Disha013
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:55 pm: |
| 
|
खरय रॉबिन्हूड. पण ते जमणं किती अवघड आहे. अशा गुन्हेगाराला देशद्रोहीच म्हणतात. पंचा, मला नाही वाटत न्या. कोदेंनी एखाद्या निरपरधाला शिक्षा केली असेल.कारण सुनावणीच्या अगदी सुरुवातीलाच ब-याच लोकांना निर्दोश मुक्त केले गेले आहे. पण ज्यांचे आरोप सिद्ध झालेत त्यांना झालेली शिक्षा गुन्ह्याच्या मानाने कमी आहे.
|
मी फ़ाशीला विरोध केला नव्हता, मी फ़क्त facts लिहिल्या होत्या.
|
Sayuri
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:39 pm: |
| 
|
RH: खरे गुन्हेगार तर आपण आहोत. >>खूप पटलं. सायराबानूची प्रतिक्रिया तर टू मच आहे!
|
मी पण RH शी सहमत आहे. एकंदरच film stars चा attitude 'आम्हाला सर्वसामान्यांचे नियम लागू होत नाहित असाच असतो यातुनच AK 47 बाळगणे, हरणाचि शिकार, दारुच्या नशेत लोकांचा जीव घेणे, पत्रकारांना मारहाण असे प्रकार होत असतात. सल्मान खान सारखे निर्लज्ज लोक हा attitude उघडपणे दाखवतात तर संजय दत्त ने diplomacy दाखवलि इतकच. एरवि मुलिचि काळजि वगैरे निव्वळ दाखवायचे दात. बर्याच सिनेकलाकारांच्या प्रतिक्रिया अश्याच असतिल अस वाटल होत पण एक वर्षभर VIVA मध्ये सोनालिचा column वाचुन तिच्याकडुन मात्र थोड्या अपेक्षा होत्या.
|
मुळात ज्या दन्गलीचा सूड म्हनून हे स्फोट केले गेले त्या दन्गलीतल्या एकालाही शिक्शा का नाही झाली या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे?
|
Bee
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:25 am: |
| 
|
सर्वांच्या प्रतिक्रिया खूप आवडल्यात. खास करू रॉबीनभाऊंच्या. संजय दत्तच्या चाहत्यांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. पण 'खलनायक' पेक्षा आता चेहर्यावरून तरी संजय दत्त सुधरला असे वाटते आहे. पण वर जसे कुणी म्हंटले आहे भुतकाळात केलेल्या चुकांचे परिणाम भोगावे तर लागतातच ना... अगदी खरे आहे. मनुष्य वर्तमानकाळात कितीही सच्चा निरागस असेल पण भुतकाळाच्या चुका भोगाव्याच लागतात.
|
मुळात ज्या दन्गलीचा सूड म्हनून हे स्फोट केले गेले त्या दन्गलीतल्या एकालाही शिक्शा का नाही झाली या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे>>>>>> कोनत्या दंगली?, जानेवारीतल्या त्या तर त्यांनी सुरु केल्या त्याचे प्रत्युतर म्हणुन टिंबर मार्केट जळाले, त्याचा सुड म्हणु हे स्फोट का? येऊन जाऊन परत एकदा सर्व प्रशन बाबरीवर आणता तुम्ही. त्या आधीचा देखील विचार करा मग बाबरीचा प्रश्न पडनार नाही. उद्या म्हणाल काबुलला विमान नेले ते पण सुड म्हणुनच, परवा म्हणाल कनिष्क पाडले ते पण सुड म्हणुनच.
