|
Bee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 7:22 am: |
| 
|
संतोष, मलाही ती फोटूंची लिंक दे..
|
Santu
| |
| Tuesday, May 15, 2007 - 12:39 pm: |
| 
|
लिम्बु, बी अरे बीबीसी वर कुठे तरि होति. आता मला पण सापडत नाहि अजुन बरेच फोटो होते यात. म्हणजे बघ मंगल पांडे ची जी प्रसिद्धी झालि ती या अद्नात विरांना मिळालि नाहि हेच खरे. तात्या टोपे पण जिवंत होते अशी बातमी होती ति बहुदा खरी होती. अशे बरेच तुटक दुवे आहेत बघ या १८५७ च्या इतिहासात
|
Zakki
| |
| Tuesday, May 15, 2007 - 1:21 pm: |
| 
|
एके काळी (म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी, भारताच्या इतिहासात शेकडो वर्षे म्हणजे अगदी अल्प काळ) भारतातले लोक धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या काही चुकीच्या (बायकांचे केस कापणे, सति जाणे, अस्पृश्यता इ.) चालीरीतींना कवटाळून बसले म्हणून त्यांची ऐहिक प्रगति झाली नाही. आता अमेरिका पण त्याच मार्गावर आहे. जुन्या गोष्टी टाकायच्याच नाहीत. आजकालच्या काळात कितीहि निरुपयोगी असल्या तरी. खरे तर बर्याच अमेरिकनांनी रोमन साम्राज्यातले अंतिम दिवस नि अमेरिकेचे आजचे वातावरण यांची तुलना केली आहे, नि निष्कर्श काढला आहे की हा देश जास्त काळ जगातील सर्वात श्रीमंत व बलवान रहाणार नाही!
|
Zakki
| |
| Tuesday, May 15, 2007 - 1:34 pm: |
| 
|
दुसर्या काही बातम्या. ते सायंटिस्ट व श्री. आमटे यांना व्हिसा मिळाला. मोदींना नाही कारण ते भडक वक्तव्ये व पॉलिसी वापरून हिंदूंखेरीज इतरांवर अन्याय करतात म्हणून! असे अमेरिकेचे मत. नि भारतात बहुधा त्या मोदींच्या विरुद्ध हि अनेक लोक सरकारात होते. एकूण हिंदूंच्या बाजूने बोलणार्याला आपल्या बहुसंख्य (नावाच्या) हिंदू राष्ट्रात पाठिंबा मिळणे कठिणच. दुसरी चांगली बातमी: साठ हजार भारतीय IT चे लोक अमेरिका सोडून भारतात परत गेले. अमेरिकेत आता काही आकर्षण असण्याजोगे राहिले नाही. इथले लोक खुळचट, इथले सगळे खोटे. त्यापेक्षा 'आपला' भारत बरा.
|
Mukund
| |
| Tuesday, May 15, 2007 - 8:45 pm: |
| 
|
चिन्मय... मी तुला नम्रपणे विचारत आहे... तु म्हणतोस की अमेरिकेच्या इतिहासात... काळ्या गोर्यांची लढाइ होत असे.. वगैरे.. हे तु इतिहासाच्या कुठल्या पुस्तकात वाचले आहेस? जर तु अमेरिकेचा इतिहास वाचलास.. जो तुला इतिहासाच्या रेप्युटेबल पुस्तकातुन वाचायला मिळेल.... तर तुला बील ऑफ़ राइट्स व खासकरुन सेकंड अमेंडमेंटचा इतिहास मिळु शकेल. राइट टु बेअर आर्म्स ह्या हक्काचा व काळे गोरे वंशभेदाचा काहीही संबंध नाही. अमेरिकेच्या घटनेतील व बील ऑफ़ राइट्स(पहिले १० अमेंडमेंट्स) मधील बहुतेक सारे नियम हे ब्रिटीशांच्या राज्यातल्या कॉमन लॉज मधुन थोडे फेर फार करुनच घेतलेले आहेत. राइट टु बेअर आर्म्स या मुद्यावर फार मोठी चर्चा १७७६ ते १७९१ दरम्यान घडली होती. तु जर जेम्स मॅडीसन व अलेक्झॅंडर हॅमील्टन यांचे फ़ेडरलिस्ट पेपर्स वाचले असशील तर तुला कळुन येईल की त्या मागचे तत्व काय होते. त्या वेळेला( १७७६ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर १५ ते २० वर्षे) अमेरिकेत फ़ेडरलिस्ट(ज्यांना स्ट्रॉंग केंद्रीय