Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 07, 2007 « Previous Next »

Zakki
Friday, August 03, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैज्ञानिक <waidnyAnik>
references सापडले (म्हणजे घरीच आहेत, माझ्या संग्रहातल्या पुस्तकांत, पण शोधावे लागेल)की देतो.

मी तर प्रथमपासूनच म्हणतो आहे की देव ही एक संकल्पना आहे, पण ती हजारो वर्षे चालत आली आहे, म्हणून सगळे लोक मानतात. आपण सुदैवी कारण आपले तत्वज्ञान आपल्याला पूर्ण मुभा देते की काही हि करा, कशीहि भक्ति करा किंवा नाही केली तरी तुम्हाला कुणि शिक्षा करणार नाही. ख्रिश्चन किंवा त्याहून वाईट म्हणजे मुसलमान धर्मापेक्षा बरे.

देव असल्याचे सर्व पुरावे हे वैयक्तिक रीत्याच तपासून घ्यायला पाहिजे. शिवाय त्याला वर्षानुवर्षे लागतात. ते मला जाणवले तरी मी इतरांना पटवून देऊ शकत नाही. त्यामुळे स्वत: अनुभव घेणे किंवा दुसर्‍यांना देणे, हे करायला आजकाल जमत नाही.

Instant चा जमाना आहे. म्हणून मग 'राहू ते देव, कशाला उगीच त्याचे स्तोम करायचे, नि वेळ घालवायचा,' अशी वृत्ति होते. साहाजिकच आहे.

हजारो वर्षात इतके लिहिल्या गेले आहे की त्याने नुसता गोंधळच फार होतो, स्पष्ट काही समजत नाही. मग 'बुवाबाजी' ला उत येतो, नि देव मानणार्‍यांचे आणखी हसू होते.

म्हणून मी आजकाल या गोष्टींचा विचारच करत नाही. माझी गोष्ट म्हणजे 'करून सवरून भागले नि परमार्थाला लागले' अशी आहे. रिटायर झाल्यावर वेळ असतो म्हणून नि जुने संस्कार इतके thick त्यामुळे अजाणता सुद्धा देवाची प्रार्थना वगैरे करतो. बाकी यथेच्छ मांस मच्छि, दारू सगळे चालते. त्याने प्रार्थना म्हणण्यात व्यत्यय येत नाही, नि मानसिक समाधानहि होते की असेल जर देव तर घेईल समजून मला, नाहीतर काय फरक पडतो?


Peshawa
Friday, August 03, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti since you are explaining evolution I am interested in knowing how decision making evolved?

with reference to the Dwakin's 'How eye might have evolved' I was interested in knowing how the organism developed/evolved 'faculties' to sort/interpret the new kind of data?

so consider a hypothetical organism who happened to have a new sensory organ by mutation or evolutionary processes. There ought to be generations of that organism with that sensory organ present but no data interpretation skills.

To all these generations this extra organ is nothing but a burden to carry with no apperant advantages how evolution explains this?

to interpret data and to make decisions based on observations; how this is connected to biology?

just curious

Aschig
Friday, August 03, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

> To all these generations this extra organ is nothing but a burden to carry with no apperant advantages how evolution explains this?

It is more likely that data interpretation preferred organisms with slightly better organs at each level and these two grew hand in hand over the millenia

झक्की, Einstein किंवा इतर scientists च्या देवंच्या कल्पनांबद्दल येथील मार्च ८ २००५ चे post वाचा:
/hitguj/messages/58489/113166.html?1145510231

Prafull
Friday, August 03, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I find it funny that we accept it as a scientific fact and not a miracle that our universe (with kind of figures that Aschig stated above) decided to come into existence from a single infinitesmly small point.
I am not challenging big bang theory .. but want to point out that the existence of the universe is based on non-logic. (At time zero there was neither space nor time nor causation , thus no logic) but when we try to discuss god we want to satisfy logical criteria. Its never going to happen.
If one realizes existence of infinity, macroscopic as well as microscopic then one will see God residing everywhere , if not then keep looking. :-)

Aschig
Friday, August 03, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

> universe decided to come in to existence from a point

I do not think there was a decision. Nor do we know what happened before the big bang. Its just that because we do not know we do not have to accept arbitrary theories about it.

