मुन्नाभाईला ६ वर्षांची शिक्षा http://www.rediff.com/news/2007/jul/31verdict4.htm ही फारच कठोर शिक्षा आहे. त्याने जवळ बंदूक ठेवण्याची चूक केली. परंतु त्याने त्या बंदुकीने कोणाचा खून केलेला नाही. त्याने यापूर्वीच या अपराधाबद्दल १६ महिने तुरुंगात काढलेले आहेत. हे लक्षात घेता त्याला सोडून द्यायला पाहिजे होते. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केलेला होता व इतरांसारखा पळून न जाता न्यायालयाला त्याने संपूर्ण सहकार्य दिलेले होते. त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर गुन्हे केलेले गुन्हेगार संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून वावरतात, जनतेच्या पैश्यांवर चैन करतात आणि निर्धास्तपणे कायद्याच्या कचाट्यात न सापडता वावरत असतात. त्यामानाने संजय दत्तचा गुन्हा खूपच किरकोळ आहे तर शिक्षा खूपच कठोर आहे.
|
Mandard
| |
| Tuesday, July 31, 2007 - 9:23 am: |
| 
|
I agree with Satish. The verdict is harsh. I think supreme court will give some concession to him.
|
शिक्षा कठोर असेलही कदाचित.पण न्यायालयासमोर सगळे सारखेच असे दिसुन येते. शेवटी दत्त कुटुंबिय पण राजकारणात आहेत. त्यांनी संजयला वाचवण्यासाठी पुर्ण दबाव टाकला होता.
|
शिक्षा ऐकल्यावर संजय दत्त रडवेला झाला. त्या तुलनेत इतर काही आरोपींनी शिक्षा ऐकल्यावर आपल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप दाखविणे तर सोडाच उलट "अल्ला हो अकबर" अशा घोषणा देऊन आपल्या निगरगट्ट धर्मांधतेचे प्रदर्शन केले. जेव्हा या धर्मांधांना फासावर चढवायला नेतील, तेव्हा हिंदू धर्मात केवळ अपघाताने जन्माला आलेले तथाकथित मानवतावादी "त्यांना फाशी देणे हे मानवतेविरूद्ध आहे" असा टाहो फोडतील.
|
दाऊदशी असलेले सम्बंध, आणि यापूर्वी टेप केलेले त्याचे फोन कॉल बघता त्याला झाली शिक्षा योग्यच वाटते. (तो मुन्नाभाई असला तरी ) गेल्यावर्षी पण 'त्याला एक मुलगी आहे, आणि तो घरातला एकमेव कमवता आहे' असल्या फालतू कारणांवार न्यायालयाने त्याला जामीन दिला होता... (ही करणे बहुतेक गुन्हेगाराना लागू पडतात, पण त्यांना कोणी सोडत नाही...)
|
संजय दत्त सारखा so called VIP कुटुंबा मधला माणुस सुध्दा न्यायालया साठी गुन्हेगार च आहे , directly-indirectly त्याहा गुन्हा किती गंभीर होता आणि उशीरा का होईना शिक्षा झाली याचे समाधान वाटते तरी पण कुठे तरी ' मुन्नाभाई ' हे कॅरेक्टर जेल मधे गेला म्हणून हळहळ का बरं वाटते !!! बॉलीवूड चा प्रभाव कळत नकळत किती जबरदस्त असतो .. 
|
दाऊदशी असलेले सम्बंध, आणि यापूर्वी टेप केलेले त्याचे फोन कॉल बघता त्याला झाली शिक्षा योग्यच वाटते. अगदी बरोबर. आता त्या सलमान खान ला सुद्धा अशीच एखादी शिक्षा व्हावी
|
Pancha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:28 pm: |
| 
|
'मुन्नाभाई ' हे कॅरेक्टर संजय दत्त ने public symphathy मिळविण्यासाथी मुद्दाम घेतले होते. त्याला झाली शिक्षा योग्यच आहे.