|
>>> येऊन जाऊन परत एकदा सर्व प्रशन बाबरीवर आणता तुम्ही. त्या आधीचा देखील विचार करा मग बाबरीचा प्रश्न पडनार नाही. उद्या म्हणाल काबुलला विमान नेले ते पण सुड म्हणुनच, परवा म्हणाल कनिष्क पाडले ते पण सुड म्हणुनच. भारतात डिसेंबर १९९२ पूर्वी झालेल्या सर्व दंगली ह्या १९४७ च्या फाळणीचा आणि काश्मीर प्रश्नाचा सूड घेण्यासाठी होत्या. डिसेंबर १९९२ ते फेब्रु २००२ पर्यंतच्या सर्व दंगली ह्या श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी जी मोडतोड झाली त्याचा सूड घेण्यासाठी होत्या. मार्च २००२ पासूनच्या सर्व दंगली गोध्रा येथे धर्मांध मुस्लीमांनी रेल्वेचा डबा जाळून ५९ हिंदुंना जाळून मारल्यामुळे जी दंगल झाली त्याचा सूड घेण्यासाठी होत्या. नवीन कारण मिळेपर्यंत भविष्यकाळातील सर्व दंगलींकरता गुजरात दंगलींचे कारण वापरले जाईल याची सर्व संबंधितांनी आणि निधर्मांधांनी नोंद घ्यावी.
|
>>> मुळात ज्या दन्गलीचा सूड म्हनून हे स्फोट केले गेले त्या दन्गलीतल्या एकालाही शिक्शा का नाही झाली या प्रश्नावर आपल्याकडे काय उत्तर आहे? या दंगली झाल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या साडेचौदा वर्षांपैकी १०+ वर्षे तुमचा पक्ष सत्तेवर आहे. दंगली झाल्यानंतर पहिली ५+ वर्षे आणि गेली ३+ वर्षे तुमचा पक्ष केंद्रात सुद्धा सत्तेवर आहे. दंगलीतल्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी तुमच्या पक्षाला कोणी अडवले आहे का? ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर तुमचा पक्ष सरळ खटले का भरत नाही?
|
>>> तो सर्व निधर्मी विचारवंतांच्या एका अतिशय आवडत्या धर्माचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला फाशीच काय, कुठलीच शिक्षा द्यायला नको होती. >> किती खोटारडेपणा कराल? तसे असते तर टायगर मेमन ला फाशी द्यावी असे मला वाटले नसते. टायगर मेमन पाकिस्तानात सुखासमाधानाने रहात आहे. त्याला भारतात परत आणणे आणि त्याच्यावर खटला चालवून त्याला शिक्षा देणे अशक्य आहे याची तुम्हाला कल्पना असल्यामुळेच तुम्ही अशी विधाने करत आहात. समजा त्याला भारतात आणून फाशीची शिक्षा ठोठावली तर तुम्ही मोठ्यांदा हंबरडा फोडाल याची आम्हाला खात्री आहे. अफजल गुरुसाठी नाही का तुम्ही अजून सुतक पाळत?
|
संजय दत्तला शिक्षा झाली हे योग्यच झालं असं इथे बहुतेकांचं मत झालेलं दिसतय. माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या गुन्ह्याच्या मानाने ६ वर्षे सक्तमजुरी ही फारच कठोर शिक्षा झाली. त्याने यापूर्वीच १६ महिने तुरुंगात काढले होते हे लक्षात घेऊन त्याला अजून जास्त शिक्षा देण्याची आवश्यकता नव्हती. बंदूक जवळ बाळगणे या गुन्ह्याकरता १६ महिने येवढी शिक्षा पुरेशी आहे असे माझे मत आहे. बाकी दाऊदशी संबंध वगैरे आरोपांना काही अर्थ नाही. मागच्याच वर्षी गुटखा किंग रसिकलाल