(0) God created the Universe
(1) A hen in a much bigger Universe laid an egg which became our universe
(2) It is a fullstop in a short story in Tumbolina which exploded because a child held it under a magnifying glass under their bright sun
(3) The universe is a closed book with an arrangement so that we believe it is the way it is
(4) Only now it seems the universe had a history of 13 billion years. But its changing so funnily that we would have had different theories a million years ago
(5) big bang happened during some indescration
(6) the universe is consistent with its del-E * del-t being smaller that h-cross

I think the best we can do most of the times is to ask "how" things are, rather than "why" they are so (to paraphrase Feynman). It is worth noting that a creator may not be needed to explain the universe (she may exist nevertheless). In particular, appeasing the creator whether or not she exists can not possibly do much to the distant future of an individual (though clearly it could to that of a race by causing unneeded nuclear wars).


Zakki
Saturday, August 04, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते, 'देव आहे' असे म्हणण्यावर आक्षेप येतो, कारण त्याच्या नावाने चाललेला भोंदूपणा, वेळेचा अपव्यय. त्याचे फायदे किंव्हा उपयोग हेहि अनिश्चित्. मग करायचे काय ते देव देव करणे नि त्यापायी वेळ घालवायचा नि स्वत:वर नसती बंधने घालून घ्यायची, हे खा नि ते नको, इ.

त्या कल्पनेवर विश्वास ठेवला काय नि नाही.

Feynman झिंदाबाद. अजून खूप काही शिकायचे आहे, करायचे आहे, नि देवाच्या मागे लागून ते होणार नाही!


Chinya1985
Sunday, August 05, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

science without religion is lame, religion without science is blind ... a legitimate conflict between science and religion cannot exist." .......Albert Einstein
स्लार्ति तुम्ही माझ्या पोस्टलाच अनुमोदन दिलेले आहे एका दृष्टीने. दुसर म्हणजे मी विज्ञानाला अंधश्रद्धा म्हटले नव्हते तर तुम्हाला म्हटले होते. यात फ़रक असा की विज्ञान हे एक क्षेत्र अहे आणि तुम्ही एक individual आहात. शिवाय तुम्ही जर अंधश्रध्दाळु ठरलात तर आम्हिहि ठरतो हे मनात धरुनच मी तसे लिहिले होते. अंधश्रध्दाळु माणुस असतो क्षेत्र नाही. मुळात अंधश्रध्दा म्हणजे जी गोष्ट नाही ती मानणे. मग तुम्ही आज तुमची थिअरि खरि मानुन चालला आहात ति जर उद्या खोटी ठरलि तर तुम्ही त्याआधी चुकिची गोष्ट बरोबर म्हणुन मानत चालला होता म्हणजेच ती अंधश्रध्दा झाली. त्यामुळे पुर्ण विज्ञान अंधश्रध्द नाही होत पण तुमचा stand चुकिचा होता. या गोष्टीची तुलना करण्यामागच कारण हेच की दोन्ही ठिकाणी मानण हे common आहे. तुम्ही लिहिलय गीता भागवत चुकिच असु शकत ही शक्यता मान्य केलि जाईल का????उत्तर अस आहे की प्रत्येक क्षेत्राचे नियम असतात. तुम्ही विज्ञानाचे नियम philosophy ला कसे लावु शकता?? मी मागेहि लिहिल होत की विज्ञान भौतिक पुराव्यांवर आधारित असते व धर्म आध्यात्मिक अनुभवांवर अवलंबुन असतो. मला मंत्र म्हटल्याने आलेले अनुभव तुम्हि चुकिचे कसे आहेत यचे तुम्हि तर्क देउ शकता पण मला आलेला अनुभव तर खराच आहे ना??मग न पटणारा तर्क दिल्यावर आम्हि तो अमान्य केला तर तुम्ही खिल्लि उडवणार. मुळात बरेच शास्त्रज्ञही हे मान्य करतात की या जगाला चालवणारी एखादी शक्ति असावी. मग त्या शक्तिच्या शोधात आम्हि निघालो असल्यास काय चुकल??
शिवाय आमच्या धर्मातिल काहि धर्मपध्दती (उदा. राजयोग) मानण्याच्या विरुध्द आहेत. जे अनुभवास येत तेच बरोबर अस त्यांच म्हणन आहे.


