|
Slarti
| |
| Tuesday, July 31, 2007 - 2:19 pm: |
| 
|
Electricity is not an electromagnetic wave like radio waves, light etc. Electric current is made of electrons whereas e/m waves are made of photons. Wireless electricity is lightning, would you want that ?
|
Slarti
| |
| Tuesday, July 31, 2007 - 3:09 pm: |
| 
|
नासदीय सूक्त सृष्टीच्या निर्मितीविषयी बोलते. शेवटचा श्लोक - इयं विसृष्टिर्यत आबभूव | यदि वा दधे यदि वा न | यो अस्याध्यक्षः परमे व्योमन् | सो अंग वेद यदि वा न वेद | That out of which creation has arisen, whether it held it firm or it did not, He who surveys it in the highest heaven, He surely knows - or maybe He does not! शेवटची ओळ खूप interesting आहे. सूक्तकारांचा skepticism सूचक आहे. हे वाचा - नासदीय सूक्त , विकीवर नासदीय सूक्त btw , सूक्ताचा अर्थ वाचल्यावर कदाचित ओळखीचे वाटेल. 'भारत एक खोज' चे सुंदर शीर्षकगीत आठवते का ? हेच ते सूक्त आणि शेवटी वाजायचे ते हिरण्यगर्भ सूक्त.
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 3:46 pm: |
| 
|
slarti, माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद. मग प्रकाश का नाही इकडून तिकडे करता येत? भिंतीच्या पलिकडे! भिंतीला भोक न पाडता. अदृष्य होण्याचा शोध लागण्यातच आहे. काहीतरी प्रकाशाच्या लहरीच अश्या अरेंज करायच्या की त्या योगे ठराविक क्षेत्र दिसेनासे होते. उद्या जर कुणि त्या इलेक्ट्रॉनचे फोटॉन नि परत फोटॉनचे इलेक्ट्रॉन बनवायचे तंत्र शोधून काढले तर? हे मी मुद्दाम इथे अश्यासाठी विचारतो आहे की, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला उगीच इकडून तिकडून वाचून काहीतरी अर्धवट समजले, की त्याच्या जोरावर कुठल्याहि गहन विषयावर सुद्धा आपण मते मांडू शकतो, जसे देव जर आम्हाला दिसतच नाही, तर तो आहे हे कशावरून? आम्हाला देव शिक्षा करणार आहे का? वगैरे.
|
Slarti
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:48 pm: |
| 
|
झक्की, तुम्ही विचारलेले प्रश्न म्हणजे 'अर्धवट ज्ञानातून अर्धवट / चुकीचे प्रश्न केले जातात' हा मुद्दा ठसवण्यासाठी दिलेली उदाहरणे आहेत की हे प्रश्न तुम्हाला खरेच पडले आहेत ?
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:05 pm: |
| 
|
मुख्यत:, अर्धवट ज्ञानातून .... बाकी, निदान या BB वर तरी वरील प्रश्नांचा उहापोह करायची इच्छा नाही! त्या बाबतीत तुम्ही काही उत्तर दिलेत तरी ते मला समजणार नाही. मी तुम्हाला म्हणेन, कशावरून ते फोटॉनच आहेत, नि इलेक्ट्रॉनच आहेत? तुम्ही मला दाखवू शकाल का एखादा इलेक्ट्रॉन वा फोटॉन? मग मी कसा विश्वास ठेवावा?
|
झक्की ७० वर्षे हे मानवाच वय म्हणुन नव्हत लिहिल अशिगनी. त्याच म्हणन अस की प्रकाशाच्या वेगाने ७० वर्षे तरी लागतिल देवाला कळायला की कोणीतरी त्याच नामस्मरण करतय. ही सरळसरळ थट्टा त्याने केलेली होती.