सरकार हवे होते.... व केंद्राच्या ताब्यात मजबुत सेना असावी.. राष्ट्राच्या रक्षणाकरता... असे त्यांचे मत होते) व ऍंटी फ़ेडरलीस्ट( ज्यांना स्ट्रॉंग राज्य सरकार हवे होते व केंद्र सरकारची लुडबुड लोकांच्या व राज्यांच्या कारभारात त्यांना नको होती. ते अशा मताचे होते की राज्य सरकारकडे प्रायव्हेट मिलिशिया(आर्म्ड सिटीझन्स!) असावेत व त्यांच्या कडे देश रक्षणाची जबाबदारी असावी... केंद्र सरकारा कडच्या देशसेनेकडे नको....) अशा दोन पक्षात राइट टु बेअर आर्म्स या विषयावर बरीच खडाजंगी झाली होती. अशा प्रायव्हेट सिटीझन्स च्या मिलीशिया ग्रुप मुळे केंद्रसरकारवर आपोआअपच आळा बसेल व त्यामुळे सरकारातील माणसे सत्तेचा गैरफायदा घेणार नाहीत असे ऍंटी फ़ेडरलिस्ट लोकांचे ठाम मत होते व त्यांनीच हे बिल ऑफ़ राइट्स रॅटीफ़ाय करण्यास सगळ्या राज्यांना उद्युक्त केले. त्यामुळे त्यांची जी इच्छा होती की प्रायव्हेट सीटीझन्स नी आर्म्स बाळगुन मिलीशिया ग्रुप्स स्थापन करावेत... ती इच्छा पुर्ण झाली. असे प्रायव्हेट सीटीझन्सचे मिलीशिया ग्रुप्स ही त्या काळाची गरज होती. अशी गरज का तेव्हा भासली त्याचा थोडा उहापोह आता करु.. हे लक्षात घे की १६०० व १७०० या शतकात अमेरिकेत ब्रिटीशांचे राज्य होते. १७५० च्या सुमारास अमेरिकेच्या ज्या पहील्या १३ कॉलनीज होत्या त्यात ब्रिटीश राजवटीबद्दल नाराजी सुरू झाली. व्हर्जीनिया व नॉर्थ कॅरोलायना मधील तंबाखु शेतकरी खुप नाखुश होते कारण तिथली तंबाखु.. म्हणजे कच्चा माल.. ब्रिटीश सरकार इंग्लंडमधे न्यायचे व तिथुन सिगरेटी बनवुन त्या अमेरिकेत आणुन जबरदस्त कर लाउन विकायचे. म्हणजे मेहनत तंबाखु शेतकर्यांची पण फायदा ब्रिटीशांचा. तीच गोष्ट दक्षिणेतल्या जॉर्जीया मधल्या कापुस शेतकर्यांची. तिथला कापुस मॅंचेस्टरमधल्या कारखान्यात जायचा व शिवलेले कपडे इथे भरमसाट कर लावुन विकले जायचे. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमधे ब्रिटीश सत्तेविरुद्ध उद्रेक होउ लागला. किती तरी राज्यात लोकांनी बंदुका जमा करुन सरकारवर अविश्वास असल्यामुळे लोकल मिलीशिया ग्रुप्स स्थापन केले. असे ग्रुप्स ब्रिटीश सरकारला मंजुर नव्हते. त्यामुळे त्यांनी तशा ग्रुप्स वर बंदी आणली व असा नियम केला की लोकांना आर्म्स बाळगण्याची आवश्यकता नाही व ते बेकायदेशीर मानले जाइल. पण असे मिलीशिया ग्रुप्स भुमीगत झाले व या अशाच मिलीशिया ग्रुप्सनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाचा पाया घातला. १७७२ ते १७७६ च्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात या मिलीशिया ग्रुप्स च्या माणसांनी ब्रिटीश सरकारला पळवुन लावण्यात व पराभुत करण्यात मोठा हातभार लावला. त्यामुळे स्वतंत्र्यानंतरही असे मिलिशिया ग्रुप्स देशाच्या रक्षणाकरता असावेत असे बर्याच लोकांना वाटणे काही वावगे नव्हते. जरी नवीन सरकार अमेरिकन लोकांचेच असले तरी सरकार या प्रकाराबद्दल आम जनतेला त्या वेळेला जरा धाक धुकच वाटत होती की केंद्र सरकार जरी आपले असले तरी सरकारमधील लोकांनी जर सरकारच्या ताकदीचा फायदा घेतला तर लोकांनी काय करावे हा मुद्दा त्या वेळेला बर्याच लोकांना महत्वाचा व व्हॅलीड वाटत होता. म्हणुन