धारीवाल आणि जे. एम. जोशी यांना दाऊदला पाकिस्तानात जाऊन गुटखा निर्मितीची यंत्रे पुरविली यासाठी पोलिसांनी पकडले आणि २-४ तास चौकशी करून मुक्त केले. त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल करून FIR सुद्धा केलेला नाही. धारीवाल १९८५ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर शिरूरमधून आमदारकीच्या निवडणुकीला उभा होता. त्यावेळच्या समाजवादी कॉंग्रेसचे उमेदवार बापू थिटे यांनी त्याचा पराभव केला होता. त्यावेळी समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे होते. धारिवालच्या कॉंग्रेस जवळीकीने तो सुटला हे उघड आहे आणि त्याच्यामुळे जोशी पण आपोआपच सुटला. १९९३ मध्ये शरद पवार संरक्षण मंत्री असताना बनारसहून पुण्याला संरक्षण खात्याच्या विमानातून आले होते. त्यांच्याबरोबर विमानामध्ये कॉंग्रेसचे मुंबईतले एक आमदार रमेश दुबे आणि मुंबईचे महापौर राम रतन सिंह हे होते. त्याच बरोबर जे. जे. रुग्णालय हत्याकांडातले दोन आरोपी (शर्मा बंधू) हे सुद्धा त्या विमानात होते. हे शर्मा बंधू दाऊदच्या टोळीत होते. हे सर्वात प्रथम गोपिनाथ मुन्डेंनी उघडकीला आणले. सुरवातीला पवारांनी इन्कार केला. नंतर शर्मा बंधू पवारांच्या बरोबर विमानात होते याचा पुरावा मुंड्यांनी दिला तेव्हा पवारांनी "मला काही माहित नाही. रेल्वेत तुम्ही बसता तेव्हा गाडीतले सर्व प्रवासी तुम्हाला माहित असतात का?" असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण ते विमान हे प्रवासी विमान नसून भारतीय संरक्षण खात्याच्या विमानदलाचे विमान होते व त्या विमानात वरील ४-५ लोकांशिवाय इतर कुणीही नव्हते असे निदर्शनास आणल्यावर पवारांनी शर्मा बंधूंना दुबे व रा. रा. सिंहांच्या ओळखीने विमानात घेतले असा बचाव केला. उरलेल्या दोघांनी अर्थातच एकमेकांकडे बोट दाखवले. पवारांबरोबर दाऊदच्या टोळीतले शूटर सरकारी विमानात होते हे सिद्ध होऊन सुद्धा हे प्रकरण दडपण्यात आले. इतर अनेक अभिनेते (गोविंदा, शाहरुख, जॉनी लिव्हर इ.) अनेक वेळा दाऊदच्या दुबईतल्या पार्ट्यांना हजर होते. तेव्हा संजय दत्त दाऊदच्या पार्टीत दुबईमध्ये हजर होता या आरोपावरून शिक्षा देण्याला फारसा अर्थ नाही. असं करायचं असेल तर पहिल्यांदा पवार, दुबे, धारीवाल, जोशी, रा. रा. सिंह, गोविंदा इंना शिक्षा करायला हवी.
|
Bee
| |
| Thursday, August 02, 2007 - 10:59 am: |
| 
|
मागे जयललिथानी केलेला घापला पण उघडकीस आला होता ना... तिला तर काहीच शिक्षा झाली नाही. सर्व मंत्री काळाबाजार करतात त्यांना शिक्षा का नाही होत. मलाही सतिश साहेबांचे पटते आहे की संजूला इतकी वर्ष शिक्षा होणे योग्य न्याय नाही. सध्या त्याचे करीअर जोरात पळते आहे हे पाहून तर अतिव दुःख होते आहे. आणि सुनिल दत्त आणि नर्गिस ह्या कलाकारांचा मुलगा असल्यामुळे तर आणखीनच वाईट वाटते आहे.