|
Peshawa
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:12 pm: |
| 
|
(एक विचारणा: वायरलेस ने जर आपला आवाज इकडून तिकडे जातो, तर electricity का तशी इकडून तिकडे करता येणार नाही? सगळ्या मुळी waves च आहेत!) zakki >>> he aataa shakya hoNyaavchyaa margaawar aahe. wireless electricity could be possible just that distance involved will not be great (just limited to a big hall or something) and yes 'waves ' is the priciple used along with the principle of resonance :-) and it has been demonstrated ... wirelessElectricity >>invisibility : he sudha try kele gele aahe. The first invisibility cloak works on optical camouflage technology and is developed in Tokyo http://science.howstuffworks.com/invisibility-cloak.htm another technology that is most likely to produce such a cloak is metamaterials http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6064620.stm उद्या जर कुणि त्या इलेक्ट्रॉनचे फोटॉन नि परत फोटॉनचे इलेक्ट्रॉन बनवायचे तंत्र शोधून काढले तर? हे मी मुद्दाम इथे अश्यासाठी विचारतो आहे की, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला उगीच इकडून तिकडून वाचून काहीतरी अर्धवट समजले, की त्याच्या जोरावर कुठल्याहि गहन विषयावर सुद्धा आपण मते मांडू शकतो, जसे देव जर आम्हाला दिसतच नाही, तर तो आहे हे कशावरून? आम्हाला देव शिक्षा करणार आहे का? वगैरे. barobar... ithe waad ghaalaayacha to tyaach karataa ki dahaa lokaaMkaDun wegawegaLe Pointers miLataat tethe jaaun te waachun ardhawaT dnyaan thoDe kami ardhawat banawataa yaawe ... about graph theory: determining isomorphism between two graphs is intractable problem as you might know. to model Entity such as god or the concept of god with all its implication in my opinion sufferes from two things 1)limited brain size/capacity (Godels information paradox) 2) intractable problems such as isomorphism. the model or the concept of god and further the entity of God (omipresent/omniscient etc etc) therefore can never be clearly defined.
|
Aschig
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:34 pm: |
| 
|
चिन्या, विष्णु वैकुंठात असतो, पण देव आपल्या हृदयात असतो (बहुदा मनात असे म्हणायचे असावे हृदय हा अवयव म्हणजे केवळ एक पंप आहे) पण विष्णु म्हणजेच देव आणी त्या मुळे वैकुंठ आपल्याच मनात असते हे न कळल्यामुळे ७० वर्षे हे ठोकळमानाने मी धरले. खरेतर जवळजवळ सर्वच तारे कितितरी जास्त दुर आहेत. असो. झक्कि, photons आणी electrons यांच्या families वेगवेगळ्या असतात. पण उद्या असे दिसणारच नाही की त्यांची अदलाबदल होवु शकत नाही असे नाही. पण ते कुठे आणी कुठल्या conditions मध्ये त्याचा मात्र अभ्यास करावा लागेल. (उदा. energy levels, temeperatures etc. ) That leads to the last part of your posting : ज्यांना हे 'कळत' नाही ते या कडे विज्ञानावरील श्रद्धा म्हणुनच पहाणार. मग देवादिकांवरील हजारो वर्षे चालत आलेल्या श्रद्धेनेच काय घोडे मारले? उत्तर्: (१) analogy चा वापर करुन वाट्टेल त्या theory ला त्या मागील reserach चे status केवळ declaration नी देता येवु शकत नाही. देव ही हिंदुंची कल्पना अशीच researched आहे असे जे मानतात त्यांनी निदान येवढे मानायला हवे की इतर धर्मांच्या पद्धती देखिल ग्राह्य असु शकतात. आणी केवळ धर्माच्याच नाही तर जादुटोण्याच्या, पुनर्जन्म असण्याच्या आणी पुनर्जन्म नसण्याच्या देखिल. पृथ्वी सपाट असण्याच्या आणी उंदीर आणी dolphins मानवा पेक्षा हुशार असण्याच्या देखिल. (२) केवळ घोडेच नाही तर माणसे सुद्धा मारल्या जातात म्हणुन. राधाचा मुद्दा योग्य आहे: देवाचा धावा करुन आधिच शाश्वत असलेले (चिन्याच्या म्हणण्याप्रमाणे) आपले स्थान पुर्णपणे शाश्वत बनेल याची शाश्वती काय?
