मंडळी करीत असतातच... ज्याने आपण आत जाणार हे गृहीत धरून पिक्चर पूर्ण केले त्याने वडिलांच्या जायदादची व्यवस्था लावली नाही ही गोष्ट पटायला कोर्ट दुधखुळे आहे काय? इथे कोणी म्हणाले त्याने स्टारडमचा माज दाखविला नाही. ते एक नाटकच होते कोर्टाची सहानूभूती मिळवण्याचे. aurthor Road तुरुंगात त्याने नन्तर जे नखरे केले ते वाचले नाहीत का? शेवटी त्याला शिक्षा आणखी वाढवावी लागेल अशी धमकी दिल्यानन्तर तो सरळ झाला. त्याच्या मुलीला लिहिलेल्या पत्रातही त्याचा हा उद्धटपणा दिसून येतो... सुनील दत्त हा चांगला माणूस होता पण त्यानेही मुम्बईच्या दंगलीत बेहरामपाड्यात आलेल्या लष्कराला आडवे होऊन परतवले होते हे विसरता कामा नये. अशा दत्ताला बाळासाहेबानीही मदत केली होती यात काय अर्थ आहे...? देशद्रोही व्हायला प्रत्यक्ष कारवायात भाग घ्यायलाच पाहिजे असे नाही. अन्डरवर्ल्डला प्रतिष्ठा मिळवून द्यायचे मोठे पाप संजयने केले आहे. म्हणे वाट चुकलेले बाळ! ! अशी अनेक वाट चुकलेली मुले मी सेन्ट्रल जेलमध्ये अन्डरट्रायल म्हणून पाहिली आहेत त्यांच्यासाठी नाही कुणी माफीची मागणी केली? त्याने का प्रसिद्धी आणि बॉलीवूडमध्ये कामे मिळतात? ये सब पब्लीकको मामू बनानेका फन्डा है भाय...
|
Dineshvs
| |
| Sunday, August 05, 2007 - 10:09 am: |
| 
|
रॉबीन, आजच्या लोकसत्तामधे एक लेख आलाय. त्यात या खटल्याची एक वेगळी बाजु आहे. तब्बल चौदा वर्षे लागली निकाल द्यायला ? तेसुद्धा खास न्यायालय असुनही !!! यातला एकही दिवस दोन्ही सत्रात खटल्याचे कामकाज चालले नाही. कुठल्याही मुद्द्यावर या विलंबाचे समर्थन होवु शकत नाही. आणि या बॉंबस्फ़ोटात जे बळी, गेले त्याना न्याय मिळाला असेही वाटत नाही.
|
मुन्नाभाई साठी संजय दत्तच बरोबर option होता. शाहरुख खान नुसताच रडला असता न्यायाधीशांनी संजयशी केलेली बोलणी मला काही चुक वाटत नाहि. त्या गोष्टीला मिडियावाल्यांनी फ़ारच फ़ाल्तु महत्व दिले. माझाही न्यायव्यवस्थेवरिल विश्वास वाढला आहे या निकालामुळे. 'जय महाराष्ट्र',जर निवडणुकांकडे लक्ष ठेउन हा निकाल असेल तर मग प्रियरंजन दास्मुन्शी,कपिल सिब्बल यांनी शिक्षेला सरळसरळ विरोध केलाच नसता. रॉबिन संघाबरोबरच भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी पण निर्णयाचे स्वागत केले आहे. आर्थर रोड जेलमधे त्याने कुठले नखरे केले??मुलिला पत्रात काय लिहिले ज्यातुन उध्दटपणा दिसतो?? दिनेश, उज्वल निकम यांचे असे म्हणने आहे की आरोपिंना या खटल्याचा निकाल लांबवायचा होता आणि त्यामुळे त्यांनी सर्व प्रयत्न केले
|
ये सब पब्लीकको मामू बनानेका फन्डा है भाय... >>> एकदम बराबर बोलेला है. व्यक्ती आणि स्टार, कर्तुत्व आणि दिखावा याची गल्लत बरेच जन करत आहेत त्यामुळे हा गोंधळ. वास्तव, मुन्नाभाई वैगरे पिक्चर हिट झाले नसते तर ह्याच पुजार्यांनी त्याला झालेली शिक्षा बरोबर आहे व ती कशी योग्य आहे ह्याच्या मुलाखती दिल्या असत्या व त्यावर लिहीले असते. (आठवुन पहा खलनायक च्या वेळीचे पेपरातले लेख). ते बेहरामपाड्यात आडवे पडने म्हणजे एकदमच भारी. च्यायला RAF ने त्याला तुडवुन जायला पाहीजे होते. ( BTW मला ही " मुन्नाभाई " आवडतो पण त्या साठी त्याची शिक्षा कमी व्ह्याला नको.)
|
Chyayla
| |
| Tuesday, August 07, 2007 - 1:49 am: |
| 
|
कायद्यापुढे सगळेच समान असावेत भले तो स्टार असो वा कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलगा असो, हिंदु असो वा मुसल्मान. शेवटी काही झाले तरी तो एक अभिनेता आहे, नेता आणी अभिनेता यात गल्लत नसावी. त्याला शिक्षा झाली हे योग्यच आहे. त्याच्याकडे ती AK-56 आलीच कशी ते काही साधे सुधे शस्त्र नाही. शस्र बाळगणे हा गुन्हाच आहे व त्यात पुर्ण न्यायप्रक्रिया होउनच योग्य शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरी बाजु अंडरवर्ल्ड व सिनेस्रुष्टी यांचे संबंध किती खोलवर असु शकतात हे लपुन राहिलेले नाही. संजुबाबा च्या निमित्याने केवळ एक टोकच दीसुन आले असावे, आपला नाचर्या गोविंदा व ईतर अनेक कलावंतांचेही असेच लागेबांधे जुळलेले असल्याचे ऐकिवात आहे. रॉबीनहुडाने ईतके चांगले मुद्दे मांडुनही एका ठीकाणी संघ, हिंदुत्ववादी असे शब्द वापरुन खाजवुन घेतलेली दीसतेय. काही का असेना रॉबीनने न कळत संघाचीच बाजु उचलुन धरली व अप्रत्यक्षपणे संघाचाच प्रचार केल्याची शंका जाणवतेय... असो आपले अभिनंदन तरी मला हा सतिश माढेकरांचा गुगली असावा अशीही शंका येत आहे... नुसता "संशय कल्लोळ" माजलाय ईथे. ( BTW संजुबाबाची शिक्षा योग्य हे मला वैयक्तिकरित्या वाटते) मलापण हुडाचे बरेचसे मुद्दे पटलेत... लगे रहो हुडाभाई...
|
>>> तरी मला हा सतिश माढेकरांचा गुगली असावा अशीही शंका येत आहे. माझा कसला हो गुगली? रॉबीनहूड कसलेले फलंदाज आहेत. ते समोरचा गोलंदाज कुणीही असला तरी गुगली, बाउन्सर, चायनामन असा कुठल्याही प्रकारचा चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून देतात.
|
न्यायाधीश कोदे संजयशी बोलले हे चुकिचे आहे अस बर्याच लोकांच मत होत. पण ते फ़क्त संजय दत्त नाही तर इतरांशिहि तसे बोलले आहेत ८३ वर्षाच्या एका आरोपिला पण त्यांनी काय आजार आहे वगैरे चौकशी केलि तसेच व्यवस्थित औषधे घ्या वगैरेहि सांगितले. मिडियावाल्यांनी संजयशी बोलण्यालाच फ़ाल्तु महत्व दिले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|