Chinya1985
Sunday, August 05, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धान्याबाबत बॉटनीतिल dormant state समजुन घ्यावि त्यात उत्तर मिळेल.

Very little is known about the size of the universe. It may be trillions of light years across, or even infinite in size.
अशीग तुम्ही दिलेलि माहिति नविन आहे. त्याबद्दल धन्यवाद. मग what is beyond universe?? विश्व संपल्यावर काय आहे मग??
मग जगातिल ज्ञानपण मर्यादित असले पाहिजेल नाहि का??

श्लोक वेळ मिळाल्यावर लिहितो
माझी मागिल पोस्ट्-
"मी अद्वैतवादी नाही तरिहि तुमच्या म्हणन्याप्रमाणे बघितल्यास मी=तु अस अद्वैतवादीही मानतात. पण आपण सर्व मायेने <cover> झालेले आहोत त्यामुळे आपण वेगवेगळे आहोत. पण जेंव्हा आपण मुक्त होऊ तेंव्हा आपण सर्व एकच होउ अस अद्वैतवादी म्हणतात. त्यासाठी ते उदाहरण देतात की नद्या, नाले वेगवेगळे असतात पण ते जेंव्हा समुद्राला जाउन मिळतात तेंव्हा ते एकच होतात त्याचप्रमाणे नदी नाले समुद्रातुनच आलेले असतात त्यामुळे त्यांची खरी <identity> तीच असते. इथे इतर अद्वैतवादी आहेत त्यांनी यावर मत द्याव."



Radha_t
Monday, August 06, 2007 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की आता मात्र तुमच म्हणण १००% पटल.
मुळात बरेच शास्त्रज्ञही हे मान्य करतात की या जगाला चालवणारी एखादी शक्ति असावी. मग त्या शक्तिच्या शोधात आम्हि निघालो असल्यास काय चुकल??
चुकल काहीच नाही. कुठल्या नावेतून जायच हे ठरवायला हव. दोन्ही नावांवर पाय ठेवून जाण्याचा प्रयत्न करणारे कदाचीत कुठेच पोहोचू शकणार नाहीत

Zakki
Monday, August 06, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, राधा.

सुरुवातीला मी पण देव आहेच अशी भूमिका घेतली होती. पण वरचे सगळे वाचून मलाहि पटले की केवळ श्रद्धा आहे म्हणून देव आहे, नाहीतर नाही!


Chinya1985
Monday, August 06, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्कि या चर्चेत अस काय होत की देव नाही हे तुम्हाला पटल???

" in science you have knowledge first and then faith follows
in spirituality faith comes first and then knowledge follows"
.................................... SHRI SHRI RAVI SHANKAR


Vijaykulkarni
Monday, August 06, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" in science you have knowledge first and then faith follows
in spirituality faith comes first and then knowledge follows"
.................................... SHRI SHRI RAVI SHANKAR


there is no faith in science.


Chyayla
Tuesday, August 07, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या चर्चा बरीच पुढे गेलेली दीसतेय..

चिन्याला जे प्रश्न पडलेत ते मलापण पडलेत त्याच उत्तर अजुनही अपुर्ण अशा विज्ञानातुनही मिळाले नाही. Univers च्या बाहेरच जाउ द्या पण स्वता:च्याच प्राणाबद्दल, स्वता: काय आहे हे जरी सांगु शकले तरी पुश्कळ आहे.

झक्की, तुम्हाला देव नाही हे पटले म्हणता... तर माझा एक भा. नि. प्र. आहे कदाचित तुम्ही तरी उत्तर देउ शकाल.

तुम्ही किंवा ईतर कुणीही कितीही म्हटले तरी..
भारतातलेच काय आपण ज्या संतांच्या भुमीतुन आलो आहोत तिथल्याच संत महात्म्यान्नी, ज्यान्नी अनुभव घेतला म्हणतात ते सगळ साफ़ खोट हे मानायला मन तयार होत नाही. तस नसेल तर मग एक प्रकारे ते लोकान्ना फ़सवुन गेलेले बुवाबाजी करणारेच म्हणावेत ना? उदा: संत ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस... ही यादी बरीच मोठी व्हायची. निदान या व्यक्ति खरच होउन गेल्या त्यांची ईतिहासात नोंद व साहित्य अजुनही उपलब्ध आहे नाहीतर राम कृष्णांसारखे हेही काल्पनिक म्हणाले असता म्हणुन यांचीच उदाहरणे देत आहे.