|
सतिशराव इतरांचे संबंध दाऊदशी होते मग त्यांनाही शिक्षा करा हे म्हणने चुकिचे नाही पण कायद्यात गोष्टी compare करुन चालत नाही. मग प्रत्येकच गुन्हेगार तस म्हणु शकतो 'याला शिक्षा नाही झाली मग मला का ?'चोर म्हणेल इथल्या चोरांच काय झाल तिथल्या चोरांच काय झाल त्यांना शिक्षा नाही झालि मग मीच का बळीचा बकरा बनु??पण अस व्हायला लागल तर अराजक माजेल. पवारांचे दाऊदशी संबंध ९३ साली होते तर त्यानंतर सरकारमधे आलेल्या आणि गृहमंत्री असलेल्या मुंडेंनी त्यांना अटक करायला हवी होती ना?? संजय दत्तला शिक्षा झाली याच दु:ख मलाही झाल. पण त्याला शिक्षा झाली हे चांगलच झाल. शिवाय त्याने कधीही 'मी स्टार आहे, सेलेब्रिटी आहे' असा माज कोर्टात केला नाही हे आवडल. शेवटपर्यंत (म्हणजे शिक्षा सुनावल्यावरही) त्याचा न्यायाधिशांशी बोलण्यातिल सुर अथवा पध्दत बदलली नाही, उज्ज्वल निकम यांना पण शेकहंड करुन 'थंक यु सर' म्हटला हेही आवडल.
|
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/2250423.cms खरं या संदर्भात हे वाचणं जरूरी आहे.... संजूला इतकी वर्ष शिक्षा होणे योग्य न्याय नाही. <<<<<< दाऊदचा पण धंदा जोरात चालला आहे, तेव्हा तो थांबेपर्यंत त्याला अटक करणे योग्य नाही... (असे मला वाटते) शिवाय तो स्टार पुत्र नसला तरी कुलाब्याचा आहे 
|
Zakki
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:58 pm: |
| 
|
ते जाउ दे विनय. पण त्या दाऊदच्या पार्टीत कोण कोण स्टार्स आले होते, त्यांनी काय गंमत केली त्याचे वर्णन लिहा ना!
|
Slarti
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:11 pm: |
| 
|
>>> सतिशराव इतरांचे संबंध दाऊदशी होते मग त्यांनाही शिक्षा करा हे म्हणने चुकिचे नाही पण कायद्यात गोष्टी compare करुन चालत नाही. मग प्रत्येकच गुन्हेगार तस म्हणु शकतो 'याला शिक्षा नाही झाली मग मला का ?'चोर म्हणेल इथल्या चोरांच काय झाल तिथल्या चोरांच काय झाल त्यांना शिक्षा नाही झालि मग मीच का बळीचा बकरा बनु??पण अस व्हायला लागल तर अराजक माजेल. अनुमोदन >>> पवारांचे दाऊदशी संबंध ९३ साली होते तर त्यानंतर सरकारमधे आलेल्या आणि गृहमंत्री असलेल्या मुंडेंनी त्यांना अटक करायला हवी होती ना? Good point.
|
मुळात पवार आणि मुन्डे एकमेकांचे विरोधक आहेत हेच मला मुळी मान्य नाही तुम्ही जर तसे मानत असाल तर ते दोघेही त्यांच्या 'तंत्रात'यशस्वी झालेत असे म्हणावे लागेल... तमाशातले नायक आणि खलनायक पडद्यामागच्या राहुटीत एकच बिडी पिताना पाहून आम्हाला लहानपणी खूप आश्चर्य वाटत असे...
|
Malavika
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:26 pm: |
| 
|
सतिश, तुम्ही सांगितलेल्या facts बरोबर आहेत. पण मला वटते आपला point of view जशी संजय दत्तला शिक्शा झाली तशीच ह्या बाकिच्या सगळ्यांना झाली पाहिजे असा हवा.
|
मालविका,पुर्ण अनुमोदन. विनय लेखावर विचार करण खरच जरुरी आहे. रॉबिन ते दोघे मित्र असतिल तर मला काहिहि shock बसणार नाहि. दोघही विश्वासार्ह नाहित.
|
Disha013
| |
| Thursday, August 02, 2007 - 7:00 pm: |
| 
|
ही ही ही रॉबिन्हूड! संजुबाबाचे ग्रह फ़िरलेत सध्या.पण सुप्रीम कोर्टात तो सुटायचे चान्सेस आहेत असा अन.दाज आहे म्हणे. आणि कोणत्या नेत्याविरुध्द कोण तक्रार देणार? सगळे एकाच माळेचे मणी.
|