फ़्रीडम टु बेअर आर्म्स च्या हक्काला अमेरिकेच्या घटनेत जागा मिळाली. हा खरा इतिहास आहे. काल्पनीक नाही. काळ्या गोर्यांची युद्धे होत असत हे मला तरी अमेरिकेच्या इतिहासात ठाउक नाही. हो... काळ्या गुलांमांवरुन अमेरिकेत १८६१ ते १८६५ च्या दरम्यान उत्तरेच्या राज्यांचे दक्षिणेच्या राज्यांशी हातघाइचे प्रदिर्घ युद्ध झाले.. त्याला सिव्हील वॉर म्हणतात.. पण ते काळे व गोरे यांच्यातील युद्ध नव्हते. त्याचे कारण हे होते की उत्तरेच्या राज्यात औद्योगीक क्रांती झाली असल्यामुळे त्यांचे असे मत होते की दक्षिणेच्या राज्यात मोठ्मोठ्या शेतकर्यांनी राखुन ठेवलेले गुलाम व त्यांचे शोषण जरुरीचे नाही व त्यांनी गुलामगीरी नष्ट करावी. दक्षिणेची राज्ये असे म्हणत होती की आमच्या हजारो एकरच्या शेतात राबायला आम्हाला मनुष्यबळ हवे व ते गुलाम आम्ही ठेउच. उत्तरेच्या राज्यांचा अब्राहेम लिंकन तेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष होता. त्याचे तर म्हणणे असे होते की आपला देश जो लिबर्टी व पर्स्युट ऑफ़ हॅपिनेस या तत्वावर आपण उभारला आहे त्या बेसीक तत्वाला गुलामगिरीचे तत्व काटशह देते... History knows his famous Emancipation Proclamation.... Acording to Lincoln... slavery was against the values and principles on which America was built.So he wanted to abolish the slavery. One should read his famous Gettysburg speech.. where hi uttered the famous quote...Democracy is the government Of the people, By the people and For the people... तर असे ते सिव्हील वॉर गुलामगिरी वरुन झाले. पण ते गोरे विरुद्ध काळे असे युद्ध जरुर नव्हते. असो. तुझ्याकडे तशा युद्धांचे दाखले व इतिहास असेल तर मला वाचायला आवडेल.
|
Uday123
| |
| Wednesday, May 16, 2007 - 12:28 am: |
| 
|
मी पण १८५७ चे काही दुर्मिळ फोटो BBC वर पहिले होते http://www.indiandefenceforum.com/index.php/topic,6357.0.html
|
मला असे वाटते की केवळ काही सनसनाटी घटना (जसे व्हर्जिजिया टेकमधे झालेला गोळीबार, कोलंबाईन वगैरे) पाहून, वाचून, ऐकून बंदुकांवर बंदी घालणे चुकीचे आहे. व्हर्जिनिया टेकमधला मुलगा इतका डोकेफिरु होता म्हणून त्याने बंदुक तशी वापरली. जर बंदुक मिळाली नसती तर त्या विकृताने पाईप व खत वापरुन गावठी बॉंब केले असते आणि कित्येक लोक मारले असते. मग काय पाईप व खत ह्या गोष्टींवर बंदी आणायची का? स्वसंरक्षणार्थ कित्येक अमेरिकन लोक शस्त्रे बाळगतात आणि त्याच्या धाकाने कित्येक गुन्हे घडण्यापासून टळतात. पण अशा घटनांना माध्यमे अवाच्या सवा प्रसिद्धी देत नाहीत आणि निव्वळ दुर्घटनांना सवंग प्रसिध्दी देतात. उलट मला वाटते भारतातही कायदेशीर मार्गाने सहज शस्त्रे मिळावीत. कारण रोज दरोडे पडल्याच्या घटना वाचायला मिळतात. कित्येक निरपराध त्यांच्याकडून मरतात, जायबंदी होतात. पोलिस एकतर निष्क्रीय असतात किंवा गुन्हेगारांना सामिल. जबरदस्त वशिला नसेल तर गुन्ह्याचा तपास लागण्याची, गुन्हेगारांना शिक्षा होण्याची शक्यता नाही. वाकड्या मार्गाने जाणारा माणूस शस्त्रे मिळवतोच. सरळमार्गी लोकांना ते अवघड केल्यामुळे ते हतबल झाले आहेत.