|
अशीग, देव वैकुन्ठात आणि मनात म्हणजे वैकुंठ मनात असा त्याचा अर्थ होत नाही. यासाठिच इषोपनिशदातिल श्लोक दिला होता ज्यात म्हटले होते की देव सर्वात दूर आणि सर्वात जवळ आहे. देव वैकुंठात आहे त्याचबरोबर तो आपल्यातही आहे(एकाच वेळी तो वेगवेगळ्या ठिकाणी असतो कारण तो देव आहे माणुस नाही). राधाचा मुद्दा योग्य आहे: देवाचा धावा करुन आधिच शाश्वत असलेले (चिन्याच्या म्हणण्याप्रमाणे) आपले स्थान पुर्णपणे शाश्वत बनेल याची शाश्वती काय? हा मुद्दा चुकिचा आहे. आपण शाश्वत आहोत हे जरी खरे असले तरी आपण या अशाश्वत material world मधे suffer करत आहोत त्यामुळे आपण या अशाश्वत material world ला सोडुन शाश्वत spiritual world मधे गेल्यास आपण आनंदित होऊ शकु.
|
Slarti
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:38 pm: |
| 
|
The report is about wireless energy transfer through e/m waves and NOT actual wireless electric current. Here 'waves' and 'principle of resonance' are pertaining to e/m waves not elec. current. 'Wireless electricity' is a misnomer. The report chooses to call it wireless energy/power transfer. >>> analogy चा वापर करुन वाट्टेल त्या theory ला त्या मागील reserach चे status केवळ declaration नी देता येवु शकत नाही. आशिष, अगदी अगदी. btw, out of curiosity, is there any indication in high energy physics that electron-photon interchange is possible ?
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:38 pm: |
| 
|
विज्ञानावरील श्रद्धा प्रत्यक्ष न बघता Atom, electron, proton, neutron, atomic structure, electron orbits यांच्या theories तयार केल्या. मग त्यावर 'श्रद्धा' ठेवून बरेच संशोधन केले. त्यातून जे आढळले त्यातले theory ने explain करण्याजोगे निष्कर्ष ठेवले, बाकीचे 'चुका' म्हणून सोडून दिले. मग त्या theory वर 'श्रद्धा' ठेवून 'एकचित्ताने, एकाच मार्गाने प्रवास करून त्या theory चे खरे पण 'सिद्ध' झाले. Astrophysics मधेहि, आज black holes आहेत, उद्या नाहीत, मग परत आहेत, असे चालतेच. खुद्द स्टीव्हन हॉकिन्स, म्हणजे जणू विश्वामित्र, वसिष्ठ ऋषीच, त्याने सुद्धा आपली मते बदलली. त्याने एक गोष्ट लिहीली आहे. पूर्वी सगळे शास्त्रज्ञ म्हणाले की देव वगैरे काही नाही. सगळ्या गोष्टींचे शास्त्रीय कारण सांगता येते. म्हणून पोपचा शास्त्रज्ञांवर शतकानुशतके राग. पण एकदा या शास्त्रज्ञांच्या सभेत पोपने कबूल केले की शास्त्राने बरेच काही सिद्ध होते. नेमके त्याच दिवशी हॉकिन्स सांगणार होता की आम्हाला अजून सगळेच समजले नाही, बिग बॅंग हे देवानेच घडवले! त्या मानाने ही देवाबिवाची theory फारच abstract , केवळ कल्पनाविलास. जसे ज्यूल्स व्हर्न इ. वैज्ञानिक कादंबरीकारांनी अनेक वर्षांपूर्वी काहि काही लिहिले, तसे. अनेऽक वर्षे एकाच मार्गाने संशोधन करून ज्यूल्सचे लिहीलेले काही काही प्रत्यक्षात घडलेले दिसते. देवाच्या बाबतीत सिद्ध करायचे तर त्या theory प्रमाणेच शक्य नाही, कारण वैयक्तिक अनुभूति, हेच त्याचे प्रमाण. मी मानले तरी तुम्ही मानालच असे नाही. तेव्हढी 'श्रद्धा' चिकाटी, असायला पाहिजे. शिवाय जे जे अनुभव सर्वांना आले, ते सगळेच जपून ठेवले, टाकून दिले नाहीत, मग ते theory प्रमाणे आहेत की नाही हे न कळल्याने सगळा गोंधळ निर्माण होतो, नि लोकांची 'श्रद्धा' कमी होते.