|
संजय दत्तने गुन्हा कबूल केला असला तरी शिक्षेत फरक पडत नाही. याची कल्पना कबुली जबाब देताना जज त्याला स्पष्टपणे देतात.या कबुली जबाबामुळे तुला एवढे एवढी शिक्षा होणार आहे. मगच त्याची इच्छा असली तर कबुली जबाब घेतात. त्यामुळे कबुली जबाब हा सहानुभूतीला पात्र ठरू शकत नाही. वास्तविक सन्जय दत्तला तशी कमीच शिक्षा झाली. Arms Act खालील या गुन्ह्याना ५ ते १० वर्षे सक्तमजुरी आहे. मुम्बई आणि बहुधा पुणेही टाडा कायद्याखाली नोटीफाईड एरिया आहे. त्यात अवैध शस्त्र धारण करण्याचे गाम्भीर्य आणि शिक्षेचे प्रमाण वाढते. संजय दत्तने AK47, 9mm pistol बाळगले होते. ते टायगर मेमनने मागवलेल्या साठ्यातून मागून घेतले होते. या शस्त्रांची भरलेली ट्रक रात्रभर त्याच्या घरी उभी होती. हे सर्व स्वसंरक्षणार्थ! गम्मत म्हणजे त्याने handgranades देखील घेतले होते. हेही स्वसंरक्षणार्थ? त्याची मित्रमंडळी तरी काय होती? नन्तरही अन्डरवर्ल्डशी फोन कॉल्स वगैरे. प्रोबेशन कायद्याचा फायदा अशा गम्भीर आणि moral turpitude च्या गुन्ह्याना दिला जात नाही. त्यामुळे संजय दत्तबद्दल अश्रू ढाळायचे कारण नाही...
|
Pancha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:55 pm: |
| 
|
आता बघा, काहि वर्षानंतर हाच संजय दत्त निवडणुक जिंकुन पुढारी होइल, त्यासाथी त्याला मुन्नाभाई कॅरेक्टर आणि मुर्ख जनता मदत करेल.
|
Malavika
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:59 pm: |
| 
|
अगदी बरोबर बोललात राॅबिनहूड. संजय दत्तला शिक्शा झाली नसती तर भारतीय न्यायसंस्थेवरचा विश्वासच उडाला असता. लोकांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास वाढवण्याचे मोठे काम न्या. कोदे यांनी केले आहे. "संजय दत्त सारखा सो अल्लेद ईP कुटुंबा मधला माणुस सुध्दा न्यायालया साठी गुन्हेगार च आहे , दिरेcत्ल्य्-इन्दिरेcत्ल्य त्याहा गुन्हा किती गंभीर होता आणि उशीरा का होईना शिक्षा झाली याचे समाधान वाटते तरी पण कुठे तरी ' मुन्नाभाई ' हे कॅरेक्टर जेल मधे गेला म्हणून हळहळ का बरं वाटते !!! बॉलीवूड चा प्रभाव कळत नकळत किती जबरदस्त असतो .. " मुन्नाभाईची भुमिका करताना संजय दत्तनी आपल्या ह्याच मानसिकतेचा वापर केला आहे.
|
Pancha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:04 pm: |
| 
|
मुन्नाभाई कॅरेक्टर = Public Brainwash
|
संजय दत्तला शिक्षा झाली आहे तर आता सिनेजगतातिल लोक म्हणत आहेत की तो सेलेब्रिटी असल्याने त्याला जास्त कठोर शिक्षा झाली. जर त्याला सोडल असत तर लोक म्हटले असते की तो सेलेब्रिटी आहे म्हणुन त्याला सोडल. किरण खेरच म्हणन आहे की दंगलीमधे संजय दत्तच्या घारातुन दंगलग्रस्तांना मदत केली जात होती म्हणुन त्याला स्वसंरक्षणार्थ बंदुक हवी होती. याला काहिच अर्थ नाही AK-56 रायफ़ल,हंड ग्रेनेड त्यासाठी कशाला लागतात??फ़ारुक अब्दुल्ला म्हणतो 'आमच्या राज्यात कितीतरी लोक बिना लायसन्स बंदुका बाळगतात.' म्हणजे या महाभागाला महाराष्ट्राचा काश्मीर करायचा आहे की काय??
|
Disha013
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:38 pm: |
| 
|
संजय दत्तला शिक्षा ही योग्यच आहे.त्याने केलेल्या चुकांचे परिणाम त्याला भोगायलाच हवे होते. पण मागे अगदी एखाद्या महिन्यापुर्वीच एका बड्या बापाच्या पोराला ६ महिनेच तुरुंगवासाची शिक्षा झाली. या दिवट्याने नशेत गाडी चालवुन ६ जणांना मारले होते. आणि या बॉम्ब्स्फ़ोट खटल्यात सहभागी असलेले इतर लोकांना फ़ाशी व्हायला हवी होती. म्हणजे स्फ़ोटकांचे ट्रक लाच घेवुन सोडुन देणारे,तसेच समुद्रकिना-यांवर स्फ़ोटके उतरवणारे वगैरे. या लोकांच्या मदतीमुळेच तर कट यशस्वी होतात. त्यांचा गुन्हा किरकोळ नाही. कारण स्फ़ोटात अनेक निरपराध मारले गेलेत. पहिल्या स्फ़ोटमालीकेचा निकाल लागला नसतानाही दुसरे बॉम्ब्स्फ़ोट ह्या माणसांनी यशस्वीरित्या घडवुन आणले. या पार्श्वभुमीवर तरी फ़ाशीशिवाय दुसरी शिक्षा मला तरी पटत नाही. नाहीतर हे चक्र था.म्बणारच नाही.