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:11 am: |
| 
|
मुकुंद, तुमचा इतका खोल अभ्यास आहे इतिहासाचा.. तुम्ही ह्या विषयात काही पदवी संपादन केलेली आहे का.. मला जरा कुतुहल वाटते आहे तुमच्या ह्या ज्ञानाविषयी... संतोष धन्यवाद...
|
मंदार, काळ्या आणि गोर्यांमधे युद्धे होत असत.त्याचे काही पुरावे देत आहे.शिवाय लिंकन रेसिझम विरुध्द असुनहि त्याने बर्याच वेळा वाद्ग्रस्त विधाने केली होती.मी एक विधान वाचल होत आत्ता नक्की आठवत नाही ज्यात त्याने म्हटल होत की आर्थिक सुधारणा करताना 'स्लेव्हरी' सकट किंवा स्लेव्हरी शिवाय व्हावी याच्या मी विरोधी नाही.म्हणजे तो रेसिसम च्या विरुध्द होत पण त्याने रेसिसम संपाव म्हणुन फ़ार ठोस पावले उचललि नाहित.आणि अमेन्डमेन्ट बद्दल तू लिहिलेल बरोबर असेल पण मी मागे लिहिल्याप्रमाणे पूर्णसत्य नाही. आणि काळ्यांची भिती हे एक कारण होत.त्यामुळेच तिथे १८७१ साली फ़क्त गोर्यांना बन्दुकी ठेवन्यास परवानग़ी होती.गन्स जर मुलभुत हक्क होता तर मग काळ्यांना परवानगी का नव्हती?????? some facts Indian Wars is the name generally used in the United States to describe a series of conflicts between the federal government and Native Americans. Also generally included in this term are those Colonial American wars with Native Americans that preceded the creation of the United States. The wars, which ranged from early 1600s to the Wounded Knee massacre and "closing" of the American frontier in 1890, generally resulted in the conquest of American Indians and their assimilation or forced relocation to Indian reservations. Citing figures from an 1894 estimate by the United States Census Bureau, one scholar has calculated that the more than 40 wars from 1775 to 1890 reportedly claimed the lives of some 45,000 Indians and 19,000 whites. This rough estimate includes women and children on both sides, since noncombatants were often killed in frontier massacres.[1] The Indian Wars comprised a series of smaller wars. American Indians were (and remain) diverse peoples with their own histories; throughout the wars, they were not a single people any more than Europeans were. Living in societies organized in a variety of ways, American Indians usually made decisions about war and peace at the local level, though they sometimes fought as part of formal alliances, such as the Iroquois Confederation, or in temporary confederacies inspired by leaders such as Tecumseh. source-http://en.wikipedia.org/wiki/Indian_Wars
|
White separatism was expressed as early as the age of Thomas Jefferson, who wrote, "Nothing is more certainly written in the book of fate, than that these people are to be free; nor is it less certain that the two races, equally free, cannot live in the same government. Nature, habit, opinion have drawn indelible lines of distinction between them."[3] This view was reiterated at the dawn of the civil rights era when Abraham Lincoln, addressing the African American community wrote: There is much to encourage you. For the sake of your race you should sacrifice something of your present comfort for the purpose of being as grand in that respect as the white people...General Washington himself endured greater physical hardships than if he had remained a British subject, yet he was a happy man because he had engaged in benefiting his race, in doing something for the children of his neighbors, having none of his own. The colony of Liberia has been in existence a long time. In a certain sense it is a success. The old President of Liberia, Roberts, has just been with me--the first time I ever saw him. He says they have within the bounds of that colony between three and four hundred thousand people, or more than in some of our old States, such as Rhode Island or Delaware, or in some of our newer States, and less than in some of our larger ones. They are not all American colonists or their descendants. Something less than 12,000 have been sent thither from this country. Many of the original settlers have died; yet, like people else-where, their offspring outnumber those deceased. The question is, if the colored people are persuaded to go anywhere, why not there? Address On Colonization To A Deputation Of Colored Men. Washington, August 14, 1862. [4] या स्टेटमेन्ट्स वरुन लक्षात येते की रेसिस्म हा पुर्णपणे निशिद्ध नव्हता या नेत्यांना.लिंकन च स्टेटमेंट तर अस म्हणत की तुम्ही अजुन श्रम करा(अजुन गुलामी करा). अजुन एक गोष्ट म्हणजे या युध्दांवर फ़ार रिसर्च करण्यात आलेला नाही एका ठिकाणी तर असही वाचण्यात आल की आत्ता आत्ता इतिहासकार यावर रिसर्च करित आहेत. एक अजुन गोष्ट म्हणजे अमेंडमेन्ट साठी हे कारण ओफ़ीशिअल असू शकत नाही कारण ते म्हणजे सरळ सरळ काळ्यांविरुध्द झाले असते. अजुन काही गोष्टी आहेत त्या नंतर लिहिन.
|
one more thing-book about abrahm lincoln named 'Abraham Lincoln's White Dream' Forced into Glory: Abraham Lincoln's White Dream, commonly abbreviated to the title Forced into Glory is a controversial work by the African American scholar and historian, Lerone Bennett, Jr.. It attacks Abraham Lincoln and claims that his reputation as the "Great Emancipator" is undeserved. The book has been a target of criticism, and has been banned from more conservative literary circles.[citation needed] The introduction to the book states that "[Lerone Bennett]'s basic idea of the book is simple: Everything you think you know about Lincoln and race is wrong. Every schoolchild, for example, knows the story of "the great emancipator" who freed Negroes with a stroke of the pen out of the goodness of his heart. The real Lincoln...was a conservative politician who said repeatedly that he believed in white supremacy. Not only that: He opposed the basic principle of the Emancipation Proclamation until his death and was literally forced--Count Adam Gurowski said he was literally whipped--"into the glory of having issued the Emancipation Proclamation," which Lincoln drafted in such a way that it did not in and of itself free a single slave." The book is dedicated to a plethora of individuals whom Bennett calls "the real abolitionists", including Frederick Douglass, Thadeus Stevens and Wendell Phillips. In the dedication, he praises them for "forc[ing] Lincoln into glory". Several opponents of Bennett state that he is forcing his modern opinions on the past. As an example, the widespread use of the word "nigger" in the Civil War era does not necessarily imply racism.
|
Zakasrao
| |
| Friday, May 18, 2007 - 4:17 am: |
| 
|
काल लोकसत्ता मधे विवा ह्या पुरवणीत सोनाली कुलकर्णी यांचा एक सिगारेट वर लेख वाचनात आला. तो खालील लिन्कवर मिळेल. सिगारेट
|
Slarti
| |
| Friday, May 18, 2007 - 5:00 pm: |
| 
|
चिन्मय, मुद्दा 'लिंकन हा खरंच वर्णद्वेषविरोधी होता का?' असा नसून शस्त्रे बाळगण्याचा अधिकार घटनेत का अंतर्भूत करण्यात आला हा आहे. दुसरे म्हणजे तू युरोपिअन (पक्षी गोरे) व स्थानिक अमेरिकन यांच्यातील युद्धासंबंधी माहिती दिली आहेस. गोरे व काळे यांच्यात युद्धे झाली हा संदर्भ कुठे आहे? मलादेखिल तो संदर्भ वाचायला आवडेल कारण मला इथे काही अमेरिकन लोकांकडून तेच कारण सांगण्यात आले जे मुकुंद यांनी मांडले आहे. आफ्रो-अमेरिकन लोकांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार नव्हता याचे मुख्य कारण त्यांना समान नागरिक मानलेच जात नव्हते हे असावे. त्यांना इतर कुठलेच मूलभूत अधिकार नव्हते तर हा अधिकार तरी कोठून मिळणार? हां, आता हे नक्कीच झाले असणार की गोर्यांनी त्या हक्काचा वापर आ.-अ. लोकांविरुद्ध केला. मुकुंद, या देशात 'फ्रंटियर' काही दशके तरी अस्तित्वात होता. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा देश वसत गेला आहे ना? तर देश असा वसवण्यामागे जे अंगभूत धोके आहेत त्यांचा विचार या अधिकारासंदर्भात केला गेला असेल का? तसे असेल तर चिन्मयने दिलेले europians-natives युद्धाचे संदर्भ संयुक्तिक ठरतात.
|
Zakki
| |
| Friday, May 18, 2007 - 7:29 pm: |
| 
|
कारण काहीहि असो. आता सेकंड अमेंडमेंटच काढून टाका, हे होणार नाही. अधून मधून कुणितरी असा गोळीबार करतात, लोक आरडा ओरडा करतात, विसरून जातात. इथल्या निवडणुकांमधे बाई, काळे, मॉर्मन असणे हेहि मुद्दे महत्वाचे ठरतात! बर्याच लोकांना, त्याहून जास्त अक्कल लागणारे विषय समजत नाहीत, जसे इराक, अर्थव्यवस्था, हेल्थ इन्शुरन्स वगैरे. सध्याच्या निवडणुकांमधे इराक, इमिग्रेशन,अबॉर्शन, हेल्थ इन्शुरन्स हेच विषय महत्वाचे आहेत.
|
Mukund
| |
| Saturday, May 19, 2007 - 6:05 am: |
| 
|
सर्वप्रथम बी.. तुझ्या प्रश्नाचे उत्तर... नाही.... माझ्याकडे इतिहासाची कुठलीही पदवी नाही. निव्वळ या विषयात असलेला रस...खासकरुन अमेरिकेत यायच्या आधीपासुन... या देशामधे कायमचे वास्तव्य करायला यायचे ठरवले तेव्हाच या देशाच्या जडणघडणीच्या इतिहासाबद्दल मला कुतुहुल होते. ज्या देशात वास्तव्य करायचे ठरवले व ज्या देशात मी माझी प्रॅक्टीस करायची ठरवली त्या देशातील लोकांच्या मानसीक व सामाजीक जडणघडणी बद्दल स्वत्:ला माहीती असावी असे मला नेहमीच वाटत आले आहे. मग त्या इच्छेतुनच हा व्यासंग जडला. हा सगळा इतिहास जाणुन घेताना अनेक रंजक गोष्टींची माहीती मिळाली, निरनिराळ्या विचारधारा वाचायला मिळाल्या. मी या देशात फक्त पैसा कमवणे या द्रुष्टीने आलो नव्हतो. माझ्या रुग्णांशी जर विश्वासाने संवाद साधायचा असेल तर त्यांची पार्श्वभुमी मला माहीत असावी या मताचा मी आहे. नुसता या देशाचा इतिहासच नाही तर इथले स्थानीक खेळ व त्याचा इतिहासही मी जाणुन घेतला. कारण रोजच्या जिवनात इथल्या लोकांशी संवाद साधायला मला ते खुप उपयोगाचे ठरले. कालांतराने मला इथले बेसबॉल,अमेरिकन फ़ुटबॉल, बास्केटबॉल हे खेळ आवडुही लागले. या व्यासंगामुळे माझे या देशातले वास्तव्य सुकर झाले असे मला वाटते. अनेक स्थानिक लोक चांगले मित्र झाले. त्यांच्या बरोबर अनेक चर्चासत्रे झाली व त्यातुनही बरेच काही शिकायला मिळाले व या समाजाला त्यांच्या दोषांसाठी नुसते नावे ठेवायच्या व्रुती ऐवजी त्यांच्या कमतरतेंची कारणे समजवुन घेता आली. त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्यांच्यात असलेल्या बर्याच चांगल्या गुणांचे आकलन झाले व ते गुण का व कुठुन आले याचे ज्ञान मिळाले. सगळ्यांचाच द्रुष्टीकोन असा असावा असे मी म्हणत नाही पण मला या इतिहासाचा खुप फायदा झाला. असो. अरे चिन्मय... स्लर्टी ने अचुक शब्दात मी जे म्हणणार होतो ते लिहिले आहे. आपण इथे दुसरे अमेंडमेंट अमेरिकन घटनेत का आले या मुद्द्याबद्दल बोलत होतो. नेटिव्ह अमेरिकन व व्हाइट अमेरिकन यांच्यातल्या चकमकींबद्दल व युद्धांबद्दल नाही. अशी युद्धे सुरु व्हायच्या आधीपासुन दुसरे अमेंडमेंट घटनेत आले आहे. आणी तु काळे गोरे यांच्यातील युद्धे म्हणत होतास.. असो... हा विषय अजुन कुठेतरी भरकटण्या ऐवजी माझ्या वतीने मी हा विषय इथेच थांबवतो. कारण लिंकनला इमॅंसीपेशन ऑफ़ स्लेव्ह्स चे श्रेय द्यावे की नाही,आफ़्रिकन अमेरिकन लोकांना मिळालेली निच व दुटप्पी वागणुक किंवा फ़्रेड्रीक डग्लस याबद्दल लिहिण्यासाठी हा बीबी नाही. त्याला वेगळाच बीबी लागेल... आणी स्लर्टी... तु खुप छान मुद्दा उपस्थित केला आहेस. जाता जाता त्या मुद्याबद्दल दोन शब्द लिहावेसे वाटले.. तु म्हणतोस ते बरोबर आहे की अमेरिकेचा विस्तार पुर्वेपासुन पश्चिमेकडे झाला. त्या पश्चिम भागाला फ़्रंटीअर लॅंड किंवा अमेरिकन वेस्ट असे म्हटले जाते. त्या भागाचा विस्तार होण्यास २ गोष्टी कारणीभुत ठरल्या... पहिली गोष्ट म्हणजे ल्युझीआना पर्चेस.. थॉमस जेफ़रसन जेव्हा १८०० साली अमेरिकेचा तिसरा अध्यक्ष म्हणुन निवडुन आला तेव्हा त्याने फ़्रांसच्या नेपोलिअन बोनापार्ट कडुन सध्याचा... ल्युझीयाना, न्यु मेक्सिको,ऍरिझोना,मिसिसीपी,अर्कॅंसास,कालोराडो,युटाह, आयडाहो,साउथ डाकोटा,नॉर्थ डाकोटा व वायोमिंग असा हा सगळा प्रदेश केवळ १५ मिलीअन्स डॉलर्सला विकत घेतला... त्याला जेफ़रसनचा जिनीयस मास्टर स्ट्रोक म्हणतात... एकही शस्त्र न उचलता एका कुंचल्याच्या फटक्यात व मुत्सत्तेगीरी दाखवुन जेफ़रसनने एका दिवसात अमेरिकेचा भुभाग दुप्पट केला! तेवढेच करुन तो थांबला नाही तर लुइस आणी क्लार्क हे दोन जण तो सगळा नवीन भाग एक्स्प्लोअर करायला पाठ्वुन त्याचा नकाशा, तेथील लोक,भुगोल,वनस्पती,प्राणी या सगळ्यांचा अहवाल त्यांना काढायला सांगीतला. त्यांचे फ़ेमस लुइस आणी क्लार्क एक्सपीडीशन वेल डोक्युमेंटेड आहे. ते मिझुरी मिसिसीपी च्या संगमापासुन सेंट लुइस वरुन निघाले व मिझुरी नदीच्या उलट्या प्रवाहातुन वल्हवत वल्हवत त्यांचे एक्सपीडीशन पार ओरेगॉन आणी वॉशींग्टनच्या पॅसिफ़ीक कोस्ट पर्यंत जाउन पोहोचले! त्यांनी मग त्यांच्या मागुन जाणार्या पायोनीअर अमेरिकन लोकांचे मायग्रेशन सुरु होण्यास असा हातभार लावला. दुसरी महत्वाची गोष्ट अमेरीकन वेस्ट च्या विस्तारास कारणीभुत ठरली म्हणजे १८४८ साली सुरु झालेली कॅलीफ़ोर्नीया गोल्ड रश! सोने सापडले आहे या बातमीने हजारो लाखो प्रॉस्पेक्टर्स कॅलिफ़ोर्नियात नशीब अजमावयाला निघाले. बहुतेक अपेशी ठरले पण नुसत्या आशेवर लाखोंच्या संख्येने लोक पश्चिमेला जाउ लागले. आता त्या वेस्टवर्ड मायग्रेशनच्या संदर्भात बंदुका बाळगण्याचे स्वातंत्र्य असावे हे कारण वावगे वाटत नाही. पण हे मायग्रेशन आधीपासुन १७७० साली ठरलेले असेल असे मला तरी वाटत नाही व इतिहासातही तसा संदर्भ माझ्या तरी वाचण्यात नाही आला. पण इट्स अ प्लॉझीबल रिझन! एवढी दुरद्रुष्टी जर अमेरिकेच्या फ़ाउंडींग फ़ादर्स ना असेल तर त्यांना खरच ग्रेट म्हटले पाहीजे.. असो विषयांतराबद्दल क्षमस्व.. माझ्या वतीने हा गन डिबेट मी इथेच संपवतो... आणी हो... झक्की... तुमच्या वरील पोस्टाला १००% अनुमोदन!थोडक्या शब्दात अगदी अचुक लिहिले आहेत तुम्ही
|
Chyayla
| |
| Saturday, May 19, 2007 - 6:19 am: |
| 
|
मुकुन्द खुपच छान माहिती दीलीत, नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपुर्ण, मनोरन्जक लेख आहे. त्यानिमित्याने तुमच्या व्यक्तिमत्वाचा छान पैलु दीसुन येतो.
|
Farend
| |
| Saturday, May 19, 2007 - 7:18 am: |
| 
|
सॅन फ्रान्सिको च्या 49rs फूटबॉल टीम चे नावही बहुधा त्या १८४९ साली आलेल्या कोणत्यातरी लोकांना 49rs म्हणत त्यावरून घेतलेले असावे. परवाची South Carolina Republican debate कोणी पाहिली का? फार मजेदार होती.
|
मुकुंद तुला अमेरिकेच्या इतिहासाबद्दल असलेली माहिती अप्रतीम आहे. मी मांडलेले मुद्दे मुख्यत्वे एका अमेरिकन पत्रकाराशी गन्सबाबत केलेल्या चर्चेवर आधारीत होते.त्या माणसाने आता पत्रकारीता सोडलेली आहे कारण त्याचा अमेरिकेतिल 'मिडिया सिस्टीम'वरून विश्वास उडालेला आहे.कारण अनेक वर्ष मिळवलेल्या माहितीवरुन त्याच्या अस लक्षात आलं की अमेरिकेत जे काही सांगितल जात शिकवल जात ते सर्व सरकार 'कंन्ट्रोल'करत. हे लिहिण्यामागचा मुद्दा हा की त्यानी केलेल्या 'रिसर्च'नंतर त्याला अस कळला होत की गन्स अमेंडमेन्ट्मागे पण काही 'अनसेड' गोष्टी होत्या. आणि इतिहासातिल युध्दांबाबतही आहेत.मी त्याच्याशी पुन्हा या विषयावर संपर्क साधायचा प्रयत्न केला पण तो आता इथे राहत नाही.त्याच्याशी पुन्हा संपर्क झाला की मी याबद्दल लिहिन आणि त्याच्याकडून याबद्दल पुरावे घेण्याचा प्रयत्न करेन.मला सध्या या विषयावर माहिती मिळवायला वेळ नाही. गन्सचा विषय माझ्यामुळे वहावत गेला असल्यास क्षमस्व. पण मी अजुनही गन्सविरोधीच आहे आणि गन्स जर माथेफ़िरुंना मिळाल्या नाहित तर ह्या घटना झाल्या नसत्या हेही तितकच खर.शिवाय गन्स वर जर निर्बंध आणले तर लोकशाहीला खिळ पोहोचेल असे जर अमेरिकन समजत असतिल तर तेही चुकिचे. मायकल मुरच्या 'बोलिंग फ़ॉर कोलंबाईन'हा या विषयावरील चित्रपट पहाण्यासारखा आहे
|
Sashal
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:07 pm: |
| 
|
http://www.msnbc.msn.com/id/18841574/?GT1=9951 जग कुठून कुठे चाललय???
|
Suyog
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:38 am: |
| 
|
नवरा हवा आयटीतलाच! देखणा, स्वत:चे घर असणारा, 'लठ्ठ' पगार, 'सरकारी' वाटावी, इतकी कायम नोकरी. अशा अपेक्षांना गेल्या काही वर्षांपर्यंत 'वरचा क्रमांक' मिळत होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्या वेगाने पुसल्या जाऊन 'आयटी प्रोफेशनल' ही एकच अपेक्षा लग्नाच्या बाजारात हिट ठरत आहे. विवाहमंडळे, 'वर पाहिजे'छापाच्या जाहिराती आणि मॅट्रिमोनिअल वेबसाइटसवर आता आयटी क्षेत्रातील मुलांनाच लग्नासाठी प्राधान्य मिळत आहे. या नव्या ट्रेंडमुळे सरकारी नोकरीतील वरांची डिमांड चक्क कमी होत आहे! दशकभरापूवीर् बँकेतल्या तरुणांना लग्नाच्या बाजारात बरीच मागणी होती. नोकरीची सुरक्षितता, चांगला पगार आणि अन्य सोयींमुळे मुली याच क्षेत्रातील मुलांना पसंती देत होत्या. मात्र, आता आयटीमधील मुलांनी बाजी मारल्याचे विवाह 'जुळवणाऱ्या' एका वेबसाइटच्या सीईओंचे मत आहे. आयटी क्षेत्रात मिळणारा पगार आणि वेगाने होणारी प्रमोशन्स हे इच्छुक वधुंसाठी प्रमुख आकर्षण ठरते. आयटीतील वर मिळावा, ही तरुणींची इच्छा असतेच. मात्र, जावई या क्षेत्रातला असावा, यासाठी मुलींचे आईवडीलही प्रयत्नशील असल्याचे या विवाहमंडळांशी संबंधित शण्मुगम या कार्यर्कत्याने सांगितले. लग्नासाठी वाढीव खर्च करणे, मुलाच्या इच्छेप्रमाणे थाटात लग्न करणे, शिवाय हुंड्यासाठी भरघोस रक्कम देण्याचीही पालकांची तयारी असते. शण्मुगमकडे येणाऱ्या बायोडेटांपैकी सुमारे ७० टक्के आयटीतील तरुणांचे असतात. आयटी प्रोफेशनल्सची प्रगती करिअरच्या प्राथमिक टप्प्यापासूनच सुरू होते. २४व्या वषीर्च हे तरुण भलेमोठे घर, गाडी आणि 'हायफाय' जीवनपद्धती अवलंबू शकतात. मात्र, इतर क्षेत्रांमध्ये ही सगळी सुखे मिळवण्यासाठी अनेक वषेर् वाट पाहावी लागते. ती मिळवता मिळवता कर्जांचे डोंगर उभे राहतात. यामुळे वैवाहिक आयुष्य सुखी होण्यासाठी हल्ली मुली अधिक पगार असलेली मुलेच निवडतात, असे शण्मुगम सांगतो. (वृत्तसंस्था) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2081188.cms
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|