तरी हे सगळे खोटारडे, ढोंगी, बुवाबाजी करणारे होते हे कोणी मला प्रामाणिकपणे पटवुन देइल का? म्हणजे मग मी पण देव नाही असे मानायला नक्कीच तयार होइल. ( BTW सध्या तरी तुमचे म्हणणे ०% पटण्यासारखे आहे.)

राधा.. दोन नावावर पाय ठेवुन जाण्याचा प्रयत्न म्हणजे कोणत्या संदर्भात? काहीच कळाले नाही.


Limbutimbu
Tuesday, August 07, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्यात मुहुर्तानुसार, १८ तारखेला "श्रावण्या" हेत, कुणाला आपापली जानवी बदलायची असतील, किन्वा नव्याने घालायची असतील तर त्या दिवशी पन्चगव्य प्राशन करुन, कणकेची गोळी गिळुन बदलुन घ्या! :-)

Ashwini_k
Tuesday, August 07, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय रे लिंबूटिंबू, हे काय मधेच काढलेस? तुला माहित नाही का, कि सगळे देव कसा अस्तित्वात नाही हे त्यानेच दिलेली बुध्दी वापरून अटीतटीने दाखवण्यात बिझी आहेत. या प्रोसेस मध्ये त्याना बराच घाम गाळायचा आहे.

त्याना अजून हे ही प्रूव्ह करायचे आहे की-----

आपले ह्रदय आपणच मिनीटाला ७२ वेळा आकुंचन प्रसरण करतो,

आपली फ़ुफ़्फ़ुसे आपणच १८ वेळा आकुंचन प्रसरण करतो,

आपल्या आतड्याच्या स्नायूने आपणच ७ ते ८ वेळा अन्न पुढे ढकलतो,

एवढेच नव्हे, तर सर्व माणसांची अंतर्रचना सारखीच असून्ही, सर्वंच्या मेन्दूत सारख्याच रासायनीक क्रिया होत असूनही प्रत्येकाच्या भावना, विचार, प्रतिक्रीया, प्रक्रुती ही वेगवेगळी असते, ती देवाची नाही तर माणसाची स्वतःची किमया आहे.

आता आपल्याच हातून घडलेल्या प्रज्ञापरधामुळे आपले अवयव आपण निकामी करतो त्यात तो देव काय करणार (कर्मस्वातंत्र देउन बसला ना?) (अर्थात, देवच नाही म्हटले तर प्रश्नच मिटला!). त्याने आपल्याला ऊर्जा देण्यासाठी ऊस दिला, पण आपण साखर किंवा गूळाऐवजी दारू निर्माण केली त्याला तो काय करणार?

तेव्हा लिंबूटिंबू, त्याना जानव्याचे सांगून त्यांना डिस्टर्ब करु नको. कदाचित विज्ञानाच्या आधारावर शोध घेताना त्यान्च्या लक्षात येइल की अजूनही काही तरी वर उरलेच आहे की ज्याला का, कसे, कोठून, केव्हा यासाठी उत्तरे नाहीत.





Limbutimbu
Tuesday, August 07, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी खी अश्विनी!
अग या चर्चेच्या गुर्‍हाळात नित्य नैमित्तीक कर्तव्य विसरायला नको कुणी म्हणुन आपल आठवण करुन दिली!

फक्त कृपाकरुन "जानव" नावाची सुती दोरी घातल्यान काय मिळत किन्वा काय होत असा फाटा विषयाला कोणी फोडु नये येवढीच प्रामाणिक इच्छा! :-)

बाकी या बीबीवर कधी तरी अवतरायलाच लागेल!


Chinya1985
Tuesday, August 07, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला अगदि बरोबर मुद्दा.

विजयराव, आधी मागच्या पोस्ट वाचा. त्यात मी आणि स्लार्तिंनी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यात हे स्पष्ट झालेले आहे की सायन्समधेही faith असतो. पुन्हापुन्हा तेच मुद्दे लिहिण्याची इच्छा नाही.