|
Aschig
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:07 am: |
| 
|
" Astrophysics मधेहि, आज black holes आहेत, उद्या नाहीत, मग परत आहेत, असे चालतेच. " ह्यातच सगळे आले. जर एखादी theory चुकीची असेल तर वैज्ञानिक ती चुक मान्य करतात. धर्म मात्र अधिकाधिक श्रद्धाबंबाळ होत जातो. आपण पुन्हा subjective बनत चाललो आहोत. माझे G4 models अजुनही झालेले नाहीत. पण आपण अद्वैतवादापासुन सुरुवात करुयात का? अद्वैतवादाचे सर्वात सोपे स्वरूप म्हणजे मी आणी ब्रह्मन एक(च) आहोत. व्यक्ति नं. २ म्हणजे तु असे म्हंटल्यास तुझ्या Frame Of Reference ( FOR ) प्रमाणे तु आणी ब्रह्मन एक आहात. आपल्या दोघांचाही ब्रह्मन एकच असेल, किंवा नसेल. एकच नसल्यास प्रत्येकाचा ब्रह्मन वेगवेगळा असु शकतो आणी मग अहम ब्रह्मास्मि ला काही अर्थ ऊरत नाही. जर तुझा आणी माझा ब्रह्मन एकच असेल आणी मी == ब्रह्मन आणी तु == ब्रह्मन तर मी == तु. म्हणजे आपण सर्व एकच आहोत. इथे भांडणारे देखिल. ज्यु आणी शिख देखिल. असे model काही खरे वाटत नाही. त्यामुळे अद्वैतवाद आपले जग describe करु शकतो हे मला पटत नाही. कुणाला अद्वैतवाद म्हणजे दुसरे काही असे प्रतीपादीत करावयाचे असल्यास कृपया विस्तृत करावे. आपण त्यावर बोलु.
|
Aschig
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:34 am: |
| 
|
Here is just the adwaitvaad model along with its two person evolution.

|
Radha_t
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:50 am: |
| 
|
मी == ब्रह्मन आणी तु == ब्रह्मन तर मी == तु आशिष ला माझेही औमोदन. अश्या प्रकारे जर मी = तू होत असेल आणि तू अनुभुतीच्या श्रद्धेच्या जोरावर किंवा कुठल्याही जोरावर मोक्ष मिळवलास तर मी सुद्धा मिळवला असा अर्थ समजायचा का? आणि मग मलाही तो शाश्वत आनंद मिळेल का? BTW शाश्वत आनंद म्हणजे काय? आनंद दुःख हे तर या नश्वर जगात असतात. subjective असतात. शाश्वत आनंद म्हणजे नेमके काय. शाश्वत झाल्यानंतर आनंदाची काय गरज असते. आणि ही आत्मा काय भानगड असते? या जगात फक्त प्राण्यांच्या करोडो जाती आहेत पैकी माणुस ही फ़क्त एक मग किती जीव असतील याचा अंदाज नाही. तितके आत्मे आहेत का? आणि जर आत्मा अमर आहे तर यांची संख्या वाढतच जाणार का? जर आत्म्याला जन्म किंवा मृत्यू नसतो तर ह्या वाढणार्या आत्म्याच्या संखेचे स्पष्टीकरण काय? पुन्हा त्यात मी = तू होत असेल तर आपल्या दोघांचे आत्मे एकच का? मग आपण इतका भिन्न विचार कसा काय करतो?
|
मी अद्वैतवादी नाही तरिहि तुमच्या म्हणन्याप्रमाणे बघितल्यास मी=तु अस अद्वैतवादीही मानतात. पण आपण सर्व मायेने cover झालेले आहोत त्यामुळे आपण वेगवेगळे आहोत. पण जेंव्हा आपण मुक्त होऊ तेंव्हा आपण सर्व एकच होउ अस अद्वैतवादी म्हणतात. त्यासाठी ते उदाहरण देतात की नद्या, नाले वेगवेगळे असतात पण ते जेंव्हा समुद्राला जाउन मिळतात तेंव्हा ते एकच होतात त्याचप्रमाणे नदी नाले समुद्रातुनच आलेले असतात त्यामुळे त्यांची खरी identity तीच असते. इथे इतर अद्वैतवादी आहेत त्यांनी यावर मत द्याव. अशीग, G31 काय आहे??? why distinct Gods ??जरा explain कर. राधा,आनंद या संस्कृत शब्दाचा इंग्लिशमधे अनुवाद होत eternal bliss .या नश्वर जगात खरा आनंद नाही(भगवद्भक्तीचा सोडुन). शाश्वत झाल्यावर आनंदाची गरज नाही हे तुला कोणि सांगितल??खरा आनंद नश्वर जगातिल आनंदाला transcendental आहे. भगवद्गीतेत म्हटलय की हे जग म्हणजे खया spiritual world ची नक्कल आहे. जर आपण नदिकाठावरिल वृक्षाच्या प्रतिमेला बघितल तर त्याची मुळे वर आणि फ़ांद्या खाली दिसतात. spiritual world आणि नश्वर जग असेच आहे spiritual world म्हणजे तो वृक्ष आणि नश्वर जग म्हणजे त्याच प्रतिबिंब. बरोबर उलट. त्यामुळे इथला आनंद हा खर्या आनंदाची नक्कल आहे. दुसरे म्हणजे आत्मा काय आहे?आधी इतर प्रशनांची उत्तरे देतो. या जगात कितितरी अब्ज जीव आहेत आणि पर्यायाने तितकेच आत्मे आहेत. आत्म्यांची संख्या वाढतच जाणार का??नाही. मनुष्यांची संख्या वाढतेय याचा अर्थ असा नाही की बाकी सर्व जीवांचीही संख्या वाढतेय. शिवाय या फ़क्त आपल्याच ग्रहावर जीव आहेत अस कोणी सांगितलय???इतरही ग्रहांवर जीव आहेत. तिकडचे आत्मे इथे येउ शकतात. आपण भिन्न विचार का करतो जर तु=मी (हा अद्वैतवादी विचार आहे मी अद्वैतवादी नाही). तरिहि उत्तर असे मिळु शकते की आपण भिन्न विचार करतो कारण आपण covered आहोत मायेने. हा संख्येचा प्रश्न लॉजिशिअन अशिगला विचारायला हवा की बाबा आपल्या पृथ्विवरिल जिवांची संख्या किति??जर म्हटल अमर्याद तर चुकला कारण काहितरी संख्या असेलच. आणि जर म्हटल अमर्याद नाही तर तुला कोणी सांगितल. जर ती अमर्याद नाही तर ती किती आहे हे सांग. आत्मा काय भानगड आहे??याला गीतेत बरेच श्लोक आहेत तुर्तास फ़क्त काही श्लोकांच भाशांतर लिहितो हवे असल्यास सांगा श्लोकही लिहिन. - आत्मा मारित नाही मारला जात नाहि,तो अविनाशी जन्मरहित,नित्य,कधीही न बदलणारा आहे ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकुन नविन धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा निरुपयोगी झालेली शरिरे टाकुन देउन नविन शरिरे धारण करतो.त्याला शस्त्राने कापता येत नाही,अग्नीने जाळता येत नाही,पाण्याने भिजवता येत नाही,वार्याने सुकवता येत नाही.तो न तुटु शकणारा,न भिजु शकणारा,न विरघळु शकणारा आहे, न जळणारा,न सुकणारा,नेहमी टीकणारा,सर्वव्यापी,न बदलणारा,निश्चल आणि शाश्वत आहे. हा आत्मा न दिसणारा,अकल्पनीय, न बदलणारा,अविकारी आहे.आत्म्यासाठी जन्मही नसतो, मृत्युही कधीच नसतो. तो कधीच भौतिक झाला नाही,होत नाही होणार नाही. तो जन्मलेला नाही,शाश्वत आहे,अमर आहे,जुना आहे,जेंव्हा शरीर मरते तेंव्हा तो मरत नाही. भगवद्गीता २.१९-२४
|
Radha_t
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:53 am: |
| 
|
पण मग प्राण्यांनी भक्ती कशी करावी? वनस्पतींनी कशी करावी त्यांना तर त्यांच्या अस्तित्वाची जाणिव सुद्धा नसते तर देवाच्या अस्तित्वाची कशी असणार. याचे अपेक्षित उत्तर असणार की कर्म फळाप्रमाणे दुसरा जन्म मिळतो मग सगळ्यात पहिला जन्म कुणाचा मिळतो आणि त्याला भक्ती किंवा सत्कर्माचा मार्ग कसा दिसतो? जर तो मनुष्य नसेल तर
|
प्रत्येक जीव वेगवेगळ्या शरिरांमधुन जाउन त्याच्या कर्मांप्रमाणे मनुष्य जन्म घेतो. म्हणुनच हा मनुष्य जन्म फ़ार महत्त्वाचा आहे. या जन्माचा उद्देशच आहे की आपण मोक्ष मिळवुन ' back to home ,back to godhead ' जाव. skeptic लोकांच्या नादी लागुन निरिश्वरवादी बनण म्हणजे आयुष्य बर्बाद करण आहे(हे माझ वैयक्तिक मत आहे त्यामुळे याला पुरावा काय विचारु नये). आधी सर्वात कोणता जन्म घेतला जातो हे मला माहित नाही. मात्र याच उत्तर आहे मला नक्कि आठवत नाही पण बहुतेक पाण्यातिल जीव घेतला जातो अस वाचल्यासारख वाटतय.मी हे वाचताना त्यावर फ़ारस लक्ष दिल नाहि त्यामुळे आठवत नाही. प्राणी, झाडे यांना भक्ती करण शक्य नाही (देवाच्या कृपेने तेही शक्य होउ शकत), हे बरोबर आहे पण त्यावरुनच मनुष्य जन्माचे महत्व कळते.
|
Zakki
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:44 pm: |
| 
|
प्राण्यांच्या आयुष्यातली सुखदु:खे वेगळीच. त्यांना ती त्यांच्या कर्मफळाप्रमाणे भोगावी लागतात.
|
Slarti
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:55 pm: |
| 
|
हे वाचा - games, cooperation and evolution देवाने हे विश्व निर्माण करताना सजीवांसाठी उत्क्रांती program केली या युक्तीवादावर काय म्हणणे आहे जन्तेचे ? हा युक्तीवाद बहुपयोगी आहे. उद्या जर compexity can give rise to consciousness असे सिद्ध झाले तर 'तेही program केले गेले आहे' असे म्हणता येईल.
|
स्लार्ती, आधी त्या शास्त्रज्ञांना उत्क्रांतिची थिअरी नक्कि ठरवु दे. मग आम्ही त्यावर बोलतो. असो उत्क्रांतीची वेदिक थिअरी पण आहे. या शास्त्रज्ञांच्या कितितरि आधी लिहिलेली आहे ती.माझ्याकडे सध्या त्याची माहिति नाही. कारण मला त्या विषयात रस नाही. तरिहि ती थिअरी मिळाल्यावर इथे पोस्ट करेन. देव काय आहे,जीव काय आहेत,प्रकृती काय आहे,माया काय आहे,ती काळानी कशी control केले जाते आणि जिवांच्या activities काय आहेत या गोष्टी जाणने जरुरिचे आहे. हे सर्व ज्ञान भगवद्गीतेत मिळते. यामधे भगवद्गीता सांगते की कृष्ण हे भगवान, परमेश्वर, ब्रह्म, परमात्मा आहेत. जीवांमधे देवाच्या qualities आहेत( सर्व नाहित). जीव हे देवाचे part and parcel आहेत,ज्याप्रमाणे समुद्रातिल पाण्याच्या एका थेंबामधे समुद्राच्या qualities असतात त्याप्रमाणे जीवांमधे देवाच्या qualities असतात.ज्याप्रमाणे देव या सर्व गोष्टी control करतो त्याप्रमाणेच आपणही त्याच tendancy नी गोष्टी control करण्याचा प्रयत्न करतो.प्रकृती ही देवाच्या control खाली आहे (गवताच्या पात्याचे उदाहरण आठवतय ना?). माया म्हणजे inferior प्रकृती.जीव हे superior प्रकृती आहे. प्रकृतीचे ३ प्रकार आहेत्-सत्गुण, रजगुण,तमगुण. या सर्वांच्या वरती काळ आहे. या ३ गुणांच्या आणि काळाच्या control मुळे activities होतात ज्याला कर्म म्हणतात. कर्म शाश्वत नसतात,मात्र कर्माची फ़ळे खुप वेळासाठी भोगली जाउ शकतात.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|