|
दिशा सहमत. गुन्हा केल्याचे सिध्द होत असल्यावर इतक्या छोट्या शि़शा देउन न्यायालयाने एक चुकीचा पायंडा घातला आहे. यावर एकच शि़शा देहदंड. ३०० पे़शा व्यक्ती त्या स्फोटात गेल्या तेव्हा या सर्वाना देहदंडच व्हायला पाहीजे.
|
Sayuri
| |
| Tuesday, July 31, 2007 - 8:40 pm: |
| 
|
आणि या बॉम्ब्स्फ़ोट खटल्यात सहभागी असलेले इतर लोकांना फ़ाशी व्हायला हवी होती. >>> वेल सेड दिशा! खरोखर तू म्हणाल्याप्रमाणे स्फ़ोटकांचे ट्रक लाच घेवुन सोडुन देणारे,तसेच समुद्रकिना-यांवर स्फ़ोटके उतरवणारे,शिवाय स्फोटके पेरण्यासाठी स्वत:ची वाहने वापरायला देणारे, स्फोटके, शस्त्रे ठेवण्यासाठी flatsवापरु देणारे लोकही तेव्ह्ढेच गुन्हेगार आहेत जेव्ह्ढे स्फोट प्रत्यक्ष घडविणारे आहेत. शेवटी एव्ह्ढे स्फ़ोट घडवून आणणे हेही टीम वर्क च आहे. कोणी एकटाच उठला, एकट्यानेच शस्त्र्-बॉम्ब मिळवले, पेरले-उडवून दिले हे तर शक्य नाही. या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा योग्य आहे त्याशिवाय जरब बसणार नाही.
|
सगळ्यांनाच फ़ाशीची शिक्षा देणे बरोबर नाही. न्यायालयाने १० पेक्षा अधिक लोकांना फ़ाशीची शिक्षा दिलेली आहे हे भरपुर आहे. आत्तापर्यंत कुठल्याही एका केसमधे एव्हढ्या लोकांना फ़ाशी दिलि गेलेली नाही. त्याचबरोबर फ़ाशी ही ' rarest of rarest' आरोपिंना दिली जावी असा नियम आहे. मला तर वाटतय सुप्रिम कोर्ट अजुन काही लोकांची फ़ाशीची शिक्षा कमी करेल.
|
याकुब मेमन ला झालेली फाशी ची शिक्षा मात्र अयोग्य आहे. आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तो स्वत: पोलिसाना शरण आल होता. मुम्बई पोलिसान्वर विश्वास ठेवू नकोस असे त्याच्या भावाने सन्गितले तरीही.
|
Pancha
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:24 am: |
| 
|
या बॉम्ब्स्फ़ोट खटल्यात सहभागी असलेले इतर लोकांना फ़ाशी व्हायला हवी होती >> हे मात्र अति झाले. माल उतरवण्यार्या हमालाला हे माहित होते का, कि ह्यात स्फ़ोटके आहेत आणि त्यामुळे ३०० लोक मारले जाणार आहेत? नकळत चुका होतात, पण ज्याने हे जाणुन केले त्याला शिक्षा व्ह्यायलाच हवी.
|
>>> याकुब मेमन ला झालेली फाशी ची शिक्षा मात्र अयोग्य आहे. तो सर्व निधर्मी विचारवंतांच्या एका अतिशय आवडत्या धर्माचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला फाशीच काय, कुठलीच शिक्षा द्यायला नको होती.
|
>>> मुस्लीम द्वेष केल्याशिवाय तुम्ही खरे हिन्दु होणार नाही असे गीतेत कुठे लिहिले आहे का अहिंदू कितीही वाईट असले तरी त्यांचे लाड केल्याशिवाय आणि जातायेता गरीब बिचार्या हिंदूंना झोडपल्याशिवाय तुम्ही खरे निधर्मी होणार नाही असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लिहीले आहे?
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:52 am: |
| 
|
काल किरोन खेर ची प्रतिक्रिया भयानक होती. अंडरवर्ल्ड चा पैसा म्हणे कुठल्या क्षेत्रात नाही, बिझिनेसमधे आहे, पोलिटिक्स मधे आहे. बये तुला माहित आहे ना कुठे आहे तो, निदान तुझ्या क्षेत्रात तरी, मग तोंड उघडुन बोल कि.
|
चित्रसृष्टीतील सर्वांच्या प्रतिक्रिया सावध आहेत. कारण अन्डरवर्ल्डच्या पैशातून होणार्या पिक्चरमधली कामे जायला नकोत ना! इव्हन सोनाली कुलकर्णीनेही समर्थनाचीच प्रतिक्रिया दिलीय. मधुर भांडरकरही त्यातलाच. इतर गुन्हेगारानाही मित्र नातेवाईक असतात पण ते त्याचे जाहीर समर्थन करीत नाहीत. इथे कामे मिळवायची आहेत ना... संजयच्या विरोधात बोलणे म्हणजे दाउदच्या विरोधात बोलणे हे सर्वाना पक्के माहीत आहे.... सबसे बडा रुपया भाया!!!
|
दिनेश किरण खेरची प्रतिक्रिया ऐकुन मिहि हबकलोच. चित्रपटसृश्टीचे सोडा पण केंद्रिय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी पण असच म्हणाला की त्याला शिक्षा व्हायला नको होती म्हणुन. असे हे मंत्री
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:15 am: |
| 
|
न्या. कोदे यांच्यावरही दडपण असल्याचे जाणवते. शिक्षा सुनावल्यावरही त्याला परत बोलावुन अनौअपचारिक बोलले ते. गैर होते ते. सगळे म्हणताहेत, कि तो चांगला माणुस होता. चांगल्या माणसाला, गुन्हा करण्याचा अधिकार आहे ? सुप्रीम कोर्टात काय होते ते बघुया. मला नाही वाटत तो शिक्षा भोगेल ती. अगदीच नाही तर निदान आजारी तरी पडेल, जे जे मधे दाखल होईल. पुढे ....
|
शिक्षा झाली ती माणसाला.. त्याचा आणि मुन्नाभाईचा संबंध जोडू नये... (दिलीप प्रभावळकरांना लोक 'गांधी' म्हणून वागवत नाहीत) BTW त्याचा एक चित्रपट 'खलनायक' पण होता....
|
तो सर्व निधर्मी विचारवंतांच्या एका अतिशय आवडत्या धर्माचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला फाशीच काय, कुठलीच शिक्षा द्यायला नको होती. किती खोटारडेपणा कराल? तसे असते तर टायगर मेमन ला फाशी द्यावी असे मला वाटले नसते.
|
याकूब मेमन शरण आला तरी त्याच्या शिक्षेत फरक पडत नाही हे वर आलेच आहे. शिक्षा फक्त माफीच्या साक्षीदाराला होत नाही. याकूब आला तर तो काही देशप्रेमाने अथवा पश्चातापाने आला नाही.. अब्जावधीच्या प्रॉपर्ट्या जप्त व्हायचाही धोका असतो....
|
खरे गुन्हेगार तर आपण आहोत. आपण का नाही संजय दत्त, सलमानखान, फिरोजखान, महेश मांजरेकर यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकीत? त्यावेळी कलावन्ताची कला आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य वेगळे असते, तो खूप चांगला माणूस आहे, तो भोला आहे, तो चुकीच्या मार्गाने गेला आहे,अशी मानभावी भूमिका घेतो. पण आपण तिकीट काढून दिलेला पैसा शेवटी कोणाला मिळतो आणि त्याचा वापर कशासाठी होतो याचा विचार कोणीच करीत नाही. चित्रपटाच्या नफ्याचा बहुतांश भाग फायनान्सरला म्हणजेच underworld लाच जातो. म्हणजे आपल्या तिकीटाच्या पैशातले काही रुपये तरी ही शस्त्रे आणण्यातच कारणी लागतात हे आपण का ध्यानात घेत नाही? म्हणजे आपले वर्तन कुर्हाडीचा दान्डा अन गोतास काळ असे नाही काय? स्वातंत्रपूर्व काळात परदेशी मालाची होळी करण्यामागे भावना तीच होती... संजय दत्त तर अर्धा मुसलमानच आहे अन त्याचे सर्वच दोस्त तेच आहेत...
|
त्याचबरोबर फ़ाशी ही ' rarest of rarest' आरोपिंना दिली जावी असा नियम आहे. मला तर वाटतय सुप्रिम कोर्ट अजुन काही लोकांची फ़ाशीची शिक्षा कमी करेल>>>>>. ... म्हणजे ही घटना rarest of the rare नाही काय? इथे काय जेरुसलेम अथवा लेबॅनॉन सारखे दर दिवस रुटीन बॉम्बस्फोट होत राहतात की काय. अहो काय ते नित्याचेच आहेत मुम्बईत बॉम्बस्फोट अशी स्थिती आहे काय? ह्या केसमध्ये पोलीसानी पुरावे अत्यन्त भक्कम गोळा केलेले आहेत त्यामुळे वर फार फरक पडेल असे वाटत नाही फारच वयोवृद्धांचा विचार होईल असे वाटते..
|