Radha_t
Tuesday, August 07, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतांचे महात्म्य मोठे त्यांना कोण बुवाबाजी करणारे म्हणेल पण त्यांच्यावर रचल्या जाणर्‍या दंतकथांना काय म्हणावे?
संत तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांची प्रतिभा, प्रगल्भता कोणीच अमान्य करणार नाही. तुकारामांच्या विठ्ठलावरील भक्तीला कुणीच challenge करणार नाही.
सगळ सगळ मान्य पण शाळेत असताना आमच्या मराठीच्या बाईंनी सांगितलेली एक गोष्ट आठवते

तुकारामांच्या ओव्या कुणा जलदेवतेने वर काढून दिल्या नाहत्या, तर त्या जनमानसात इतक्या रुळल्या होत्या प्रत्येकाच्याच मुखात त्या इतक्या बसल्या होत्या की त्या पुन्हा लिहिल्या गेल्या. चमत्कार वगैरे दंतकथा.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या नव्हे तर रेड्यासारखी बुद्धी असणार्‍या माणसाच्या मुखातून वेद वदवून घेतले. " प्रयत्ने वाळूचे कण रगडिता ..."

भक्तिचाही एक मार्ग आहे, मोक्ष मिळवण्यासठी. ( मोक्षाचा साधा अर्थ हसत हसत मरण मिळवण्यासाठी. ) मरणाला अंतीम सत्य म्हणतात कारण हे जग नश्वर आहे. आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव असण महत्वाच. उगाच कुठल्याही मोहात अडकून फायदा नाही हे समजून घेण महत्वाच.

यापेक्षाही मोक्ष म्हणजे वेगेळ काही असेल अस ( मला ) वाटत नाही.

तेव्हा भक्ती हा एकच मार्ग आहे अस नाही. ज्ञान हाही एक मार्ग आहेच की. मग इतर मार्गाने जाणारे म्हणतात भक्ती आंधळी असते. देव बीव काही नाही तर त्यांच चुकल कुठे?

Chyayla

दोन नावा समजल्या काय

Nandini2911
Tuesday, August 07, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधाजी, तुमच्या पोस्ट्स वाचून मी गोंधळले आहे. काहीच समजत नाही आहे. जरा प्लीज खुलासा कराल?

Ashwini_k
Tuesday, August 07, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,

नाव नं. १- ज्ञान मार्ग ('ज्ञानाग्नी'= ज्ञान+ अग्नी= आगीत तापून निघालेले पक्के मडके एकदा का फ़ुटले तर खापरी हाती लागतात) हा मोक्ष मागतो. मोक्ष म्हणजे काहीच न उरणे ("तो" दिसला तरी तो कसा आहे हे सांगण्यासाठीही न उरणे). खूप कठीण मार्ग आणि वर पतनभय (रामफ़ळ जसे झाडावरच पिकवून काढावे लागते, आपोआप पडले तर हाती उत्तम फ़ळ लागत नाही.)

नाव नं २- भक्ती मार्ग ('भक्तीग्नी' असा शब्द नाही. कारण भक्ती ही स्वतः शीतल आहे पण उष्ण, स्निग्ध असे गुरूतेज देते). भक्तीमार्ग हा मोक्ष न मागता 'मुक्ती' मागतो. मुक्ती म्हणजे सामिप्य मुक्ती (ईश्वराशी सामिप्य). संत तुकाराम महाराज म्हणतात "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी" म्हणजे, तुझी इच्छा असल्यास परत परत जन्माला घाल पण प्रत्येक जन्मी तुझे सामिप्य दे. फ़ार सोपा मार्ग (सर्व त्याच्या चरणी अर्पून कर्म करत रहाणे, फ़लाशेला पूर्णविराम, फ़ळ काय द्यायचे हे त्याच्यावर सोपवणे). सिताफ़ळ जसे पिकण्याआधीच उतरवले तरी फ़ुकट जात नाही, नंतर पिकवून खाता येते तसे मनातील भक्तीभाव मोहामुळे कधी कमी जास्त झाला तरी तो प्रयत्नपूर्वक परत आणता येतो (विठ्ठल हे हरीचे बालरुप, आपली नजर जरा चुकली तरी पळून जाणार! पण पुन्हा प्रेमाने बोलावले, जवळ घेतले तर राग न धरता बिलगणार! बघा, किती सोप्पी आहे ना भक्ती?).


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators